Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sun, 05/08/2016 - 21:55
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४. मुलगी देब्रा आणि मुलगा ९६ कुळी मराठा. मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ५. मुलगी कोब्रा आणि मुलगा धनगर.दोघांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून द्यायचे ठरवले आहे. ६. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. वरील सर्व उदाहरणे महाराष्ट्रातील आणि त्यातील एक तर सोलापूर जिल्ह्यातलेच आहे. ================================== आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
  • 22888 views

प्रतिक्रिया

Submitted by जव्हेरगंज on Sun, 05/08/2016 - 22:08

Permalink

मी सिनेमा बघीतला नाही आणि

मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.
अभिनंदन!!! पूर्वग्रहदुषितेचा चष्मा लावलेल्यांसाठी हा सिनेमा नाहीच्चे!
आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
बरं, तुमच्या आटपाट नगरात सगळं आलबेल असेल तर प्रश्नच मिटला. नकाच बघू तुम्ही ती भिकार कलाकृती! केवळ 'मी पिच्चर पाहणार नाही' हे सांगण्यासाठी धागा काढलाय काय? मग असो! शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 05/08/2016 - 22:16

In reply to मी सिनेमा बघीतला नाही आणि by जव्हेरगंज

Permalink

काहितरी चुकतेय

काहितरी चुकतेय
अभिनंदन!!! पूर्वग्रहदुषितेचा चष्मा लावलेल्यांसाठी हा सिनेमा नाहीच्चे!
लेखात कसलाही पुर्वग्रहदूषितपणा दिसला नाहीये...पिच्चर नसेल बघायचा तर ठिकाय कि...बघितलाच पाहिजे असेही नाहीये
बरं, तुमच्या आटपाट नगरात सगळं आलबेल असेल तर प्रश्नच मिटला. नकाच बघू तुम्ही ती भिकार कलाकृती!
पिच्चरला भिकार कुठेही म्हटलेले नाहिये
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Sun, 05/08/2016 - 22:23

In reply to काहितरी चुकतेय by टवाळ कार्टा

Permalink

मिपा वर सैराट चे ब्रँड

मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस आपण असे कसे बोलू शकता?
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 05/08/2016 - 22:37

In reply to काहितरी चुकतेय by टवाळ कार्टा

Permalink

"सैराट" सारखी नकारात्मक कला

"सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
हे त्यांना कुठून कळालं? बघायच्या आधीच? म्हणून ते पूर्वग्रहदुषित! सिनेमा बघणे/न बघणे ज्याची त्याची आवड! पण 'मी बघणार नाही' हे स्पेशली सांगणे म्हणजे जरा अतीच! असो!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 05/08/2016 - 23:03

In reply to "सैराट" सारखी नकारात्मक कला by जव्हेरगंज

Permalink

अहो....

परीक्षणांत कुणी लिहिले नसले तरी ऐकण्यात तर नक्कीच आले आहे. शिवाय अंकूर किंवा निशांत पेक्षा....जॉनी मेरा नाम आणि शोले हेच जास्त आवडतात. असो, आम्हाला जरा अ‍ॅक्शन (३६ चेंबर ऑफ शाओलिन, शाओलिन सॉकर) किंवा कॉमेडी (व्हाय वरी, सेफ्टी लास्ट) किंवा सायन्स फिक्शन (अवतार, स्टार वॉर्स) मुवीज जास्त आवडतात. ज्याची त्याची आवड. कधी तरी हिंदी सिनेमे बघत होतो, त्या काळात पण "एक दूजे के लिये" पेक्षा, बॉबी,बेताब, हीरो आणि एक जान है हम (हा पण एक सिनेमा होता) जास्त आवडले आणि परत-परत बघीतल्या पण गेले. "आणि ते मेले" ह्या नकारात्मक शेवटापेक्षा "आणि त्यांनी लग्न केले" असा सुखावह शेवट मला तरी जास्त आवडतो. मला "एक दुजे के लिये" आवडला नाही म्हणून ती कलाकृती बेक्कार, असे मी म्हणत न्हवतो आणि मला "५ रायफल्स" आवडला म्हणून, तीच कलाकृती सर्वश्रेष्ठ असे आजही म्हणत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रनील मुल्हेरकर on Sun, 05/08/2016 - 22:14

