तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा,
ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी,
तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,
ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी,
एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण.
दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं,
एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं.
' वाट होते जरी तुझी माझी वेगळी,
सोबतीची तरी आस सांग का लागली,
जीव तुटतो का असा रे.. सांग ना
तुझ्याविना, तुझ्याविना..'
आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी...
मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली,
मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला.
तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला..
' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..'
जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं,
काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा..
तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा.
' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..'
आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं.
' कोण होतास तू,
काय झालास तू
अरे वेड्या कसा
वाया गेलास तू..'
तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची.
त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती.
' गडी अंगानं उभा नि आडवा,
त्याच्या रूपात गावरान गोडवा,
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा,
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..'
आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा.
'अंगात माझिया भिनलाय ढोलिया,
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली,
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..'
त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती,
' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग,
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..'
अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले.
मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली,
'प्रचू डार्लिंग !!'
अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली..
क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले.
'बदलुन गेलया सारं,
पिरतीचं सुटलया वारं,
अल्लड भांबावयाला,
बिल्लोरी पाखरू न्यारं,
आलं मनातलं ह्या व्हटामंदी,
अन मनासंगं मन जुळलं जी..'
.............................................................................................
.............................................................................................
क्रमश:
* कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती.
** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल,
कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही.
मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात.
अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात.
.............................................................................................
प्रतिक्रिया
18 May 2016 - 12:09 pm | नाखु
एक जागेवर अचल असल्याने तिची काहीच फिकीर नाही आणि तक्रार सुद्दा !!
अता फिरणारी (आणि फिरवणारीहीच्या) काय काय अपेक्षा आहेत ते बुवांना (कदाचित) माहीत असेल.
बाकी या धाग्य्वर स्पा-बुवा जोडी न आल्याचे आस्चर्य वाटले
बाकीचा साक्षीदार नाखु
18 May 2016 - 12:24 pm | वपाडाव
जोडीने दर्शनाला गेले असावेत काय??...
18 May 2016 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, वर आलेले लेखनातीलविचार काल्पनिक आहेत,
गंभीर नका होऊ हं तुम्ही प्लीज. प्रचु डार्लिंग सॉरी प्रचेतस काळजी घ्या....! :)
-दिलीप बिरुटे
18 May 2016 - 12:28 pm | प्रचेतस
बसं का सर?
20 May 2016 - 10:05 am | वपाडाव
सर, वरच्या प्रतिसादात दोन जोड्या असल्याने तुम्हाला असले प्रश्न उद्भवले असावेत.
पण मी स्पा-बुवा जोडीबद्दल बोलत होतो हे नमुद करावयचे राहुन गेले.
गैरसमज नसावा
18 May 2016 - 11:35 am | रमेश भिडे
काय चाललं आहे नेमकं?
जोड्या काय, डार्लिंग काय, मोहोर काय, मेसेंजर काय?
मैं कहा हूँ?
18 May 2016 - 12:22 pm | वपाडाव
रविना जरा टिलु को दवाइ पिलाना...
18 May 2016 - 12:34 pm | नाखु
ठीक नही होता आप यहांपेही रहना.
18 May 2016 - 12:39 pm | रातराणी
दवाई नहीं डंडे मारणे पडते है ऐसे मरीजको ;)
( भिडेसर हल्के घ्या. रहावल नाही अगदीच)
18 May 2016 - 12:59 pm | रमेश भिडे
संस्थळाची लायकी त्याचे सदस्य ठरवतात असं नुकतंच याच संस्थळावर वाचलं आहे. असो!
18 May 2016 - 2:02 pm | रातराणी
रागावू नका ओ काका. कधीतरी दंगा करायचीच पोरं. :)
18 May 2016 - 2:05 pm | रमेश भिडे
मग तुम्ही का शिंगं मोडून घुसताय वासरांमध्ये???
पोरांना करु दे दंगा. आणि कोण लहान आहे इथं मुळात म्हणतो मी?
18 May 2016 - 2:08 pm | रातराणी
झाले शंभर. टाटा बाय बाय! :)
18 May 2016 - 2:11 pm | रमेश भिडे
हा हलकटपणा आहे राणे!
18 May 2016 - 2:15 pm | रातराणी
हा हलकटपणा आहे? मग तुम्ही आमचे पेपर नेऊन रद्दी देता परस्पर ते काय आहे अं?
18 May 2016 - 2:19 pm | रमेश भिडे
हळू बोला हळू!
आणि बास बनवाबनवी आता.
संस्थळाची लायकी उंचावेल असं काही करा!
18 May 2016 - 2:23 pm | रातराणी
चला मिपावीरहो सुसज्ज व्हा उठा चला! माझे डोळे उघडले तुम्ही काका. माझ्या काही करण्याने संस्थळाची लायकी उंचावेल असं आपल्यासारख्या सन्माननीय सदस्याला वाटतं यातच सर्व काही आलं. ;)
18 May 2016 - 2:30 pm | नीलमोहर
संस्थळाची लायकी उंचावेल असं काही करा!
-उदाहरणार्थ ?
आम्ही अगदीच अजाण नादान आहोत, आमचे अज्ञान दूर करा.
18 May 2016 - 4:49 pm | पैसा
आयडी चुकला का?
18 May 2016 - 5:55 pm | रमेश भिडे
तो विश्वास सरपोतदार नावाच्या character च्या तोंडचा संवाद आहे. ते राणी ऐवजी राणे मुद्दाम म्हटलं आहे. माने राणे यमक जुळवायला.
आयडी चुकला का कशाबद्दल?
18 May 2016 - 6:04 pm | पैसा
धनंजय माने आयडी असल्या प्रतिक्रिया देताना बघितलाय.
18 May 2016 - 2:12 pm | सस्नेह
पळतेस कुठं ? सत्कार कोण करणार ??
18 May 2016 - 2:18 pm | रातराणी
ते काम जेपींच आहे. तस्मात आपला पास. तस पाहिलं तर माझाच सत्कार चाललाय इथं. वेगळा कशाला आणि नीमोचा?
18 May 2016 - 2:19 pm | सस्नेह
तू आणि नीमो एकच आहात वाट्टं ? =))
18 May 2016 - 2:25 pm | नीलमोहर
"Et tu, Brute?"
18 May 2016 - 2:35 pm | सस्नेह
आताच वरती भिडेकाकांनी उंच उंच कामं करा म्हणून सांगितलाय आणि तुम्ही शिव्या देताय ?
हर हर...
(किती करायचेत आता ? दोनशे ? दे सुपारी )
18 May 2016 - 2:59 pm | नीलमोहर
किती करायचे ते करा, मी नको म्हणून का ते व्हायचे राहणारेत.
उंच उंच कामं करत उंची वाढली पण तब्येत बारीक राहिली, म्हणून तो नाद सोडून दिला ;)
18 May 2016 - 4:47 pm | पैसा
मी चुकून Birute वाचले आणि जाम दचकले! हर हर!
18 May 2016 - 4:58 pm | अजया
=))))))
18 May 2016 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण बिरुटेच वाचलं होतं. =))
निमोने वेडं केलं राव पब्लिकला.
-दिलीप बिरुटे
18 May 2016 - 6:19 pm | वपाडाव
तरी बरं,
item song एकही नव्हतं ह्यात...
नैतर शिव शिव...
18 May 2016 - 2:25 pm | रातराणी
ह्या ह्या ह्या नीमो बघ बाई काय काय सहन करतीये मी!
18 May 2016 - 1:53 pm | कंजूस
आम्हाला ही काल्पनिक श्टोरी आवडली आहे याची नोंद घ्यावी.प्रचूची खवं आम्ही वाचत असतो आणि तिकडे दुर्लक्ष करत आलोय.आता त्यांना झोप येत नसे असं कित्येकांना वाटून गेलं ( सर) परंतू प्रचूला उशाशी धोंडा घेतला तरी झोप येते.मुग्ध बालिकांच्या तसबिरी त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर आहेत पण त्यांच्या ध्यानाचा भंग करू शकत नाहीत.
# काही महिन्यांपुर्वी ऐसीवर अशीच काही प्रेमपत्रे प्रसिद्ध होत होती." प्रटुल्याची वीणा." लेखक पीडी वीणा. वाचून पाहा.
18 May 2016 - 2:42 pm | नाखु
धाग्यातील नायकाचा खालील गाण्याच्या चित्रफीती देऊन भाजे येथील लेण्यात रा रा रा पोपशास्त्री यांचे हस्ते व धागालेखिका प्रमु़ख पाहुणे यांचे उपस्थीतीत करणेत येईल. सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या+प्रीमो) देतील्,टक्या हात+डोळे पुसायचे रुमाल(फक्त ७ नग) प्रायोजीत करीत आहे.वल्ली मित्रमंडळाकडून बांबुची/चटईची हॅट दिली जाईल.
अखिल मिपा सचीव जेपी संस्थापित टका संचालित सत्कार महामंडळ (पुणे महानगर शाखा)
गाणे क्रं १
गाणे क्रं २
गाणे क्रं ३
गाणे क्रं ३
साहीत्य संपादकांनी विनंती गाणी दृश्य्स्वरूपात रुपांतरीत करावीत.
18 May 2016 - 3:35 pm | अभ्या..
आँ....
प्रीमो कधी करायली हे?
.
आणि @ नाखुन्स
असले आयजी बायजी उदार शिलेदार चलणार नाही बरका. आधीच सांगून ठेवतो.
18 May 2016 - 3:40 pm | नाखु
टी शर्ट निमो करतात का प्रीमो तेच नीट लक्ष्यात नाही आले.
अता अमाले डिझाईनमधल< काही कळत नाही तेव्हा तुच एक आधार.
18 May 2016 - 5:00 pm | प्रीत-मोहर
तेच ना. मी कुठुन आले हित्ते म्हणते मी?
18 May 2016 - 5:01 pm | प्रीत-मोहर
मी हे काम करत नाही नाखु आणि अभ्या.
धन्यवाद.
18 May 2016 - 3:20 pm | विटेकर
नुस्ता टारगट्पणा चालला आहे ! मजा गेली !
पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो
18 May 2016 - 3:31 pm | सतिश गावडे
>> पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो
हे "पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा जीव जातो" असं असायला हवं होतं का?
18 May 2016 - 3:50 pm | सस्नेह
दु दु सगा सर तुम्ही प्रतिपक्षास फितूर झाला आहात हे आमच्या ध्यानी आले आहे.
19 May 2016 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा
@पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा जीव जातो" असं असायला हवं होतं का?›››
18 May 2016 - 6:01 pm | जेपी
अजुन वेळ गेली नाही..
धाग्याचे प्रयोजन काय हे सांगावे..
(आता उरले सत्कारापुरता )जेपी
19 May 2016 - 11:40 am | पियुशा
आता उरले सत्कारापुरता )जेपी
काय हे ? उरले का उरलो तुमच्यावर पण दॉ ऊ ट घ्यावा काय ;)
18 May 2016 - 6:39 pm | जव्हेरगंज
लै भारी !!!
18 May 2016 - 9:24 pm | मुक्त विहारि
आता मुग्धाच्या ह्या खोडीने हितेश,उद्दाम, सचिन, नाना नेफळे, माई, ग्रेट थिंकर. दादा (द)रेकर ह्यांना काय वाटेल?
19 May 2016 - 9:01 am | प्रचेतस
माताय, चित्र कुणी टाकलं वर?
19 May 2016 - 9:52 am | चांदणे संदीप
लोल!
.....आणि सांगा राया सांगा ही कशी दिसते?
