मंडळ निघालं गोव्याला

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
4 Nov 2009 - 4:45 pm

"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर....
असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात".... कोण बोललं ते हे आजूनही आठवत नाही..

कारण होतं इंजिनियरींच्या शेवटच्या वर्षाचा शेवट्च्या सेमचा शेवटचा पेपर संपल्याचं.....
पेपर संपल्या संपल्या कॉलेजसमोर एक मस्त दहाहजारी माळ लावली गेली....
ताड्ताड उडणार्‍या त्या माळेवर सर्वांनी ठेका धरला.....मेकॅनिकल च्या पोरांनी ढोल-ताशांची सोय आधीच केलेली होती....
जणू काही डिग्र्या मिळाल्याच्या आवेशात अनेकांनी कागदाचे चिटोरे हवेत फेकले..टोप्या उडवल्या....
जणू काही ते आमची सध्याची मनस्थितीच व्यक्त करत होते...हो मुक्त...स्वतः काहीतरी करून दाखव...
फुरफुरणार्‍या वार्‍याबरोबर ते कागद आमच्यापासून दूर जात होते...
जणू काही ही येणार्‍या काळाची दिशाच वार्‍याच्या रूपाने दर्शवत होती की....
किती वल्गना कराल....होईल ते माझ्या मनाप्रमाणेच....
उद्या जाल तुम्ही नोकरीच्या निमित्ताने...भेटायला सोडा बोलायची पण मारामार होईल...मग बघेन मी...

इतक्यात काही टवाळांनी सटासट १०-१५ रॉकेट्स प्रिंसीच्या ऑफिसचा रोख धरून उडवले...
ज्यांचा त्यावर राग त्या तिघाघौघांनी बियरच्या बाटल्या ही फोडल्या लायब्ररीसमोर....
आणी वसकन अंगावर आलेल्या सिक्युरिटीला पाहून फोटो काढण्यात गुंग असलेली पोरं पांगली.

बराच काळ गेला आणी हा विषय बाजूला पडला...
मधेच सुशांतच्या एका लग्नाच्या गोष्टीचं महाभारत पण झालं........
सगळं सेटल झाल्यावर या विषयावरची खपली निघाली... मेल वर मेल चे ढीग पडायला लागले.....कंपूबाजी होऊ लागली.....हो नाही करत करत २-४ योध्दे गारद होत दहा जण तयार झाले...
बॅचलर ट्रिप असल्याकारणे सुश्या पण बाद झाला......तयार दहा लंगूर होते ते असे..

दिग्या उर्फ दिगंबर : बेणं मालदार.....मालेगाव के शोले....लहा्नपणी पोलियो झाल्याने एक हात थोडा वाकडा..पण मनाने सरळ आणी जरा थोडा भित्राही...बोलण्यात अडखळायचा पण फमिने मधल्या शाहीदप्रमाणे किशोरची गाणी न अडखळता म्हणायचा... नागपूरला मेडीकल मधे मन रमलं नाही म्हणून डिप्लोमाकरून येडझवं आमच्या कॉलेजात इंजिनियरींग करत होतं....ही मंडळाची पतसंस्था पण होती....प्रोजेक्ट पार्टनर...आणी हो...समोरच्याचं डोकं खायची फार हौस याला...

गफ्फुर (चरसी),अनप्या,बायको उर्फ अनुप : आमच्या मंडळाची जान...ह्याची बाची एकमेव अशी एम-८० आमची चार-चार धूडं उचचून कॉलेजला वहायची.... लोकलाईट... ह्याचं राहण असायचं आमच्या रूमवरचं (मंडळानी दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते..थोडे दूर दूर)...फक्त आंघोळीला आणी दोन वेळा जेवायला बेणं घरी जायचं....म्हणून बायको...जणू काही आमची रूम म्हणजे सासर तर स्वतःच घर म्हणजे माहेर....माझा जिवाभावाचा मित्र...प्रोजेक्ट पार्टनर...शेवटचं दीड वर्ष माझ्या फ्लॅटच्या गच्चीत बसून चांदण्या मोजत गप्पा मारायचो आम्ही...दोघांचा दिनक्रम ही ठरलेला...सकाळी ५-६ ला काळभोर काकांच्या जकात नाक्याच्या टपरीवर जाऊन चा-सिग्रेट...मला फ्लॅटवर सोडून हा घरी....झोपा काढणे...मग दुपारी टेरीखाली गाडी आली की सुटले आपले देवाला सोडलेल्या वळूसारखे...रात्रीचे जेवण झाले की बसले पीसीवर..ह्याचा पीसी माझ्या रूमवर आणून लॅन करून गेम खेळत बसायचो रात्रभर..कंटाळा आला की सिग्रेट आणी गच्ची... आजही मि रात्री तीन वाजता फोनवून "***,निगडीला आलोय ..घ्यायला ये" म्हटलं तर एका पायावर येणारा गडी.... कॉलेजात छोटा गॉल्ड्फ्लेक पिणारा गडी नोकरीनंतर माईल्ड झाला...आता सोडलीय...

