भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा.
युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो. लंडनला निघालेलं हे जहाज काही कारणाने रूट बदलून दोन आठवडे आधी मुंबईत दाखल होतं, रुस्तम घरी आल्यावर त्याला कळतं कि त्याची पत्नी 'सिंथिया' म्हणजेच इलियाना डिक्रुझ दोन दिवसांपासून घरी आलेली नाही. त्यातच रुस्तमला घरी त्याचा मित्र विक्रम आहुजाने सिंथियाला पाठवलेली प्रेमपत्रं सापडतात, तिचा तपास करता करता तो त्याचा मित्र विक्रम आहुजाच्या घरी पोचतो पुढे काय होते ते पडद्यावर पाहणं उचित कारण इथून खरी स्टोरी सुरु होते.
चित्रपट साधारणपणे दोन भागात विभागला गेला आहे, इंटर्वल च्या आधीचा भाग पूर्णपणे इंटर्वल नंतरची स्टोरी सेटअप करण्यासाठी वापरला आहे. एका खुन करणाऱ्या माणसाला मिळणारी सहानुभूती. त्या लेव्हल वर चित्रपट जे वेगवेगळे पदर उलगडतो ते अधिक मनोरंजन करणारे ठरतात. एका पॉईंट नंतर आपल्याला पुढे काय घडेल हे समजून गेलेलं असते तरीही आपण त्यातली गती आपल्याला थांबतो.
अक्षय कुमारने एक नेव्ही ऑफिसर च्या मर्यादेत राहून रुस्तम पावरीच्या भूमिकेला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं आहे त्याचा संयत अभिनय, संवादफेक हा रुस्तम चा युसपी ठरतो. अक्षय कुमार बरोबर अजून दोनजणांच्या अभिनयाची इथे तारीफ केली पाहिजे ती म्हणजे पवन मल्होत्रा ने साकारलेला व्हिन्सेंट लोबो आणि कुमुद मिश्राने साकारलेला पेपर मिलचा प्रसिद्धी साठी काहीही करायला तयार असलेला मालक. या दोघांच्याही बहारदार अभिनयाने रुस्तमला चार चांद लागले आहेत. यात अजूनही जुने अभिनेते आहे जे खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेत. यात एक त्रुटी आहे ती म्हणजे विनोदाने थिल्लर केलेला कोर्टरूम सिन्स. तुम्ही जर या आधी 12 angry men अथवा Few Good Men. यांसारखे उत्तम कोर्ट रूम ड्रामा पाहिले असतील तर त्यांना रुस्तम थोडा कंटाळवाणा वाटू शकतो .
का पाहावा : अक्षय कुमारच्या अभिनय, चित्रपटातले अनपेक्षित टर्न्स आणि ट्विस्ट साठी. गोड गोड दिसणाऱ्या इलियाना साठी. कुमुद मिश्रा आणि पवन मल्होत्राच्या अभिनयासाठी.
का पाहू नये : सचिन खेडेकर आणि न्यायाधीश यांच्यातल्या फुटकळ विनोदासाठी.
प्रतिक्रिया
13 Aug 2016 - 5:24 pm | ज्योति अळवणी
उत्सुकता वाढली... येत्या आठवड्यात नक्की बघणार.... धन्यवाद
14 Aug 2016 - 10:36 am | सतिश गावडे
उत्सुकता वाढली... येत्या आठवड्यात नक्की बघणार.... धन्यवाद
14 Aug 2016 - 10:45 am | मुक्त विहारि
मला तरी, हिंदी सिनेमाचे अर्थकारण जरा संशयास्पदच वाटत आहे.
14 Aug 2016 - 11:05 am | संदीप डांगे
म्हणजे??
15 Aug 2016 - 8:05 am | मुक्त विहारि
जावू द्या हो....
तुम्ही नका टेंशन घेवू.
थोडे आजुबाजूला बघीतले की हिंदी सिनेमाचा पैसा नक्की कुठे जातो, ह्याचा अंदाज प्रत्येकाला वेगळा-वेगळा येतो.
हिंदी सिनेमावाले समाजासाठी कुठलीही भरीव कामगिरी करत नसल्याने, मी माझ्या कष्टाचा पैसा आजकाल ह्यांच्यावर ओवाळत नाही.
आपल्या पैशाने, इतरांची घरे पोसण्यात मला तरी रस नाही.
आणि
झोपेचे सोंग घेतलेल्या मंडळींना जागे करण्यात अजिबात अर्थ नाही. (ह्यात तुम्ही मोडत नाही.)
