सैराटच्या निमित्ताने....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 May 2016 - 9:55 pm

मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे.

१. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले.

आज दोघेही सुखाने नांदत आहेत.

२. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत.

३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

४. मुलगी देब्रा आणि मुलगा ९६ कुळी मराठा. मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

५. मुलगी कोब्रा आणि मुलगा धनगर.दोघांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून द्यायचे ठरवले आहे.

६. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत.

वरील सर्व उदाहरणे महाराष्ट्रातील आणि त्यातील एक तर सोलापूर जिल्ह्यातलेच आहे.

==================================

आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

चित्रपटप्रकटनविचार

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

8 May 2016 - 10:08 pm | जव्हेरगंज

मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.

अभिनंदन!!!

पूर्वग्रहदुषितेचा चष्मा लावलेल्यांसाठी हा सिनेमा नाहीच्चे!

आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

बरं, तुमच्या आटपाट नगरात सगळं आलबेल असेल तर प्रश्नच मिटला. नकाच बघू तुम्ही ती भिकार कलाकृती!

केवळ 'मी पिच्चर पाहणार नाही' हे सांगण्यासाठी धागा काढलाय काय? मग असो!
शुभेच्छा!!!

टवाळ कार्टा's picture

8 May 2016 - 10:16 pm | टवाळ कार्टा

काहितरी चुकतेय

अभिनंदन!!!

पूर्वग्रहदुषितेचा चष्मा लावलेल्यांसाठी हा सिनेमा नाहीच्चे!

लेखात कसलाही पुर्वग्रहदूषितपणा दिसला नाहीये...पिच्चर नसेल बघायचा तर ठिकाय कि...बघितलाच पाहिजे असेही नाहीये

बरं, तुमच्या आटपाट नगरात सगळं आलबेल असेल तर प्रश्नच मिटला. नकाच बघू तुम्ही ती भिकार कलाकृती!

पिच्चरला भिकार कुठेही म्हटलेले नाहिये

वैभव जाधव's picture

8 May 2016 - 10:23 pm | वैभव जाधव

मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस आपण असे कसे बोलू शकता?

जव्हेरगंज's picture

8 May 2016 - 10:37 pm | जव्हेरगंज

"सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

हे त्यांना कुठून कळालं? बघायच्या आधीच? म्हणून ते पूर्वग्रहदुषित!

सिनेमा बघणे/न बघणे ज्याची त्याची आवड! पण 'मी बघणार नाही' हे स्पेशली सांगणे म्हणजे जरा अतीच!
असो!

मुक्त विहारि's picture

8 May 2016 - 11:03 pm | मुक्त विहारि

परीक्षणांत कुणी लिहिले नसले तरी ऐकण्यात तर नक्कीच आले आहे.

शिवाय अंकूर किंवा निशांत पेक्षा....जॉनी मेरा नाम आणि शोले हेच जास्त आवडतात.

असो,

आम्हाला जरा अ‍ॅक्शन (३६ चेंबर ऑफ शाओलिन, शाओलिन सॉकर) किंवा कॉमेडी (व्हाय वरी, सेफ्टी लास्ट) किंवा सायन्स फिक्शन (अवतार, स्टार वॉर्स) मुवीज जास्त आवडतात.

ज्याची त्याची आवड.

कधी तरी हिंदी सिनेमे बघत होतो, त्या काळात पण "एक दूजे के लिये" पेक्षा, बॉबी,बेताब, हीरो आणि एक जान है हम (हा पण एक सिनेमा होता) जास्त आवडले आणि परत-परत बघीतल्या पण गेले.

"आणि ते मेले" ह्या नकारात्मक शेवटापेक्षा "आणि त्यांनी लग्न केले" असा सुखावह शेवट मला तरी जास्त आवडतो.

मला "एक दुजे के लिये" आवडला नाही म्हणून ती कलाकृती बेक्कार, असे मी म्हणत न्हवतो आणि मला "५ रायफल्स" आवडला म्हणून, तीच कलाकृती सर्वश्रेष्ठ असे आजही म्हणत नाही.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

8 May 2016 - 10:14 pm | चंद्रनील मुल्हेरकर

प्रत्येक उदाहरणात सवर्णांतर्गत विवाह आहेत ,त्यामुळे फारसा विरोध झालेला नाही.आमच्या गावात एका मराठा मुलीशी मित्रत्वाच्या नात्याने बोलणार्या एका दलित मुलाचा खून करण्यात आला ,दोघांचीही फक्त मैत्री होती बाकी काही नाही.
आज ब्राह्मण मुली मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह करत आहेत ,पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे.
महाराष्ट्रात ऑनर किलिंग मध्ये मराठा जात आघाडीवर आहे ,नीतीन आगे सारख्या घटनांमधून हेच दिसते.मराठ्याच्या मुलिने ब्राह्मणाशी सूत जुळवले तर त्यांना विलक्षण आनंद होतो,पण जर मुलगा तथाकथीत मागासवर्गीय जातीतला असला तर मग त्याचा खून पडायला वेळ लागत नाही.
प्रस्तुत लेखकाला अजूनही जातीची उतरंड.

नाखु's picture

9 May 2016 - 9:35 am | नाखु

पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे.

जीतकी चर्चा आणि प्रतिसाद पूर धागे खैरलांजीआणि जवखेडा नगर बद्दल आले त्याच्या पार्शव्भूमीवर एक ओळही आली नाही मिपावर कोल्हापुर घटनेच्या संदर्भात..
नगरच्या घटनेत तर जळी स्थळी मिपावर डांगोरे हाकारे पिटले गेले आणि सत्य काही वेगळेच समोर आले.

कदाचित मिपावरीलही संवेदनशीलता आणि सामाजीक सजगता जात सापेक्ष असावी.

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 10:20 pm | तर्राट जोकर

चंद्रनील यांच्या प्रतिसादाशी सहमत. दे.ब्रा. आणि मराठा चा विवाह माझ्या नातलगात बघितलाय. सवर्ण, उच्चवर्णिय, संपन्न आर्थिक स्थिती, प्रतिष्ठित कुटूंब इ. कारणे सुखी, समाधानी संसाराला हातभार लावतात असे निरिक्षण आहे.

बाकी सैराटनिमित्त अशा विवाहांबद्दल चर्चा होणे आवश्यक असे माझे मत. प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...

मला अजूनही नीट कळालेले नाही. मला समजावून सांगा प्लीज

खर्ड्याची नितीन आगे ची घतना तुम्ही पाहीलेली नसल्याने झालेलीच नाही, त्यामुळे अशा घटना घडतच नाहीत, म्हणून सैराट नकारात्मक असं तुम्हाला म्हणायचंय. माझं हे आकलन चुकतंय का ?

गणेश उमाजी पाजवे's picture

9 May 2016 - 2:38 am | गणेश उमाजी पाजवे

मूवी काकांनी लिहिलेले सगळे विवाह तो एक धनगर आणि कोब्रा चा सोडला तर सगळे सवर्ण टू सवर्ण आहेत काका, दलित आणि ९६ कुळी मराठा किवा चांभार आणि कोब्रा असे विवाह मला दाखवा जे कोणत्याही विरोधाशिवाय झालेले आहे सैराट निमित्त आंतरजातीय विवाहांची चर्चा होतेय हे चांगलंच आहे पण सैराट मी पहिला नाही आणि बघणारही नाही हे मिपा वर लोकांना ओरडून ओरडून सांगण्यासाठी लोकांचा जो आटापिटा चाललाय न तो बघून खूप हसू येतंय. इकडे हे अस तर तिकडे वल्ली आणि स्पा वगैरे कॅप्टन अमेरिका ची झैरात करत सुटलेत. बरंय ब्वा !!!

सुबोध खरे's picture

9 May 2016 - 12:52 pm | सुबोध खरे

चांभार आणि कोब्रा असे विवाह
आमच्या रोजच्या पाहण्यातील आहे

ईश्वरसर्वसाक्षी's picture

9 May 2016 - 3:08 am | ईश्वरसर्वसाक्षी

काका ते नंतर आले
मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस आपण असे कसे बोलू शकता?

ईश्वरसर्वसाक्षी's picture

9 May 2016 - 3:18 am | ईश्वरसर्वसाक्षी

खफ वर कोणितरी बहुधा सुड ह्यानि विचारले होते कि ह्या पुर्वि मराठि सिनेमा वर अशी चर्चा बघितलि नाहि त्याला कारण हेच होते कि "मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस" हि व्यक्ति पार कन्हैया कुमार ते नागराज मंजुळे एकच धारणा घेउन वावरत असते. त्यामुळेच ह्या सिनेमा वरति इतक्या लोकांनि लेख काढुन सुद्धा जर तुम्हि ह्या टिनपाट चित्रपटा विरुध्द काहि बोललात कि बास..... तिन पैसल्ड्या चि वॅल्यु नाहि त्या झींगाट ला...पण हे डोक्यावर घेउन नाचणार म्हणुन तुम्हि नाचा.

खटपट्या's picture

9 May 2016 - 3:48 am | खटपट्या

प्रिय मुवि,
तुम्ही चित्रपट न पहाता एखाद्या चित्रपटा विषयी मत बनवताना पाहून आश्चर्य वाटले.
तुम्ही जी उदाहरणे दीली आहेत ती असतीलही खरी म्हणून चित्रपटात दाखवलेला प्रसंग घडूच नये कींव दाखवूच नये हा अट्टहास का?
वरील जातीची सर्व उदाहरणे पहाता हा चित्रपट जातीव्यवस्थेवर आहे असा आपला समज झालेला दिसतोय. परत एकदा विनंती, क्रुपया चित्रपट पहा. न बघता मत देउ नका.

आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने

चांगली गोष्ट आहे. दुसर्‍यांचे अनुभव वेगळे असू शकत नाहीत का? आता खेड्यात रहायला जाणारच आहात.. तेव्हा काय अनुभव येतात ते पहा.

"सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

जबरदस्ती नाही. आवड आपली आपली. (मला चिंचेच्या पाकातला वडा आवडतो) म्हणून तो दुसर्‍यांनाही आवडावा शी जबरदस्ती नाही. चित्रपटाचा शेवट कसा करावा ही संपूर्ण कथाकाराची मनावर आहे.
एका कलाक्रुतीला न पहाता जातीपातीवर जोखून तीचे अवमुल्यन करू नका.

मला वाटतं कधी कधी माणसाला तू किती हैवान होऊ शकशील आणि किती खालच्या पातळीवर जाऊ शकशील हा आरसा दाखवणाऱ्या गोष्टी विचार करायला प्रवृत्त करतात. बरेच ठिकाणी वाचल्याप्रमाणे भयंकर शेवट बघून एकाच्या जरी मनात आलं कि मी माझ्या मुली -बहिणी बरोबर असं कधीच होऊ देणार नाही तरी शेवट वाईट केल्याचं सार्थक झालं म्हणायच.

"पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे." -> माझं मत असं कि ब्राम्हण लोकांना सत्ता नाही त्यामुळे ती जायची भीती नाही + घरची शेतीवाडी अथवा इस्टेट भरपूर नसल्याने रोजचं आयुष्य जगण्यासाठी नोकरी / व्यवसाय इमानदारीत करण भाग आहे. हा निकष (सत्ता + संपत्ती नाही ) असणारे मराठा (कुठलीही जात टाका) लोकही "ओनर किलिंग " च्या पातळीवर जातील असं वाटत नाही. कारण अश्या गोष्टी करण आणि त्या पचवणं ह्या दोन्ही गोष्टींसाठी पैसा + सत्ता + वेळ मुबलक असणं आवश्यक आहे.

खटपट्या's picture

9 May 2016 - 7:48 am | खटपट्या

पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही

विदा दील्यास उत्तम...

