(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 9:27 am

अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.

दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.

मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.

पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या

का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या

आजूबाजूला बोंबाबोंब किती
कोण ऐकेल माझे
घायाळ झाली आता
कोठे माझी दमाची भाषा

ना रुजते मन माझे
या झाकोळल्या विजनात
राहतं नाही माझ्या
कृष्ण्कर्मे आडोश्या

फरपटत जात आहे मी
दशाहीन झाल्या या मिशा
दाविती दर्पण मज
या फेंदारलेल्या मिशा.

१ संराशा= संजय राऊतांची ले़खणीशाई

अविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कविताहास्यविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

12 Oct 2016 - 9:33 am | राजेंद्र देवी

आमची दिलखुलास दाद आहे.... अप्रतिंम.....

पैसा's picture

12 Oct 2016 - 9:40 am | पैसा

संराशा का! =))

यशोधरा's picture

12 Oct 2016 - 9:46 am | यशोधरा

संराशा =))
मराठी भाषेला देणगी!

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2016 - 10:00 am | टवाळ कार्टा

खि खि खि

प्रचेतस's picture

12 Oct 2016 - 10:17 am | प्रचेतस

कसं काय सुचतं हो तुम्हाला?

रातराणी's picture

12 Oct 2016 - 11:10 am | रातराणी

=))
मूंछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो!
=))

नाखुकाकांची कविता समजल्याचा आनंद शब्दातीत आहे, दसर्याच्या शुभ मुहूर्तावर पैजारबुवांनी आपल्याला गंडा बांधला की काय अशी एक शंका आली मनात ;)

नाखु's picture

28 Nov 2016 - 10:09 am | नाखु

पैजारबुवां आम्हाला कायम गुरुस्थानी आहेत्च आणि नुकतेच त्यांनी आम्ही दोघे एकाच मुख्याध्यापकाचे शाळेत आहोत हे आम्हाला सुचीत केले आहेच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Nov 2016 - 10:56 am | ज्ञानोबाचे पैजार

काय हो आपले प्रातःस्मरणीय परमआदरणीय वंदनिय श्री श्री १०८ मुख्याध्यापक एकच आहेत सा-या जगाला माहीत आहे.(इथे आम्ही आमच्या दोन्ही कानांना हात लावला आहे)

पण त्याच बरोबर चार वर्ष नापास होत तुमच्या वर्गात आलेल्या दगडाला कशाला शेंदुर लावताय?

(शेवटच्या बाकावर बसून पहिल्या बेंचवर बसलेल्या नाखुअंकलकडे मठठासारखा पहाणारा)
पैजारबुवा,

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 11:28 am | नीलमोहर

'आता मला वाटते भिती'

- हा कुठला काव्यरस म्हणायचा =))

अभ्या..'s picture

12 Oct 2016 - 12:28 pm | अभ्या..

मेरेको वाट्याच. कोईतो फेंदारलेल्या, ओथंबलेल्या मिश्या बोलके विडंबन डालेंगाच.
पण आमच्या साक्षात साह्यबांवर विडंबन केलेले असल्याने तूर्तास वरुन आदेश आल्याने तूर्तास निषेध. तुम्हीही तूर्तास माफी मागा.

वरुण मोहिते's picture

12 Oct 2016 - 3:02 pm | वरुण मोहिते

मस्त

कवि मानव's picture

12 Oct 2016 - 3:43 pm | कवि मानव

:)))

चिनार's picture

12 Oct 2016 - 4:05 pm | चिनार

मस्त !!!

अजया's picture

12 Oct 2016 - 4:09 pm | अजया

=)))))

विशाल कुलकर्णी's picture

29 Nov 2016 - 11:55 am | विशाल कुलकर्णी

लैच ....
संराशा बद्दल वाचून तर घैवरुनच आलं देवा ;)