नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात.
एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे.
स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही.
चारोळ्या देण्याचा अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)असेल.
परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील.
निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल.
चला तर मग
महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती.
----
प्रतिक्रिया
25 Apr 2017 - 8:23 pm | यशोधरा
स्पर्धेसाठी.
पुरावे, अश्रू, उसासे,
सारंच कसं फोल आहे..
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे..
25 Apr 2017 - 10:16 pm | मितान
वाचायला मजा येणार.
25 Apr 2017 - 11:15 pm | मितान
खाली उतरणं सोपं
वर निघणं जमेना
बळ पुराचं आणून
नदी उलटी वाहीना.
27 Apr 2017 - 9:32 pm | माहितगार
छान
28 Apr 2017 - 7:30 pm | राघव
बळ पुराचं आणून
नदी उलटी वाहीना.
कल्पना खूप आवडली. :-)
28 Apr 2017 - 11:15 pm | रुपी
मस्त..
25 Apr 2017 - 11:20 pm | पिलीयन रायडर
विषय : महाराष्ट्र
उत्तम कल्पना! वाचायला उत्सुक!
26 Apr 2017 - 11:51 am | अरूण गंगाधर कोर्डे
देव चढला रे चढला
दारू चढली रे चढली
देवापेक्षा दारू बरी
लवकर उतरते तरी
26 Apr 2017 - 11:52 am | चांदणे संदीप
स्पर्धेसाठी नाही:
जमले ना अजूनी
शब्द पुरे कोशात
परिचय देण्या महाराष्ट्राचा
लागतील घ्यावे जन्म सात!
Sandy
26 Apr 2017 - 12:13 pm | साहेब..
बाकी सगळ्या चारोळ्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाहीये.
27 Apr 2017 - 3:36 pm | इरसाल कार्टं
जिंकलात जिंकलात
26 Apr 2017 - 2:33 pm | विशाल कुलकर्णी
चारोळी नाहीये, पण जे काही आहे ते हे आहे...
नकोच आम्हा चौकट कुठली
नकोत आता कुठल्या सीमा
जो जो येई तो होई आपला
सज्ज स्वागता प्रत्येकाच्या महाराष्ट्र माझा
कुणी बिहारी, कुणी मद्रासी
कुणी भय्या युपीचा
बंगाली कुणी, कुणी गुजराती
सामावून सकळा घेई आनंदे, महाराष्ट्र माझा
बलिदाने कित्येक पाहिली
हौतात्मे ती सुखे मिरवली
माती सोशिक सह्याद्रीची
शौर्य पिकवतो अभिमानाने महाराष्ट्र माझा
शिवबाचा, बाजीप्रभूंचा
टिळक, आगरकर, ज्योतिबांचा
बंग, आमटे, सिंधुताईंचा
परंपरा समृद्ध मिरवतो हा महाराष्ट्र माझा
अनेक रूपे भाषेची येथे
अगणित साज मराठी ल्याली
हवा कशाला गर्व व्यर्थ हो
सांगे अर्थ सहिष्णुतेचा महाराष्ट्र माझा
इथल्या दरीखोऱ्यात नांदतो
समीर अवखळ स्वातंत्र्याचा
सुटे कधी ना आत्मभान परी आदर सर्वांचा
स्वातंत्र्याचे मर्म शिकवतो महाराष्ट्र माझा
हा महाराष्ट्र माझा ...
विशाल
27 Apr 2017 - 12:22 am | अभ्या..
मस्त रे विशाल, प्रत्येक कड़वे विनर होईल अर्शी कविता.
27 Apr 2017 - 8:12 am | मितान
वा विशाल ! अगदी चाल लावून म्हणता येईल अशी सुंदर कविता !
26 Apr 2017 - 2:38 pm | पिशी अबोली
कंपल्सरी झेंडे चढतील,
दिन-दीन कोट्या झडतील,
सह्याद्री-मुंबई-विकास-मागास,
एकदा फडफडतील, मग गप पडतील.
26 Apr 2017 - 3:54 pm | आदूबाळ
स्पर्धेसाठी नाही
धरणे अन् पाटबंधारे
पैशाचा काला केला
पल्पवृक्ष पुत्न्यासाठी
लावुनिया काका गेला
- पॅसिव्हसुत
27 Apr 2017 - 8:14 am | मितान
कविनामासाठी पुन्हा एकदा टाळ्या !!! :))
26 Apr 2017 - 4:13 pm | अभ्या..
कापड आमचे उधार दांडा
जोषात घुमवू आपलाच झेंडा
इकून बापाच्या समद्या पेंडा
सोताच्या शिंगामागं पळतोय गेंडा
27 Apr 2017 - 9:30 pm | माहितगार
जमलीए
26 Apr 2017 - 11:53 pm | जव्हेरगंज
तमारा गुजरी लायका नथी
तोहार बिहार गयो आखरी
तमिलील यारुम केतकाविल्लई
जगात महाराष्ट्र एक नंबरी
27 Apr 2017 - 9:29 pm | माहितगार
:)
27 Apr 2017 - 12:11 am | स्रुजा
अरे वा ! भारी उपक्रम.. मजा येणार वाचायला.
27 Apr 2017 - 6:13 am | तुषार काळभोर
मनातली भावना अजून अमूर्त आहे,
मराठीविण आयुष्या काय अर्थ आहे।
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो,
मराठीच्या सावलीत जीवन सार्थ आहे॥
27 Apr 2017 - 9:28 pm | माहितगार
वा मस्त आहे आवडली
27 Apr 2017 - 8:06 am | Pradip kale
स्पर्धेसाठी.
कित्येक आले, कित्येक झाले
गाऊन गेले महती जयाची
उत्तुंग अशी किर्ती माझ्या महाराष्ट्राची
तेथे पुरतील काय या चार ओळी
27 Apr 2017 - 8:15 am | मितान
बहुतेक चारोळ्या उद्विग्न येताहेत असे निरीक्षण ! :(
27 Apr 2017 - 8:43 am | माहितगार
नकोत आम्हा लंगोट कुठली
नको आम्हा भाषेचा अभिमान
जो जो हाणेल त्याच्या
.. प्रत्येकाच्या .. हरवते कुठे अवसान
27 Apr 2017 - 9:00 am | माहितगार
मुक्ततेसाठी लंगोट गर्वाचे टाकावे
स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाचे सोडू नये
तारतम्य हवे केव्हा टाकावे, केव्हा झाकावे
घास द्यावा पण पाट आपला सोडू नये
27 Apr 2017 - 1:12 pm | अभिषेक पांचाळ
महाराष्ट्र दिन स्पर्धेसाठी :
लढले किल्ले लढली माती , लढला राजा घडली ख्याती
लढले बाहू शिरही लढले , ताठ कण्याने नडली छाती
वीर असे इथेच घडले , दिल्लीचे ते तक्थही रडले
गुणगान असे हे या मातीचे , अटकेपारही झेंडे पडले
अभिषेक पांचाळ , पुणे
27 Apr 2017 - 1:57 pm | अभ्या..
भारीच रे अभिषेक,
मस्तय.
.
थोडे जरा अटकेपार झेंडे पडले पेक्षा झेंडे गाडले चालेल का?
किंवा पडायचेच असेल तर पाऊल पडले लिहिता येईल
27 Apr 2017 - 4:24 pm | अभिषेक पांचाळ
धन्यवाद ..तसंही होऊ शकेल.. पण आता ते पहा एडिट नाही करता येणार.. ?
27 Apr 2017 - 5:20 pm | चांदणे संदीप
तेच म्हणणार होतो.... झेंडे पडले ऐवजी "चढले" ही चालेल!
काहीही! =))
Sandy
27 Apr 2017 - 2:03 pm | पुंबा
फारच उत्तम...
28 Apr 2017 - 11:16 pm | रुपी
छान!
27 Apr 2017 - 2:02 pm | खेडूत
मला मराठीचा लळा
बाकी कांही जमत नाही
आईने थोपटावे म्हणून तर
बाळ लवकर झोपत नाही !
