चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
18 Mar 2018 - 2:34 pm

आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे. सेल्फीचे वेड तर मानसिक आजार आहे की काय इतके वाढले आहे आणि ते अनेकदा अपघात व मृत्युचे कारणही ठरत आहे.

कॅमेर्‍याची सोय हल्ली इतकी महत्वाची झाली आहे की फोनचे नवीन मॉडेल आले की त्याच्या जाहिरातीत सर्वप्रथम कॅमेर्‍याची मोठी पिक्सेलसंख्या, पुढचा दुहेरी कॅमेरा, सेल्फी कॅमेर्‍याची मोठी पिक्सेलसंख्या, स्लो मोशन कॅमेरा, इ इ इ केवळ कॅमेर्‍याचे अनेक गुणधर्म प्रकर्षाने मांडलेले असतात. इतके की, ते पाहून ही जाहिरात फोनची आहे की कॅमेर्‍याची असा प्रश्न पडावा ! फोनमधले कॅमेरे इतके शक्तिशाली व वापरण्यास इतके सोपे झाले आहेत की काही दिवसांतच स्वतंत्र कॅमेरा ही वस्तू केवळ व्यावसायिक छायाचित्रकारांच्या हातातच दिसेल असे वाटते !

पण, असे काही असले तरी कॅमेरा ही फोनमधली एक महत्वपूर्ण सोय आहे यात वाद नाही. मात्र, केवळ फोटो घेणे याउप्पर त्या कॅमेर्‍याचे अनेक उपयोग होऊ शकतात हे बहुतेकांच्या घ्यानात येत नाही ही त्या कॅमेर्‍याच्या दृष्टीने एक शोकांतिकाच आहे ! फोटो/सेल्फी घेणे आणि तो साठवणे या मूलभूत सोईला इतर फोनअ‍ॅप्सबरोबर जोडून कॅमेर्‍याचे नेहमीच्या व्यवहारात शक्य असलेले असंख्य सोपे आणि फुकट उपयोग उपलब्ध आहेत. या लेखात त्यांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. जाणकारांनी त्यात अधिक भर टाकून मिपाकरांना शहाणे करून सोडावे व कॅमेरा+फोनअ‍ॅपसॅव्वी करून सोडावे अशी अपेक्षा आहे. :)

१. आपल्याला न येणार्‍या भाषेचे आपल्याला समजणार्‍या भाषेत भाषांतरः

परदेशांतच काय पण भारतातल्या अनेक राज्यांत फिरताना तेथिल भाषा येत नसल्याने होणारी गैरसोय ही नेहमीची गोष्ट आहे. इथे चकटफू गुगल ट्रान्सलेट (for Android and iOS) अ‍ॅप कामी येते. अ‍ॅपमध्ये कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत भाषांतर हवे ते निवडून तुमचा फोन मजकूरावर फोकस करा आणि इंन्स्टंट ट्रान्सलेट बटण दाबा, बस. त्या मजकूराचे भाषांतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसू लागेल. मजकूर टाईप करण्याची गरज नाही ! रस्त्यावरून फिरताना दिसणार्‍या पाट्या, रेस्तराँमधला मेन्यू, छापील कागदावरचा मजकूर, इत्यादींचा त्वरीत अर्थ लावायला अत्यंत सोईचे !

सामसुंग गॅलॅक्सी S8 किंवा नंतरच्या मॉडेलमध्ये ही सोय अंतर्भूत (इनबिल्ट) आहे व ती Bixby Vision बटण दाबून वापरता येते.

२. रात्रीचे आकाशदर्शनः

आकाशदर्शनाची आवड असलेल्यांसाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यातले Star Walk 2 (for Android and iOS) हे अत्यंत उपयुक्त अ‍ॅप आहे. फोनमधिल लोकेशन सर्विस आणि गायरोस्कोप वापरून हे अ‍ॅप फोनच्या पडद्यावर दिसणारी नक्षत्रे, ग्रह, धूमकेतू, इत्यादिंची माहिती देते. वेळेबरोबर (पुढे/मागे) आकाशातील स्थिती कशी बदलेल, नक्षत्रांचे त्रिमिती रूप, इत्यादी गोष्टीही या अ‍ॅपवर पाहता येतात. SkyView (for Android and iOS) हे अ‍ॅपही चांगले आहे पण Star Walk 2 इतके ताकदवर नाही. मात्र हे अ‍ॅप नजिकच्या काळात आकाशात घडणार्‍या प्रसंगांची पूर्वसूचना देऊ शकते. जाहिरातींचा जाच सहन केला तर दोन्ही अ‍ॅप्स चकटफू आहेत.

३. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी:

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे फोटो किंवा चित्रांमध्ये डिजिटल ग्राफिक सामिल करणे. उदा: आत्याबाईला मिशा काढणे, माणसाला नसलेली टोपी घालणे, इ. इतरांकडे पाठवण्यापूर्वी फोटोंना अधिक मनोरंजक करण्यासाठी हे माध्यम उपयोगी आहे.

या विषयात असंख्य अ‍ॅप्स आहेत. Snapchat (for Android and iOS) मध्ये ही सोय अंतर्भूत आहे. Inkhunter (for Android and iOS) हे सुद्धा चांगले आहे. Ikea Catalog app (for Android and iOS) मध्ये तुम्ही आपल्या घराच्या फोटोत वेगवेगळे फर्निचर ठेवून ते शोभून दिसेल की नाही हे पडताळून पाहू शकता.

४. डिजिटायझेशनः

सद्याच्या डिजिटल जमान्यात कागदी दस्त साठवून ठेवण्याची गरज दिवसेदिवस कमी होत आहे. अनेक अनौपचारिक व औपचारिक देवाणघेवाणितही (बँक स्टेटमेंट्स, जागेचे फोटो, कागपत्रे, पावत्या, बिझनेस कार्ड्स, ते गरजेचे नसते. त्यांच्या डिजिटल प्रती फोनमध्ये/क्लाऊडवर (गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, इ) साठवणे किंवा (इमेल, व्हॉट्सॅप, इ वापरून) घर/ऑफिसच्या बाहेर असतानाही त्वरीत दुसरीकडे पाठवणे, यासाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. असा व्यवहार (डेटा प्रोव्हायडर सोडून) कोणत्याही वहनसेवादात्याच्या (उदा: कुरिअर, पोस्त, इ) मदतीशिवाय जलद, सहजसुलभ व पेपरलेस करण्यासाठी ही अ‍ॅप्स फार उपयोगी आहेत.

यातिल काही अ‍ॅप्समध्ये स्वयंचलित क्रॉपिंग/रोटेशन/ठळक करणे (फोटो एडिटिंग), फोटोचे (एडिट) करण्याजोग्या मजकूरात रुपांतरण करणे, इत्यादी सोयी अंतर्भूत आहेत. या प्रकारातील CamScanner हे अ‍ॅप त्यातिल अनेक उपयोगी सोईंमुळे माझे आवडते आहे.

५. माहितीदर्शन (Look up information):

गुगलफोटोमध्ये नुकतेच अंतर्भूत केलेल्या Google Lens तंत्राने (हे सद्या फक्त Android मध्ये उपलब्ध आहे, iOS साठी ते नजिकच्या भविष्याकाळात येईल) एखाद्या गोष्टीचा (उदा: ऐतिहासिक वास्तू, फूल, प्रसिद्ध व्यक्ती, नावाजलेले चित्र, इ) फोटो किंवा तिचे चित्र वापरून तिच्याबद्दलची माहिती मिळविता येते.

६. दुवा टाईप न करता संस्थळे उघडणे:

हल्ली बरीच संस्थळे त्यांचा QR code पाटी, पार्सल, पोस्टर, माहितीपत्रक, स्टेशनरी, इत्यादींवर प्रसिद्ध करतात. तो कॅमेर्‍याने स्कॅन करून त्यांचे संस्थळ उघडता येते व त्या संस्थळावर संपूर्ण महिती उपलब्ध होते. जालावर असंख्य QR code Scanner/Reader उपल्ब्ध आहेत.

७. छुपा सुरक्षा कॅमेरा (स्पायकॅम):

एखादा जुना/अतिरिक्त फोन आणि सतत जवळ असलेला फोन अशी जोडी वापरून या अ‍ॅप्सच्या वापराने आपले घर, घरातील लहान मुले, पाळीव प्राणी, इत्यादींवर घराबाहेर पडल्यावरही नजर ठेवता येते. यासाठी, Manything (for Android and iOS) हे फार उपयोगी अ‍ॅप आहे. घरातल्या लहान मुलांवर लक्ष ठेवायला Dormi (for Android only) व Cloud Baby Monitor (for iOS only) ही उपयोगी अ‍ॅप्स आहेत. यापैकी काहींमध्ये, हालचालीने सक्रिय होणे, लहान मुल रडू लागल्यास आवाज मोठा करून गजर वाजवणे, मुलांशी बोलायची व्यवस्था असणे, चित्रण जालावर साठवणे, इत्यादी (विनाशुल्क/सशुल्क) सोयी आहेत.