कापूसकोन्ड्या's picture

9 May 2016 - 5:59 am | कापूसकोन्ड्या

सैराट पाहीला खुप आवडला.
ज्याच्या त्याच्या आवडीच प्रश्न आहे.मला आवडलेल्या काही
१.कथावस्तू खरी रिअल वाटते. उगाच ओढून ताणून काही संदेश द्यायचा खटाटोप नाही.
२.मित्रासाठी दोन मित्रानी घरचा विरोध पत्करून मदत करणे त्या वयात अगदी नैसर्गिक वाटते.
३.उत्तम भाषा आणि उत्तम ग्रामिण अ‍ॅक्सेन्ट
४.नैसर्गिक आणि संयत अभिनय कुठेही मेलोड्रामा नाही
५.उत्तम दिग्दर्शन
६.सुखद कॅमेरा (संध्याकाळी उडणारे पक्षांचे थवे पहा)
७.उत्तम संगीत आणि पार्श्व संगीत
आपल्याला तर आवडला बुवा.

सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल थोडासाही नकारात्मक सूर न लावणे अगदी खपतच नाही असे काही बरेचसे प्रतिसाद बघून वाटत आहे.

प्रचेतस's picture

9 May 2016 - 6:06 am | प्रचेतस

सूर लावणे असे वाचावे.

वल्ल्या सिविल वाॅर भन्नाट आहे रे, जबर्या रेटींग

आज जातोय रात्री पावणेअकराच्या शोला. :)

नाखु's picture

9 May 2016 - 8:23 am | नाखु

प्रतिसादाला दुजोरा..

आणि अता अवांतर : वल्ली कसा आहे " कॅअमेरिका" मी दादाला दाखवावा म्हणतोय (तो बोअर तर होणार नाही ना?)

पा ल्क नाखु

मुक्त विहारि's picture

9 May 2016 - 9:35 am | मुक्त विहारि

माझ्या मुलांना पण आवडला.

आणि मला पण हे असे एक्स-मॅन, सुपरमॅन, स्पायडर-मॅन टाइप सिनेमे जास्त आवडतात.

खटासि खट's picture

9 May 2016 - 7:12 am | खटासि खट

ते बहुतेक सचिनभक्तांकडून शिकले असतील. सचिन शतकांसाठी खेळतो असं म्हटलं की गेलाच कामातून तसं..
बाकी सैराटभक्त हा शब्द नवा आहे. आता सैराटद्वेष पण रुजू होईल लौकरच.

सैराटद्वेष नाही रुजणार. कारण भक्तच लगेच वैयक्तिक हल्ले करून तो प्रयत्न हाणून पाडतील. :)

खटासि खट's picture

9 May 2016 - 7:53 am | खटासि खट

नाही रुजला तर सचिनभक्तांचे चेले नाहीत ते. सचिनभक्तांनी सचिनद्वेष हा शब्द रुजवून सचिन बद्दल एकही शब्द विरोधात लिहीणा-यांना नामोहरम केलं होतं (नंतर अण्णाभक्त, केजरूभक्त, मोदी भक्त आले. पण आपले सचिनभक्त आद्य आहेत).

ह्यावरुन सचिनभक्त असलेल्या आपल्या किसनदेवांची आणि इतरही अनेक मिपाकरांची आठवण आली.

साहेब..'s picture

9 May 2016 - 8:05 am | साहेब..

हे मात्र अगदी खर आहे.

अनिरुद्ध प्रभू's picture

9 May 2016 - 3:17 pm | अनिरुद्ध प्रभू

+१

सायकलस्वार's picture

9 May 2016 - 7:09 am | सायकलस्वार

अहो प्रचुकाका लोक म्हणतायत पिक्चर बघा आणि मग पाहिजे तेवढी टीका करा.
आमच्या आजूबाजूला असलं काही होत नाही म्हणून आम्ही शहामृगासारखे डोके खुपसून वास्तव deny करणार याला काय अर्थ आहे?
हाच धागा एखाद्या नवख्या आयडीने काढला असता तर लोकांनी चिंधड्या उडवल्या असत्या आत्तापर्यंत, होक्की नाही?

प्रचेतस's picture

9 May 2016 - 7:17 am | प्रचेतस

तुमच्या माहितीसाठी-
काल चित्रपट पाहिला. अत्यंत रटाळ वाटला. रिलेट होताच आलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2016 - 7:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट रटाळ आहे, रिलेट होता आलं नाही या आपल्या मताचा आदर आहेच, पण चित्रपट आवडला नाही त्याची काही कारणे सांगता आली तर सांगा, चार मित्रामधे चित्रपटाबद्दल निगेटिव्ह बोलायला
मदत होईल. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

9 May 2016 - 9:08 am | प्रचेतस

पहिला अर्धा भाग तद्दन व्यावसायिक आहे तर नंतरच्या अर्ध्या भागात संसाराची कुत्तरओढ दाखवण्यात आलीय. चित्रपट प्रचंड लांबीमुळे कंटाळवाणा होतो आणि कधी संपतोय असे वाटते.
शेवट मात्र बरा दाखवलाय दिग्दर्शकाने.

सतिश गावडे's picture

9 May 2016 - 10:06 am | सतिश गावडे

पहिला अर्धा भाग तद्दन व्यावसायिक आहे

होय. हळव्या मनाच्या लोकांना आपले अकरावी बारावीचे किंवा एफवाय एसवायचे दिवस आठवतील.

हा चित्रपट कथा म्हणून पाहायला गेलात तर त्यात नेहमीप्रमाणे गोड गोड नसलेला जरा वेगळा शेवट सोडला तर पाहण्यासारखे काही नाही.

चित्रपटातील मुख्य कथानक बाजूला ठेवून या चित्रपटात पाहण्यासारखे खुप काही आहे. दिग्दर्शकाने अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामिण जीवन उभं केलं आहे. हे ग्रामिण जीवनाचे अस्सल चित्र आहे. चित्रपटातील नवखे कलाकार अगदी आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं वाटतात. चेहर्‍यावर रंग फासलेले कलाकार वाटतच नाहीत. ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

दिग्दर्शनात तेलुगू चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. तेलुगू चित्रपट पाहणार्‍यांच्या ते लगेच लक्षात येईल. बर्‍याचशा फ्रेम्स तेलुगू चित्रपटांतून ढापल्या आहेत असे जाणवते. थोडासा प्रेमिस्थे आणि थोडासा जयम संदर्भ बदलून वापरले आहेत की काय असे चित्रपट पाहताना जाणवत राहते.

