काय, कधी कुठे? - अमेरिका

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
27 Aug 2016 - 6:34 pm

अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..

तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.

जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.

आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!

किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!

अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!

धन्यवाद!

देशांतरराहती जागामाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 7:01 pm | चित्रगुप्त

न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध मेट्रोपॉलिटन म्यूझियम हे खरेतर 'पे अ‍ॅज यू विश' आहे, परंतु तसे लिहिलेले नसते. २५ डॉलरचे तिकीट घेणारांची मोठी रांग असते, परंतु बाजूला रिकाम्या असणार्‍या काउंटर वर जाऊन मला ५ डॉलर डोनेशन द्यायचे आहे, आम्ही चार (किंवा जितकेही) जण आहोत, असे सांगितले तरी सर्वांना प्रवेश मिळतो.
.

चित्रगुप्त's picture

27 Aug 2016 - 7:05 pm | चित्रगुप्त

वरील विषयाबद्दल बातमी:
http://therealdeal.com/2015/02/09/the-met-can-keep-controversial-pay-wha...

पद्मावति's picture

27 Aug 2016 - 7:37 pm | पद्मावति

लायब्ररी फ्री असतात. एका ब्रांच मधून पुस्तकं घेऊन दुसर्‍या ब्रांच मधे रिटर्न करता येतात. तसेच एखादं पुस्तक मिळालं नाही तर लायब्ररी च्या कॅटलोग मधून मागवता येतं. मराठी पुस्तकं पण मिळतील. cleveland च्या पब्लिक लायब्ररी मधे प्रचंड संख्येत मराठी आणि हिंदी पुस्तके आहेत.
अजुन एक पर्याय मराठी पुस्तकांसाठी म्हणजे रसिक डॉट कॉम ही लायब्ररी. सहा माहिने किंवा एक वर्षांसाठी पैसे भरून पुस्तके ऑर्डर करता येतात. अगदी घरपोच सेवा आहे. पुस्तके वाचून झाली की पोस्टाने पुस्तकं पाठवून द्यायची. रिटर्न लेबल तेच देतात.
बार्न्स & नोबल सारख्या दुकानात आणि लायब्ररी मधे सुद्धा मुलांसाठी स्टोरी टेलिंग सारखे छान कार्यक्रम असतात.

सार्वजनिक वाचनालयात संगणक वापरता येतात. प्रिंटिंगची सोय असते. काही महत्त्वाचे प्रिंट करुन घ्यायचे असेल तर जुजबी पैसे भरुन करता येतं. इंटरनेट साधारणपणे दोन तास एका व्यक्तीला वापरु देतात. फारच गर्दी असेल तर लोक आपणहूनच जरुर तेवढा वेळ वापरुन पुढच्यास जागा देतात.

ऑडिओबुक्स हा फारच सुंदर प्रकार बहुतेक सर्व वाचनालयातून मिळतो. मुलांसाठी ही फारच छान सोय असते. चालत्या गाडीत ऑडिओ सीडी लावली की मुलं तासंतास गोष्टी ऐकतात. याचा मला जाणवलेला फायदा म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला ताण मिळतो. फक्त ऑडिओ असल्यामुळे मुलं गोष्टीत हरवून जातात आणि एकेक प्रसंग डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करत असतात. या पुस्तकांचं वाचनही अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं असतं. बहुतेक वाचक मंडळींना नाटकाचं प्रशिक्षण मिळालेलं असावं इतकं उत्तम वॉइस मॉड्यूलेशन, गोष्टीतले भाव व्यक्त करणं हे असतं.
मला तर मोठ्यांची ऑडियोबुक्स देखील आवडली. :)

"चीपर बाय द डझन"चे ऑडिओ-बूक ऐकायला खूपच छान आहे. मी पुस्तक वाचले होते, पण ऐकण्यातली मजा वेगळीच! मुलांसाठीचे अजून ऐकले नाहीत, आता आणायला पाहिजेत.

बाकी जास्त आमच्या गाडीत "सेल्फ-हेल्प" प्रकारातलेच ऑडिओबूक्स चालायचे आणि मला बर्‍याचदा त्या वाचणार्‍या व्यक्तीचा आवाज फारच तीव्र वाटतो :(

लायब्ररीची आणखी एक चांगली सोय म्हणजे Link+. यात वेगवेगळ्या शहरांच्या लायब्ररीज एकत्र आलेल्या असतात आणि तुम्हाला हवे असलेले पुस्तक दुसर्‍या शहराच्या लायब्ररीत असेल तरी तुम्ही मागवू शकता. फक्त उशीराचा दंड वगैरे नियम थोडे वेगळे आहेत, पण फारच चांगली सोय आहे ही. इंटर-लायब्ररी-लोन असाही एक प्रकार आहे, पण मी स्वतः अजून वापरुन पाहिला नाही, त्यामुळे नक्की कसा वापरावा हे माहीत नाही.

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 1:27 am | पिलीयन रायडर

ऑडिओ बुक्स असतात हे पाहिलं होतं पण घेऊन पाहिली नाहीत. आता मात्र घ्यायला हवी होती असं वाटतय! एक दोन दिवसात पुस्तक बदलायला चक्कर होणार आहेच. तेव्हा नक्की घेते. पब्लिक लायब्ररी हा एक फार सुंदर प्रकार आहे अमेरिकेत. भारतातही उत्तम वाचनालयं आहेत खरं तर, इथे वेळ हाताशी आहे हे आनंदाचं खरं कारण आहे!

