प्रिय मिपामालक.
सगळीच माणसं संस्थळावर नीट नसतात, आणि सगळीच तितकी सरळ. हे शिकेलच ना 'तो' मात्र त्याला एकदा सांगा. संस्थळावर प्रत्येक चांगल्या सदस्यांबरोबर एक 'गर्दीही' असते. आपला 'हिशेब टीशेब' ठेवणारेही असतात. आपल्या 'सोसायटीत' आजूबाजूला असतात तसे 'रंगेल' माणसंही असतात. संस्थळासाठी आयुष्य समर्पित करणारे सदस्य असतात, काही काड्या टाकणारेही असतात, तसे सदस्यांना जपणारे ....!
मला माहीती आहे. संस्थळावर सगळ्याच गोष्टी नाही बोलता येत आणि सांगताही येत तुम्हाला.... तरीही, जमलं तर एकदा व्य.नि. मनीतून त्याच्याशी बोला आणि त्याला सांगा... सदस्य जपावा लागतो, सांभाळावा लागतो. मनावर ठसवा त्याच्या की अजिबात वेळ नसतो मला. कधी कधी निर्णय वाईटही घ्यावा लागतो. एक एक सदस्य मला सोनचाफ्यासारखा प्रिय असतो. काही दिवस कसे शांत राहावे लागते, हे सांगा त्याला. मिपावर संयमाने आणि आनंदाने कसे राहावे हेही शिकवा त्याला.
तुमच्यात त्राण असेल तर त्याला टोकाचे प्रतिसाद टाकू नको, कोणाची अक्कल बिक्कल काढू नको, हेही शिकवा त्याला. उदंड उत्साह आवरता आला तर आवरत जा, आपलं 'अव्वल ज्ञान' व्यक्त करायला भीत जाऊ नको म्हणावं, संस्थळावर कुणालाही नमवणं सर्वांत सोपं असतं !
जमेल तेवढे दाखवीत चला त्याला मिपावरचे नियम, काही स्वतःचे, काही असलेलेले, काही नसलेले. जगू द्या त्याला मिपावर निर्वीवाद, बोलू द्या त्याला अमर्यादित. घेऊ द्या त्याला घेता येईल तितकी भरारी...कापू नका त्याचे पंख, बसू द्या त्याला इथे, तिथे, आणि तिकडेही.
मिपावर त्याला हा धडा मिळू दे, वादविवादात अपयश आले तरी ते स्वीकारलंच पाहिजे. तोच बोनस असतो मिपावर जगण्याचा. आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावर त्याचा प्रचंड विश्वास आहे, सर्वच त्याला चूक ठरवतात तेव्हा तो चिडतो, भांडतो. इथेच प्रचंड संयम ठेवायला शिकवा त्याला...!
त्याला समजावून सांगा, चांगल्याशी चांगलं वागतांना कोणाला अद्दल घडवायच्या फंदात पडू नको. त्याला हे पुरेपूर समजवा, की सर्वच ज्ञान इथे विकू नको, त्याची इथे किम्मत नाही. अनेकांच्या 'अंहं' लटकून पडतो. दुर्लक्ष करता आले तर कर म्हणावं. पण तुझ्या ज्ञानाची पाटी मिरवू नको, टोचा मारणार्या झुंडी आल्या तर त्याला दोन पावले मागे घ्यायला शिकवा आणि ठसवा त्याच्या मनावर की सत्यासाठी पाय रोवून लढतांना....रक्त आटवू नको म्हणावं जालावर.
त्याला प्रेमाने वागवा म्हणतोय पण म्हणजे लाडावूही नका. आणि हेही त्याला सांगा की जालावर ऐकायचं शिकवा त्याला, थोडक्यात भांडावं आणि अभ्यासूही मोजकंच बोलावं. कोण काय बोलतं ते आपल्या मनाच्या चाळणीतून चाळून घेतांना काही बरोबर असेल तर तेही स्वीकार म्हणावं...!
आभासी जगात 'तावून सुलाखून' निघाल्याशिवाय मानाचं पद आणि दरारा निर्माण होत नाही आणि झाला तरी त्याला फारशी किंमत नसते जालावर. त्याच्या रोमारोमात भिनवा की कोणत्याही शौर्यासाठी, संयमच आवश्यक असतो. तरच त्या ज्ञानाला किंमत असते.
आता इतकं ऐकलंच आहे तर आणखी एक सांगा त्याला, मला सर्वांचं ऐकावं लागतं, असेल उन्नीस बीस होत त्यातही पण उरातल्या बर्याच गोष्टी दाबून काही निर्णय घ्यावेच लागतात. अजून एक सांगतो, आसवं ढाळायची त्याला अजिबात सवय नाही. जमलं तर तितकं तुच्छ्तेने बोलणं टाळता आलं तर टाळ म्हणावं. कोणतेच रस्ते कधीच कायमचे बंद होत नसतात. प्रत्येक दिवस नवा असतो. नव्याने 'नवा' मार्ग शोधायचा. विजनवास एक संधी असते.
