<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
30 Nov 2009 - 2:48 pm

गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे.
अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.)

==============

दिसलीस तू.. भेटलीस तू..
थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन)
थांबला जणू रस्ता तेवढा
जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू !

भासलीस तू कापरापरी,
काजळी जणू.. काळजावरी
लखलखती भिंगे ढापणी
सांगती तुझी बातमी खरी

न स्मित मोजके, न बोलणे कमी
नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या..
जे मनात ते, बोललो कुठे?
होत राहिले हेच नेहमी..

ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे..
आळसावणे.. डुलकणे तुझे..
त्या कळा कुठे? बेरंग ते कुठे?
लोपले कुठे.. पेंगणे तुझे?

शब्द का मुके? मौन बोलके..?
तोंड दाबूनी जरा, बोल नेमके
सांग कल्पना, सांग शक्यता
दे वेदना.. आण हुंदके!

कळे ना मला , तू टोचते कुठे?
काय वाटते? तू बोचते कुठे?
शिजवतेस तू त्या तटावरी..
या तटावरी पचते कुठे?

तीच तू जरी.. तोच मी जरी
वेगळे किती वाटतो तरी !
एवढी कशी वाढली वजने?
वाढली कधी, सांग ही ढेरी?

मोकळी कधी ही व्हायची
ट्रॅफीक ती वाहनांची ?
हॉर्न वाजले.. पो पॉ टीर्र ठ्रँ
वेळ जाहली..तू सूटायची
.
.
.
काय घेतले? काय मी दिले?
वय वाढले? दोंद सुटले ?
म्हणतो आता एवढेच
बरे जाहले.. नाही जमले ते
बरे जाहले जे जाहले ते
( मी सूटलो ना एका अवजड जबाबदारीतून ........ आगागागागागागागागा )

भयानकहास्यकरुणनृत्यसंस्कृतीवावर

प्रतिक्रिया

गणपा's picture

30 Nov 2009 - 3:07 pm | गणपा

बरच शीघ्र विडंबन पाडलतकी विजुभौ..
हे ही आवडलं.

ज्ञानेश...'s picture

30 Nov 2009 - 3:07 pm | ज्ञानेश...

केशवसुमार, खोडसाळ यांची विडंबने वाचावीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Nov 2009 - 3:12 pm | llपुण्याचे पेशवेll

खुलाशाबद्दल धन्यवाद. केसुंची विडंबने वाचली आहेत. हे 'खोडसाळ' विडंबनकारांची विडंबने कुठं वाचायला मिळतील याचाही खुलासा केलात तर बरे वाटेल. असो.
मूळ कविता व विडंबन २ही छाण.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अवलिया's picture

30 Nov 2009 - 4:48 pm | अवलिया

पुपेशी सहमत !!

--अवलिया

प्रभो's picture

30 Nov 2009 - 9:21 pm | प्रभो

नानाशी बाय डीफॉल्ट सहमत.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

jaypal's picture

30 Nov 2009 - 5:46 pm | jaypal

पुण्याच्या पेशव्यांशी १००% सहमत
मुळ कविते इतकाच विडंबनाचा पण अस्वाद घेतला.

विनायक प्रभू's picture

30 Nov 2009 - 5:50 pm | विनायक प्रभू

आधी विडंबनाचा आणि नंतर मुळ कवितेचा आस्वाद घेतला.
दोन्हीही भारी.

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Dec 2009 - 4:33 pm | ब्रिटिश टिंग्या

गुर्जींशी सहमत!

विजुभाऊ's picture

1 Dec 2009 - 6:09 pm | विजुभाऊ

टार्‍याची अनुभवकथा पोपट वाचल्यावर मला हा एक अनुभव आठवला .
बरे झाले ते ती अवजड वस्तु झेपलीच नसती ( हुश्श्श्श्श.....)