अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
29 Sep 2017 - 12:42 am

मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये.

पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले. जेव्हा त्याचे रिझल्ट आले तेव्हा वडिलांचा आणि मुलांचा डीएनए जुळत होता परंतु आई आणि मुलांचा डीएनए अजिबात जुळत नव्हता. अगदी ०.०% मिसमॅच. हे आईसाठीच काय पण कायदेपंडितांसाठी पण धक्कादायक होतं.

कदाचित पहिली टेस्ट चुकली असेल म्हणून लिडियाने दुसरी टेस्ट करायचं ठरवलं. या दुसऱ्या टेस्टचे निकालही काही वेगळे आले नाहीत. लिडियाला कोर्टाची नोटीस आली की मुले तुम्ही पळवून आणली नाहीत किंवा कुठल्या सरोगसी स्कॅममध्ये सहभाग नाही किंवा दुसर्याचीच मुले दाखवून टॅक्समधले फायदे लाटले नाही हे सिद्ध करा. पुढचे काही दिवस लिडियासाठी फारच भयानक गेले. आपली मुलं आपल्यापासून दुरावणार आणि आपण त्यांना कधीच भेटू शकणार नाही या भीतीने तिला ग्रासलं. त्यात भर म्हणजे जर मुलं तिचीच आहेत हे सिद्ध करता आलं नाही तर तुरुंगाची हवा खायला लागली असती. त्यात तिच्या आधीच्या दोन्ही गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे सगळे रेकॉर्ड उपलब्ध होते. पण मग ज्या मुलांना तिने जन्म दिला ती मुले कुठे आहेत याचा पण शोध घेणे अवश्य होते. डीएनए टेस्ट सोडून जन्मदाती म्हणून सिद्ध करण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे हे कोणालाच सुचत नव्हते.

लिडियाच्या सुदैवाने हा गोंधळ चालू असताना ती परत गर्भवती होतीच. मग कोर्टाने आदेश काढला की लिडिया जेव्हा बाळाला जन्म देईल तेव्हा कोर्टाची एक प्रतिनिधी लेबर रूम मध्ये उपस्थित असेल. बाळ जन्मल्या जन्मल्या बाळाचे डीएनए सॅम्पल घेऊन लिडियाच्या डीएनए बरोबर मॅच करा. तर नवीन बाळाचं डीएनए पण लिडियाबरोबर जुळत नव्हतं. लिडियाची चिंता जरा कमी झाली पण आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावायला लागला.

पण लिडियाच्या नशिबाने फिर्यादी (प्रॉसिक्युशन) पक्षाच्या वकिलाला कुठून तरी बॉस्टनमधल्या कॅरेन किगन नामक महिलेबद्दल माहिती मिळाली, जी तिने बचाव पक्षाच्या अॅलन टिंडेल नामक वकिलाच्या कानावर घातली. अॅलनने पुढे तपास केला असता एक धक्कादायक गोष्ट समजली की कॅरेन एक चिमेरिक स्त्री आहे. म्हणजेच अश्या व्यक्तींच्या शरीरात दोन वेगवेगळे डीएनए एकाच वेळेला असतात. या अनुषंगाने लिडियाच्या पुढील चाचण्या झाल्या. त्यात असे उघडकीला आले की लिडिया गर्भावस्थेत असताना सुरुवातीला जुळी मुलं म्हणून सुरुवात झाली. पण त्या दुसऱ्या गर्भाची वाढच फारशी झाली नाही. जसा जसा पहिला गर्भ वाढायला लागला, तेव्हा त्याने दुसऱ्या गर्भाला आपल्यात सामावून घेतलं. म्हणजे लिडिया जरी एक मूल म्हणून जन्माला आली तरी तिच्यात तिच्या न जन्मलेल्या बहिणीचा अंश राहिला. पुढे जेव्हा लिडियाला मुलं झाली तेव्हा त्यांच्यात लिडियाचा डीएनए न येता तिच्या न जन्मलेल्या जुळ्या बहिणीचा डीएनए आला.

फक्त अमेरिकेत आतापर्यंत ३० चिमेरिक लोक आढळले आहेत. सगळेच लोक डीएनए टेस्ट करायला जात नाहीत, त्यामुळे चिमेरिक लोकांची नक्की संख्या किती आहे हे समाजाने अवघड आहे. न जाणो आपल्यापैकी पण कोणी असू शकेल.

लिडियाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.

समाजजीवनमानमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

29 Sep 2017 - 1:30 am | पिलीयन रायडर

ऐकावे ते नवलच!! कधी विचारच केला नाही की असं काही होऊ शकतं. बहिणीचा DNA वगैरे थोडं भीतीदायक पण वाटलं!

संग्राम's picture

29 Sep 2017 - 1:35 am | संग्राम
संग्राम's picture

29 Sep 2017 - 1:35 am | संग्राम

असं पण होऊ शकत ....

स्रुजा's picture

29 Sep 2017 - 1:39 am | स्रुजा

सुरस !!

पण बहिणीचा जरी डिन एन ए असेल तरी लिडिया शी मॅच असयलाच हवा ना. कारण मावशी आणि भाचे यांचे आणि मुळात जुळ्या बहिंणीचे डी एन ए मॅचिंग असतात च. अगदी हाफ ब्रदर - सिस्टर चे पण मॅचिंग असतात.

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2017 - 2:30 am | ट्रेड मार्क

माझी पण अशीच समजूत होती. पण ते नेहमीच खरं नसावं बहुतेक.

ओह्ह ! फार च आश्चर्यजनक आहे हे मग. कारण मला वाटलेलं की अगदी १००% नसले तरी थोड्या प्रमाणात मॅच असणार.

रुपी's picture

29 Sep 2017 - 1:55 am | रुपी

रोचक!

हे वाचल्यावर बायोइंफॉर्मॅटिक्समध्ये 'चिमेरा'बद्दल ऐकल्याचं आठवत आहे.. पण बाकी काही आठवत नाही ;)

स्मिता.'s picture

29 Sep 2017 - 3:02 am | स्मिता.

मुलांना मिळालेला डिएनए जरी लिडियाच्या "सामावलेल्या" बहिणीचा असला तरी तो 0% मिसमॅच कसा असेल? आईएवढा नाही पण मावशीएवढा मॅच तर यायलाच हवा ना.

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2017 - 4:06 am | ट्रेड मार्क

पण टेस्ट्स करणाऱ्या विविध लॅब्सना तो ०.१ % सुद्धा मॅच करता आला नाही, हीच तर अविश्वसनीय गोष्ट आहे. आणि फक्त अमेरिकेत आत्तापर्यंत सापडलेल्या अश्या ३० व्यक्ती आहेत, संपूर्ण जगात कितीतरी असतील पण तो आकडा कदाचित आपल्याला कधीच कळणार नाही.

कदाचित यामुळे आपल्या (म्हणजे सायंटिस्टांच्या) समजुतींना बऱ्यापैकी धक्का बसला असेल. आणि या प्रकारच्या त्रुटी (?) असूनही जैविक आईबाप ठरवण्यासाठी डीएनए मॅचिंग हीच मुख्य टेस्ट मानली जाते. लिडियाचं नशीब चांगलं होतं की ती परत गर्भवती होती आणि बाळाचा जन्म कोर्टाच्या व्यक्तीसमोर झाल्याने हे उघडकीस आलं. नाहीतर डीएनए मॅच होत नाही म्हणून कोर्टाने विविध आरोपांखाली तिला तुरुंगात टाकले असते.

आता या केसमध्ये लिडियाला मातृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. पण हेच जर पुरुषाच्या बाबतीत असेल तर? म्हणजे अपत्याचे डीएनए आईबरोबर जुळतात पण वडिलांबरोबर जुळत नाहीत...

स्मिता.'s picture

29 Sep 2017 - 4:28 am | स्मिता.

एकूणच प्रकरण आतापर्यंतच्या समजाला धक्का देणारं आहे. त्यामुळे ते गर्भावस्थेत जुळ्या भावंडाला सामावून घेणं आणि एका शरिरात दोन डिएनए असणं अजून बुद्धीला पटत नाहीये. कदाचित जास्त उहापोह झाल्यावर तेवढंच संशोधन होवून विश्वासार्ह माहिती मिळेल.