"मला खरंच वाटंना. मी इथं आलोय आन तू माज्यासंगं बोलती ते" हे परशाचे बोल आणि त्यानंतर आर्चीने "त्यात खरं नं वाटाय काय झालं, मी खरंच आली" असं म्हणून परशाला चिमटा काढणं हे पाहून तेलुगू बोमरीलूमधील सिद्धार्थ आणि जेनेलियाचा संवाद आठवला. आपली प्रेयसी आपल्या खोलीत आली आहे यावर विश्वास न बसल्याने नायक नायिकेला म्हणतो, "नाकू नच्चलो, ओक्क अम्मायी ना रुमलो उन्दा. नम्म लेकपोतन्नानू". यावर नायिका त्याला चिमटा काढून म्हणते, "नम्म सिद्धू" म्हणते.

नायकाच्या चेहर्‍यावरील अविश्वासाचे भाव, नायक नायिकांचे संवाद, नायिकेचे नायकाला चिमटा काढणे सारे अगदी तसेच्या तसे. फक्त इथे नायिकेचे उसाचे रान तर तिथे नायकाच्या प्रशस्त बंगल्यातील नायकाची खोली. प्रेमाची भाषा वैश्विक असते हेच खरे. ;)

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 10:12 am | तर्राट जोकर

बरोबर, त्या तेलुगू चित्रपटातही तो सीन कुठल्या चीनी, जपानी, कोरियन, पोलिश, आयरिश, इ इ चित्रपटातून उचलला असेल ह्याची काही शाश्वती नाही. ह्या बाबतीत प्रेमाची भाषा वैश्विकच म्हणायला हवी. आपले बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली अशा भाषेची भाषांतरे करण्यात फार पटाईत आहेत असे 'बघून' आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2016 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेमाची भाषा वैश्विक असते आणि अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात, लोक म्हणतात वेगळं पाहिजे, आता प्रेमात काय वेगळ अजुन दाखवायचं असतं..!

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

9 May 2016 - 10:22 am | सतिश गावडे

बरोबर, त्या तेलुगू चित्रपटातही तो सीन कुठल्या चीनी, जपानी, कोरियन, पोलिश, आयरिश, इ इ चित्रपटातून उचलला असेल ह्याची काही शाश्वती नाही.

होय.

मी वरील प्रतिसादात उल्लेख केलेला "प्रेमिस्थे" हा तेलुगू चित्रपट "काधल" या या तमिळ चित्रपटाची तेलुगू डब आवृत्ती आहे. विकीनुसार काधल हा "मन्जरी" नावाच्या नेपाळी चित्रपटाचा रिमेक आहे.

काधल/प्रेमिस्थे चा महेश कोठारेंनी आपल्या लेकाला घेऊन "वेड लावी जीवा" नावाचा मराठी रिमेक बनवला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2016 - 7:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>प्रचुकाका लोक म्हणतायत पिक्चर बघा आणि मग पाहिजे तेवढी टीका करा.

नै तर काय..... कालच्या दै सकाळच्या फिरस्ती मधे उत्तम कांबळे यांनी अशा लोकांबद्दल एक चांगला शब्द वापरला आहे. तो शब्द आहे, ''निष्क्रिय सोशल ऑडिटर'' यांचे स्वत:चे प्रश्न खुपच वेगळे असतात आणि त्याची उत्तरं खुप साधी असतात. (मूवीला उद्देशून नाही, जनरली काही मानसाबद्दलचा हा विचार आहे)

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

9 May 2016 - 9:32 am | सतिश गावडे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2016 - 7:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं चित्रपटाबद्दल परीक्षण मूवीनी लिहिलं की काय, छ्या अपेक्षा भंग झाला.

>>>>>>आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

धन्यवाद. ज्याच्या मनाची पाटी कोरी नाही, त्यांनी चित्रपट खरंच पाहू नये. मिपा सैराट मित्र मंडळ आपले आभारी आहे. _/\_

-दिलीप बिरुटे

मंदार कात्रे's picture

9 May 2016 - 7:19 am | मंदार कात्रे

कोल्हापुरातील ब्राह्मण मुलगा आणि मराठा मुलगी ( Megha Patil / Indrajit Kulkarni)यांचे गेल्या वर्षीच झालेले honour killing एवढ्यात विसरलात का?

http://www.thehindu.com/news/national/other-states/couple-hacked-to-deat...

खटासि खट's picture

9 May 2016 - 7:52 am | खटासि खट

नाही रुजला तर सचिनभक्तांचे चेले नाहीत ते. सचिनभक्तांनी सचिनद्वेष हा शब्द रुजवून सचिन बद्दल एकही शब्द विरोधात लिहीणा-यांना नामोहरम केलं होतं (नंतर अण्णाभक्त, केजरूभक्त, मोदी भक्त आले. पण आपले सचिनभक्त आद्य आहेत).

दिग्विजय भोसले's picture

9 May 2016 - 8:27 am | दिग्विजय भोसले

नकारात्मक गोष्टी घडतायेत त्या नाकारून चालणार नाही.
ऑनर किलिंग मराठ्यांमध्ये जास्त आहे,ते एकंदरीत लोकसंख्येप्रमाणे असेलच.
एक निराळच वैशिष्ट्य म्हणजे उच्च मराठा(सरकार) आणि कनिष्ठ मराठा यांचही सुत जमत नाही.

जेपी's picture

9 May 2016 - 8:39 am | जेपी

शंभर पक्के..
सत्कारात काय देऊ..!?=))

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 9:23 am | तर्राट जोकर

सैराटची दोन टिकिटे.

