कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 12:54 pm

सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही.

असं म्हणतात की कोहीनूर बहुधा आताच्या आंध्र प्रदेशातील कोल्लूर खाणीत मिळाला असावा आणि दक्षीण भारतातील काकातीया राजवटीच्या संपत्तीत असावा, इस्वी १३१० मध्ये खिलजीच्या सैन्याने यशस्वीपणे वरंगल लूटल्या नंतर तो बहुधा दिल्ली दरबारी रुजू झाला असावा हा बहुधा निश्चीतपणे न सांगता येणारा सर्वसाधारण तर्क. पण दिल्लीच्या सुलतानांकडे खिलजीच्या काळापासून ते औरंगजेबा पर्यंत व्यवस्थीत नोंद करुन राहीला असावा, त्या नंतर इराणच्या शहाची लूट > अफगाणी फूट> त्यांची आपापसातली दगाबाजी होत आश्रयाला आलेल्या अफगाणी शुजाशहा दुर्राणी कडून हा शीख राजे रणजितसिंगाकडे पोहोचला, रणजितसिंगां स्वर्गवासानंतर त्यांच्या मागे त्यांच्या कुटूंबातील, शीखांमधील आणि पंजाबातील दुफळीच्या परिणामातून शिखांचा इंग्रजांशी युद्धात पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी रणजित सिंगाच्या सातवर्षीय वंशजाशी जो करार केला त्यात हा लिखीत स्वरुपात इंग्लंडच्या राणीसाठी भेट मिळवला. आणि इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात जडवला जाऊन तेथील संग्रहालयात प्रदर्शनार्थ ठेवला गेला आहे.

कोहीनूरचा हिरा तसा जगातला सर्वात मोठा वगैरे नाही पण मोठ्या आकाराच्या हिर्‍यांपैकी एक, त्याच ऐतिहासिक मुल्य बाजूला ठेवल तर एक ते दहा अब्जात त्याची किंमत होण्यास हरकत नसावी (हे माझ व्यक्तिगत मत) आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर आजच्या काळासाठी दहा अब्ज ही मोठी किंमत नाही आणि कार्बनचा दगड तो शेवटी कार्बनचा दगड त्यासाठी म्हणून किती हट्टाला पेटायच ?

हा कोहीनूर हिरा वापस मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत म्हणून भारतीय सर्वोच्च न्यायालयात कुणि गेले, काहीही झाले तरी हिरा लगेच भारतास मिळेल असे नाही त्यामुळे याचिका सुनावणीस घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला घाई करण्याची गरज नसावी आणि समजा सुनावणीस घेतली तर -कोहीनूर वापस घेण्याची घाई नसेल किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची वस्तुस्थिती म्हणून अजून बराच काळ शांत बसावे लागेल किंवा कदाचित मानवी जिवनास निरुपयोगी कोळश्याच्या दगडाचे आकर्षण भाजपा सरकारला नसेल-तर एकुण आताच्या देशप्रेमी भाजपा सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेले - कोहीनूर ही इंग्लडच्या राणीला देण्यात आलेली भेट होती असे- प्रतिज्ञापत्र देशप्रेमाचा आदर्श ठरते का असा साशंकतेचा मुद्दा आहे. भारताची आजची राजकीय एकात्मता अंशतः ब्रिटीश राजकर्त्यांच्या करामतींचा त्यांनी केलेल्या भल्या बुर्‍या करारांचा भाग आहे त्यामुळे ब्रिटीशांनी भारतात केलेले सर्व ऐतिहासिक करार मदार नाकारुन चालत नाहीत हे खरे असले तरी त्यांनी केलेल्या वसाहतवादी लूटीचे समर्थन करण्याचे कारणही नसावे आणि नेमकी इथेच बहुधा भाजपा सरकारची गल्लत होत असावी; प्रश्न केवळ काही वस्तु ब्रिटनकडे राहील्या याचा नाही अप्रत्यक्षपणे त्यांचा वसाहतवाद भारत सरकार स्विकारते असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होतो किंवा कसे. भारत आज तसेही सार्वभौम राष्ट्र आहे, एखाद्या प्रतिज्ञापत्राचा अर्थ काय होतो याने फार फरक पडत नाही फरक यातील कायदे विषयक आणि देशप्रेम विषयक बारकावे भाजपा सरकारास ल़क्षात न येत असण्याचा आहे.

