दु:ख

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जे न देखे रवी...
3 Nov 2009 - 8:45 pm

दु:ख

स्वतःला वेदना होऊ नये
म्हणून प्रयत्न करतात
रक्त वाहू नये म्हणून
पट्टी बांधतात
दु:ख दिसले की
त्यावर
इलाज करतात
सज्जन माणसे!

पण लोकांना
दु:ख दिसत नाही
अथवा
बंद डोळ्यामागे
जागे असते दु:ख!-
इथेच सगळी गोची आहे

रक्ताने माखलेले सैनिक
आक्रोश करणारी
लहान मुले
भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी
खाटिकाकडे बांधलेली
मुकी जनावरे

सगळे जेव्हा लोकांसमोर येते
तेव्हा
शांत झालेले असते
सजलेले, सजवलेले ,
फोटोच्या चौकटीत असते
मोहवणारे असते

खर आहे-
लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!

कविता

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

3 Nov 2009 - 8:52 pm | सन्जोप राव

लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
अगदी, अगदी!
आवडला हा विचार!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

टारझन's picture

3 Nov 2009 - 9:20 pm | टारझन

लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!

हीच ओळ हृदयाला भिडली !!

- गप्झोप राव
जेवण गरम आहे, तोवरंच खाण्यात मजा आहे.

मदनबाण's picture

3 Nov 2009 - 9:11 pm | मदनबाण

छान कविता...

मलईची भूक यांना
दु:खाचा तर कधीच
विसर पडला...
केंद्रात जरी मंत्री असले,
तरी महाराष्ट्रात यांचा
जिव अडकला...
मरतो शेतकरी अन्
अंधार जरी दाटला
खात्यांचा लोभ मात्र
एकच प्रश्न मोठा !!!

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

श्रावण मोडक's picture

3 Nov 2009 - 9:30 pm | श्रावण मोडक

चांगली कविता.

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Nov 2009 - 9:45 pm | अक्षय पुर्णपात्रे

सुवर्णमयी, प्रयत्न आवडला. आपण ब्लेकची 'On Another's Sorrow' ही कविता वाचली आहे काय? खाली काही ओळी देत आहे.

Can I see another's woe,
And not be in sorrow too?
Can I see another's grief,
And not seek for kind relief?

.............................
लोक चलाख असतात, दु:ख वाईट नसते!

बेसनलाडू's picture

3 Nov 2009 - 10:19 pm | बेसनलाडू

ही कल्पना/विचार आवडली/ला.
(चलाख)बेसनलाडू

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:03 pm | प्रभो

आवडली

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विसोबा खेचर's picture

4 Nov 2009 - 8:05 am | विसोबा खेचर

खर आहे-
लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!

वा!

तात्या.

फ्रॅक्चर बंड्या's picture

5 Nov 2009 - 9:46 am | फ्रॅक्चर बंड्या

आवडली कविता...

दशानन's picture

5 Nov 2009 - 9:48 am | दशानन

छान आहे कविता आवडली.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

धनंजय's picture

23 Mar 2010 - 11:07 pm | धनंजय

सहज रचनेसाठी कवितेचा विषय कठिण आहे.

शेवटची ओळ अत्यंत प्रभावी.