मी त्या मितीकरीला हलवून हलवून उठवलं. "अहो मितीकरी, उठा. इथे कसे पोचलो आपण ? मला प्लिज सगळं स्पष्ट सांगाल का?" आम्ही एका स्तूपाजवळ होतो .
"हं" आळोखे पिळोखे देत तो उठला . आजूबाजूचा अंदाज घेत म्हणाला," सांगतो, तू माझा जीव वाचवलायस त्यामुळे तेवढं तरी माझं कर्तव्य बनतं. पण आधी तू सांग तू यात कसा अडकलास?"
"अहो ते सरबत प्यायल्यावर आपण एकत्रच आलो ना इथं? "
"अरे इथं नाही या सगळ्या प्रकरणात तू कसा अडकलास ?"
"अच्छा, ते होय. त्याचं काय झालं, शशिकांत माझा जिगरी दोस्त. व्यवसायानं गणितज्ञ. एक दिवस त्यानं मला एका महत्त्वाच्या कामासाठी त्याच्या घरी नाशिकला बोलावलं. काही दिवसापूर्वी शशिकांतची खुदिरामशी ओळख झाली होती. खुदिरामनं त्याला एक स्पेशल आरसा दिला होता. त्याबद्दल अजून काही माहिती घेण्यासाठी तो पुन्हा खुदिरामला भेटणार होता. पण त्याचा खुदिरामवर विश्वास नव्हता. अशावेळी विश्वासाचा माणूस बरोबर असावा म्हणून शशिकांतनं मला बोलावलं होतं. हे गुपित त्याने मी सोडून इतर कुणालाही सांगितलं नव्हतं. अगदी शालूला पण नाही. एवढंच नाही तर त्यानं मला शपथ घातली की मी जर यातलं काही कुणाला सांगितलं तर त्याचा म्हणजे शशिकांतचा मृत्यू होईल. नंतर तो मला आणि शालूला लेण्यापाशी घेऊन आला. शशिकांतनं तो आरसा माझ्याकडं दिला आणि तो खुदिरामशी बोलायला निघून गेला. शशिकांतनं सांगितलेलं मी काही सिरीयसली घेतलं नाही. गम्मत म्हणून मी शालूला तो आरसा दाखवला. त्यापुढं काय घडलं ते मला अजूनही नीट कळलं नाही. फक्त शालूची किंकाळी आठवते. मी डोळे उघडले तर मी वेताळबाबाच्या डोंगर पायथ्यापाशी होतो .
कुणी तरी हाताला धरून ओढत न्यावं तास मी शशिकांतच्या घरी पोचलो. बघतो तर तो मेलेला होता. तोपर्यंत मला पांडवलेण्यांवरचा प्रकार हा एक भासच वाटत होता. पण हे काहीतरी वेगळं चाललंय हे मला जाणवायला लागलं. मला त्यानं घातलेली शपथ आठवायला लागली. शशिकांत माझ्यामुळे मेला की काय अशी भीती वाटू लागली. या सगळ्याच कारण तो आरसा असावा हे माझ्या लक्षात आलं. पण लेण्यांमध्ये शालूला दाखवल्यानंतर तो आरसा गायब झाला होता. कसं कोण जाणे पण मला त्या रात्री पडलेल्या स्वप्नात खुदिराम दिसला आणि मी त्याच्याकडून तो आरसा विकत घेतला. आरसा दिसायला साधाच होता पण आरशात पाहिल्यावर माझ्या स्वतःच्या चेहऱ्याऐवजी शशिकांतचा चेहरा दिसत होता, हे गौड बंगाल काही कळेना . मी त्याचाच विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो तर शालूचा मेसेज आला होता. तो वाचल्यावर शशिकांतच्या मुत्यूला मीच जबाबदार असल्याची माझी खात्रीच पटली .
