न्युयॉर्क

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
2 Dec 2009 - 9:56 pm

"भे**...मी NY ला येतोय या थँक्सगिविंगच्या सुट्टीला.....आयेगा नं तू मिलने???"
ऑफिसमधला एक जुना मित्र जो आता दुसर्‍या कंपनीत आहे तो जीमेलवर बोलत होता. शेवटची भेट झालेली दीड वर्षापूर्वी....त्याच्या अमेरिकेला जाणार म्हणून दिलेल्या पार्टीला...

ईकडे रूमपार्टनर्स आणी बाकिच्या मित्रांचा वॉशिंग्टन डी सी आणी अटलांटीक सिटी ला जायचा प्लान फिसकटला..

म्हणून मग न्युयॉर्क ला जायचं ठरवलं..आधीचा विकांत पण एका मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी न्युयॉर्कची नाईट लाईफ हुंगण्यात गेला होता. यावेळेस काही प्रसिध्द ठिकाणं पाहण्याचे ठरवले..

थँक्सगिविंग डे ला न्युयॉर्कचे एक आकर्षण असते ते म्हणजे मेसीची थँक्सगिविंग डे परेड. ही परेड दरवर्षी मेसी नावाचे एक भलेमोठे डिपार्टमेंटल स्टोअर भरवते. ह्या परेडला ८५ वर्षांचा इतिहास आहे आणी ही अमेरिकेतली सर्वात जुनी दोन नंबरची थँक्सगिविंग डे परेड आहे.

न्युयॉर्कला जाणासाठी मी आदल्या दिवशीच मावसभावाकडे न्युजर्सी ला जाउन राहिलो..तिकडून मेट्रोने प्रवास करुन न्युयॉर्कच्या ३४व्या रस्त्यावरच्या जगप्रसिध्द Penn(Pennsylvania) स्टेशन वर उतरलो. ह्या स्टेशनच्या वर जगप्रसिध्द असा मॅडिसन स्केअर गार्डन अरिना आहे. इथे बास्केटबॉल, बॉक्सिंग ई. चे सामने होत असतात. हे असे ठिकाण आहे कि जेथे जिवंत रेल्वे रूळांवर जगातला सर्वात मोठा शॉपिंग मॉल आणी मैदान आहे.

त्याच चौकातून दिसणारी ही कधीकाळची जगातील सगळ्यात उंच इमारत...एंपायर स्टेट बिल्डींग..

मग आम्ही चालत परेड पहायला निघालो....

या परेड मधे १५०० नर्तक, चीअरलीडर्स, गायक यांनी भाग घेतला होता. लहान मुलांसाठी आकर्षण म्हणून १५ भलेमोठे कार्टून फुगेही होते.
यावर्षीचे काही फुगे होते Sailor Mickey, Ronald McDonald, Spiderman आणी Pillsbury Doughboy.

परेड संपल्यावर पावले वळली सरवाणा भवन कडे...तिथे मस्त असा डोसा, घी पोंगल, साउथ इंडियन थाळी खाउन, ताक पिउन मन तृप्त केले.

आता वेध लागले ते सेंट्रल पार्कचे...आपल्या राजीव गांधी नॅशनल पार्क प्रमाणेच हे एक मॅनहॅटन मधील एक खुप मोठे पार्क आहे...इथे जाण्यात एक आतला हेतू होता की पार्कमधे एखादा रिकामा बेंच पाहून मस्तपैकी ताणून द्यायची.

पुढील भागात - वॉल स्ट्रीट, सॅटन आयलंड फेरीवरून बराचसा जवळून दिसणारा लिबर्टी बाईचा पुतळा , चार्गिंग बुल याबद्दल.

संस्कृतीराहणीमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

2 Dec 2009 - 10:09 pm | टारझन

झाली का तुझी हिरवा माज दाखवायला सुरूवात ?
फोटो पाहून दिपलोय .. सांगुन ठेवतो .. ज्यास बोलायचं काम नाय !!
आमचा बी नंबर यील !

-- (ड्रिम अमेरिकन) टारझन

ऋषिकेश's picture

2 Dec 2009 - 10:41 pm | ऋषिकेश

वा!
मी युएस्ला पहिल्यांदा गेलो ते न्यूयॉर्कलाच.. आणि त्या शहराने मला नकळत आपलंस करून टाकलं.
मुंबईसारखंच धावतं पळतं न्यूयॉर्क पून्हा बघून फार बरं वाटलं.. धन्यवाद!!!

जाहिरातः यानिमित्ताने मी लिहिलेलं अमेरिकायण! मधील न्यूयॉर्क आठवलं :)

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

मस्तानी's picture

2 Dec 2009 - 10:58 pm | मस्तानी

न्यूयोर्क ला बरंच काही पाहायचं राहून गेलंय पण पहिल्या भेटीत लक्षात काय राहिलं तर मेट्रो चा प्रवास ... मुंबई च्या लोकल सारखं दरवाजात उभं राहून नाही तरी पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या करणारा तो मेट्रो चा प्रवास मस्तच ... ती मेसीज ची परेड आम्ही आपली घरी टीव्ही वरच पाहिली :)

भानस's picture

3 Dec 2009 - 12:40 am | भानस

सारवणाभवनाचा फोटो पाहून अगदी त्रास त्रास झालाय..... सगळेच फोटो छान.

