नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात.
एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे.
स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही.
चारोळ्या देण्याचा अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)असेल.
परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील.
निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल.
चला तर मग
महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती.
----
प्रतिक्रिया
29 Apr 2017 - 11:51 am | अभ्या..
अहाहाहाहा, मस्तच जमलीय हो.
अप्रतिम साकडे.
पांडुरंगा, मायबापा ___/\____
29 Apr 2017 - 4:09 pm | राघवेंद्र
+१
29 Apr 2017 - 1:39 pm | पद्मावति
एक से एक चारोळ्या येताहेत. मस्तच.
29 Apr 2017 - 11:13 pm | अभ्या..
आई मराठी, माय मराठी, अम्मा मम्मी याडी मराठी
हाय मराठी हॅलो मराठी, बाय बाय टेककेअर मराठी
ब्रेड मराठी, पिझ्झा मराठी, नान पराठा दोसा मराठी
महाराष्ट्राची रीत मराठी, सर्वांना सामावून उरणार मराठी
29 Apr 2017 - 11:43 pm | इडली डोसा
अटकेपार लावले झेंडे
चालवू परंपरा अशीच पुढे
असो खंड वा देश कोणते
गर्जते मराठी सगळीकडे
30 Apr 2017 - 4:07 pm | aanandinee
मराठी माझी असे माऊली
महाराष्ट्र अन् बाप असे
सातसमुद्रापारही हृदयी
महाराष्ट्राची माती वसे
डॉ. माधुरी ठाकुर (आनन्दिनी)
अॅबर्डीन , युके
30 Apr 2017 - 8:01 pm | तुषार काळभोर
बहुतेक थोडा उशीर झालाय. पण स्पर्धा एक बाजूला, ही चारोळी खूप आवडली.
1 May 2017 - 9:12 am | यशोधरा
आज निकाल येतोय ना? :)