नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या!
नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या!
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!
नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या!
जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो
चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या!
—सत्यजित
प्रतिक्रिया
17 Apr 2017 - 9:58 pm | एस
छान कविता.
18 Apr 2017 - 12:32 am | सत्यजित...
धन्यवाद!
18 Apr 2017 - 1:07 pm | मोनाली
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!>>>> खूप छान!
18 Apr 2017 - 5:46 pm | सत्यजित...
धन्यवाद!
18 Apr 2017 - 6:01 pm | दशानन
गझल किती नियमात आहे हे न पाहता आशय पाहून म्हणतो...
खूप आवडली आहे, सध्या अभ्यास कमी असल्याने नियम इत्यादी चिरफाटे सोडून लिहतो आहे.
18 Apr 2017 - 8:06 pm | सत्यजित...
धन्यवाद!
20 Apr 2017 - 10:59 am | अनुप ढेरे
छान आहे!
20 Apr 2017 - 5:24 pm | सत्यजित...
धन्यवाद!
20 Apr 2017 - 7:58 pm | प्रमोद देर्देकर
आवडली येवू द्या अजून
21 Apr 2017 - 12:50 am | सत्यजित...
धन्यवाद!
20 Apr 2017 - 9:55 pm | पैसा
कविता आवडली
21 Apr 2017 - 12:51 am | सत्यजित...
धन्यवाद!
21 Apr 2017 - 1:26 am | आषाढ_दर्द_गाणे
छान!
21 Apr 2017 - 4:14 am | सत्यजित...
धन्यवाद!
21 Apr 2017 - 11:10 am | वेल्लाभट
सॉलिड आवडलीय ! :) आशय अप्रतिम मांडलायत. वाह वाह!
क्या बात है भाऊ क्या बात है!
10 May 2017 - 9:17 am | सत्यजित...
धन्यवाद!