...नवल!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
16 Jul 2017 - 4:33 pm

नजर टाळणे..पण पहाणे..नवल!
तुझे लाजणे अन् बहाणे..नवल!

मला जाग आली सुगंधी किती!
तुझे अत्तराचे नहाणे...नवल!

जुनी वाट हरवून गेली तरी
तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

कुणी पारधी ना कधी भेटला
कुणी साधले हे निशाणे..नवल!

कुणी हात सोडून अर्ध्यावरी
बरे घेत आहे उखाणे..नवल!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलरतीबाच्या कविताकवितागझल

प्रतिक्रिया

राघव's picture

18 Jul 2017 - 9:59 pm | राघव

असे शब्द.. अर्थात ओथंबलेले!
समजूनही पुन्हा वाचणे.. नवल!

भाषेत अपुल्या कशी ती करामत!
पुन्हा भाव "तो".. उमजणे.. नवल!

गझल खूप आवडली. शेवटचा ट्विस्ट कातिल! :-)

मितान's picture

19 Jul 2017 - 12:43 pm | मितान

सुंदर !!!

वरची राघव यांची उत्स्फूर्त दाद ही आवडली !

सानझरी's picture

19 Jul 2017 - 1:08 pm | सानझरी

फारच सुंदर!!!

सत्यजित...'s picture

19 Jul 2017 - 9:19 pm | सत्यजित...

राघव खूप भरभरुन दाद दिलीत,त्याबद्दल आभारी आहे मी आपला!
मितान,सानझरी...आपलेही मनःपूर्वक धन्यवाद!

Swapnaa's picture

25 Jul 2017 - 6:54 pm | Swapnaa

Khup chan