नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
प्रतिक्रिया
23 Nov 2016 - 9:52 pm | रेवती
ओ, थांबा, आत्महत्या करू नका. बाकी उपाय निघतील.
24 Nov 2016 - 12:36 am | खटपट्या
+१ हेच म्हणतोय. इथे तुम्हाला मदत करणारेच भेटतील. खात्री बाळगा.
मितानताइंच्या प्रतिक्षेत...
24 Nov 2016 - 11:00 am | मितान
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.? >>>>>>>> तुम्ही काय ठरवलं आहे ? उपयोग होणार की नाही होणार ? त्यावर अवलंबुन आहे.
आणि हो, तुमच्या जीवनाचं काय करायचं हे तुम्हाला सुचत नसेल तर तुम्हाला विश्वास वाटणार्या कोणत्याही सामाजिक स्वयंसेवी संस्थेला तुमचं आयुष्य देऊन टाका. ते करतील तुमचं काय कारयचं ते !
23 Nov 2016 - 9:55 pm | पिलीयन रायडर
असं पन्नास आयडी घेऊन, दहा संस्थळांवर लेखांचा रतिब घालायचा म्हणलं तर हँग झालं असेल ते डोकं. रॅम नसते एवढी सामान्य मेंदुची.
23 Nov 2016 - 9:58 pm | मोदक
:=)) :=))
23 Nov 2016 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
एखादे एसडी कार्ड टाकायची व्यवस्था करता येईल काय ?!
23 Nov 2016 - 10:46 pm | जानु
मोठे प्रश्न आहेत. त्यातच डोके नाही हे माहित असुन........आहे आशा आहे.......
23 Nov 2016 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेखक धाग्याच्या नावाला कंसात टाकायला विसर्ला की क्काय ? असा सौंशय येतोय :)
23 Nov 2016 - 11:52 pm | सुबोध खरे
तुम्ही इंटर कूलर बसवून घ्या
24 Nov 2016 - 12:34 am | गामा पैलवान
टफि,
तुम्ही लग्न करून पहा. अक्कल नसेल तर यायला सुरुवात होईल.
आ.न.,
-गा.पै.
24 Nov 2016 - 10:34 am | बाजीप्रभू
१००% सहमत,
लग्न करा आणि बायकोच्या डोक्याने चाला. सगळे प्रश्न निकाली लागतील.
मिपावरील बरेच बाप्पे हेच करतात. मी धरून.
24 Nov 2016 - 12:41 pm | मराठी कथालेखक
+१
डोकं नसलं तरी चालेलं... बॉडी बनवा..सुंदर बायको मिळेल....एन्जॉय करा.. डोकं आणि घर बायकोलाच चालवू द्या म्हणजे मग दोघेपण खूष
24 Nov 2016 - 12:21 pm | विनटूविन
दुसरे चाक व्यवस्थित चालत असेल आणि त्याला आपल्या जोडीदाराबाबत कल्पना असेल तर प्रवास स्मूथ होईल.
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्ही तुमच्या व्याख्येनुसार यशस्वी व्हावे ही प्रार्थना
25 Nov 2016 - 11:40 am | मीउमेश
सहमत
24 Nov 2016 - 12:41 am | पुंबा
का वाटतं असं?
24 Nov 2016 - 1:10 am | jp_pankaj
मी काय करु??????
-
एकच उपाय .......
आतंरजालीय आत्महत्या
24 Nov 2016 - 1:27 am | संजय क्षीरसागर
इतकं प्रांजळ आत्मनिवेदन मी आंतरजालावर आजतागायत कधीही पाहिलं नाही. तुमचा आयडी टोपण नावानं आहे, तो जर खर्या नावानं असता तर तुमच्यासारखे प्रामाणिक तुम्हीच !
आपण बिनडोक आहोत ही केवळ तुमची एकट्याचीच व्यथा नाही, तो अखिल मानवतेचा प्रॉब्लम आहे. पण लोक इतके षंढ आहेत की कुणीही तो उघडपणे मान्य करत नाही. इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हा मानवी जन्माला लाभलेला जन्मजात शाप आहे. इथे कुणीही माईचा लाल नाही ज्याला असा काँप्लेक्स नाही. लोक फक्त तो मान्य करत नाहीत.
इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स फक्त एका आणि एकाच मार्गानं दूर होऊ शकतो तो म्हणजे आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा बोध होणं. दुर्दैवानं या फोरमवर ती चर्चा होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला ग्वाही देतो की `आय एम अॅन इडियट' हा मानव होण्यातच दडलेला प्रश्न आहे. त्याचा तुमच्या एकट्याच्या मानसिकतेशी काहीही संबंध नाही.
माझ्या या प्रतिसादाचा तुम्हाला उपयोग झाला तर जस्ट चिल ! यू आर नॉट अलोन.
24 Nov 2016 - 7:56 am | नावातकायआहे
आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा बोध होणं!!
24 Nov 2016 - 10:17 am | असंका
+ १
27 Nov 2016 - 3:30 pm | निराकार गाढव
यक् दम ब्रोब्र! त्यो मानसांचा प्रोब्लेम हाय, गाडवांचा नाय. मपल्याला बी कन्चा बी प्रोब्लेम बी नाय बी. दिस्ला प्रोब्लेम घाल त्येला लात... म्हूनच म्या कोन्ला काय ते समदा सांगत सुटतो:
दिस्ला प्रोब्लेम घाल त्येला लात...
:::
दिस्ला प्रोब्लेम घाल त्येला लात...
:::
दिस्ला प्रोब्लेम घाल त्येला लात...
— एक अंतर्ज्ञाणी गाडाव (म्हंजी मी, मी, मी, आणि मी सुद्दा)
24 Nov 2016 - 1:32 am | बोका-ए-आझम
वस्तुस्थिती नाही. बिनडोक माणूस म्हणजे ज्याला आपल्याला काही कळत नाही हेही माहित नसतं तो. तसं तुमचं नाहीये. शिवाय इथल्या(मिपावरच्या) वादविवादांत जिंकणं किंवा हरणं याला बाहेरच्या जगात काहीही किंमत नाहीये. त्यामुळे निराश होऊ नका. काही लोकांना दिशा सापडायला वेळ लागतो.