27 Apr 2017 - 2:02 pm | खेडूत
मला मराठीचा लळा
बाकी कांही जमत नाही
आईने थोपटावे म्हणून तर
बाळ लवकर झोपत नाही !
27 Apr 2017 - 9:25 pm | माहितगार
उखाण्यात नाव घ्यावे मराठीचे
ट ला ट चे आणि 'म' ला 'म' चे
27 Apr 2017 - 2:12 pm | अजया
छान उपक्रम.
27 Apr 2017 - 2:37 pm | जिन्क्स
महाराष्ट्र दिन स्पर्धेसाठी :
उंटा वरुन शेळी राखणार्यांची
इथे भरली आहे शाळा
अन्नदाता झोपतो उपाशी
आपल्याच घरात उपरा, तो बळी राजा
27 Apr 2017 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा
'स्पर्धेसाठी'
महाराष्ट्र दिन १मे ला
म्हणून मी "मराठी"आहे.
हमरी-तुमरी.. ,रोज एक मेला!
म्हणूनंही "मी" मराठी आहे.
========
अतृप्त..
27 Apr 2017 - 3:19 pm | श्रीगुरुजी
मराठी म्हणून जन्मलो
हेच कधीकधी विसरलं जातं,
मराठी वर्ड्स रिमेंबर करायला
खूपखूप डिफिकल्ट जातं
27 Apr 2017 - 9:22 pm | माहितगार
!!
27 Apr 2017 - 3:36 pm | माम्लेदारचा पन्खा
"हर हर महादेव" नाद गुंजता
सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . .
माऊलीहूनही मृदू होती ते
महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे !
27 Apr 2017 - 3:58 pm | अॅस्ट्रोनाट विनय
स्पर्धेसाठी :
झटकून राख, नव्याने जाग,
आठव शिवशंभू बाणा;
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
उठ महाराष्ट्रा, लढ पुन्हा.
27 Apr 2017 - 4:48 pm | Dr prajakta joshi
सह्याद्रीचे लेणं आणिक
कोटकिल्यांची ग वसनं.....
माझ्या महाराष्ट्राच्या गर्भी
उपजे संतमहात्म्यांची खाण..
27 Apr 2017 - 4:52 pm | Dr prajakta joshi
सह्याद्रीचे लेणं आणिक
कोटकिल्यांची ग वसनं.....
माझ्या महाराष्ट्राच्या गर्भी
उपजे संतमहात्म्यांची खाण..
ईथ शिवबाचा ईतिहास
माऊलीचा उपदेश
देवांचाही देव घेतो
ईथ गरीबाचा वेश
ईथ सावित्रीच्या लेकी
बहीणाबाईची कवनं..
मुक्ताईच्या अभंगानं
ईथ फुलतं नंदनवन
ईथ राबणारा कुणबी
ईथ हाडाचा शिक्षक
ईथ सायबरचाही गुरू
ईथ हुशार वैद्यक
कवतुक महाराष्ट्राचं
सांगताना लोका
आत्महत्या बळीराजाची
चुकवी काळजाचा ठोका
तडफदार बाणा आपला
देतो मराठीपणाची ग्वाही
अस भेकडं मरण गड्या
रीत आपली न्हाई
....रीत आपली न्हाई....
प्राजक्ता जोशी
27 Apr 2017 - 5:25 pm | वेल्लाभट
भारी !
28 Apr 2017 - 2:19 pm | इरसाल कार्टं
खूप चॅन लिहिलात
28 Apr 2017 - 6:02 pm | Dr prajakta joshi
धन्यवाद
28 Apr 2017 - 6:05 pm | Dr prajakta joshi
धन्यवाद
27 Apr 2017 - 5:31 pm | वरुण मोहिते
कामगार गेले ,आता
शेतकरीही जातील ,सत्तेवरील
लोकं फक्त
लोणी आवडीने खातील .