८. काढलेले फोटो आपोआप जालावर साठवणे:

काढलेले बहुतेक फोटो त्वरीत कामाचे नसतात व केवळ आठवण म्हणून काढलेले असतात. ते फोनवर सतत साठवून बाळगणे आवश्यक नसते. बहुतेक सर्व कॅमेरा अ‍ॅप्समध्ये फोटो त्वरीत (किंवा ब्रॉडबँड उपलब्ध झाल्यावर) जालावर साठवण्याची आणि फोनवर आवश्यक नसलेले फोटो तेथून नष्ट (डिलिट) करण्याची सोय असते. यामुळे फोनवरची जागा (मेमरी) भरून फोन संथ होण्याचे प्रमाण कमी होते.

८. आठवणीत ठेवायचा मजकूर:

बर्‍याचदा आपल्याला एखाद्या जागेचा पत्ता, एखादी संख्या किंवा इतर कोणती माहिती (उदा: टू डू लिस्ट्स, प्रवासात बरोबर घेतलेल्या प्रत्येक बॅगेतील वस्तूंची यादी, हॉटेलमधले महत्वाचे फोन नंबर्स, इ) फक्त काही काळासाठी साठवून ठेवायची असते. ती फोनमध्ये (अ‍ॅड्रेसबुक, इ मध्ये) टंकणे हा अनावश्यक त्रास असतो. यावर उपाय म्हणून अनेक नोट साठवणारी अ‍ॅप्स आहे जी मजकुराबरोबरच फोटोही साठवू शकतात. अश्या गोष्टींचे फोटो फोनमध्ये साठवल्यास ते सतत उपलब्ध राहतात व काम झाल्यावर ते फोटो डिलिट करून फोनमधील जागा रिकामी करणे शक्य होते.

या प्रकारातले माझ्या आवडिचे अ‍ॅप Google Keep आहे. यात लिखित मजकूर, आवाजी मजकूर व फोटो वेगवेगळ्या नोट्समध्ये विषयवार साठवून ठेवता येतात. मजकूर ठेवताना बुलेट लिस्ट हा उपलब्ध प्रकार फार सोईचा आहे. तो वापरून यादी बनवल्यास त्यातील प्रत्येक नोंद स्वतंत्रपणे कमी जास्त करता येते. आपल्या प्राथमिकतेप्रमाणे याद्यांचा क्रम पुढेमागे करता येतो. याद्यांना कलर-कोड करता येते. दीर्घकाळ / वारंवार लागणार्‍या याद्या काम झाल्यावर आर्काईव्ह करून ठेवाता येतात व जरूर पडेल तश्या परत वर आणता येतात, इ इ इ.

मोबाईल फोन कॅमेरा वापरणार्‍या अ‍ॅप्सची ही केवळ एक छोटीशी जंत्री आहे. इतरांनीही त्यात जरूर भर घालावी. या माहितीची देवाणघेवाण सर्वांच्या फायद्याची होईल असे वाटते.

कृपया, इथे फक्त "फोनचा कॅमेरा वापरून फोटो काढण्यापलिकडे शक्य असलेल्या उपयोगांचीच" चर्चा करणे अपेक्षित आहे. धन्यवाद !

तंत्रविज्ञानअनुभवमाहितीमदत

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

18 Mar 2018 - 2:56 pm | डँबिस००७

धन्यवाद डॉ सुहास म्हात्रे साहेब,

माझा एक पैसा,

फोनच्या कॅमेराचा आणखी एक उपयोग : बर्याच उत्पादनाच्या / औषधाच्या वेष्टणावर ची माहीती ही अती बारीक फॉण्ट मध्ये
टापलेली असते. एक्सायरी डेट वाचता येत नाही अश्यावेळेला मॅग्निफाईंग ग्लासची गरज भासते. अश्यावेळेला फोन कॅमेरा कामाला
येतो. फोनच्या कॅमेरातुन ह्या लिखाणाकेडे बघत असताना झुम केल की बारिक फाँण्टची अक्षर वाचता येतात.

