सैराटच्या निमित्ताने....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 May 2016 - 9:55 pm

मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे.

१. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले.

आज दोघेही सुखाने नांदत आहेत.

२. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत.

३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

४. मुलगी देब्रा आणि मुलगा ९६ कुळी मराठा. मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

५. मुलगी कोब्रा आणि मुलगा धनगर.दोघांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून द्यायचे ठरवले आहे.

६. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

वरील सर्व उदाहरणे महाराष्ट्रातील आणि त्यातील एक तर सोलापूर जिल्ह्यातलेच आहे.

==================================

आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

चित्रपटप्रकटनविचार

प्रतिक्रिया

धनंजय माने's picture

9 May 2016 - 5:19 pm | धनंजय माने

काही का असेना आम्ही सगळ्यांनी (शंतनू सकट) नोकरी बघून लग्नं केली. थोडं खोटं बोलणं वगैरे ठीक आहे पण उगाच पैजा लावून प्रेम आणि लग्न करायला ते म्हणजे काय हे आहे काय????

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 7:11 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मिस्टर धनंजय माने माझे सत्तर रूपये कधी देताय?

नया है वह's picture

10 May 2016 - 12:12 pm | नया है वह

;)

स्पा's picture

9 May 2016 - 5:21 pm | स्पा

आॅच् श्ग्ग जाल्ल तल

तुषार काळभोर's picture

9 May 2016 - 5:21 pm | तुषार काळभोर

वर धागाकर्त्याने दिलेल्या उदाहरणांत (आणि इतरत्रही) बहुतेक वेळा (पाचात चारवेळा? दहात सातआठ वेळा?), विरोध हा मुलीच्या घरच्यांकडून होतो. विरोधाची कारणे 'आंतरजातीय' विवाह आहे यापेक्षा इतर जास्त असतात.
उदा. मुलाच्या घरचं 'लो' आर्थिक/सामाजिक स्टेटस.

प्रेमविवाहाची काही काल्पनिक उदाहरणं बघू
१) मुलगा व मुलगी दोन्ही समजातीय (मराठा/देब्रा/कोब्रा/कुणबी/दलित कोणीही) : मुलाचा आर्थिक स्तर कमी/मुलीचा जास्त. परिणामः मुलीकडच्यांचा अतीतीव्र विरोध. मुलाकडच्यांचा विरोध नाही.(क्वचित मुलाकडच्याकडून विरोध झाला तर कारण असे असू शकते: मोठ्याची मुलगी डोक्यावर बसेल)
२) आंतरजातीयः मुलगी उच्चजातीय व श्रीमंत/मुलगा निम्नजातीय व गरीबः उदा क्र १ पेक्षा 'n' पटींनी मोठा विरोध.
लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य.
३) आंतरजातीयः मुलगा उच्चजातीय व श्रीमंत/मुलगी निम्नजातीय व गरीबः मुलीकडच्यांकडून शुन्य/थोडाफार विरोध. मुलाकडच्यांकडून कडाडून विरोध.(मुलाला बहिणी असतील तर लग्न होण्याची व घरच्यांनी ते टि़कू देण्याची शक्यता जवळजवळ शून्य)
४) आंतरजातीयः आर्थिक स्तर जवळपास सारखा: गरीब/श्रीमंत घरातून थोडाफार विरोध. मध्यमवर्गीय घरांतून तीव्र विरोध.(मुलगा-मुलगी दोन्ही बाजूंनी)

प्रत्यक्ष पाहण्यातील उदाहरणे:
१) मुलगी-मराठा, मुलगा-माळी(ओबिसी): दोन्ही मध्यमवर्गीय; मुलाच्या घरच्यांनी स्वीकारलं, मुलीकडच्यांनी लग्नाला विरोध केला, मुलीला २ आठवडे घरात डांबून ठेवलं, मुलगी परीक्षेसाठी कॉलेजला जाऊ लागली, शेवटच्या पेपरनंतर घरी आलीच नाही. सतरा वर्षे झाली. सुखात संसार सुरू आहे. मुलीकडच्यांनी सुरुवातिल संबंध तोडले, मुलगी आम्हाला मेली असे जाहीर केले, नंतर मुलगी व आई चोरून भेटू लागल्या. आता सगळं आलबेल
२) मुलगी-मराठा, मुलगा-(गुन्हेगारी शिक्का बसलेल्या) भ.वि. जातीतला (वडील बँकेत प्युन होते, पण त्यामुळे शिक्षणाची किंमत होती व मुलगा डिप्लोमा करून 'भारत फोर्ज' मध्ये सुपरवायजर होता). इतर वरीलप्रमाणेच सर्व.
३) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, दोन्ही कुटुंबे हडपसरची 'गुंठामंत्री'/बागायतदार क्याटेगरीतली. मुलाच्या घरच्यांचा शून्य विरोध. मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध. काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल.
४) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा, मुलाचे आईवडील दोघे शिक्षक -विरोध नाही. मुलीचे वडील येस्बीआयमध्ये शाखाव्यवस्थापक- आईचा अतीतीव्र विरोध . मुलगा-मुलगी दोघेही आयटीत व कमावते. दोघांनी ठरवले की घरी समजावत राहायचे, पण पळून जाऊन/गुपचुप लग्न नाही करायचे. दोन वर्षांनी घरचे 'पटले'. आता सगळं आलबेल.
५) मुलगी: महादेव कोळी, मुलगा: मराठा, मुलीच्या घरच्यांचा अतीतीव्र विरोध, मुलाकडून आल-इज-वेल. (मुलीच्या आईने गुडनाईट पिऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.). काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने लग्न सुरळीत पाडले. आता सगळं आलबेल.
६) मुलगा व मुलगी दोन्ही मराठा. मुलीचे वडील खाजगी कंपनीत अकाउंटंट होते. आता गुंठामंत्री. मुलाचे वडील नाशिक जिल्ह्यातील एका मोठ्या गावी वकील. मुलगा व मुलगी दोघे आयटीत नोकरीला. मुलाच्या घरून विरोध नाही. मुलीच्या घरच्यांचा विरोध. (कारण घरातील इतर मुलींची-म्हणजे भावांच्या मुलींची लग्ने परिसरातील गुंठामंत्र्यांच्या घरी झालेली.) मुलगा-मुलगी ठाम व शांत राहिले. घरूनही काही आततायीपणा नाही. एक-दीड वर्ष सर्वांतर्फे वेट & वॉच. आता मुलीचे वडील लग्नाला तयार झालेत.

