"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
21 Feb 2016 - 2:27 pm

आरोप:
तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात.

स्पष्ट शब्दात दिलेली समज:

  1. तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
  2. फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही.

प्रश्न:
तुम्हाला जसे प्रतिसाद मिळावे असे वाटते अन लिहिता तसेच इतर बरेच जण लिहितात. आपण किती जणांचे वाचता? किती प्रतिसाद दिलेत?

आज्ञार्थक विनंती:
वेलकम टू "जातो मी" क्लब ;)

मला आठवणारा एक प्रसंग:

याशिवाय काही प्रकट न झालेले पण कधीही प्रकट होऊ शकणारे विचार :
हा मोरे; नाव, आडनाव, आणि टोपणनावावरून फार कमेंट करतो. काही नियम बनवावा का या संदर्भात !

माझ्यापुढला ज्वलंत प्रश्न:

  1. हे आपलं मैत्रीपूर्ण रॅगिंग चालू आहे की आपण लॉर्ड ऑफ द फ्लाइज खेळतोय? आणि मला जरी मी पिग्गी किंवा सायमन वाटलो तरी कदाचित मी राल्फ किंवा जॅक नसीन कशावरून?
  2. आता हे मिपावर टाकू की नको ?
  3. आणि टाकलंच तर कुठे टाकू? जनातलं मनातलं मध्ये की, काथ्याकूट मध्ये? (बरेचसे माझ्या मनातील विचार आहेत म्हणून, "जनातलं मनातलं" मध्ये टाकतो)
  4. यातली गंमत मिपाकरांना आवडेल का? की एका धाग्यावरून गाशा गुंडाळल्यानंतर पूर्ण मिपाने आपल्याला वाळीत टाकले आहे काय?
विनोदमौजमजाप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

21 Feb 2016 - 3:39 pm | तर्राट जोकर

काकांना आनंद मोरे विभाग काढून द्या.

Anand More's picture

21 Feb 2016 - 4:01 pm | Anand More

प्रचंड हसलोय …. :D :D :D :D

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 4:04 pm | यशोधरा

मोरेसाहेव, जरा चिल माडी (प्यायची नव्हे, कानडीमधली) हो. चांगलं लिहिता तुम्ही. अगोदरचं आणि राशोमोनही आवडलं होतं.

ही मात्र उगाच्च जिलबी आहे हो मोरेकाका.

सतिश गावडे's picture

21 Feb 2016 - 4:08 pm | सतिश गावडे

अगदी हेच वाटले.
राशोमान सारखी विचारांना खुराक देणारी उत्तम वैचारीक लेखमाला लिहिल्यानंतर असा धागा येणं काही आवडलं नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Feb 2016 - 11:10 am | टवाळ कार्टा

का? जिल्ब्या फक्त तुम्हीच टाकाव्या का? =))

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:19 pm | स्वामी संकेतानंद

र्‍यागिंग सबका होता है बाबा. काय्कू टेन्सन घेनेका?

स्पा's picture

21 Feb 2016 - 4:34 pm | स्पा

अर्र्र

चला. विडंबनाला मटेरिअल मिळाले. मस्त एकदम. थँक यु मोरेसाहेब. ;)

च्यायला राहिलेच की विडंबन करायचे.
जौदे. आता मोरे आपले झाले ;)
.
.
.
तिकडे टाकावे.

अभ्या भौ … करा की विडंबन … काळवेळ असायला ते काय डंबन थोडीच आहे (काहीतरी चुकलं वाटतं)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2016 - 5:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हिडीओ क्लिप आवडली !

अजया's picture

21 Feb 2016 - 8:16 pm | अजया

:)

पैसा's picture

22 Feb 2016 - 11:33 am | पैसा

अरे बापरे

बॅटमॅन's picture

22 Feb 2016 - 12:06 pm | बॅटमॅन

असा सगळा प्रकार झाला तर, खूप वाईट झाले

रातराणी's picture

22 Feb 2016 - 12:31 pm | रातराणी

सर सर ओ सर वी लौ यू :)

घाटी फ्लेमिंगो's picture

28 May 2016 - 1:09 pm | घाटी फ्लेमिंगो

ह्या प्रसंगाची पुनरावॄत्ती 'होईल' ह्याची पुरेपुर काळजी घेऊ आम्ही सर..!!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 May 2016 - 2:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही लिहा...वाचणारे वाचतीलच!!

अवांतर-- फार दुखतंय का?

विवेकपटाईत's picture

28 May 2016 - 3:29 pm | विवेकपटाईत

ज्या माणसाकडे डोके असते तो मिसळपाव वाचण्या आणि लिहिण्या साठी आपला बहुमूल्य वेळ का खर्च करेल? त्या पेक्षा मिसळपावची टपरी टाकून पैका कमवेल. दुपारी मस्त पैकी झोपण्या एवजी मी इथे प्रतिसाद का देतो आहे मलाच समजत नाही. कदाचित माझे डोके हि ....

तुमचा हा प्रतिसाद माझा विवेक जागृत करण्यात कदाचित मला पटाईत करू शकेल … पण हाय दैवा तरीही हा प्रतिसाद देण्याची सुरसुरी काही मला रोखता आली नाही…. त्यामुळे माझे आभासी डोके त्याच्या आभासी ठिकाणावर आणण्याचा माझा प्रयत्न चालूच ठेवावा लागेल मला.