[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. ४
[खो कथा] पोस्ट क्र. ५
पोस्ट क्र. ६:
या दोघांची भांडण बघून मला कंटाळा आला होता.
मी एक जांभई दिली, मान, बोट, पाठ मोडली आणि उठलो. पायातली चप्पल नीट केली, चप्पलेचा अंगठा तुटला होता, या पगारात मला एक बूट पण घेता येत नाही, जाऊ दे या दोघांचं काहीतरी बघायला पाहिजे.
मी लांबूनच हाक मारली "ए भावड्या"
तसं दोघांनी माझ्याकडे बघितले, मी हातानेच त्यांना 'इकडे या' असा इशारा केला, अशोककुमार ने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले, खुदिराम बाप्पू तर कुठंतरी दुसरीकडं बघायला लागले.
आयला एवढा पण रिस्पेक्ट नाय?
मग मीच पायातली चप्पल घासवत त्यांच्याकडे गेलो, मी जवळ आलेला बघून दोघे ही भांडायचे थांबले, खुदिराम माझ्याकडे एकटक बघायला लागला, मी कोण आहे ते याला बहुतेक कळाले असावे, अशोक तर अजून काय भाव देत नव्हता.
अशोक यार तो फिट हैं, जिम करतो वाटतं, मला पण डायट...
"सॉरी आपण?" अशोकने मला विचारले.
"मी.." एवढे बोलून जरा ड्रॅमॅटिक पॉंझ घेतला, खुदिरामकडे बघितले, माझ्या शॉर्ट्स मधल्या खिशातला गॉगल काढून डोळ्यावर चढवला आणि मनात विचार आला,
'गॉगल पुसायला पाहिजे'
"मला माहितेय" खुदिराम सावकाश माझ्या चेहऱ्याकडे निरखून बघत म्हणाला, "मी यांना प्रत्येक मितीत बघतो"
"मी यांना प्रत्येक मिठीत बघतो" लोल. मी माझ्या मनातल्या जोकवर हसत, शर्टच्या कोपऱ्याने गॉगल पुसत खुदिरामकडे बघत म्हणालो, "भावा, बस्स का? नाव पण माहित असेल ना?" मी खुदिरामला म्हणालो.
खुदिरामने नाही म्हणून मान डोलावली.
"आपण यांचे भाऊ का?" अशोकने मला विचारले.
काय पण म्हणा, एवढे मॅनर्स देऊन आज काल कोण बोलतं? अशोकने बहुतेक एमबीए केलय, मला पण करायचं होत यार.. त्या मितीत कॉलेज पण चांगलं होत, कुठं बँक पीओची परीक्षा देत बसलो..
"तुम्ही....?" खुदिराम माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला, मी उगाच चेहृऱ्यावर माज दाखवत म्हणालो, "कसं आहे, तुम्ही जे इकडून तिकडे मितीत शिरता, ते चुकीचं आहे, ते कायद्यात आय मिन, कायद्यात नाही, पण ते बसत नाही, नियमांमध्ये बसत नाही"
एमबीए करायलाच पाहिजे होतं, माझ्याकडे अजिबात कम्युनिकेशन स्किल...
"नियम, कसले नियम? आणि आपण कोण?" 'आणि' मधल्या 'ण' वर भर देत अशोक म्हणाला.
"मी..मितीकरी.."
"मतकरी?"
"नाय, ते आपले आवडते लेखक आहेत, पण मी मि-ती-क-री, मी मित्या संभाळतो"
"अरे हां, मी ऐकलंय, मला माहितेय" खुदिराम अशोककडे बघत म्हणाला, खुदिराम पाठीत वाकून, दोन्ही हातांनी माझ्या पाया पडायला लागला, मी त्याचे लागलीच हात पकडत म्हणालो,
"सर काय हे, तुम्ही लाजवताय"
"नाही नाही, असं कसं, तुम्ही स्वतःहून आलात, कधीच कोणाला भेटत नाहीत..."
"एक्सक्यूझ मी" अशोकला हा प्रकार काय आहे ते कळेना तो म्हणाला,
"मित्या संभाळता?"
"हो, तुम्ही खूपच इकडे तिकडे जाता..आणि मग" मी पुण्याच्या एक्सेन्ट मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
"म्हणजे नेमकं काय करता?" अशोकने त्याचा प्रश्न पूर्ण केला आणि तो पुण्याचाच आहे हे दाखवून दिले.
"अरे, कस सांगू, अरे हे सगळं बघतात, म्हणजे मित्यामध्ये जे लोक प्रवास..." खुदिराम ने सांगण्याचा प्रयत्न केला.