ट्रेड मार्क's picture

29 Aug 2016 - 7:21 pm | ट्रेड मार्क

बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड असेल तर बरीच म्यूझियम फ्री असतात. त्याची माहिती बँक ऑफ अमेरिकेच्या वेबसाईट वर मिळते. आता तुम्ही न्यूयॉर्क मध्ये आहात तर Intrepid म्यूझियम जरूर बघा. खरी पाणबुडी अँड खरे कंकॉर्ड विमान आहे ते आतून पण बघायला मिळतं (जास्त पैसे देऊन). पण हे म्यूझियम बँक ऑफ अमेरिका डेबिट कार्ड असेल तर फ्री आहे (सद्यस्थितीतील माहिती आंतरजालावर बघून जावे). या सारखंच इतर बॅंक्स पण काही ना काही पर्क्स देत असतात.

बाकी पैसे देऊन असणारे शो ई साठी goldstar.com वा groupon वर चांगली डील्स मिळतात. बऱ्याच कंपन्यांची पण कॉर्पोरेट पर्क्सची वेब साईट असते. त्यातून बऱ्याच गोष्टींसाठी डील्स मिळतात अगदी हॉटेल बुकिंग, रेंटल कार, रेस्टॉरंट पासून ते डिस्ने पार्क्स, सिक्स फ्लॅग्स, फ्लाईट बुकिंग साठी पण चांगली डील्स मिळतात.

तुमची आवड आणि किती वेळ आहे ते कळलं तर अजून बऱ्याच ठिकाणांची माहिती मी देऊ शकेन.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर

Intrepid म्यूझियम बघण्याचे केव्हाचे नवर्‍याच्या मनात आहे. डेबिट कार्ड तर नाहीये, पण तरीही जाणार आहोतच.

डिल्स बद्दल ऐकुन आहे. कधी घेतल्या नाहीत पण.

आत्ता येणार्‍या लॉन्ग वीकेंदसाठी वॉशिंग्टन डिसीला जाण्याचे चालु आहे. तेव्हा उपयोगी पडतील का ते पहायला हवे!

तुम्हाला असलेली सर्वच माहिती इथे टाकत रहा. सगळ्यांच्याच कामाला येईल.

फॉल्स मध्ये काय करता येईल हे जर सांगितले तर मला फार मदत होईल. सध्या नेमकी आमच्याकडे ना कार आहे ना लायसन्स. अशांच फार अवघड आहे अमेरिकेत.. :(

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 12:00 am | ट्रेड मार्क

तुम्ही megabus किंवा goto bus च्या पॅकेज टूरने डीसीला जाऊ शकता परंतु स्थलदर्शन करायला फारच कमी वेळ मिळतो. न्यू जर्सीत अमेरिकेत आल्यापासून एक वर्ष तुमच्या भारतीय वाहन परवान्यावर रेंटल कार मिळते. पूर्ण वाहन विमा त्यांच्याकडूनच घ्यायचा म्हणजे अनपेक्षित प्रसंगात काळजीचे कारण नाही. अजून एक ऑप्शन म्हणजे amtrack रेल्वे किंवा ग्रेहाउंड. थोडं महाग आहे पण चांगलं ऑप्शन आहे.

डीसी मधील सर्व म्युझियम्स फ्री आहेत. एअर अँड स्पेस, नॅचरल हिस्टरी हे तर बघाच. परंतु लायब्ररी ऑफ काँग्रेस पण बघण्यासारखी आहे. एअर अँड स्पेस मध्ये Flight Simulator आहे त्याचा अनुभव पण मस्त. बाकी कॅपिटॉल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल आणि इतर वॉर मॉन्यूमेन्ट्स आहेतच. कार घेऊन डीसी मध्ये गेलात तर एखादं पूर्ण दिवसाचं पब्लिक पार्किंग बघायचं. यासाठी parkingpanda वगैरे साईट्स चांगल्या आहेत. तिथे जागेवर पार्किंग साधारण $२०-$२२ ला मिळत असेल तर parkingpanda वरून $९ ला मिळतं. डीसीजवळ National Museum Of Marine Corps आहे. त्यात WW१ पासूनच्या सगळ्या युद्धांचे देखावे आहेत, त्यावेळची शस्त्रास्त्रे वगैरेची माहिती आहे. बाल्टिमोरचे Aquarium मस्त आहे.

फॉलमध्ये पोकोनो माऊंटन्स, पेनसिल्वेनिया मध्ये जा. फॉल कलर्ससाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण तुमच्याकडे कार असणं गरजेचं आहे. अगदीच कार शक्य नसेल तर ग्रेहाउंड बस चा पर्याय आहे.

लेक जॉर्ज पण छान आहे.

अभिजीत अवलिया's picture

30 Aug 2016 - 12:46 am | अभिजीत अवलिया

मी पिट्सबर्ग मध्ये आहे. इथे पण भारतीय परवान्यावर कार मिळेल का?

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 12:49 am | संदीप डांगे

तुम्हाला आंतरराष्ट्रीय परवाना लागेल, जो भारतातल्याच आरटीओ कडून मिळाला असता.

राघवेंद्र's picture

30 Aug 2016 - 12:53 am | राघवेंद्र

भारतीय परवान्यावर कर विकत किंवा भाड्याने मिळेल. कार विमा थोडा जास्त असेल पण ठीक आहे. एकदा लोकल शो रूम मध्ये चौकशी करा.

खटपट्या's picture

30 Aug 2016 - 1:20 am | खटपट्या

तुम्हाला अमेरीकेतील चालक परवाना मिळेपर्यंत काही महीने तुम्ही भारतीय परवान्यावर गाडी चालवू शकता.

