सर्व मिपाकरांना माझा नमस्कार.
मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती.
मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना. करंदीकर यांचे "ठकीचा संसार" हे प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन मी लहानपणी दूरदर्शनवर पाहिले होते.यावेळी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.
पूर्वीच्या काळातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यांच्या नावफलकासहित येथे मांडल्या होत्या.काहींचे working models(याला मराठी प्रतिशब्द काय हो)(उदा.ताक घुसळणारी बाई,जात्यावर दळणारी बाई,इ.)ही होते.
सुट्टीत गावी गेल्यावर तेथे पाहिलेल्या वस्तूंच्या येथे छोट्या छोट्या प्रति़कृती पाहून खूप आनंद वाटत होता,मजा येत होती.काही वस्तू माहित नव्हत्या त्यांची माहिती आई-बाबांकडून मिळत होती.प्रदर्शन पाहण्यास आलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णणीय होता.लहान मुले उत्सुकतेने तिथेल्या वस्तूंची चौकशी करत होती आणि त्यांचे पालक मुलांच्या शंकांना उत्तरं देत होते.श्री. विलास ना. करंदीकरही वस्तूंची माहिती करून देत होते.
एक आनंददायी,भावपूर्ण्,मनाच्या एका कोपर्यात साठवून ठेवावा असा हा एक अनुभव होता.
तेथे काढलेली छायाचित्रे-
http://picasaweb.google.com/prachikurkute/Bhatukali?locked=true#
प्रतिक्रिया
14 Feb 2009 - 10:20 pm | रामदास
आपले मिपावर स्वागत.
फोटो का बरं दिसत नाहीत.?
14 Feb 2009 - 10:27 pm | महेंद्र
मी पण पाहिलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केलेला सापशिडी चा खेळ पण त्यांच्याच प्रदर्शनात पाहिला होता.
15 Feb 2009 - 4:27 am | प्राची
Sorry मिपाकर,पहिल्यांदाच फोटो चढवले होते.
आता दिसत आहेत का फोटो?
महेंद्रजी,तो गुलाबरावमहाराजांनी तायार केलेला गंजिफाचा खेळ होता,फोटोमध्ये आहे.
15 Feb 2009 - 6:06 pm | महेंद्र
गंजिफा नाही हो.. नक्कीच सापशिडीचा खेळ होता त्या प्रदर्शनात. मी नाशिकला पाहिलं होतं दोन वर्षापुर्वी. गुलाबराव महाराजांनी बनवलेला असु शकतो कदाचीत माझी चुक झाली असेल, ज्ञानेश्वर म. म्हणालो ते..
14 Feb 2009 - 10:44 pm | पक्या
मलाही फोटो दिसले नाहीत.
15 Feb 2009 - 3:46 am | llपुण्याचे पेशवेll
असे एक प्रदर्शन काही वर्षापूर्वी मी बालगंधर्व रंगमंदिरात पाहीले होते.
प्राची,
तुमचा अल्बम शेअर्ड दिसत नाहीये. म्हणून फोटो नाही पाहू शकलो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
15 Feb 2009 - 5:56 am | रेवती
ठकीचा संसार दिसला. मस्तच आहे.
आपण त्यापैकी काही भांडी बघीतलीयेत तरी.
बरीच फक्त नावं ऐकलेली भांडीही बघायला मिळाली.
छान!
रेवती
15 Feb 2009 - 6:55 am | सहज
फोटो बघायला मजा आली. :-)
धन्यवाद.
मिपावर स्वागत.
15 Feb 2009 - 7:10 am | विसोबा खेचर
फोटू सही आहेत! :)
तात्या.
15 Feb 2009 - 8:21 am | प्राची
धन्यवाद :D
16 Feb 2009 - 12:21 am | प्राजु
खूपच सुंदर आहे हा संसार.. मजा आली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Feb 2009 - 8:35 pm | किट्टु
खुप छान फोटो ...
16 Feb 2009 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर
छान भातुकली. ह्यातील बर्याचशा वस्तू प्रत्यक्षात वापरात असताना पाहिलेल्या आहेत. त्या पुन्हा पाहायला मिळाल्या आणि बालपणीच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
17 Feb 2009 - 4:05 am | महेंद्र
या फोटोमधले बरेचसे वर्किंग मॉडेल्स आहेत ..