पण मला आरशात त्याचाच चेहरा का दिसला ? योगायोग होता, भास होता की अजून काही ? कळायला मार्ग नव्हता. शेवटी जास्त विचार करायचा नाही असं मी ठरवून टाकलं.गाडीत बसलो. काहीतरी चित्र विचित्र स्वप्नं पडली आणि त्या गोंधळात तो आरसा फुटून गेला. जेव्हा मी गाडीबाहेर पडलो तर कुठल्यातरी जुन्या पुराण्या काळात पोचलो होतो ."
"चायला तुला बनवला खुदिरामने."
"म्हणजे?"
"म्हणजे वाघाचे पंजे. शशिकांतकडचा आरसा हा दुसऱ्या मितीत नेत होता. तुला दिलेला आरसा त्याच मितीत फक्त दुसऱ्या काळात नेत होता. ते जाऊदे पुढं बोल."
"पण त्यानं असं का फसवलं?"
" ते मग सांगतो. आधी पुढं काय झालं ते सांग."
"पुढं??? हां. मला असं दिसलं की मी आणि शालू एका स्तूपापाशी उभे आहोत. Actually हाच तो स्तूप. आणि मी तिला सांगतोय की वर्षानुवर्षं हे रहस्य त्या भिक्षूंनी जपलंय आपणही ते कुणाला सांगता कामा नये. या गोष्टीबद्दल तू कुणाला काही बोलू नकोस. तिनं आपल्या कुंकवाची शपथ घेतली. एवढं दिसतंय तितक्यात मी माझ्या गाडीत परत आलो होतो . नंतर मला आठवतंय की मी खुदिरामला भेटलो. आणि पुन्हा त्याच्याकडून आरसा विकत घेतला .
"पुन्हा? एकदा जो राडा झाला तो कमी नाय काय?"
"पण मला शशिकांतला पुन्हा जिवंत करायच होता. कारण तो मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्याची मेल मिळाली. त्यात लिहिल्याप्रमाणे खुदिराम दुस-या मितितून आला होता आणि तो शशिकांतला म्हणाला होता की "ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही. तुझ्या दोस्ताकडून म्हणजे माझ्या कडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच." शशिकांतनं त्या मेलमध्ये मला खुदिरामपासून सावध राहायला सांगितलं होतं."
"आयला दोस्त हो तो ऐसा. बरं मग?"
"मग मी तो आरसा घेऊन शालूकडे गेलो तर शालू मरून पडली होती. आणि तिच्या हातात शशिकांतने मला पहिल्यांदा दिलेला आरसा होता. पण फुटलेला. मी दुसरं कुणी तिथं येण्याआधी तिथून निघालो आणि तडक खुदिरामला भेटायला त्याच्या झोपडीत गेलो. आधी त्यानं खोटंच सांगितलं की माझी मुलं दुसऱ्या मितीत अडकलीत त्यांना शोधायला मी इथं आलोय . पण मला शशिकांतनं सगळं सांगितलंय कळल्यावर त्याचा नूर बदलला. पुढचं तर तुम्हाला माहितीय."
"हं.तो खुदिराम ने ऐसा गेम कियेला है "
"मितीकरी साहेब प्लिज, आता तरी मला हे काय चाललंय ते सांगता का?"
"ओक्के बॉस. ऐक .
हे विश्व असंख्य मितींचं बनलं आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक विश्व इथे गुण्यागोविंदानं नांदत असतात. या मिती बदलणाऱ्या आरशांमधून तुम्ही सहज दुसऱ्या मितीत जाऊ शकता. अशा या आरशाचा शोध सर्वात प्रथम तुमच्या मितीत इ स पूर्व ३०० वर्षांपूर्वी कात्यायन नावाच्या एका गणितज्ञाने लावला. त्याच्या मताप्रमाणे विशिष्ट कोनात जर यज्ञवेदी बनवली आणि त्यातून येणारा प्रकाश जर विशिष्ठ आकाराच्या ताम्रपटावरून परावर्तित केला तर दुसऱ्या मितीत जाता येईल. त्यालाच त्यानं स्वर्ग म्हटलं. पुढं त्यानं आणि त्याच्या शिष्यानी हे संशोधन अजून पुढे नेलं व मिती आणि काळ बदल करणारा आरसा बनवला .
तेव्हा सम्राट अशोक राज्य करत होता. त्याच्या तिष्यरक्षा नावाच्या तरुण पत्नीचं राजपुत्र कुणालवर प्रेम बसलं. पण कुणालनं, तिला तो त्याची आई मानतो, हे सांगून नाकारलं याचा सूड घेण्यासाठी तिष्यरक्षेनं कुणालला कपटानं अंध केले. हे जेव्हा अशोकाला कळलं तेव्हा त्याने तिला मृत्युदंडाची शिक्षा केली. पण तिनं कशातरी प्रकारे कात्यायनाकडून तो मिती बदलणारा आरसा मिळवला आणि दुसऱ्या मितीत निघून गेली. हे कळताक्षणी अशोकानं तिष्यरक्षेनं आत्महत्या केली असा प्रचार केला. पुन्हा असं घडू नये म्हणून कात्यायनाच्या शिष्यांचं सर्व संशोधन नष्ट केलं. पण तरीही त्याला तो आरसा किंवा तिष्यरक्षा मिळाली नाहीच. कात्यायनाच्या पट्टशिष्याला ती सर्व विद्या मुखोद्गत होती. अशोकाचा रोष होऊ नये म्हणून त्या सर्व शिष्यानी बौद्धधर्म स्विकारला. त्या पट्टशिष्यानं त्याला येत असलेली विद्या कुणाच्या हाती लागू नये पण नष्ट होऊ नये म्हणून गुपचूप भूर्जपत्रांवर लिहून काढली. त्याच सुमारास त्रिरश्मी पर्वतावर गुंफा खोदण्याचं काम चालू होतं आणि तिथली व्यवस्था काही बौद्ध भिक्षूंकडं होती. या शिष्यानं त्यांच्यामध्ये प्रवेश मिळवला आणि ती पत्रं कुणाला सापडणार नाहीत अशा प्रकारे तिथल्या एका खोबणीत लपवून ठेवली. त्याच त्या पांडवलेण्यांच्या गुंफा.
इकडे तिष्यरक्षा ज्या मिठीत आपलं ज्या मितीत गेली तिथं तिच्याकडं तो आरसा होताच. अनेक मिती तसेच अनेक काळ बदलत ती कुठेतरी स्थिरावली.. ती आमची मिती म्हणजे माझी ओरिजिनल मिती. तिथं अजूनही सत्ययुग चालू होतं. तिष्यरक्षेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा (त्याला वेवेगळ्या विश्वात, संस्कृतीत वेगवेगळी नावं आहेत ) अनेक मितीत , अनेक काळात भ्रमण करू लागला. त्याच्याबरोबर एका मितीतील बातम्या दुसऱ्या मितीत जात. बऱ्याचदा त्यामुळं भांडणंसुद्धा होत असंत. आधी सर्व आलबेल होते पण कुणा एका भामट्यानं त्याच्याकडून काही वेळाकरता तो आरसा मिळवला आणि आरशाचे अनेक डुप्लिकेट आरसे बनवले आणि विकले. पण यात एक फॉल्ट होता. या नवीन आरशांमधून फक्त दुसऱ्या एकाच मितीत किंवा काळात जात येत असे. पण त्याचा वापर करून अनेक जण आजूबाजूच्या मितीत ये जा करू लागले. त्यामुळे गोंधळ माजला कारण कोणी आज इथे आहे तर उद्या नाही असं होऊ लागलं . एव्हाना सत्ययुग पण ओल्ड फॅशन्ड झालेलं. हळूहळू तिथंही लबाड्या होऊ लागल्या. मग मिती प्रवासाचे रुल्स बनले.. ते नीट पाळले जातायत ना हे बघायला एक सिस्टीम बनवली. त्याचा संघाध्यक्ष ठरवला. आरशांच्या निर्मितीवर नियंत्रण आणलं. एका व्यक्तीला एकच आरसा मिळेल. प्रवासाआधी इन्शुरन्स काढणं अपरिहार्य आहे. प्रवासाला जाण्याआधी आपली संपत्ती आणि कुठच्या मितीत जाणार ते डिक्लेअर करावं लागेल. वगैरे "
"आधी मला सांग संपत्ती म्हणजे सोनं? तुमच्या मितीत नक्की करन्सी कुठची वापरतात?"