बारक्या,डार्लिंग उर्फ अमोल : मंडळाचा फेवीकॉल...कुठे गोची झाली कि ह्याला पुढे करावा....ह्याला कोणी कोणत्या गोष्टीला कोणी नाही म्हणायचाच नाही...गफ्फुर पहिले दिड वर्ष ह्याच्या मग माझ्या रूमवर झोपायचा...एक नंबरचा बोलबच्चन....उंची चार फूट...जीभ तेवढीच लांब...मुंबैचा पण डिप्लोमापासून पुण्यात...

शॉट, रॉक्या उर्फ अजितः मंडळाचा सदस्य..आईला बराच भिणारा....आम्ही सगळेही काकूंना भ्यायचो..मंडळाला पुण्यात जायला कार हवी असली की काकूंना मस्का लावायचे काम माझ्याकडे आणी बारक्याकडे...माझ्या बाजूच्या दोन इमारती सोडून रहायचा.माझं आठवड्यात दोन-चार वेळा जेवण ह्याच्याच घरे व्हायचं..हाही फार प्रश्न विचारायचा म्हणून शॉट...ह्याच्या घरी सगळ्यात जास्त भाव असायचा ह्यांच्या रॉकी कुत्र्याला....ह्याच्यापेक्षापण जास्त...म्हणून ह्याचं संबोधन रॉक्या पडलं......

राहुल्या,भंड्या उर्फ राहुल : मनाने एकदम सरळ...तोंड गटार....कामाला लागल्यापासून एकदम मवाळ झालाय......अजमेरा-मोरवाडीचा रहिवासी....अभ्यासातही हुशार....खेळात प्रवीण.....माझा कॅरम पार्टनर....

वैभ्या उर्फ वैभव
: हा आमचा एक वर्ष सिनियर....अनप्याचा डीप्लोमापासूनचा बिडी पार्टनर....सेकंड ईयर पर्यंत अशी ओळख नव्हतीच.....पहिल्यांदा राजमाची ट्रेकला भेटला....ग्रूपमधलाच एक झाला...प्रत्येक ओल्या पार्टीला हजेरी असायची गड्याची....आणी काळभोर काकांच्या टपरीवर....परिक्षा चालू असल्या की एका बाजूने ह्यांचा कॉलेज ग्रूप आणी दुसरीकडून आमचा असे टपरीवर भेटू आणी तासभर मस्त मजा करत असू...

बैल, सांड, केद्या, केळ्या उर्फ केदार : बामण पण एखाद्या पैलवानासारखी मस्ती होती अंगात....तळेगावी मल्ल.....चिकन म्हणजे जीव की प्राण....ग्रूप मधला सगळ्यात टारगट आणी ग्रूपचा ब्रेन....थोडक्यात म्हणाल तर आमच्या ग्रूपचा उम्या जोशी.......हा , अमोल , मी आणी भोक्या यांपैकी कोणी दोन जण समोर असले की तंगड्या खेचणारे फक्त आम्हीच...:)

योग्या, पोग्या, डार्लिंग, यवगेश उर्फ योगेश : हाही सोलापूरचाच...बारक्याचा रूम पार्टनर......आवडते सिनेमा हम आपके हय कॉन ........ह्याची रूम आमचा धूडगूस खाना......माळ्यावर नं.१ च्या बाट्ल्या आणी टेबलाखालची बादलीभरून सिग्रेटची थोटके जमवणे हा आमच्या सगळ्यांचा पी यल मधला आवडता शौक......हा एक थेंब आणी एक कश पण न घेणारा....एकदम शांत....दिग्याचा गिनिपिग.....दिग्या ह्याचं सर्वात जास्त डोकं खायचा.....

भोक्या, दुर्व्या उर्फ दुर्वेश : शुक्रवारात रहायचा....एक रस्ता सोडला की बुधवार....घरासमोरच पिवळ्या पुस्तकांची प्रेस होती....दर आठवड्याला एक नवा गठ्ठा रूमवर हजर असायचा....केद्या, वैभ्या आणी भोक्या पिण्यात आणी फुकण्यात टंकी...एकदा ६ पेग गेले की कोणालाच ऐकायचा नाही.....फुटक्या नशिबाने एका दिवशी काळभोर काकांची टपरी बंद हेती तर एका सिग्रेटीसाठी निगडीवरून प्यासा ला गाडी घ्यायला लावली होती साल्याने.....बाप ईस्त्रीवाला....बर्‍याचदा हाही कॉलेजला यायच्या आधी ईस्त्री करून यायचा दुकानावर....स्वताच्या आणी आई-बापाच्या हिमतीने सर्व काही केले......एकदा रात्री पिल्यावर लाँग ड्राईव ला जायची ईच्छा झाली मला आणी भोक्याला....रॉक्याची गाडी मिळाली नाही.....दोघेही टूल्ल....माझ्या घराच्या गच्चीवर....