Permalink

प्रत्येक उदाहरणात

प्रत्येक उदाहरणात सवर्णांतर्गत विवाह आहेत ,त्यामुळे फारसा विरोध झालेला नाही.आमच्या गावात एका मराठा मुलीशी मित्रत्वाच्या नात्याने बोलणार्या एका दलित मुलाचा खून करण्यात आला ,दोघांचीही फक्त मैत्री होती बाकी काही नाही. आज ब्राह्मण मुली मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह करत आहेत ,पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे. महाराष्ट्रात ऑनर किलिंग मध्ये मराठा जात आघाडीवर आहे ,नीतीन आगे सारख्या घटनांमधून हेच दिसते.मराठ्याच्या मुलिने ब्राह्मणाशी सूत जुळवले तर त्यांना विलक्षण आनंद होतो,पण जर मुलगा तथाकथीत मागासवर्गीय जातीतला असला तर मग त्याचा खून पडायला वेळ लागत नाही. प्रस्तुत लेखकाला अजूनही जातीची उतरंड.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/09/2016 - 09:35

In reply to प्रत्येक उदाहरणात by चंद्रनील मुल्हेरकर

Permalink

हे ही लक्ष्यात घ्या

पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे.
जीतकी चर्चा आणि प्रतिसाद पूर धागे खैरलांजीआणि जवखेडा नगर बद्दल आले त्याच्या पार्शव्भूमीवर एक ओळही आली नाही मिपावर कोल्हापुर घटनेच्या संदर्भात.. नगरच्या घटनेत तर जळी स्थळी मिपावर डांगोरे हाकारे पिटले गेले आणि सत्य काही वेगळेच समोर आले. कदाचित मिपावरीलही संवेदनशीलता आणि सामाजीक सजगता जात सापेक्ष असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sun, 05/08/2016 - 22:20

Permalink

चंद्रनील यांच्या प्रतिसादाशी

चंद्रनील यांच्या प्रतिसादाशी सहमत. दे.ब्रा. आणि मराठा चा विवाह माझ्या नातलगात बघितलाय. सवर्ण, उच्चवर्णिय, संपन्न आर्थिक स्थिती, प्रतिष्ठित कुटूंब इ. कारणे सुखी, समाधानी संसाराला हातभार लावतात असे निरिक्षण आहे. बाकी सैराटनिमित्त अशा विवाहांबद्दल चर्चा होणे आवश्यक असे माझे मत. प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Sun, 05/08/2016 - 23:33

Permalink

मला अजूनही नीट कळालेले नाही.

मला अजूनही नीट कळालेले नाही. मला समजावून सांगा प्लीज खर्ड्याची नितीन आगे ची घतना तुम्ही पाहीलेली नसल्याने झालेलीच नाही, त्यामुळे अशा घटना घडतच नाहीत, म्हणून सैराट नकारात्मक असं तुम्हाला म्हणायचंय. माझं हे आकलन चुकतंय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by गणेश उमाजी पाजवे on Mon, 05/09/2016 - 02:38

Permalink

काका काहीतरी चुकतंय

मूवी काकांनी लिहिलेले सगळे विवाह तो एक धनगर आणि कोब्रा चा सोडला तर सगळे सवर्ण टू सवर्ण आहेत काका, दलित आणि ९६ कुळी मराठा किवा चांभार आणि कोब्रा असे विवाह मला दाखवा जे कोणत्याही विरोधाशिवाय झालेले आहे सैराट निमित्त आंतरजातीय विवाहांची चर्चा होतेय हे चांगलंच आहे पण सैराट मी पहिला नाही आणि बघणारही नाही हे मिपा वर लोकांना ओरडून ओरडून सांगण्यासाठी लोकांचा जो आटापिटा चाललाय न तो बघून खूप हसू येतंय. इकडे हे अस तर तिकडे वल्ली आणि स्पा वगैरे कॅप्टन अमेरिका ची झैरात करत सुटलेत. बरंय ब्वा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 05/09/2016 - 12:52

In reply to काका काहीतरी चुकतंय by गणेश उमाजी पाजवे

Permalink

चांभार आणि कोब्रा असे विवाह

चांभार आणि कोब्रा असे विवाह आमच्या रोजच्या पाहण्यातील आहे
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरसर्वसाक्षी on Mon, 05/09/2016 - 03:08

Permalink

काका ते नंतर आले

काका ते नंतर आले मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस आपण असे कसे बोलू शकता?
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरसर्वसाक्षी on Mon, 05/09/2016 - 03:18