15 Aug 2016 - 9:01 am | चंपाबाई
सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ...
सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या.
15 Aug 2016 - 10:57 am | मुक्त विहारि
"सिनेमाच्या निर्मितीमुळे निर्माता, कलाकार, डायरेक्टर , संकलन, संगीत , टॉकिजवाले ... मॉलवाले तिथले पॉपकॉर्नवाले.. शेकडो लोकांची पोटं भरत असतात ..."
मस्त हो.... आणि मग हे बॅकस्टेजवाले तंत्रज्ञ आजारी पडले की त्यांना कुणीही वाली नसतो.
"सिनेमा पटत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतात मंजुळाबाई किर्टेगावकारांचा तमाशा आणून मनोरंजन करुन घ्या."
कशाला?
आमचे मनोरंजन करायला इथले डू.आय.डी. आणि त्यांचे गहन-विचार समर्थ आहेत.
15 Aug 2016 - 11:44 am | चंपाबाई
शेताचा मालक शेतमजुर म्हातारे / आजारी झाल्यावर मदत करतात का ?
भाजी विकणार्या आज्जीला शेतकरी मदत करतात का ?
15 Aug 2016 - 5:15 pm | मुक्त विहारि
सिनेमाच्या अर्थकारणांत "शेती" कुठून आली?
फारच मनोरंजक लिहिता, बुवा तुम्ही.
अर्थात, आता तुम्ही वाट्टेल तो बादरायण संबंध कुठल्याही धाग्यावर जोडू शकता, ह्यात आजकाल नवल वाटत नाही.
15 Aug 2016 - 5:20 pm | चंपाबाई
सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?
15 Aug 2016 - 9:06 pm | मुक्त विहारि
तुम्ही अहमदशहा अब्दालीची दाढी...
मुश्ताक अहमदला चिकटवण्यात माहीर आहात...
गोष्ट सिनेमाची आणि तुम्हाला व्यथा शेतीची....
भलतेच विनोदी आहात हो तुम्ही...
15 Aug 2016 - 11:42 pm | चंपाबाई
शेती हे इतर व्यवसायाचे एक उदाहरण म्हणुन वापरले. मूळ मुद्दा हा आहे ....
सिनेमा व्यवसायातील लोकानी आपल्या व्यवसायातील गरजू लोकाना मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे, तर इतर व्यवसातील लोकानीही ते तत्व पाळायला नको का ?
16 Aug 2016 - 11:06 am | मुक्त विहारि
बादरायण संबंध कसा जोडावा?
हे आपल्याला उत्तम जमते.
15 Aug 2016 - 9:04 am | संदीप डांगे
ह्या अर्थकारणावर मी मागे एक सविस्तर प्रतिसाद लिहिला होता, मिळाला की लिंक देतो, थोडक्यात टॉप फिल्म्स च्या निर्मितीमागे भाईचा पैसा आणि रिअल इस्टेट चा भाव वाढणे ह्यचा संबंध आहे, ह्यात सामान्यांचा पैसा लुटून वरून भाववाढ लादली जाते,
कआल्या ढगाला सोनेरी किनार म्हटलं तर ९० टक्के मराठी लोक्स (कलाकार, तंत्रज्ञ) बॉलीवूड मध्ये असल्याने त्यांच्या पोटापाण्याची सोय होते,यात निसटतं समाधान आहे,
15 Aug 2016 - 5:53 pm | बोका-ए-आझम
८०-९० च्या दशकात होती हे माहीत आहे. त्याचे अनेक किस्से ऐकलेले आणि काही पाहिलेले पण आहेत. पण आत्ताही तसं आहे? तेव्हा चित्रपट चालला तरच निर्माता पैसे कमवायचा. परिणामी त्याला no questions asked अशा स्त्रोतांकडून पैसे उचलावे लागत. त्यामुळे अंडरवर्ल्डचा पैसा येत गेला. Hollywood मध्येही माफियाचे पैसे होतेच. पण आता निर्माते अनेक मार्गांनी - Music rights, web rights, merchandising, broadcast rights वगैरे मार्गांनी पैसे कमावतात. चित्रपट चालणं हा त्यामुळे बोनस असतो. तो पडला तरी निर्माता गाळात जात नाही. अंडरवर्ल्डचा पैसा काळ्याचा पांढरा करण्यासाठी येत असेल हे मान्य आहे पण त्याची पकड आहे हे पटत नाही.
