गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
प्रतिक्रिया
27 Sep 2016 - 4:48 am | मराठमोळा
मस्त धागा..
मी अजुनही बर्याचदा ही सगळी गाणी अधून मधून तुनळीवर पाहतो, ऐकतो. तुनळीला अशा सर्व गाण्यांसाठी मनःपूर्वक धन्यवाद द्यावेसे वाटतात.
माझी काही आवडती गाणी
१. डुबा डुबा रहता हुं
२. तनहा दिल तनहा सफर
३. ए सनम मेरे प्यार मे तेरे मुझको जीना मरना है
४. मेड ईन ईंडीया
५. बुम बुम
६. ओ सनम तेरी यादो की कसम
७. मैने चुनरी है लहरायी
८. सोनु निगमचा पुर्ण दीवाना आल्बम
९. अब के सावन ऐसे बरसे
१०. अनामिका चे 'कही करता होगा वो मेरा ईतजार' रिमिक्स
११. परी हुं मै
१२. पिया बसंती रे काहे सताये आजा - चित्रासाठी जोरदार टाळ्या
१३. ईधना विनवा आणि ये किसने जादू किया
१४ भीगी भीगी रातो मे
१५. रागेश्वरी चे ये दुनिया बडी रंगीली
१६. धुम पिचक धुम
आणखी बरीच आहेत .. :)
एक गाणं खुप शोध घेउनही मिळालं नाही - 'ए भाई तू क्यो उदास है, तेरा मन क्यो निराश है जो डराये तेरे मन को उसकी बात ना मान. सब जंतर मंतर है.. बाबा रे बाबा.' - कुणाला मिळाले तर सांगा.
'एक से बढकर एक' नावाची एक गाण्याची सिरियल यायची त्यात कांतीभाई नावाचे कॅरॅक्टर (मारा पिसा मन्ने दे दे) आठवतेय. त्यातही ही गाणी बर्याचदा दाखवायचे.
तसेच नंतरच्या काळात बरेच रिमिक्सही गाजले होते.. माझा फेव्रेट रिमिक्स आल्बम होता U M I - 10. सुंदर रिमिक्स.(व्हिडीओ बद्दल बोलत नाहीये ;) )
28 Sep 2016 - 12:03 pm | ओसु
सब जंतर मंतर है.. बाबा रे बाबा
https://youtu.be/w38_T-XlXk4
नुकतेच तू-नळी वर मिळाले
मस्त धागा, थोडा हळवा झालो :)
27 Sep 2016 - 7:22 am | मनिमौ
त्याच बोलो ता रा रा रा.
इला अरूण च दिल्ली शहर मे मारो घागरो ज्यो घुमायला ही गाणी पण भन्नाट
माझ्याकडे आहे सा नि ध प गाण हवे असल्यास सांगा
27 Sep 2016 - 7:22 am | मनिमौ
त्याच बोलो ता रा रा रा.
इला अरूण च दिल्ली शहर मे मारो घागरो ज्यो घुमायला ही गाणी पण भन्नाट
माझ्याकडे आहे सा नि ध प गाण हवे असल्यास सांगा
29 Sep 2016 - 11:41 am | एस.योगी
हर तरफ तेरा जलवा - लिसा रे एकदम मस्त
27 Sep 2016 - 7:30 am | माम्लेदारचा पन्खा
गोविंदाचा अल्बम, अमिताभचा एबीबेबी....देवांग पटेल नामक प्राण्याचे अल्बम.....
जावेद जाफरीचा मुंभाय ही कडी होती !
27 Sep 2016 - 8:07 am | कैलासवासी सोन्याबापु
मुंभाय बहुदा बॉम्बे बॉयस सिनेमातील एक ट्रॅक होता.
अमिताभच्या अल्बम मधील एक रहें ईर एक रहें बीर एक रहें फत्ते एक रहें हम हे भोजपुरी गाणे तुफान होते, वेदांग पटेल हा फक्त पॅरोडी अल्बम काढत असे माझ्या माहितीनुसार, तसेच गोविंदावर चित्रित "स्टॉप दॅट" अन "मेरी मर्जी" ही हिट गाणी देवांग ने गायली असावीत असे वाटते
27 Sep 2016 - 8:29 am | माम्लेदारचा पन्खा
कड दित्ती जान, पीली स्कर्टवाली लडकी वगैरे....पण ते बोंबललं...