मी: 'भोक्या, गाडी घेउन टाक एक मंडळाला....'
भोक्या: 'पत्या, घेउया यार....साला सगळ्या मंडळाला एकत्र जायला..आणी रात्रीच्या लाँग ड्राईवला गाडी हवीच..रॉक्याला पण मिळत नाही दर वेळेस गाडी....'

आणी पठ्याने लगेच २ महिन्याने दिवाळीत सँट्रो घेतली....उद्-घाटनालाच सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर-शिर्डी-शनिशिंगणापूर अधीक पोग्याचे लग्न अशी ट्रीप झाली......

मी, पत्या, प्रत्या, फट्या उर्फ प्रतिक : कधीही कॉलेजला न जाणारा ...फक्त c,c++ आणी कोबोल हे आवडते विषय..कॉलेजात गेलो तरी लॅबमधेच सापडणार...नाहीतर कँटीन मधे तरी.....कॉलेजपासून ३ किमी वर दूर मुद्दमच रूम घेतली होती...कधी सायकलवर तर कधी अज्याच्या गाडीने कॉलेजला जायचो...माझ्या एका रूम पार्ट्नरचे आई-बाबा वारले होते आणी भाऊ एम एस करत होता.....त्यामुळे त्याचं सगळं सामान रूमवरच....सोफा, फोन, सोनी वेगा टी व्ही, ३ जणांचे ३ संगणक, वॉशिंग मशिन, गॅस, फ्रीझ, ढाकीचीकी म्युझीक सिस्टीम सगळं सगळं.......२ वेळा नास्ता करून पैज लावून सहा प्लेट कांदेपोहे खाणारा मी....

हा भाग आवडला तर क्रमशः, नाहीतर ...........................

कथाप्रवासमौजमजाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Nov 2009 - 4:51 pm | अवलिया

हा भाग आवडला तर क्रमशः, नाहीतर ...........................

नाही आवडला. काय करणार ? लिहिणं बंद करणार ?
नाही ना ? मग उगा कशाला उंटाच्या *डीचा मुका घ्यायचा?

लिहि मुकाट्याने पुढचा भाग.. नाही तर लै मार खाशील :)

लवकर लिहि रे पुढचा भाग !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

4 Nov 2009 - 4:55 pm | दशानन

असेच म्हणतो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

गणपा's picture

4 Nov 2009 - 4:57 pm | गणपा

ऐसाईच बोल्ताय.

धमाल मुलगा's picture

4 Nov 2009 - 5:14 pm | धमाल मुलगा

वरच्या समद्यांशी सहमत :D

पत्या, मंडळाचे काही शॉट झाले का नाही कधी??? एखादे गुर्जी...सिक्युरिटी..घरमालक..मेसवाला????
फुल्ल टवाळ गँग दिसतीये....

प्रभो's picture

4 Nov 2009 - 5:34 pm | प्रभो

हा...भरपूर.....माझा स्वता:चा झाला होता.....
३ महिने लेक्चर न बसता डायरेक्ट प्रॅक्टीकलला गेलो...गेलो ते गेलो वरून मास्तरशी न बोलता प्रोग्रॅम स्वतः बसुन एका जुन्या जर्नल मधून छापला...मास्तुरं चिडलं...म्हणालं "दगड.. हो तूम दगड"...पुढच्या तीन सेम प्रॅक्टीकलला ५० पैकी २०..काठावर पास...

सिक्युरिटी तर आपले दोस्त....लायब्ररीच्या सिक्युरिटीला २ रू ची तंबाखू पुरवली की आपण धुडगुसासाठी मोकळे.....त्याला *ट विंग्रजी येत नव्हतं....लायब्ररीच्या समोरून पोरी चालल्या की त्याला किल्ली द्यायची आणी पोरी छेडायला लावायचं..ह्यलाच एकदा आम्ही पोरांनी पी एल मधे एका सफाई कामवाल्या मावशी बरोबर रात्री कॉलेजच्या गच्चीवर पकडला होता...कॉलेजने त्याला हाकलून दिला.... नंतर एक वर्ष सिक्युरिटी सोबत बोंबाबंब=))

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धमाल मुलगा's picture

4 Nov 2009 - 6:26 pm | धमाल मुलगा

येड्यांनो, बोंबाबोंब कशाला करायची? धरला ना सिक्युरिटीला? मंग त्याला म्हणायचं बघ, आम्ही काय बोलत नाय..तु काय मदत करणार? ;)

अवलिया's picture

4 Nov 2009 - 6:55 pm | अवलिया

मंडळाचे काही शॉट झाले का नाही कधी??? एखादे गुर्जी...सिक्युरिटी..घरमालक..मेसवाला????