15 Aug 2016 - 8:42 pm | संदीप डांगे
अंडरवर्ल्ड पूर्वीसारखं राहिलं नसून खूप सॉफीस्तिकेटेड झालं आहे, पकड नाही तर प्रत्यक्ष कॉर्पोरेट टाईप काम करतंय, आज बंदूक डोक्यावर लावून खंडणी उकळत नाहीत तर प्रत्यक्ष भागीदारी असते, यात पोलीस, नेते, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचीच भागीदारी असते,
चित्रपट व बतम्यांमधून जे व जसं दिसतं त्यापेक्षा वेगळं आहे आज अंडरवर्ल्ड.
15 Aug 2016 - 9:10 pm | मुक्त विहारि
हिंदी सिनेमा बघणे हा पण एक प्रकारे राष्ट्रदोह होवू शकतो.
कारण मग आपला पैसा आंतकवाद्यांना पण जायचे चान्सेस आहेत.
स्वगत : असे असेल तर आम्ही हिंदी सिनेमे बघत नाही, हे उत्तमच म्हणायचे.
15 Aug 2016 - 9:20 pm | संदीप डांगे
राष्ट्रद्रोह तर आहेच! पण तो इंग्रजी सिनेमे बघितल्याने टळतो हाही गैरसमज आहे! किंबहुना आपण जे काही खरेदी करतो त्यातला कुठला ना कुठला भाग राष्ट्रविरोधी घटकांकडे जाण्याची शक्यता असते, अनेक गोष्टी दृष्टीआड असतात ते बरेच असते!
16 Aug 2016 - 10:33 am | चिनार
मुविकाका...
जगभरातल्या सिनेमांचे रेव्हेन्यू जनरेशन बघितले तर त्यात हिंदी सिनेमांचा वाटा जास्तीत जास्त 20 टक्के असेल. हा 20 टक्के पैसा चुकीच्या कामांसाठी वापरला जातो असे आपले मत आहे हे आपल्या प्रतिसादांवरून कळते. पण उरलेला 80 टक्के पैसा सत्कारणी लागतो ह्याविषयी काही मत/विदा/पुरावा आहे का ?
नाहीतर हिंदी सिनेमे बघणं जर राष्ट्रद्रोह असेल तर इंग्रजी सिनेमे बघणं हे अखिल मानवजातीविरुद्ध केलेलं कृत्य सुद्धा ठरू शकतं..
अर्थात गोऱ्यांचं सगळंच चांगलं/पवित्र असं मानणारी मंडळी आहेतच आपल्याकडे..
16 Aug 2016 - 12:17 am | बोका-ए-आझम
तशी तर Underworld ने राजकारणातही ब-यापैकी शिरकाव केलाय. मग मतदान करणं हाही राष्ट्रद्रोह म्हणायला हवा.
17 Aug 2016 - 10:15 am | नितिन थत्ते
पूर्वीचं पुणं राहिलं नाही
14 Aug 2016 - 10:48 am | चंपाबाई
छान .. आधीही दोन सिनेमे निघाले होते ना? अशोककुमारचा एक आणि दुसरा विनोद खन्ना का?
14 Aug 2016 - 11:53 pm | बोका-ए-आझम
हा नानावटी खटल्यावर आधारित होता. विनोद खन्नाच्या अचानक मध्ये गाभा तोच असला तरी कथा वेगळी केली होती, उदाहरणार्थ त्यातला सैन्याधिकारी आपल्या पत्नीची हत्या करतो. ये रास्ते है प्यारके आणि रुस्तममध्ये सैन्याधिकारी पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.
14 Aug 2016 - 1:37 pm | यशोधरा
परीक्षणाबद्दल धन्यवाद!
14 Aug 2016 - 2:16 pm | पद्मावति
धन्यवाद. मस्तं परीक्षण.
14 Aug 2016 - 7:31 pm | मनिमौ
आज सकाळीच रुस्तुम पाहिला.मला खुप छान वाटला
अर्थात गाणी अजिबात नसली तरी चालले असते
14 Aug 2016 - 8:44 pm | मदनबाण
रुस्तम या चित्रपट चित्रपटा बद्धल थोडेफारच ऐकले होते,आज हा धागा पाहिला आणि मला जयंत काकांच्या लेखाची आठवण झाली... त्याचे दुवे इथे देतो :-
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho
14 Aug 2016 - 11:59 pm | बोका-ए-आझम
पण खूपच त्रोटक लिहिलंय. अजून वाचायला आवडलं असतं.
16 Aug 2016 - 9:37 am | महासंग्राम
टंकाळा अजून काय ...
15 Aug 2016 - 12:12 pm | अजया
काल पाहिला सिनेमा.त्यातल्या अगदी उठून दिसणाऱ्या काही त्रुटी नजरेआड केल्या तर चांगला आहे सिनेमा!