अमेरिकन त्रिशंकू's picture

29 Sep 2017 - 4:39 am | अमेरिकन त्रिशंकू

चिमेरा नाही.
किमेरा किंवा कायमेरा.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2017 - 7:58 am | मार्मिक गोडसे

धक्कादायक माहिती.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2017 - 8:30 am | मार्मिक गोडसे

लिडियाचे केसांचे व त्वचेचे DNA तिच्या मुलांच्या DNA शी मॅच झाले नाही,परंतू सर्व्हायकल स्मिअरचे मॅच झाले. म्हणजे लिडियाचे शरीर वेगवेगळ्या फेनोटाइप व जेनोटाइप DNA ने बनले होते का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2017 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

या प्रकारात, एकाच पेशीत दोन जनुकसंच (जिनोम) नसतात... एका प्रकारच्या (एका अवयवाच्या) पेशीत एकच जनुकसंच (जिनोम) असतो.

"त्वचा व केस (केस हा त्वचेचाच एक उप-अवयव आहे)" आणि "सर्व्हायकल पेशी" हे दोन वेगवेगळे अवयव असल्याने त्यांच्यात वेगळे जनुकसंच असू शकतात... हे दोन्ही जनुकसंच वेगवेगळे जेनोटाईप (जनुकाचे / डिएनएची जडणघडण) आहेत.

फेनोटाईप म्हणजे एखाद्या जनुकसंचाचे व्यक्तीच्या शरिरात व्यक्त झालेले प्रदर्शन/फरक... उदा: कातडीचा रंग. डोळ्यांचा रंग, इ.

एकाच जनुक/जनुकसंघाचा (जीन/जीन गृप), "शून्य फरक (डॉर्मंट) ते अनेक फरक (व्हेरिड एक्स्प्रेशन... पक्षी डोळ्यांना दिसणारे किंवा प्रयोगशाळेतल्या तपासणीत सापडणारे अनेक प्रकारचे व्यक्त प्रदर्शन)" असा वैविध्यपूर्ण वर्णपट असू शकतो. त्यामुळेच, शरिराच्या बाह्य रुपापेक्षा डीएनए तपासणी जास्त विश्वासू ठरते.

टिनटिन's picture

29 Sep 2017 - 10:07 am | टिनटिन

House Season ३ Episode २ बघा. किती बरोबर आहे माहीत नाही पण entertaining आहे.

....एका माणसाला काही स्वप्न/चित्र दिसत असतात तोच एपिसोड आहे का हा?

यशोधरा's picture

29 Sep 2017 - 11:04 am | यशोधरा

अविश्वसनीय!

राघव's picture

29 Sep 2017 - 11:21 am | राघव

असेच म्हणतो. हतबुद्ध!

अभिजीत अवलिया's picture

29 Sep 2017 - 11:17 am | अभिजीत अवलिया

रोचक.

एस's picture

29 Sep 2017 - 12:09 pm | एस

इंटरेस्टिंग!

दीपक११७७'s picture

29 Sep 2017 - 2:11 pm | दीपक११७७

कदाचीत दोन वेगवेगळ्या व्यक्ती सोबत समागम झाला असेल, अगदी अल्प कालावधीच्या अंतराने.
दोघांचे शुक्राणु गर्भाशयात successfully fertilize झाले असणारं. पुढे आपण वर सांगीतल्या प्रमाणे एकच जीव गर्भाशयात वाढला असेल.
आणि परीणामी एकाच व्यक्ती मध्ये दोन भिन्न डीएनए आले असतील.

ही एक शक्यता वाटते

शलभ's picture

29 Sep 2017 - 3:35 pm | शलभ

3 वेळा.. :D

मराठी कथालेखक's picture

29 Sep 2017 - 5:14 pm | मराठी कथालेखक

तीन वेळा नाही .. एक वेळ , लिडीयाच्या जन्माची (म्हणजे तिच्या आईच्या गर्भधारणेची वेळ)

दीपक११७७'s picture

29 Sep 2017 - 6:33 pm | दीपक११७७

एकदम १००% बरोबर.

काही जणं प्रतिक्रिया देतांना खुप घाई करतात.

ओके.. तरीपण जास्तच खेचलं आहे असं वाटतय..तज्ञांच्या प्रतिक्रियेची वाट बघतो.