27 Sep 2016 - 9:06 am | टवाळ कार्टा
गोरी 'तेरी आंखे कहे, के रात भर सोयी नही
अपाचे इंडिअनचे चॉक दे
27 Sep 2016 - 9:34 am | महासंग्राम
आमच्या अल्ताफ राजा ची आठवण नाही काढली राव श्या... काय एक से एक दर्दी गाणी होती.
तुम तो ठेहरे परदेसी
जा बेवफा जा
पहले तो कभी कभी गम था
दिल का हाल
आंख हि ना रोई है दिल भी
पंगा ले लिया
एक से एक गाणी ऐकतांना कायम असं वाटतं कि आपलाच ब्रेकडाऊन झालाय. रच्याकने आजही गावाकडे हि गाणी ऑटोमध्ये वाजतात.
27 Sep 2016 - 10:13 am | गणामास्तर
वडाप च्या जीपड्यांमध्ये आजही अगम कुमार निगम ची 'बेवफाई' आणि 'फिर बेवफाई' वाजत असतात.
हे महाशय अजून सुद्धा अल्बम काढतात,अर्थात नावामध्ये बेवफाई असतेच असते. लोकांना दर्द देण्यात अल्ताफ राजाचा बाप आहे हा माणूस :)
रच्याकने, यांचाच सुपुत्र म्हणजे सोनू निगम.
27 Sep 2016 - 10:51 am | अनिरुद्ध.वैद्य
म्हणणार होतो!
27 Sep 2016 - 12:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमच्या कल्चरल नाईटला मी ते "वो माह जनवरी था.... पासून ते वो साल दुसरा था ये साल दुसरा है" पर्यंत खेचले होते प्रकरण! पोरे बुंगाट झाली होती.
29 Sep 2016 - 10:39 am | साहेब..
मस्त आहे. म्हणताना मस्त वाटते एकदम.
अल्ताफ राजा एक नंबर आहे
29 Sep 2016 - 11:45 am | एस.योगी
आमच्या पण कल्चरल ला एकाने सुरु केले होते..
पण मार्च पर्यंत आला आणि त्याला आम्ही स्टेजवरुन अक्षरशः उचलून बाहेर फेकला
27 Sep 2016 - 10:11 pm | आदूबाळ
अल्ताफ राजा एक नंबर आहे!
27 Sep 2016 - 10:22 am | टिके
धागा काढल्याबद्दल धन्यवाद !! एकदम नॉस्टॅल्जिक झालो !!
अजून गाणी येऊ द्या !!
27 Sep 2016 - 10:46 am | पुजारी
अरे भावांनो, जोजो च " वो कौन थी " विसरलात का ?
https://www.youtube.com/watch?v=efX9tssirYo
27 Sep 2016 - 11:44 am | गुंड्या
मस्तच आहे! पण वन हिट वंडर झाला जोजो...
27 Sep 2016 - 10:55 am | विनू
युफोरिया आणि सुलतान खान अजुनही रोज एकतोय
27 Sep 2016 - 10:59 am | पुजारी
एकेकाळचा गुणी गायक "अभिजित भट्टाचार्य " चे "लोहे कि तू ना बनी " पण चांगले होते.
27 Sep 2016 - 11:10 am | अमित मुंबईचा
"सावन में लग गायी आग" एका चित्रपटाची कथा एका गाण्यात चित्रित केली आणि त्याच मान हलवून नाचणं जबरा ...
27 Sep 2016 - 11:11 am | गुंड्या
प्रतिसादातली सगळीच गाणी मस्त आहेत! आणखी एक हरवलेलं नाव म्हणजे मेह्नाझ. कालच तिचा मौसम हा संपूर्ण अल्बम गाना.कॉम वर मिळाला! मौसम च टायटल ट्रॅक आणि व्हिडीओ दोन्ही सुरेख आहेत. स्ट्रिंग्ज हा तर माझा अतिशय लाडका बॅन्ड! दूर आणि धानी हे अल्बम कधीही आणि कितीही वेळा ऐका!
