✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

स
साहित्य संपादक यांनी
Tue, 04/25/2017 - 19:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी. विषय : महाराष्ट्र अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत. मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात. एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे. स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही. चारोळ्या देण्याचा

अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)

असेल. परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील. निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल. चला तर मग महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती. ----
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चारोळ्या
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
28889 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

स्पर्धेसाठी

वरुण मोहिते
गुरुवार, 04/27/2017 - 17:31 नवीन
कामगार गेले ,आता शेतकरीही जातील ,सत्तेवरील लोकं फक्त लोणी आवडीने खातील .
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी

वेल्लाभट
गुरुवार, 04/27/2017 - 17:39 नवीन
स्पर्धेसाठी सह्याद्रीसम विचार उंच, मना समुद्राची खोली नदीसारखी संस्क्रूती वाहे, राखत माती ही ओली मग अभिमानाचा माज जाहला, विरले भाषेचे प्रेम बळावल्या जातीही कळेना काय असे आता नेम
  • Log in or register to post comments

छान

Dr prajakta joshi
गुरुवार, 04/27/2017 - 18:07 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

विषय : महाराष्ट्र

प्रचेतस
गुरुवार, 04/27/2017 - 17:54 नवीन
विषय : महाराष्ट्र अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत. वरील सर्व चारोळ्या बघता स्पर्धेसाठीच्या निकषात एकही चारोळी बसत नाही. मात्र सदस्यांनी दिलेल्या सर्वच चारोळ्या उत्तम आहेत.
  • Log in or register to post comments

स्वारी बरंका.

प्रचेतस
गुरुवार, 04/27/2017 - 18:23 नवीन
स्वारी बरंका. चुकून शब्द आणि अक्षरे ह्यात गल्लत झाली, बर्याचश्या चारोळ्या निकषात बसणाऱ्याच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

माहितगार
गुरुवार, 04/27/2017 - 21:20 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उगाच का तळमळा राष्ट्रा

दशानन
गुरुवार, 04/27/2017 - 22:57 नवीन
उगाच का तळमळा राष्ट्रा येथे न राहिला कोणी द्रष्टा उगाच फुकाचा झेंड्याचा रेटा हातात फक्त दांड्याचा काटा! - दशानन
  • Log in or register to post comments

स्पर्धेत उतरण्याचा खरं तर विचार नव्हता पण... टुकार चारोळ्या!!!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/27/2017 - 23:48 नवीन
स्पर्धेसाठी: ये पाखरा, ये रविकिरणा देश माझा पाहून जा! दूर गाताना, मावळताना महाराष्ट्रातून आलो, सांगून जा! - संदीप चांदणे (२४/४/२०१७)
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी

उल्का
Fri, 04/28/2017 - 12:52 नवीन
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा
  • Log in or register to post comments

मस्त.. कमी शब्दांत छान आशय

रुपी
Fri, 04/28/2017 - 23:40 नवीन
मस्त.. कमी शब्दांत छान आशय मांडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का

स्पर्धेसाठी

सागर
Fri, 04/28/2017 - 13:36 नवीन
मराठी दिनाचे निमित्त आज, करु आठवण भूमीच्या लेकरांची मराठी अस्मितेसाठी शीर अर्पिणार्‍या शिवबाच्या मावळ्यांची मराठी भावनांना गुढी उभारण्याची संस्कृती देणार्‍या सातवाहनांची मराठी अभिजात भाषेची थोरवी सांगणार्‍या सुंदर पुस्तकांची जय महाराष्ट्र - सागर
  • Log in or register to post comments

टिप : चारोळ्या देण्याचाअंतिम

साहित्य संपादक
Fri, 04/28/2017 - 14:15 नवीन
टिप : चारोळ्या देण्याचा

अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)

असेल.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी : माझ्या महाराष्ट्रावर माझी चारोळी :

अनन्त्_यात्री
Fri, 04/28/2017 - 16:08 नवीन
बेलाग कड्याची कठोर कपार त्यातून खुणवी गरुडाचे घर आंब्याचा मोहोर, थिरकता मोर असा माझा महाराष्ट्र हा थोर
  • Log in or register to post comments

वॉवच.

अभ्या..
Fri, 04/28/2017 - 16:11 नवीन
वॉवच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

धन्यवाद, अभ्या.