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 1:35 am | ट्रेड मार्क

भारतीय परवान्यावर रेंटल कार मिळेल. पण तो जुना पुस्तक परवाना असेल तर अवघड आहे. प्रत्येक राज्यातील वाहन परवाना नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे स्थानिक रेंटल ऑफिस मध्ये चौकशी करणे चांगले. पण रेंटल कार मिळायला हरकत नसावी. स्मार्ट कार्ड असेल तर अडचण येणार नाही. राघव यांनी म्हणल्याप्रमाणे रेंटल कार विमा पण मिळेल. विम्याचा दर जास्त असेल असं वाटत नाही, पण जो असेल तो, विमा मात्र घ्याच.

भारतीय परवान्यावर कार विकत घेता येत नाही. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला त्या राज्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र गाडी घेण्यासाठी पुरेसे आहे. वाहनाच्या नोंदणीसाठी स्थानिक पत्ता हवा असतो जो राज्याच्या ओळखपत्रावर सुद्धा असतो. Link

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 7:08 pm | ट्रेड मार्क

केवळ राज्य ओळखपत्र आणि भारतीय परवाना यावर गाडी विकत घेता येईल? इन्शुरन्स पण मिळेल का?

मी कधी पेनसिल्वेनिया मध्ये राहिलो नसल्याने मला तेथील माहिती नाही. परंतु मी जिथे जिथे गाड्या विकत घेतल्या आहेत तिथे मला अमेरिकन वाहन परवाना आवश्यक आहे असे सांगितले.

गाडी विकत घेण्याला परवान्याची आवश्यकता नाही. अमेरिकन नाही, भारतीय नाही कोठलाच नाही. विम्यासाठी सुद्धा पहिले 6 महिने परवान्याची आवश्यकता नाही. अर्थात तुम्ही नवीन वाहनचालक असाल तर तुमचा विमा हप्ता पण तगडा असतो. माझ्या मित्राने इथला किंवा भारतातला परवाना नसताना विमा घेतला होता. त्याने 6 महिन्यात परवाना मिळवला. 6 महिन्यात परवाना न मिळाल्यास विमा रद्द होतो किंवा नाही याबद्दल मला काही कल्पना नाही.

मी स्वतः राज्य ओळखपत्रावर गाडी घेतली होती. गाडीचा विमा करताना भारतीय परवाना चालतो. विमा देताना मला दुचाकीच्या परवान्यावर विमा दिला होता, परवान्यांचा त्यांनी केवळ क्रमांक घेतला होता.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:06 am | संदीप डांगे

अर्थात, जितकी राज्ये तितके वेगवेगळे कायदे आहेत म्हणून असेल तसे, हो ना?

ट्रेड मार्क's picture

31 Aug 2016 - 1:10 am | ट्रेड मार्क

गाडी विकत घेता येईल हे खरंच आहे पण मला प्रश्न होता रस्त्यावर आणता आणि त्या व्यक्तीला चालवता येईल का. पण जर का परवाना नसताना फक्त पत्ता बघण्यासाठी राज्य ओळखपत्र वापरून सगळं करता येत असेल तर भारीच आहे. तसाही नवीन अमेरिकन परवाना असेल तर विमा जास्त पडतो.

थोडक्यात काय तर पैसे जास्त द्या आणि गाड्या उडवा असं इथे पण आहे तर. नियमांचं काही उल्लंघन झालंच तर परवाना नाही म्हणून पॉईंट्स मिळण्याची भानगड नाही. पैसे द्या आणि सुटा :). थोडक्यात नो परवाना नो पर्वा.

रच्याकने - हे सांगणारा मला का नाही कोणी भेटला या पूर्वी. उगाच माझ्या पत्नीसाठी ३ वेळा रोड टेस्टसाठी खेपा घातल्या. बाकी पण बरेच मित्र उगाच खटपटी बसले... सांगतोच आता सगळ्यांना.

सुकुमार's picture

30 Aug 2016 - 1:38 am | सुकुमार

पिट्सबर्ग मध्ये भारतीय driving licnce वर rental कार मिळणे कठीण आहे, बहुतेक नाहीच. NYC किंवा Jersey मध्ये शक्य आहे.

अभिजीत अवलिया's picture

30 Aug 2016 - 1:52 am | अभिजीत अवलिया

आत्ताच गुगल रावांनी हे दाखवले.

Can I drive in Pennsylvania with my Foreign Driver’s License?
Individuals who possess a valid foreign driver’s license from their country are authorized to drive in Pennsylvania for up to one year from their date of entry into the United States, or upon expiration of their foreign license, whichever comes first. International driving permits are strongly recommended, but not required.

एकदा रेंटल कार ऑफिस मध्ये चौकशी करतो. सर्वांचे धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 1:39 am | पिलीयन रायडर

लेक जॉर्ज, ऑज्बल चाझम वगैरे झालंय माझं. डीसी मध्ये काय पहायचं ते आता नोट करुन ठेवलंय. :)

धन्यवाद!

राघवेंद्र's picture

29 Aug 2016 - 7:38 pm | राघवेंद्र

धन्यवाद पितातै धाग्याबद्दल !!!

सार्वजनिक गणेश उत्सव या वर्षी एडिसन मध्ये नसुन तो जर्सी सिटी मध्ये आहे.
स्थळ : 792 Newark Avenue, Jersey City, NJ 07306
तारीख : ५ -११ सप्टेंबर, २०१६ सकाळी १० ते रात्री १० वाजता
संदर्भ :http://www.oaktreeroad.us/edison-news-corner.html

एडिसन मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे. अजुन माहिती मिळाली की इथे update करतो.