माहितगार's picture

18 Mar 2018 - 6:06 pm | माहितगार

उपयूक्त धागा

८) काढलेले बहुतेक फोटो त्वरीत कामाचे नसतात व केवळ आठवण म्हणून काढलेले असतात. ते फोनवर सतत साठवून बाळगणे आवश्यक नसते. बहुतेक सर्व कॅमेरा अ‍ॅप्समध्ये फोटो त्वरीत (किंवा ब्रॉडबँड उपलब्ध झाल्यावर) जालावर साठवण्याची आणि फोनवर आवश्यक नसलेले फोटो तेथून नष्ट (डिलिट) करण्याची सोय असते. यामुळे फोनवरची जागा (मेमरी) भरून फोन संथ होण्याचे प्रमाण कमी होते

हे कसे करावे हे जाणून घेण्यात जाणकारांनी नदत करावी ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे दोन प्रकारे करता येते:

१. फोटो जालावर ठेवणे:
१.अ) फोटो आपोआप जालावर पाठवण्यासाठी: गुगलफोटोमध्ये "सेटिंग्ज > बॅक अप अँड सिंक" हा पर्याय वापरा.
१.आ) फोटो जालावर पाठवल्यावर मोबाईलमधून आपोआप डिलिट होण्यासाठी: "सेटिंग्ज > फ्री अप डिव्हाईस स्टोरेज" हा पर्याय वापरा.
१. इ) "सेटिंग्ज"मध्ये इतर अनेक उपयोगी सोयी आहेत, त्यांना पण पहा.

२. कॅमेर्‍यात मोठ्या क्षमतेचे मेमरी (एसडी) अ‍ॅड-ऑन कार्ड असल्यासः कॅमेराअ‍ॅपमध्ये "सेटिंग > स्टोरेज > मेमरी कार्ड" हा पर्याय वापरा. याने कॅमेर्‍याने काढलेले फोटो एसडी कार्डावर "माय फाईल्स > ऑल > स्टोरेज > एसडी कार्ड > डीसीआयएम > कॅमेरा" येथे साठवले जातात व मोबाईलची मूळ मेमरी मोकळी राहते. असे केल्याने ते कॅमेर्‍यातच राहतात आणि नेट न वापरता कॅमेर्‍यात पाहता येतात. एसडी कार्ड भरत आल्यावर (किंवा इतर केव्हा हवे तेव्हा) मोबाईल काँप्युटरला जोडून, डेटा पॅकला धक्का न लावता, हे फोटो हवे तिथे कॉपी-पेस्ट करून साठवून ठेवता येतात

आत्ता लगेच अ‍ॅक्तीव्हेट केले आहे. अर्थात मी स्वतःहून शेअर केल्या शिवाय इतरांना दिसणार नाहीत ना अशी अपेक्षा करतो कारण क्वचीत आयडी आणि दिलेले चेक इत्यादीचे फोटोग्राफस घ्यायची सवय आहे मला

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

गुगल्फोटोमध्ये वेगवेगळे अल्बम्स (फोल्डर्स) बनवून त्या प्रत्येकाला स्वतंत्रपणे अ‍ॅक्सेस देण्याची सोय आहे. अल्बमच्या पेजच्या वर उजव्या कोपर्‍यात असलेल्या शेअर आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणार्‍या विंडोच्या खालच्या भागात असलेल्या गुगल+ मध्ये जाऊन हवे तसे अ‍ॅक्सेस सेट करू शकाल.

जरासे प्रयोग केलेत तर दर फोटोचा स्वतंत्र अ‍ॅक्सेस सेट करता येतात (फोटो-लेव्हल कंट्रोल). मात्र, तसे करणे किचकट काम असल्याने, समान विषयांचे/अ‍ॅक्सेस द्यायचे असलेले फोटो मी वेगवेगळ्या अल्बम्समध्ये ठेवतो आणि प्रत्येक अल्बमला जरूर तो अ‍ॅक्सेस देतो (अल्बम लेव्हल कंट्रोल)... तो अ‍ॅक्सेस त्या अल्बममधिल सगळ्या फोटोंना लागू होतो. हा उपाय सर्वात सोपा आणि जास्त व्यावहारीक आहे.

