हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :)
पत्र क्रमांक - १
बेटा नंदन,
अनेक आशीर्वाद!
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!
सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे. मुंबै-दिल्ली-बंगळुरातले बिनबाह्यांचे आधुनिक आणि फ्यॅशनेबल स्त्री-सौंदर्य, पेशवाई ब्राह्मणी-कायस्थी -घाटी मराठी स्त्री-सौंदर्य, कधी अत्यंत देखण्या तर गुडीगुडी गोडगोड गुजराथी खमण-ठेपला अने ढोकलावाल्या भाभ्यांचे स्त्री-सौंदर्य, तर कधी लस्सीसारखे घट्ट-आव्हानात्मक-उफाड्याचे-मक्कई रोटीसारखे गरमागरम पंजाबी स्त्री-सौंदर्य!
नखर्यानटव्याचे-लाडीक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्यानीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडीकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य!
आणि सरतेशेवटी सुंदर मोकळा केशसम्भार, आखीवरेखीव भुवया, सुंदर नाकेलं नाक, बोलके डोळे असलेलं,आणि जीवघेण्या बांध्याचं दाक्षिणात्य स्त्री-सौंदर्य!
असं हे विविधतेने नटलेलं भारतीय स्त्री-सौंदर्यच या जगात आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे! नाय, तश्या तुमच्या अमेरीकन नी कोरीयन, नी रश्शियन, नी विंगलंड, नी जापनीज बायड्या असतीलही छान, परंतु बेटा नंदन,
स्त्री-सौदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही रे!
असो..
बाळ नंदन, आता भारतीय स्त्री-सौंदर्याचे महाराष्ट्र-राजस्थान-मल्लूकेरळ इत्यादी विभागवार वर्णन करणारी स्वतंत्र पत्रे तुला सवडीने पाठवीनच! चला, या निमित्ताने तुझा हा हट्ट मला पुरा करता येतोय याचे समाधान आहे हो! :)
तुझा,
तात्या.
प्रतिक्रिया
21 Nov 2009 - 12:22 pm | अवलिया
सुरवात तर चांगली झाली आहे. पुढील पत्रांमधुन भारतीय स्री सौंदर्यावर रोशनी पडो आणि नंद्या मार्गाला लागो !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
21 Nov 2009 - 12:23 pm | jaypal
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Nov 2009 - 12:29 pm | प्रभो
स्त्रीसंत तात्याबा महाराज अमर रहे...
असच लिहून सगळ्यांवर रोशनी टाका.....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 12:32 pm | विसोबा खेचर
अरे मी आहे अजून.....! :)
तात्या.
21 Nov 2009 - 12:43 pm | प्रभो
बरं मग...
तात्या जिये हजारो साल..साल के दिन हो पचास हजार.... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 1:01 pm | अवलिया
>>>अरे मी आहे अजून.....!
हा निष्कर्ष कसा काढलात ?
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
21 Nov 2009 - 1:15 pm | प्रभो
>>हा निष्कर्ष कसा काढलात ?
ह्म्म...
तात्याबा स्वर्गवासी झाल्याचे कमीत कमी १० फोटो पाहिल्याचे मला आठवतंय..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 12:41 pm | नंदन
क्या बात है! सौंदर्याबाबत 'मनसे' नव्हे तर दिलसे काम घ्यावे, हे खरं. बाकी अंमळ खाद्य-पेययात्रेचा पुढचा भाग वाचतो आहे की काय असा भास झाला ;)
--- आवड आपली आपली. अरे पण शिंडी राहिली की :)
बाकी मी न केलेल्या हट्टामुळे का होईना, तात्याने नवीन लेखमाला लिहायला लेखणी उचलली हे काय कमी आहे? पुढच्या भागांची वाट पाहतो :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2009 - 12:53 pm | मधु मलुष्टे ज्य...
वाह मस्त. हात आ़खडता घेतलात पण पुढचे भाग न विसरता टाका.
१०० सुंदर भारतीय ललना
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
21 Nov 2009 - 12:54 pm | प्रभो
पहिला आणी तिसरा फोटो ज्ज्याम आवडला...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 1:16 pm | समंजस
संगीत उपासक, साहित्य उपासक अशी तात्यांची रुपे बघतच आलो आहोत.
आता या लेखमालेच्या निमीत्ताने सौंदर्य उपासक असलेल्या तात्यांच्या ह्या रुपाची सुद्धा चांगलीच ओळख होणार तर :D
21 Nov 2009 - 1:45 pm | विनायक प्रभू
काय ठरले नंदनभौ?
