सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन
स्वतःला कवी समजुन
काहीजण प्रयत्न करतात
ढापले म्हणु नये म्हणून
शब्द बदलतात
समोर जे जे दिसेल
त्यावर
कविता करतात
भुक्कड माणसे!
पण वाचकांना
अर्थ लागतोच असं नाही
अथवा
डोके बंद करुन
लिहित असतो कवी!
इथेच सगळी गोची आहे
फुलांनी नटलेला वसंत
अल्लड हसणारी
लहान मुले
प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन्
वर्षानोवर्षे चालणारे
फुटकळ विषय
सगळे जेव्हा लोकांसमोर येते
तेव्हा
काव्य झालेले असते
सजलेले, सजवलेले ,
व्रुत्ताच्या चौकटीत असते
मोहवणारे असते
खर आहे-
विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
प्रतिक्रिया
5 Nov 2009 - 11:09 am | प्रशांत उदय मनोहर
=))
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
5 Nov 2009 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही हा हा हा ... आवडलं हे "काव्य"!
अदिती
5 Nov 2009 - 12:51 pm | चेतन
धन्यवाद प्रशांत आणि अदिती
चेतन
5 Nov 2009 - 1:18 pm | sneharani
छान....
=))