ती पहा पडली गझल...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
15 May 2017 - 11:59 pm

ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!?

पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!

कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!

हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!

काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

16 May 2017 - 10:15 am | विनिता००२

ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी >>> लोल

भारीये :)

हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!

काय लिहीलंय.. वाह्..

पैसा's picture

16 May 2017 - 12:04 pm | पैसा

..लाच देल्यासारखी

इथे जरा गडबड झालीय. काही शेर आवडले, काही गडबडले.

विशाल कुलकर्णी's picture

18 May 2017 - 10:12 am | विशाल कुलकर्णी

सहमत ! शेवटचे दोन्ही शेर आवडले .

बुवाचे लक्ष गेले कसे नाही अजुन, कडक कच्चा माल आहे

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2017 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा

माझं लक्ष काय???

हे असलं हवं तुला इकडे यायला.. अं Ssssssss ?

हरामखोर पांडू, तूच मार की दांडू! :p

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2017 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा. आवडली रचना.

-दिलीप बिरुटे

हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!

आवडला.

तुम्ही गझलेव्यतिरिक्त अजून काही लिहायला पाहिजे असे ही गझल वाचून वाटले.

सत्यजित...'s picture

18 May 2017 - 2:53 am | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

गझलेची एक व्याख्या अशीही केली जाते की,डोक्यात शिरण्याआधीच काळजात घुसते,ती गझल!

drsunilahirrao's picture

23 Jun 2017 - 6:27 pm | drsunilahirrao

आवडली!