24 Nov 2016 - 2:15 am | संदीप डांगे
टफीसाब, इट्स अ ब्लेसिंग! जर तुम्हाला एवढं समजलं तरी खूप सुखी असाल.
तुम्ही हे प्रामाणीकपणे मांडलं असेल तर सलाम तुम्हाला!
(आगावूपणाचा सल्ला: शेतीतून बचत करायला जमतं का पहा, नोकरीधंद्याला घाबरु नका. भीती आपला सर्वात मोठा शत्रू. तिच्यापासून पळू नका. तिला आत्मसात करा. पार्टटाईम धंदा-पाणी, उगाच दोन-तीन छोटे उद्योग करुन बघा, पाण्यात उतरल्यावर भीती दूर होईल. बुद्धीवंतांच्या चर्चेत पडून उपयोग नाही. तो त्यांच्या मनोरंजनाचा विषय आहे. ह्या चर्चांमधले विजय पराजय आपल्या बॅन्कबॅलन्सवर परिणाम करत नाहीत. तस्मात् बॅन्कबॅलन्स नीट असेल तर तुम्ही जगातले सर्वात हुशार आणि इन्टेलिजंट आहात असे समजा. बाकी दुनिया गेली तेल लावत! ;) )
24 Nov 2016 - 2:47 am | निओ१
एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करुन पहा, मग समजेल एवढे सोपं नसते हे.
मी आताच काही महिन्यापुर्वी शहाणा झालो आहे.
24 Nov 2016 - 6:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्या आयडीशी वैचारिक मतभेद असले तरीही आत्महत्त्या वगैरे प्रकाराचा विचारही तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा करतो.
बाकी एखादा छोटासा उद्योग सुरु करा असा सल्ला देईन.
किंवा राजकारणात जा.
24 Nov 2016 - 9:48 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
कॅप्टन ,आत्महत्येला खूप धाडस लागते हे एका अनुभवातून उमगले आहे.टिंबटिंबमध्ये दम लागतो ,तो माझ्यात नाही.पुन्हा त्या वाट्याला जाणार नाही.
24 Nov 2016 - 7:45 am | वेल्लाभट
सोपा उपाय. असेच धागे काढत रहा.
24 Nov 2016 - 8:41 am | नाखु
वाटते
टर्बोचार्जड फिलॉसॉफर,
टॉपगिअर्ड फिलॉसॉफर, वेगवेगळे असावेत. आणि सगळे त्या दादूमोगामुळे यांच्या सोग्याला हात घालत असावेत.
पैल्वान भाऊ आपला सल्ला रोगा पेक्षा इलाज भयंकर असा होऊ नये हीच अपेक्षा.
डांगेअण्णा म्हणतात ते खरं आहे इथे(मिपावर) वादविवादात जिंकला म्हणजे व्यवहारात्,वर्तणुकीत यशस्वी असेल्च असे नाही.
बाकी सल्ले/तोडगे/हमखास उपाय अनुभवी आणि तज्ञ देतील्च.
मी गुमान बाकड्यावर बसतो,कप्तान जरा सरक बाजूला जागा करून दे.
बाकड्यावरचा नाखु
24 Nov 2016 - 9:28 am | माईसाहेब कुरसूंदीकर
माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.
ही जाणीव होणे हे बुद्धी असल्याचे पहिले लक्षण रे फिलॉसॉफरा.तेव्हा नाउमेद न होता, व्यावहारिक वाचन वाढवलेस तर फायदा होईल असे ह्यांचे मत.
24 Nov 2016 - 9:51 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
माई ,फक्त तूच गं .तु येत जा मिपावर व प्रतिसाद देत जा ,बरे वाटते तु आल्यावर.
24 Nov 2016 - 9:53 am | माहितगार
फिलॉसॉफरा नकारात्मक विचार झटकून टाक, आत्मविश्वास ठेवण्याची फिलॉसॉफी आधी आत्मसात कर
आता तुझ्या दोन धाग्यातील माहिती जोडल्यास अल्प साशंकता वाटते आमची कुठे गल्लत होत असेल तर सांग
या धाग्यात आपण म्हणताय
आणि या आधीच्या धाग्यात आपण म्हणताय
हमारा कुछ चुक्या तो माफ करो बाबा.
24 Nov 2016 - 9:54 am | माहितगार
सॉरी तो तुमचा आधीचा धागा लेख दुवा
24 Nov 2016 - 10:21 am | असंका
अरेच्चा! खरंच की!!
काय हो साहेब... कसं रीकन्साइल करायचं?
24 Nov 2016 - 10:34 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अहो ,अल्पकाळ मी नोकरी केली होती ,पण ती न जमल्याने मला कामावरुन काढून टाकण्यात आले.तो अल्पकाळ मी जमेत धरत नाही.
24 Nov 2016 - 9:54 am | एक वाटसरू
डॉ खरें च्या जुन्या एका प्रतिसादातील एक वाक्य माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहे त्याचा आशय असा होता कि "काय फरक पडतो कि तुमच्या मुलाला कमी मार्क पडले तो जसा आहे तसे त्याला जगू द्या सर्वच जणांचा पहिला नं नाही येऊ शकत ,तुम्ही तुमच्या अपेक्षा त्याच्यावर लादू नका. तुम्ही त्याच्या प्रगतीची तुलना स्वतःच्या प्रतिष्ठेशी केल्यामुळे त्रास होतो"
वर संजयजीने ने म्हटल्याप्रमाणे वागणे जमले तर प्रश्न सुटतो पण ती स्थीती(स्टेट) २४ x ७ अमलात आणणे कठीण आहे.
बुद्धिमत्ता आणि व्यवहारज्ञान याचा बराच संबंध कमीच असतो. बरेच वेळेस असे पहिले आहेत कि जे हुशार आहेत पण व्यवहार करू शकत नाही.