21 Nov 2009 - 4:54 pm | नंदन
ठरायचंय काय, सर? टीआरपी वर आणायचे प्रयत्न. उदा. हे पहा ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2009 - 4:59 pm | अवलिया
हा हा हा
म्हणजे ऑनलाईन दुनियादारीच्या कोर्स मधला हा पहिला चाप्टर म्हणता येईल.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
21 Nov 2009 - 5:05 pm | नंदन
पहिला चाप्टर म्हणता येईल, पण पुनरावृत्ती होत असते अधूनमधून. विसरलास का तुझी प्रतिक्रिया? :D
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2009 - 5:14 pm | अवलिया
घ्या ! म्हणजे तुम्हाला सध्या बक्कळ टैम दिसतोय.. जुनं पुराणं उकरुन काढताय!
पुर्वेकडे चक्कर मारुन तिथलं कल्चर पाहुन नवयौवन संजीवनी प्राप्त करुन आलेल्या आपल्या अजुन यौवनात मी सिद्ध करणा-या संतश्रेष्ठ हभप (हळुच भलतीकडे पहाणारे) गुरुबद्दलच्या आमच्याच जुन्या प्रतिक्रिया दाखवुन तुम्ही गुरुबद्दल अनादराची भावना प्रकट केली आहे त्याचे पापक्षालन करणे गरजेचे आहे.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
21 Nov 2009 - 4:38 pm | टारझन
कोदांनी जरूर वाचावा असा धागा !! ते बिचारे पौगंडावस्थेत असुन पार डोक्याचे किस पाडणारे लेख लिहीतंय :) ...
एक कोदा आहे .. पौगंडावस्थेत असुन तसा वागत नाही , आणि एक राजे आहे ... जो पार वय निघुन गेलं तरी अजुन पौगंडावस्थेतुन निघत नाहीये ;)
- (सौंदर्यसाबण) ट्रक्स
21 Nov 2009 - 10:07 pm | प्रभो
ठ्यॉ....
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
22 Nov 2009 - 12:30 am | श्रावण मोडक
मला वाटलं स्रीसंत आणि स्त्रीसंत (चंद्रशेखर - तोच हो तोच, ज्याच्या एका हातातून दोन वेगळ्या प्रकारचे चेंडू पडायचे असं सारे फलंदाज म्हणायचे) हे एकच असावं. शेवटी हे सगळं शुद्धलेखन. हे काही आपल्याला कळत नाही. ;)
22 Nov 2009 - 7:13 pm | धनंजय
अगदी दिलसे-जिगरसे लिहिलेली मालिका वाचण्यास उत्सूक आहे :-)
22 Nov 2009 - 7:47 pm | चतुरंग
तो नंदन तिकडे त्या अमेरिकेत सुदूर पश्चिमेस आणि त्यातही अतीव दक्षिण टोकास जाऊन बसलाय, रखरखीत वाळवंटी प्रदेश सगळा! ;)
सौंदर्यानुभूती बद्दल आपल्याशिवाय इतक्या अधिकारवाणीने कोण बरे लिहू शकेल? तेव्हा ही मालिका सुरू राहूदे आम्हीही वाचूच चवीचवीने! :D
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या मालिकेच्या निमित्ताने उचललेली लेखणी आता कशाकशावर बरं 'रोशनी' टाकेल? :?)
(रोशन)चतुरंग
22 Nov 2009 - 7:49 pm | अमृतांजन
भारतीय स्त्रीचे सौंदर्य उत्त्रोत्तर खूलत जाते ह्याविषयी शंकाच नाही. आता हेच पहा ना-
आजच लग्न झालेली शिल्पा लहानपणी म्हणे अशी दिसत होती-
तिचे बाकीचे लहानपणीचे फोटो येथे बघावयास मिळतील.
23 Nov 2009 - 4:58 am | निमीत्त मात्र
जिसको भगवान नही देता उसको डॉक्टर देता है!
-राखी सावंत
23 Nov 2009 - 2:55 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
_/\_
सादर प्रणाम!!
-(मिक्का) ध.
22 Nov 2009 - 9:25 pm | मदनबाण
श्रीसंत तात्याबा महाराजांचे पुढील पत्र व्यवहार वाचण्यास उत्सुक...
तेव्हढंच आमच्याही ज्ञानात भर पडेल !!! ;)
(सदा वर फिदा)... ;)
मदनबाण.....
23 Nov 2009 - 7:23 am | संदीप चित्रे
एका सुरेख आणि नाजूक विषयाबद्दल लेखमाला लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन ! पुढील लेखनाची उत्सुकतेने वाट बघतोय.
23 Nov 2009 - 6:12 pm | सूहास (not verified)
जोरदार!!
सू हा स...