माहितगार's picture

18 Mar 2018 - 8:31 pm | माहितगार

चांगला सल्ला दिलात , करून बघेन . अनेक आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक...

आपण हे अ‍ॅक्सेस नंतर केव्हाही हवे तेव्हा हवे तसे बदलू शकतो.

चभ्रध्व च्या कॅमेऱ्याचा आणखी एक उपयोग म्हणजे त्याचा आरशा सारखा वापर :)

काही महिला सहकाऱ्यांना मेकअप, लिपस्टिक आणि एकंदरीत अवतार ठीकठाक आहे का हे पाहण्यासाठी फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करताना बघितले आहे.

अस्वीकरण : हे निरीक्षण अहेतुक आणि अजाणतेपणी घडलेले आहे असे मत नोंदवतो / स्पष्ट करतो.

चित्रगुप्त's picture

18 Mar 2018 - 7:56 pm | चित्रगुप्त

अतिशय उपयोगी धागा प्रसवल्याबद्दल आभार.
परवाच नवीन चष्मा बनवण्यासाठी गेलेलो असता एक तरूण मुलगी चष्म्याची फ्रेम निवडत होती. मात्र समोर लहानमोठे आरसे उपलब्ध असूनही, आणि फ्रेम कशी दिसते हे सांगण्यास उत्सुक असलेली तिची आई बरोबर असूनही ती प्रत्येक फ्रेम घालून मोबाईलात बघत होती, आणि त्या फ्रेमसह ओठांचा चंबू वगैरे करून आपण कसे दिसतो हे बघत होती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ डँबिस००७ : व्यावहारीक उपयोग !

@ चामुंडराय : यात वाईत काहीच नाही. पावसात, वार्‍यात आणि मुंबईच्या लोकलच्या प्रवासात हा उपयोगे स्त्री-पुरूष दोघांनाही सारखाच उपयोगी आहे.

दोघांनाही भर टाकल्याबद्दल धन्यवाद !

माहितगार's picture

18 Mar 2018 - 7:01 pm | माहितगार

ओला उबर सारख्या सर्विसेस सोडून इतर रिक्षा गाड्या बसेस मध्ये कुणालाही बसवून देताना पुर्वी साध्या फोनवर गाड्यांचा नंबर डायल करत असे आता स्मार्टफोनवर गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेऊन ठेवतो आणि असे नंतर अनावश्यक फोटो पुढच्या रविवारी वगळतो.

पाकृंसाठीचा उपयोग तर सर्वच जण करतातच

कंजूस's picture

18 Mar 2018 - 7:10 pm | कंजूस

उपयुक्त माहिती.

* "Image to text app"
काढलेल्या फोटोतील मजकूर अक्षरी मिळवणे.
सध्या इंग्रजीचे करता येते. मराठी नाही.

माहितगार's picture

18 Mar 2018 - 7:35 pm | माहितगार

QR code Scanner/Reader माझ्या सारखा नवागत, त्यातला रिलायेबल आणि सुरक्स्।ईत QR code Scanner/Reader कोणता आहे ह्या विचारात पडतो आणि एवढ्या कारणामुळे मी अद्याप QR code Scanner/Reader डाऊनलोड केलेला नाही. याही बाबतीत मदत मिळाल्यास आभारी असेन.

माहितगार's picture

18 Mar 2018 - 7:41 pm | माहितगार

माझ्याकडे सॉमसंगचा ऑन ७ आहे. मला अजून एक असलेलि समस्या माझे क्रमांक डिअ‍ॅनडि केलेले असूनही येणार्‍या एस एम एसची संख्या बेसुमार आहे . कसे मॅनेज करावे सुचत नाही.

दुसरे टाईप केलेला मराठी एस एम एस का कोण जाणे हा माझा फोन एम एम एस मध्ये कन्व्हर्ट करतो आणि बरेचसे मराठी एस एम एस जातच नाहीत कधी कधी जातात सुद्धा.

अजून एक आलेली समस्या लॅप्टॉपवर च्या पिडीएफ व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यास नव्यानेच अडचण येते आहे, काही महिन्यांपुर्वी काही अडचण नव्हती

कंजूस's picture

19 Mar 2018 - 5:54 am | कंजूस

पिडीएफ शेअरिंग -

https jumpshare dot com वर अकाउंट बनवून तिथे फोटो/व्हिडिओ/pdf अपलोड करा.
१) कोणत्याही डिवाइसमधून साइट लॅागिन करा.
२) वाटसपसाठी फक्त pdf ची कॅापी लिंक पाठवायची.