आणि जशी बुद्धिमता जन्मजात असते तसे व्यवहारज्ञान हि जन्मजात असते. आपण फक्त मेहनती व सवय लावून ते थोड्याफार प्रमाणात वाढवू शकतो.
वयक्तिक मत असे आहे कि जर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर कसली गरज पडत नाही(व्यवहारात तोटा झाला तरी) आणि कॉन्फिडन्स तुम्ही योग किंवा व्यायामाद्वारे वाढवू शकता.
24 Nov 2016 - 10:13 am | amit१२३
माझ्या मते जगात सर्वात सुखी तुम्ही आहात. आंतर जाल किंवा कट्ट्या वरच्या गप्पा या फक्त वेळ जावा म्हणून केल्या जातात त्यातून निष्पन्न काही होत नाही. त्यामुळे तिथे गेल्यानंतर काही बोलता येत नसेल तर शांत राहून फक्त ऐकून घेणे (कळत नसले तरीही ) कारण सध्या ऐकून घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही ही उत्तम गोष्ट . व्यवहार ज्ञान म्हणजे पैशाचा व्यवहार जर जमत असेल तर उत्तम बाकी वेगळ्या ज्ञानाची गरज नाही जगण्यासाठी. मित्र बनवा , लग्न करा आणि जास्त विचार न करता आनंदात जगा. आई वडिलांच्या माघारी बायको नक्कीच काळजी घेईल.
24 Nov 2016 - 10:26 am | अर्धवटराव
तुम्ही गमतीने हा धागा काढला नाहि असं गृहीत धरतो.
१) तुम्हाला का वाटतं कि आपल्याला व्यवहार ज्ञान नाहि? तुम्ही स्वतःची तुलना कुणाशी करता ? मिपासारखं संकेतस्थळ म्हणाल, तर वाचन, प्रवास, व्यासंग आणि व्यावसायीक अनुभव यांच्या जोरावर इथल्या मान्यवरांची चर्चा चालते. प्रत्येकाने कुठेतरी शुण्यापासुन सुरुवात केलेली असते. एखादा विचार मुरतो, चिंतनाचं आवर्तन पूर्ण होतं आणि ते संस्थळावर प्रसवतं. तुमच्या बाबतीतसुद्धा तसच होईल. स्वतःला वेळ द्या.
२) तुम्ही कुठे फसवल्या गेले आहात काय? स्वाभिमानाला ठेच लागली का? त्या दु:खातुन हे प्रकटन आलं असल्यास हार्दीक अभिनंदन... भावी प्रगतीसाठी हे दु:ख फार गरजेचं असतं. सर्वप्रथम एक गोष्ट करा. तुम्हाला काय भोगायला लागलं व का याचा शांतपणे विचार करा. तुम्हाला कुठेतरी स्वतःची चुक उमगेल (दुसर्यावर विश्वास ठेवणे वगैरे सुद्धा आपलीच चुक असते). या पुढे ति चुक रिपीट होणार नाहि याची काळजी घ्या.
३) तुम्ही फक्त ३१ वर्षाचे आहात. आता कुठे आयुष्य सुरु झालय. निरनिराळे प्रयोग करायला, व्यासंग करायला भरपूर स्कोप आहे. परिणामांची/रिझल्टची पर्वा न करता, केवळ आवड म्हणुन जे करायची इच्छा असेल त्यासाठी वेळ काढा. अगदी भरपूर. त्यातुन व्य्ववहार ज्ञान आपोआप निपजेल.
४) मिपावर येत जा :)
24 Nov 2016 - 10:50 am | सामान्य वाचक
खूप सामान्य माणसे आहेत आणि सगळे छान सुखात आहेत
जास्त विचार करू नका
तुमच्या पेक्षाही ढ लोक मजेत जगत आहेत
आणि तुमच्या मते जी हुशार लोक आहेत, ती सुखात आहेत कि नाही हे माहित नाही
मुळात आयुष्य समाधानात जगायला हुशारी लागत नाही, attitude लागतो, शांतपणा लागतो, थोडीशी स्थितप्रज्ञाता लागते, समाधान मानण्याची वृत्ती लागते, प्रेम देण्याची आणि घेण्याची पात्रता लागते
हे सगळे जमले, कि तुमच्या सारखे सुखी तुम्हीच
24 Nov 2016 - 10:50 am | सामान्य वाचक
खूप सामान्य माणसे आहेत आणि सगळे छान सुखात आहेत
जास्त विचार करू नका
तुमच्या पेक्षाही ढ लोक मजेत जगत आहेत
आणि तुमच्या मते जी हुशार लोक आहेत, ती सुखात आहेत कि नाही हे माहित नाही
मुळात आयुष्य समाधानात जगायला हुशारी लागत नाही, attitude लागतो, शांतपणा लागतो, थोडीशी स्थितप्रज्ञाता लागते, समाधान मानण्याची वृत्ती लागते, प्रेम देण्याची आणि घेण्याची पात्रता लागते
हे सगळे जमले, कि तुमच्या सारखे सुखी तुम्हीच
24 Nov 2016 - 10:53 am | मोदक
व्वा, काय बोलला आहात..!!!
__/\__
24 Nov 2016 - 11:03 am | मितान
+११११ बोललात ताई !
24 Nov 2016 - 1:13 pm | बारक्या_पहीलवान
__/\__
24 Nov 2016 - 1:25 pm | अत्रुप्त आत्मा
@
››› +१ .
पण हेच अनाकलनीय भाषेत लिहिलं की आपण सर होतो. ;)
24 Nov 2016 - 2:17 pm | सामान्य वाचक
पुढच्या वेळेस गहन लिहिण्याचा प्रयत्न करिन
पण तुम्ही मला सगळे मॅडम नक्की म्हणणार ना?
28 Nov 2016 - 1:13 am | निराकार गाढव
अरारारारारारा ... अरे मणूष्यगुर्ज्या... तुजा ह्यो पाय है कि हातोडा? ठेचून काढली ना माजी शेपूट... आता बोंबला...
24 Nov 2016 - 1:33 pm | सस्नेह
बैलाचा डोळा !
24 Nov 2016 - 4:26 pm | अजया
परफेक्ट सावा!
24 Nov 2016 - 12:13 pm | सुबोध खरे
असमाधानी असण्याचे मूळ कारण म्हणजे आपण विचार करतो.
लष्करात एक सांगितले जात असे.
तुम्ही कधी दुःखी गांडूळ पाहीले आहे काय?
त्याचे दोन तुकडे करा दोन्ही तुकडे वेगवेगळ्या दिशेला जातात. कुठे असमाधान दिसते का?
विचार करणे सोडून द्या.
24 Nov 2016 - 12:45 pm | पाटीलभाऊ
सर्वप्रथम आपण कुठे तरी कमी पडतोय, अथवा आपल्याला काही कळत नाही हे असे विचार मनात येऊ नका देऊ. बऱ्याच लोकांना एखाद्या विषयातील काही कळत नसले तरी सर्व काही समजत असल्याचा आव आणतात.
तुम्ही जे उपचार घेत आहेत ते सुरु ठेवा. मन लावून शेती करा. आपला एखादा छंद वगैरे असेल तर त्यात रममाण व्हा. लोकांचा विचार कारण सोडून द्या. मग बघा...!
आणि हो...लग्न करा :)
24 Nov 2016 - 1:40 pm | औरंगजेब
काळजी करु नका.प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान नाही असे होत नाही. अहो तुम्ही स्वतःला उगाच दोष देताय.वास्तविक आपल या जगात कस होणार याची काळजी बाळगणार्यांच सगळ नीट होत हो. नका काळजी करु.
सही-
एक बिनडोक.
24 Nov 2016 - 4:19 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.जसे मनात आले तसे मांडले.आणि अक्कल नसल्यानं माझं काही अडत नाही ,फक्त दुसर्याकडे आहे ते आपल्याकडे नाही याची बोच राहाते ,म्हणून हा प्रपंच.
24 Nov 2016 - 4:26 pm | पुंबा
अहो चुकून सुद्धा अशी तुलना करू नका. लहानपणी अनेकदा घरातले म्हातारे नातेवाईक, शेजारी वगैरे अशी तुलना करून मनावर ओरखडे उठवत असतात. तेच आयुष्यभर त्रास देतात. शेवटी प्रत्येक माणूस हा एकटाच असतो, त्याचे आयुष्य हे त्याचे एकट्याचेच असते, दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. त्याने तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढेल.
24 Nov 2016 - 5:21 pm | मारवा
१- सर्वप्रथम हा उपदेश वगैरे नसुन मित्रत्वाच्या नात्याने केलेली साधी सुचवणी आहे फ़क्त पटेल तितके घ्यावे नाहीतर सोडुन द्या ही विनंती. तुम्ही आत्महत्या करु शकला नाहीत याचाच अर्थ कुठे तरी जगण्याच्या मुलभुत इच्छेचा अंकुर तुमच्यात होताच ज्याने तुम्हाला मागे ओढले. इतकेच पुरेसे असते. ही मुलभुत विल टु लीव्ह च जर संपली तर मात्र सर्वच संपते. पण ही इतकी असली तरी पुरे बर का. कारण ही असेल तर याच्या फ़ोर्सनेच माणुस मग स्वत:च्या जीवनात अर्थ, ध्येय्य ,श्रद्धा, आनंद इ. डोलारा उभा करत जातो व खेळात दंग राहतो. त्यामुळे हा तरी तुमचा प्रॉब्लेम नाहीच. आता काही माझ्या अल्पबुद्धीने काही व्यावहारीक उपाय सुचवतो.
२- एक आंतरजाल पुर्ण नेट वरील तुमच्या वावराला कुठे तरी मर्यादीत करा.. एक किमान का होइना वेळेची शिस्त आणा. म्हणजे काही दिवस किंवा काही तास दररोज निश्चीत करा व त्याचे काटेकोर पालन करा. उदा. रोज १ तास किंवा आठवड्यातुन ३ दिवस किंवा विकेंडला काहीतरी एक तुमचा स्वत:ला झेपेल असा प्लॅन करा मात्र. यानेच मोठा फ़रक पडेल. सतत व्यक्त होत राहावेसे वाटणे, सतत चौकात येऊन काहीतरी बोलावेसे वाटणे हे ही एक व्यसनच आहे. अव्यक्त राहण्यात व त्याहुन महत्वाच शिस्तबद्ध मर्यादीत वापराने अनेक गुंते सुटतील. एक प्रकारच मिडीया डाएट करा. नेट ला अन्ना सारख ट्रीट करा. जसे अन्नाच्या सेवनावर आपण काहीना काही तरी निर्बंध ठेवतो, कुठले खावे कुठले नाही, कीती प्रमाणात तसे.
३-तुमच्या शेतीत प्रत्यक्ष जीवनाच्या तुमच्या मित्र मंडळात तुमच्या कुटुंबात अधिक गुंतवणुक वाढवा. तुमच्या शेतीत जर सर्व काम मजुरांकडुन करवुन घेत असाल तर थोडे स्वत:ही करता येइल का असे एखादे शारीरीक कष्टाचे काम बघा, सफ़ाई का असेना, काही पेंडींग कामे असतील, कुंपणाच काम असेल तुम्हाला अधिक माहीत तर तुमच्या शेतीतल्या कामात जोरदार सहभाग घ्या. अलिप्त वा दुरस्थ वा सुपरवायजर सारखे न करता जमेल तितके स्वत: इन्व्हॊल्व्ह व्हा.
४- तुमचे बी.एस.सी झालेले आहे म्हणता त्याला बक्कळ शिक्षण म्हणता ? तुमच्या क्षेत्राचा वा एखाद्या आवडत्या क्षेत्राचा एखादा करस्पॉन्डन्स कोर्स करा. जो तुमच्या व्यवसायात प्रत्यक्षात मदतीला येइल असे एक्स्पो वा शिबीर अटेंड करणे असे काही तरी. खर तर तुमच्या क्षेत्रात तुम्ही कदाचित पुरेसे झोकुन देत नसाल असे मला आपले वाटते ( मी चुकु शकतो चुकल्यास आनंदच होइल.) पण तुम्ही इतका वेळ आंजा वर देता त्यावरुन वाटले. एक वाचलेल आठवतय अमेरीकेचे का कुठले शेतकरयांचे शिष्टमंडळ भारतात आलेले त्यांना विचारले तुमचे हे मंडळातील शेतकरी तेथील सर्वात अव्वल दर्जाचे असतील. तर उत्तर मिळाले नाही ते आमच्या बरोबर आले नाहीत. अवर बेस्ट फ़ार्मर्स नेव्हर लीव्ह देअर फ़ार्म असे काहीसे उत्तर होते.
५-आर्थिक असुरक्षिततेच्या भितीला वर डांगे म्हणाले तसे प्रत्यक्ष भिडा. जे उत्पन्न असेल त्यातुन किमान १००० रुपयाची तरी बचत सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन वा इतर कुठल्याही गुंतवणुकीत योग्य तज्ञाच्या सल्ल्याने करण्याचा संकल्प तरी सोडा व नियमीत बचतीचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष बचत अगदी थोडी जरी केली तरी एक सायकॉलॉजिकल सिक्युरीटी फ़िलींग येइल. नुसत्या विचार करण्याने ती भिती जाणार नाही.
६- अनुभवी, अधिकृत सायकॉलॉजिस्ट च्या सल्ल्याने औषधोपचार चालु असतील तर ते ही नक्कीच मदतीला येइल. प्रत्येक वेळी नुसत्या कौन्सेलींगने प्रश्न सुटत नाहीत. ब्रेन मध्ये आवश्यक तो रासायनिक संतुलन साधण्यासाठी औषधयोजनाही कधी कधी गरजेची असते व फ़ार चांगली मदत होते. अर्थात पात्र चांगल्या डॉक्टर ची निवड काळजीपुर्वक करणे अती महत्वाचे.
७- चर्चा वाद संवाद हे सर्व आयुष्याच्या तुलनेने प्रत्यक्ष आयुष्याच्या जगण्याच्या तुलनेने फ़ारच दुय्यम व किरकोळ बाबी आहेत. त्यांचे एक मर्यादीतच महत्व आहे. आंजा हा स्व ला सिद्ध करण्याचे साधन नका करु. आंजा वरील मानसिक भावनिक अवलंबित्व कमी करा. अधिकाधिक प्रामाणिक स्वत:शी होत गेला. व बाहेरील रीयल लाइफ़ लाच आपल्या स्व च्या अभिव्यक्तीचे माध्यम बनवणे कधीही उत्तम. ते तुमचे खरे जीवन आहे त्यातील जे काही तुम्ही आहात जी काय पात्रता आहे ज्या काय पायरीवर आहात तिथेच थांबा. त्याचे अवलोकन करा समजुन घ्या व तिथुन पुढे कसे जाता येइल केवळ त्यावरच तुमची टाइम एनर्जी रिसोर्सेस केंद्रीत करा. आंजा वरील चर्चा वाद संवाद थोडा काळ पुर्ण टाळले तर बरे होइल. एकदा तिथे स्थिर व्हा. काही काळ इथे केवळ वाचनमात्र व्हा. त्या रीअल लाइफ़ वर तुमचे नियंत्रण आले तिथे तुम्ही कंम्फ़र्टेबल झालात की इथेही आपसुक व्हाल. वाद जिंकणे लढणे हा तर फ़ारच बालीश प्रकार आहे. तुमची एनर्जी इथे वेस्ट होत आहे ते वाईट पण त्याहुन वाईट तुमची रीअल लाइफ़ मधील गुंतवणुक कमी होतेय. इथे काहीही लेख वा प्रतिसाद देण्यापुर्वी एकदा तरी आत्मपरीक्षण करुन बघा की जे काय लिहीताय ते खरच लिहायचय की नुस्ती तात्पुरती उबळ आहे. मी तर म्हणतो तुम्ही काही काळ पुर्ण थांबा, तुमचे संबंध इतके बिघडलेले आहेत की तुम्ही साध्या गंमतीजमतीतही आता काही लिहाल तर ते वादाकडे जाईल कदाचित. एक तुम्ही अती चिवडल्यामुळे तुमचा आंजा वरील पुर्ण वावर तुम्हाला आता केवळ वेदनाच देइल तापच देइल असे वाटते इथुन तुम्हाला फ़ारसे काही गवसेल असे वाटत नाही. म्हणुन थोडे थांबा, अधिकाधिक वाचत जा, कमीत कमी व प्रामाणिकपणे व्यक्त व्हा. मग वाद चर्चा संवादाने मिळणारा जो खरा फ़ायदा समृद्धी आहे ती तुम्ही घेऊ शकाल. अन्यथा पुन्हा तेच " अनडिग्नीफ़ाइड सोल मुव्हींग अराउंड " होइल व तुम्हीही अजुन निराश होत जाल. अजुन एक जमल्यास कट्ट्यावर येऊन प्रत्येकाल भेटा एकेकदा गैरसमजांची धार तीव्रता कमी होइल.
८- व्यायाम हे फ़ार मोठे वरदान आहे. कुठलाही अगदी कुठलाही तुमच्या आवडीचा व्यायाम नियमीत पणे करा अनेक प्रकारच्या नकारात्मक विचारप्रवाहांना मोडण्यात व्यायामासारखा दुसरा उपाय नाहीच. रनींग स्वीमींग जिम जे आवडेल ते करा पण नियमीत व्यायाम कराच. तो तुमच्या डिप्रेशनकडे जाणारया सवयीला आश्चर्यकारक रीत्या तोडेल.
९- प्रेमाचा मार्ग धरा. प्रेमाची नाती बनवण्यासाठी तुमच्या वेळेची श्रमांची गुंतवणुक करा आयुष्यात अगदी दोन जरी माणसं जोडली जीवाभावाची तर डिप्रेशन मध्ये जाण अवघड होइल तुम्हाला बघा.
१०- हे अस एकदाच प्रामाणिकपणे विचारत आहात हे चांगलच आहे पण अस सारख विचारणा करु नका नाहीतर सेल्फ़ पिटी ची सिंपथी गेन करण्याची सवय लागेल. पुढच्या वेळेस इथल्या सभासदांनी दिलेल्या सल्ल्याचा तुम्ही काय प्रत्यक्ष वापर केला व तुम्हाला नेमका फ़ायदा झाला की नाही की तोटा च झाला. तो सविस्तर फ़िडबॅक जरुर द्या. कारण तुमच्या सारखे इतर जे समस्याग्रस्त असतील त्यांनाही कळेल की कुठली गोष्ट तंत्र कामात येते कुठले निरुपयोगी आहे त्यांना फ़ायदा होइल. आणि त्याहुन महत्वाच तुमची कमिटमेंट दिसेल की तुम्ही खरचं स्वत:त बदल करण्यास उत्सुक आहात.
कमी जास्त बोललो असेल थोडा उद्धटपणा आला असेल तर कृपया रागावु नका. माझी भावना केवळ मित्रत्वाच्या नात्याने सुचवणे इतकीच आहे त्याहुन वेगळी काहीच नाही.
24 Nov 2016 - 7:08 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मारवाजी ,आपल्या विस्तृत प्रतिसादासाठी आभारी आहे.नक्कीच प्रयत्न करुन पाहीन.
24 Nov 2016 - 8:20 pm | रेवती
सगळ्यांनी चांगले प्रतिसाद दिलेत. टफि, तुम्हाला आता बरे वाटत असावे अशी आशा.
फक्त एकच करू नका, ते म्हणजे अशा मानसिक अवस्थेत लग्न!
लग्न ही गोष्ट अडचणीत असताना करण्याची नसून जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर करण्याची आहे. हामेरिकेतलं फारसं माहित नाही पण भारतियांमध्ये हा विचार बरेचदा दिसतो की 'लग्न करून टाका, सगळे व्यवस्थित होईल'. संसारात प्रश्न उभे राहणं व ते सोडवणं वेगळं व आधीच गंभीर प्रश्न असताना, त्याच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या मुलीला/ मुलाला त्यात ओढून आणणं व त्या व्यक्तिच्या गळ्यात ती प्रश्नांची माळ घालणं अजिबात योग्य नाही. आनंदी होण्यासाठी लग्न करू नका, आनंदी असताना लग्न करा. कल्पना करा की, दुसरी व्यक्तीही बरेच अनुत्तरीत पण गंभीर मामले तिच्या पदरात बांधून लग्नाला उभी रहात असेल तर तुमच्या प्रश्नांची व्याप्ती किती मोठी होईल. मला असे म्हणायचे नाही की सगळे सतत आलबेलच असते. अगदी आनंदात लग्न करताना काही प्रश्न प्रत्येकाचे असणारच आहेत. फक्त ते कोणते असले तरी चालतील हे पहावे लागेल. बाबौ! हे लिहिताना कसंसं झालं हे कबूल करते.
24 Nov 2016 - 8:25 pm | सानझरी
अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च आलेलं.. ऊठसूठ लोक लग्नाचे सल्ले कसे काय देतात याचंच आश्चर्य वाटतं..
24 Nov 2016 - 8:38 pm | गामा पैलवान
सानझरी, मी गंमतीत दिलेला आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Nov 2016 - 11:18 am | सानझरी
फक्त तुम्हाला उद्देशून नाही बोल्ले हो मी. गैरसमज करून घेऊ नका. पण एकंदरीतच भारतात 'लाख दुखों की एक दवा' म्हणून लग्नाकडे बघीतल्या जातं आणि सगळीकडून लग्नाचे सल्ले यायला लागतात. नाखू म्हणताच तेच खरं - रोगा पेक्षा इलाज भयंकर. त्या मुलीची होणारी फरफट खाली रेवतीताईंनी लिहीलीच आहे.. असो..
25 Nov 2016 - 1:11 pm | गामा पैलवान
अहो, मीही ही सगळी गंमत धरून चाललो होतो. अचानक चर्चेने गंभीर वळण घेतलं. म्हणून म्हंटलं की आपला पवित्रा जाहीर केलेला बरा. तुम्ही केवळ निमित्तमात्र! :-)
आ.न.,
-गा.पै.
24 Nov 2016 - 8:44 pm | रेवती
होय गं, आणि बरेचदा त्या बिचार्या मुली पार म्हातार्या होईस्तोवर खस्ता खातात.
घरात कोणी बाईमाणूस नाही, मुलाचे व्यसन, डिप्रेशन वगैरे कारणांसाठी लग्न करणे म्हणजे त्या येणार्या मुलीसाठी किती मोठे प्रश्न आधीच तयार असतात. घरात असणारी तीन चार पुरुषमंडळी जर त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवू शकत नसतील तर बाहेरून आलेल्या व वयाने लहान असलेल्या मुलीने ते प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा असते त्यात ती पार पिचून जाते. घरात बाईमाणूस नसणे, म्हणजे गेलेले असणे हा प्रश्न त्या दुसर्या मुलीचा कसा असू शकतो?
तसेच व्यसनी, डिप्रेस्ड मुलाची मनस्थिती सुधारायला जर त्याचे जन्मदाते काही करू शकत नसतील तर झालेल्या गोष्तींना अजिबात कारणीभूत नसलेली मुलगी कशी काय जबाबदार असू शकेल?
मग मुलीचे आधीचे प्रेमप्रकरण, तिच्या घरातील कोर्टकज्जे, तिचे डिप्रेशन यांची किती जबाबदारी तो नवरा किंवा त्याच्या घरातील लोक्स घेणारेत? बरेचदा घेत नाहीत. अशावेळी लग्नाचा सल्ला देणे योग्य नाही.
24 Nov 2016 - 10:15 pm | एस
प्रचंड सहमत.
24 Nov 2016 - 11:23 pm | अभिजीत अवलिया
सहमत रेवती ताई
26 Nov 2016 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
24 Nov 2016 - 9:17 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
@रेवती,तुमचा मुद्दा पटतो .लग्न करुन समस्या वाढवून कुणा मुलीचं आयुष्य दावणीला लावण्याइतका मी असंवेदनशील नाही.it is like pushing the problem back to one step
24 Nov 2016 - 9:20 pm | माम्लेदारचा पन्खा
आपल्याला काहीच कळत नाही हेच ब-याचजणांना आयुष्यभर कळत नाही ....आणि तरीही ते मजेत जगतात....
तुम्ही ती उन्मनी अवस्था पार केलीत त्याबद्दल तुमचं अभिनंदन....
एकदाच मिळणारं आयुष्य यथेच्छ उपभोगून घ्या...कोणी लेकाच्यानं पुनर्जन्म पाहिलाय...परत बीएस्सीपर्यंत शिकणं हीच केवढी मोठी शिक्षा असेल....सोडून द्या हा विचार आणि मजेत रहा !
24 Nov 2016 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
@
››› टनाटन संघटनेत जा! ;) एंट्रिलाच ८०टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक म्हणून गौरविले जाल! =))
24 Nov 2016 - 10:10 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
माझी अध्यात्मिक पातळी १०५% आहे.टनाटन पाच ट्क्के कमी करुन देणार काय???
25 Nov 2016 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा
टफि, सॉरी हां. गंमत केली मी.
24 Nov 2016 - 10:10 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
माझी अध्यात्मिक पातळी १०५% आहे.टनाटन पाच ट्क्के कमी करुन देणार काय???
25 Nov 2016 - 2:00 am | गामा पैलवान
टफि,
मला वाटतं की जर तुमची अध्यात्मिक पातळी १०५ % असेल तर तुम्हाला उपरोक्त प्रश्नंच पडायला नकोत.
आ.न.,
-गा.पै.
24 Nov 2016 - 10:29 pm | तेजस आठवले
आपल्याला सल्ला द्यावा एवढी माझी पात्रता नाही. पण टोकाचे पाऊल उचलू नका." हे ही दिवस जातील" हे वाक्य सदैव मनाशी म्हणत राहा. केली जरी ज्योत बळेच खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे हे वचन लक्षात ठेवा.
जगातला प्रत्येक माणूस सर्वज्ञ नसतो. त्यामुळे तुम्हाला जरी असे वाटत असले कि तुम्हाला बऱ्याच गोष्टींमधले कळत नाही तरी ते तसे नाही हे लक्षात घ्या. सध्या माहितीचा विस्फोट झाला आहे त्यामुळे हे असे वाटणे बऱ्याच जणांना होते. सर्वच गोष्टींमधील बदल इतक्या झपाट्याने होत आहेत कि तो वेग सर्वानाच झेपतो असे नाही. आणि ज्यांना झेपतो त्यांची भरपूर दमछाक होते हे देखील तितकेच खरे आहे. तुम्ही एखाद्या छंदात मन का रमवत नाही? अगदी बिल्ले गोळा करण्यापासून बाजारात जाऊन जुन्या गोष्टी धुंडाळणे असा कुठलाही छंद घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे. चांगली पुस्तके वाचा. चांगले संगीत ऐका. कुठलेतरी संगीत असे नक्कीच असेल कि ते ऐकल्यावर तुम्हाला एकदम शांत वाटेल. खरंच ऐकत जा. चांगली लायब्ररी जॉईन करा.
अगदी महत्वाचे. कोणाशीही तुमची तुलना करू नका.आपले आयुष्य हे आपले आहे.बुद्धी, हुशारी, कष्ट ह्याबरोबर काही प्रमाणात नशीब ही लागते(हे माझे वैयक्तिक मत आहे), त्यामुळे तुमच्या कडे जे काही आहे त्याचा वापर करा असे मी सांगेन.नैराश्य आले तर परिस्थिती अजून बिघडेल. त्यामुळे कुठेतरी मन रमवणे गरजेचे आहे.
सूर्य तो सूर्यच, पण त्यामुळे पणतीचे महत्व कमी होत नाही. त्यामुळे आपण जे आहोत जसे आहोत त्याचा स्वीकार करा. चांगली अथवा वाईट परिस्थिती कधीच खूप वेळ राहत नाही हे पक्के ध्यानात ठेवा.
असो, खूप बौद्धिक घेतले कि काय असे वाटले. पण खरंच टोकाचे पाऊल नका उचलू. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या मनावरचे मळभ लवकर दूर होवो अशी सदिच्छा देतो.
24 Nov 2016 - 10:52 pm | चित्रगुप्त
धागाकर्त्याचे प्रांजळ निवेदन आणि प्रगल्भ प्रतिसाद सर्वच मननीय वाटले.
मित्र आणि आईवडील यांचेबद्दल फारसे कुणी लिहीलेले दिसले नाही. तुम्हाला अगदी खास, लहानपणापासूनचे मित्र आहेत का ? त्यांचेशी वारंवार भेटी, गप्पा, चर्चा होतात का ? आणि आईवडिलांशी कितपत आणि कसे संबंध आहेत ?
तुमच्या शेतावर एक झकास मिपाकट्टा करा आणि नवीन मित्र मिळवा, असेही सांगावेसे वाटते.
बाकी तथाकथित व्यवहारज्ञान नसलेले लोकच जास्त सुखी आणि समाधानी जीवन जगत असतात, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. बाह्यतः सुखात असलेल्यांची अंदरकी बात इतरांना कळत नसते, त्यांचेशी स्वतःची तुलना करण्याची काहीच गरज नाही.
25 Nov 2016 - 1:49 am | DeepakMali
तू चाल पुढं ... तुला रं गड्या भिती कशाची... पर्वा ती कोणाची... मस्त रहा तुमच्या टेन्शन घेण्याने कोणाला काही फरक पडत नाही.
25 Nov 2016 - 10:20 am | श्री गावसेना प्रमुख
धागा कर्त्याचा उद्देश साध्य झालेला आहे .
25 Nov 2016 - 3:41 pm | शलभ
+१
पण प्रतिसाद छान दिलेत लोकांनी.