गणपा's picture

3 Dec 2009 - 2:21 am | गणपा

लेका कंपनीने तुला कामासाठी पाठवलय का एकडे वेळ जात न्हवता म्हणुन तिकडे फिरायला पाठवलाय रे तुला..
काम करायची सोडुन फिरता कसले रे..
ही होती जळजळ बाहेर पडली एकदाची..

आता संथ ऐकेनाथ प्रतिक्रिया..
वा वा.. छान छान.. असाच भटकत रहा देशोदेशी आणि आम्हालाही फिरवुन आण तुझ्या सोबतीने..

नॉर्मल प्रतिक्रिया
मस्त रे प्रभ्या लेका तिथे गेलास आणि आयता फेस्टिव्ह सिझन मिळाला तुला भटकायला.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

-माझी खादाडी.

स्वाती२'s picture

3 Dec 2009 - 3:34 am | स्वाती२

न्यूयॉर्कच्या फोटोमधे पण छळायला डोसा?
बाकी परेडचे फोटो मस्त. दोन वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. गावाकडला माणूस मुंबै बघायला आल्यावर त्याला जसे वाटेल तसे काहिसे वाटले.

चित्रा's picture

3 Dec 2009 - 8:35 am | चित्रा

बरीचशी मुंबईची आठवण येते न्यूयॉर्कला गेले की.

मदनबाण's picture

3 Dec 2009 - 8:41 am | मदनबाण

छान फोटो... पुढच्या भागाची वाट पाहतो.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

नीधप's picture

3 Dec 2009 - 8:49 am | नीधप

आहा न्यूयॉर्क...
माझं फार आवडतं शहर आहे. विशेषतः व्हिलेजमधून एकट्याने भटकणं तर सगळ्यात बेष्ट!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:56 am | विसोबा खेचर

वा छान..

दशानन's picture

3 Dec 2009 - 9:14 am | दशानन

मस्त फोटो..
अमेरिका तुला चांगलीच मानवलेली दिसत आहे ;)

येताना जरा माती घेऊन ये रे.. आम्ही पण बघावी म्हणतो अमेरिकेची माती. हिरवीच असते काय बे :)

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2009 - 9:32 am | llपुण्याचे पेशवेll

अरे प्रभ्या तू नवयार्कात गेलास आणि टाईम्स स्क्वेअर, ब्रूक्लिन ब्रिज पाहीला नाहीस, मग तू न्यू यॉर्क फिरलाच नाहीस. (जमलं ना विजुभाऊ?).
असो न्यूयॉर्कला गेलाच आहेस तर वर्ल्ड ट्रेड सेंटरची साईटही बघ, न्यू यॉर्क स्टॉक एस्क्चेंज बघ, ब्रूक्लिन ब्रिज बघ. मजा मजा कर.
(हे सगळे मीही तिकडे होतो हे सांगायला)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रभो's picture

3 Dec 2009 - 10:16 am | प्रभो

अरे पुप्या ते क्रमशः मधे आहे रे... :)
जाउन आलोय...टंकायचं बाकी आहे..

बाकी तुझ्या प्रतिसादानी विजुभाऊंची छाती २ इंच फुगली असेल.. =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टारझन's picture

3 Dec 2009 - 12:29 pm | टारझन

बाकी तुझ्या प्रतिसादानी विजुभाऊंची छाती २ इंच फुगली असेल..

स्वतःच्याच लेखावर असा पाण्चटपणा ? =)) लेका तुझं लक्ष कोणाची किती फुगली ह्याच्याकडेच !!

- (निरिक्षक) फुगारंग

sneharani's picture

3 Dec 2009 - 12:02 pm | sneharani

छान फोटो आहेत.
:)

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 12:20 pm | श्रावण मोडक

छान!

सुमीत भातखंडे's picture

3 Dec 2009 - 12:35 pm | सुमीत भातखंडे

मलाही तिकडे फिरताना मुंबईचीच आठवण येत होती.

बाकी फोटो मस्त.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

विशाल कुलकर्णी's picture

3 Dec 2009 - 12:48 pm | विशाल कुलकर्णी

जुन्या आठवणी जाग्या केल्यास यार ! गेले ते दिन गेले.....
मजा आली फोटो पाहताना.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2009 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

न्यूयॉर्कमधे जॉन आणि नील नाही भेटले?

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2009 - 1:21 pm | बिपिन कार्यकर्ते

वाटलंच... तुमचं लक्ष तिकडेच. :D

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2009 - 1:07 pm | बिपिन कार्यकर्ते

डोसा छान! के व ळ अ प्र ति म !!

(शारजाच्या सरवानाभवनवर पोसलेला) बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

3 Dec 2009 - 1:42 pm | अवलिया

छान !

--अवलिया

क्रान्ति's picture

3 Dec 2009 - 7:17 pm | क्रान्ति

मस्त फोटो ! घरबसल्या न्यूयॉर्कची मिनी सफर झाली! डोसा भारीच! :)

क्रान्ति
अग्निसखा

प्रमेय's picture

8 Dec 2009 - 3:55 am | प्रमेय

जरा उशीर झाला प्रतिक्रिया द्यायला रे...
छान आहे रे फोटो?
जरा भेटायचे पण ठरव आता, काय?