अनन्त्_यात्री
Fri, 04/28/2017 - 16:22 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभिप्राय

Dr prajakta joshi
Fri, 04/28/2017 - 18:00 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

सुंदर!

रुपी
Fri, 04/28/2017 - 23:18 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

स्पर्धेसाठी आमची चारोळी..

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/28/2017 - 16:46 नवीन
ज्ञानोबा, तुकोबाच्या भागवत धर्माची ज्याची पर्ंपरा आहे शिवबा, टिळक, अगरकर्, सावरकरादी युगपुरुषांची जी कर्मभूमी आहे कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश आणि देशाची वज्रमुष्टी आहे अशा महाराष्ट्र देशी मी जन्मलो, हे माझे परमभाग्य आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी - महाराष्ट्रगाथा (चारोळी)

शार्दुल_हातोळकर
Fri, 04/28/2017 - 17:30 नवीन
स्पर्धेसाठी - बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)
  • Log in or register to post comments

छान रचना !

गौरी कुलकर्णी २३
Fri, 04/28/2017 - 23:35 नवीन
चारोळी आवडली ! आपल्या मराठी मायभूमीचे यथार्थ वर्णन चारोळीमध्ये आले आहे . शौर्याचा इतिहास, संतांची भूमी , कलासंस्कृती, ज्ञानवंतांची जन्मभूमी यांचा व अनेक अभिमानास्पद गोष्टींचा मिलाफ म्हणजे आपला "महाराष्ट्र " !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

वा वा ! काही चारोळ्या आवडल्या

मितान
Fri, 04/28/2017 - 17:35 नवीन
वा वा ! काही चारोळ्या आवडल्या !
  • Log in or register to post comments

छान उपक्रम! :-)

राघव
Fri, 04/28/2017 - 18:18 नवीन
स्पर्धेसाठी - कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! राघव
  • Log in or register to post comments

प्रचंड आवडलेली आहे.

अभ्या..
Fri, 04/28/2017 - 18:54 नवीन
प्रचंड आवडलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

+१

रुपी
Fri, 04/28/2017 - 23:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुंदर !!!

मितान
Fri, 04/28/2017 - 20:44 नवीन
सुंदर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आवडली.

यशोधरा
Fri, 04/28/2017 - 23:26 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

स्पर्धेसाठी - महाराष्ट्र

संदीप-लेले
Fri, 04/28/2017 - 18:52 नवीन
या चारोळीची खासियत अशी आहे की प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाचल्यास ‘एकमेव’ हा शब्द होतो आणि प्रत्येक ओळीचे शेवटून दुसरे अक्षर वाचल्यास ‘महाराष्ट्र’ हा शब्द होतो. अर्थात दोन्ही मिळून ‘एकमेव महाराष्ट्र’ ! महाराष्ट्र एकेक नररत्न या भूमीने निपजले महा कसा वर्णावा हापूसचा गोडवा अहाहा मेखला सह्याद्रीच्या पूर्वेस देश न्यारा हा वसवूनी चित्रनगरी चमकतो महाराष्ट्र हा
  • Log in or register to post comments

एकमेव महाराष्ट्र

संदीप-लेले
Fri, 04/28/2017 - 19:01 नवीन
चारोळीचे नाव 'एकमेव महाराष्ट्र' असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले

छान

Dr prajakta joshi
Fri, 04/28/2017 - 20:31 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप-लेले

स्पर्धेकरता

मोहन
Fri, 04/28/2017 - 19:09 नवीन
शिवबा, ज्ञानबा, आंबेडकर धरले वेठीला, बळीराजा, मजूर, मौलवी बांधले दावणीला, पोळी आप आपली भाजताहेत दादा, भाऊ,राजे, साहेब, बा महाराष्ट्रा माझ्या लाव आता तरी ह्यांना रस्त्याला.
  • Log in or register to post comments

माझा सहभाग...

सत्यजित...
Fri, 04/28/2017 - 20:22 नवीन
स्पर्धेसाठी, ====== मृदंगाचा नाद,शाहिराचा डफ,ढोलकीची थाप महाराष्ट्री! संस्कृतीची नदी वाहे सदोदीत,वारीचा प्रघात महाराष्ट्री! ओवी ज्ञानेशाची,तुक्याचा अभंग,सज्जनांचा संग महाराष्ट्री! दगडांचा इतिहास,ताऱ्यांचे भविष्य,माती होणे अंग महाराष्ट्री!
  • Log in or register to post comments

थोडे अवांतर...

