.
.
.
नजर पोचते जिथवर तितके
निळ्या नभाशी निळेच पाणी
पाण्यात सोडूनी पाय बैसली
निळावती ती कुणी जलराणी
मित्र पांघरे निळीच दुलई
निळे व्योम अन निळी धरा
सभोवार फाकली निळाई
निल नभांगणी निळा झरा
मंद निळाई शुभ्र निळाई
निळा होय कातळ काळा
जळी कोरडे कमळ निळे
वात्सल्याचे गोत ही निळे
गात्रांत उमलला बहर निळा
निळी बासरी सावळ कान्हा
हृदयी पाझरे पाझर निळा
माय वत्सल निळाच पान्हा
विशाल कुलकर्णी
.
प्रतिक्रिया
30 Mar 2017 - 4:26 pm | पैसा
कसली सुंदर लिहिली आहेस कविता!!
"नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा" आठवला एकदम!!
30 Mar 2017 - 11:28 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद संपादक मंडळी !
1 Apr 2017 - 8:33 am | पैसा
धन्यवाद स्वीकारते. पण त्येवढं संपादक मंडळी वगळा. ते वायले. आम्ही वायले. =))
2 Apr 2017 - 2:51 pm | विशाल कुलकर्णी
माफी द्येवा माय एकवार ...
समद्यांस्नी थ्यांकू ! निसत्ये प्रतिसाद दिलेल्यांचच न्हाय तर ज्येनी ज्येनी वाचलं त्या समद्यांचं दिकून थ्यांकू =))
30 Mar 2017 - 4:44 pm | मोदक
नजर पोचते जिथवर तितके
निळ्या नभाशी निळेच पाणी
पाण्यात सोडूनी पाय बैसली
निळावती ती कुणी जलराणी
या सोबत एक समुद्रकिनार्याचा एक निळा फोटो दे.
बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .
30 Mar 2017 - 11:20 pm | विशाल कुलकर्णी
हा चालेल का? संपादक मंडळी, आपल्यापैकी कुणी हा फोटो वरच्या मुळ पोस्टमध्ये जोडून द्याल काय?
30 Mar 2017 - 11:25 pm | विशाल कुलकर्णी
किंवा हा फोटो...
31 Mar 2017 - 8:15 am | अत्रे
यात HDR इफेक्ट खूप वापरला आहे का?
31 Mar 2017 - 12:15 pm | विशाल कुलकर्णी
ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अॅडजस्ट केलेत काही प्रमाणात. बाकी कुठलाही इफेक्ट नाही वापरलेला.
30 Mar 2017 - 11:19 pm | शार्दुल_हातोळकर
सुरेख !!
30 Mar 2017 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
वाह... फोटू तो फोटू... कविता भी कम्माल है!
31 Mar 2017 - 8:06 am | प्राची अश्विनी
सुरेख!
31 Mar 2017 - 12:16 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद !
31 Mar 2017 - 1:18 pm | बरखा
आवडली कविता. खुप छान लिहीलिये.
1 Apr 2017 - 12:44 am | सत्यजित...
कविता आवडलीच!अभिनंदन,शुभेच्छा!
2 Apr 2017 - 2:52 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
2 Apr 2017 - 3:29 pm | सस्नेह
सुंदर कविता !
पाठ्यपुस्तकात शोभावी अशी !
3 Apr 2017 - 1:06 pm | उपेक्षित
मस्त कविता विशाल भाऊ...
पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का )
बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?
3 Apr 2017 - 2:56 pm | विशाल कुलकर्णी
तुमाले कसं इसरु भाव ? ठ्यांकू बर्का :)