Permalink

खफ वर कोणितरी बहुधा सुड

खफ वर कोणितरी बहुधा सुड ह्यानि विचारले होते कि ह्या पुर्वि मराठि सिनेमा वर अशी चर्चा बघितलि नाहि त्याला कारण हेच होते कि "मिपा वर सैराट चे ब्रँड ऍम्बॅसाडर असलेल्या व्यक्तीस" हि व्यक्ति पार कन्हैया कुमार ते नागराज मंजुळे एकच धारणा घेउन वावरत असते. त्यामुळेच ह्या सिनेमा वरति इतक्या लोकांनि लेख काढुन सुद्धा जर तुम्हि ह्या टिनपाट चित्रपटा विरुध्द काहि बोललात कि बास..... तिन पैसल्ड्या चि वॅल्यु नाहि त्या झींगाट ला...पण हे डोक्यावर घेउन नाचणार म्हणुन तुम्हि नाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/09/2016 - 03:48

Permalink

प्रिय मुवि,

प्रिय मुवि, तुम्ही चित्रपट न पहाता एखाद्या चित्रपटा विषयी मत बनवताना पाहून आश्चर्य वाटले. तुम्ही जी उदाहरणे दीली आहेत ती असतीलही खरी म्हणून चित्रपटात दाखवलेला प्रसंग घडूच नये कींव दाखवूच नये हा अट्टहास का? वरील जातीची सर्व उदाहरणे पहाता हा चित्रपट जातीव्यवस्थेवर आहे असा आपला समज झालेला दिसतोय. परत एकदा विनंती, क्रुपया चित्रपट पहा. न बघता मत देउ नका.
आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने
चांगली गोष्ट आहे. दुसर्‍यांचे अनुभव वेगळे असू शकत नाहीत का? आता खेड्यात रहायला जाणारच आहात.. तेव्हा काय अनुभव येतात ते पहा.
"सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही.
जबरदस्ती नाही. आवड आपली आपली. (मला चिंचेच्या पाकातला वडा आवडतो) म्हणून तो दुसर्‍यांनाही आवडावा शी जबरदस्ती नाही. चित्रपटाचा शेवट कसा करावा ही संपूर्ण कथाकाराची मनावर आहे. एका कलाक्रुतीला न पहाता जातीपातीवर जोखून तीचे अवमुल्यन करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Mon, 05/09/2016 - 04:00

Permalink

मला वाटतं कधी कधी माणसाला तू

मला वाटतं कधी कधी माणसाला तू किती हैवान होऊ शकशील आणि किती खालच्या पातळीवर जाऊ शकशील हा आरसा दाखवणाऱ्या गोष्टी विचार करायला प्रवृत्त करतात. बरेच ठिकाणी वाचल्याप्रमाणे भयंकर शेवट बघून एकाच्या जरी मनात आलं कि मी माझ्या मुली -बहिणी बरोबर असं कधीच होऊ देणार नाही तरी शेवट वाईट केल्याचं सार्थक झालं म्हणायच. "पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही हे ब्राह्मण जात सिविलाईज्ड असल्याचेच द्योतक आहे व निश्चित स्वाग्तार्ह आहे." -> माझं मत असं कि ब्राम्हण लोकांना सत्ता नाही त्यामुळे ती जायची भीती नाही + घरची शेतीवाडी अथवा इस्टेट भरपूर नसल्याने रोजचं आयुष्य जगण्यासाठी नोकरी / व्यवसाय इमानदारीत करण भाग आहे. हा निकष (सत्ता + संपत्ती नाही ) असणारे मराठा (कुठलीही जात टाका) लोकही "ओनर किलिंग " च्या पातळीवर जातील असं वाटत नाही. कारण अश्या गोष्टी करण आणि त्या पचवणं ह्या दोन्ही गोष्टींसाठी पैसा + सत्ता + वेळ मुबलक असणं आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/09/2016 - 07:48

In reply to मला वाटतं कधी कधी माणसाला तू by वीणा३

Permalink

पण कुठेही ऑनर किलिंग

पण कुठेही ऑनर किलिंग ब्राह्मणांनी केलेले नाही
विदा दील्यास उत्तम...
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on Mon, 05/09/2016 - 05:59

Permalink

आपल्याला तर आवडला बुवा.

