गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
प्रतिक्रिया
28 Sep 2016 - 9:46 pm | Vishvnath Shelar
Band Of Boys che "Meri Neend Ud Gayi Hii...& Altaaf Raja chi pn athavn theva.....bhavanno...."Tum Toh Thehre Pardesi..., Toh Ghungaru Bandh Liye & Apna Usse Banaya he pn changle gaane hote
28 Sep 2016 - 11:39 pm | टवाळ कार्टा
ले गयी दिल मेरा मंचली
खलीवली खलीवली खलीवली
29 Sep 2016 - 11:26 am | एस.योगी
'एक से बढकर एक' - सूत्र संचालन 'कार्तिकी राणे'
29 Sep 2016 - 11:48 am | अभ्या..
हा. त्यात मुकुल देव होता. असे टॉप टेन प्रोग्राम्स हेच इंडीपॉपचे लाँचपॅड होते.
29 Sep 2016 - 11:54 am | अभ्या..
वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत गणेश हेगडे राहिला. त्याचा 'मै दिवाना' वगैरे गाण्यावरचा डान्स बरा होता. शूटिंग आणि प्रेझेंटेशनला पैकी मार्क.
रागेश्वरीचा 'हा ये दुनिया बडी रंगीली" वन साँग वंडर होता.
गणेश आचार्यचा पण एक अल्बम होता बहुधा.
कमाल खानचा पण ओ ओ ओ जानेजा हे अल्बममधलेच हिट होते, नंतर पिक्चरात आले.
काही काळ कॅनेडिअन्/ब्रिटिश पंजाबी रेगा/रॅप/पॉप वाल्यानी डोके उठवले होते.
हार्ड कौरचे 'एक गलासी' आधी बरे वाटले, नंतर तिचे उचके चाळे आणि जॉनी गद्दार मधले गाणे बघुन ऐकवत नाही.
29 Sep 2016 - 12:14 pm | एस.योगी
रागेश्वरी चे 'मेरे मेहबूब चल और कही' लैच सेंटीमेंटल होते राव...
क्लायमॅक्स मस्तच ....
29 Sep 2016 - 12:20 pm | नया है वह
Pankaj Sarawgi
Pyar Hai Tumse...
29 Sep 2016 - 12:06 pm | टवाळ कार्टा
निगोडी कैसी जवानी है झालयं का वर?
29 Sep 2016 - 12:12 pm | शरभ
:))
-शरभ
29 Sep 2016 - 12:16 pm | एस.योगी
स्टिरिओ नेशन चे 'डोन्ट ब्रेक माय हार्ट' राहिले की ....
29 Sep 2016 - 12:17 pm | एस.योगी
'म्युझिक एशिया चॅनल'वर न चुकता रोज सकाळी लागायचे
29 Sep 2016 - 12:25 pm | एस.योगी
बाबोव ......
'ऐका दाजीबा' राह्यलंय की जणू...
29 Sep 2016 - 12:32 pm | बांवरे
सोनू निगमचे : https://www.youtube.com/watch?v=OVI6Uzh5Las - तूऽऽ
https://www.youtube.com/watch?v=J8zlroVMYeM : दिवाना तेरा.
अमिताभ मियांचे : https://www.youtube.com/watch?v=P9J0-Al3odo - एक रहेन ईर
शुभा मुद्गल : https://www.youtube.com/watch?v=CsN9MAfsGIM&list=PL8FAgeC0DYXDWl7DxPryTb... - अब के सावन ऐसे बरसे.
आशा भोसले : https://www.youtube.com/watch?v=3JnXgAtt34M जानम समझाकरो
https://www.youtube.com/watch?v=k5JKlkHWxGg : केसरिया है रूप म्हारो.
आणि लई म्हत्वाचे : https://www.youtube.com/watch?v=smDKvkkoWpM रूप तेरा मस्ताना रिमिक्स ..