27 Sep 2016 - 11:20 am | मारवा
इला अरुण चे सरसो के खेतो मे पहला उजाला मार डाला मार डाला तेरी ( त्यातला एक फ्रंट ला नाचणारा चकणा होता असे शिरीष कणेकरांनी शोधुन दाखवले होते.) इला अरुण च्या एका गाण्यात चक्क गे कपल वर गाण दाखवलेल होत. त्या काळाच्या मानाने जास्तच थोडस एक तरल अॅबस्ट्रॅक्ट लेस्बीयन थीम असलेल गाण होत फाल्गुनी पाठकच फोटोतुन सुंदरी उतरते परीकथेत झाकलेल होत.
सय्योनी चैन एक पल नही और कोइ हल नही इइइइइइइ सय्योनी..ईईईईईईईईईईईईईईई मस्त आर्त ताणुन खेचायचा अस्वस्थता घेरुन टाकायची मग गिटार चा जबरद्स्त तुकडा यायचा. दिल दहेला देने वाला म्युझिक लिरीक्स
शान च गाण तर ग्रेटच होत
तनहॉ दिल तनहा सफर फिर क्यु उसे डुंढे नजर तनहॉ दिल....
त्यानंतर नुकताच शान जो इथे आज उनसे मिलना है हमे मध्ये भेटला तर तस्साच गोड वाटला. शान एकदम छान
नंतर तो ट्रेन मध्ये ब्रश करता करता तो बंगाली कोण
मायरी मायरी त्याचे बोल कधीच कळले नाहीत सुरुवातीचे पण गाण झकास होत.
तो एक पाण्याखाली वाजवणारा बॅन्ड होता सिल्वर रुट ना
डुबा डुबा रहता हु
जिजाजीकडे आलेली प्रेमात पडलेली प्रिती जांगियानी छुइ मुइ सी तुम लगती हो प्यारी प्यारी दिखतीहोत.
सुरुवात ज्यापासुन झालेली ते मेड इन इंडिया पण स्टायलीश आणि ग्लॅमरस होत. सध्या म्हातारा दिसणारा मिलिंद सोमण तेव्हा चांगला दिसायचा.
शुभा मुग्दल ची गाणी पण जबर होती. पुरानी जीन्स और गिटार मोहल्ले की छत और मेरे यार हे बहुधा त्या काळातलच एक झकास गाण होत . परी होती रागेश्वरी होती.' एकुण फ्रेश काहीतरी नविन करण्याचा काळ होता. कॉपी होती प्रयोग होते पण मजा येऊन गेली.
एक मात्र कोणी फार प्रतिभाशाली नव्हता एक एक प्रयोगापुरता वेगळा व छान होता.
बाबा सहगल रॅप केल नविन छान वाटल
शंकर महादेवनने श्वास रोखुन दाखवला जे शास्त्रीय संगीतातली नॉर्मल बाब आहेत. पण मजा आली कारण त्याचे लिरीक्स मस्त होते वेगात होते इन्टेसीटी त्या स्पीड ची मजा यायची.
अल्प मर्यादीत प्रतिभेचा शाप या सर्वांनाच होता फार थोडे वक्त की कसौटी पे टीक सके
शान शंकर अजुन आहेत कारण त्यांच्यात ती प्रतिभा होती. दम होता.
पण एक छोटा काळ एक लाट आली छान भिजवुन गेली.
याच्यावर अजुन डिटेल लिहावस वाटत
धागा एक नंबर धाग्यासाठी धन्यवाद.
27 Sep 2016 - 11:32 am | भाते
यातली बहुतेक गाणी ऐकतच मोठा झालो असल्याने ते जुने दिवस आठवले. बाकी सगळी गाणी वरती आली आहेतच. तरीही माझ्याकडुन काही गाणी
तुमको देखा तो दिवाने हो गये
व्हेलेण्टाइन डे
आ जाने जा (रिमिक्स)
दिल का आलम
कभी यादों मै आऊ
चुरा लिया
कही दूर जब (जगजीत सिंग)
अपाचे इंडीअनचे वॉर्निंग (रिमिक्स) गाणे कुठे मिळेल का? नो रिझर्व्हेशन मधल्या या गाण्याचे दुसऱ्या अल्बममध्ये (नफ विब्स विथ डॉन राजा) मध्ये रिमिक्स होते. पुर्वी कॅसेट असताना ते अनेक वेळा ऐकले आहे. पण आता कुठेही सापडत नाही आहे.