सैराट पाहीला खुप आवडला. ज्याच्या त्याच्या आवडीच प्रश्न आहे.मला आवडलेल्या काही १.कथावस्तू खरी रिअल वाटते. उगाच ओढून ताणून काही संदेश द्यायचा खटाटोप नाही. २.मित्रासाठी दोन मित्रानी घरचा विरोध पत्करून मदत करणे त्या वयात अगदी नैसर्गिक वाटते. ३.उत्तम भाषा आणि उत्तम ग्रामिण अ‍ॅक्सेन्ट ४.नैसर्गिक आणि संयत अभिनय कुठेही मेलोड्रामा नाही ५.उत्तम दिग्दर्शन ६.सुखद कॅमेरा (संध्याकाळी उडणारे पक्षांचे थवे पहा) ७.उत्तम संगीत आणि पार्श्व संगीत आपल्याला तर आवडला बुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 06:05

Permalink

सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल

सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल थोडासाही नकारात्मक सूर न लावणे अगदी खपतच नाही असे काही बरेचसे प्रतिसाद बघून वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 06:06

In reply to सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल by प्रचेतस

Permalink

सूर लावणे असे वाचावे.

सूर लावणे असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 05/09/2016 - 07:00

In reply to सूर लावणे असे वाचावे. by प्रचेतस

Permalink

वल्ल्या सिविल वाॅर भन्नाट आहे

वल्ल्या सिविल वाॅर भन्नाट आहे रे, जबर्या रेटींग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 07:02

In reply to वल्ल्या सिविल वाॅर भन्नाट आहे by स्पा

Permalink

आज जातोय रात्री पावणेअकराच्या

आज जातोय रात्री पावणेअकराच्या शोला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/09/2016 - 08:23

In reply to आज जातोय रात्री पावणेअकराच्या by प्रचेतस

Permalink

वल्लींच्या

प्रतिसादाला दुजोरा.. आणि अता अवांतर : वल्ली कसा आहे " कॅअमेरिका" मी दादाला दाखवावा म्हणतोय (तो बोअर तर होणार नाही ना?) पा ल्क नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/09/2016 - 09:35

In reply to वल्लींच्या by नाखु

Permalink

कॅपट्न अमेरिका...बिंधास्त बघा....

माझ्या मुलांना पण आवडला. आणि मला पण हे असे एक्स-मॅन, सुपरमॅन, स्पायडर-मॅन टाइप सिनेमे जास्त आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Mon, 05/09/2016 - 07:12

In reply to सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल by प्रचेतस

Permalink

ते बहुतेक सचिनभक्तांकडून

ते बहुतेक सचिनभक्तांकडून शिकले असतील. सचिन शतकांसाठी खेळतो असं म्हटलं की गेलाच कामातून तसं.. बाकी सैराटभक्त हा शब्द नवा आहे. आता सैराटद्वेष पण रुजू होईल लौकरच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 07:16

In reply to ते बहुतेक सचिनभक्तांकडून by खटासि खट

Permalink

सैराटद्वेष नाही रुजणार. कारण

सैराटद्वेष नाही रुजणार. कारण भक्तच लगेच वैयक्तिक हल्ले करून तो प्रयत्न हाणून पाडतील. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Mon, 05/09/2016 - 07:53

In reply to सैराटद्वेष नाही रुजणार. कारण by प्रचेतस

Permalink

गल्ली चुकली.

नाही रुजला तर सचिनभक्तांचे चेले नाहीत ते. सचिनभक्तांनी सचिनद्वेष हा शब्द रुजवून सचिन बद्दल एकही शब्द विरोधात लिहीणा-यांना नामोहरम केलं होतं (नंतर अण्णाभक्त, केजरूभक्त, मोदी भक्त आले. पण आपले सचिनभक्त आद्य आहेत).
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 09:47

In reply to गल्ली चुकली. by खटासि खट

Permalink

ह्यावरुन सचिनभक्त असलेल्या

ह्यावरुन सचिनभक्त असलेल्या आपल्या किसनदेवांची आणि इतरही अनेक मिपाकरांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by साहेब.. on Mon, 05/09/2016 - 08:05

In reply to ते बहुतेक सचिनभक्तांकडून by खटासि खट

Permalink

+१००

हे मात्र अगदी खर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on Mon, 05/09/2016 - 15:17

In reply to सैराटभक्तांना चित्रपटाबद्दल by प्रचेतस

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सायकलस्वार on Mon, 05/09/2016 - 07:09