दीपक११७७'s picture

29 Sep 2017 - 11:15 pm | दीपक११७७

पण घाई करु नका!
तसे खाली खरे सरांची प्रतिक्रिया आली आहे वाचावी _/\_

शलभ's picture

3 Oct 2017 - 2:48 pm | शलभ

_/\_

मराठी कथालेखक's picture

29 Sep 2017 - 5:12 pm | मराठी कथालेखक

हे रंजक आहे.
पण मुळात आधीच घटस्फोटाच्या केसमध्ये आईची डी एन ए का करायला सांगितली हे नाही समजलं ? खरं तर एकूणातच डी एन ए का केली गेली ? जर बापाने 'ही मुलं माझी नाहीत' असा दावा केला तरच डी एन ए करण्याची गरज पडावी नाहीतर घटस्फोटासारख्या केस मध्ये ही खर्चिक चाचणी करायला लावण्याचं काय कारण ? असो.

माझ्या माहितीतल्या एका कुटूंबात मुलाचा रक्तगट आई आणि वडील दोघांशीही जुळत नाही, आणि ही माहिती मला त्या वडीलांनीच दिली. त्यापाठीमागेही असेच काही कारण असेल का ? झालंच तर ते बॉम्बे ब्लडग्रुपचं अजून एक वेगळंच प्रकरण आहे..त्याबद्दलही वाचायला आवडेल.

ट्रेड मार्क's picture

29 Sep 2017 - 6:55 pm | ट्रेड मार्क

घटस्फोटानंतर मुलं कोणाकडे राहणार हे ठरल्यानंतर त्या मुलांसाठी तो पालक सरकारी फायदे (टॅक्स बेनेफिट्स, पालक पुरेसं कमवत नसेल तर सरकारी मदत) हे मिळवू शकतो. लिडियाने अश्या सरकारी फायद्यांसाठी अर्ज केला होता. यात आता मित्र/ मैत्रिणीची म्हणा किंवा भावा/ बहिणीची मुले आपली दाखवून कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून डीएनए टेस्ट बंधनकारक आहे.

अमेरिकेत एक केस मध्ये उघडकीला आली होती, ज्यात एका बाईने सरकारी फायद्यांचा गैरवापर केला. सिंगल मदर असूनही जास्त मुलांना जन्म देऊन काम न करता सरकारी फायद्याच्या जोरावर पुरेसं कमवत होती. त्या केसचे डिटेल्स आत्ता सापडत नाहीयेत, मिळाले तर देतो.

बाकी प्रकार पण आहेत, जसे की पैसे मिळवण्याचा स्रोत असताना तो न दाखवणे, वडील बरोबर रहात असून व कमवत असूनही न सांगणे, मुलं आपल्याकडे रहात नसताना ती आपल्याकडे रहातात असा सांगून पैसे मिळवणे ईई.

माझ्या माहितीतल्या एका कुटूंबात मुलाचा रक्तगट आई आणि वडील दोघांशीही जुळत नाही, आणि ही माहिती मला त्या वडीलांनीच दिली. >> रक्तगट आई किंवा वडील यापैकी ऐकाशीतरी जुळलाच पाहीजे असे काही जरुरी नाही.

हा एक चार्ट मिळाला (सा.सं. योग्य वाटल्यास इमेज प्रतिसादमधेच एम्बेड करून द्या प्लीज. मला माहित नाही कसे करायचे)

For example, two O blood type parents can produce a child with only O blood type. Two parents with A blood type can produce a child with either A or O blood types. Two parents with B blood type can produce a child with either B or O blood type. One parent with A and another with B can produce a child with A, B, AB or O blood types. If one parent has A and another has AB, they can either produce a child with A, B or AB blood types. If one parent has A and another has O, they can either produce a child with A or O blood types.

मराठी कथालेखक's picture

3 Oct 2017 - 4:08 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद, हे माहित नव्हतं

उपाशी बोका's picture

29 Sep 2017 - 5:41 pm | उपाशी बोका

छान. नवीन माहिती कळली.

एमी's picture

29 Sep 2017 - 5:55 pm | एमी

रोचक!!

दुर्गविहारी's picture

29 Sep 2017 - 6:14 pm | दुर्गविहारी

नियमाला अपवाद असतो म्हणतात ते असे. इथुन पुढे डि.एन.ए. टेस्ट करताना हि बाबही विचारात घ्यावी लागेल.

गामा पैलवान's picture

29 Sep 2017 - 6:44 pm | गामा पैलवान

मार्मिक गोडसे,

लिडियाचे केसांचे व त्वचेचे DNA तिच्या मुलांच्या DNA शी मॅच झाले नाही,परंतू सर्व्हायकल स्मिअरचे मॅच झाले. म्हणजे लिडियाचे शरीर वेगवेगळ्या फेनोटाइप व जेनोटाइप DNA ने बनले होते का?