बापरे ! मंडळ भलतच डेंजर दिसतय... शॉटच्या बाबतीत !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

4 Nov 2009 - 4:59 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

नान्याची कमेंट वाचून खपलो .... बाकी लेख वाचून प्रतिक्रियाकर्म रात्री !

प्रसन्न केसकर's picture

4 Nov 2009 - 5:38 pm | प्रसन्न केसकर

ते डॅनबरी का कॅडबरी कुठंशिक आहे तिथं गेलास तरी लिहायचं सगळं. वेळच्यावेळी पुढचे भाग यायला पायजेत. टांगुन नाही ठेवायचं. चांगलं चाललय ते असंच चालु दे.

सूहास's picture

4 Nov 2009 - 6:57 pm | सूहास (not verified)

मंडळ निघालं गोव्याला >>>

आमच्या मंडळाला हॅप्पी जर्नी म्हणजेच पुढचा प्रवास सुखकर होवो ही सदिच्छा...

ह्याचा पीसी माझ्या रूमवर आणून लॅन करून गेम खेळत बसायचो रात्रभर>>
काय खेळायचा रे ? एजेस ऑफ एम्पायर का ?

मी, पत्या, प्रत्या, फट्या उर्फ प्रतिक : कधीही कॉलेजला न जाणारा ...फक्त c,c++ आणी कोबोल हे आवडते विषय>>>
बरा पटनीत घेतला रे तुला !!! नशीबवान आहेस !!

असो लेख एक नम्बर ...बाकी सदस्यांना(लेखातल्या रे) मिपावरची लिंक पाठव ...

सू हा स...
(कधीही गोव्याला आणी लोणावळ्याला न गेलेला )

टारझन's picture

4 Nov 2009 - 7:14 pm | टारझन

एजेस ऑफ एम्पायर का ?

हा कुठला गेम रं बाबा
राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे राजे
राजे राजे राजे
राजे राजे
राजे

बेक्कार ... खपलो !!

प्रभो's picture

4 Nov 2009 - 8:28 pm | प्रभो

टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या टार्‍या
टार्‍या टार्‍या
टार्‍या

प्रतिसाद टार्‍याला अर्पण !!!

स्वाती२'s picture

4 Nov 2009 - 6:59 pm | स्वाती२

>>हा भाग आवडला तर क्रमशः, नाहीतर ...........................
काय उगाच भाव खाताय? लिहा पटापट!

श्रावण मोडक's picture

4 Nov 2009 - 8:24 pm | श्रावण मोडक

लिहा!

हर्षद आनंदी's picture

5 Nov 2009 - 9:58 am | हर्षद आनंदी

मजा येतेय.. लिवा

आम्ही हिंदूत्ववादी !!
आमची शाखा कुठेही नाही..

प्रमेय's picture

5 Nov 2009 - 10:02 am | प्रमेय

काय बे?
हे काय काढलयं बे?
घरच्या बोंबा कमी पडल्या का बे?
वर अजून नाहीतर....... ?
चल गुमान पुढचे भाग टाक बे!
आणि जरा हा*र्‍याला मेल टाक बे!

चल बे! घरी जातो बे आता, घरचे वाट बघत असतील आता!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2009 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

हा भाग आवडला नाही, पुढचाही आवडणार नाहीच तेंव्हा कृपया टंकायचे कष्ट घेउ नयेत.

माजला का रे ? 'हा भाग आवडला तर' वगैरे एकदम ? स्वतःला अवलिया समजतो का तु ?? टाकु का लेख डिलिट करुन ??

©º°¨¨°º© परालिया चौपाटीवाले ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दिपाली पाटिल's picture

5 Nov 2009 - 12:15 pm | दिपाली पाटिल

मंडळ निघालंय गोव्याला...पण कुठाय...ते तर गोव्याचं काहीच नाही लिहीलंयस...ते कोण लिहीणार...आणि ते त्या वॉचमननी मावशीला पकडल्याची बोंबाबोंब कशाला करायचीस...कामाला आला असता ना कधीतरी...पेपर-बिपर मिळाला असता कधीतरी...चान्स पे डान्स नाही करता आला बुवा तुम्हाला... :D

दिपाली :)