Permalink

अहो प्रचुकाका लोक म्हणतायत

अहो प्रचुकाका लोक म्हणतायत पिक्चर बघा आणि मग पाहिजे तेवढी टीका करा. आमच्या आजूबाजूला असलं काही होत नाही म्हणून आम्ही शहामृगासारखे डोके खुपसून वास्तव deny करणार याला काय अर्थ आहे? हाच धागा एखाद्या नवख्या आयडीने काढला असता तर लोकांनी चिंधड्या उडवल्या असत्या आत्तापर्यंत, होक्की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 07:17

In reply to अहो प्रचुकाका लोक म्हणतायत by सायकलस्वार

Permalink

तुमच्या माहितीसाठी-

तुमच्या माहितीसाठी- काल चित्रपट पाहिला. अत्यंत रटाळ वाटला. रिलेट होताच आलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 07:32

In reply to तुमच्या माहितीसाठी- by प्रचेतस

Permalink

आभारी आहे

चित्रपट रटाळ आहे, रिलेट होता आलं नाही या आपल्या मताचा आदर आहेच, पण चित्रपट आवडला नाही त्याची काही कारणे सांगता आली तर सांगा, चार मित्रामधे चित्रपटाबद्दल निगेटिव्ह बोलायला मदत होईल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 05/09/2016 - 09:08

In reply to आभारी आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पहिला अर्धा भाग तद्दन

पहिला अर्धा भाग तद्दन व्यावसायिक आहे तर नंतरच्या अर्ध्या भागात संसाराची कुत्तरओढ दाखवण्यात आलीय. चित्रपट प्रचंड लांबीमुळे कंटाळवाणा होतो आणि कधी संपतोय असे वाटते. शेवट मात्र बरा दाखवलाय दिग्दर्शकाने.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 05/09/2016 - 10:06

In reply to पहिला अर्धा भाग तद्दन by प्रचेतस

Permalink

पहिला अर्धा भाग तद्दन

पहिला अर्धा भाग तद्दन व्यावसायिक आहे
होय. हळव्या मनाच्या लोकांना आपले अकरावी बारावीचे किंवा एफवाय एसवायचे दिवस आठवतील. हा चित्रपट कथा म्हणून पाहायला गेलात तर त्यात नेहमीप्रमाणे गोड गोड नसलेला जरा वेगळा शेवट सोडला तर पाहण्यासारखे काही नाही. चित्रपटातील मुख्य कथानक बाजूला ठेवून या चित्रपटात पाहण्यासारखे खुप काही आहे. दिग्दर्शकाने अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामिण जीवन उभं केलं आहे. हे ग्रामिण जीवनाचे अस्सल चित्र आहे. चित्रपटातील नवखे कलाकार अगदी आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं वाटतात. चेहर्‍यावर रंग फासलेले कलाकार वाटतच नाहीत. ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. दिग्दर्शनात तेलुगू चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. तेलुगू चित्रपट पाहणार्‍यांच्या ते लगेच लक्षात येईल. बर्‍याचशा फ्रेम्स तेलुगू चित्रपटांतून ढापल्या आहेत असे जाणवते. थोडासा प्रेमिस्थे आणि थोडासा जयम संदर्भ बदलून वापरले आहेत की काय असे चित्रपट पाहताना जाणवत राहते.
"मला खरंच वाटंना. मी इथं आलोय आन तू माज्यासंगं बोलती ते" हे परशाचे बोल आणि त्यानंतर आर्चीने "त्यात खरं नं वाटाय काय झालं, मी खरंच आली" असं म्हणून परशाला चिमटा काढणं हे पाहून तेलुगू बोमरीलूमधील सिद्धार्थ आणि जेनेलियाचा संवाद आठवला. आपली प्रेयसी आपल्या खोलीत आली आहे यावर विश्वास न बसल्याने नायक नायिकेला म्हणतो, "नाकू नच्चलो, ओक्क अम्मायी ना रुमलो उन्दा. नम्म लेकपोतन्नानू". यावर नायिका त्याला चिमटा काढून म्हणते, "नम्म सिद्धू" म्हणते. नायकाच्या चेहर्‍यावरील अविश्वासाचे भाव, नायक नायिकांचे संवाद, नायिकेचे नायकाला चिमटा काढणे सारे अगदी तसेच्या तसे. फक्त इथे नायिकेचे उसाचे रान तर तिथे नायकाच्या प्रशस्त बंगल्यातील नायकाची खोली. प्रेमाची भाषा वैश्विक असते हेच खरे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 10:12