आणि त्यामुळे सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःची मती स्थिर ठेऊन अधिक चर्चा करुन पुन्हा सादर करण्यास सांगितले अशी बातमी आहे. मंत्रिमंडळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली सारखे दोन-दोन अनुभवी सर्वोच्च न्यायालय स्तराचा वकीली अनुभव असलेली मंडळी असताना काय लिहून दिले जात आहे हे आणि तेही भाजपा सरकारने पाहू नये हे आचंबित करणारे आहे.

संदर्भ
*कोहीनूर विषयक ताज्या बातम्या
* Koh-i-Noor इंग्रजी विकिपीडिया लेख
* First Anglo-Sikh War
* Text of the 1846 Treaty of Lahore
* ज्याच्या कारकर्दीत कोहीनूरचे हस्तांतरण झाले तो रणजित सिंगाचा मुलगा दुलीप सिंग
* जगातील मोठ्या हिर्‍यांची यादी

* एनी वे मी गेल्या २४ तासाच्या आत परस्पर विरोधी राजकीय पक्षांवर म्हणजे दुसर्‍या धाग्यातून काँग्रेस कम्युनीस्टांच्यावरही टिका केली आहे तेव्हा तरीही ज्यांना मी विषीष्ट चष्मे लावतो वाटते त्यांनी तसे वाटून घ्यायचे की निष्पक्ष दृष्टीकोणांचा आदर करावयाचा हे पहावे. प्रतिसादांसाठी आभार.

संस्कृतीइतिहासदेशांतरराजकारण

प्रतिक्रिया

युद्धात जेता हरलेल्या देशाचे सर्व मौल्यवान नेतो.आता तो हिरा रीतसर अमूक ठिकाणी आहे वगैरे माहीत नसतं तर ( आणि अशाच इतर चिजा) काय केलं असतं?

माहितगार's picture

19 Apr 2016 - 1:58 pm | माहितगार

हम्म.. चांगला प्रश्न आहे, इतर कुणि याचे उत्तर देऊ इच्छित आहे का ? मी माझे उत्तर देण्यापुर्वी इतरांच्या चर्चेची वाट पाहीन. प्रतिसादासाठी आभार

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 2:24 pm | मराठी कथालेखक

सरकार (भाजप वा कोणतेही) केवळ कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करु शकतात. जर जुनी कागदपत्रे 'हिरा भेट दिला' असंच सुचवत असतील तर आता अजून काय तपास करणार ? त्या व्यहवाराशी संबंधित लोकांना बोलवून त्यांची चौकशी तर नाही करता येणार

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 3:21 pm | तर्राट जोकर

ही जुनी कागदपत्रे नक्की कधी सापडली आहेत? कारण 'हिरा नेला' इतकीच त्रोटक माहिती आजवर सामान्यांमधे होती. इतिहासाचे जाणकार अधिक माहिती देतील तर बरं.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 3:41 pm | माहितगार

तजो धागा लेखाच्या तळाशी 'ट्रिटी ऑफ लाहोर'चा दुवा आहे त्यात कोहीनूर इंग्रज राणीला दिला जाण्याबद्दल सुस्पष्ट उल्लेख आहे.

त्या शिवाय मी या लेखासाठी जे वाचन केले त्यावरुन बाबर, बाबराचा मुलगा, शिवाय औरंगजेब या तिघांच्या दस्तएवजात कोहीनूरचे सुस्पष्ट उल्लेख येतात, त्यानंतरचे हस्ते परहस्ते रणजितसिंगापर्यंत कोहीनूर पोहोचण्याचे कथानकही प्रथमदर्शनितरी बर्‍यापैकी विश्वासार्ह वाटते. अर्थात इतर जाणकार या बाबत अधिक सांगू शकतील

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 3:53 pm | तर्राट जोकर

आता बघितले. हा तह आहे. ह्यात नमूद कलमाप्रमाणे राजाने राणीस हिरा 'सुपुर्त करावा' असा उल्लेख आहे. सरेंडर. म्हणजे तो मित्रत्वाचे संबंध वाढवण्यासाठी दिलेल्या नजराण्यांमधे भेट दिलेला ऐवज नाही. युद्धात जिंकून घेतलेला आहे असे म्हणावे. त्यामुळे सरकारने 'राणीस भेट दिला' असे प्रतिज्ञापत्र दिले असे तर ते दिशाभूल करणारे आहे असे वाटते.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 3:58 pm | माहितगार