27 Sep 2016 - 11:55 am | मदनबाण
इंडिपॉप म्हणजे माझा विक पॉइंट...अगदी परवाच बाबा सहगल चे दिल धडके परत ऐकले होते...
धाग्यात काही गाणी नव्याने दिसली, त्याबद्धल आभार्स... पल्याडला कामी येतील.
बाकी स्टाईल भाई फक्त फक्त अश्विनी भावे साठीच पाहिले होते, डॅम हॉट ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
27 Sep 2016 - 12:04 pm | नरेश माने
तो काळच वेगळा होता. मला वाटते सर्व प्रथम इंडिपॉप बाबा सहेगलमुळे लोकप्रिय झाले. लोकांनी या नव्या प्रयोगाचे स्वागत केले. त्यानंतर मग एकापेक्षा एक दमदार गायक आणि सुंदर गाणी आली. ज्यांचे चित्रीकरण ही एक जमेची बाजू होती. आणि लोकांना या गाण्यांनी वेड लावले. रिमिक्स असो वा स्वतंत्र अल्बम गाणी एका वेगळ्याच प्रकारे सादर होत होती आणि नेहमीच्या एकाच बाजाच्या हिंदी चित्रपट संगीतापेक्षा लोकांनी श्रवणीय गाणी ऐकायला मिळत होती. त्यामुळे हा प्रकार खुप लवकर प्रसिध्द झाला. त्या गायकांना सुध्दा प्रसिध्दीचे वलय लाभले.
आज पुन्हा ती गाणी आठवली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
27 Sep 2016 - 12:15 pm | वैदेही बेलवलकर
शाळेचं शेवटचं वर्ष.... येणाऱ्या कॉलेज जीवनाची रंगीत स्वप्नं आणि सोबतीला इंडिपॉप..... सगळे जुने दिवस झर्र्कन डोळ्यांसमोर तरळून गेले. वर उल्लेखलेलं प्रत्येक गाणं तेव्हा हिट होतं. एक म्युझिक चॅनेलही होतं तेव्हा ज्यावर दिवसभर हीच गाणी रिपीट होत असायची. युफोरिया, जुनून, पंकज उधासचं और आहिस्ता, पिया बसंती रे, शुभा मुद्गलचा पूर्ण अल्बम, बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या सूरत है, मुझे मिल जो जाये थोडा पैसे आणि कितीतरी अगणित गाणी..... खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. याच दरम्यान आलेलं लास केचप पण खूप लोकप्रिय झालं होतं.
धन्यवाद माम्लेदारचा पंखा.... जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.
27 Sep 2016 - 4:20 pm | मदनबाण
बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या सूरत है
बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या जरा नजरों से केह दो मस्त आहे, सेलिना एकदम चिक्की माल दिसते त्यात !
अशीच लिसा रे आफरिन आफरिन मध्ये दिसते, वाळंवंटातली उष्णता तिला सहन होत नाही हे तिच्या कपड्यांवरुन समजले होते मला ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
27 Sep 2016 - 12:23 pm | गुंड्या
चाँदनी रातें - शमसा कंवल ! केवळ अप्रतिम!
27 Sep 2016 - 12:41 pm | nandan
हे गाण खूप असायचे टीव्ही वर....खूपच मजा असायची ...
https://www.youtube.com/watch?v=yK97tjSwmmo
27 Sep 2016 - 12:54 pm | नाखु
एक गाणे आठवते ये मेरी मुन्नी .. नक्की रेमोचेच आहे का? आणखी कुणाचे (जाणकारांनी लेखण्या परजाव्यात)
मला रेमोचे नसरूद्दीन्च्या जलवामधले देखो देखो जलवा हे गाणे आवडते (त्याच रेमोने रे सरा रे सरा हे गाणे गायले असावे -प्र्भुदेवा-माधुरीवर चित्रीत झालेले पुकार सिनेमातले.
बाकी दूर्दर्शन्वर दाखविण्यात येणारी हिंदी पॉप म्हणजे परी हूं आणि मेड इन ईंडीया ,उषा उत्थुप ने गायलेले काही अल्बम गाणी आहेत अता नेमकी आठवत नाहीत कुणाला माहीती असतील तर सांगणे (या ९० च्या दशकातच)
27 Sep 2016 - 12:58 pm | अभ्या..
ओ मेरी मुन्नी, मुन्नी मुन्नी बेबे. हे रेमो फर्नांडेझचेच गाणे. रेमोचे बॉलिवुड हिट म्हनजे हम्मा हम्मा.
कोर्ट केसमध्ये गेलेले गाणे म्हणजे 'अफलातून' मधले मै हूं अफलातून (त्यात आइभैणीवर शिव्या होत्या)
2 Oct 2016 - 2:49 pm | बोका-ए-आझम
शंकर महादेवनचा आवाज आहे. रेमोने गायलेलं फेमस हिंदी गाणं म्हणजे ' प्यार तो होना ही था ' चा टायटल ट्रॅक.
2 Oct 2016 - 2:52 pm | अभ्या..
ते जस्पिंदर नरुला सोबत म्हणलेले टैटलला होते त्यापेक्षा कुमारशानूचे श्रवणीय होते. अर्थात रेमो फर्नांडेझ काही स्पेशल टैपचेच गाणे म्हणू शके.
27 Sep 2016 - 1:33 pm | पाटीलभाऊ
अहाहा...एक से एक गाणी होती ९० च्या दशकातली !
आजची गाणी काही दिवस ऐकली कि नंतर कंटाळवाणी वाटू लागतात...पण ९० च्या दशकातल्या गाण्यांची बात काही औरच...!
रात्रीच्या वेळी नीरव शांततेत FM वर हि गाणी ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योगचं...!
27 Sep 2016 - 1:53 pm | झुमकुला
ओ सनम 'तेरी आँखोंकी कि कसम by लकी अली हे हि खुप आवडते गाणे
27 Sep 2016 - 2:01 pm | झुमकुला
आय माय स्वारी....
ओ सनम मोहब्बत कि कसम
, असे वाचावे27 Sep 2016 - 2:04 pm | अभ्या..
चालतय चालतय, आक्ख्या गाण्यात ते गहरे नशीले डोळेच लक्षात राह्यलेले.
27 Sep 2016 - 2:03 pm | गुंड्या
विविधभारती च्या म्युझिक मसाला कार्यक्रमात बरीच जुनी इंडीपॉप गाणी असतात.
27 Sep 2016 - 2:07 pm | मोदक
विवा कसे काय आठवले नाही अजुन कोणाला..?
27 Sep 2016 - 2:27 pm | गुंड्या
अर्रे हो! विवाची चोरी चोरी आँखोसे, हम नयें गीत सुनायें मस्तच आहेत...
27 Sep 2016 - 6:57 pm | मारवा
याची लिंक द्या हो जरा
27 Sep 2016 - 3:11 pm | संदीप डांगे
अमिताभ चे गाणे?? "एक रहे...
27 Sep 2016 - 3:34 pm | पद्मावति
..यप आणि अमिताभच अजुन एक.... कभी कभी चं रीमिक्स. ते पण मस्तं होतं.
27 Sep 2016 - 3:37 pm | सिरुसेरि
हवा हवा ऐ हवा -
काला कव्वा काट खायेगा सच बोल -
नाम तेरा तेरा नाम तेरा तेरा -
27 Sep 2016 - 4:11 pm | gogglya
सुपरहीट गाणे. अजून काही छान गाणी खाली दिलेली आहेत:
यामधील "गा रहा था" कातरवेळी / रात्री एकटे असताना ऐकण्यास खास वाटते. "बारीश का है मौसम" ही तर निव्वळ एक घटना / कथा आहे, पण ज्या प्रकारे त्याचे गाण्यामध्ये रुपांतर केलेले आहे ते उल्लेखनीय आहे.
27 Sep 2016 - 4:40 pm | वेदांत
https://www.youtube.com/watch?v=lkCVXeSnTo4
27 Sep 2016 - 4:45 pm | टवाळ कार्टा
कांटा लगाSSSSSSSSSSS हाय लगा...आज्जा बंगले के पिच्छे ;)
27 Sep 2016 - 4:53 pm | वेदांत
शेफाली जरिवाला माझ्या कॉलेज मध्ये होती.. जुनी आठ्वण जागी झाली..
27 Sep 2016 - 5:15 pm | टवाळ कार्टा
हायला...एसपीचे का तुम्ही?
28 Sep 2016 - 10:13 am | हेमन्त वाघे
ट का तुम्ही पण एसपीचे ?
28 Sep 2016 - 11:57 am | टवाळ कार्टा
हाय इतनी मेरी किस्मत कहा
27 Sep 2016 - 4:45 pm | नया है वह
मला वाटतं सोनु निगम,के के,मोहित चोहान, अलिशा, शान हे सर्व इंडिपॉप चे देणं आहे
27 Sep 2016 - 6:51 pm | टिलू
१. है धुआ है धुआ -- विकास भल्ला
२. तुझे देखा सासे मुझे आती अब कम, धडकन रुक् गई निकले न दम
३. दिल क्या करे च remix
४. दूम तारा - सुचित्रा कृष्णमूर्ती
27 Sep 2016 - 6:56 pm | मारवा
म्हणजे
कभी हा कभी ना मधली शाहरुखची नायिका च ना ?
आना मेरे प्यार को ना तुम झुटा समझो जाना
ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये
आणि ही मला वाटत शेखर कपुरची बायको होती एके काळी
एका अलबम मध्ये शेखर कपुर पण आहे तिच्याबरोबर
दाढीवाला एलिजाबेथ मि. इंडिया वाला
शेखर कपुर
अॅम आय राइट ?
27 Sep 2016 - 7:42 pm | संपत
बरोबर
29 Sep 2016 - 11:53 am | एस.योगी
तिचं 'जिंदगी मेरी' पण मस्त जमलय
27 Sep 2016 - 7:08 pm | जव्हेरगंज
लै भारी धागा!!!
वाचनखूण साठवतो !
27 Sep 2016 - 7:41 pm | संपत
अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का - काय ते गाणे , काय तो किशन कुमार , काय ती पोरे दारू पिऊन रडायची - चित्रपट पण आला नंतर गाण्यावर
27 Sep 2016 - 7:44 pm | मारवा
आजही हमने बदले है कपडे
आजही हम नहाये हुए है
ही होती
पण ते पॉप नव्हत ना.
तो किशनकुमार नावाचा गुलशन चा भाऊ होता
त्यानंतर अनेक एक्स्ट्रांचा आत्मविश्वास वाढलेला....
27 Sep 2016 - 10:02 pm | nashik chivda
khalid didi
https://www.youtube.com/watch?v=f7-YyghdmzU
HISHAM abbas with shahbaz SUBA
https://www.youtube.com/watch?v=BuKOCWMOdOo
27 Sep 2016 - 11:44 pm | सुंड्या
"नाझिया हसन" ची एक वेगळीच छाप होती डिस्को गाण्यांची "डिस्को दिवाने आणि आप जैसा कोई" हे विशेष लोकप्रिय झाले होते.
लेस्ली लुईसचे "भिगी भिगी रातों मे" आणि बिददुचे "दिल बोले बूम बूम, कभी मिलते है हम तुम" एक नंबरचं आहेत.
रागेश्वरी चे "मैने देखे है सभी रंग दुनिया के ...,
,सुचित्रा कृष्णमुर्ती- "डोले डोले"
स्टाईल भाई नावाचा प्रकारही होता (आजच्या हनीसिंगचा तो आद्य अवतार.)
@ भाते साहेब ते 'अपाचे इंडिअन' आमचे कडे हायेत(जवळ जवळ सगळणी),
क्रमशः
28 Sep 2016 - 9:06 am | अमृत
लिहायला थोडं ऑड वाटतय पण श्री अन्नू मलिकजींनी गायलेलं 'धुआ धुआ हो रहा है समा कही तो है आग लगी' हे गाणं.
सोनूचं तुझे लगे ना नजरीया ओढले चुनरिया
आरयन भाऊंचं आखोमे तेरा ही चेहरा आणि ये सदा कहती क्या सुन तो मेरी जाना
बाबा सहगल्चं आजा मेरी गाडी मे बैठ जा
इन्स्टंट कर्मा - दील क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाये, बाहोमे चले आ
अभिजीत - कभी यादो मे आओ कभी खाबो मे आओ
अजुन आठवतील तसे देतोच.
28 Sep 2016 - 12:21 pm | नरेश माने
इंडिपॉपच्या जमान्यात आशाताईंनी सुध्दा काही गाणी गायली होती. पडदे में रहने दो या गाण्याचे रिमिक्स आणि रात शबनमी भिगी चांदनी......... जानम समझा करो ही दोन आठवतात.
29 Sep 2016 - 11:57 am | एस.योगी
'दिल पे नाराज था हमे बडा सनम, पर क्या बतलायें हम' हे पण छान होत आशाजींचं ....!
29 Sep 2016 - 12:02 pm | अभ्या..
एका गान्यात 'सुनाली बेन्ड्रे' होती. मॅन्क्वीनचे रुपांतर होते तिच्यात. बहुतेक जानम समझा करो.
28 Sep 2016 - 12:31 pm | शरभ
दिल ले गयी कूडी... बघुन आम्ही तरुण झालो...
:)
- शरभ
28 Sep 2016 - 12:40 pm | कपिलमुनी
लैच रोमॅण्टीक रिमिक्स होता हे
28 Sep 2016 - 1:17 pm | अभ्या..
Shyla Lopez. Khatranak.
Bahome chale aao and hum bewafa hargiz na the.
29 Sep 2016 - 11:59 am | एस.योगी
लोपेझ बाई ....
लै खतरनाक प्रकरण बघा .....
+१००
28 Sep 2016 - 12:41 pm | सुमीत भातखंडे
जबरदस्त धागा. बरीच नवीन गाणी समजली.
रिमिक्सेस फारसे आवडत नसून सुद्धा "बॉम्बे व्हायकिंग" ची गाणी त्यांच्या व्हिडिओज मुळे जास्त आवडायची. खासकरून "क्या सुरत हे" आणि "मोना रे" (अतुल परचुरे, व्रजेश हिरजी आणि यश टाँक यांची एका मुलीसाठी चढाओढ.....तीही सबटायटल्स मधून. अफलातून व्हिडियो होता.)
"रुप तेरा मस्ताना" रिमिक्स चा व्हिडियो सुद्धा भारी होता.
आज बर्याच वर्षांनंतर हे सगळं परत परत बघताना आणि ऐकताना खूप भारी वाटतं.
जबरदस्त नॉस्टॅलजिया.....
29 Sep 2016 - 12:06 pm | एस.योगी
शंकर महादेवनचे 'सामने ये कौन आया' एकदम सही..
रेट्रो लूक्स, लॅम्ब्रेटा स्कुटर्स लैच भारी राव ...
28 Sep 2016 - 1:50 pm | पुजारी
हरिहरन आणि लेस्ली चा कलोनिअयन कझन्स हा नाद्याबाद अल्बम.
पण यातलं कृष्णा नि बेग ने आणि Its’ gonna be alright या दोघांचेच विडिओ आले . ( बहुतेक)
रच्याकने , , हरिहरन चा ' काश ' आमचा जीव कि प्राण अल्बम आहे !
गाणी सगळी इंडिपॉप म्हणता येणार नाहीत , गझल्स होत्या- पण आम्ही तर बुआ पंखे झालो तेव्हापासुन 'हरी 'चे !
28 Sep 2016 - 3:35 pm | हेमन्त वाघे
इथे बराच वेळ बॉम्बे व्हायकिंग चा उल्लेख होत नसल्याने आश्रय वाटत होते .
खास आठवण यायचे कारण म्हणजे मध्ये एका दारू पार्टीत नीरज श्रीधर - बॉम्बे व्हायकिंग च संतापाक आणि भारतीय चेहरा , याची ओळख झाली आणि थोड्या गप्पा झाल्या . सध्याही तो गात असतो आणि त्याचा एक स्टुडिओ आहे .
एकेकाळचा त्याची लोकप्रियता बघता हा बराच शांत माणूस वाटलं . शेवटी त्याला इंडी पॉप बद्दल आणि बॉम्बे विकिंग्स बद्दल छेडले असता तो म्हणाला कि या घोस्टनची ऐक वेळ होती ... आणि ती सर्व काही घेऊन गेली ..आणि हे मार्केट बॉलीवूड पुढे टिकले नाही ..
28 Sep 2016 - 4:43 pm | भाते
गुरु ऑफ पीस
माँ तुझे सलाम
और आहिस्ता
चुपके चुपके
तेरा मेरा प्यार
28 Sep 2016 - 5:09 pm | टवाळ कार्टा
"बजा के बाजा, बना मै राजा, मंजुला" या बाबा सैगलच्या गाण्याचा व्हिडिओ आहे का कोणाकडे?
28 Sep 2016 - 5:31 pm | भाते
https://www.youtube.com/watch?v=wwdLg2jhi3Q
28 Sep 2016 - 5:39 pm | टवाळ कार्टा
हा हा...हेच्च
28 Sep 2016 - 6:14 pm | भम्पक
काय माप राव आमच्या कॉलेजच्या सोनेरी आठवणी जागवल्या.....धन्स...लय भारी
अजूनही आमच्या मोबाईल मध्ये हि सर्व टवटवीत गाणी आहेत . बादवे आम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात आमच्या आवडत्या लकी अलीचे , आमचे आवडते "ओ सनम " हे गाणे गाऊन घसा साफ करून घेतला होता .
28 Sep 2016 - 6:36 pm | रायबा तानाजी मालुसरे
क्या बात...क्या बात! मस्त आठवणी जाग्या झाल्या.
हजारो ख्वाइशें ऐसी मधलं 'बावरां मन देखने चला एक सपना' हे एक अफाट गाणं. इंडीपॉप नसलं तरी या यादीतलंच वाटतंय.
स्वानंद किरकीरे आणि शुभा मुद्गल दोघांनी पण गायलंय. तरी मला शुभा वालं व्हर्जन जास्त आवडतं. संगीत बहुतेक शांतनू मोईत्राचं.
मागे स्वानंदला बोलताना ऐकलं, की अजुनही या गाण्याबद्दल प्रतिक्रिया येतात. मला तरी अगदीच सहाजिक वाटलं ते.
28 Sep 2016 - 6:59 pm | भावना कल्लोळ
धम्माल धागा ... त्याकाळात पंकज उदास, जगजीत सिंह, आशा ताई यांची गझल सॉंग्स पण छान यायची.
त्यातली हि गझल जगजीत आणि लताजीच्या आवाजातली ... कही कही से हर चेहरा ऑल टाइम आवडीची आहे. तसेच
जब सामने तो तुम आ जाते हो
मुझे खबर थी वो मेरा नहीं पराया था
चुपके चुपके
और आहिस्ता कीजिये बातें
परत इला अरुण हिचे वोट फॉर घागरा, निगोड़ी कैसी जवानी, बिछुड़ा, सुनीताचे परी हूँ मैं, आशा ताईचे ओ मेरे सोना रे, जानम समझा करो, अलकाचे खोया खोया चाँद, सोनूचे अब मुझे रात दिन, अदनानची लिफ्ट करा दे, भीगी भीगी रातों मैं, नैन से नैनों को मिला लिस्ट अनलिमिटेड आहे.
29 Sep 2016 - 12:10 pm | एस.योगी
' नशा ही नशा है' - सुखविंदर सिंग बेस्ट
28 Sep 2016 - 7:18 pm | अभ्या..
आनंद शिंदे मिलिंद शिंदेची गाणी इंडीपॉपमध्ये न घेतल्याबद्दल जाहीर निषेध.
बादवे रेतिवाला नवरा, वाट बघतय रिक्शावाला असली गाणी कोणत्या टाईपात येतात? लोकगीते म्हणून सांगू नका.
29 Sep 2016 - 8:12 am | संदीप डांगे
बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत असतील... =))
29 Sep 2016 - 8:15 am | कैलासवासी सोन्याबापु
आरारारारारा बाजारच उटीवला भावानं =)) =))
29 Sep 2016 - 8:30 am | संदीप डांगे
कुणाच्याही भावना दुखावल्या आसतील तर आधीच माफी मागतो बावा !!! ;)
29 Sep 2016 - 11:46 am | अभ्या..
चिंधीपॉप. खत्तरा शब्द.
आवड्या.
पण हि चिंधीगिरी वडाप, कालीपिली आणि रिक्षावाल्याना लै आवडते.
28 Sep 2016 - 9:35 pm | Vishvnath Shelar
"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....
28 Sep 2016 - 9:43 pm | Vishvnath Shelar
"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....