27 Apr 2017 - 5:39 pm | वेल्लाभट
स्पर्धेसाठी
सह्याद्रीसम विचार उंच, मना समुद्राची खोली
नदीसारखी संस्क्रूती वाहे, राखत माती ही ओली
मग अभिमानाचा माज जाहला, विरले भाषेचे प्रेम
बळावल्या जातीही कळेना काय असे आता नेम
27 Apr 2017 - 6:07 pm | Dr prajakta joshi
छान
27 Apr 2017 - 5:54 pm | प्रचेतस
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
वरील सर्व चारोळ्या बघता स्पर्धेसाठीच्या निकषात एकही चारोळी बसत नाही. मात्र सदस्यांनी दिलेल्या सर्वच चारोळ्या उत्तम आहेत.
27 Apr 2017 - 6:23 pm | प्रचेतस
स्वारी बरंका.
चुकून शब्द आणि अक्षरे ह्यात गल्लत झाली, बर्याचश्या चारोळ्या निकषात बसणाऱ्याच आहेत.
27 Apr 2017 - 9:20 pm | माहितगार
:)
27 Apr 2017 - 10:57 pm | दशानन
उगाच का तळमळा राष्ट्रा
येथे न राहिला कोणी द्रष्टा
उगाच फुकाचा झेंड्याचा रेटा
हातात फक्त दांड्याचा काटा!
- दशानन
27 Apr 2017 - 11:48 pm | चांदणे संदीप
स्पर्धेसाठी:
ये पाखरा, ये रविकिरणा
देश माझा पाहून जा!
दूर गाताना, मावळताना
महाराष्ट्रातून आलो, सांगून जा!
- संदीप चांदणे (२४/४/२०१७)
28 Apr 2017 - 12:52 pm | उल्का
महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तृत्वाने वाजावा
28 Apr 2017 - 11:40 pm | रुपी
मस्त.. कमी शब्दांत छान आशय मांडलाय.
28 Apr 2017 - 1:36 pm | सागर
मराठी दिनाचे निमित्त आज, करु आठवण भूमीच्या लेकरांची
मराठी अस्मितेसाठी शीर अर्पिणार्या शिवबाच्या मावळ्यांची
मराठी भावनांना गुढी उभारण्याची संस्कृती देणार्या सातवाहनांची
मराठी अभिजात भाषेची थोरवी सांगणार्या सुंदर पुस्तकांची
जय महाराष्ट्र
- सागर
28 Apr 2017 - 2:15 pm | साहित्य संपादक
टिप : चारोळ्या देण्याचाअंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)असेल.
28 Apr 2017 - 4:08 pm | अनन्त्_यात्री
बेलाग कड्याची कठोर कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
आंब्याचा मोहोर, थिरकता मोर
असा माझा महाराष्ट्र हा थोर
28 Apr 2017 - 4:11 pm | अभ्या..
वॉवच.
28 Apr 2017 - 4:22 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद !
28 Apr 2017 - 6:00 pm | Dr prajakta joshi
छान
28 Apr 2017 - 11:18 pm | रुपी
सुंदर!
28 Apr 2017 - 4:46 pm | ज्ञानोबाचे पैजार
ज्ञानोबा, तुकोबाच्या भागवत धर्माची ज्याची पर्ंपरा आहे
शिवबा, टिळक, अगरकर्, सावरकरादी युगपुरुषांची जी कर्मभूमी आहे
कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश आणि देशाची वज्रमुष्टी आहे
अशा महाराष्ट्र देशी मी जन्मलो, हे माझे परमभाग्य आहे
पैजारबुवा,
28 Apr 2017 - 5:30 pm | शार्दुल_हातोळकर
स्पर्धेसाठी -
बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे
नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे
खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी
चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी
- शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)
28 Apr 2017 - 11:35 pm | गौरी कुलकर्णी २३
चारोळी आवडली ! आपल्या मराठी मायभूमीचे यथार्थ वर्णन चारोळीमध्ये आले आहे .
शौर्याचा इतिहास, संतांची भूमी , कलासंस्कृती, ज्ञानवंतांची जन्मभूमी यांचा व अनेक अभिमानास्पद गोष्टींचा मिलाफ म्हणजे आपला "महाराष्ट्र " !!
28 Apr 2017 - 5:35 pm | मितान
वा वा ! काही चारोळ्या आवडल्या !
28 Apr 2017 - 6:18 pm | राघव
स्पर्धेसाठी -
कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती!
फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती..
"महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!!
समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!!
राघव
28 Apr 2017 - 6:54 pm | अभ्या..
प्रचंड आवडलेली आहे.
28 Apr 2017 - 11:22 pm | रुपी
+१
28 Apr 2017 - 8:44 pm | मितान
सुंदर !!!
28 Apr 2017 - 11:26 pm | यशोधरा
आवडली.
28 Apr 2017 - 6:52 pm | संदीप-लेले
या चारोळीची खासियत अशी आहे की प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाचल्यास ‘एकमेव’ हा शब्द होतो आणि प्रत्येक ओळीचे शेवटून दुसरे अक्षर वाचल्यास ‘महाराष्ट्र’ हा शब्द होतो. अर्थात दोन्ही मिळून ‘एकमेव महाराष्ट्र’ !
महाराष्ट्र
एकेक नररत्न या भूमीने निपजले महा
कसा वर्णावा हापूसचा गोडवा अहाहा
मेखला सह्याद्रीच्या पूर्वेस देश न्यारा हा
वसवूनी चित्रनगरी चमकतो महाराष्ट्र हा
28 Apr 2017 - 7:01 pm | संदीप-लेले
चारोळीचे नाव 'एकमेव महाराष्ट्र' असे वाचावे
28 Apr 2017 - 8:31 pm | Dr prajakta joshi
छान
28 Apr 2017 - 7:09 pm | मोहन
शिवबा, ज्ञानबा, आंबेडकर धरले वेठीला,
बळीराजा, मजूर, मौलवी बांधले दावणीला,
पोळी आप आपली भाजताहेत दादा, भाऊ,राजे, साहेब,
बा महाराष्ट्रा माझ्या लाव आता तरी ह्यांना रस्त्याला.
28 Apr 2017 - 8:22 pm | सत्यजित...
स्पर्धेसाठी,
======
मृदंगाचा नाद,शाहिराचा डफ,ढोलकीची थाप महाराष्ट्री!
संस्कृतीची नदी वाहे सदोदीत,वारीचा प्रघात महाराष्ट्री!
ओवी ज्ञानेशाची,तुक्याचा अभंग,सज्जनांचा संग महाराष्ट्री!
दगडांचा इतिहास,ताऱ्यांचे भविष्य,माती होणे अंग महाराष्ट्री!
28 Apr 2017 - 8:32 pm | सत्यजित...
भर मैफलीत कालच्या,मी माघार घेतली...
ते म्हणाले,चार ओळीत महाराष्ट्र बसवा!
28 Apr 2017 - 8:47 pm | मितान
अगदी अगदी !
कालपासून खटपट करतेय पण चार ओळीत महाराष्ट्र बसेना !!!:))
30 Apr 2017 - 5:50 pm | aanandinee
सुंदर! मनाला भिडली
28 Apr 2017 - 11:56 pm | श्रीगुरुजी
स्पर्धेसाठी
----------
मंगल देशा, सुंदर देशा
कणखर देशा, महाराष्ट्र देशा
संकटघिरल्या भारताची
तूच एक आशा
29 Apr 2017 - 12:09 am | अभ्या..
मस्तच हो गुर्जी. भारीय.
.
.
मग???
यंदा पवारसाहेबांना राष्ट्रपती करताय म्हणा की? ;)
29 Apr 2017 - 11:42 am | श्रीगुरुजी
काहीतरीच काय!
28 Apr 2017 - 11:56 pm | गौरी कुलकर्णी २३
नभांगण जिथे झुके
तारांगण जिथे फिके
'महाराष्ट्र' असे 'महाकाव्य'
जिथे शब्द होती मुके !
29 Apr 2017 - 4:07 pm | राघवेंद्र
मस्त!!!
29 Apr 2017 - 10:58 am | पद्मश्री चित्रे
राजा जाणता लाभू दे ,बळीराजा होवो सुखी
पोटभर अन्न जावो दीन दुबळ्यांच्या पोटी
अंधविश्वास सरु दे , सृजनाचे तेज मिळो
महाराष्ट्रात या माझ्या स्थैर्य धैर्य सौख्य नांदो