संदीप चित्रे's picture

29 Aug 2016 - 9:08 pm | संदीप चित्रे

'गन्धार' हा ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो.
फेसबुकवर अधिक माहिती मिळेल.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2016 - 10:49 pm | पिलीयन रायडर

मी आजच इथे विचारणार होते की गणपती कुठे असतो! यंदा काही इथे घरात करण्याचे जमत नाही असे दिसते.

दिवाळीची सुद्धा माहिती द्या!

रमेश आठवले's picture

29 Aug 2016 - 8:46 pm | रमेश आठवले

पुण्यात आणि इतर ठिकाणी वयस्क नागरिकांच्या साठी अथश्री सारखी घरे बांधणारे परांजपे बंधू सध्या अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांच्या भेटीवर आहेत.. ही योजना तेथिल भारतीय मूळाच्या वयस्क स्थायी मंडळी साठी राबवता येईल का याची पहाणी करत आहेत. मंगळवारी लॉस अँजेल्स मध्ये एका मराठी कुटुंबाच्या घरी ते इच्छुकांना भेटणार आहेत .

रमेश आठवले's picture

29 Aug 2016 - 8:54 pm | रमेश आठवले

हि अथश्री बैठक मंगळवारी नसून बुधवारी ३१ ऑगस्टला आहे.

संदीप चित्रे's picture

29 Aug 2016 - 9:05 pm | संदीप चित्रे

सॉरी संदीप तुम्ही मराठी विश्व ची लिंक आधीच दिलेली होती ती मी बघितली नाही.
या वेळी गणपती वेस्ट विंड्सर ला आहे नं?

संदीप चित्रे's picture

30 Aug 2016 - 8:39 pm | संदीप चित्रे

वेस्ट विन्डसरला आहे.

पद्मावति's picture

29 Aug 2016 - 9:09 pm | पद्मावति

खास मराठी पदार्थांसाठी सुमा फुड्स आहे नॉर्थ ब्रनस्विकला. मराठी विश्व सुद्धा खूप मोठं आहे. त्यांची मराठी लायब्ररी आणि रविवारी मराठी शाळा असते.

सुमा फुड्स मध्ये प्रत्येक ट्रिप ला जातेच. केसरी कडुन ज्या अमेरिका टुर्स येतात त्यांच्यासाठी केटरिंग पण सुमा फुड्स कडुन होते. आमच्या घरचा गणपती पण तिथुन च येतो.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2016 - 10:50 pm | पिलीयन रायडर

हो ऐकलं होतं ह्या बद्दल. जाऊन येते आणि कळवते.

राघवेंद्र's picture

29 Aug 2016 - 11:07 pm | राघवेंद्र

सुमा फूड्स चे पटेल दुकानातील मधले पॅकेट घ्यायचे. नॉर्थ ब्रनस्विकला जायची गरज नाही कारण ते खायचे ठिकाण नाही फक्त किचन आहे.
कार नसेल तर फॉल कलरसाठी टेक टूर्स झिंदाबाद. फॉल कलरसाठी न्यू यॉर्क मध्ये सेंट्रल पार्क सगळ्यात जायला सोपे आणि मस्त ठिकाण.

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2016 - 11:18 pm | पिलीयन रायडर

खायचे ठिकाण नाही का?! अरेरे मग! मग पटेल ब्रदर्स झिंदाबाद!

आणि सेंट्रल पार्कतर आहेच काहीच झालं नाही तर.. टेकटुर्स हाच मुख्य प्लान आहे..

हे ही एक सापडलय..

Fall Foliage Train Rides - September 24

https://www.facebook.com/events/174667926248210/

Trip Duration: 2 1/2 Hours

All Fall Foliage Trains that are not Train Robberies are standard fare.

Adults $16, Seniors (62 and over) $15, Children (3-12) $13, Under 3 FREE.

Reservations Encouraged but Not Required.

Food and beverages for sale on board.

Picturesque ride through the Susquehanna River Valley. Travel along the tranquil Susquehanna River, through farm fields with beautiful views, and forests with colorful foliage.

खटपट्या's picture

30 Aug 2016 - 1:24 am | खटपट्या

पाथ ट्रेन पकडून जर्नल स्क्वेअरला उतरा. स्टेशनला उतरून कोणालाही इंडीयन स्ट्रीट विचारा. इथे खाण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. रस्त्यावरचा कचरा बघून भारतात आल्यासारखे वाटेल. हे ठीकाण जर्सी सीटीमधे येते.

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 7:53 am | पिलीयन रायडर

काय खटपट्या भौ!! तिथेच रहाते ना मी जवळच! दर वीकांताला माथा टेकवुन यावा लागतो भाजीपाल्यासाठी!

खटपट्या's picture

30 Aug 2016 - 8:53 pm | खटपट्या

हायला, मी बी तीथंच होतो एक वर्ष. तसा स्वस्त आहे तो एरीया, पण गुंडागर्दीसाठी बदनाम आहे.

चित्रगुप्त's picture

29 Aug 2016 - 9:10 pm | चित्रगुप्त

चार-लोटे Charlotte NC मधे कुणी मिपाकर आहेत का ? मी सध्या डिसेंबर अखेर पर्यंत चार-लोटे मधे आहे.

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 12:02 am | ट्रेड मार्क

मी राले, नॉर्थ कॅरोलिना मध्ये आहे.

Madhavi1992's picture

30 Aug 2016 - 7:03 pm | Madhavi1992

मी आहे Charlotte NC मधे.

निओ१'s picture

22 Sep 2016 - 7:07 pm | निओ१

Mi attach part aalo punyat.

निशदे's picture

30 Aug 2016 - 2:50 am | निशदे

उत्तम धागा.
गडबडीत असल्याने एकच जागा शेअर करतो.
गेटी सेंटर
लॉस एंजिलीसमध्ये ब्रेंटवूड या भागात डोंगरावर हे सुंदर म्युझियम आहे. लॉस एंजिलीसला भेट देणार्‍या प्रत्येकाने पहावीच अशी ही जागा आहे. सुमारे १३० कोटी डॉलर्स खर्च करून बांधलेले हे म्युझियम १९९७ साली जनतेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. मुख्यत्वे युरोपिअन कलाविष्कारांसाठी हे म्युझियम प्रसिद्ध आहे. पण रिचर्ड मायर(Richard Meier) या आर्किटेक्टची स्थापत्यशैली पाहण्यासाठीही इथे अनेक जण येतात. म्युझियमच्या अधिकृत माहितीनुसार येथे दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख लोक भेट देतात. लहान मुलांसाठी त्यांनी तयार केलेले कार्यक्रम दर वीकांताला ओसंडून भरलेले असतात.
जर लॉस एंजिलीसला भेट देणार असाल तर गेटी सेंटरला भेटायला विसरू नका.
g
चित्र जालावरून साभार.

नेत्रेश's picture

30 Aug 2016 - 5:42 am | नेत्रेश

पण मस्त ठीकाण आहे

बहुगुणी's picture

30 Aug 2016 - 3:08 am | बहुगुणी

या धाग्यात ही किंचित अवांतर माहिती दिली तर चालेल असं वाटतं.

८ वर्षांपूर्वी निघालेल्या "आवर्तन" या पहिल्या दृक्-श्राव्य दिवाळी अंकाचे जवळजवळ पंचवीस-एक डिव्हीडी सेट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. (ते नेमके कुणाकडून माझ्यापर्यंत पोहोचले हे देखील मला आता आठवत नाही!) मोहन आगाशे यांच्या संपादकत्वाखाली निर्मित झालेले दोन डिव्हीडी चे हे डिव्हीडी सेट्स तसे प्रत्येकी १५ डॉलर्स किंमतीचे होते, आणि मुक्तसुनीत या मिपाकरांखेरीज कुणी विचारणा केली नसल्याने ते विकले जात नव्हते. म्हणून मी त्यांना (निर्मात्यांना) डिव्हीडीज् परत घेण्याविषयी विचारणा केली; पण ते घेऊन जाण्याचा खर्च मानवणारा नसल्याने त्यांनी ते इच्छुकांना मोफत द्यावेत असं सुचवलं. पण गेली कित्येक वर्षे ते माझ्याकडे पडून आहेत आणि खूप प्रयत्न करूनही इथल्या मराठी कुटुंबाना ते घ्यावेसे वाटलेले नाहीत :-(

या पाच तासांच्या डीव्हीडींविषयी आधिक माहिती या जुन्या धाग्यावर मिळेल. बाबा आमट्यांच्या कार्यावरील डॉक्युमेंटरी तसेच इतरही बहुतांश कार्यक्रम प्रेक्षणीय आहेत.
काही उदाहरणं आंतर्जालावर प्रोमोज मध्ये उपलब्ध आहेत, पण दुर्दैवाने असे दिवाळी अंक पुन्हा नंतर निघाल्याचं मी तरी ऐकलं नाही. त्यामुळे माझ्याकडच्या डीव्हीडीज हे collector's items असावेत!

आताच शोध घेतला तर २०१४ मध्ये बहुधा त्याच निर्मात्यांनी आवर्तन हा यू ट्यूब चॅनेल सुरू केल्याचं दिसलं. पण तिथेही गेल्या वर्षानंतर काही भर पडलेली दिसत नाही. ही मालिका चालू राहिली तर पहायला नक्की आवडेल.

तेंव्हा अमेरिकेतील मिपाकरांना व त्यांच्या मराठी आवडणार्‍या इतर परिचितांना हे डिव्हीडी सेट्स मोफत हवे असल्यास व्य नि द्वारे मला कळवावे. सेट्स पाठवण्याचा स्थानिक पत्रखर्च माझ्यापर्यंत कसा पोचवायचा ते कळवेन. माझा आवर्तनच्या प्रवर्तकांशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, आणि मी हे केवळ मराठीतील कौतुकास्पद उपक्रमाला माझा हातभार लागावा या भावनेने करतो आहे, हे कृपया लक्षात घ्यावे.

कंजूस's picture

30 Aug 2016 - 6:58 am | कंजूस

हा वेगळ्या प्रकारचा माहितीधागा काढल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 7:57 am | पिलीयन रायडर

नवीन नाही काका. मोदकने आधीच पुणे - मुंबईसाठी हे धागे काढलेले आहेत.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2016 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नियतीचं काय सांगता येतं नै, नियती माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकते. कधी चुकुन अमेरीकेच्या रस्त्याने गेलो तर माहिती उपयोगी पडेल. प्रतिसाद नुसते चाळले. (इकडे प्रतिसाद वाढवायचा काय स्कोप दिसत नै)

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 8:16 pm | संदीप डांगे

+1000

बाकी, प्रतिसाद वाढवायचे का? तर घ्या: सदर धागा 'आमी हामरिकेत कशी मज्जा करतो, तुम्हाला टुकटुक' एवढ्यासाठी काढलाय! ;) =))

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 8:21 pm | पिलीयन रायडर

हामिरिकेत मज्जा असते ही अफवा आहे. त्या स्कॅमचा मी बळी आहे!

मेरा भारत"च" महान!

मोदक's picture

30 Aug 2016 - 8:21 pm | मोदक

डॉलरात पैशे उधळण्यापेक्षा मायदेशातल्या कितीतरी गरजूंना त्या पैशाचा लाभ होईल असे काहीतरी काम करायचे सोडून असले रिकामे उपद्याप... वगैरे वगैरे...

किंवा..

पिराकाकूंनी इंजिनीवर / पोस्ट ग्रॅड असे हुच्चभ्रू शिक्षण घेवून एका गरजूची नोकरी खाल्ली आणि आता मायदेशाला टाटा करून परप्रांतात खुशाल मजा करत आहेत... वगैरे वगैरे

(मी पळतो आता..!!) ;)

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 8:22 pm | पिलीयन रायडर

वेगळा धागा काढा.. आमच्या चांगल्या धाग्याला दृष्ट लावु नका जळक्यांनो!

मोदक's picture

30 Aug 2016 - 8:24 pm | मोदक

हिहिहि :p

इरसाल's picture

1 Sep 2016 - 7:00 pm | इरसाल

कोळश्यांनी नजर लावली तर चालेल ना?

पण चित्रपटांच्या डीव्हीडी मिळवण्याचा हाही एक मार्ग अमेरिकेत उपलब्ध आहे. वरील दुव्यावरून संजीव कुमारचे १५० सिनेमे उपलब्ध असावेत असं दिसतं.

सही रे सई's picture

30 Aug 2016 - 7:47 pm | सही रे सई

मी या लाँग विकांताला नायगारा धबधबा पाहायला जात आहे. कार रेंटने घेतली आहे. नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे. नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अ‍ॅट्रॅक्शन्स आहेत तो ऑनलाईन विकत घेणार आहे. तरी याबद्दल अधिक माहिती, उपयुक्त टिपा असतील तर त्या जाणकारांनी द्याव्यात.

तेव्हा त्या तयारीने जा :).

तो डिस्कव्हरी पास मीही घेतला होता. तुम्ही इतर कुठली aquariums बघितली असतील तर मग तिथले नाही बघितले तरी चालेल. अगदीच छोटेसे आहे. आमचे मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स आणि ती मूव्ही होईपर्यंत ते डिस्कव्हरी सेंटर बंद झाले होते.

भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तिथे.

बाकी नायाग्रा धबधबा अतिप्रचंड आहे. मेड ऑफ द मिस्ट मधे गेल्याशिवाय कल्पना येत नाही त्याच्या आकाराची.

बहुगुणी's picture

30 Aug 2016 - 8:16 pm | बहुगुणी

मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स ही दोन प्रमुख आकर्षणं आहेत. दहा वर्षांपूर्वीचा अनुभवः एकच दिवस हाताशी असेल आणि मुलं/ वयस्कर मंडळी बरोबर असतील तर धावाधाव होते आणि बाकीच्या गोष्टींना वेळ पुरतही नाही.

शुक्रवारी दुपारी निघून रात्री पर्यंत नायगारा ला पोहोचू. शनिवार रविवार राहाणार आहोत. त्यामुळे थोडा जास्ती वेळ असेल हाताशी असा अंदाज आहे.

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 8:29 pm | ट्रेड मार्क

कॅनडा व्हिसा असेल तर तिकडून पण बघून या. पूर्ण व्ह्यू मिळतो.
अमेरिकन साईडने नायगरा अनुभवता येतो. तुमच्या अगदी जवळून पाणी प्रचंड वेगाने वाहत असते.
दोन्हीची मजा वेगळी. कॅनडा साईडला गेलात आणि साहसाची आवड असेल तर तिकडे झिपलाईन करता येईल.

डिस्कव्हरी पास घेतला तर बहुतेक सगळं कव्हर होईल. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह मध्ये फोन/ कॅमेरा ओला होऊ शकतो. ते सांभाळा.

जाता येता कॉर्निंग ग्लास म्युझियम बघू शकता.

टिवटिव's picture

30 Aug 2016 - 11:01 pm | टिवटिव

वॅट्किन्स ग्लेन पण मस्त आहे..

लंबूटांग's picture

31 Aug 2016 - 9:06 pm | लंबूटांग

कॉर्निंग म्युझियम ऑफ ग्लास मस्त आहे. अपस्टेट न्यु यॉर्क आणि पेनसिल्व्हेनिया मधे गेले की खरी अमेरिका दिसते.

कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा ऑन द लेक ला जरूर जा. अर्धा तासाचा सुंदर ड्राइव आहे. छोटंसं पण अतिशय सुरेख गाव आहे आणि खूप छान लेक.
तसेच नायगारा फॉल्स या गावात सुद्धा खूप काही करण्यासारखे आहे. खास करून मुलांसाठी. बॉटनिकल गार्डन, आकाश पाळणा, बटरफ्लाइ गार्डन. आणि एक उलटं घर पण आहे. आप्साइड डाउन असे. तिकीट घेऊन आत जाता येते. खूप मजेदार आहे. मान वरती करून छताला लावलेले सोफे, बेड्स वगैरे बघायचे. मजा येते :))

सही रे सई's picture

31 Aug 2016 - 1:09 am | सही रे सई

कॅनडा बाजूला जायचा अत्ता विचार नाही. पण जेव्हा जाईन तेव्हा नक्की बघेन.

त्याला काहीही अर्थ नाही. गर्दीमुळे तुमचे ५ अ‍ॅट्रॅक्शन्स पाहणे होणार नाहीत. लंबूटांग यांनी म्हटल्याप्रमाणे aquarium पाहण्यात काही विशेष नाही. डिस्कवरी सेंटर लवकर बंद होते. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विंडस पाहण्यातच वेळ सत्कारणी लागणार आहे.

सही रे सई's picture

22 Sep 2016 - 10:27 pm | सही रे सई

नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे.
हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.

अभिजीत अवलिया's picture

23 Sep 2016 - 12:02 am | अभिजीत अवलिया

मला व्य.नी. करा ना हि माहिती.

खटपट्या's picture

4 Oct 2016 - 9:07 pm | खटपट्या

मलाही व्य नी करा प्लीज

सही रे सई's picture

5 Oct 2016 - 8:10 pm | सही रे सई

व्य.नी. केला आहे.
बाकीच्यांसाठी ही लिंक बघावी - https://www.vrbo.com/7084688ha
अजून माहिती साठी मला व्यनी केलात तरी चालेल.

भारतीय मनुष्याचं घर नाही पण मोटेल एकदा अनुभवावं लागलं होतं. नायगर्‍यातच! अगदी वाईट अनुभव होता. तुम्हाला तसा न येवो. कॅनडातून नायगरा पहाच!

सही रे सई's picture

31 Aug 2016 - 1:10 am | सही रे सई

कोणतं मोटेल होत ते? आणि भारतीय माणसचं नाव आठवत असेल तर सांगा.

रेवती's picture

31 Aug 2016 - 1:30 am | रेवती

सॉरी हां, आठवत नाही, बारा पंध्रा वर्षे झाली, पण नंतर आणखी दोन नायगरा वार्‍या झाल्या तेंव्हा हॉटेले चांगली मिळाली. जमल्यास तुम्ही घरून एक दोन बेड शीटस घेऊन जावा. घरच्या स्लिपर्सही! (अर्थात जमल्यास)

अभिजीत अवलिया's picture

31 Aug 2016 - 1:43 am | अभिजीत अवलिया

अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे तितकेसे 'worth' आहे का?

ट्रेड मार्क's picture

31 Aug 2016 - 1:57 am | ट्रेड मार्क

एकदाही पाहिलेला नसेल तर कुठल्याही साईडने पाहावाच.

अमेरिकन बाजूने अनुभवता येतो... तुमच्या अगदी जवळून एवढा मोठा जलप्रपात कोसळत असतो. तर कॅनडाच्या बाजूने पूर्ण हॉर्सशूचे दर्शन होते.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 2:03 am | पिलीयन रायडर

ओह! पण मग पहाण्यापेक्षा अनुभवणे जास्त भारी असेल ना?

कॅनडासाईडने पाण्यात नेत नाहीत का?

रेवती's picture

1 Sep 2016 - 1:14 am | रेवती

नेतात.

रेवती's picture

1 Sep 2016 - 1:13 am | रेवती

ट्रे मा यांच्याशी सहमत. कनेडियन व्हिसा नसेल तर अमेरिकी बाजूने पहा. क्यानडातून पाहिल्यास जास्त चांगला दिसतो.

अंतु बर्वा's picture

12 Sep 2016 - 7:52 pm | अंतु बर्वा

आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. नायगारा अमेरिकन साईडने आधी पाहिला होता, या वे़ळी कनेडियन बाजुने पाहिला. मोठा विकांत असल्याने भरपुर गर्दी होती. त्यामुळे एकाही फोटोत दुसर्या कुणाचा हात, डोकं, पाय, बॅग इत्यादी न येण, ऑलमोस्ट अशक्य कोटीतली गोष्ट झाली होती :-). कॅनडा बाजुने पाहु इच्छिणार्यांसाठी: अमेरिकन बाजुच्या केव्ह ऑफ द विंड आणी तिकडच्या जर्नी बिहाईंड द फॉल्स मधे थोडा फरक आहे. अमेरिकन बाजुने केव्ह करताना जितकी मजा येते, तितकी जर्नी ला नाही असे माझे मत झाले आहे (रादर, सिटी पास नं घेता, कॅनडा बाजुने फक्त मेड ऑफ द मिस्ट करावी आणी केव्ह अमेरिकन बाजुने). बाकी टोराँटो सिटी सुद्धा छान आहे, मि एक आठवडा आधी गेल्यामुळे सध्या चालु असलेला टोराँटो फिल्म फेस्टिवल मिस झाला :(

रेवती's picture

12 Sep 2016 - 8:02 pm | रेवती

कळवल्याबद्दल धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 1:53 am | पिलीयन रायडर

माझ्या मुलाचा इथे एक्स रे करावा लागला (क्षयाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने) तर त्याचे बिल ३८२$ आले आहे. पैकी डिड्क्टबिल मीट न झाल्याने ते सर्व आम्हालाच भरायचे आहे. (कोण म्हणलं रे अमेरिकेत मज्जा आहे!)

माझा प्रश्न असा की एखाद्या चाचणीचे बिल किती असायला हवे हे कसे कळणार? इथे बिल येईपर्यंत नक्की किती पैसे झाले हे कळतही नाही. आपण हे बिल जास्त आहे अशी काही तक्रार करु शकतो का? की मुकाट्याने भरुन टाकायचे?

(अवांतर - मागे इथे बहुदा शिल्पा ब ह्यांनी अमेरिकेत डिलीव्हरीचा खर्च ५००००$ झाला असे लिहीले होते, तेव्हा खुप जणांनी अविश्वास दाखवला होता. आता कळतय की अगदी सहज शक्य आहे...)