माझ्या अंदाजानुसार बहुतेक हो. संदर्भ : इथला मुद्दा क्रमांक २ - https://en.wikipedia.org/wiki/Genotype#Phenotype

चूकभूल देणेघेणे.

एका जिवंत शरीरात दोन डीएने असू शकतात. प्रत्यारोपित अवयवाचा डीएने निदान सुरुवातीला तरी यजमानाच्या डीएनेहून भिन्न असणार. पण यथावकाश कदाचित एकसारखा होत असेल. मध्यंतरीच्या काळात चाचणी केल्यास एखादं डीएने मिश्रण दृष्पत्तीस येईल.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 7:03 pm | सुबोध खरे

Tetragametic chimerism is a form of congenital chimerism. This condition occurs through the fertilisation of two separate ova by two sperm, followed by aggregation of the two at the blastocyst or zygote stages. This results in the development of an organism with intermingled cell lines. Put another way, the chimera is formed from the merging of two nonidentical twins (although a similar merging presumably occurs with identical twins, but as their DNA is almost identical, the presence would not be immediately detectable in a very early (zygote or blastocyst) phase). As such, they can be male, female, or have mixed intersex characteristics.[citation needed]

As the organism develops, it can come to possess organs that have different sets of chromosomes. For example, the chimera may have a liver composed of cells with one set of chromosomes and have a kidney composed of cells with a second set of chromosomes. This has occurred in humans, and at one time was thought to be extremely rare, though more recent evidence suggests that it is not the case
http://www.academia.edu/202539/Which_Half_Is_Mommy_Tetragametic_Chimeris...

डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली माहिती वाचुन पण आईशी डीएनए कसे जुळत नाहीत ते कळले नाही. वडीलांशी नाही जुळले तर समजु शकतो, पण आईच्या जिन्स तर दोन्ही गर्भात कॉमनच असणार ना ?

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2017 - 7:20 pm | मार्मिक गोडसे

This condition occurs through the fertilisation of two separate ova by two sperm

हे दोन पुरुषांच्या स्पर्मने होउ शकते का?

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 7:57 pm | सुबोध खरे

टेट्रा गॅमेटिक चिमेरिझम म्हणजे चार बीजातून निर्मिती झालेल्या व्दिगुणसूत्रक गर्भ. म्हणजेच दोन स्त्रीबीजे आणि दोन पुरुष बीजे--शुक्राणू(हे एका किंवा दोन पुरुषांचे असू शकतात) यापासून तयार होणारे दोन भ्रूण यांचा विलय होणे. यामुळे एकाच व्यक्तीच्या शरीरात गुणसूत्रांच्या दोन जोड्या असतात. काही अवयवात यातील एक जोडी आणि काही अवयवात दुसरी जोडी असते.
आपण जीन्स (गुणसूत्रांच्या) चाचणीत शरीराच्या कोणत्या भागाच्या/ अवयवाच्या पेशी वापरल्या त्याप्रमाणे गुणसूत्रे मिळतील.
वरील केसमध्ये लिडियाच्या गर्भाशयाच्या तोंडाच्या (सर्व्हायकल) पेशीतील गुणसूत्रांच्या जोडी सारखीच गुणसूत्रांची जोडी असलेल्या स्त्रीबीजापासून मुलाचा जन्म झाल्यामुळे मुलाच्या गुणसूत्रांची जोडी त्या अवयवाशी जुळली पण नेहमी चाचणी साठी घेत असलेले केस आणि त्वचा वेगळ्या गुणसूत्रांच्या जोडीचे होते यामुळे सुरुवातीच्या चाचणीत मुलाची आणि आईची गुणसूत्रे जुळली नाहीत.

ट्रेड मार्क's picture

30 Sep 2017 - 12:05 am | ट्रेड मार्क

धन्यवाद डॉ. खरे. चांगली माहिती मिळाली.

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2017 - 8:25 pm | मार्मिक गोडसे

धन्यवाद! बरेचसे समजले.
अजुन एक शंका, दोन्ही स्त्रीबीजे एकाच स्त्रीची असताना दोन्ही स्त्रीबीजात आईचे DNA असताना चाचणीत शुन्य टक्के कसे आले?

