दे बहाणे सोडुनी ...
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी
भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी
मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी
ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी
साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी
... संदीप
वा वा वा! फारच लयबद्ध आणि गेय
छान!
एस, तुमचा उत्स्फूर्त अभिप्राय
>> गेयता नाही, गोडवा कमी होईल
संदीपजी,
किंवा
व्वा, व्वा, क्या बात है !
गजलेची तांत्रिक भाषा कळत नाही
गजल लिहिण्याचे तंत्र
गजलेच्या नियमांच्या
+११
भटसाहेबांच्या लेखाबद्दल
आहाहा...
धन्यवाद पाटीलभाऊ.
सुरेख!
वाह!!
पैसा आणि शार्दूल, धन्यवाद !