ट्रेड मार्क's picture

31 Aug 2016 - 2:12 am | ट्रेड मार्क

कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. खरं तर डॉक्टरने सांगितलेल्या Diagnostic Tests कव्हर करायला पाहिजेत. डॉक्टरकडे गेल्यावर आणि कुठल्याही ट्रीटमेंटच्या किंवा टेस्टच्या आधी तुम्ही किती खर्च येईल आणि इन्शुरन्समध्ये कव्हर होईल का ते विचारू शकता. बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईटवर एखाद्या टेस्ट/ ट्रीटमेंटसाठी किती खर्च येईल हे सांगणारे एस्टीमेटर्स असतात. इन्शुरन्स कंपनीला फोन करून पण विचारू शकता.

तुम्ही जर्सी सिटी मध्ये राहत असाल तर Palisade Avenue वर North Hudson Community Hospital (नक्की नाव लक्षात नाही) तिथे जा. चांगली सेवा स्वस्तात मिळते (मिळायची.. कधी काय बदलेल सांगता येत नाही).

मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा अमेरिकेतला एक गंडलेला प्रकार आहे. काय वाट्टेल ती बिलं लावतात आणि ती आपल्याला भरायला लागतात. एवढं करूनही एकदम भारी सेवा मिळते असं काही नाही.

माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन.

निशदे's picture

31 Aug 2016 - 3:11 am | निशदे

कोणता इन्श्युरन्स, कोणता प्लॅन(पीपीओ वगैरे), इन-नेटवर्क की आऊट ऑफ नेटवर्क डॉक्टर अशा अनेक गोष्टींवर ते ठरते. ER ला गेला असाल तर खर्च नेहेमीच जास्त येतो. तुमचा डिडक्टिबल किती आहे ते तपासून घ्या. आणि इन्श्युरन्स कंपनीला फोन करून तर घ्याच. त्यांच्याशी बोलल्यावर चार्जेस कमी केल्याची अनेक उदाहरणे माहितीतली आहेत.

<माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन. >
नक्की काढा धागा. त्यानिमित्ताने माहिती कळेल.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 5:19 am | पिलीयन रायडर

हो हे हॉस्पिटल पाहिले आहे. कधी गरज पडली तर जाते. मला असं वाटलं होतं की Jersey city medical center हा सरकारी दवाखाना आहे आणि म्हणुन स्वस्त असेल! म्हणुन मी तिथे फारसा विचार न करता गेले!

एस्टिमेटर पाहिला नव्हता. :(

तुम्ही नक्की एक धागा काढा. कच्चुन शिव्या द्यायची इच्छा आहे इथल्या ह्या सिस्टिमला!!

अनन्त अवधुत's picture

31 Aug 2016 - 11:02 pm | अनन्त अवधुत

इथल्या वैद्यकीय सेवा (त्यात फिजिशियन, दंतवैद्य, डोळ्यांचे डॉक्टर, स्पेशालिस्ट, आणि अर्जेंट केअर) वर खूप काही बोलण्यासारखे आहे. जोडीला विमा आहेच. तुम्ही धागा काढा. 100 प्रतिसाद तर कोठे जात नाहीत :)

अमेरिकेत वैद्यकीय सेवांच्या किंमती पुरवठादारांनुसार (providers) बदलतात!
"People don't realize the same procedure may vary by 500 percent or more in the same town, or even on the same block"

चेस्ट एक्स रे ची साधारण किंमत खरं तर $६७ ते $६९ असायला हवी असं दिसतं :-(

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 5:24 am | पिलीयन रायडर

अरे! कमाल आहे!

मग आता मी तक्रार करु शकते का Jersey city medical center मध्ये? की एवढी किंमत का लावली आहे म्हणुन?

बरं आणखीन रेडिओलॉजिस्ट्ने वर ७०$ चे वगळे बिल लावले आहे. आम्हाला ना तो डॉक्टर भेटला ना कधी तो एक्स रे सोडा, रिपोर्ट पाहायला मिळाला. आमच्या पिडीयाट्रिशनकडे डायरेक्ट तो रिपोर्ट आला आणि त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं. :(

अनन्त अवधुत's picture

31 Aug 2016 - 5:55 am | अनन्त अवधुत

तुम्हाला सुदैवाने अर्जेंट केअर नामक प्रकार अनुभवायला मिळाला नाही (आणि तो मिळूही नये)

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 5:17 am | पिलीयन रायडर

सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी बरीच चौकशी केली तर बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी फटका पडलेला आहे. लहान मुलाच्या तापासाठी इमर्जन्सी मध्ये गेल्याने १४००$ बिल लावले वगैरे किस्से ऐकले. मला हीच एक गोष्ट अजिबात आवडली नाही इथे. मेडिकल सारख्या गोष्टीत खरं तर माणसाला विचार न करता पटकन डॉक्टरकडे जाता यायलाच हवे. आपला देश अमेरिके एवढा विकसित नसला तरी अत्यंत परडवडेल अशी वैद्यकीय सुविधा तर देऊ शकतो. अगदी कितीही भारी दवाखान्यात गेलात तरी एवढे बिल होत नाही जेवढे अमेरिकेत साध्या तापासाठी होते. मी अजुन २-३ च डॉक्टर्स पाहिले आहेत, पण मला ते काही फार महान वाटले नाहीत. अगदीच साधारण होते. हॉस्पिटल्स सुद्धा ठिकच आहेत.

इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?

बहुगुणी's picture

31 Aug 2016 - 7:07 am | बहुगुणी

इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?

आजारी न पडणे!

कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः
The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services.

तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)