अगदी बरोबर बहुधा म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र स्विकारण्यास टाळले असावे.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 3:54 pm | माहितगार

"...कागदपत्रे 'हिरा भेट दिला' असंच सुचवत असतील तर..."
दबावाखाली मिळवलेली भेट इंग्लंडच्या कायद्यानेही भेट ठरत नसावी, इथेतर एका पाठोपाठ भारतीय राज्ये गिळंकृतकरण्याचे वसाहतवादी राजकारण ब्रिटीशांनी केले. भारताशी व्यापारातून मिळालेला पैसा सैन्य उभारण्यावर खर्च केला, भारत न कळत एकसंघ झाला हा फायदा. कोहीनूर घेऊन जाणे प्रत्यक्ष समोर दिसणारे प्रातिनिधीक आहे, माझ्यातरी मते खरा प्रश्न अंशतः वसाहतवादासाठी त्यांनी केलेल्या कृष्णकृत्यास अपरोक्ष पाठीशी घालण्याचा आहे की वसाहतवादाला पाठीशी घालण्याचा आहे एवढाच असावा.

इसकाळ मध्ये डेव्हीड कॅमेरूनच्या २०१३ च्या भारत भेटीची बातमी आली आहे. त्यात डेव्हीड कॅमेरून खालील प्रमाणे म्हटल्याचे सकाळ बातमी म्हणते.

कोहिनूर हिरा हा जगातील मोठ्या हिऱ्यांपैकी एक असून ब्रिटीश सत्ताधारी स्वातंत्र्यपूर्व काळात तो इंग्लंडला घेऊन गेले. त्यानंतर महात्मा गांधीच्या नातवांसहीत इतर भारतीय नेत्यांनी अनेक वर्षापासून हा हिरा भारताच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी करत आहेत.

भेटीच्या शेवटच्या दिवशी कॅमेरॉन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोहिनूरच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. ‘कोहिनूर‘ कडे पाहण्याचा हा दृष्टिकोन चूकीचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही मागणी म्हणजे ग्रीकच्या अथेन्सने एलिगन मार्बल हा ब्रिटनमधील पुतळा परत करण्याच्या मागणी सारखीच असल्याचेही कॅमेरॉन म्हटले. अनेक वर्षापासून अथेन्सने एलिगन मार्बलचे शिल्प ब्रिटनने परत करावी अशी मागणी केली आहे. शिवाय ‘परत करणे‘ या कृतीवर माझा विश्वास नाही. माझ्यामते परत करण्याची कृती विवेकबुद्धीला अनूसरुन नसल्याचे त्यांनी सांगितले.

कॅमेरॉन यांनी भारताच्या आर्थिक विकासामध्ये ब्रिटनला रस असल्याचे सांगत दोन्ही देशातील काळ्या भूतकाळापेक्षा उज्ज्वल वर्तमान आणि भविष्याकडे पाहिले जावे अशी आशा व्यक्त केली.

डेव्हीड कॅमेरूनचे वक्तव्यच ब्रिटीशांनी इतिहासात कुठून कुठून काय काय मिळवण्याचे उद्योग केले आणि भूतकाळातील आमच्या कृष्णकृत्यांकडे बघू नका असे सांगते ते पुरेसे बोलके असावे.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 4:15 pm | तर्राट जोकर

बातमीवरच्या काही प्रतिक्रिया मजेदार आहेत. =))

बातमीत सांगितल्याप्रमाणे कोहिनूर हाच स्यमंतक असेल तर परत आणावा कि नको ?

माहितगार's picture

19 Apr 2016 - 4:56 pm | माहितगार

काडी ? ;) आने दो आने दो :)

माहितगार's picture

19 Apr 2016 - 4:38 pm | माहितगार

खरचं की Lol कोणाचे काय तर कोणाचे काय :)

अवांतरः ब्रिटीशांच्या राजकारणाला उघडे पाडणार खाद अब्दुल गफार खान यांच्या मुलाचे अभ्यासपुर्ण लेखन वाचले नसल्यास अवश्य वाचावे.

आणि असभ्य मृत्यूदंडाचा कळस माहित करुन घ्यायचा असेल तर साधारण याच काळात १९व्या शतकात ब्रिटीश सैन्य अफगाणीस्तानातून परत देताना अफगाण स्त्रीयांनी ब्रिटीश सैनिकांना दिलेलेल मृत्यूदंड. इंग्रजी विकिपीडियावर रास्त संदर्भासहीत सापडेल वाचून कुणिही अवाक होईल.