अंतु बर्वा's picture

29 Sep 2017 - 9:03 pm | अंतु बर्वा

एक शंका (लेखाबद्दल नाही) - जर identical twins चा डीएनए सारखाच असेल, आणि त्यापैकी एकाच्या मुलाची डिएनए टेस्ट केल्यास पिता कोण हे शोधता येत नाही का? की मायनर डिफरन्स शोधता येउ शकेल?

आगाऊ म्हादया......'s picture

30 Sep 2017 - 6:57 am | आगाऊ म्हादया......

बापरे, त्या बाईच्या डोक्यात काय काहूर उठलं असेल, लोकांनी किती उलटे सुलटे तर्ककुतर्क केले असतील.

असंका's picture

3 Oct 2017 - 12:31 pm | असंका

अगदी ०.०% मिसमॅच.

०.०% मिसमॅच = १००% मॅच....

मार्मिक गोडसे's picture

3 Oct 2017 - 2:27 pm | मार्मिक गोडसे

०.०% मिसमॅच = १००% मॅच....
+1

सुबोध खरे's picture

4 Oct 2017 - 7:58 pm | सुबोध खरे

टेट्रा गॅमेटिक चिमेरिझम हि स्थिती ५ ते १५ % लोकसंख्येत आढळून येते.
या मध्ये दोन पेशींच्या दोन गुणसूत्रांच्या जोड्यांच्या मिश्रणातून पेशी तयार होत असल्याने तयार होणाऱ्या शरीरामध्ये काही अवयव एका गुणसूत्रांच्या जोडीमुळे आणि काही अवयव दुसऱ्या गुणसूत्रांच्या जोडीमुळे तयार होतात उदा. जर ४६ XY या जोडीच्या पेशीने मेंदू तयार झाला पण दुसरी पेशी जिची गुणसूत्रांची जोडी ४६ X X अशी आहे त्याने जर बीजांडे तयार झाली तर "मानसिक दृष्ट्या पुरुष" (मेंदूआणि नसांमध्ये ४६ XY) असलेली ती व्यक्ती शरीरात इस्ट्रोजन प्रोजेस्टिरोन तयार झाल्यामुळे जननेंद्रिये स्त्री सारखी (किंवा अर्धवट) स्त्रीच्या शरीरात वसलेला पुरुष अशी स्थितीत असते. अशी बाह्य स्त्री जिला (मेंदू पुरुषांचा आहे) इतर स्त्रियांबद्दल आकर्षण असते ती लेस्बियन म्हणून जगत असते.
उलट स्थिती सुद्धा असू शकते म्हणजे ४६ X X मेंदू असलेली व्यक्ती वृषण आणि लिंग असल्यामुळे दिसायला पुरुष पण मानसिक दृष्टया स्त्री असते हा पुरुष मग इतर पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागल्यामुळे गे म्हणून जगात असतो.
मग किन्नर, बृहन्नडा किंवा शिखंडी हि पुराणातील उदाहरणे किंवा आजचे नपुंसकलिंगी व्यक्ती अशा आहेत का या वर सखोल संशीधन चालू आहे.
human chimerism may be quite common, occurring in between 5% and 15% of people. Chimerism has been believed to be rare because it usually presents without visible phenotype. In addition to the documented occurrence of dual gender macrochimeras with true hermaphrodite phenotype, there are reports of the occurrence of other natural human macrochimeras. The literature reviewed in this paper suggests that such macrochimerism is much more common than usually appreciated. Chimerism occurs in a patchy manner, with male cells outgrowing female in macrochimerism causing the majority to be phenotypically male. The literature also suggests that the sex of nervous system tissue is the primary determinant in higher animals of sexual attraction. From this, the existence of human macrochimeras in which large proportions of cells are male and female is predicted to have a correlation with homosexuality and transgender self-identification because in many such cases, the central nervous system, or crucial parts of it, will be of one sex and the gonads and body form will be of the opposite sex.
http://www.hy-ls.org/index.php/hyls/article/view/57/0.html
या विषयाची खोली आणि रुंदी फारच जास्त आहे. सध्या येथेच थांबतो.

मदनबाण's picture

6 Oct 2017 - 11:50 am | मदनबाण

च्यामारी लईच भानगड आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighter

सुमीत भातखंडे's picture

6 Oct 2017 - 3:08 pm | सुमीत भातखंडे

ऐकावं ते नवलच.
हे अजून एकः http://www.bbc.com/news/health-38717930