त्यांना आवडणार नाही त्यांनी आधीच सांगितलंय. त्यापेक्षा मला दया. मूवीकाकांना आपण सत्कारात एक डायरी देऊया. ( ह घ्या काका :) फटके पडायच्या आधी पळते ;) )

चौकटराजा's picture

9 May 2016 - 9:04 am | चौकटराजा

मी काही वर्षापूर्वी हिमाचलला सहलीला गेलो होतो. सिमला मनाली मंडी कांग्रा डलहौसी अशा प्रवासासाठी के इन्डिकावाला गाठला. सिमला सोडताच आमच्या गप्पा सुरू झाल्या . काही गाणी मी म्हटली काही त्याने. त्यात मधेच एका ठिकाणी त्याने गाडी एका वळणावर थांबविली. त्याअगोदर त्याने आपल्या प्रेमाची काहाणी आम्हाला कथन केली होती. ती जागा आल्यावर रस्त्याच्या कडेला एका खड्डेवजा जागेकडे बोट दाखवून मला म्हणाला " अंकल, इधर मेरे सालेने मुझे मौतके वास्ते पीट पीटकर फेंका था | " आमच्या सर्वांच्याच अंगावर काटा आला. पुढे याच्या व तिच्या प्रमाला साफल्य आले. ".. ऑगस्ट मे मेरी शादी है .. आपने आना है " असे त्याने आम्हाला सांगितले. त्यानंतर मी एन एच १० हा चित्रपट मुलीसह पाहिला तेंव्हा तिला व मला त्या ड्रायवर ची आठवण आली. " अरे अंकल ... उससे खुब्सूरत दुनियामे कोई नही... हे त्याचे वाक्य आजही मला आठवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2016 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव छान.

"अरे अंकल ... उससे खुब्सूरत दुनियामे कोई नही..." क्या बात है, यावरुन एक शेर आठवला, कोणाचा आहे माहिती नाही -

'बस दिलों को जीतना ही मकसद
रखना दोस्तों......!

वरना दुनिया जीतकर भी सिकंदर
खाली हाथ ही गया.....!

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

9 May 2016 - 9:05 am | श्री गावसेना प्रमुख

एक साधा प्रश्न ,आंतरजातीय विवाह केल्याने कुणाला कुणाची जात घ्यावी स्विकारावि लागते की दोन्ही स्वतंत्र जात लावू शकतात।

खटपट्या's picture

9 May 2016 - 9:42 am | खटपट्या

आंतरजातीय विवाह केल्याने कोणालाही कोणाची जात घेता येत नाही. कींवा जातीचा फायदाही घेता येत नाही. उदा. ब्राह्मण मुलीने जर मागासवर्गीयाशी लग्न केले तरीही तीची जात ही ब्राह्म्णच रहाते. जे अपत्य होते त्यास वडीलांची जात मिळते..

चांदणे संदीप's picture

9 May 2016 - 10:14 am | चांदणे संदीप

माफ करा....पण मिपावर आधीच सैराटने वातावरण ढवळून निघालेले असताना तुमच्या या लेखाचे प्रयोजन समजले नाही. तुम्ही स्वत:ला कट्टर मिपाकर म्हणवता आणी या इथे आपल्या लाडक्या मिपावरच गोंधळ वाढवायला हातभार लावता हा दुर्दैवी विरोधाभास आहे! लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमस्व!

आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.

ह्या अशा वाक्यांची तर तुमच्यासारख्या जाणत्या माणसाकडून अपेक्षा'च' नव्हती. अनेक सुख-दुखांचे पावसाळे झिरपवलेल्या जीर्ण खोडाला विचारलं तर त्याच्याकडून कुठल्याच प्रकारच्या पक्षपातीपणाचा विचार/अनुभव ऐकायला मिळणार नाही. वर पुन्हा दर श्रावणाला त्याच्याच तळाला नवी पालवी फ़ुटल्याचेहि दिसेल.

माझा हा प्रतिसाद सैराटच्या बाजूने लिहिलेला नाहीये तर सैराटवरून चाललेल्या गदारोळात आपली एक वीट भिरकावण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात लिहिलेला आहे. बरेचदा वाटत सोडून द्याव, दुर्लक्ष करून पुढे चालावं. खर पाहता अगदी परवाच पैजारबुवांशी अशा वेळी काय करावे याविषयी चर्चा होऊन त्यांना मी वचन दिलेले की इथून पुढे मी दुर्लक्ष करीत जाईन अशा धाग्यांना. अरे पण दुर्लक्ष कुणाला करावे... बिनडोक आयडिंना... सतत एकाच विषयाभोवती गिधाडघिरट्या घालणार्यांना...का तुमच्या सारख्या समंजस, नेहमी मदतीस तत्पर आणि खेळीमेळीच वातावरण तयार करू पाहणार्या व्यक्तींना??

मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो!

जय महाराष्ट्र!

Sandy

वैभव जाधव's picture

9 May 2016 - 10:24 am | वैभव जाधव

क्या अण्णा, आपके टीव्ही पे सिरीयल लगते जो आपको पसंद नै तो टी व्ही फोडते? आप घर से निकल जाते? या आप चॅनेल बदल लेते?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 10:30 am | खालीमुंडी पाताळधुंडी

आयडी बदल लेते=((
Chill yaaro

वैभव जाधव's picture

9 May 2016 - 10:35 am | वैभव जाधव

अच्चं जालं तल... ;)

कदाचित मी नवीन असताना ह्या सर्व गोष्टींवर माझे लक्ष जात नसेल. पण जसजसा अधिकाधिक मिपाशी परिचित होत चाललोय आता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझ्या कविता, चित्रे नाही टाकू वाटत.

तसेही कुणाच्या असण्या वा नसण्याने या जगात कुणाला काय फरक पडतो.

कारवां चलता है, चलता जायेगा
वक्त की रेत पे किसके निशां रहे है!

Sandy

नाखु's picture

9 May 2016 - 10:40 am | नाखु

एका वाक्यासाठी तरी भेट रे

अरे पण दुर्लक्ष कुणाला करावे... बिनडोक आयडिंना... सतत एकाच विषयाभोवती गिधाडघिरट्या घालणार्यांना...

मस्तानी लागू

साक्षीस वल्ली असावेत
(आजकाल मिपावर वल्ली(ना) साक्षीस असतेत)

जव्हेरगंज's picture

9 May 2016 - 7:57 pm | जव्हेरगंज

आता पहिल्यासारखी ओढ नाही राहिली मिपाची!