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 4:29 pm | मराठी कथालेखक

बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून हिरा द्यायला लावला असे जरी सरकारने प्रतिज्ञापत्र केले तरी त्याने काय फरक पडणार आहे ?
सर्वोच्च न्यायालय याबाबत "आता सरकारने (म्हणजे लष्कराने) इंग्लडवर हल्ला चढवा आणि हिरा मिळवावा" असा आदेश देवू शकत नाही , फार फार तर सरकारने त्याकरिता राजनैतिक प्रयत्न करावेत असे सुचवू शकते. यापलीकडे सरकारने आपला परराष्ट्र व्यहवार कसा चालवावा , काय करावे, काय करु नये यात न्यायालय ढवळाढवळ करु शकत नाही. तेव्हा अशा याचिकांना काही अर्थ नाही.
इथे हजारो किंवा लाखो करोड रुपयांचा काळा पैसा परदेशात असताना उगाच एका हिर्‍यासाठी डोकेफोड करण्यात अर्थ नाही.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 4:48 pm | माहितगार

बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून हिरा द्यायला लावला असे जरी सरकारने प्रतिज्ञापत्र केले तरी त्याने काय फरक पडणार आहे ?

त्यांनी दिली नाही दिली आंतरराष्ट्रीय राजकारणात बळी तो कानपिळी ज्यांनी हिरा लुटारूंकडून लुटला त्यांच्यावरही रणजितसिंगास देण्याची वेळ आली तेव्हा इंग्लंडवर त्याची त्याची वेळ येईल. प्रश्न इंग्रजांना सात वर्षाच्या राजाकडून हिरा देण्याचा करार करण्याची लाज वाटली आपल्याला तो वापस मागण्याची लाज का वाटावी ? सर्वोच्च न्यायालय तेच म्हणते तुमचे आत्ताचे प्रतिज्ञापत्रक स्विकारले आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हिरा भारताच्या सांस्कृतीक वारश्याचा हक्क नाही असा एकदा निकाल दिला की नंतर निवडून आलेल्या सरकारला पाठपूरावा करण्याची इच्छा झाली तरी तुमच्या सर्वोच्च न्यायालयानेच तो तुमचा नाही म्हटले होते असे होते.

भोपाळ वायु दुर्घटनेत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन नुकसान भरपाई निश्चित केली की आमेरीकन न्यायालयात आपोआपच कूणि दाद मागू शकत नाही.

बोफोर्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्रक देऊन टाकले आणि सर्वोच्च न्यायालयाने स्विकारले की उघडपणे खाल्लेला पैसाही भविष्यात वापस मिळवण्याची अंधूक शक्यताही संपतात. असो.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 4:53 pm | तर्राट जोकर

असे असते काय? अहो जगात कैक घटना एकमेकांच्या अगदी विरोधातल्या सुरु असतात. काळा पैसा आणि कोहीनूर असा संबंध लावायची गरज नाही. दोहोंवर डोकेफोडे करणारे वेगवेगळे आहेत. हे म्हणजे अजुन लाखो भारतीय फुटपाथ्वर झोपतात तेव्हा राष्ट्रपतीस एवढ्या मोठ्या महालाची गरज काय असे विचारण्यासारखे आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Apr 2016 - 6:29 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे म्हणजे अजुन लाखो भारतीय फुटपाथ्वर झोपतात तेव्हा राष्ट्रपतीस एवढ्या मोठ्या महालाची गरज काय असे विचारण्यासारखे आहे.

>>

अन ते एक महात्मा तसाच पंचा नेसुन राहिले आयुष्यभर!

माहितगार's picture

19 Apr 2016 - 4:53 pm | माहितगार

इथे हजारो किंवा लाखो करोड रुपयांचा काळा पैसा परदेशात असताना उगाच एका हिर्‍यासाठी डोकेफोड करण्यात अर्थ नाही.

या केस बद्दल खरेच अर्जंन्सी नव्हती, पण शेवटी मी लेखात आणि प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न केवळ हिर्‍याचा नाही, प्रतिज्ञापत्र ज्या पद्धतीने केले गेले त्याने अपरोक्षपणे उघडपणे केलेल्या वसाहतवादी कृष्णकृत्यावर आपण स्वतःहूनच पांघरूण घालणे आहे. तेव्हाच्या भारतीय राज्यांची आपणच कदर करत नाही भारताच्या सांस्कृतीक वारशाची/अभिमानाची भारतीयांनाच कदर नाही असा अर्थ निघतो आणि भारताच्या अभिमानाच्या गप्पा करणार्‍या राजवटीकडून असे होणे हे अचंबित करणारे असावे. असो.

