नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
प्रतिक्रिया
28 Nov 2016 - 7:32 pm | मोदक
>>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत). तसा मी बक्कळ शिकलो आहे.
या गोष्टींमध्ये साम्य असावे. :))
(आनंदा यांचा प्रतिसाद अस्थानी वाटला.)
28 Nov 2016 - 9:13 pm | संदीप डांगे
हा हा हा! मी 36 वर्षाचा 'तरुण' असून केस पांढरे होणे वयाच्या 20 व्या वर्षीच अलमोस्ट झाले आहे.. =))
30 Nov 2016 - 8:58 pm | कपिलमुनी
कोणी पत्ता मागतय तर कोणी बायोडाटा !
मोदककाका फुल्ल डिमांड मधे !
28 Nov 2016 - 11:42 pm | पिलीयन रायडर
=))
का टफिला लोक मनावर घेताहेत काय कळत नाही. पण तुम्हाला त्या रांगेत अनावधानाने का होईना बसवलेलं पाहिलं, धन्य झाले मी!
28 Nov 2016 - 11:47 pm | पैसा
चार्ज संपला काय? एखादा काथ्याकूट काढा. तुमचे सगळे प्रॉब्लेम नाहिसे होतात का नाही बघा!
29 Nov 2016 - 12:17 am | मोदक
काथ्याकुटाला विषय - सीतेने रामाकडून पोटगी घ्यायला हवी होती का?