In reply to पहिला अर्धा भाग तद्दन by सतिश गावडे

Permalink

बरोबर, त्या तेलुगू

बरोबर, त्या तेलुगू चित्रपटातही तो सीन कुठल्या चीनी, जपानी, कोरियन, पोलिश, आयरिश, इ इ चित्रपटातून उचलला असेल ह्याची काही शाश्वती नाही. ह्या बाबतीत प्रेमाची भाषा वैश्विकच म्हणायला हवी. आपले बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली अशा भाषेची भाषांतरे करण्यात फार पटाईत आहेत असे 'बघून' आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 10:18

In reply to बरोबर, त्या तेलुगू by तर्राट जोकर

Permalink

प्रेमाची भाषा...

प्रेमाची भाषा वैश्विक असते आणि अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात, लोक म्हणतात वेगळं पाहिजे, आता प्रेमात काय वेगळ अजुन दाखवायचं असतं..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 05/09/2016 - 10:22

In reply to बरोबर, त्या तेलुगू by तर्राट जोकर

Permalink

बरोबर, त्या तेलुगू

बरोबर, त्या तेलुगू चित्रपटातही तो सीन कुठल्या चीनी, जपानी, कोरियन, पोलिश, आयरिश, इ इ चित्रपटातून उचलला असेल ह्याची काही शाश्वती नाही.
होय. मी वरील प्रतिसादात उल्लेख केलेला "प्रेमिस्थे" हा तेलुगू चित्रपट "काधल" या या तमिळ चित्रपटाची तेलुगू डब आवृत्ती आहे. विकीनुसार काधल हा "मन्जरी" नावाच्या नेपाळी चित्रपटाचा रिमेक आहे. काधल/प्रेमिस्थे चा महेश कोठारेंनी आपल्या लेकाला घेऊन "वेड लावी जीवा" नावाचा मराठी रिमेक बनवला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 07:27

In reply to अहो प्रचुकाका लोक म्हणतायत by सायकलस्वार

Permalink

अगदी बरोबर

>>>>>प्रचुकाका लोक म्हणतायत पिक्चर बघा आणि मग पाहिजे तेवढी टीका करा. नै तर काय..... कालच्या दै सकाळच्या फिरस्ती मधे उत्तम कांबळे यांनी अशा लोकांबद्दल एक चांगला शब्द वापरला आहे. तो शब्द आहे, ''निष्क्रिय सोशल ऑडिटर'' यांचे स्वत:चे प्रश्न खुपच वेगळे असतात आणि त्याची उत्तरं खुप साधी असतात. (मूवीला उद्देशून नाही, जनरली काही मानसाबद्दलचा हा विचार आहे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 05/09/2016 - 09:32

In reply to अगदी बरोबर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 07:10

Permalink

धत तेरे की.....

मला वाटलं चित्रपटाबद्दल परीक्षण मूवीनी लिहिलं की काय, छ्या अपेक्षा भंग झाला. >>>>>>आमच्या अनुभवांत सगळ्या सुखी आणि समाधानी प्रेम-कथा असल्याने, "सैराट" सारखी नकारात्मक कला रिचवणे शक्य होणार नाही. धन्यवाद. ज्याच्या मनाची पाटी कोरी नाही, त्यांनी चित्रपट खरंच पाहू नये. मिपा सैराट मित्र मंडळ आपले आभारी आहे. _/\_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Mon, 05/09/2016 - 07:19

Permalink

कोल्हापुरातील

कोल्हापुरातील ब्राह्मण मुलगा आणि मराठा मुलगी ( Megha Patil / Indrajit Kulkarni)यांचे गेल्या वर्षीच झालेले honour killing एवढ्यात विसरलात का? http://www.thehindu.com/news/national/other-states/couple-hacked-to-death-in-suspected-honour-killing-in-kolhapur/article8001750.ece
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Mon, 05/09/2016 - 07:52

Permalink

नाही रुजला तर सचिनभक्तांचे

नाही रुजला तर सचिनभक्तांचे चेले नाहीत ते. सचिनभक्तांनी सचिनद्वेष हा शब्द रुजवून सचिन बद्दल एकही शब्द विरोधात लिहीणा-यांना नामोहरम केलं होतं (नंतर अण्णाभक्त, केजरूभक्त, मोदी भक्त आले. पण आपले सचिनभक्त आद्य आहेत).
  • Log in or register to post comments