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 6:30 pm | मराठी कथालेखक

कदर करणं वेगळं आणि व्यर्थ धडपड करणं वेगळं. मागून काही मिळणार नाही.
कोहिनूर हे वैभवाचे एक प्रति़क आहे (अर्थात मी त्याचे मुल्य नाकारत नाही).
मुत्सद्देगिरि, राजकराण, युद्ध करुन ब्रिटिशांनी आपली बरीच संपत्ती लुटली , उपभोगली.
आजच्या काळात युद्धाची जागा बव्हंशी व्यापारी शक्तीने घेतली आहे. त्यामुळे बुद्दिमत्ता, व्यापार, राजकारण आणि मुत्सद्देगिरि यांच्या जोरावर जगातले अनेक कोहिनूर आपल्याकडे आणू शकतो.
ब्रिटीशांचे मानाचे समजले जाणारे वाहन ब्रॅड (जग्वार, लँड रोवर) हे आज भारतीय उद्योगसमूहाकडे आहेत, एका अर्थाने एक ब्रिटिश हिरा भारताकडे आहे असे म्हणू शकतो.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 6:48 pm | माहितगार

अंशतः सहमत आहे, पण केवळ उद्योग असणे पुरेसे नसावे एकता आणि सामरीक सशक्तता सोबतीस असणे गरजेचे असावे हा भारतीय इतिहासातून घ्यावयाचा धडा महत्वाचा असेल का.

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 6:52 pm | मराठी कथालेखक

बरोबर.. आजच्या काळात सामरिक सशक्तता हा मुत्सद्देगिरी आणि राजकारणाचा एक भाग झालाय
अन्यथा मोठमोठी अण्वस्त्र , क्षेपणास्त्र प्रत्यक्ष वापरली जाण्याची शक्यता कितपत असावी ?

आदूबाळ's picture

19 Apr 2016 - 5:29 pm | आदूबाळ

चांगलं आहे. सबास.

सोमनाथ मंदिर लुटणार्‍या गजनीच्या (बुत्शिकन) महमूदाच्या वंशजांकडून ती सगळी लूट कधी आणायची?

उलट आपणच त्या देशाला आता रस्ते बांधणी वगैरे मदत करतोय.

एग्जॅक्टली. आहे म्हणून मागत सुटायचं आणि नसलं की गप पडायचं?

भूतकाळाचं ओझं टाकून द्यावं असं फार वाटतं.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 6:50 pm | माहितगार

"...नसलं की गप पडायचं?"

इतिहासातील चुकांबद्दल माफ करण्यास हरकत नाही पण किमानपक्षी जाणीव देण्याची जाणीव हवी किंवा कसे.

माझ्या मते जाणीव देण्याचीही गरज नाही. श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकरांचं एक वाक्य आहे - महापुरुष हे त्या काळाचं अपत्य असतात हे मान्य करायला हवं. वसाहतवाद, लुटालूट हेही त्या काळाचं अपत्य आहे हे मान्य करावं आणि सोडून द्यावं.

एक म्हणणार जाणीव करून द्यावी. मग थोडा कडवा म्हणणार नुसती जाणीव देववून काय होणारे - माफी मागितली गेली पाहिजे. तिसरा जास्त कडवा म्हणणार माफीबिफी तोंडची वाफ - जे अत्याचार आमच्यावर झाले त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आणखी कडवा... वगैरे.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 9:53 pm | माहितगार

युरोमेरीकन 'इमोशनल क्लोजर' (मराठीत काय म्हणावे ?) नावाच्या संकल्पनेचा उल्लेख करत असतात, अफेक्टेड व्यक्तींना आणि समुहांना 'इमोशनल क्लोजर'ची गरज असतेच आणि अन्यायकर्त्यांना शिक्षा नसेल तर माफ करण्यापुर्वी जाणीव, पश्चाताप आणि माफी या किमान स्टेप्सची अपेक्षा असते या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसल्या तर कडव्या गटातील लोकांची संख्या अधिक रहाते आणि अपेक्षा पूर्ण झाल्यातर कडव्या गटातील लोकांची संख्या कमी राहील; कोणता पर्याय अधिक बरा वाटतो ?