"मला नाही वाटतं...." अशोक म्हणाला.
मी चिडलो, याला का नाही वाटतं, माझ्याकडे बघून कोणालाच का..
"मला नाही वाटतं 'मिती' च अनेकवचन मित्या असेल" अशोक माझ्याकडे बघत म्हणाला.
"नाही हो, मित्याच आहे, काही मित्यांमधले लोक त्याला मिटीज असंही म्हणतात, मिट्या, मितीबाई पण म्हणतात"
मी माझ्या विनोदावर खूप खुश होऊन हसलो, खुदिरामने रिस्पेक्ट म्हणून थोडेसे हसून दाखवले, अशोकच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा बदलली नाही.
मग शिक्षक चिडल्यावर, मुलगा जस खरं सांगतो, तस सांगायला मी सुरुवात केली.
"मिती मध्ये जगण्याचे, आय मिन राहण्याचे काही एटीगेट्स आहेत, म्हणजे....."
कायदे म्हणायचं का तुम्हाला? अशोक म्हणाला.
"नाही, एटीगेट्स म्हणजे, हां बरोबर कायदे, नियम आहेत" च्यामारी माय कॉम्युनिकेशन सक्स!! मी मनात म्हणालो.
"तर नियम असे आहेत की.." मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात,
"पहिला नियम काय आहे?" अशोकने मला विचारले.
"मिती नियम कोणाला सांगू नका"
"काय?"
"हो, म्हणजे, आय मिन, मिती प्रवास करता येतो, हीच गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, काही थोड्याच लोंकाना माहित आहे, ती सगळ्यांना सांगितली तर, खुपजण त्याचा गैर वापर करतील, कारण ही मोठी शक्ती.."
"हे नियम कोणी ठरवले?" अशोक ने परत विचारले.
"काही अशा लोंकानी, ज्यांनी पहिला मिती प्रवास केला, त्यांनी मग त्यावर पुस्तक लिहिली, मग ती प्रसिद्ध झाली, मग ती वाचून अजून काही लोक प्रवासाला गेले, पण ते परत आले नाहीत, मग असं होऊ नये म्हणून परत पुस्तक लिहिली गेली, मग परत.."
"पण मग तुम्ही, कसे..??"
"कस आहे, एक मितीमती मंडळ आहे"
"मिती?"
"मती"
"माती?"
"मितीमती.."
"मित्रमंडळ म्हणा ना" खुदिराम वैतागून म्हणाला.
"तर तेच, सहा- सात जणांचं मंडळ आहे, तर त्यांनी मिती प्रवासाला सुरुवात केली आणि काही पहिल्या मितीत परत आलेच नाहीत, ते मितीच्या मिठीत अडकले"
मी विनोद करून टाळीसाठी हात पुढे केला, पण दोघांनी मला टाळी दिली नाही.
"सॉरी गाइज, आय एम रिअली गुड ऐट बॅड जोक्स"
पण माझा हा सुद्धा जोक त्यांना कळाला नाही.
"त्यांनी तुम्हाला हे काम दिलंय का?" अशोकने मला विचारले.
"तूच रे तू" असे म्हणून मी अशोकच्या खांद्यावर थोपटले. "पगार नाही हो पण..सात वर्ष झाली अजून ग्रॅच्युइटी नाही.."
"पण मग तुमचं नेमकं काम काय आहे" अशोकचा परत प्रश्न आला.
"ज्या चांगल्या लोकांनी वाईट वळणं घेतली आहेत, त्यांना मी पुढचा मार्ग दाखवतो" मी हातवारे करत म्हणालो, बेस्ट!!! हाच व्हाट्सएप्प स्टेटस ठेवुयात!
"माझ्या मुलांचं तेवढं बघा ना" खुदिराम कळवळीने मला म्हणाला.
"सर, असं असतं का? मुलांवर कोणी मिती प्रवास लादत का? मी माझ्या सासूला पाठवले होतं, पण.." मी जरा जास्त बोलून गेलो.
"पण.."? दोघांनी एका सुरात मला विचारले.
"पण परत आल्या, आता आमची ही म्हणतेय, सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या मितीला न्या"
"तुमची मुलं बहुतेक मागच्या मितीत गेली असतील" मी पटकन मुळ विषयावर आलो.
"मागची मिती?" खुदिरामने विचारले.