+१

सुहागरात तर झाली, आता संसार कराय नको वाटतंय मलाही ;)

मुक्त विहारि's picture

9 May 2016 - 11:01 am | मुक्त विहारि

प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते आणि त्या व्यक्तीची एखादी कलाकृती बघीतल्यावर,ऐकल्यावर्,वाचल्यावर किंवा स्पर्श केल्यावरची प्रतिक्रिया भिन्न असते.

"मोनालिसा" तीच असली तरी, कुणाला ती कलाकृती फार उत्तम वाटते तर कुणाला ती अजिबात आवडत नाही.

पुर्वी मी चित्रपटाचे परिक्षण न वाचता पण सिनेमे बघत होतो. तिसरी आंख,महान,लोहा,मर्द असे अनेक सिनेमे बघीतल्यानंतर एक जाणवले, की आपले घामाचे पैसे अशा ठिकाणी वाया जायला नकोत.म्हणून मी शक्यतो भारतीय सिनेमे टॉकीज मध्ये बघायला जात नाही.५-६ वर्षातून एकदा बायकोच्या हट्टाखातर मात्र जावे लागते.

माझ्या दोन्ही मुलांनी "सैराट" बघीतला.एकाला आवडला तर एकाला अजिबात आवडला नाही.दोघेही कॉलेज-कुमार आहेत.

थोडक्यात एकाच घरात आणि एकाच संस्कृतीत वाढलेल्या आणि साधारणपणे एकाच वयाच्या २ मुलांच्या कलेच्या आस्वाद घेण्याच्या दृष्टीत पण फरक असतोच.मग तो "मिपा"वर पण असणारच.

मला नकारात्मक सिनेमे आवडत नाहीत ही माझी भूमिका.मग तो प्यासा असू दे किंवा कागज़ के फूल किंवा नशांत अथवा अंकूर.

माझ्या आसपासच्या घरांत परजातीत लग्ने झाली तरी पण प्रेमी युगलांची कुणी हत्या केली नाही...ह्याचा अर्थ ते इतरत्र होत नसेलच, असे माझे म्हणणे नाही....

मी नकारात्मक कलाकृतींशी रीलेट होवू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे.

एक विनंती....

"मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो!"

हे मात्र अजिबात करू नका.

तुषार काळभोर's picture

9 May 2016 - 12:46 pm | तुषार काळभोर

मिपावरच्या सततच्या निरर्थक काथ्याकूटान्ना आणि जिथे-तिथे नसत्या मुद्द्यांना जात्यात घालून दळणाला लावणार्या प्रवृत्तींना वैतागून मिपावर माझे थोडेच दिवस राहिलेत हे मी इथे जाहीर करतो!

>>>
याला माझ्याकडून समर्थन. (म्हणजे तुम्ही सोडून जाण्याला समर्थन नाही. मी सुद्धा हाच विचार करतोय.)

माझ्या जाण्याने कुणाला **** फरक पडत नाही, हे माहिती असून वैतागून निघून जाण्याच्या विचारात असलेला, पैलवान

नाव आडनाव's picture

9 May 2016 - 1:46 pm | नाव आडनाव

+१

खरंच वैतागलो ह्या जातीच्या चर्चांना. काहिंना सरळसरळ जातीवादी लिहायचंय, तर काहिंच्या प्रतिसादातला अंडरकरंट कायम समजणाराच असतो. आणि ह्या चर्चांतून नक्की काय मिळतं हा ही कायम प्रश्न पडतो. बरेच प्रतिसाद "'आम्ही' किती चांगले,चान चान. 'ते'च वाईट आहेत." ह्याच टाईपचे. ह्यातले 'ते' कधी दुसर्‍या धर्माचे, दुसर्‍या जातीचे, खेड्यातले, आपण करतो ते काम सोडून दुसरं काही काम करणारे...

दोन तीनदा वाटलंय - बंद करावं इथे यायचं. आणि मी बंद करून कोणाचा काहीही नुकसान होणार नाही हे चांगलं माहितीय. खरंतर ते होऊच नये. फक्त मला वाटणार्‍या प्रॉब्लेम वर काय उत्तर आहे, हे शोधायचा प्रयत्न केला तर "इथे येणं बंद करायचं" हा एक उपाय सापडतो. पण ते सदस्य आणि त्यांचं लेखन / कविता / प्रतिसाद आठवतात ज्यांच्यामुळे मी बरंच काही शिकलोय. माहित नाही काय करायचं. पण बर्‍याचदा मला मी "बाहेरचा" वाटत राहतो.

जातीच्या चर्चांपासून कायम लांब ठेवून बघितलं - म्हणजे अश्या धाग्यांवर प्रतिसाद न देऊन. ज्याने मिसळपावची बदनामी होइल अश्या निगेटिव प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण ह्या चर्चा थांबत नाहीत. कितीतरी वेळा तर काहीच संबंध नसतांनाही जात आपोआप येते :(

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

याला ट्यार्पी ऐसे नाव ;)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 10:27 am | खालीमुंडी पाताळधुंडी

अच्छा,
अच्च जालं तल!!!

मुविकाका सैराट संपला, आम्ही लागलो पण कामाला. तुमचा नकारात्मक शेवटावरचा नकारात्मक धागा काय पटला नाहि बघा.
(मुविकाका यायच्याआत मी पळालेलो हाय)

हाताची ५ बोटे सारखी नसतात, मग तुमचे आमचे प्रत्येक गोष्टीत पटले पाहिजे असे थोडीच आहे.

हाताची पाच बोट एकत्र आली तर...
जाऊद्या मराठी पासुन काय एक होत नै...

जय हिंद..जय महाराष्ट्र...जय मिल्की वे...

सतिश गावडे's picture

9 May 2016 - 11:22 am | सतिश गावडे

जय भारत, जय पृथ्वी आणि जय सौरमाला राहीले.

अर्धवटराव's picture

9 May 2016 - 11:54 am | अर्धवटराव

ते ब्लॅकहोल का काय त्याची पण जै करुन टाका ना भौ :ड

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 May 2016 - 11:59 am | खालीमुंडी पाताळधुंडी

जय आकाशगंगा,जय ब्रह्मांड,जय ब्रह्मांडनायक!!
गजानन महाराज कि जय!!
शेवटी पृथ्वीवर यावच लागतं!

