मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती
मला कळले नाही
आजपण...
जाता जाता वेळ गेला
कळले नाही कधी सरले
बालपण...
उचलली जीभ लावली टाळ्याला
बोलू नका तूम्ही
काहीपण...
मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली
हाती उरले फक्त
वेडेपण...
का म सु (काही महत्त्वाच्या सुचना)
१. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्याने चोरली आहे असे समजावे.
२. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही.
३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी.
४. वरील दोन्ही प्रकारात जे मोडत नाहीत (२ आणि ३) त्यांनी कवितेच्या पुढील ओळी लिहाव्यात.
- अडाणि.
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 11:19 am | रामदास
कविता समजली नाही.
थोडे समजावून सांगा.कदाचीत लक्षात न आलेला आशय समजायला सोपा जाईल.
7 Mar 2009 - 2:10 pm | जागु
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती
मला कळले नाही
आजपण...
मला पण कळले नाही. जरा समजाउन सांगा.
7 Mar 2009 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार
कविता वाचुन मतीची माती झाली माझ्या !
काहि छुपे गुढ गर्भीत अर्थ दडले आहेत काय ह्यात ?
खोलगट आणी पसरट टिकाकार
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
7 Mar 2009 - 2:27 pm | दशानन
मलाबी असंच वाटय !
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
7 Mar 2009 - 7:18 pm | नरेश_
अवांतर : तुम्हाला सतिश चावला माहीत आहे का ? ;-)
कृपया हळूवारपणे घेणे :-)
7 Mar 2009 - 8:07 pm | क्रान्ति
मुंग्यानी केल तुम्हाला वेड पण
मातीवर लिहा काहीपण
बालपण गेल तरी
शाबूत आहे शहाणपण!
मस्त मुक्तक आहे!
क्रान्ति
8 Mar 2009 - 2:28 pm | मराठमोळा
या कवीतेचे विडंबन करायला मजा येईल.