योगी९००'s picture

18 Mar 2018 - 10:51 pm | योगी९००

काही कॅमेरा लेन्स झुम करण्याची अ‍ॅपअसतात. ती वापरून लांबवरचे पहाता येते.

उदा: Telescopic 45X नावाचे अ‍ॅप वापरतोय. त्यातून बरेच लांबचे पहाता येते. दिवसा वापरलेतर झुम इफेक्ट चांगला मिळतो. प्रत्येक मोबाईलवर हे अ‍ॅप चालेलच असे नाही.

अनिंद्य's picture

19 Mar 2018 - 11:44 am | अनिंद्य

छान विषय निवडला आहे, संकलित माहितीचा उपयोग होईल.

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 12:02 pm | पगला गजोधर

चांगला धागा, उपयुक्त माहिती.

अवांतर: मी एका परदेशी संरक्षक विषयक मासिकात वाचलेले होते (नक्की डिटेल आठवत नाही चू भू दे घे)

असे एक ऍप (होते /आहे / सध्या बंदी घातलीये माहीत नाही )
जमिनीवरून, आकाशात उडणाऱ्या प्रवासी विमानांकडे कॅमेरा रोखून क्लिक केल्यावर ,
कुठून कुठे जाणारे विमान, फ्लाईट क्र
, कंपनीचे नाव , इतकंच काय विमान क्षमता ., बांधणीचा प्रकार
इ माहिती मिळायची...
असं ऍप दहशतवादी संघटना कश्या वापरतील यावर रिसर्च लेख होता बहुतेक ...

मास्टरमाईन्ड's picture

20 Apr 2018 - 11:54 pm | मास्टरमाईन्ड

विमान जमिनीच्या पासून कमीत कमी ५०० मीटर अन्तरावरुन उडत असणार (कदाचित जास्तच, ३५००० फूट असं ऐकल्यासारखं वाटतंय).
एवढ्या लांबचं Object कि ती ही उत्तम दर्जाचा मोबाईल कॅमेरा वापरलात तरी त्यात Capture होणं दुरापास्त आहे.
दुसरं म्हणजे दहशतवादी असल्या कुठल्याही Third Party App वर अवलंबून राहतील हेही जवळपास अशक्य आहे.
असं अ‍ॅप म्हणजे बहुतेक simulation असण्याची शक्यता जास्त आहे.

Nitin Palkar's picture

19 Mar 2018 - 2:55 pm | Nitin Palkar

अतिशय माहितीप्रद लेख. आकाश दर्शन हा छंद असल्याने तो व spycam हे खूप उपयुक्त असे दोन महत्वाचे अतिरिक्त उपयोग समजले.धन्यवाद.

काहीजणांच्या हाताच्या नसा काहीवेळा सापडत नाहीत (टेस्टसाठी lab मधे रक्त काढताना). तर त्या व्हेन्स ठळक करुन दाखवणाऱ्या कॅमेराऍप्सविषयी मधे वाचलं.

काय टेक्निक आहे बघायला पाहिजे.

अनिंद्य's picture

19 Mar 2018 - 3:26 pm | अनिंद्य

एखाद्या इमेज वरून त्याची कुंडली देणारे ऍप आहे का कोणाच्या माहितीत - म्हणजे एखाद्या फुलाचा/वृक्षाचा किंवा इमारतीचा फोटो बघून त्याबद्दल बेसिक माहिती देऊ शकणारे?

केडी's picture

23 Mar 2018 - 11:51 am | केडी

फुल/वृक्ष ह्यासाठी PictureThis नावाचा अँप आहे अँड्रॉइड साठी. ते वापरून बघा...

मराठी कथालेखक's picture

19 Mar 2018 - 6:06 pm | मराठी कथालेखक

google hangout dialer वरुन आता भारतातील क्रमांकावरही फोन करता येतो... (पुर्वी करता येत नसे).. इथे आधी कमीतकमी १० US Dollar रक्कम टाकावी लागते. ज्याला तुम्ही कॉल करता त्याच्याकडे इंटरनेट चालू असण्याची आवश्यकता नाही (अगदी लँडलाईनवरही कॉल होवू शकतो)
एखादे वेळेस सिमला नेटवर्क नसेल पण चांगले वाय फाय कनेक्शन उपलब्ध असेल तर तातडीचा कॉल करण्यासाठी याचा उपयोग होवू शकतो.