Submitted by दिग्विजय भोसले on Mon, 05/09/2016 - 08:27

Permalink

नकारात्मक गोष्टी घडतायेत त्या

नकारात्मक गोष्टी घडतायेत त्या नाकारून चालणार नाही. ऑनर किलिंग मराठ्यांमध्ये जास्त आहे,ते एकंदरीत लोकसंख्येप्रमाणे असेलच. एक निराळच वैशिष्ट्य म्हणजे उच्च मराठा(सरकार) आणि कनिष्ठ मराठा यांचही सुत जमत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 05/09/2016 - 08:39

Permalink

शंभर पक्के..

शंभर पक्के.. सत्कारात काय देऊ..!?=))
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 05/09/2016 - 09:23

In reply to शंभर पक्के.. by जेपी

Permalink

सैराटची दोन टिकिटे.

सैराटची दोन टिकिटे.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 05/09/2016 - 10:48

In reply to सैराटची दोन टिकिटे. by तर्राट जोकर

Permalink

त्यांना आवडणार नाही त्यांनी

त्यांना आवडणार नाही त्यांनी आधीच सांगितलंय. त्यापेक्षा मला दया. मूवीकाकांना आपण सत्कारात एक डायरी देऊया. ( ह घ्या काका :) फटके पडायच्या आधी पळते ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 05/09/2016 - 09:04

Permalink

फसलेले ऑनर किलिंग एक आठवण

मी काही वर्षापूर्वी हिमाचलला सहलीला गेलो होतो. सिमला मनाली मंडी कांग्रा डलहौसी अशा प्रवासासाठी के इन्डिकावाला गाठला. सिमला सोडताच आमच्या गप्पा सुरू झाल्या . काही गाणी मी म्हटली काही त्याने. त्यात मधेच एका ठिकाणी त्याने गाडी एका वळणावर थांबविली. त्याअगोदर त्याने आपल्या प्रेमाची काहाणी आम्हाला कथन केली होती. ती जागा आल्यावर रस्त्याच्या कडेला एका खड्डेवजा जागेकडे बोट दाखवून मला म्हणाला " अंकल, इधर मेरे सालेने मुझे मौतके वास्ते पीट पीटकर फेंका था | " आमच्या सर्वांच्याच अंगावर काटा आला. पुढे याच्या व तिच्या प्रमाला साफल्य आले. ".. ऑगस्ट मे मेरी शादी है .. आपने आना है " असे त्याने आम्हाला सांगितले. त्यानंतर मी एन एच १० हा चित्रपट मुलीसह पाहिला तेंव्हा तिला व मला त्या ड्रायवर ची आठवण आली. " अरे अंकल ... उससे खुब्सूरत दुनियामे कोई नही... हे त्याचे वाक्य आजही मला आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 05/09/2016 - 09:32

In reply to फसलेले ऑनर किलिंग एक आठवण by चौकटराजा

Permalink

क्या बात है.

अनुभव छान. "अरे अंकल ... उससे खुब्सूरत दुनियामे कोई नही..." क्या बात है, यावरुन एक शेर आठवला, कोणाचा आहे माहिती नाही - 'बस दिलों को जीतना ही मकसद रखना दोस्तों......! वरना दुनिया जीतकर भी सिकंदर खाली हाथ ही गया.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 05/09/2016 - 09:05

Permalink

एक साधा प्रश्न ,आंतरजातीय

एक साधा प्रश्न ,आंतरजातीय विवाह केल्याने कुणाला कुणाची जात घ्यावी स्विकारावि लागते की दोन्ही स्वतंत्र जात लावू शकतात।
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/09/2016 - 09:42

In reply to एक साधा प्रश्न ,आंतरजातीय by श्री गावसेना प्रमुख

Permalink

आंतरजातीय विवाह केल्याने

आंतरजातीय विवाह केल्याने कोणालाही कोणाची जात घेता येत नाही. कींवा जातीचा फायदाही घेता येत नाही. उदा. ब्राह्मण मुलीने जर मागासवर्गीयाशी लग्न केले तरीही तीची जात ही ब्राह्म्णच रहाते. जे अपत्य होते त्यास वडीलांची जात मिळते..
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com