=)) =))
Sandy
19 May 2016 - 10:01 am | अभ्या..
लावून ताडी
आक्ख टमरेल ओतून आलोया
सोडून गाडी
विसरून किल्ली पळत आलोया
भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट
भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट
भिंग भिंग भिंग भिंग भिंग
19 May 2016 - 10:18 am | नीलमोहर
कथा जोडीची आहे किनई, मग नायिकेचे एकटीचेच का चित्त्तर? नायकही हवा होता त्यात, त्यास हवे तर बदामाच्या दुसर्या बाजूस उभे करायचे होते..
चित्त्तर लई भारी हां पण :)
19 May 2016 - 10:27 am | प्रचेतस
कशाला उगाच ते, नायिका एकटीच पुरेशी आहे. नैतरी नायिकेचेच मनोगत आहे हे.
19 May 2016 - 10:35 am | अभ्या..
ते कैतरी आत्मरन्जन आत्मकुंथन वगैरे तुम्ही म्हणता तशापैकीय का हे?
19 May 2016 - 10:37 am | प्रचेतस
ते फक्त बुवांचं असतं.
19 May 2016 - 11:08 am | नीलमोहर
कुठल्या अँगलने ते नायिकेचेच मनोगत वाटतेय हो.. ती सरळसरळ दोघांची कथा आहे.
ते कसेय ना, आधी तो पिच्छा पुरवणार, ती बळेच झिडकारणार, आधी इन्कार मग इजहार यात मजा होती,
आता नायिकेने प्रेम व्यक्त करून झालेय, मग स्टोरीत काही मजा वाटत नसेल नायकाला. एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिचं कौतुक, हाती आली की कौतुक संपलं, तसंच.
आता मध्यंतरानंतरची सैराटची स्टोरी सुरू झालीय, वास्तव दिसायला लागले असेल समोर :p
19 May 2016 - 11:11 am | अभ्या..
हा ना. नुसती बुलेट चलवून काय होनारे? लसून कुठे सोलता येतोय? ;)
.
आमच्या आर्चीला सगळं येतया ब्वा. :)
19 May 2016 - 11:50 am | प्रचेतस
नक्की का?
नायक मुळात पिच्छा पुरवतचं नाहिये, नायिकेलाच हे असं वाटत असेल तर त्याला नायक विचारा काय करणार? राहिता राहिला प्रश्न नायिकेने प्रेम व्यक्त करण्याचा पण नायकाकडून दुसरी बाजू पुढे येतच नाहिये किंवा नायकाचीच बाजू पुढे येत नाहिये मग कसलं कौतुक आणि काय. नायक बिचारा त्या दगडधोंड्यांतच रमलेला दिसतोय अजून.
बाकी इथेतरी नको ब्वा सैराट उगाच :)
19 May 2016 - 12:23 pm | नीलमोहर
सार्या पुराव्यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवायला हवे होते, पण तुम्ही असे पलटाल असं कधी वाटलं नव्हतं...
'नायक मुळात पिच्छा पुरवतचं नाहिये'
- आत्ता इथे पुराव्यादाखल नायकाचे अनेक प्रतिसाद दाखवून दिले असते, पण ते सध्या शक्य नाहीय, हे त्यासही
माहित आहे आणि त्याच गोष्टीचा तो पुरेपूर फायदा घेतोय.
'नायकाचीच बाजू पुढे येत नाहिये.. नायक बिचारा त्या दगडधोंड्यांतच रमलेला दिसतोय अजून.'
- हो ना, आणि मी नाही बुवा त्यातला, म्हणून त्याने लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी अर्जंट्मध्ये हिरवाई इ.सोडून पूर्वीप्रमाणे एक लेण्यांवरील धागा टाकून दिला आहे.
मला तर मुग्धेची दया येऊ लागलीय आता, बिचारी.. कसं सोसेल ती हे सारं...
19 May 2016 - 12:33 pm | प्रचेतस
=))
खूपच हसायला आलं हो.