एकदा अक्षयकुमारसाठी बघायला हरकत नाही.
15 Aug 2016 - 12:40 pm | चौथा कोनाडा
छान आटोपशीर परिक्षण !
आज काल फक्त एखादा बिग बजेट सिनेमा म्हण्जे सबकुछ हिरो.... दुसर्या लोकांचं कौतुक कोणी करतच नाही !
पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा उल्लेख करून या लेखाला चार चांद लागलेत !
या परिक्षणामूळे सिनेमा पाहायची उत्सुकता वाढलीय !
15 Aug 2016 - 1:35 pm | अभ्या..
अक्षयभाव फिटनेस मेन्टेन करून राह्यलेत.
15 Aug 2016 - 2:24 pm | किसन शिंदे
अक्कीसाठी एकदातरी पाहायला जाईनच हा सिनेमा
15 Aug 2016 - 2:25 pm | काळुराम
चांगला आहे सिनेमा
16 Aug 2016 - 2:02 am | चंपाबाई
फालतू आहे
16 Aug 2016 - 10:11 am | पैसा
काल सिनेमा पाहिला. एकदा बघायला चांगला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी आणि धंद्याचे गणित म्हणून मूळ घटनेशी फारकत घेऊन बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. पण गाड्या, कपडे इत्यादि बरेच काळाशी सुसंगत आहे. हिंदी सिनेमात असे फार कमी वेळा बघायला मिळते. गाणी बरीच सुश्राव्य वाटली. इल्याना गोग्गोड दिसली आहे. अभिनय पवन मल्होत्रा आणि कुमुद मिश्राचा आवडला. प्रीती माखिजाचे काम करणारीसुद्धा बर्यापैकी आवडली. अक्षयकुमार आपल्या मर्यादेत चांगले काम करतो. सचिन खेडेकर, उषा नाडकर्णी आणि अनंग देसाईंना फारसे कौतुक करण्यासारखे काम नाही. ओके ओके. हा सिनेमा एकूणात ठीकठाक आहे. पैसे वाया घालवले असे वाटले नाही.
16 Aug 2016 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे
काल पाहिला. आवडला. नेहमीच्या मसालापटांपेक्षा निश्चित वेगळा आणि उजवा आहे.
17 Aug 2016 - 9:43 am | महासंग्राम
डॉक एक शंका आहे, एखादा लष्करी सेवेतील अधिकाऱ्यावर अश्या खटल्यात आरोप सिद्ध झाला तर त्याचं त्याच्यावर लष्कर काही वेगळी कारवाई करत का ??? जसे कि कोर्टमार्शल/सेवेतून बडतर्फ करणे
17 Aug 2016 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे
मला भारतिय लष्कराच्या नियमांबद्दल सखोल माहिती नाही. डॉ खरे याबाबत विश्वासू माहिती देऊ शकतील असे वाटते.
18 Aug 2016 - 1:59 am | बोका-ए-आझम
लष्कराच्या कायद्यांनुसार जे गुन्हे असतात, उदाहरणार्थ insubordination, cowardly behavior, treason - यांच्यासंदर्भात केलं जातं. नानावटींवरचा खटला हा एका लष्करी अधिकाऱ्यावर भरलेला खटला असला तरी तो लष्करी कायद्यांचा भंग केल्यामुळे भरलेला नव्हता. त्यामुळे त्यात court martial झालं नसेल. सेवेतून बडतर्फी झाली असावी. किमान suspend तर केलं असणारच.
17 Aug 2016 - 2:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
या चित्रपटाच्या निमित्ताने जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या लेखमालेची आठवण झाली
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट
पैजारबुवा,
17 Aug 2016 - 2:34 pm | महासंग्राम
हो जयंत काकांनी खूप सुरेख लिहिलंय तो लेख
20 Aug 2016 - 11:28 am | प्रभाकर पेठकर
नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं. ती ह्या केसवरील आधारीत पहिली कलाकृती असा माझा अंदाज आहे. ह्या नाटकाचा कुठेही उल्लेख नाही ह्याचे वाईट वाटले.
बाकी, आज पाहणार आहे 'रुस्तम'.
21 Aug 2016 - 3:20 am | प्रभाकर पेठकर
नानावटी केसवर आधारीत एक मराठी नाटक आलं होतं. मला वाटतं 'माझा कुणा म्हणू मी?' असं कांहीतरी नांव होतं.
माफी असावी. ते मराठी नाटक 'अपराध मीच केला' हे होतं.