" वेल, संपत्ती म्हणजे सोनं नाणं, पुस्तकं , अलीकडे बिटकॉईन्स वगैरे जे तुम्ही गोळा केलं असेल ते. पण करन्सी म्हणजे ट्रस्ट इंडेक्स"
"म्हणजे?"
"एखादी व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, ह्यावर हा इंडेक्स ठरतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व घटनांची नोंद स्पेशल मॉनिटर्सवर ठेवली जाते. तो माणूस किती खोटं बोलला, कुणाला फसवलं का, दिलेला शब्द पाळला का? कुणाला मदत केली का ? त्यानं स्विकारलेलं काम व्यवस्थित करतो का? यावर तो इंडेक्स प्लस मायनस होत असतो.”
"ओक्के. म्हणजे ज्याचा इंडेक्स सर्वात जास्त तो श्रीमंत."
"हो आणि तो संघाध्यक्ष बनतो. त्याला तो तिष्यरक्षेचा ओरिजिनल आरसा मिळतो. त्याला कितीही मितीत आणि काळात फिरता येतं.”
"हं. पण याचा आणि शशिकांतचा काय संबंध?"
"अरे धीर धर, सांगतो .
खुदिरामला ओरिजिनल आरसा हवा होता. किंवा तो तयार करायचा फॉर्म्युला. म्हणजे ट्रस्ट इंडेक्स शून्य असला तरी आणि संघप्रमुख बनू शकेल. मग त्याला कोणीच हात लावू शकणार नाही. पण तिष्यरक्षा इतक्या असंख्य मिती आणि काळात फिरली होती की डुप्लिकेट आरशांनी ही मिती शोधून काढणं म्हणजे गवतात पडलेली सुई शोधण्यासारखं कठीण काम होतं.
तर या खुदिरामनं त्याच्या मितीतील एकाचा खून केला. आणि त्याचा आरसा मिळवला. बरं खुनाचा त्यानं काही पुरावा नं ठेवल्यानं त्याला कुणी पकडू शकलं नाही. मग त्यानं असले धंदे चालूच ठेवले. लोकांना मारून अनेक आरसे मिळवले. त्यांच्या साहाय्यानं मित्या बदलल्या आम्ही त्याला पकडणार हे लक्षात येताच तो मिळवलेल्या आरशांच्या मदतीनं अनेक मिती बदलत तुमच्या मितीत पळून आला. इथे आल्यावर जरा संशोधन केल्यावर त्याला कळलं की हीच ती मूळ मिती.