दाखवा बरं ते प्रतिसाद कुठे असले तर (व्यनि केले तरी चालतील)
बाकी नायकाचं हे धागे टाकणं नॉर्मल आहे. नायक पूर्वीपासूनच तसं करत आलाय. सध्याचा धागा लेणीवर नसून मंदिरावर असावा ह्याची नोंद घ्यावी.
बाकी ती मुग्धा ही डु आयडी होती हे पहिल्यापासून सर्वांनाच माहीत होते. तीही आता उडालीय.
19 May 2016 - 1:23 pm | नीलमोहर
मुग्धा नसल्यामुळे तिचे प्रतिसाद शोधता येत नाहीत, त्याचाच फायदा नायकास मिळतोय.
कुणीतरी म्हटलेलं आहेच की नायक बोलायला पोपट आहे म्हणून, तो बोलण्यात असा सहजासहजी हार जाणार थोडीच,
आता कुणी काहीही बोलले तरी त्याच्याकडून निव्वळ शब्दच्छल चालू राहणार,
असोच.
19 May 2016 - 1:29 pm | प्रचेतस
=)).
असोच्च असो.
19 May 2016 - 11:42 am | पियुशा
नायक बस णार आहे का पन चित्रात ? आय मिन किति मोठ चित्र बनवाव लागेल मग ;)
विचारात प ड ले ली पियु ;)
19 May 2016 - 10:45 am | पैसा
डोळे उघडा, बघा नीट! ते नायिकेचं चित्र नैये. नायक लोकांवर लक्ष ठेवणारी हातात भिंग घेतलेली छिद्रान्वेषी डिटेक्टिव्ह आहे ती!
19 May 2016 - 10:59 am | प्रचेतस
मला तर ती हातात आरसा घेतलेली दर्पणा वाटली. :)
19 May 2016 - 11:52 am | चांदणे संदीप
मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता...!!

Sandy
19 May 2016 - 11:58 am | भोळा भाबडा
नीमो हा बिरूटे सरांचा आयडी असण्याची दाट शक्यता आहे.
19 May 2016 - 12:01 pm | अभ्या..
हम्म. भोळे भाबडे नाहीत म्हणा की तुम्ही?
19 May 2016 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भोले भाबड़े नाहीत ते.... बाकी मी निमो नाही. आणि मी कोणत्याही अन्य आयडीने वावरत नाही.
-दिलीप बिरुटे
19 May 2016 - 9:33 pm | रमेश भिडे
कसली गोडुली गँग आहे हि. डकटेल्स ना???
19 May 2016 - 1:28 pm | पैसा
दर्पणा असेल तर जत्रेत पाच रुपयाला मिळणारा आरसा हातात घेतलेली आधुनिकोत्तर दर्पणा दिसते ही!
19 May 2016 - 1:30 pm | प्रचेतस
=))
लोलबंध
19 May 2016 - 12:37 pm | सस्नेह
बाकी काही असो, चित्र भारी रे अभ्या..
20 May 2016 - 9:30 am | सतिश गावडे
चित्रातील कन्येच्या हाती आरसा नसता तर आपले हेच मत असते का?
20 May 2016 - 10:11 am | सस्नेह
तो आरसा आहे ??
मला वाटलं मुग्धातैंच्या हातातला स्टेथॉस्कोप.
20 May 2016 - 10:32 am | अभ्या..
त्याला काय हेडफोन जोडता का तपासायच्या येळी?
20 May 2016 - 10:33 am | अभ्या..
का ब्ल्यू टूथ स्टेथो आहे?
20 May 2016 - 10:36 am | सस्नेह
ते हेडफोन जमलं नसेल ओ चित्रकाराला. आपण समजून घ्यायचं =))
20 May 2016 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा
असा सगऴा प्रकार झाला तर!
20 May 2016 - 9:46 am | वडाप
आरसा तर अमच्या गाडीलाबी असतुया आन मागे लिवलय - मला आपली म्हना आन सुट्टे पैसे द्या
20 May 2016 - 11:51 am | रमेश भिडे
2000 करायचे आता. थांबू नका.
मिपा चे झेंडे अटकेपार लावा.