29 Sep 2016 - 2:03 pm | वाह्यात कार्ट
कोई ख्वाब में रोज आता है - अलका याग्निक- https://www.youtube.com/watch?v=1HoNaEO8B9w
दिल था यही अभी अभी - अलका याग्निक - https://www.youtube.com/watch?v=5X_dKdMFJQA
मुझे मोहोब्बत सी हो गायी है- रूपकुमार राठोड - https://www.youtube.com/watch?v=tzCNtjGFSVQ
हू हल्ला हू - अनयडा - https://www.youtube.com/watch?v=Pkr61XiYt64
चांदी जैसा रंग है तेरा - पंकज उधास - https://www.youtube.com/watch?v=2FEpust-rXw
मेहेंदी की रात आयी - https://www.youtube.com/watch?v=OVZRS8oWMN8
इश्क मेरा तडपावे - सुखबीर - https://www.youtube.com/watch?v=AKmq8Xqr03A
आणि हे एक "संस्मरणीय" गीत
हंगामा हंगामा संजय रैना - https://www.youtube.com/watch?v=xB-r-X_xTF8
29 Sep 2016 - 2:05 pm | नीलमोहर
बहुतेक आवडती गाणी वर आलीत, अजून काही,
आजा सोणेया, घर आजा सोणेया, शाझिया मंझूर
http://youtu.be/JuTnKaCwBGY
पहले तो कभी कभी गम था, अल्ताफ राजाचं हे एकमात्र आवडणारं गाणं,
http://youtu.be/TfELfvs92Gg
कभी तो नजर मिलाओ, भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना,
मुझको भी तो लिफ्ट करा दे, अदनान सामी
मेरी मर्जी आणि इतर, देवांग पटेल,
ऑफिसमध्ये ऐ राजू, सारखं वाजवून वात आणला होता लोकांनी, मग कुणालाही राजू बनवलं जायचं :)
http://youtu.be/Zh9CuOpQqLU
हे तर अहाहा, सुंदर !!
http://youtu.be/EbPVTxLiKm8
29 Sep 2016 - 2:34 pm | गिरिजा देशपांडे
व्वा मस्त धागा!!! एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या :) यात माझे पण दोन पैसे
याच काळात हरभजन मान चे दोन गाणे खूप गाजले
1) लाली लाल दुपट्टे वाली
2) कुडी कट के कालजा ले गायी (ओये होये नावाचा अल्बम होता.)
आणि शुभा मुद्गलचं सीखो ना नैनो कि भाषा पिया पण फार आवडायचं
29 Sep 2016 - 2:37 pm | गिरिजा देशपांडे
आणि हो धाग्यासाठी धन्यवाद!!!! वा.खू.सा.आ.
30 Sep 2016 - 5:24 pm | धर्मराजमुटके
मजा आली. बहुतेक सर्वच अल्बम मधील नायिका एकाचवेळी सुंदर, निरागस आणि ...... कशा काय बुवा दिसू शकतात ? तो जमानाच वेगळा होता काय ? की आमची नजरच वेगळी होती ? :)
अवांतर : आमचा जमाना, तुमचा जमाना म्हणजे वय झाल्याची खुण आहे असे इथे कोणीतरी म्हटले होते बुवा.
15 Oct 2016 - 12:37 am | अनिरुद्ध.वैद्य
व्हिडिओ आहे का? तुनळीवर बराच शोधला, पण सापडत नाहीये.
15 Oct 2016 - 5:22 pm | शिद
16 Oct 2016 - 10:27 am | बोका-ए-आझम
हा व्हिडिओ दिल्याबद्दल!
18 Oct 2016 - 6:38 am | मी_आहे_ना
बर्याच दिवसान्नी मिपाला भेट द्यावी आणि असा धागा मिळावा म्हणजे क्या कहने!! १९९० चे दशक म्हणजे नुकतेच सगळीकडे कलर टीव्ही/ केबल टीव्ही आलेले, सोनी / झी इ. वाहिन्या आपले पाय रोवत होत्या आणि आपल्यासारखे १९८०च्या आसपास जन्मलेले 'टीन एजर' बनत होते ते सोनेरी दिवस मोरपिसान्सारखे जपून ठेवण्यासाठी. 'हवा हवा ए हवा' सारखं उडत्या चालीचं गाणं ओझरतं ऐकायला मिळालं होतं पण ती पुढे बदलणार्या हवेची चाहूलच होती. दलेर मेहंदी, बाबा सेहगल, शुभा मुदगल, उषा उथप, लेस्ली लुविस ह्यांनी ठेका धरायला शिकवलं आणि त्यात भर पडली ती सोनू निगम, फाल्गुनी पाठक, जगजीत सिंग, आशा - लता आणि आपल्या मराठ मोळ्या मिलिंद इंगळे ची. डबल कॅसेट प्लेअर वर गाणी कॉपी करायची आणि मित्रांमधे शेअर करायची. कॅसेट टेप तुटली किंवा गुंडाळली की अलगदपणे काढून जोडून पेन्सिलिनी परत गुंडाळणे आणि काही डेटा लॉस न होता गाणी ऐकायला मिळणे म्हणजे एखादा किल्ला काबीज झाल्याचा आनंद होई.
आधीच इतकी कमलपुष्पे उमललेली पाहून आनंद झाला आणि अर्थातच उजळणीही झाली. काही पुष्पे मझ्याकडून - चन्ना वे घर (कुणाल गांजावाला), पुरानी जीन्स, निगोडी कैसी जवानी (इला अरूण), यारोन (के के), गुर नालो इश्क मिठा, चुपके चुपके (पंकज उदास) ......