खुदिराम इथपर्यंत पोचला खरा पण त्याचा ट्रस्ट इंडेक्स मायनसमध्ये असल्यानं त्याला कात्यायनाच्या काळात जात येईना. कारण संघाध्यक्षांनी कुणाच्या हातात ते संशोधन मिळू नये म्हणून आरसे बनवताना आधीच अशी पाचर मारून ठेवली होती, इथं आल्यानंतर खुदिरामला कळलं की आपल्याला एकट्याला ते संशोधन मिळवणं आणि आरसा बनवणं जमणार नाही. जरा चौकशी करता त्याला समजलं की शशिकांत सुद्धा याच विषयावर अभ्यास करणारा संशोधक आहे. मग त्यानं शशिकांतला गाठलं. आपल्या आरशानं दुसऱ्या मितीत फिरवून आणलं आणि शशिकांतचा विश्वास मिळवला. कात्यायनाचं संशोधन मिळवायला शशिकांतनं मदत केली तर त्या बदल्यात बिटकॉईन्स देईन अशी लालूच दाखवली. शशिकांतला या साऱ्यातून शालूला दूर ठेवायचं होतं. आणि पुरेसं श्रीमंत झाल्यानंतर तिला घेऊन वेगळ्या मितीत जाऊन राहायचं होत. पण खुदिरामच्या मनात मात्र काही और शिजत होतं आपलं काम करवून घेतल्यावर शशिकांतला मारायचं आणि त्याचं शरीर घेऊन राहायचं त्यानं प्लॅन केलं होतं. कुठंतरी पाणी मुरतंय हे शशिकांतच्या लक्षात आलं. आणि त्यानं आपल्या बाजूनं अजून कुणीतरी असावं म्हणून तुला इन्व्हॉल्व केलं. तू यात येणं खुदिरामला फायद्याचंच होतं कारण खुदिरामला तर जुन्या काळात जाता येत नव्हतं आणि शशिकांतला पाठवलं आणि तो जर परत आलाच नाही तर खुदिरामचं अस्तित्वच उरलं नसतं. त्यानं शशिकांतला पटवलं की अशोकला आपण जुन्या काळात पाठवू आणि नक्की कुठं संशोधन लपवलंय हे त्याच्याकडून काढून घेऊ .
तू शालूला आरशाबद्दल सांगशील असं शशिकांतला वाटलंच नाही . त्याला वाटलं की तूच त्या काळात जाशील. पण तुम्ही दोघं एकत्र गेलात. तुम्हाला बाकी काहीही माहिती नव्हतं. या गुंफांमध्ये ते संशोधन लपवून ठेवताना तुम्ही पाहिलंत. तिथल्या भिक्षुनी या संशोधनाबाबत घेतलेली गुप्ततेची शपथ ऐकलीत. आणि तुम्हालाही वाटलं की हे कुणाला सांगू नये तुम्ही तशी एकमेकांना शपथ दिलीत . आणि पुन्हा त्या मितीतून परत आलात."
"मग मला हे सगळं का नाही आठवत?"
"इथच तर मेख आहे. कारण आरशातून एकच व्यक्ती मिती प्रवास करू शकते. तुम्ही दोघं असल्यानं आरशाची शक्ती तुमच्या दोघांच्या प्रवासातच खर्च झाली, तुमची मेमरी पूर्णपणे परत येऊ शकली नाही" .
"आणि हे सगळं कधी झालं?"
"गेल्या दोन तीन दिवसातच. पण तुला खूप काळ गेल्याच वाटतंय. कारण तुझ्या मेमरीवर परिणाम झालाय. शालूला यातलं बरच आठवत होतं पण तिला ते स्वप्न वाटत होतं. ती त्या आरशातून परत आली ते डायरेकट तिच्याच घरी. तेव्हा शशिकांत तिच्या शेजारीच बसला होता. तिनं शशिकांतला आपल्याला पडलेलं स्वप्न सांगितलं. शशिकांतची आता खात्री पटली की खुदिराम आपल्याला वापरून घेतोय. त्याच्या हाती ते संशोधन जाणं धोक्याचं आहे. म्हणून तो जाब विचारायला तडक खुदिरामकडं गेला. खुदिराम आणि त्याची बाचाबाची झाली. बोलण्याच्या ओघात खुदिराम बोलून गेला की त्याला आता स्वतःच आयुष्य नकोय कारण त्यानं केलेले खून आता उघड झालेत. कात्यायनाचं संशोधन मिळालं की तो तुला मारून तुझ्या शरीरात प्रवेश मिळवणार होता आणि तुझ्या शरीरानं वेगवेगळ्या मितीत व काळात जगणार होता. शशिकांत हे ऐकून घाबरला. तो हे काही थांबवू शकत नव्हता. आपण बिटकॉईन्स च्या मोहापायी कसल्या भयंकर कटात अडकलोय हे लक्षात आल्यानं त्याला प्रचंड टेन्शन आलं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शालूला कळलं की ते स्वप्न नव्हतं. तिला वाटलं की तिनं तुला दिलेली शपथ मोडली म्हणून शशिकांत मेला आणि त्या मागे तो आरसाच आहे. म्हणून तिनं तो आरसा फोडला आणि स्वतःला मारून घेतले.
इकडं खुदिरामनं तुला परत एक आरसा देऊन तुला त्या काळात पाठवायचा प्रयत्न केला पण तुझा आरसाच फुटला. खरं तर तू तिथेच अडकून पडायचास पण तुझं नशीब चांगलं की गाडीच्या रिमोटमुळं तू पुन्हा गाडीजवळ पोचलास आणि त्या आरशाचे तुकडे तुला परत घेऊन आले. अर्थात पुन्हा तुझी मेमरी पूर्णपणे नाही येऊ शकली. तुझा आता काही उपयोग नाही हे खुदिरामला कळून चुकलं तो तुला मारून दुसरा कुणी बकरा शोधणार होता. आणि जवळच्या आरशाने त्या बकऱ्याकडून संशोधन मिळवणार होता. तितक्यात खुदिरामाचा पाठलाग करत मी इथे पोचलो. खुदिरामने मग आपल्या दोघांना मारायचा प्लॅन केला. पण तू मला उठवलं आणि यातून वाचवलं. "
"मग आता खुदिराम कुठेय?"
"तो त्या लेण्यांच्या खालच्या झोपडीतच आहे. मी ते सरबत पिण्याआधी त्याच्या नकळत त्याच्या भोवती बुद्धिभ्रष्ट करायच्या बेड्या घातल्या होत्या."
"बेड्या? पण मला तर दिसल्या नाहीत" .
"अरे अशा नुसत्या डोळ्यांना नाहीच दिसत. संघाध्यक्षांनी मुद्दाम माझ्याकडे दिल्या होत्या त्या. जोपर्यंत मी त्या उघडत नाहीत तोपर्यंत खुदिरामच्या मनात चित्रविचित्र असंबद्ध विचार येतील. आणि त्यामुळे तो कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही. आहे तिथेच अडकून पडेल. मी त्याला आता परत आमच्या मितीत नेणार आहे. खुदिरामचं काय करायचं हा निर्णय आता संघाध्यक्षंच घेतील."
"आणि मी ?"
"तू जा परत मुंबईला. फक्त हे कोणाला सांगू नकोस.अर्थात तुला गेल्या काही दिवसात काय झालयं हे तसंही आठवणार नाहीच म्हणा."
अशोक उठला तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले होते. त्याची बायको किचनमध्ये काहीतरी करत होती. सवयीने त्याने उठल्याउठल्या मोबाईल बघितला. मोबाईल मध्ये अनोळखी नंबरवरून एक वेब ऍड्रेस, अकाउंट नंबर आणि पासवर्डचा मेसेज आला होता.
_________________________________________________________________________________________________________________________________________
इति साता उत्तराची कहाणी आठा उत्तरी सफळ संपूर्ण!
प्रतिक्रिया
30 Mar 2017 - 5:59 pm | संजय पाटिल
आता परत एकदा सगळं पहिल्या पासून वाचतो....
एंजॉयड इट!!!
30 Mar 2017 - 6:03 pm | राजाभाउ
येस. आता सगळ एकत्र वाचल पाहीजे.
30 Mar 2017 - 6:03 pm | राजाभाउ
जबरदस्त !!!!
30 Mar 2017 - 6:13 pm | अभ्या..
काही कन्सेप्टस मस्त आहेत. बेड्या, आरसे, इंडेक्स वगैरे.
कथा मात्र सुरुवातीपासून वाचावी लागेल एकदा.