प्रसाद१९७१'s picture

9 May 2016 - 2:17 pm | प्रसाद१९७१

लग्न एकाच जातीत असेल किंवा आंतरजातीय, मुवि काकांचा विदा खोटा आहे असे म्हणावेसे वाटते कारण

५ लग्ने झाली आणि पाच ही जोडपी संसारात सुखी आहेत. हे अशक्यकोटीतले आहे. कैच्या कै लिहीले आहे.

मुक्त विहारि's picture

9 May 2016 - 5:27 pm | मुक्त विहारि

तुम्ही जर महाड-मुंबई-नागपूर-पुणे-सोलापूर भागात असाल तर त्या जोडप्यांची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो.

अर्थात, माझा जायचा-यायचा आणि त्या कट्ट्याचा आणि त्या कट्ट्याला येणार्‍या इतर सर्व मिपाकरांचा पक्षी-तीर्थाचा संपूर्ण खर्च तुमचा.

धनंजय माने's picture

9 May 2016 - 5:31 pm | धनंजय माने

लग्न होऊन पण सुखी?

कैच्या कै... असं म्हणायचंय त्यांना!

आता आमचंच घ्या. लग्नापूर्वी लिपस्टिक, नेलपेंट विकायचो ते चालायचं बायकोला. आता????
कसलं आलंय सुख!

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:32 pm | तर्राट जोकर

मला वाटतं त्यांनी गंमतीने म्हटले असावे. 'सुखी संसार' एक काल्पनिक सत्य ह्या अर्थाने. =))

मग ठीक आहे.

प्रसाद१९७१'s picture

9 May 2016 - 7:10 pm | प्रसाद१९७१

सॉरी मुवि. तुमचा गैरसमज झाला. खाली काही लोकांनी बरोबर ओळखले आहे.

५ जोडप्यांमधले २ जास्तीत जास्त ३ ( फार झाले ) सुखी संसार वगैरे करत असतील. ५ पैकी सगळी ५ जोडपी सुखी म्हणजे कै च्या कै असे म्हणायचे होते.

सैराट पाह्यला, लोकांनी एवढा का डोक्यावर घेतलाय ते कळलं नाही. बर्‍याच जणांचा पहिला-वहिला सिनेमा असून केलेला सहज अभिनय आणि शोकांतिका, एवढं वगळता त्या सिनेमात काहीच वेगळं वाटलं नाही.

जात-पात सोडा!! निव्वळ प्रेम आहे म्हणून ज्याचं अजून काहीच स्थिरस्थावर नाही; अशा व्यक्तीसोबत माझ्या घरातली एखादी मुलगी; घरातलीच (स्वत:च्या कमाईची नसलेली) नोटांची गड्डी घेऊन पळून गेली तर मला तरी आवडणार नाही.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 2:57 pm | तर्राट जोकर

पिराताईंचा प्रतिसाद नै वाचला? निव्वळ प्रेम आहे म्हणून अजून काहीच स्थिरस्थावर नसलेल्या व्यक्तीसोबत मुलीला "पळून जायची" वेळ का यावी? मुलीला आपल्या प्रेमाची कबूली घरी देऊन समर्थन वा मार्गदर्शन मिळणारच नाही असे वातावरण असेल तर कुणाचं चुकतं?

तुमच्या घरात असं घडलं तर तुम्ही काय कराल? मुलगा तुमच्या ओळखीतला आहे, त्याचं काय्येक कमाईचं साधन नाहीये हे तुम्हाला माहीत आहे. अशा वेळी घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडली. तुम्ही काय कराल?

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 3:13 pm | तर्राट जोकर

=)) =)) ऐसा हुआ हैं साईं.. म्हणून म्हटलं सॅम्पल्गृप म्होटा हाय. प्रकरणं ह्याण्डल करता आली पायजेल. दुर्दैवाने आपल्या समाजात टोलरन्स फार कमी. थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली तर 'आपल्याला' हवं तेच मिळवता येतं. 'जवळच्यांचा विश्वास आणि आधार' भुछत्री प्रेमापेक्षा केव्हाही मोठा असतो हे विसरलं नाही तर बरं असतं. आपण आपल्या लोकांवर प्रेम करतो, हक्क बजावत नाही इतकं संबंधितांना कळलं तर आपण म्हटल्यावर विहिरीत जीव द्यायला पण तयार होतात. सरतेशेवटी 'प्रेम' जिंकतं दादा, इतर काहीही नाही.

पाल्हाळ नकोय, झालं असेल तर काय केलंत ते सांगा.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 3:24 pm | तर्राट जोकर

थोडा टोलरन्स दाखवून नीट हाताळली>> एवढ्यावरुन नै समजलं तर अशक्य आहे. किती का सांगोत, पाल्हाळच असेल.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 3:54 pm | तर्राट जोकर

चला, तुमच्यासाठी सांगुनच टाकतो. किस्सा घरातलाच आहे. मुलगी पंधरा वर्षांची. कुठल्याशा धार्मिक टूरवर आईवडीलांसोबत गेली, तिकडे गृपमधे एक कुटूंब होते सोबत. त्यांचा १८-१९ वर्षांचा मुलगा. भिक्षुकी शिकत होता. चार-पाच दिवसांच्या सहवासात जमलं दोघांचं. जात-पात-उपजात सगळं यथायोग्य. नकारास कोणतेही कारण नाही. घरचे श्रीमंत वैगरे. शिवाय दोन्ही घरं एकमेकांना चांगली ओळखणारी. मुलीचा हट्ट, आईवडीलांना कसे सामोरे जावे कळत नव्हते. लग्नाची जणू बोलणी झालीत असा माहोल. म्हणे मुलगी सज्ञान होईस्तोवर थांबणार. मुलाच्या घरचे लगोलग मुलीला सून संबोधायला लागले. मला वाटते ह्यापेक्षा उत्तम परिस्थिती कोणत्याच प्रेमप्रकरणात उद्भवत नसेल. तरी शेवटी आई-वडील माझ्या मताची वाट पाहत होते. मी मुलाची माहिती काढली. मला त्याचे विचार आवडले नाहीत. एकूण त्याच्या घरातली विचारसरणी, त्याच्यावरचे संस्कार काय असतील ह्याचा अंदाज आला. मग मी माझ्या 'चाली' खेळलो. प्रकरणास अनुमोदन दिले आणि एकदा मुलाला मुलीच्या समक्ष भेटायचे ठरवले. दरम्यान एखाद महिना गेला असेल. स्वप्नांचे इमले आकाशापर्यंत पोचले होते.