"जनरली या मितीतून लोक मागच्या मितीत जातात"
थोडक्यात मला हे दाखवायचं होतं की मी लय एक्स्पर्ट आहे, तुम्हाला काही माहित नाही.
"मग मागच्या मितीत कस जायचं?" खुदिरामने विचारलं.
मी खुदिरामकडे मितीचा आरसा मागितला, खुदिरामने मला आरसा काढून दिला, मी उगाच एकदम एक्स्पर्ट असल्याचा आव केला आणि म्हणालो,
हे काय हा तर मागच्या मितीचा आरसा आहे, तुम्ही परत मागच्या मितीत जा"
"मुलं तिथं असतील?" खुदिरामने फार आशेने विचारले.
"हां तिथं असू शकतात, पण बऱ्याच वेळा पोर एकदा मितीतून बाहेर पडली की घरच्या मितीत परत येत नाहीत, त्यांना ती नवीन मिती आवडून जाते, मी लय पोरांचं बघितलं, त्यांना एकदम फ्रीडम मिळतं ना.. मग कशाला.."
एवढं सांगत असताना खुदिराम बापू दुसऱ्या मितीत गेले सुद्धा!!
आयला एवढा पण रिस्पेक्ट नाय?
"हे बघ, असं असत या जॉब मध्ये काय रिस्पेक्ट च नाय, माझं कोण ऐकतच..."
मी हे बोलत असताना अशोक सुद्धा आरसा समोर धरून उभा होता, अशोक ने माझ्याकडे बघितले, मी त्याच्याकडे बघून खांदे उडवले.
याला मिती प्रवासाचा दुसरा नियम सांगावा का? का नको? काय करावे? मला काय करावे ते कळत नव्हते.
क्रमशः
प्रतिक्रिया
24 Mar 2017 - 7:59 pm | निशदे
आवडली आहे...... कथा आणि लेखनशैली या दोन्हीला सलाम......
24 Mar 2017 - 8:43 pm | दीपक११७७
छान आता नविन angle मुळे धमाल उडेल.
24 Mar 2017 - 9:34 pm | अॅस्ट्रोनाट विनय
पुढचा खो कुणाला ?
24 Mar 2017 - 10:13 pm | भीमराव
हिरमोड झाला राव माझा, मला वाटलेलं हा मीतीपोलीस काय तरी चिरीमिरी मागेल पन कशाचं काय, रच्याकने मिती हा शबुद किती वेळा आला हो एवढ्यात,
25 Mar 2017 - 7:27 am | प्राची अश्विनी
चांगलली वठलीय.
25 Mar 2017 - 9:31 am | ज्योति अळवणी
मस्त. आता कथा कशी वळेल याची उत्सुकता आहे. खो कोणाला?
25 Mar 2017 - 10:57 am | किसन शिंदे
मागचा भाग पुन्हा एकदा वाचल्यावर हा भाग दोनदा वाचून काढला तेव्हा कुठे कळाला. =))
लगे रहो. पुढचा खो कुणाला?
25 Mar 2017 - 7:01 pm | मोहन
खूप छान ! खो कुणाला सांगा हो.
25 Mar 2017 - 7:20 pm | चॅट्सवूड
पुढचा खो '५० फक्त' यांना देत आहे
25 Mar 2017 - 7:53 pm | अभ्या..
चला आता २०१८ मध्ये यावे पुढची कथा वाचायला. :(
.
एकतर ते ५० म्हणजे मोस्ट बिझ्झीयेस्ट आणि लहरीयेस्ट आयडी ऑफ द मिपा. त्यात आमच्या गावाची रग.
काय खरं नाय. ;)
25 Mar 2017 - 8:49 pm | जव्हेरगंज
=))
25 Mar 2017 - 8:12 pm | किसन शिंदे
बेस्ट! हर्षदची स्टाईलही जबरदस्त आहे लिहीण्याची
25 Mar 2017 - 10:47 pm | गवि
वा.. ५० फक्त पुढचे लेखकमहाशय? मजा येणार...
पुढचे भाग येऊदेत पटापट.. चांगला प्रयोग चाललाय..
या भागात जरा म्हणजे खूपच बेअरिंग बदललं असं वाटलं निवेदनकर्त्याचं.अचानक नर्मविनोदी झाल्याने जरा ठळक गॅप जाणवली. पण बघू पुढे काय होतंय ते.
26 Mar 2017 - 11:46 am | संजय पाटिल
५० फक्त पुढचे लेखकमहाशय? मजा येणार...>>>>
सहमत..
25 Mar 2017 - 10:56 pm | पैसा
कहानी में ट्विस्ट!