माफ करा मालक ! आज पावसाळी सायंकाळ म्हणून मी फार बोलतो आहे, खूप काही खरडतो आहे. पण पाहा. जमेल तेवढं अवश्य कराच !
आमचा जालमित्र भलताच हट्टी आहे, पण भलताच भारी आहे हो तो !!!
-प्रा.डॉ. :)
प्रेरणा : अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
प्रतिक्रिया
19 Jul 2017 - 9:19 pm | अभिदेश
योग्य विचार. लिंकनच्या पत्रावर बेतलेला तुमचं पत्र आवडले.
19 Jul 2017 - 9:39 pm | अभ्या..
आज हमने दिलका हर किस्सा तमाम कर किया,
खुद्द भी पागल होगये, हमको भी पागल करा दिया,
, सर, सर ओ सर.....
इ लोवे यु.
19 Jul 2017 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लौ यू टू रे...! लै दिवसांचा भावनिक बोळा तुंबला होता. आज मोकळं मोकळं वाटतंय. ;)
-दिलीप बिरुटे
20 Jul 2017 - 4:09 pm | विजुभाऊ
और ये लगा.... बिरुटे गुरुजी चौका
लै दिवसानी दिसलात प्रा डॉ.
मजा आली.
19 Jul 2017 - 10:29 pm | दशानन
लेखनाचा उद्देश आवडला व पटला ही, पण "मालक" मला व्यनी करून परत बोलावून घेतात म्हणून अजून शेफारला तर काय हो?
19 Jul 2017 - 11:37 pm | यशोधरा
भारी पत्र.
20 Jul 2017 - 12:49 am | एस
बादवे, हेडमास्तरांनी अब्राहम लिंकनच्या पत्राला उत्तर दिलं होतं की नाही हे कुणाला माहीत आहे का? असल्यास कृपया पत्राची लिंक देणे.
20 Jul 2017 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अब्राहम लिंकनच्या पत्राला कोणी उत्तर लिहिले असेल की ते माहिती नाही पण आमचे एक अमेरिकेतील मित्र मला खासगीत म्हणाले की अब्राहम लिंकनने असे पत्रच कधी लिहिलेले नाही.
http://creative.sulekha.com/abraham-lincoln-did-not-write-this-letter-to... (शेवटचा प्रतिसाद वाचा)
-दिलीप बिरुटे
20 Jul 2017 - 7:13 pm | mayu4u
यांच्या "नाही मनोहर तरी..." या पुस्तकात आहे.
20 Jul 2017 - 2:05 am | गामा पैलवान
प्राडॉ,
शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची!
मालकांनी त्याला परत बोलावलं तर मालकांना उद्देशूनही हेच म्हणेन!
आ.न.,
-गा.पै.
20 Jul 2017 - 9:57 am | पैसा
आता थांबू नका. याच मालिकेत संपादक, सल्लागार, त्रस्त वाचक, ट्रोलभैरव, त्सुनामीकारक लेखक, अशा सगळ्याना पत्र लिहा. बादवे, मिपावरचे नग बोलून सुधारतात यावर तुमचा अजून विश्वास आहे हे पाहून बरे वाटले.
20 Jul 2017 - 10:05 am | ज्ञानोबाचे पैजार
ये सब पयलेच सोचनेका होता है रे बाबा, अब एक बार निर्णय लिया तो उसको बदलना ठीक नही होता है, और अपने संस्थळ के इज्जत का भी खयाल करो ना रे बाबा.
तुम्हारा मित्र सचमे अगर एवढा ग्यानी होता तो उसके उपर ये वेळ आता नही ना. और अगर तुमको ऐसा लगता है की संस्थळ का निर्णय चुक्या तो फिर ऐसे येडे लोगो के संस्थळ पे बार बार वापीस क्यो आनेका?
जरा एक और बात का उत्तर दो, "मछली को पेडपे चढना आता नही इसलिये मछली बेवकुफ है" ऐसा सोचनेवाला आदमी ग्यानी कैसे हो सकता है?
बाबुराव गणपतराव आपटे उर्फ पैजारबुवा,
20 Jul 2017 - 11:36 am | अजया
पत्र आवडले. ( कधी नव्हे ते) सरांशी अगदी सहमत!
20 Jul 2017 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयडी अजयाचाच आहे का म्हणून ! :/
-दिलीप बिरुटे
20 Jul 2017 - 4:49 pm | अजया
हम ना बदलेंगे वक्त की रफ़्तार के साथ ,
हम जब भी मिलेंगे अंदाज पुराना होगा ;)
20 Jul 2017 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा
(हे) पत्र नव्हे ,मित्र.