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 6:09 pm | पगला गजोधर

आणि या कामात मोबाईचा कॅमेरा कशी मदत करतो ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Mar 2018 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

नविन माहिती मिळाली....त्यातली बरीच माहिती उपयुक्त आहे.
वापरुन पहातो
पैजारबुवा,

मदनबाण's picture

22 Mar 2018 - 11:37 pm | मदनबाण

जरासे अवांतर...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan

जरासे अवांतर कशाबद्दल आहे ते दोन ओळीत लिहा.

-------

>>८. आठवणीत ठेवायचा मजकूर:>>

गुगल कीप Google Keep मध्ये फोटो "अटॅचमेंट" म्हणून एक छोटी थंबनेल राहाते. ते प्रत्येकवेळी उघडून /क्लिक करून पाहावे लागते॥

Nimbus Note Web हे अॅप ( नोट अॅप आहे, IOS/ANDROID/WINDOWS तिन्हीवर sync होते) वापरल्यास फोटो मोठेच राहतात.

जरासे अवांतर कशाबद्दल आहे ते दोन ओळीत लिहा.
कंजूस मामा अवं इडियो दिला हाय नव्हं, तो बघा की...

बाकी गुगल लेंन्स अ‍ॅप कॅमरा वापरण्याचे नविन आयाम उघडत आहे. काही काळा पूर्वी मी गुगलचेचे कोणते तरी कॅमेरा अ‍ॅप वापरुन पाहिले होते ज्यामुळे तो कॅमेरा समोरची वस्तु ओळखतो...म्हणजे पीसी मॉनिटरवर कॅमेरा रोखला तर मॉनिटर असे कॅमेरा दर्शवतो, फुलावर कॅमेरा रोखला तर ते फुल कोणते ते कॅमरा अ‍ॅप आपल्याला सांगते. नंतर ते अ‍ॅप काढुन टाकले होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles

पैशांच्या देवाणघेवाणीसाठी मोबाइल कसा वापरायचा? यासाठी कोण कोणते अँप्स उपलब्ध आहेत?

मराठी कथालेखक's picture

2 Apr 2018 - 3:39 pm | मराठी कथालेखक

Paytm किंवा तत्सम Wallet वापरु शकता किंवा UPI based transaction साठी अनेक apps आहेत (जसे BHIM, पुन्हा paytm ही आहे , अनेक बॅंकाचे apps). तरी तुम्हाला विस्ताराने माहिती हवी असल्यास स्वतंत्र धागा काढा असे सुचवेन. तिथे प्रत्येक app ची विस्ताराने चर्चा करुयात.

तिमा's picture

25 Mar 2018 - 7:54 am | तिमा

मोबाईलचे इतके उपयोग आहेत, त्यांत खालच्या बाजूला एखादे शेव्हिंग किट पण असले पाहिजे. ड्राय शेव्हरसारखी दाढी पण करता आली पाहिजे.
फोनचा रोल करुन त्यातला व्हायब्रेटर वापरुन , त्याचा ' जसा पाहिजे तसा 'ही उपयोग करता येईल, अशी व्यवस्था पाहिजे.

लहान मुले आईचाफोन वापरतात हो!

सचिन काळे's picture

2 Apr 2018 - 2:54 pm | सचिन काळे

छान माहितीपूर्ण लेख!

सुखीमाणूस's picture

20 Apr 2018 - 7:43 pm | सुखीमाणूस

लाइफ 360 इन्स्टॉल केली कुटुंबातील सर्व सदस्यांच्या फोनवर.
सुट्टीत मुले लाम्बवर सायकल घेउन फिरतात. त्याना प्रेस करणे सोपे झाले.
मुलीला याची उपयुक्तता पटली. तिच्या मैत्रिणी व्यायाम म्हणून सायकल चालवायला येत नाहीत. तिला मुलांबरोबर जाव लागत मग उगीच काळजी वाटते. शिवाय ती देखिल आमच्या वर लक्ष ठेवते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत उपयोगी अ‍ॅप आहे हे ! विशेषतः, पालकांचा रक्तदाब ताब्यात ठेवण्यासाठी तर फार उपयोगी आहे ! :)