खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी
भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी
मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी
ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी
साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी
... संदीप
प्रतिक्रिया
4 May 2017 - 11:06 pm | एस
वा वा वा! फारच लयबद्ध आणि गेय काव्य. मजा आली वाचताना.
5 May 2017 - 3:44 am | सत्यजित...
>>>'कैकदा',सारे अशी,सारे तशी,बट लाजरी>>>मिसरा आवडला!
>>>बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी>>>क्या बात है! हा मिसरा तर जबरदस्तच!शेरही छानंच!
लिखते रहिये!!
5 May 2017 - 8:32 am | संदीप-लेले
एस, तुमचा उत्स्फूर्त अभिप्राय वाचून दिल खुश हो गया ! अनेक धन्यवाद.
सत्यजित, तुझ्याकडून शाबासकी मिळाली. त्यानेही दिल खुश हो गया :) 'कैकदा' लिहावे असे मलाही वाटले होते. पण गेयता कमी होईल अशी शंका आली. आता प्रत्यक्ष तूच म्हणतो आहेस तर तसेच करतो.
dr अहिरराव, विशाल कुलकर्णी आणि विशेषतः: सत्यजित यांच्या गजल वाचून गजल लिहायची तीव्र इच्छा झाली.
गजल च्या नियमांसंबंधी विशाल कुलकर्णी यांनी उपयुक्त माहिती कळवली. त्याबद्दल विशालचे मनापासून आभार.
मिपा मुळे हे शक्य झाले. ३ cheers for मिपा !!!
5 May 2017 - 8:43 am | संदीप-लेले
<<<पण गेयता कमी होईल >>> गेयता नाही, गोडवा कमी होईल असे वाटले
6 May 2017 - 5:10 am | सत्यजित...
संदीपजी,
गझल लिहावयाची तीव्र इच्छा बाळगून आहात हे वाचून आनंद झाला!आणि म्हणूनच अजून लिहितो आहे...
शेवटच्या शेरात,दोन मिसऱ्यांमध्ये,राबत्याचा प्रश्न जाणवतो आहे! खरेतर,शेरांना पर्यायी शेर सुचवणे हा माझा स्वभाव नाही.किंबहुना,पहिल्यांदाच सुचवतो आहे,याचे कारण इतकेच की आपली लिखाणाबद्दलची इच्छा जाणवली,व राबता जरा स्पष्ट व्हावा! हां,तर तो शेर मी असा काहिसा लिहिला असता...
वर्षतो ग्रीष्मात आहे..साध ही संधी बरी
हे बहाणे सोड राणी..चल भिजू आतातरी!
6 May 2017 - 5:17 am | सत्यजित...
किंवा
विर्घळू दे लाजणे हे,चल भिजू आतातरी!
असे काही!
6 May 2017 - 12:00 pm | संदीप-लेले
व्वा, व्वा, क्या बात है ! पटलेच.
5 May 2017 - 10:14 am | मितान
गजलेची तांत्रिक भाषा कळत नाही. पण यातली लय खूप आवडली. ते पंचम वाले चरण तर खासच !
5 May 2017 - 1:40 pm | संदीप-लेले
धन्यवाद मितान.
सुरेश भट यांनी सोप्या शब्दात लिहिलेले गजलेचे नियम या धाग्यावर मिळतील.
ही गजल लिहिताना मला गजल लिहिण्याचे, लिहिण्याचे म्हणण्यापेक्षा बनवण्याचे, एक तंत्र लक्षात आले. सिद्धहस्त कवींची बात वेगळी. पण मला कविता आणि गजल, दोन्ही बनवाव्या लागतात.
ज्यांना गजल लिहायची इच्छा आहे पण तंत्र माहित नाही, त्यांना ते उपयोगी पडेल असे वाटते. अर्थात मुळात कविता लिहिता येणे आवश्यक आहे.
मला सुचलेल्या कवितेवरून ही गजल कशी बनवली यावर सोदाहरण माहिती देऊन स्वतंत्र लेखात हे तंत्र सांगावे की काय असा विचार मनात येतो आहे. कोणाला त्यात रस असल्यास कळवावे.
5 May 2017 - 2:26 pm | सतिश गावडे
गजलेच्या नियमांच्या दुव्यासाठी धन्यवाद.
जरुर लिहा. माझ्यासारख्या कित्येक यमकहरामांना त्याचा फायदा होऊ शकेल.
5 May 2017 - 2:52 pm | मितान
+११
5 May 2017 - 2:43 pm | एस
भटसाहेबांच्या लेखाबद्दल धन्यवाद.
5 May 2017 - 1:52 pm | पाटीलभाऊ
एकदम मस्त कलाकृती...!
दिल छु लिया..!
6 May 2017 - 7:41 pm | संदीप-लेले
धन्यवाद पाटीलभाऊ.
6 May 2017 - 9:42 pm | पैसा
सुरेख!
6 May 2017 - 11:28 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त लयबद्ध रचना.... आवडली....
साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी
क्या बात है....
7 May 2017 - 7:02 pm | संदीप-लेले
पैसा आणि शार्दूल, धन्यवाद !