कन्क्लुज्यनः अपवाद वगळता, प्रेमविवाहाला मुलीच्या घरून विरोध असतो. जात, वगैरे फक्त निमित्त!

उडन खटोला's picture

9 May 2016 - 5:27 pm | उडन खटोला

http://www.misalpav.com/node/34641

ह्ये बी बगा वाइच टायम काडुन म्हन्तोय मी

मित्रहो's picture

9 May 2016 - 7:52 pm | मित्रहो

चित्रपट सुंदर बनवलाय, मला तर पहील्या भागापेक्षा दुसऱ्या भाग जास्त आवडला. पहीला भाग बराचसा मनिरत्नमची आठवण करुन देतो. सुंदर गाणी, त्याचे जबरदस्त शूटींग, उसाची आणि केळाची शेत गेली कित्येक वर्षात मराठी सिनेमात आलीच नव्हती. दुसरा भाग जबरदस्त. हेैद्राबादचे नाव दिल्याने आम्हाला अधिक जवळचे. मी तर बंजारा हिल्स, की असेंब्ली की एनटीआर गार्डन हाच विचार करीत होतो. पळून जाउन लग्न करण्याचा विचार करनाऱ्यांनी तर दुसरा भाग बघायलाच हवा (शेवटली दोन मिनिट सोडूून). आयुष्य वाटत तितक गोड नसते.
आता राहीला शेवट, अजिबात आवडला नाही. सिनेमॅटीक दृष्टीकोनातून हा शेवट कदाचित भारतीय सिनेमाच्या दहा पैकी एक शेवट म्हणून असेल पण एक विचार म्हणून मात्र हा पराभूत मनोवृत्तीचे प्रतिक आहे. हे वास्तव असले तर तितकेच वास्तव वाटले असते जर परशाने सगळ्यांना कुटुन काढले असता हे जितके वास्तव वाटले असते तितकेच. लाखातली एक केस वगेरे. प्रत्यक्षात दोन वेगळी आयुष्य दोन वेगळ्या ठिकाणी तशीच चालली असती. शेवटी काही रेषा समांतर सुद्धा असतात त्यांनी भेटायलाच हवे असे नाही. माफ न करताही दोन आयुष्ये चालली असती ते जास्त वास्तवादी असते. माणसाला देवाने फार मोठी देणगी दिली विस्मृती, माणूस कदाचित माफ करनार नाही पण विसरायला शिकतो. कदाचित प्रचंड प्रभावी शेवट करण्याच्या नादात माणसाच्या या सहज प्रवृत्तीचा नागराजला विसर पडला असेच वाटले.

एक कलाकारच दुसर्या कलाकाराची तारीफ करु शकतो. नाही का?

एकदम खरी गोष्ट.....

म्हणूनच तर आम्ही जॉनी डेप (निक ऑफ टाइम),जॅक निकल्सन (बॅटमॅन), टॉम हँक्स (फॉरेस्ट गम्प), डेंझेल वॉशिंग्टन (फ्लाईट) आणि जेसन स्टॅथॅम (द बँक जॉब) ह्यांची तारीफ करतो.

असो,

जमल्यास, डेंझेल वॉशिंग्टन अभिनित "फ्लाईट" जरूर बघा.अर्थात मुलांच्या बरोबर बघू नका.

जेपी's picture

10 May 2016 - 12:24 pm | जेपी

100

नाखु's picture

10 May 2016 - 1:05 pm | नाखु

धागा शंभरीबद्दल मुवीशेठ यांचा एक सुई दोरा,एक मी सैरा तर तू वैरा या (गुरुजींच्या ताज्या कवीतां-चारोळ्यांचा हस्तलिखीत-मागील बाजूस घरच्या वाण-सामानाची यादी आहे तेव्हा वाचून परत देणे ) आणि दोन असोले नारळ आणि निवडायला दुर्वा देऊन करण्यात येत आहे.

मिपा संचालित जे पी मित्रपरिवार

मुक्त विहारि's picture

30 May 2022 - 7:22 pm | मुक्त विहारि

आणि ते आता सुखाने संसार करत आहेत ...

संसार वेलीवर, एक फुल देखील उमलले आहे