आम्ही एका हॉटेलात भेटलो. मुलाला विचारले, "प्रेम करतोस का हिच्यावर?". म्हणाला, "खूप"

त्याला विचारले, "काय रे, समजा दोन-तीन वर्षांनी ही सज्ञान झाली व तिला हे स्थळ तितकेसे अनुरुप वाटले नाहीतर तुझे काय म्हणणे आहे?" त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. ह्या शक्यतेचा त्याने विचार केला नव्हता. मी म्हटलं, "अरे आज ही तुझ्यावर जीव लावते असे सांगते, अल्लड वय आहे. लग्न होईस्तोवर तुम्ही भेटणार नाहीत असे ठरले आहे. समजा उद्या सज्ञान झाल्यावर तिला कॉलेजात वैगरे कोणी दुसरा मुलगा भेटला, तिला आवडला, त्याच्याबद्दल विचार करावासा वाटला तर तुझी काय भूमिका असेल?"

ह्या प्रश्नांवर त्याचे जे उत्तर होते ते पुरुषप्रधान संस्कारांतून येणारे टिपिकल विचार होते, स्त्रीला तिचे स्वतःचे मत नाकारुन पुरुष म्हणेल तसे त्याच चाकोरीत, आज्ञेत जगायचे, "त्याने आता तिच्यावर रुमाल टाकला आहे" अशा अर्थाचे काहीसे विचार होते. त्याचे ते सर्व महान विचार ऐकून मुलीला जे समजायचे ते समजले. तीने 'मी विचार करुन निर्णय कळवते' असे सांगितले. दोन चार दिवसातच मुलाकडे नकार कळवला गेला. ते प्रकरण थांबले. नंतर त्या मुलाने मुलीला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.

जवळच्या मुलींबद्दल अशा अनेक घटना हाताळल्या आहेत. मी विना-अनुभव अजिबात बोलत नाही.

हेच मला म्हणायचंय, वर जे काही डोळे झाकून जे काही म्हणेल ते स्वीकारायचं किंवा खालच्या जातीतला होता म्हणूनच नाही म्हटलं असं जे काही चाल्लंय ते मला पटलं नाही.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 4:18 pm | तर्राट जोकर

ओके. आय होप माय स्टॅन्ड इज क्लिअर अ‍ॅट्लिस्ट.

अप्पा जोगळेकर's picture

9 May 2016 - 4:51 pm | अप्पा जोगळेकर

माफ करा पण 'तुमच्या वडिलांना लश्करच्या भाकरी भाजायची, लग्ने जुळवायची सवय होती असे काहीसे तुम्हीच लिहिले होते ना ?'
आणि आता तुमचेही तेच ?

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:04 pm | तर्राट जोकर

घरातली मुलगी >> हे वाचले नाही का अप्पासाहेब? घरातली कामे लष्कराच्या भाकर्‍या नसतात. माझ्या थेट जवळच्या नात्यांमधे किमान तीस-पस्तीस मुली आहेत, वेगवेगळ्या वयाच्या.

अप्पा जोगळेकर's picture

9 May 2016 - 5:10 pm | अप्पा जोगळेकर

जौंदे साहेब. फार वैयक्तिक होते आहे. मला इतरांच्या खाजगी आयुष्यात रस नाही.
तुम्ही जाहीरपणे लिहिलेली दोन मते विरोधाभासी वाटली इतकेच.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 5:20 pm | तर्राट जोकर

वैयक्तिक काही नाही त्यात. जगरहाटी आहे. वडीलांची पद्धत वेगळी होती. वडीलांचा आमच्या जातीतला जनसंपर्क अफाट होता आणि आहे. माझा अजिबात नाही. मला तर आमच्याच घाराण्याचे सेम आडनाव असणार्‍या सर्व वंशजांचे कुठं काय चाललंय माहित नाही. मी आपला थेट काका, मामा, मावश्यांपुरता व त्यांच्या पिलावळींपुरता मर्यादित. =))

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 3:58 pm | तर्राट जोकर

थोडी अ‍ॅडिशनल माहिती: आज ती मुलगी २४ वर्षांची आहे, एका चांगल्या घरातल्या चांगल्या नोकरीवाल्या मुलासोबत (दुसर्‍या जातीच्या) प्रकरण सुरु आहे. दोन्ही घरी सांगून रितसर लग्न करण्यासाठी दोन्ही घरच्यांची मनधरणी चालू आहे. तिचा पळून वैगरे जाण्याचा कोणताच विचार नाही. कारण घरातून भक्कम पाठिंबा आणि आधार मिळेल ह्यावर तिचा आजही विश्वास आहे.

अप्पा जोगळेकर's picture

9 May 2016 - 3:21 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,
पालक चोरीविरुद्ध पोलिस कंप्लेंट करणे, घरातून हाकलून देणे (सज्ञान मुलांना पालक कायद्याने घराबाहेर काढू शकतात), इस्टेटीतून बेदखल करणे इत्यादी पर्याय अवलंबु शकतात. तो त्यांचा अधिकार सुद्धा आहेच.
बहुतकरुन सर्वांचा आक्षेप अमानुष पणा, क्रूर मारहाण, आयुष्यातून उठवू शकतील अशा खोट्या पोलिस तक्रारी, मसल पोवारचा वापर करून कुटुंबियांना त्रास देणे आणि जबरदस्तीचा विरोध याला आहे (किंवा असावा) .
बाकी कोलेजात असताना पेमाबिमात पडल्यावर घरी आरत्या ओवाळल्या जातील अशी पोरांची देखील अपेक्षा असते काय ? बहुधा नसावी.

(स्वत:च्या कमाईची असलेली/नसलेली)*