30 Mar 2017 - 7:05 pm | रांचो
अगदि अगदि... +१
30 Mar 2017 - 6:43 pm | जगप्रवासी
या कथेतच सर्व मागील कथांची लिंक दिली तर वाचायला बरं पडेल नाहीतर एक सारखं मागे जावं लागतंय
30 Mar 2017 - 6:46 pm | जव्हेरगंज
कल्पनाशक्तीची कस दाखवणारा धागा!!!
सगळ्या पोस्ट एकत्रित बांधून शेवट करणे अवघड काम होते..
हॅट्स ऑफ!!
30 Mar 2017 - 7:05 pm | ५० फक्त
प्राची, खुप कसरत केलीत तुम्ही आणि ती देखिल अतिशय उत्तम रितीनं, अगदी एकमेकांशी कशा जोडल्या जातील अशी शंका घ्यायला लावणा-या साखळीच्या कड्या एकदम भारी एकत्र जोडल्यात.
मागचे सात भाग कमीत कमी दहा वेळा वाचुन त्यावर नोटस काढाव्या लागल्या असतील तुम्हाला.
30 Mar 2017 - 7:12 pm | Ranapratap
छान सम्पूर्ण मालिकेने खिळवून ठेवले.
30 Mar 2017 - 8:28 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद. मी फक्त जोडण्याचं काम केलं. बाकी कथाक-यांनी सर्व कन्सेप्ट आधीच लिहिले होते. त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल खूप खूप आभार.
30 Mar 2017 - 9:58 pm | दीपक११७७
सगळ्या पोस्ट एकत्रित बांधून शेवट करणे अवघड काम होते..
हॅट्स ऑफ!!
30 Mar 2017 - 10:37 pm | मिडास
छान कल्पना, जबरदस्त. द एंड
30 Mar 2017 - 10:55 pm | निशदे
वेल डन प्राची.
तुम्ही केवळ उत्तम शेवट केला नाहीत तर त्यातही वळणे टाकून हा भाग उत्कंठावर्धक केलात....
उत्तम शेवट.
31 Mar 2017 - 8:05 am | प्रीत-मोहर
ही खो कथा मालिका आवडली!!
31 Mar 2017 - 9:26 am | पैसा
हा भाग लिहायला सर्वात अवघड होता, पण मस्त जमलाय!
31 Mar 2017 - 11:28 am | प्राची अश्विनी
सर्वांना धन्यवाद!
31 Mar 2017 - 2:03 pm | विनिता००२
सुरेख जमलेय :)
निवांतपणे वाचेन.
31 Mar 2017 - 2:41 pm | किसन शिंदे
ही दोन्ही वाक्ये परस्परविरोधी नाहीत का? =))
31 Mar 2017 - 2:37 pm | गवि
निरनिराळे प्रयोग होत राहिले पाहिजेत.
कौतुकास्पद प्रयत्न..
यापुढच्या प्रयत्नात एक व्हेरिएशन करून पहावं.
प्रत्येक लेखकाचा एक एक भाग थेट प्रकाशित न करता आधी सर्वांनी पडद्यामागे ( ऑफलाईन / व्यनीमध्ये इत्यादी) कथा लिहून पूर्ण करावी आणि मग एका किंवा अनेक सदस्यांनी ती एका सूत्रात बांधून संपूर्ण पेश करावी.
प्रत्येकाची शैली वेगळी असणारच पण तरीही त्यातल्या त्यात मिश्रण एकजिनसी कसं होईल हे सर्वांनी पाहावं. सध्याच्या खो प्रकारात केवळ शैलीच सतत बदलत नसून अचानक काही भागांत उद्भवणारा सेन्स ऑफ ह्यूमरही अनेकदा अनाठायी (आउट ऑफ द प्लेस) वाटतोय. एकामागून एक लिहिल्या जाणार्या कथाभागांमध्ये अचानक शैलीचे रूळ बदलण्याचं टाळावं कारण त्याने खडखडाट होतो.
31 Mar 2017 - 4:49 pm | प्राची अश्विनी
अगदी पटलं. पुढच्या वेळी हा मुद्दा (आम्ही) नक्की लक्षात ठेऊ.
31 Mar 2017 - 3:29 pm | आनन्दा
फारच छान शेवट केलात..
31 Mar 2017 - 4:02 pm | मोहन
खो - खो आवडला ! सर्व लेखकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच
31 Mar 2017 - 4:05 pm | भिंगरी
कथा उत्तम प्रकारे जोडून शेवटही छान केलात.
31 Mar 2017 - 4:48 pm | आनन्दा
आता खो कथा स्पर्धा आयोजित करावी अशी मी संपादकांना विनंती करतो
31 Mar 2017 - 4:51 pm | प्राची अश्विनी
कथेला नाव अजून दिलेलं नाही. वाचकांनी सुचवावं ही विनंती.
31 Mar 2017 - 6:18 pm | अभ्या..
मि ती नव्हेच
31 Mar 2017 - 8:17 pm | प्राची अश्विनी
:०)) ;) आवडेश!
31 Mar 2017 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्राची, खुप कसरत केलीत तुम्ही आणि ती देखिल अतिशय उत्तम रितीनं, अगदी एकमेकांशी कशा जोडल्या जातील अशी शंका घ्यायला लावणा-या साखळीच्या कड्या एकदम भारी एकत्र जोडल्यात.
(इति, "५० फक्त")+१००
"मेथड इन मॅडनेस" शोधून काढण्यात प्राची यांना गोल्ड मेडल मिळाल्याचे जाहीर करत आहे !!!
एकंदर प्रयोगच भन्नाट होता ! सगळ्या लेखकांच्या कल्पनाशक्तीला आणि प्रतिभेला सलाम !!
31 Mar 2017 - 6:21 pm | अभ्या..
एक्काकाकांचे प्रतिसाद आजकाल डिझायनर होत चाललेत, सुशोभनासाठी वेलबुट्टीची बॉर्डर ठेवायची सोय मालकांकडे मागावी काय असा विचार येतोय.
एक्काकाका, आमच्या पोटावर पाय देऊ नका हो प्लीज ;)
31 Mar 2017 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
क्या कहना चाहते हो, अभ्या.. ? :)
31 Mar 2017 - 6:32 pm | अभ्या..
अहो म्हणजे प्रतिसादात बोल्ड, कलर्ड टेक्स्ट, इटालिक्स, असे ऑप्शन्स वापरुन तुमचे प्रतिसाद येताहेत आजकाल. इतर सगळ्या टेक्स्ट प्रतिसादात तेच उठून दिसतात.
आता तुम्हीच असे नुसते टेक्स्टचे प्रकार वापरुन डीझायनर लुक द्यायला लागलात तर आम्ही बिचार्या पेंटर लोकांणी काय करावे ब्रे?
31 Mar 2017 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
31 Mar 2017 - 8:18 pm | प्राची अश्विनी
:) सर्वांच्या वतीने धन्यवाद!
31 Mar 2017 - 8:36 pm | अत्रे
खो कथा आयडिया भारी आहे! सगळे भाग आत्ता एकदम वाचले.
यातल्या दोन कन्सेप्ट खालील चित्रपट/मालिकांशी सिमिलर (सेम नव्हे) आहेत. उत्सुक लोकांनी जरूर बघ्याव्यातं -
मिती कन्सेप्ट - Coherence http://www.imdb.com/title/tt2866360/?ref_=tt_rec_tt
इंडेक्स - ब्लॅक मिरर सिझन ३, एपिसोड १ Nosedive
6 Nov 2018 - 5:16 pm | साबु
सगळे भाग एका दमातच्वाचुन काढले..अचाट आनि अतर्क्य आहे. सगळ्या लेखकांच्या कल्पनाशक्तीला आणि प्रतिभेला सलाम !!