(डोलकरांचे मनोगत)

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 Jan 2017 - 11:42 am

(डोलकरांचे मनोगत)

पेरणा अर्थातच

शतदा भरला एक प्याला शेवटचा
मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा
रिचवले हजारो पेग मी उदरात
सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा

चखण्याची देउन आहुती पोटाला
मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला
नसता जेवण व्यर्थ मानले असते
मज आहे कारण आज घरी जाण्याला

धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले
कुठे जायचे ते अडखळत सांगितले
जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!

हे विजय मल्या थोर तुझे उपकार
तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर
गायबला जरी तू बँकांना देउन तुरी
सदैव राहिल तुझी आठवण यार

मोह नसे अन्य कुठलाही देहाला
सिंहाचा वाटा जरी असे पार्टीला,
डोळे फिरले पाय जरी लटपटले,
मी नाही घालले लोटांगण धरणीला !!

- थोडा दानव

अभंगकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीरोमांचकारी.वीररसबालकथाऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 Jan 2017 - 12:10 pm | संजय क्षीरसागर

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी !

आता मोह नित्यनवे या देहाला,
बाला बाराची यावी मम सेवेला,
हे हृदय हर्षिले, शीश उचलले,
वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jan 2017 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

क्या बात है सर... जिओ....
बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल.
बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली
पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2017 - 12:29 pm | टवाळ कार्टा

=))
क्विता जब्राट

कवि मानव's picture

12 Jan 2017 - 3:16 pm | कवि मानव

:)))

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jan 2017 - 12:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

पैजारबुवा, जबरदस्त हो! खरा काजू काय, चलदूर अंघोळकर काय, थोडा दानव काय, एकसे बढकर एक, तोड नाही!

आदूबाळ's picture

12 Jan 2017 - 1:51 pm | आदूबाळ

थोडा दानव :))

एस's picture

12 Jan 2017 - 2:59 pm | एस

आशीर्वाद असू द्या माऊली! _/\_

नीलमोहर's picture

12 Jan 2017 - 3:00 pm | नीलमोहर

प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय,
यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात.
काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

कवि मानव's picture

12 Jan 2017 - 3:17 pm | कवि मानव

अचूक बोललात _/\_

नीलमोहर's picture

12 Jan 2017 - 3:07 pm | नीलमोहर

सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

डोलकर म्हटल्यावर दर्याचा राजा आठवणं, हे पुणेकर नसल्याचं लक्षण आहे.

नीलमोहर's picture

13 Jan 2017 - 2:49 pm | नीलमोहर

एकवेळ अज्ञानी असल्याचं लक्षण आहे म्हणा, पुणं किंवा पुणेकर काही नाही त्यात,
डोलकर हे स्थळ सापेक्ष असतात :)

कवि मानव's picture

12 Jan 2017 - 3:16 pm | कवि मानव

:))))))))))))))))))))))))))))))))))

अल्टिमेट विडंबन....
सावरकर सुद्धा हसत असतील वरून :)))))

पैसा's picture

12 Jan 2017 - 4:40 pm | पैसा

काय हे!

प्रचेतस's picture

12 Jan 2017 - 5:35 pm | प्रचेतस

पैजारबुवा रॉक्स....!!!

देशप्रेमी's picture

12 Jan 2017 - 5:46 pm | देशप्रेमी

अगागागा..... अलौकिक आहे हो तुमची प्रतिभा .......

विडंबन सम्राटाला आमचा सलाम !!

शार्दुल_हातोळकर's picture

12 Jan 2017 - 10:12 pm | शार्दुल_हातोळकर

अप्रतिम !! पैजारबुवांचा अजुन एक जबरदस्त षटकार !!

रातराणी's picture

13 Jan 2017 - 12:18 am | रातराणी

हा हा! हे कसं काय राहून गेलं वाचायचं! तुफान जमलंय :)

अनन्त्_यात्री's picture

13 Jan 2017 - 10:16 am | अनन्त्_यात्री

मूळ "कविता" ट ला ट अन री ला री करून "जुळवलेली" , अन त्यावर "इड॑बन" . कमाल आहे सहनशक्तीची

खेडूत's picture

13 Jan 2017 - 10:28 am | खेडूत

धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले
रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण?

असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच.
(हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

प्रसाद_कुलकर्णी's picture

18 Jan 2017 - 11:19 am | प्रसाद_कुलकर्णी

डोळे फिरले पाय जरी लटपटले,
मी नाही घालले लोटांगण धरणीला !!