20 Jul 2017 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा
(हे) पत्र नव्हे ,मित्र.
20 Jul 2017 - 2:17 pm | पैसा
प्रा डॉ,तुमच्या मित्रासाठी एक शेर
20 Jul 2017 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा जालमित्र तसा रसिक माणूस आहे, तो म्हणाला असता-
"कारीगर हूँ साहब 'अल्फ़ाज़ो' की मिट्टी से 'महफ़िलों' को सजाता हूँ,
कुछ को 'बेकार' तो कुछ को 'कलाकार' नज़र आता हूँ
जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू आमच्या मित्राची. ;)
-दिलीप बिरुटे
20 Jul 2017 - 2:58 pm | अभ्या..
अहाहाहा सरजी. वाह खूब.
20 Jul 2017 - 3:06 pm | पैसा
अस्सं कस्सं? अपना तो दिल ही कुछ ऐसा हय!
20 Jul 2017 - 3:29 pm | यशोधरा
वा, वा!
20 Jul 2017 - 3:01 pm | गणामास्तर
भारीच ओ सर ! "त्या" तुमच्या मित्राला पंख फुटून परत इथे तिथे बसावा हिचं ईच्छा.
त्याचबरोबर ऑलरेडी इथे तिथे बसून असलेल्यांना सुद्धा वरील पत्रातील काही भाग समजावून सांगावा अशीही ईच्छा.
20 Jul 2017 - 3:28 pm | यशोधरा
हा आहे तर नवीन खरडफळ्याचा पत्ता!
20 Jul 2017 - 3:39 pm | पैसा
गतम् न शोच्यम्!
गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः ॥
आजूबाजूला बघा. तुमचे मित्र ज्ञानी असल्याने जुन्या आयडीचे दु:ख न करता नव्या आयडीरूपी वस्त्रात मिपावर कदाचित आलेसुद्धा असतील!
20 Jul 2017 - 5:53 pm | वरुण मोहिते
इतके समंजस आणि प्रगल्भ प्राध्यापक आजच्या जगात दुर्मिळ तसे ....
बाकी पत्र आवडले .
20 Jul 2017 - 6:38 pm | सिरुसेरि
छान लिहिलं आहे . "अपनी तो पाठशाला .. मस्तीकी पाठशाला " असं म्हणत पुराना किल्ल्यामधे धुमाकुळ घालणारे डीज्जे आणी त्याचे मित्र आठवले . या डीज्जेलाही मनातुन माहिती आहे की " आपली हिरोगिरी फक्त आतमधेच चालु शकते . एकदा इथुन बाहेर पडले की , बाहेरच्या जगात आपल्याला काहिही किंमत नाही . "
21 Jul 2017 - 12:36 pm | पिंगू
प्राडॉ, खुसखुशीत पत्र आवडले..
21 Jul 2017 - 8:41 pm | नीलमोहर
पण काय ना सर, आता बोलावलं तरी परत येऊ नये त्याने, परत आला तरी तेच होईल,
यू नो, हिस्ट्री रिपीट्स,
सो येऊच नये त्याने, बेटर फॉर हिम,
22 Jul 2017 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यू नो, हिस्ट्री रिपीट्स
खरंय, काहींच्या बाबतीत इतिहासाचीच पुनरावृत्ती होत असते.
सो येऊच नये त्याने, बेटर फॉर हिम
हं...... (दीर्घ पॉज) यायलाच हवं....!
-दिलीप बिरुटे
22 Jul 2017 - 12:24 am | जुइ
भारी आहे हे पत्र!
22 Jul 2017 - 10:28 am | सचिन काळे
पत्र छान लिहिलंय.
28 Jul 2017 - 4:04 pm | माहितगार
लय भारी :) , सरांनी आभार प्रदर्शन उरकलेल असल्यामुळे प्रतिसाद वर देतो आहे म्हणजे आभार आयतेच पावतील.
22 Jul 2017 - 8:26 pm | शब्दबम्बाळ
छान लिहिलंय.. आवडलं!
पावसाळी सायंकाळी लिहिलंय म्हटल्यावर आतूनच आलं असणार...
याचा उपयोग होईल का माहित नाही पण तरीही भावना छान उतरवल्या आहेत.
मैं चुप कराता हूँ हर शब उमडती बारिश को
मगर ये रोज़ गई बात छेड़ देती है
27 Jul 2017 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद देणार्या सर्व मिपाकर मित्र मैत्रीणींचे मन:पूर्वक आभार.
वाचकांचेही आभार..असाच लोभ असू द्या... !
जब बेअसर से होने लगे मन्नतो के धागे,
समझलो और इम्तिहान है इसके आगे.
-दिलीप बिरुटे