सत्यजित...
Fri, 04/28/2017 - 20:32 नवीन
भर मैफलीत कालच्या,मी माघार घेतली... ते म्हणाले,चार ओळीत महाराष्ट्र बसवा!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी !

मितान
Fri, 04/28/2017 - 20:47 नवीन
अगदी अगदी ! कालपासून खटपट करतेय पण चार ओळीत महाराष्ट्र बसेना !!!:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

सुंदर! मनाला भिडली

aanandinee
Sun, 04/30/2017 - 17:50 नवीन
सुंदर! मनाला भिडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

स्पर्धेसाठी

श्रीगुरुजी
Fri, 04/28/2017 - 23:56 नवीन
स्पर्धेसाठी ---------- मंगल देशा, सुंदर देशा कणखर देशा, महाराष्ट्र देशा संकटघिरल्या भारताची तूच एक आशा
  • Log in or register to post comments

मस्तच हो गुर्जी. भारीय.

अभ्या..
Sat, 04/29/2017 - 00:09 नवीन
मस्तच हो गुर्जी. भारीय. . . मग??? यंदा पवारसाहेबांना राष्ट्रपती करताय म्हणा की? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काहीतरीच काय!

श्रीगुरुजी
Sat, 04/29/2017 - 11:42 नवीन
काहीतरीच काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

स्पर्धेसाठी

गौरी कुलकर्णी २३
Fri, 04/28/2017 - 23:56 नवीन
नभांगण जिथे झुके तारांगण जिथे फिके 'महाराष्ट्र' असे 'महाकाव्य' जिथे शब्द होती मुके !
  • Log in or register to post comments

मस्त!!!

राघवेंद्र
Sat, 04/29/2017 - 16:07 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी कुलकर्णी २३

स्पर्धेसाठी

पद्मश्री चित्रे
Sat, 04/29/2017 - 10:58 नवीन
राजा जाणता लाभू दे ,बळीराजा होवो सुखी पोटभर अन्न जावो दीन दुबळ्यांच्या पोटी अंधविश्वास सरु दे , सृजनाचे तेज मिळो महाराष्ट्रात या माझ्या स्थैर्य धैर्य सौख्य नांदो
  • Log in or register to post comments

अहाहाहाहा, मस्तच जमलीय हो.

अभ्या..
Sat, 04/29/2017 - 11:51 नवीन
अहाहाहाहा, मस्तच जमलीय हो. अप्रतिम साकडे. पांडुरंगा, मायबापा ___/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

+१

राघवेंद्र
Sat, 04/29/2017 - 16:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एक से एक चारोळ्या येताहेत.

पद्मावति
Sat, 04/29/2017 - 13:39 नवीन
एक से एक चारोळ्या येताहेत. मस्तच.
  • Log in or register to post comments

आई मराठी, माय मराठी, अम्मा

अभ्या..
Sat, 04/29/2017 - 23:13 नवीन
आई मराठी, माय मराठी, अम्मा मम्मी याडी मराठी हाय मराठी हॅलो मराठी, बाय बाय टेककेअर मराठी ब्रेड मराठी, पिझ्झा मराठी, नान पराठा दोसा मराठी महाराष्ट्राची रीत मराठी, सर्वांना सामावून उरणार मराठी
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी

इडली डोसा
Sat, 04/29/2017 - 23:43 नवीन
अटकेपार लावले झेंडे चालवू परंपरा अशीच पुढे असो खंड वा देश कोणते गर्जते मराठी सगळीकडे
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी

aanandinee
Sun, 04/30/2017 - 16:07 नवीन
मराठी माझी असे माऊली महाराष्ट्र अन् बाप असे सातसमुद्रापारही हृदयी महाराष्ट्राची माती वसे डॉ. माधुरी ठाकुर (आनन्दिनी) अॅबर्डीन , युके 
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर!!!

तुषार काळभोर
Sun, 04/30/2017 - 20:01 नवीन
बहुतेक थोडा उशीर झालाय. पण स्पर्धा एक बाजूला, ही चारोळी खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: aanandinee

आज निकाल येतोय ना? :)

यशोधरा
Mon, 05/01/2017 - 09:12 नवीन
आज निकाल येतोय ना? :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा