✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या प्रेमाचे मनोगत

स — सोहम कामत, Sat, 11/12/2016 - 22:43
कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे.. प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे.. कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे.. काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे.. कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे.. मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे.. कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे.. नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे.. कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी.. चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी.. कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे.. तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे.. कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे.. माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे.. कधी वाटे मला जणु आयुष्य तुझे सजवावे.. आनंदाच्या चिंब लहरींत चित्त तुझे भिजवावे..

प्रतिक्रिया द्या
5693 वाचन

💬 प्रतिसाद (19)

ओ, जीव आवळून कसे चिडतात?

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 23:14 नवीन
ओ, जीव आवळून कसे चिडतात?
  • Log in or register to post comments

डोळे पाणवून रडतात तस्सेच! =))

यशोधरा
Sat, 11/12/2016 - 23:33 नवीन
डोळे पाणवून रडतात तस्सेच! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सदा सर्वदा योग तुझा घडावा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/12/2016 - 23:25 नवीन
सदा सर्वदा योग तुझा घडावा च्या चालीत फिट्टं बसते कविता.
  • Log in or register to post comments

काय करावे

चित्रगुप्त
Sun, 11/13/2016 - 04:06 नवीन
कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे..
तिकडे सरजींनी काय करावे हे एवढे जीव तोडून सांगितले, तरी पालथ्या घड्यावर पाणी.
  • Log in or register to post comments

माझे प्रभातीचे मनोगत

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2016 - 06:09 नवीन
माझे प्रभातीचे मनोगत कधी वाटे मजला पोट धरून बसावे.. प्रभातकाळी जाऊन, जोर लाउन कुंथावे.. कधी वाटे मजला पोटावर पालथे पडावे.. का "होत नाही"? विचार करूनी , उशीला पोटी आवळावे.. कधी वाटे मजला आत तसले पुस्तक पहावे.. मुठीत घेऊन .. . जीवं,बाहेर काही ऐकू न जावे.. कधी वाटे मला जणु प्रेशर येई पर्यंत खावे.. जोरात आली कळ-निर्मळ, की.. पळत जाउन बसावे.. कधी वाटे मजला डबड्या'ला लाथ लागावी.. दुसय्रांची सिग्रेटची थोटकं त्यात वाहून जावी.. कधी पहाटे वाटे जणु पोटात कळवळून यावे त्यासाठी आदल्या रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.. कधी पहाटे ग्गार वाय्रात गच्चीत जाऊन बुळकावे.. कुणी येण्याआधी तिरक्या वाटेने पाईपावरून सुळकावे.. कधी वाटे मला जणु दुसय्रांना रोज चिडवावे.. काव्य-होत नसेल तरी, कुंथून कुंथून काढावे.. ================ लेखनविषय:: कुंथनकविता, परगोलॅक्सच्या गोळ्या, प्रभात'काव्य. ------------------- प्रेषक, दु. स. य्रांचीहजामत.
  • Log in or register to post comments

बुवा इज ब्याक =))

प्रचेतस
Sun, 11/13/2016 - 08:41 नवीन
बुवा इज ब्याक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा इज हॅक!

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2016 - 08:51 नवीन
बुवा इज हॅक! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आगोबा इज हॅक!

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2016 - 08:53 नवीन
आगोबा इज हॅक! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवांनी

नाखु
Mon, 11/14/2016 - 08:47 नवीन
ह. मौन सोडले. सारी सोहमाची किमया !!! अता को$हम असे म्हणणार्या मिपाकरांच्या विश्वमंडळाताला बारका ठिपका नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्हीह्हीह्ही

किसन शिंदे
Sun, 11/13/2016 - 10:49 नवीन
ह्हीह्हीह्ही ब-याच दिवसांनी हं बुवा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धन्यवाद...

सोहम कामत
गुरुवार, 11/17/2016 - 12:02 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

कुणाला ?

सस्नेह
गुरुवार, 11/17/2016 - 14:45 नवीन
कुणाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोहम कामत

=))

अजया
गुरुवार, 11/17/2016 - 15:56 नवीन
बुवांना!! बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना.... ह.कविता! शिष्योत्तम नाही आले वाटतं अजून.का मागे उभे आहेत डबडे घेऊन!
  • Log in or register to post comments

मागे उभे आहेत =))

सतिश गावडे
गुरुवार, 11/17/2016 - 17:04 नवीन
मागे उभे आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

रिस्क

पैसा
Sat, 11/19/2016 - 23:22 नवीन
रिस्क का घेतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/19/2016 - 17:31 नवीन
>>>>> बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना. खपलो, मेलो, वारलो. = )) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

@बर्याच दिवसात झाली नव्हती

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/19/2016 - 23:09 नवीन
@बर्याच दिवसात झाली नव्हती वाटतं बुवांना.... ››› =)) ल्लुल्लुल्लुल्लु ! =)) प्रेशरंही यावं लागतं वरून.. तसच! =)).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=))

प्रचेतस
Mon, 11/21/2016 - 05:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

माझ्या प्रेमा-चे मनोगत, -ची

एस
Sun, 11/20/2016 - 00:21 नवीन
माझ्या प्रेमा-चे मनोगत, -ची मायबोली, -चा उपक्रम, -चा मिसळपाव, -ची अक्षरे इ. इ. छान आहे. आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा