पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव.
ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील. म्हणजे ते आले एप्रिलमध्ये आणि जाणार होते जुलै मध्ये, पण डिसेंबर पर्यंत पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. बरं महिन्याचा हप्ता जवळपास $४०० होत होता. मग आपला मध्यमवर्गीय विचार करून मी इन्शुरन्स घ्यायचा नाही असं ठरवलं. किरकोळ आजारांसाठी लागणारी औषधं भारतातून येताना बरोबर आणायला सांगितली.
ते प्रथमच न्यू यॉर्कमध्ये आले असल्याने भरपूर भटकंती सुरु होती. अश्यातच वेस्ट कोस्टची ट्रिप ठरली. ग्रँड कॅन्यनला माझी ४ वर्षांची मुलगी माझ्याच बरोबर आलेल्या एका व्यक्तीमुळे जवळपास ४ फूट उंचीच्या दगडावरून पडली (त्यातले खास भारतीय व्यक्तींचे वागणे व तो अनुभव दुसऱ्या लेखात सांगीन). मुलीचा पाय दुखावला पण फ्रॅक्चर आहे का नाही ते कळेना. गाडीत बसल्यावर ती शांत झाली आणि मग आम्ही ४-५ तासांचा प्रवास करून वेगासमध्ये परत आलो. पायाला नक्की फ्रॅक्चर आहे का नुसताच मुरगळलाय ते कळत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) चर्चा करत होतो की काय करावं. अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या आणि खर्चाच्या भयानक कथा ऐकल्या होत्याच. त्यात इन्शुरन्स नसल्यामुळे कसं आणि काय होणार याची पण चिंता होती.
वेगासला येईपर्यंत तसा उशीर झाला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला एका हॉस्पिटल मध्ये नेलं. तातडीच्या सेवेमध्ये (ER) हॉस्पिटलने दाखल करून घेतलं व आमची रवानगी एका खोलीत झाली. थोड्या वेळाने एक नर्स येऊन वय, वजन, उंची ई घेऊन गेली. मग अर्धा तास झाला, एक तास झाला आम्ही आपले वाट बघतोय. मध्ये २ वेळा विचारून आलो तर नुसतंच डॉक्टर येताहेत (Doctor is on his way) असं सांगत होते. डॉक्टर पण ग्रँड कॅन्यनहून येत होता की काय कोण जाणे. साधारण दीड तासाने एक माणूस डुलतडुलत आला म्हणलं चला आता उपचार चालू होतील, तर तो निघाला X-Ray काढणारा. पाय वेडावाकडा करून करून त्याने ५-६ X-Ray काढले व परत आमची रवानगी एका खोलीत झाली. आधीच्या अनुभवावरून फार लवकर काही होईल अशी आशा नव्हती पण यावेळेला फक्त ३ तासांनी डॉक्टर आले. तोपर्यंत आम्हाला फ्रॅक्चर आहे वा नाही हे पण कोणी सांगत नव्हतं.
अमेरिकन प्रथेप्रमाणे छान छान बोलून डॉक्टरांनी सुरुवात केली. इथे माझ्या मनात मी म्हणतोय बाकी सगळं राहूद्या हो, आधी सांगा काय झालंय ते. पण नाही... आधी आमच्याशी, मग मुलीशी छान छान बोलून डॉक्टरांनी ५-७ मिनटं घालवलीच, मग मुद्द्यावर आले. घोट्याच्या २-३ इंच वर नडगीला अगदी बारीक (Hairline) फ्रॅक्चर होतं पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आत्ताच्या फ्रॅक्चरच्या थोडं वर एक जुनं फ्रॅक्चर पण होतं जे भरून आलं होतं. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की ती या आधी कधी अशी पडली नाही किंवा पाय दुखतोय अशी तक्रार पण केली नाही, मग असं जुनं फ्रॅक्चर असणे कसं शक्य आहे? पण तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच येताय त्यामुळे आधीचं आम्हाला काही माहित नाही आणि जे दिसतंय ते आम्ही सांगतोय असं उत्तर देऊन प्रश्नच फेटाळून लावला.
आता प्लॅस्टर घालायचं का विचारल्यावर नर्स येऊन घालेल म्हणाले. नशिबाने या वेळेला नर्स लवकर आली पण हातातलं सामान प्लॅस्टरचं वाटत नव्हतं. तिने पायाची पाहणी केली आणि मग एक पट्टीसारखं काहीतरी काढलं. जवळपास २ इंच रुंद आणि ३ फूट लांब असेल. ते पाण्यात भिजवलं आणि पोटरीच्या खालून अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत लावून त्याला पायाचा आकार दिला आणि ते वाळल्यावर स्ट्रेच बँडेज गुंडाळून टाकलं. एवढ्यात झालं का अश्या मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले तर म्हणाले झालं सगळं. तेवढ्यात परत डॉक्टर आले आणि म्हणाले तिला जर वाटलं तर २ आठवड्याने ते बॅंडेज बदलून टाका. मी त्यांना सांगितलं की आम्ही इथे राहत नाही व २ दिवसात परत जर्सीला जाणार आहे, तर म्हणाले घरीच बदलून टाका. आम्ही विचारलं की तिचे X-Rays आणि रिपोर्ट्स मिळतील का? कारण जर जर्सीमध्ये डॉक्टरांना दाखवायचं असेल तर उपयोगी पडेल. तर CD वर कॉपी करून देतो म्हणाले. मी परत जुन्या फ्रॅक्चरचा विषय काढला, तर म्हणे तिची हाडं ठिसूळ आहेत. त्यावर लवकरात लवकर टेस्ट्स आणि ट्रीटमेंट करून घ्या. प्रकरण वाढलं तर ती नुसतं चालता चालता पडली तरी फ्रॅक्चर होईल. हे ऐकून आम्ही दोघे एकदम टेंशनमध्ये आलो.
तेवढ्यात ते धडकी भरवणारे वाक्य आलं - बिल भरून या. जड पायांनी आणि धडधडत्या छातीने मी गेलो. बिलिंग डेस्कवरची स्त्री आणि माझा संवाद खालील प्रमाणे -
ती: इन्शुरन्स कोणता आहे?
मी: नाहीये. मी थोडक्यात तिला परिस्थिती समजवायचा प्रयत्न केला.
परत मीच: घाबरत तिला बिल विचारलं
ती: ३,५०० डॉलर्स
माझ्या पोटात गोळा आला. जे भारतात ३,५०० रुपयात (तेव्हा) झालं असतं त्याला जवळपास २,००,००० रुपये द्यायचे? तिला बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं.
ती: तुम्ही भरू शकता का?
मी: हे बरेच पैसे आहेत.
ती: तुम्ही यातले २०% भरू शकता का? $६०० वगैरे.
माझ्या मनात एकदम बऱ्याच भावना आणि प्रश्न आले. त्यामुळे चेहऱ्यावर बावळट भाव आले असावेत.
तिने पटकन माझ्याकडे एक फॉर्म दिला आणि म्हणाली हा भर, ६०० डॉलर दे की तुझं काम झालं.
मी: (अविश्वासाने) बाकीचे पैसे मी नाही भरायचे?
ती: नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ.
मी फॉर्म भरून दिला.
ती: हे ६०० डॉलर्स तुला एकदम भरता येणार नसतील तर आपण महिन्याला ठराविक रक्कम ठरवू तेवढे भर.
मला अगदी गहिवरून आलं... मनात म्हणलं माउली (दिसायला आणि वयाने ती तशी नव्हती म्हणा) तुझे चरणकमल कुठे आहेत. पण स्वतःला सावरलं, कारण इथल्या प्रथेप्रमाणे मिठी मारायला पाहिजे, पण मग बाजूला उभ्या असलेल्या माझ्या धर्मपत्नीकडे बघून भावना आवरायलाच लागल्या. मला झालेल्या फ्रॅक्चर्ससाठी यांनी सवलत दिली असती की नाही जाणे.
मी: ६०० डॉलर्स भरतो.
पुढे एका विभागात जाऊन मी रिपोर्ट्सची CD घेतली व सकाळी ८ ला ER मध्ये गेलेलो आम्ही साधारण संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडलो. यात खरं काम किती वेळाचं तर फार तर १ तास, बाकी वेळ नुसतच बसून.
उर्वरित ट्रिप तशीच लेकीचा "प्लॅस्टर" मधला पाय घेऊन पार पाडली.
समारोप
जर्सीला परत गेल्यावर ते रिपोर्ट्सचं पाकीट उघडलं. याआधी ते वाचायला वेळ झाला नव्हता. ३ पानी रिपोर्ट वाचता वाचता दुसऱ्या पानावर एका परिच्छेदात काय लिहिलं होतं त्याचा संदर्भच लागेना. लिहिलं होतं - किडनीच्या आजाराचे डिटेल्स, किडनीमधून स्टेंट टाकल्याचे आणि अजून कसलेकसले मार्क्स आहेत. आम्हाला दोघांनाही काय करावे ते कळेना. भारतात आमच्या डॉक्टरना फोन झाले. अमेरिकेतल्या डॉक्टर असलेल्या माझ्या चुलत बहिणीला विचारून झालं पण कोणाला काही कळेना. मग दुसऱ्या दिवशी वेगासमधल्या हॉस्पिटलला फोन केला. त्यांनी शांतपणे सांगितलं की टाईप करताना चुकलं असेल. म्हणलं प्रत्येक पानावर रुग्णाचं नाव लिहिलंय आणि पानावरचा एकच परिच्छेद कसा चुकू शकतो? तर ते म्हणे झालं असेल चुकून, तुम्ही दुर्लक्ष करा.
पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला बायकोमुलींची सुट्टी वाढवायला लागली. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे बायकोमुलीं सुट्टीनंतर परत जाणार होते व मी एकटा अमेरिकेत राहणार होतो. परंतु, मुलीच्या हाडांच्या ठिसूळपणाचं पुढे योग्य निदान आणि उपचार करावे म्हणून आम्ही सगळ्यांनीच अमेरिकेतला गाशा गुंडाळून परत जायचं ठरवलं. दरम्यान पुढील १-२ महिन्यांमध्ये त्या हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून $५०-$६० ची २-३ बिलं आली, जी मी भरली.
भारतात परत आल्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ् आहेत त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Dexa Scan केलं. त्याचे रिपोर्ट्स व अमेरिकेतले रिपोर्ट्स घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो. Dexa Scan रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणले ती व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. मी अमेरिकेतले रिपोर्ट्स दाखवले. ते बघून ते म्हणाले कि अमेरिकन स्टॅंडर्डप्रमाणे सगळ्याच भारतीयांची बोन डेन्सिटी कमी असते. त्यामुळे ते लोक म्हणतात की तुमची हाडं ठिसूळ आहेत. पण तसं काही नसतं आणि तुमच्या मुलीलाही काही झालेलं नाहीये.
अशी ही अमेरिकेतल्या मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्सची गम्मत.
प्रतिक्रिया
1 Sep 2016 - 2:35 am | अर्धवटराव
सर्वात पहिली चुक.
परदेशी, खास करुन अमेरीकेत जात असाल तर व्हिसा नंतर सर्वात आवष्यक गोष्ट म्हणजे इन्सुरन्स, असं म्हणतात. इन्सुरन्स सुद्धा भारतीय कंपन्यांकडुन नाहि तर अमेरीकन कंपन्यांकडुन.
1 Sep 2016 - 4:45 am | ट्रेड मार्क
गणिती विचार केला तर मला प्रतिमहिना $४०० असे किमान ५ महिने (आम्ही गाशा गुंडाळून परत गेलो म्हणून) प्रीमियम भरायला लागला असता. तेवढा भरून पण Deductible पूर्ण होईपर्यंत (साधारण $४५००) सगळे मलाच भरावे लागले असते आणि त्यावर २०% माझा हिस्सा द्यावाच लागला असता. म्हणजे मी सांगितलेल्या केस मध्ये ३६०० मला भरायला लागले असते.
एकूण खर्च:
प्रीमियम: $२००० + बिल $३६०० = ५६००
मी एकटा पुढे अमेरिकेत राहिलो असतो तर $४००*१२ = ४८००... त्यामुळे!!!
कंपनी देते तो सोडून दुसरा इन्शुरन्स घेतला असता तर त्याचा प्रीमियम खूपच जास्त असतो, साधारण $८०० ते $१००० प्रतिमहिना. त्या हिशोबाने साधारण $४००० ते $५००० भरायला लागले असते, वर Deductible ची भानगड आहेच. म्हणजे हा पर्याय खूपच महागडा आहे.
वरील दोन्ही पर्याय टाळून मला फक्त $८०० मध्ये काम झालं ही देवाची कृपाच म्हणायची.
अमेरिकेत येताना इन्शुरन्स घ्यावा म्हणतात पण फारच tricky decision आहे. नुसतं भेट द्यायला येणाऱ्यांना फक्त $५०,००० कव्हरेज साठी सहा महिन्यांना २००० ते ३००० प्रीमियम कमीतकमी पडतो. त्यातही दुर्दैवाने तुम्हाला मोठ्या आजारावर (उदा. हार्ट अटॅक) उपचार घ्यावेच लागले तर इन्शुरन्स कंपनी, अगदी अमेरिकन असली तरी, आधीपासून असलेला आजार (Pre-existing ailment) म्हणून भरपाई नाकारतात. बहुतेक वरिष्ठ नागरिकांना रक्तदाब, मधुमेह असतो व असे लोक दुर्दैवाने यात सापडले तर मग हार्ट अटॅक येण्याचं कारण रक्तदाब आहे असं सांगता येतं.
माझ्या एका मित्राची आई इथे आली असताना तिला हार्ट अटॅक आला. ४ दिवस ICU मध्ये ठेवला पण दुर्दैवाने त्यांचे निधन झालं. बिल फक्त १३०,००० डॉलर्स सांगितलं आणि इन्शुरन्सने हात वर केले. एवढे पैसे देणं शक्यच नव्हतं त्यामुळे माझ्या मित्राने पण देऊ शकत नाही म्हणून सांगितलं, दहा वर्ष होऊन गेली अजून तो ते निस्तरतोय.
त्यामुळे तुमच्या नशिबावर हवाला ठेवायचा आणि निर्णय घ्यायचा.
1 Sep 2016 - 4:51 am | अर्धवटराव
पॅट्रीयट अमेरीका वगैरे अनेक कंपन्या आहेत. प्रति माणुस ~१०० डॉलर्/महिना रेट पडतो साधारणतः
असो. अमेरीकी हेल्थ इन्सुरन्स हा वेगळा कटकटीचा विषय आहे हे खरं.
1 Sep 2016 - 5:02 am | ट्रेड मार्क
पण गणित मांडलं तर बरेच पैसे जातात
(३ माणसांचे ३०० प्र .म.) * ५ महिने = १५००+ (२०% पहिल्या ५००० साठी) = १००० म्हणजे २५०० गेलेच असते.
असो. खर्चाच्या बाबतीत मी नशीबवान ठरलो म्हणायचं (काष्ठ - स्पर्श).
1 Sep 2016 - 5:00 am | रुपी
तुमचा मित्र नक्की ते कसे निस्तरतोय ते सांगू शकाल का (हरकत नसेल तर)? कारण ही वेळ कुणावरही येऊ शकते.
2 Sep 2016 - 12:28 am | ट्रेड मार्क
आधी प्रोसेस समजावून घेऊ -
१. हॉस्पिटल बिल पाठवते
२. भरलं नाही तर ३ रिमाईंडर्स येतात
३. तुम्ही काहीच केलं नाहीत तर बिल कलेक्शन एजन्सीला पाठवतात. - इथपासून तुमच्या क्रेडिट स्कोअर वर परीणाम व्हायला सुरुवात होते.
४. कलेक्शन एजन्सी तुमच्याकडे पैश्याची मागणी करत राहते. यात दहशत, गुंड पाठवणे, धमक्या देणे हे प्रकार नसतात. पण तुमच्याकडून पैसे कुठल्या मार्गाने वसूल करता येतील ते बघतात.
५. तुमच्या क्रेडिट स्कोअर वर परीणाम झाल्याने तुमच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत नाही, कर्ज मिळत नाही, जरी मिळालंच तरी खूपच जास्त व्याजाने मिळतं ई.
तुम्ही काय करू शकता -
१. हॉस्पिटल कडून बिल मिळणे ते ३ रिमाईंडर्स या काळात तुम्ही हॉस्पिटलबरोबर बोलून काही मांडवली होते का ते बघू शकता. हॉस्पिटल तुम्हाला बिल कमी करून देऊ शकतं किंवा अश्या प्रसंगी मदत करणारे लोक वा काही धर्मादाय संस्था यांचे पत्ते देतात. अजून एक मार्ग म्हणून तुम्हाला महिन्याचा हप्ता बांधून देतात.
२. क्रेडिट रेटिंग एजन्सी (कलेक्शन नव्हे) उदा. Transunion, Experian and Equifax यांच्याशी बोलून क्रेडिट रिपोर्टवरील नोंद कशी कमी करता येईल ते बघावे.
३. अगदीच मोठी रक्कम असेल तर वकील नेमावा.
माझा अनुभव -
मुलीला डॉक्टरांना दाखवण्यासाठी मी मध्यंतरी ७-८ महिने अमेरिकेत नव्हतो. त्याकाळात एक $६० चं बिल त्या हॉस्पिटलने माझ्या त्यांच्याकडे असलेल्या पत्त्यावर पाठवलं. मी ते घर साहजिकच सोडलेलं होतं. आणि मला माहितीही नव्हतं की ते अजून काही बिल पाठवतील. पुढे मी अमेरिकेत परत आल्यावर कारसाठी कर्ज मागितलं. तर जवळपास १२-१४ ब्यान्कांनी कर्ज नाकारलं, शेवटी होंडा फायनान्सकडून व्याजदर ९.५% नी कर्ज मिळालं.
मी क्रेडिट रेटिंग एजन्सीला फोन केला की मला कर्ज का मिळत नाहीये. तेव्हा त्यांनी सांगितलं की $६० चं एक बिल तुम्ही भरलं नाहीये त्याची नोंद क्रेडिट रिपोर्टवर आहे. मग त्यांना मी सगळी कहाणी सांगितली. मी अमेरिकेत नव्हतोच म्हणून मला बिल आलेलं कळलं नाही वगैरे. त्यांना ते पटल्यावर ती नोंद काढून टाकण्यात आली. तोपर्यंत २-३ महिने मी ९.५% नी व्याज भरलं. मग एका क्रेडिट युनियन कडून मला १.९९% नी refinance कर्ज मिळालं.
थोडक्यात तुम्ही मुद्दाम पैसे बुडवत नसाल तर ते तुम्हाला शक्य तेवढी मदत करतात.
2 Sep 2016 - 12:32 am | स्रुजा
९.५??? बाबो !
बादवे, बरं झालं तुम्ही हा धागा काढलात. बरीच नवीन माहिती मिळते आहे. खास करुन फेअर प्राईस ई.. बद्दल.
2 Sep 2016 - 1:24 am | ट्रेड मार्क
फटके खाऊन काही गोष्टी शिकलोय, तीच माहिती आपल्यापैकीच कोणालातरी उपयोगी पडेल. आणि मला पण इतरांचे अनुभव वाचून शिकता येईल.
बाकी फेअर प्राईसबद्दल म्हणाल तर काही प्रश्न विचारून, खटपटी करून बरी प्राईस मिळवता येते. सुरुवातीला इथे मला पण वाटायचं आपण असं कसं विचारायचं किंवा लोक काय म्हणतील. एवढंच काय तर एखाद्या रेस्टॉरंटचं कूपन असेल ते दाखवायला पण मला लाज वाटायची. पण मग एकदा कळलं हे कसं चालतंय सगळं मग बिनधास्त विचाराला लागलो. मिळालं तर मिळालं नाहीतर नाही :)
या धाग्याच्या विषयाला थोडं अवांतर होतंय पण फेअर प्राईसचा विषय निघाला म्हणून राहवत नाहीये म्हणून अजून एक उदा. -
बहुतेक सगळी डिपार्टमेंटल स्टोअर्स प्राईस मॅच करतात. म्हणजे काय तर मी टारगेटच्या वेबसाईटवर बार्बेक्यु $२४ ला बघितला. पण साईझ नक्की कळेना म्हणून म्हणलं आपणच दुकानात जाऊन बघू आणि घेऊ. तर दुकानात तोच बार्बेक्यू $३५ ला होता. बिल करताना मी त्यांना मोबल्यावर साईट उघडून दाखवलं की ऑनलाईन तुम्हीच $२४ ला विकताय तर मी ऑनलाईन मागवतो स्टोअरमधे (स्टोअर पिक-अपला डिलिव्हरी चार्जेस नसतात) आणि ४ दिवसांनी इथूनच घेऊन जाईन. तर त्यांनी तो तिथेच मला $२४ ला दिला. याचप्रमाणे कॉम्पिटिटर प्राईस मॅच पण असतं.
2 Sep 2016 - 3:08 am | स्रुजा
हो, असं मला ही बिचकायला व्हायचं. माझ्या हक्काचं इन्क्रीमेंट मागायला पण माझी झीभ पटकन चालत नाही. पण नशिबाने आत्तापर्यंत इन्क्रीमेंट साठी किंवा फेअर पगारासाठी भांडायची वेळ आली नाही , टच वुड. माझा नवरा असल्या प्राईसेस किंवा माझा फायदा मला दे टाईपच्या गोष्टी अत्यंत सहज आणि कौशल्याने करत असतो, त्याला करताना बघितलं की वाटतं, अरेच्या, सोप्पय. पण पुन्हा पुढची वेळ आली की माझे आपले पहिले पाढे ५५. त्यामुळे आमचे सगळे इन्शुरन्स फिन्शुरन्स चे डिल्स् तो करतो. मी सोप्पय, सोप्पय करत स्वतःचं समाधान करते ;)
मला तर वाटतं की भारतात नवश्रीमंतांनी उगाचच " मांडवली" किंवा " स्वस्तातली" गोष्ट याला बदनाम करुन ठेवलंय . किंमत बघुन घेताय म्हणजे तुम्ही गरीब. आजुबाजुला अनेक जणं उगाच मोठे पणा मिरवायला असं दुसर्याला जज करत असतात. इथे सुरुवातीला समोरची सेल्स मन पण सेल वर ची गोष्ट आहे का वगैरे बघताना मनातल्या मनात आपल्याला चिंधी म्हणेल असं वाटायचं पण नंतर वाटायला लागलं , की नाही. ती जी वस्तु विकुन पगार कमावते आहे ती विकत घ्यायची माझी तयारी असेल तर मी चिंधी नाही. मग ती काहीही म्हणो. अगदी कंपनीचा सी ईओ ला सुद्धा मुलीवर वैतागताना पाहिलं की "ही सारखी मित्र-मैत्रिणींबरोबर जाते सिनेमाला आणी मग अगदी सहज ३५-४० $ खर्चुन येते, त्यापेक्षा कमी पैशात मी आणि माझी बायको छान जेवतो." आता त्याला पैशांची कमी नाहीये पण व्हॅल्यु फॉर मनी मिळावी अशी त्याची ही इच्छा आहे. इथे हा फार मोठा फरक आहे. एका कलिग ची मुलगी खुप चांगली अॅथलीट आहे, तिला मोठ्या लीग मध्ये टाकायचं तर पैसा खुप लागतो पण तो बिनदिक्कत पणे मला परवडत नाही हो हे सांगत असतो, स्पॉन्सर शोधत असतो. पैशांचा डोळ्यावर पडदा नसावा आणि आव ही आणु नये. या कन्स्झुमर मार्केट मध्ये तुम्हाला तुमचा फायदा ही करुन घेता यायला हवा. नाही तर परवडते म्हणुन २ $ ची गोष्ट ४ $ ला आणली दर वेळेस तर लाखाचे १२ हजार व्हायला कितीसा वेळ लागणार? तसं होऊ नये त्यासाठी भीड पडता कामा नये, हे सूत्र मी इथे सगळ्यांना पाळताना बघते. आपण ही हा विचार करायलाच हवा.
2 Sep 2016 - 5:12 am | ट्रेड मार्क
जोपर्यंत कोणाला फसवून किंवा धमकावून कमी किमतीत मिळवत नाही तोपर्यंत लाज का वाटून घ्यावी.
2 Sep 2016 - 9:48 am | हेमन्त वाघे
बऱ्याचदा मी असे अति श्रीमंत लोक पहिले आहेत कि ते त्यांच्या LUXURY वस्तू वर हि पैसे वाचवतात
1) माझ्या ऐका बिल्डर मित्राने जेव्हा मर्सिडिस ई क्लास 3 वर्षांपूर्वी घेतली - तेव्हा त्याने मुंबई , पुणे व ठाणे मधील सर्व डिलरशिप कडून कोटेशेन घेतली होती . 3 महिने त्याने वाईट घासाघीस केली . एकदा अभिमानाने त्याने मला सांगितले कि बँकॉक मधून त्याला 1.5 लाखाची पर्स 45 हजारात मिळाली !
2) अजून माझा ऐक क्लायंट जो के अब्जाधीश आहे , माझ्या 30-40 हजाराच्या बिलाचा प्रत्येक हिशोब बघतो . त्यानेसुद्धा ऑडी A6 अशीच हार्ड बार्गेन करून घेतली होती . आणि अनेकदा तो सोया म्हणून रिक्षा , टॅक्सी नाहीतर आमच्यासारख्या व्हेंडर च्या छोट्या गाड्यातून फिरतो . आमच्या माहितीत खरे तर त्याला मर्सिडिस एस क्लास पण परवडेल . हिरानंदानी नवीन असताना , आणि मार्केट पडले असताना त्याच्या वडिलांनी 3500 squre फूट चा ( होय !) फ्लॅट आणि 6 पार्किंग कशी XX फाट भावात ( तो पारशी आहे , शिव्याच देतो) घेतली ते अभिमानाने सांगितले .आणि त्याचे कफ परेड ला पण फ्लॅट्स आहेत . त्याला आम्ही विदेशी कंपन्यांबरोबर तासंतास भावासाठी खिचखीच करताना आम्ही स्वतः बघितले आहे !
3) माझ्या एका माजी बॉस ने मुलीचे लग्न करायचे आहे म्हणून 4-5 वर्षे विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात सिंगल माल्ट च्या बाटल्या जमवल्या होत्या. लग्नाआधीच्या 2 पार्ट्या त्याने घरातच देऊन दारू वर बरेच पैसे वाचवले !!
4) एक बँकर मित्र घड्याळ घ्यायचे म्हणून 6-7 महिने थांबला होता .. तो गरीब नक्कीच नव्हता कारण त्याचे बजेट 1.5 लाखाचे होते . शेवटी त्याला 40% सवलतीत ओमेगा मिळाले !
5) लुक्सरी हॉटेल मद्ये फुकटच्या दारू पार्टीत मी सर्वानाच रांग लावताना बघितले आहे ! तसेच तेथे हि सर्वात महागडी दारू आदी संपते ( मी अशा रांगेत बराच पुढे असतो किंवा पहिला राहायचा प्रयत्न करतो)!
म्हणून पैसे वाचवायची लाज बाळगू नका !
2 Sep 2016 - 10:08 am | संदीप डांगे
निगोशिएशन ही एक कला व गरज आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. आपले मध्यमवर्गिय संस्कार आपल्या मानसिकतेला फ्रॅक्चर करुन आहेत. त्यामुळे चैनीच्या वस्तूंसाठी पैसा खर्च करतांना हात आखडता घेऊ नये हे आपल्या मनावर बिंबवलेले असते (राजे-महाराजान्चा इतिहास), म्हणून आपण एकतर पैसाच खर्च करत नाही किंवा केला तर अविचाराने करतो.
2 Sep 2016 - 1:12 am | रेवती
अगदी.
2 Sep 2016 - 1:21 am | रुपी
अच्छा.. धन्यवाद हे सगळं लिहिण्याबद्दल...
2 Sep 2016 - 6:44 am | अनन्त अवधुत
क्रेडिट कर्मा वर तुमचा क्रेडिट स्कोर विनामूल्य कळू शकतो. तसेच सगळ्या क्रेडिट रेटिंग एजेन्सी कडून एक क्रेडिट रिपोर्ट दरवर्षी फुकट मिळतो. अधिक रिपोर्ट हवे असतील तर पैसे (डॉलर्स) द्यावे लागतात.
क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड आवश्यक आहे पण क्रेडिट कार्ड नसले तरी तुमचा क्रेडिट स्कोर असतो.
मी जेव्हा या (क्रेडिट कर्मा) संस्थळाचा सभासद झालो तेव्हा माझ्याकडे केवळ डेबिट कार्ड होते.
थोडे अवांतर झाले पण क्रेडिट चा विषय निघाला म्हणून सांगितले.
1 Sep 2016 - 2:49 am | अभिजीत अवलिया
तुम्ही इन्शुरन्स घेतला न्हवती ही चूकच. पण तरीही हॉस्पिटलने जी सेवा दिली आणी जे बिल लावले/रिपोर्ट बनवले ते चीड आणणारे आहे.
1 Sep 2016 - 2:59 am | रुपी
हा हा.. २०%च भरावे लागल्यामुळे गमतीदार अनुभव, नाहीतर चांगलाच तापदायक झाला असता.
पण खरं सांगायचं तर तुमचा इन्शुरन्स कोणता वगैरेवर बरेच अवलंबून आहे. इन्शुरन्स कंपनीकडून बरेच पैसे मिळवता यावेत म्हणून काही डॉक्टर्स तुम्हाला जास्त आजारी दाखवायचा प्रयत्न करतात. इथली आरोग्यसेवा महाग आहे, म्हणूनच इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. त्यातही वेगवेगळे प्लॅन्स असतात, त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य घेणेही महत्त्वाचे आहे. मला स्वतःला बाळ झाले तेव्हा प्रसूतीचा खर्च एक पैसाही झाला नाही. फक्त तो खूप आजारी पडला तेव्हा इमर्जन्सीतून न्यावे लागले, दोन दिवस दाखल करुन घेतले आणि आमचे राहणे, (तो खूप लहान असल्यामुळे) माझे खाणे/पिणे वगैरे धरुन फक्त $३५ द्यावे लागले - जे इमर्जन्सीतून गेल्यामुळे लागतात हे प्लॅन घेतानाच माहीत होते. कुठल्या भेटीसाठी स्वतः किती पैसे भरावे लागणार ते आधीच माहीत असते आणि तेवढेच पैसे लागतात. फक्त माझ्या प्लॅनमध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडे जास्त आजारी आहोत असे भासवावे लागते ;) मी माझ्या प्लॅनमुळे १००% समाधानी आहे असे नाही म्हणणार, पण २-३ प्रसंगी जी अफाट तत्परतेने सेवा मिळाली आहे त्याबद्दल मी ऋणीच आहे. थेट तुमच्यासारखा नाही, पण एका स्नेह्यांकडून एक किस्सा ऐकला होता - त्यांनाही कॅश द्यायची तयारी असेल तर अशीच बिलात सूट दिली होती एका डॉक्टरने.
डेंटीस्ट मात्र या प्लॅनमध्ये येत नाही, म्हणून जरा डोळे उघडे ठेवावे लागतात. इन्शुरन्स कंपनीने पाठवलेले स्टेटमेंट आणि तीने आकारलेले पैसे यात कधीकधी मला तफावत जाणवते, पण मी ते पैसे सोडत नाही - १५/२० $ असले तरी.
1 Sep 2016 - 3:19 am | स्रुजा
डेंटिस्ट स्टेटमेंट मधला हा फरक मला इथे पण जाणवतो. डोळे उघडे ठेवावेच लागतात त्या बाबतीत. पण प्लान बरा असल्याने फार त्रास होत नाही. आमच्या इथे दोघांचे एम्प्लोयर इन्शुरन्स असतील आणि दोन्ही प्लान्स ८०-८० % समजा एका विशिष्ट ड्रग साठी कव्हर करत असतील तर जी काही रक्कम असेल ती आधी माझ्या इन्शुरन्स मधुन घेतात , उरलेला को-पे त्याच्या इन्शुरन्स कडुन ८०% कव्हर होतो . म्हणजे १००-८० - १६ असा ४ $ चा को पे होतो. जर १००% कव्हरेज असेल तर प्रश्न च मिटला. पण दोघांचे इन्शुरन्सेस तुमच्या फार्मसी मध्ये फाईल वर तत्परतेने आणणे आणि ते लोकं नीट कॅल्क्युलेट करतायेत ना हे बघणं फार महत्त्वाचं !
बाकी
ही ही ही.. फार च आवडलं.
1 Sep 2016 - 5:08 am | खटपट्या
दातांचा विमा वेगळाच असतो. मी एकदा रूट कनाल (बरोबर आहे शब्द?) करुन घेतले त्याचे २१००$ झमला, त्यातले मला ६००$ भरावे लागले. पण काम असे केले की परत कधी दाढ दुखली नाही.
1 Sep 2016 - 6:37 am | रेवती
दातांच्या कामाबाबत सहमत. दोनदा /वर्ष तपासण्या, दुरुस्त्या, क्लिनिंगे वेळेवर झाल्याने ते काम चांगले होते, नाहीतर भारतातही दातांचे खर्च कमी नसतात.
1 Sep 2016 - 6:57 pm | सुबोध खरे
माझा चुलत भाऊ अमेरिकेत आहे. त्याला त्याच्या दांत वैद्याने रूट कॅनॉल चा उपचार करायला सांगितला ज्याचा खर्च २२०० डॉलर्स सांगितला. मी चुलत भावास सांगितले कि याच पैशात (१,४३,०००/- )तुला भारतात तिकीट काढून भारतात येऊन उपचार करणे परवडेल. त्याप्रमाणे तो
भारतात येऊन आपली रूट कॅनॉल( खर्च रु ४५००/- ) करून आपल्या आईवडिलांना( आमच्या काकांना) भेटून परत गेला. यानंतर तो दरवर्षी आला कि न चुकता माझ्या दंतवैद्याला भेट देऊन ( आणि जे असेल ते करून) येतो.
चार दिवसापूर्वी माझ्याकडे एक एन आर आय बाई चेक अप साठी होत्या त्यांना पण खर्च २३०० डॉलर्स सांगितला होता
1 Sep 2016 - 9:39 pm | खटपट्या
तुमचा भाउ आइ वडीलांना भेटून आला ही जमेची गोष्ट. नाहीतर जेवढे दीवस तो भारतात आला तेवढ्या दीवसांचा पगार गेला. वर सुट्ट्या वापरल्या गेल्या. (काही ठीकाणी सुट्ट्या एनकॅश करुन देतात.)
अवांतर - काही मित्रांना असा अनुभव आला आहे की जेव्हा जेव्हा ते सुट्टीवर गेले त्यानंतर लगेच त्यांची नोकरी गेली. बर्याच ठीकाणी माणूस रजेवर गेल्यावर त्याशिवाय काम चालू शकते का याची खातरजमा करतात. आणि जर सुट्टीवर गेलेल्या माणसाशिवाय काम होत असेल तर लगेच नारळ दीला जातो. सद्या मंदी आल्यापासून हेच धोरण आहे. त्यामुळे सुटी मागायला भीती वाटते.
2 Sep 2016 - 9:56 am | सुबोध खरे
तो SAP consultant आहे आणि स्वयं रोजगार वाला आहे. एक लॕपटॉप घेऊन येतो आणि इथे घरी बसून काम करतो.
1 Sep 2016 - 6:42 am | रेवती
डोळे तपासणी विमा पण वेगळा असतो ना! त्याची किंमअत फारशी नसल्याने ते एक ठीक आहे. ;)
2 Sep 2016 - 1:26 am | रुपी
डोळ्यांच्या तपासणीपर्यंत ठीक आहे.. भिंगे लावायची वेळ आली तर मात्र भारतातून घेणेच बरे.
1 Sep 2016 - 3:09 am | स्रुजा
ई.आर साधारण नेहमीच असा केऑटिक असतो. अगदी मुद्द्याची गोष्ट सांगायची झाली तर जर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तिकडे गेला असाल तर तुमची टक्कर मरायला टेकलेलया पेशंट्स शी असते. तुम्ही थांबु शकता, ते नाही. त्यामुळे पहिलं प्राधान्य अशांनाच दिलं जातं. कॅनडा आणि अमेरिका दोन्हीमध्ये जाणवलेला एक खुप मोठा गैरसोयीचा भाग म्हणजे कोपर्यावरच्या डॉ. कडे तो " जवळ" आहे म्हणुन जाऊन येता येत नाही. साधारण एक दिवस वॉक इन्स साठी असतो आणि उरलेले दिवस आधी वेळ ठरवुन च जावं लागतं . वॉक इन दिवस सोडुन इतर दिवशी ताप आला तर टु बॅड ! बराच वैताग येतो.. शिवाय तिथे जाऊन पण असे काही दिवे लागत नाहीत. थातुर मातुर डोस देऊन परत पाठवलं जातं. ही गोष्ट खरं म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही आहे. छोट्या मोठ्या सिझनल आजारांना परस्पर हँडल करायची क्षमता शरीरात तयार होते पण तो छोटा मोठा आजार नस्ला तर वेळ वाया जातो. सगळं कसं बाय द बुक ! आधी ३ दिवस थांबा, मग एक माईल्ड डोस घ्या, नाहीच बरं वाटत का? मग अजुन एक डोस घ्या कारण तो डोस दिलाय हे कागदोपत्री दिसल्याशिवाय स्पेशालिस्ट कडे नाही पाठवणार. स्पेशालिस्ट कडे तुमची फाईल गेली की आधी तो त्याचा अंदाज लावणार. काय नुसती अॅलर्जीच आहे का? थांब मग तू ! ९-९ महिने देखील लागतात छोट्या मोठ्या खेळताना झालेल्या इन्जरिजना स्पेशालिस्ट दिसेपर्यंत. अॅलर्जी बिलर्जी तर पार एक सिझन जाऊन दुसरा येऊन तुमची वाट लावतो तरी तुम्ही वाट च पाहत असता.
ई आर मध्ये जायचा मला ही एकदा योग आला होता. मैत्रिणीच्या नवर्याचं अॅपेन्डिक्स चं ओपरेशन होतं. तो पहाटे ५ वाजता गेला, पोटात दुखतं म्हणुन. मग टेस्ट्स , त्यात २ वाजले. हा उपाशीच. मग सर्जरी करायची ठरवली म्हणुन खायचं काही नाही. कधी तरी पहाटे २ ला नेलं सर्जरी ला. आमच्याकडे सगळं म्ह्यणजे सगळं हेल्थ कव्हरेज सरकारकडुन होतं त्यामुळे आम्ही आणि आमचे एम्प्लॉयर्स फक्त प्रीस्क्राईब्ड ड्रग्ज साठी तेवढा इन्शुरन्स आहे का बघतो पण म्हणून या वेळाचा त्रास व्हायचा तो होतोच.
अशा वेळेला भारतीय सिस्टीम फार म्हणजे फार आठवते. विश्वासावर पेशंट्स जातात आणि डॉ देखील त्याला पात्र ठरतात , आणि हे उलटं देखील खरं आहे. मात्र एक आहे , एकदा इकडे तुम्ही सिस्टीम मध्ये आलात, पहिले वेळखाऊ सोपस्कार झाले की मग तुमची सगळी चिंता त्यांना . तुम्ही निवांत राहु शकता.
1 Sep 2016 - 5:07 am | ट्रेड मार्क
जे होते ते सगळे अगदी निवांत होते. बहुतेक वेगास मध्ये सकाळी ८ ला कोणी येणं ही दुर्मिळ गोष्ट असावी. त्यामुळे सगळ्यांना कळवून ते येईपर्यंत वेळ गेला असावा.
पण बाकी शहरात पण काही फार त्वरित सेवा मिळते असं नाही.
रच्याकने: तुम्ही कॅनडामध्ये असता का?
1 Sep 2016 - 9:08 am | स्रुजा
हो, मी कॅनडामध्ये आहे. त्यामुळे उठ सुठ इन्शुरन्स लागत नाही. प्रिस्क्राईब्ड् ड्रग्स, डेंटल आणि आय चेकप एवढ्यासाठी लागतो. मात्र आमचं ई आर तुमच्यापेक्षा वाईट आहे. कॅनडाच्या हेल्थ केअर चे स्वतःचे असे इशुज आहेत च पण एकदा सिस्टीम मध्ये आलात की बर्यापैकी सोपं होतं.
1 Sep 2016 - 4:03 am | रेवती
मलाही लिहायचय पण उजव्या हाताला कास्ट असल्याने आत्ता शक्य नाही. माझा इन्शू. असताना भारतात काय झाले ते सांगितले असते, तरी ट्रीटमेंट चांगली मिळाली.. आता पुढील अठवड्यात येथील को पे कळतील. गेली २ वर्षे को पे देऊन अनेक अनुभव आलेत. भारतातही लूट केल्याचे अनुभव वडिलांचे आहेत.
1 Sep 2016 - 11:33 am | पिंगू
बाब्बो, बिलाचा आकडा बघूनच डोळे पांढरे झाले की राव. बिलाच्या रकमेच्या एक चतुर्थांश रकमेत माझ्या आईच्या पाठीचे ऑपरेशन झाले.
1 Sep 2016 - 12:09 pm | अजया
बापरे!
अमेरिकेत डेंटल क्लिनिक काढून मिपाकरांकडुन रुपयात पैसे घ्यावे काय ;)
1 Sep 2016 - 5:07 pm | ट्रेड मार्क
भारी शब्दप्रयोग आहे... ट्रीटमेंटची किंमत रुपयात घ्या पैश्यात नको. नाहीतर न संपणारी रांग लागेल तुमच्या क्लीनिकबाहेर.
कृहघ्या...
तसेही रुपयात घेतलेत तरी रांग लागेलच. इथे दातांची ट्रीटमेंट खूपच महाग आहे. नुसता दात काढायला मला $६० द्यायला लागले, वर इन्शुरन्सने त्यांचा हिस्सा दिलाच असेल. दाताच्या इन्शुरन्समध्ये दरवर्षी फुकट दात स्वच्छ करून देतात. त्यात तुम्हाला कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्याला किती पैसे लागतील तेही सांगितलं जातं. मला त्यांनी $७५०० माझा हिस्सा सांगितला आणि माझ्या पत्नीला $७००० फक्त, इन्शुरन्स कडून येणारे वेगळे. याच्या कितीतरी कमी पैश्यात आम्ही भारतात येऊन सगळी ट्रीटमेंट करून गेलो.
1 Sep 2016 - 5:46 pm | रेवती
$७५००+$७००० हे तुम्ही फक्त दातांचे सांगताय असे गृहित धरतिये. आपल्याकडे लहानपणापासून मुलांच्या दंतारोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही व दातांची काळजी घेण्याविषयी शिकवले जात नाही. माझ्याही दातांच्य विकारांबाबत हेच झाले आहे. अनेक गावे व अनेक डेंटिस्ट बदलून झाले पण समाधानकारक ट्रीटमेंट मिळाली नाही. मला हामेरिकेत दातांवर बराच पैसा खर्च करावा लागला पण जी उपाययोजना झाली त्याबद्दल एकही तक्रार नाही. उलट माझ्या आईवडिलांनी त्यांच्या दातांवर भारतात काही लाख खर्च केले व परिस्थिती जैसे थे अशी आहे. अर्थात हे ज्याचे त्याचे दातांचे प्रश्न व उपलब्ध असलेले दंतवैद्य यांच्यवरही अवलंबून आहे. पण येथील दातांच्या ट्रीटमेंटबद्दल माझी काही तक्रार नाही.
1 Sep 2016 - 5:54 pm | पिलीयन रायडर
दातांचा विमा आहे, तर दातांची कुठलीही ट्रिटमेंट करण्याची अजिबात इच्छा नाही पण फक्त क्लिनिंग करायचे आहे. त्यांनी बेनिफीट्स मध्ये लिहीलय की क्लिनिंग फ्री आहे. पण तरी दुधाने तोंड पोळल्याने.... =)
तर खरंच क्लिनिंग फ्रि होईल का?
1 Sep 2016 - 6:05 pm | रेवती
हो. पण क्लिनिंगदरम्यान समजा त्यांना तुझ्या दातात क्या व्हिटी आढळली तर तुझ्या कानावर घालणे, ट्रीटमेंट प्लान बनवणे हे त्यांचे काम असल्याने ते सांगितलेले तुला चालेल का? पोस्टपोन करणे, न करणे तुझ्या हातात असेल हे नक्की. अपॉ. मेक करताना फ्री क्लिनिंग, तुझा इन्शू. याबद्दल फोनवर खात्री करून घे.
1 Sep 2016 - 6:47 pm | सुबोध खरे
भारतात दुर्दैवाने दातांच्या आरोग्याबद्दल अक्षम्य अशी अनास्था आढळते.
दाताच्या उपचाराचा खर्च थोडासा जास्त असेल तर बरेच लोक दात "काढून टाका" सांगतात. अगदी पहिली दाढ असेल तरीही( हा एक अतिशय महत्वाचा दात आहे)
हेच अगदी पायाचे महत्त्वाचे नसलेले एक बोट कापायचे म्हटले तर लोक कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
दाताला टाचणी टोचली तर दुखत नाही हे कारण.
जाता जाता -- कवळीची चावण्याची क्षमता मूळ दाताच्या फक्त १५ % असते.
1 Sep 2016 - 6:50 pm | रेवती
सहमत.
1 Sep 2016 - 7:15 pm | अजया
हो. हा रोजचा संवाद आहे आमचा.पार वाट लावून लोक येतात.मग मोठी ट्रीटमेंट मोठा खर्च यात दात पाडणे हा आॅप्शन लोकांना बरा वाटतो.आधी न येण्याचे कारण कायम दात कालच दुखायला लागला हे असते.
दात हा इतर अवयवांसारखाच जिवंत अवयव आहे हे कळायला लोकांना दात ठणकायला लागतो :(
1 Sep 2016 - 7:32 pm | योगेश कोकरे
शहरी भागात थोडीफार जागरूकता आहे . ती पण सुशिक्षित लोकांमध्येच ,,,,गावी खूप कमी जागरूकता आहेत . लोकांना कोलगेट वर ज्यास्त विश्वास आहे .एक्दम चवीने कोलगेट खातात घासतात ,,,,अगदी ब्रश कसा घासावा इथपासून सुरवात होते ,,,,,,काही काही लोक लिंबाच्या काटक्या चघळतात ,,,,लिंबामध्ये गुणधर्म आहेत पण दात किती स्वच्छ निघतात याबद्दल शंका आहे .बाकी वरील खर्च ऐकून दंतवैद्य थोडे निराश होणे साहजिक आहे . पण काय करणार प्रक्रियांचा खर्च वाढवला /रेट वाढवला कि पेशंट कमी व्हायची भीती...
2 Sep 2016 - 8:19 pm | विवेकपटाईत
कडू लिंबाच्या काडीने दातून करणार्यांचे दात मजबूत राहतात. प्रत्यक्ष बघितले आहे. पण त्या साठी २०-२५ मिनिटे कडू चाववी लागते. तेवढा वेळ कुणा कडे.
1 Sep 2016 - 8:24 pm | ट्रेड मार्क
एकूणच भारतीयांमध्ये तब्येतीच्या बाबतीत अनास्था आहे, त्यात दातांच्या बाबतीत जास्तच.
आपण काय, कधी आणि किती खातो याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. वर व्यायाम फारसा नाही (यात मी पण आलो). त्यामुळे भारतीय लोक तसे मालन्यूट्रीशन्ड म्हणले पाहिजेत. विशेषतः हे परदेशात राहिल्यावर जास्त जाणवतं. अर्थात इथेही काही सगळेच तब्येतीने चांगले असतात असे नाही. पण बरेच लोक्स अगदी बांधेसूद असतात, नियमित व्यायाम करतात, खाण्यावर कंट्रोल ठेवतात. जे नसतात ते मात्र शब्दशः वेडेवाकडे सुटलेले असतात.
दाताच्या बाबतीत म्हणायचं तर भीती जास्त असते असं मला वाटतं. कॉलेजमध्ये असताना आमच्या आजोबांचा एक ठरलेला दंतवैद्य होता. माझी दाढ दुखत होती म्हणून मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तिथे माझ्या शेजारीच एक गाल सुजलेला माणूस बसलेला होता. तो म्हणाला रूट कॅनाल काही महिन्यांपूर्वी केलं त्यानंतर हे असंच आहे. बरीच सीटिंग्स झाली पण काही सुधारणा नाहीये. ते ऐकून मी जी धूम ठोकली ते पार त्या दाढेचे तुकडे पडल्यावर काढायला गेलो. विनोदाचा भाग सोडला तर ती खुर्ची, विविध टूल्स आणि हिरडीत दिलं जाणारं इंजेकशन याची बऱ्याच जणांना भीती वाटते.
2 Sep 2016 - 5:39 am | अनन्त अवधुत
पण क्लिनिंग झाल्यावर दातात फ्लुराईड का क्काय भरतात ते इन्शुरन्स देत नाही.
आधीच डॉक्टरला आणि इन्शुरन्सला विचारून घेणे.
त्याचे 15-20 डॉलर होतील, अर्थात डेंटिस्ट डेंटिस्ट चार्जेस भिन्न:
2 Sep 2016 - 5:46 am | रुपी
हे हे.. डेंटीस्टने माझे तोंड एकदा पोळवल्याने मी तर एका भेटीत सुरुवातीलाच तिला सांगितले की - मी माझे वॉलेटच घेऊन नाही आलेय, त्यामुळे जेवढे काही १००% कव्हर्ड असेल तेवढेच काम कर =)
तिने त्या भेटीत तसेच केले, पण मला वाटते एकंदरीत तिने माझ्या बाकी दातांचे भविष्यात काम निघेल असे काही काही करुन ठेवले, त्यामुळे इन्शुरन्स असूनही मी २-३ वर्षे कुठल्याच डेंटीस्टकडे गेले नाही :(
1 Sep 2016 - 7:03 pm | अजया
बापरे.काय आकडे आहेत हे.
1 Sep 2016 - 5:52 pm | पिलीयन रायडर
माझ्या मनातल्या भावना आहेत अगदी..
इथे येताना मी माझ्या मुलाच्या हृदयाचय सर्व टेस्ट करुन आले होते. सर्व काही नॉर्मल आहे. इथे पहिल्या डॉकला वेलनेस चेकप मध्ये दाखवलं, त्यांनी हिस्टरी सांगितली, त्यांनी तपासलं.. सगळं नॉर्मल होतं. फक्त "इथल्याही" कारडिओलोजिस्टला दाखवा म्हणे. आम्हाला वाटलं शाळेसाठी कंपल्सरी आहे. पण आम्ही थांबलो आणी तसंही अपॉईंटमेंट मिळतच नव्हती.
मग पुढची लस द्यायला वेगळ्या डॉककडे गेलो. तिला काही हिस्टरी माहिती नव्हती. तिने मानेवरची ऑपरेशनी खुण बघुन विचारलं की हे काय आहे? मी सांगितलं तर म्हणे इथल्या कार्डिओलॉजिस्टला का दाखवत नाही? म्हणलं का दाखवु पण? तर म्हणे "कारण तुम्हाला अॅव्हलेबल आहे इथे".. म्हणजे काय तर तुम्हा नॉन अमेरिकन लोकांना इथली लय भारी लोकं अव्हलेबल आहेत तर तुम्ही धन्य धन्य होऊन आधी इथे दाखवुन घ्यायला हवं!!
मग म्हणे.. आणि हो.. ह्याच्या छातीत मर्मर ऐकु येतेय.! आता गेल्या चार वर्षात न जाणे किती डॉक्टरांनी त्याला तपासलय, कधीही कुणालाही काही ऐकु आलं नाही ऑपरेशन नंतर.. ना कुठल्या टेस्ट मध्ये काही डिटेक्ट झालंय.. हिला आम्ही ऑपरेशनचं सांगितलं की लग्गेच मर्मर ऐकु आली!
पण आम्ही अर्थातच टरकलो! शोधाशोध सुरु केली.. आणि नेमकी त्याच वेळेला ही बिलं यायला सुरवात झाली..
आता आमचं फुल्ल धाबं दणाणलं आहे.. इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कदाचित किडन्या विकाव्या लागतील असा अंदाज आहे!!
1 Sep 2016 - 6:00 pm | रेवती
आम्हालाही नसलेल्या मर्मरबद्दल मुलाच्या तपासण्या करवण्यास सांगितले होते.
असं लिहिता येत नाही, कधितरी फोनवर बोलू.
आणि काहीतरी बोलू नकोस. कश्याला किडन्या विकाव्या लागतायत!
1 Sep 2016 - 6:14 pm | स्रुजा
बघ ना ! लगे हाथ दोन फटके पण दे तिला फोन केला की.
1 Sep 2016 - 6:34 pm | पिलीयन रायडर
ओ आम्ची पहिलीच वेळ आहे ना..!!
आम्हाला सवय नाहीये हो ५००$ ची बिलं पहाण्याची.. बरं एकदाही काही आजार आहे म्हणुन दवाखान्यात गेलो नाही आहोत.. तरी कसं काय ह्यात अडकलो देव जाणे!
ती जी क्षयाची चाचणी आहे ना.. पीपीडी.. स्किन टेस्ट.. ती जर भारतातुनच करुन येता येणार असेल तर तसं सांगा लोकांना इथे यायच्या आधीच.. बिचार्यांचे पैसे तरी वाचतील!
1 Sep 2016 - 8:01 pm | ट्रेड मार्क
शाळेला फक्त तुम्ही सगळ्या लसी दिल्या आहेत आणि टीबीची टेस्ट एवढंच लागतं. उगाच ती डॉक्टर सांगते म्हणून कार्डिओ ला भेटायची गरज नाही. तिला सांगायचं तुझ्या स्टेथो मध्ये मर्मर होत असेल.
इथे डॉक्टर जे काही सांगतात त्यातलं काय काय खरंच गरजेचं आहे ते तिथल्या तिथे विचारायचं. अगदी आपलं समाधान होईपर्यंत.
होतं काय की अमेरिकन लोक्स जरा काही इकडे तिकडे झालं की केस टाकतात आणि भरपाई मिलिअन्समध्ये मागतात. त्यामुळे डॉक्टर्स पण ज्या काही शक्य आहेत त्या सगळ्या टेस्टस करायला सांगतात. कारण त्यांच्या दृष्टीने इन्शुरन्स पैसे देणार असतं.
आपण प्रश्न विचारले की आपल्याला त्यातला काय पाहिजे काय नाही ते कळू शकतं, माहिती घेऊन आपल्या भारतातल्या डॉक्टरला विचारू शकतो. त्यामुळे प्रश्न विचारणे गरजेचे आहे -
- कसली टेस्ट आहे?
- त्यातून काय काय कळेल?
- मला आत्ता होणाऱ्या त्रासासाठी ती कशी गरजेची आहे? किंवा आत्ता काही त्रास होत नाहीये तरी का करायला पाहिजे?
- साधारण किती खर्च येतो?
- इन्शुरन्स मध्ये कव्हर होते का?
1 Sep 2016 - 8:13 pm | पिलीयन रायडर
हो आता हेच सुरु केलं आहे. जे आवश्यक आहे तेसुद्धा चारदा चौकशी करुन करतोय!
1 Sep 2016 - 9:40 pm | अभिजीत अवलिया
इथे कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कदाचित किडन्या विकाव्या लागतील असा अंदाज आहे!!
-- अबबबब. नुसती कटकट. आता मी बायको आणि मुलाला इकडे घेऊन आलो नाही ते योग्य केले असे वाटायला लागलेय.
1 Sep 2016 - 6:27 pm | योगेश कोकरे
भारत एक मेडिकल टुरिजम : ह्या वर धागा काढा आता . कोणी कोणी कोणत्या वैद्यकीय मदतीसाठी भारतात आले होते आणि त्यामुळे त्यांचे किती पैसे वाचले ह्या बद्दल मिपाकरांनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी . मेडिकल ट्रीटमेंट चा दर्जा ऊस(US) मध्ये चांगला असेल तर मग इकडे का बरं यावं. असो अखिल भारतीय स्वस्तात मस्त संघटना आपले कायम स्वागत करेल भारतात ......
1 Sep 2016 - 6:35 pm | पिलीयन रायडर
मलाही अजुन दर्जात फरक नाही जाणवलाय. म्हणजे हे पैसे नक्की कशाचे आहेत आणि तमाम अमेरिकन जनता का ते सहन करते आहे देवच जाणे!
1 Sep 2016 - 6:50 pm | चौकटराजा
दुसर्या देशामधे युद्ध लावायचे
शस्स्त्रात्रे विकायची
अर्थव्यवस्था मोठी होते
दरडोकी उत्पन्न वाढते
क्रयशक्ती वाढते
अशावेळी दर्जाचा काय संबंध....आपल्या कडील काही श्रीमंत मंडळी कांदा आवक कमी झाली की कोणत्याही भावाने कोणत्याही दर्जाचा कांदा घेतोच की.
1 Sep 2016 - 6:46 pm | रेवती
मी सुट्टीसाठी आले असताना धडपडले. हॉस्पि. मध्ये सेवा चांगली मिळाली. इन्शुरन्स आहे पण त्यासाठी २४ तास अॅडमिट व्हावं लागेल, त्याकळात फक्त निरिक्षणाखाली ठेवलं जाईल असं सांगितलं. मला फ्रॅक्चर असल्याने कास्ट घालावा लागणारच होता पण नियमात बसण्यासाठी थांबायची तयारी नव्हती म्हणून इन्शू. न वापरता उपचार करवून घेतले. तिथे काही तासां चे १५०००रु बिल आले ते भरले. हामेरिकेत असे करणे परवडले नसते. हामेरिकेत अनुभवलेली सेवा (दर्जा) व भारतातील सेवा सुदैवाने सारखी अनुभवास आली. इथे किरकोळ फरक ध्यानात घेतले नाहीत. सुदैवाने दिसेल त्या हॉस्पि. मधे जाण्याची वेळ आली नाही तर चांगल्या ठिकाणीच नेले गेले हे ही होतेच. अगदी चुका काढायच्याच तर मोडक्या पेशंटास कमीत कमी दुखवून कपडे बदलावेत ही गरज होती, त्यावेळी इतर गप्पा चालू होत्या, तसेच हामेरिकेत पेशंटास तयार करून ठेवले व दीड तास वाट बघत झोपवले. हे सोडता तक्रार नाही. हॉस्पि.च्या बर्या सेवेबद्दल तुम्ही समधान व्यक्त करू शकता ..........आनंद नाही.
1 Sep 2016 - 8:08 pm | फेरफटका
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कुठेही रहायचं असल्यास तिथल्या पद्धतीनं राहिल्यास गोष्टी सुकर होतात. अमेरिकेत टेंपररी येणारे - बहुतेक आय.टी. वाले, अमेरिकेत राहून, देसीपणा, जुगाड करून रहातात आणी चटका बसला की भारताचे गोडवे गातात असं माझं निरिक्षण आहे. तसच आणी तितकच, अमेरिकेतून भारतात सुट्टीसाठी गेल्यावर अमेरिकन सुविधांची अपेक्षा भारतात करतात आणी नाकं मुरडतात हा सुद्धा अनुभव कॉमन आहे. ह्या वाक्यात जनरलायझेशन वगैरे नाहीये आणी ते ज्याला लागू पडत नाही त्याने मनावर घेऊ नये. पण हा अनुभव खोटा नाहीये आणी अपवादात्मक सुद्धा नाहीये.
ज्याला जिथे आवडतं, पटतं, जमतं तिथे रहाण्याचा चॉईस असल्यास आनंदाने तिथे रहावं पण एकीकडे राहून, दुसर्या ठिकाणचे फायदे हवेत, पण तिथल्या त्रुटी नकोत असे नकाश्रू वहायचे - बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स- ही अपेक्षा अवास्तव आहे.
1 Sep 2016 - 8:12 pm | पिलीयन रायडर
मुद्दा पटतोय तुमचा कारण मी सुद्धा असे लोक पाहिले आहेत.
पण फक्त वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी हे माझे मत आहे. ह्यात बेस्ट ऑफ बोथ वर्ड्ल्सचा प्रश्न नाही. ही मुलभुत गरज आहे.
1 Sep 2016 - 8:40 pm | फेरफटका
"वैद्यकीय सुविधेसारखी गोष्ट आवाक्यात हवी" - सहमत.
चांगले - वाईट अनुभव दोन्हीकडचे आहेत. प्रश्न आपल्या कंफर्ट झोन चा आणी कुठल्याही सिस्टीम ला सरावायचा आहे.
अमेरिकेत सुद्धा डॉक्टर ला संध्याकाळी घरी फोन करून किंवा टेक्स्ट मेसेज करून सल्ला घेतला आहे, किंबहून डॉक्टर ने स्वतः सुद्धा शनिवारी टेक्स्ट करून मुलाच्या तब्ब्येतीची चौकशी केलेली आहे. भारतात जायच्या दिवशी मुलगा आजारी पडला असताना, त्या पिडीयाट्रीशीयन ने ऑफिस अवर च्या अर्धा तास आधी येऊन तपासणी करून औषध प्रिस्क्राईब केलं आणी फारमसिस्ट ला फोन करून ते अगदी तयार करून ठेवायला सांगितलं आणी वेळ आलीच तर म्हणून स्वतःकडची सँपल्स पण दिली. हे अनुभव सगळीकडे येतात. चांगला ईंश्यूरन्स असेल तर बाळंतपणं पूर्णपणे फुकट सद्धा होतात. आणी त्या च्या विरुद्ध टोक म्हणजे भारतातल्या एका दंतवैद्याने अर्धवट केलेलं रूट कॅनॉल, केवळ तुम्ही अमेरिकेत रहाता म्हणून आम्ही तुमच्याकडून जास्त पैसे घेतो असं सांगून घेतलेले जास्त पैसे (मग, आम्ही गरिबांकडून घेत नाही . आयजीच्या जीवावर बायजी उदार) हे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत.
तरीसुद्धा कुठलीही एक सिस्टीम संपूर्ण चांगली / वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ज्या सिस्टीम मधे रहायचं त्या सिस्टीम चे संकेत, नियम पाळल्यास ते सुकर - सुसह्य होतं ईतकच मी म्हणीन.
1 Sep 2016 - 8:45 pm | आजानुकर्ण
फेरफटका दोन्ही प्रतिसाद आवडले.
1 Sep 2016 - 8:55 pm | पिलीयन रायडर
अर्थातच..
भारतातल्या वैद्यकीय सुविधेबद्दल खुप चर्चा आधीच झालेली आहे. मुर्ख डॉक्टर सगळीकडेच असु शकतात. भारतातली सुविधा किमान आवाक्यात तरी आहे हेच काय ते सुदैव!
ह्या चर्चेतुन ह्या सिस्टीममध्ये ज्यांना रहायचं आहे त्यांना ती अधिकाधिक सुकर कशी होईल हेच शोधायचे आहे. नवख्यांना अनेक गोष्टी माहिती नसतात. अनेकदा केवळ माहिती नाही म्हणुन अकारण बरेच जास्त पैसे भरावे लागतात. त्या दृष्टिने ही चर्चा महत्वाची आहे.
1 Sep 2016 - 8:57 pm | ट्रेड मार्क
याला पूर्ण सहमत
ते संकेत, नियम सांगणे हाच उद्देश होता. बहुधा सफल झाला नसावा. लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, कमी जास्त झालं असेल ते सांभाळून घ्या.
2 Sep 2016 - 1:51 am | प्रियान
+100, दोन्ही प्रतिसादांना !
2 Sep 2016 - 1:52 am | प्रियान
फेरफटका यांच्या प्रतिसादांना, असे म्हणायचे होते!
1 Sep 2016 - 8:54 pm | ट्रेड मार्क
धाग्याचा उद्देश फक्त माझा अनुभव सांगणे आणि त्यातून बाकीच्यांना काही झालीच तर मदत हा आहे. इथली वैद्यकीय व्यवस्था गंडलेली आहे हे म्हणणं म्हणजे शिव्या घालणं नसून फक्त माझं झालेलं इम्प्रेशन आहे.
तिथल्या पद्धतीने राहायचं म्हणजे या प्रसंगात काय करायला पाहिजे होतं ते स्पष्ट केलंत तर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन होईल.
तुमच्याशी काही अशी अंशी सहमत. तुम्ही म्हणताय अनुभव खोटा नाहीये पण तो मनुष्य स्वभाव नाही का? साध्या हॉटेलात बसून खाताना लोक म्हणतात की कधी ५ स्टार मध्ये खायला मिळेल आणि ५ स्टार मध्ये गेल्यावर खाद्यपदार्थांना साध्या हॉटेलात कशी चव छान असते हे बोलतात. फक्त भारतीयच नाही तर अमेरिकन्स पण इथल्या हेल्थ सिस्टिमला शिव्या घालतात.
पिरा म्हणतात तसं वैद्यकीय सेवा ही जीवनावश्यक आहे. त्यामुळे ती तरी आवाक्यात हवी. आपल्याकडून कोणी उगाच पैसे जास्त काढत नाही ना, जे पैसे आपण मोजतोय ते त्या सेवेसाठी योग्य आहेत ना, एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना घेणं याला देसीपणा, जुगाड कसं म्हणता येईल? असो.
1 Sep 2016 - 9:22 pm | बहुगुणी
MDsave
PriceCheck
Estimate My Costs
1 Sep 2016 - 9:28 pm | फेरफटका
अगदी सुरूवातीला लिहील्याप्रमाणे तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. ह्या शेअरींग मधून खूप गोष्टींचा उहापोह होतो आणी बरीच वेगळी माहिती मिळते.
ईंशूरन्स ईंडस्ट्री ने बर्याच क्षेत्रांना वेठीस धरलय हे तर खरंच आहे. पण त्यातही अधिक - उणं आहेच. आणी कितीही सरकर-बदल वगैरे झाले तरी ईतकी मोठी आणी खोलवर रुजलेली सिस्टीम फार मोठे बदल सामावून घेऊ नाही शकत. आपल्या हातात चांगला ईंश्यूरन्स घेणं, तुम्ही म्हणता तसं जास्तीत जास्त प्रश्न विचारून स्वतःला वेल-ईन्फॉर्म्ड ठेवणं हे असतं. एक चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेत डॉक्टर ला प्रश्न विचारल्याचा राग येत नाही. किंबहूना तुम्ही विचाराल तितकी तुमच्या तब्ब्येतीची माहिती, औषधांची माहिती, आफ्टर-केअर विषयी महिती तुम्हाला दिली जाते. ह्यातली बरीचशी न विचारता सुद्धा दिली जाते. कदाचित ह्या ईंश्यूरन्स ईंडस्ट्री च्या दणक्यामुळे सुद्धा तसं असावं. पण सवय नसताना कधी कधी गांगरून जायला पण होतं.
२०% पैसे मागण्यामागे मला वाटतं की जर तुमचा ईंन्शूरन्स नसेल तर निदान ऑपरेटींग कॉस्ट तरी वसूल व्हावी हा उद्देश असावा. बाकीचं बिल बहूदा बॅड डेट म्हणून राईट-ऑफ केलं असावं. पण ईंश्यूरन्स नाही म्हणून उपचार थांबवले नाहीत. ईमर्जन्सी रूम मधे वाट पहायला लागणे हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे. पण वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे तुम्ही बरेच वेळा मरणाशी झुंजणार्या पेशंट्स बरोबर लाईन मधे असताना, तुमचा क्रम उशीरा लागतो.
"एखाद्या डीलमध्ये वस्तू स्वस्त मिळत असताना" - ह्या बाबतीत माझं तरी असं मत आहे की यू गेट व्हॉट यू पेड फॉर.
1 Sep 2016 - 11:21 pm | ट्रेड मार्क
हे महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट. इथे नियमाप्रमाणे पहिले उपचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पैसे देऊ शकता की नाही, कसे आणि कधी देणार हे सगळं नंतर येतं. त्यामुळे पहिले पैसे भरा मगच उपचार सुरु करू असं इथे होत नाही.
मान्य. मी केवळ ER मध्ये गेलं की तत्पर सेवा मिळेल अशी कोणी अपेक्षा ठेवू नये म्हणून सांगितलंय. मी तिथे भांडलो नाही, आवाज चढवला नाही वा शिव्याही घातल्या नाहीत. पण मी म्हणल्याप्रमाणे सगळे निवांत दिसत होते, म्हणून मग असं वाटलं की इथे माझी मुलगी त्रासात आहे तर तिला तरी पटकन ट्रीटमेंट द्या. दुसऱ्याबाजूने विचार केला तर ER मध्ये आलो म्हणून जास्त पैसे घेतात, मग काहीतरी SLA पाहिजे ना. नुसता एक्सरे काढायला २ तास, पुढे प्लॅस्टर (?) घालायला ३ तास. तेवढा वेळ मुलींसकट आम्ही उपाशी. पाणी प्यायचं असेल तर फक्त फाऊंटनवरून. बाहेर जाता येत नाही कारण ते कधी बोलावताहेत ते माहित नाही. त्यामुळे जरा अनुभव सांगावासा वाटला. तसंही प्रत्येकाला आपला पेशंट जास्त महत्वाचा वाटतो त्यामुळे मलाही वाटले असेल तेव्हा की लवकर उपचार मिळावेत.
नॉट ऑल्वेज ट्रू. एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये मी हॉटेलच्या वेबसाईट वरून रूम बुकिंग केलं तर $XX मध्ये मिळते आणि तेच priceline, expedia ई वरून केलं तर $XX - Y मध्ये मिळते. तर इथे काय फरक असेल? अश्या वेळेला उगाच बाणेदारपणा कशाला दाखवा?
काही काही गोष्टीत देसीगीरी दाखवायला लागते त्याला काही उपाय नाही. उदा. इथे रेस्टोरंटमध्ये एका प्लेटमध्ये एवढं मिळतं की आम्ही दोघे खाऊ शकतो. मग आम्ही सरळ २ प्लेट घेऊन चौघे खातो. काही लोक विचित्र नजरेने बघतात पण काही पर्याय नाही. उगाच ४ प्लेट घ्यायच्या आणि टाकून द्यायचं पटत नाही आणि बांधून घरी घेऊन गेलं तर शिळं चांगलं लागत नाही. त्यामुळे आम्ही इग्नोर करतो त्या नजरा.
1 Sep 2016 - 9:29 pm | सुबोध खरे
http://mobile.nytimes.com/2015/09/21/business/a-huge-overnight-increase-...
औषधांच्या किमतीवर नियंत्रण नसल्याचे तोटे.
1 Sep 2016 - 9:43 pm | फेरफटका
मुक्त बाजारपेठेची फायदे-तोटे आपण सर्वजण च भोगतो.
त्याची दुसरी बाजू - खुली स्पर्धा ही पण आहेच. हे बघा: http://www.cbsnews.com/news/express-scripts-will-offer-1-alternative-to-...
1 Sep 2016 - 9:32 pm | पद्माक्षी
काही असले तरी प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते ?
रच्याकने,
अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात?
1 Sep 2016 - 9:40 pm | फेरफटका
"प्लास्टर घालण्यासाठी ३५००डॉलर्स चे समर्थन कसे काय होऊ शकते" - किती डॉलर्स पर्यंत समर्थन होऊ शकेल? हा प्रश्न उपरोधिक आहे ह्याची मला जाणीव आहे. पण कुठल्याही गोष्टीची किंमत ठरवताना बर्याच गोष्टी त्यात अंतर्भूत असतात - ज्यात फिक्स्ड कॉस्ट, ओव्हरहेड वगैरे पण येतं.
"अमेरिकेसंदर्भात काही अडचण सांगितली तर लोकं लगेच डिफेन्सिव्ह का होतात" - मी कुठेही अमेरिकेचा बचाव वगैरे केला नाहीये. ज्याला जिथे सुखानं रहाता येईल तिथे रहावं, ज्या सिस्टीम मधे रहायचं असेल त्याचे संकेत / नियम पाळून रहावं, चांगले-वाईट अनुभव सगळीकडे येतात असा साधारण माझा सूर आहे. मांडलेल्या अडचणीवर एक दुसरी बाजू मांडली तर ते बचाव / समर्थन नाही तर, चर्चेची दुसरी बाजू आहे. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धागाकर्त्याचं अभिनंदन केलं ते त्याच भुमिकेतून.
1 Sep 2016 - 9:54 pm | पिलीयन रायडर
कॉस्ट संदर्भात.
अगदी इमर्जन्सी नसली तरी इथे खुप जास्त पैसे लावतात. जसे की डोळ्यांच्या डॉक कदे पहिली व्हिजिट मुलाची,५८२$, एक्स रे - ४००$ इ. मुलाच्या वेलनेस व्हिजिट्चे (ज्यात अगदीच प्राथमिक तपासणी झाली) आम्हाला काही बिल नसले तरी डॉक्टरने ८५०$ क्लेम केले आहेत.
तर इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते. एकवेळ जिथे मनुष्यबळ लागते तिथे मी समजु शकते. पण केवळ एक्स रे "काढण्याचे" ४००$ कसे काय होऊ शकतात? इतकी कसली कॉस्ट आहे?
इथल्या जनतेचे पगार काय ते नक्की माहिती नाही, पण उत्पन्नाच्या मानाने अशा साध्या गोष्टींची कॉस्ट मला तरी जास्त वाटत आहे.
1 Sep 2016 - 9:59 pm | रेवती
तुमचा इन्शू पुन्हा एकदा तपासावास असे सुचवते.
आम्हीही डोळे तपासून घेतो पण एवढी बिले अजून तरी आली नाहियेत.
1 Sep 2016 - 10:01 pm | पिलीयन रायडर
कसा तपासुन घेऊ? म्हणजे नक्की काय तपासुन घेऊ?
डोळे तपासले, काही प्रॉब्लेम नाही म्हणाले आणि इतकं बिल पाठवलं.. ह्यात मी नक्की काय करु शकते.
आमचा डोळ्यांचाही इनशुरन्स आहे.
1 Sep 2016 - 10:06 pm | रेवती
थांब जरा, एवढे लिहिणे जमणार नाही. माझे उत्तर तयार झाले की फोन करते.
1 Sep 2016 - 10:45 pm | ट्रेड मार्क
तुम्हाला एवढे पैसे देणं आहे का टोटल बिल एवढं आहे? डोळ्याच्या इन्शुरन्समध्ये नेत्रतपासणी फुकट असते. एक्सरे चे जास्त पैसे लावलेत असं मला वाटतंय. रेवतीताई म्हणतायेत त्याप्रमाणे एकदा इन्शुरन्स काय आहे ते तपासून बघा.
इथल्या जनतेचे पगार तुलनेने कमी असतात. NJ मध्ये personal per capita income of $50,781 आहे तर हाऊसहोल्ड इनकम (दोघेही काम करतात असं समजलं तर) $७२००० च्या आसपास आहे. बहुतेक करून IT वाल्यांना यापेक्षा बरा पगार असतो.
अवांतर: इथल्या शाळाशिक्षकाला पगाराची सुरुवात साधारण ३०-३५००० डॉलर पासून होते तर पोलिसाला साधारण ४५-५०००० डॉलर्स पगार मिळतो.
मला व्यनी करून कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवलेत तर मी काहीतरी सांगू शकेन.
1 Sep 2016 - 10:54 pm | बहुगुणी
इतकी कॉस्ट का? हीच गोष्ट भारतात फार स्वस्तात होते.
पिराताई: तुमच्या दुसर्या धाग्यात दिलेलं स्पष्टीकरण (चार्जमास्टर) हे कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मदत करेल. तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला फोन करून 'साध्या' टेस्ट्स ची त्या हॉस्पिटल मधील त्यांची निगोशिएटेड किंमत काय आहे ते विचारा (तो तुमचा हक्क आहे), तुमच्या विभागातल्या फेअर प्राईस अंदाजावरून ती अवास्तव असेल तर ती तशी का आहे ते त्यांना विचारा. काही वेळा ते सभासद गमावण्यापेक्षा निगोशिएट करून चार्जेस कमी करतात. वचने किं दरिद्रता? फोन-पलिकडचे इंन्शुरन्स एजंट काही तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाहीत, ना तुम्ही त्यांना, नुसतं विचारण्याने फायदा होत असेल तर बोलून पहायला काय हरकत आहे?
1 Sep 2016 - 11:11 pm | धर्मराजमुटके
पैसे जास्त का वाटतात ते कळले नाही ? डॉलर वि. रुपया अश्या हिशोबामुळे तुम्हाला कदाचित ते जास्त वाटत असावेत. तुम्ही भारतात आहात आणि एक्स रे साठी ५०० रु. डॉक्टर चार्ज ८५० रु. असा विचार करुन पाहिला तर कदाचित जास्त वाटणार नाही. फक्त डॉलरच्या जागी रुपया असे लिहून पहा बरे एकदा !
अवांतर (तुम्हाला उद्देशुन नाही) : बाहेर देशात जाताना घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था होत असते काय लोकांची ?
1 Sep 2016 - 11:35 pm | ट्रेड मार्क
याच धर्तीवर रुपयाच्या जागी डॉलर लिहा... भारतात मला समजा रु. १० लक्ष पगार असेल आणि मग अमेरिकेत आल्यावर मला $१० लक्ष पगार मिळणार असेल तर मग एक्सरे साठी $५०० द्यायला काहीच हरकत नाही.
$१० लक्ष पगार - कधी येणार तो दिवस? सगळ्यांनी प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा रे.
तसं नाही म्हणणार मी. फेफा साहेब/ ताई (?) जसं म्हणताहेत की नवीन जागी तुम्हाला तिथले नियम किंवा हे कसं चालतं हे माहित नसतं म्हणून सुरुवातीला त्रास वाटतो. कोणी सांगणारं असेल किंवा स्वानुभवातून एकदा कळलं की मग काही वाटत नाही.
2 Sep 2016 - 1:46 am | पिवळा डांबिस
हा तुमच्या आणि तुमच्या एम्प्लॉयरच्या मधला प्रश्न आहे की नाही ट्रेडमार्कसाहेब?
त्याचा अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या हेल्थ केअर सिस्टम आणि किंमत ह्याच्याशी काय संबंध आहे? :)
अमेरिकन हेल्थ केअर सिस्टीम ही त्यांनी त्यांच्या नागरिकांसाठी बनवलेली आहे. तिथे प्रत्येक काम करणार्या व्यक्तिने हेल्थ इन्शुरन्स बाळगणं हे अपेक्षित आहे. जे रिटायर्ड वा अतीगरीब अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी अनुक्रमे मेडिकेअर आणि मेडिकेड हे फुकट/स्वस्तातले इन्शुरन्स आहेत.
दर्जाच्या दृष्टीने विचार केला तर किरकोळ कारणांसाठी भारत आणि अमेरिका इथे फारसा फरक नाही. पण इमर्जन्सी/ मोठ्या कारणांसाठी उपचार (इन्क्लूडिंग चाईल्डबर्थ) ह्याचा विचार केला तर दर्जात अजीन-अस्मानाचा फरक आहे.
एक स्वतःचा अनुभव सांगतो...
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीला एकदा अचानक भोवळ आली. तेंव्हा मी तिच्यासमोरच उभा असल्याने मी तिला पडण्यापासून सावरलं आणि बेडवर निजवलं. ९११ ला कॉल केलं.
आता हॉस्पिटलला जावं लागणार म्हणून कपडे बदलले आणि शूज घालेपर्यंत (५-७ मिनिटे) दारावर नॉक झालं. दार उघडून बघतो तर बाहेर पोलीस उभा.
"मेडिकल इमर्जन्सी?"
"येस"
"व्हेअर इज द पेशन्ट?"
"इन द बेडरूम"
तो पोलीस बाजूला झाला, त्याच्यामागे उभे असलेले दोन पॅरामेडीक्स आत शिरले. त्यांनी पेशंटला त्यांच्याबरोबर आणलेल्या फोल्डिग व्हीलचेअरवर बसवलं, तिथेच सलाईन चालू केलं. पेशन्ट अजून बेशुद्धच....
मी काही सांगू गेलो तर त्यांनी मला थांबवून त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला,
"विच इज युवर हॉस्पिटल?"
मी सांगितल्यावर ते ती व्हीलचेअर घेऊन दोन जिने उअतरून निघून गेले. मी घराला कुलूप लावून खाली येऊन बघतो तर पुढे पोलीस कार आणि मागे अॅम्ब्युलन्स लाईटस लावून सायरन मारत बघता बघता भरधाव निघून गेले. त्यांच्या मागे मी शक्य तितल्या वेगाने पण सिगन्ल्स पाळत हॉस्पिटलात पोहोचलो (अंदाजे १५ मिनिटांचा ड्राईव्ह). मी गाडी पार्क करून आत जाऊन बघतो तर त्यांनी तिला अॅडमिट करून घेऊन आधीच उपचार सुरू केले होते. पेशन्ट शुद्धीवर आणला गेला होता, टेस्टींगसाटी ब्लड घेऊन ते लॅबला पाठवलं गेलं होतं....
लॉन्ग स्टोरी शॉर्ट, रात्रभर ऑब्झर्व्हेशनखाली ठेवून दुसर्या दिवशी पेश्न्टला डिस्चार्ज मिळाला. दुखण्याचं निदान आणि त्यावरची प्रिस्क्रिप्शन्स मिळाली...
खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल.
बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला....
सारांश काय, की इन्शुरन्स चांगला भरवशाच्या कंपनीकडून हवा.
2 Sep 2016 - 2:15 am | ट्रेड मार्क
धर्मराजांनी $५०० आणि रु. ५०० सारखे माना म्हणलं म्हणून मी ते उदाहरण दिलं हो. माझा आणि माझ्या एम्प्लॉयरमधला हाच प्रश्न सुटावा म्हणून फक्त सगळ्यांना प्रार्थना करायला सांगतोय. कळकळीची विनंती आहे.
बाकी तुम्ही सांगितलेला अनुभव बरोबर आहे आणि इतकी तत्पर सेवा मिळते यात वादच नाही. बाकी भरवशाच्या इन्शुरन्सकडून पण बरेच अडवणुकीचे किस्से आहेत. त्यामुळे भरवशाची म्हैस कधी कधी टोणगा पण देऊ शकते ;)
इन्शुरन्स असो वा नसो इतकीच तत्पर सेवा प्रत्येकाला मिळेल याची खात्री आहे.
2 Sep 2016 - 7:54 am | पिवळा डांबिस
मी फारसा आस्तिक नाही त्यामुळे माझ्या प्रार्थनेचा कितपत उपयोग होईल ते माहिती नाही...
पण तुमच्यासाठी आणि अशा अन्य लोकांसाठी मी जरूर प्रार्थना करीन.
शेवटी सगळ्यांचं कल्याण झाल्याशी मतलब.
13 Sep 2016 - 9:44 pm | उदय
पिडाकाका, हे असे पाहिजे.
एक स्वतःचा अनुभव सांगतो...
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे........
खर्च डॉलर ३० आला, इआरचा डिडक्टिबल.
बाकी सगळा खर्च इन्शुरन्स कंपनीने भरला....
आता कुठलाही इंश्युरन्स ३० डॉलरमध्ये इआरमध्ये पाऊल टाकू देणार नाही.
14 Sep 2016 - 1:52 am | रुपी
मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्हाला $३५ आला होता.
14 Sep 2016 - 4:24 am | पिलीयन रायडर
पण तुझी डिलिव्हरी सुद्धा काहीही न देता झालीये ना? इकडे आम्च्या मित्राला ६ हजार खर्च आलाय. इन्शुरन्स मुळे हा फरक पडतोय. तुझा इन्शुरन्स खुप चांगला असणारे.
14 Sep 2016 - 4:39 am | रुपी
खूप चांगला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. कारण माझ्या इन्शुरन्समध्येही बरे-वाईट सगळेच आहे. माझा आत्तापर्यंतचा अनुभव चांगला आहे खरा.
शिवाय, डिडक्टेबल हा त्यातला एक भाग झाला. कुठल्या डॉक्टरकडे जाता येऊ शकते, स्पेशॅलिस्टची गरज पडली तर काय, ट्रॅव्हल करताना गरज पडली तर काय अशा अनेक बाबी आहेत. त्यादृष्टीने सगळ्यांनाच हा इन्शुरन्स जमेल/ आवडेल असेही नाही.
1 Sep 2016 - 10:28 pm | संदीप डांगे
ते ओबामा केअर चा फार गवगवा झालेला मागे, काय स्थिती आहे आता? तेव्हा बरीच चर्चा वाचलेली, आता काय आठवत नाहीये,
1 Sep 2016 - 10:51 pm | ट्रेड मार्क
मला फारशी माहिती नाही याबद्दल. पण माझ्यामते हे फक्त सिटिझन्ससाठी आहे. त्यातही इन्शुरन्स कंपन्यांचा बऱ्यापैकी विरोध आहे याला.
कोणी माहितगार असेल तर अधिक माहिती पुरवावी.
1 Sep 2016 - 11:02 pm | बहुगुणी
अफोर्डेबल हेल्थकेअर अॅक्ट (ओबामाकेअर) मधील तरतुदींचा फायदा* फक्त अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड-धारक पर्मनंट रेसिडेंट्स यांना उपलब्ध आहे.
(* फायदा: ही वादग्रस्त गोष्ट आहे, निवडणूकीत बरंच भलंबुरं ऐकायला मिळेल!)
1 Sep 2016 - 11:06 pm | अभ्या..
हामरिकेत असे अचानक तर रेटस वाढले नसतील ना? एकतर पहिल्यापासूनच डॉक्टर हा प्रकार महागडा असतो असे काहीतरी असणार किंवा काहीतरी ट्रिगर झाले असणार कि (उदा रिस्टरिक्षन्स, अव्हेलिबिलिटी, सिक्युअर दृष्टिकोन) तेव्हापासून वैद्यकीय सेवा महागल्या.