माझ्या प्रेमाचे मनोगत

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
12 Nov 2016 - 10:43 pm

कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे..
प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे..

कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे..
काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे..

कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे..
मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे..

कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे..

कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी..
चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी..

कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे..
तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे..

कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे..
माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे..

कधी वाटे मला जणु आयुष्य तुझे सजवावे..
आनंदाच्या चिंब लहरींत चित्त तुझे भिजवावे..

कविताचारोळ्याप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 11:14 pm | सतिश गावडे

ओ, जीव आवळून कसे चिडतात?

डोळे पाणवून रडतात तस्सेच! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Nov 2016 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सदा सर्वदा योग तुझा घडावा च्या चालीत फिट्टं बसते कविता.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2016 - 4:06 am | चित्रगुप्त

कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..

तिकडे सरजींनी काय करावे हे एवढे जीव तोडून सांगितले, तरी पालथ्या घड्यावर पाणी.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2016 - 6:09 am | अत्रुप्त आत्मा

माझे प्रभातीचे मनोगत

कधी वाटे मजला पोट धरून बसावे..
प्रभातकाळी जाऊन, जोर लाउन कुंथावे..

कधी वाटे मजला पोटावर पालथे पडावे..
का "होत नाही"? विचार करूनी , उशीला पोटी आवळावे..

कधी वाटे मजला आत तसले पुस्तक पहावे..
मुठीत घेऊन .. . जीवं,बाहेर काही ऐकू न जावे..

कधी वाटे मला जणु प्रेशर येई पर्यंत खावे..
जोरात आली कळ-निर्मळ, की.. पळत जाउन बसावे..

कधी वाटे मजला डबड्या'ला लाथ लागावी..
दुसय्रांची सिग्रेटची थोटकं त्यात वाहून जावी..

कधी पहाटे वाटे जणु पोटात कळवळून यावे
त्यासाठी आदल्या रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे..

कधी पहाटे ग्गार वाय्रात गच्चीत जाऊन बुळकावे..
कुणी येण्याआधी तिरक्या वाटेने पाईपावरून सुळकावे..

कधी वाटे मला जणु दुसय्रांना रोज चिडवावे..
काव्य-होत नसेल तरी, कुंथून कुंथून काढावे..
================
लेखनविषय::
कुंथनकविता, परगोलॅक्सच्या गोळ्या, प्रभात'काव्य.
-------------------

प्रेषक, दु. स. य्रांचीहजामत.

प्रचेतस's picture

13 Nov 2016 - 8:41 am | प्रचेतस

बुवा इज ब्याक =))

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2016 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा

बुवा इज हॅक! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2016 - 8:53 am | अत्रुप्त आत्मा

आगोबा इज हॅक! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

नाखु's picture

14 Nov 2016 - 8:47 am | नाखु

ह. मौन सोडले. सारी सोहमाची किमया !!!

अता को$हम असे म्हणणार्या मिपाकरांच्या विश्वमंडळाताला बारका ठिपका नाखु

किसन शिंदे's picture

13 Nov 2016 - 10:49 am | किसन शिंदे

ह्हीह्हीह्ही

ब-याच दिवसांनी हं बुवा. =))

सोहम कामत's picture

17 Nov 2016 - 12:02 pm | सोहम कामत

धन्यवाद...

सस्नेह's picture

17 Nov 2016 - 2:45 pm | सस्नेह

कुणाला ?

अजया's picture

17 Nov 2016 - 3:56 pm | अजया

बुवांना!!
बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना.... ह.कविता! शिष्योत्तम नाही आले वाटतं अजून.का मागे उभे आहेत डबडे घेऊन!

सतिश गावडे's picture

17 Nov 2016 - 5:04 pm | सतिश गावडे

मागे उभे आहेत =))

पैसा's picture

19 Nov 2016 - 11:22 pm | पैसा

रिस्क का घेतो?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2016 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना.

खपलो, मेलो, वारलो. = ))

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

19 Nov 2016 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना.... ››› =)) ल्लुल्लुल्लुल्लु ! =)) प्रेशरंही यावं लागतं वरून.. तसच! =)).

प्रचेतस's picture

21 Nov 2016 - 5:57 am | प्रचेतस

=))

माझ्या प्रेमा-चे मनोगत, -ची मायबोली, -चा उपक्रम, -चा मिसळपाव, -ची अक्षरे इ. इ. छान आहे. आवडले.