25 Nov 2016 - 3:53 pm | श्रीगुरुजी
नानासाहेब,
इथल्या सदस्यांना काय ** समजता का? 'स्त्रिया पुरूषांचे अनुकरण का करतात', 'antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका', 'मुक्त लैंगिक व्यवहार स्वीकारल्यास बलात्कार थांबतील का' असले धागे काढताना भरपूर डोके चालते, असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता, गोंदवल्याला जेवताना जानवे बघतात असले खोडसाळ आरोप करताना उकळ्या फुटतात आणि आता "मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????" असले फालतू धागे काढून गंमत बघता काय?
26 Nov 2016 - 12:36 am | संजय क्षीरसागर
विचारच करु शकत नाही असं आहे का?
मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.
हे तर त्यांनी स्वतः कबूल केलंय. त्यावर "असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता " हा व्यक्तिगत आकसातून आलेला शेरा वाटतो.
दोन गोष्टी प्रकर्शानं जाणवल्या. मागे सोन्याबापूनी म्हटलं होतं की इथे काही आयडी अमरपट्टा घेऊन आलेत. आणि सोत्री म्हणाला होता की, इथे `काय लिहीलंय' याच्याऐवजी `कुणी लिहीलंय' हे पाहिलं जातं.
26 Nov 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी
त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अवतारात निर्माण केलेले धागे व त्यांचे वेगवेगळ्या धाग्यांवरील प्रतिसाद बघा. त्यातून त्यांचे व्यवहार ज्ञान व तिरपागडे चालणारे डोके दिसून येते. माईसाहेब या अवतारातून दिलेले सभ्य प्रतिसाद बघा. त्यांचे धागे व प्रतिसाद हे अजिबात बिनडोक माणसाचे धागे व प्रतिसाद नाहीत. त्यांच्या जातीयवादी व शिवराळ भाषेमुळेच त्यांचे अनेक आयडी बॅन झाले आहेत. आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत.
26 Nov 2016 - 6:10 pm | सामान्य वाचक
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला
तुम्ही पण धागा एन्जॉय करा
आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
26 Nov 2016 - 6:10 pm | सामान्य वाचक
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला
तुम्ही पण धागा एन्जॉय करा
आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
26 Nov 2016 - 6:14 pm | सामान्य वाचक
तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला
तुम्ही पण धागा एन्जॉय करा
आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही
26 Nov 2016 - 10:24 pm | संजय क्षीरसागर
आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत.
तसं संपादकांना वाटलं तर ते धागा डिलीट करतील . अर्थात काही सदस्यांच्या कितीही व्यक्तिगत कमेंटस इथे कशा चालतात हे आश्चर्य आहे .
26 Nov 2016 - 6:37 pm | अन्कुश शिन्दे
मानस यांची मुलाखात वाचा... , ते व्यसनाच्या मगरमिठीतून कसे सुटले ..हे वाचले कि आपले अपयश तुच्छ वाटून जगण्याचा अर्थ काढण्यास मदत होईल
26 Nov 2016 - 6:39 pm | अन्कुश शिन्दे
मिपावरच त्याचा धागा आहे.
27 Nov 2016 - 6:58 am | Ram ram
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन बिमीन दान करून टाका, बिनडोक लोकसंख्या फार वाढू लागली हो.
27 Nov 2016 - 9:26 am | Ram ram
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन बिमीन दान करून टाका, बिनडोक लोकसंख्या फार वाढू लागली हो.
27 Nov 2016 - 6:17 pm | निओ१
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
do it. असे म्हणालो असतो, पण ते करण्याआधी काही गोष्टीचा विचार नक्की करा. आपण म्हणजे आपले जग नाही आहे, आपण ज्यांच्यासोबत आहोत, जे आपले आहेत त्या सर्वांचा एकदा विचार करा व मग वाटलेच तर..
पण मला खात्री आहे, असा मुर्खपणा एखादा विचारी व्यक्ती नक्कीच करु शकत नाही. अडचणी कोणाला येत नाहीत? अगदी गरिबातील गरिब आणि टाटा यांना देखील. बातम्या वाचत आहात ना? थोडा धीर धरा. एवढे म्हणावे म्हणतो आहे, कारण प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे काळ आहे.
28 Nov 2016 - 3:29 am | निनाद
बहुदा तुमच्या आजुबाजुला असे कोणीतरी आहे की जे तुम्हाला हा न्युनगंड आणते आहे.
तेव्हा संगत बदला!
जे कोणी लोक सल्ले देताना 'तुम्ही किती मुर्ख आहात' असा आव आणत असतील त्यांना टाळा.
'कुणी, किती, कसा सहज पैसा कमावला' वगैरे चर्चा चालल्या असतील तर त्यापासून चार हात दूर रहा!
फक्त आनंदी आणि पॉझिटिव्ह विचारांचे लोक शोधा. त्याच लोकांमध्ये जाणीवपुर्वक मिसळा. (कितीही आमंदी असले तरी व्यसनी मात्र नकोत.) नाही मिळाले तर तर आपणच आनंदी कसे राहता येईल याचा विचार करा.
रोज किमान दोन चांगल्या झालेल्या गोष्टी झोपताना आठवा.
शेती आहेच तर त्यात लक्ष घाला ते आनंददायी कार्य आहे. स्वत:च्या खाण्यासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची बाग बनवा. त्यातून स्वतः (मजूर न लावता) भाजीपाला काढा. त्यात केव्हढा आनंद आहे!
28 Nov 2016 - 3:31 am | निनाद
आणि दीर्घ कालीन उपाय योजना म्हणून, कोणत्याही एका साध्या - अगदी साध्या - गोष्टीत जाणीवपुर्वक तज्ञता (एक्स्पर्टाईज) आणा.
28 Nov 2016 - 12:50 pm | आनन्दा
बाकी माहीत नाही, पण डांगेअण्णांकडे पहा एकद.. ते देखील अश्याच वाईट परिस्थितीतून गेले आहेत एकदा..
28 Nov 2016 - 1:26 pm | संदीप डांगे
आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं धिरडं करता राव...!!!!!!
आत्महत्येचा विचार सोडला तर बाकी काय कॉमन दिसतंय दादा????