आदूबाळ's picture

19 Apr 2016 - 10:56 pm | आदूबाळ

हे इमोशनल क्लोजर प्रकरण होलोकॉस्ट इ० च्या संदर्भात वाचलेलं आहे. त्याबाबतीत हे पटतंही, कारण त्याची स्केल तेवढी होती.

साडेसात मिलियन ज्यूंचं शिरकाण आणि एका राजाकडे असलेला हिरा हिरावून नेणे** यात फरक आहे. समजा, होलोकॉस्ट झालं नसतं, तर युरोपातल्या करोडो सर्वसामान्य ज्यूंचे आई-वडील जिवंत राहिले असते. समजा, कोहिनूर नेला नसता, तर रणजितसिंहाचे मूठभर वंशज वगळता कोणाला फारसा फरक पडला नसता.

या बाबतीत इमोशनल क्लोजर झालं नाही तरी त्यातून फारसे कडवे निर्माण होणार नाहीत.

(याउलट, जालियनवाला बाग प्रकरणाबद्दल ब्रिटिश राजघराण्याने माफी मागितली आहे असं अंधुक आठवतं आहे. तिथे इमोशनल क्लोजरची खरी गरज होती आणि ती पूर्णही करण्यात आली.)
_____
**हाऊ पोएटिक!

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:43 pm | माहितगार

या बाबतीत इमोशनल क्लोजर झालं नाही तरी त्यातून फारसे कडवे निर्माण होणार नाहीत.

तुम्ही या विषयावर शीख समुदायाच्या भावना अभ्यासून मत व्यक्त करत आहात का ? गंमतीचा भाग असा की कदाचित शीख समुदायातील कडवे ब्रिटीशांना दोष देणार नाहीत पण सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्राबद्दल केवळ भाजपालाच नव्हे हिंदू आणि उर्वरित भारतियांनाही दोष दिल्या शिवाय राहतील का -तर्कसुसंगत नसले तरीही- असा प्रश्न शिल्लक राहतो. शिवाय शीख असोत अथवा नसोत अनेक तक्रार छोटी असो वा मोठी असो अनेक तक्रारींमध्ये छोट्या तक्रारीही बेरजे खातर मोजल्या जात असाव्यात.

आदूबाळ's picture

20 Apr 2016 - 12:11 am | आदूबाळ

तुम्ही या विषयावर शीख समुदायाच्या भावना अभ्यासून मत व्यक्त करत आहात का ?

हा rhetorical प्रश्न आहे का? असा अभ्यास अर्थातच नाही, पण माझ्या ओळखीत जे शीख आहेत त्यांच्या बोलण्यात "कोहिनूर" याविषयावर फारशा तीव्र भावना आढळल्या नाहीत. (खलिस्तान, भिंद्रनवाले, डेरा साचा सौदा, टायटलर वगैरेबद्दल आढळल्या.)

माझं साधं म्हणणं असं आहे की तुलनात्मक दृष्टीने हा नॉन इश्शू आहे.

माहितगार's picture

20 Apr 2016 - 12:13 am | माहितगार

तुलनात्मक ..

तुलनात्मकता सब्जेक्टीव्ह असते का ?

आदूबाळ's picture

20 Apr 2016 - 11:17 am | आदूबाळ

अर्थातच.

मराठी कथालेखक's picture

20 Apr 2016 - 11:34 am | मराठी कथालेखक

आदूबाळ यांनी मांडलेले मुद्दे अगदी पटणारे आहेत.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 6:25 pm | माहितगार

सिल्करुटवर असून, एवढ्या लूटी करुनही अफगाण लोकांनी स्वतःची अशी परवड का करुन घेतली असेल ? पैसा वापरुन संपतो पण भारतातून मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी नेलेल्या सोने आणि जडजवाहीराचे काय झाले हा एक प्रश्नच आहे.

मला हल्ली Dr. Koenraad Elst ह्या बेल्जीअन इंडॉऑजीस्टचे लेखन आवडायला लागले आहे. त्याच्या वॉज देअर अ इस्लामीक जेनोसाईड ऑफ हिंदूज या लेखात तो म्हणतो इस्लामी आक्रमकांनी हिटलर स्टाईल मोठे एक सिंगल जेनोसाईड केले असल्यास माहिती नाही पण सर्व शतकांची मिळून केलेली बेरीज कदाचित जेनोसाईड एवढी भरेल. पुढे लेखात ज्यू लोकांची आणि हिंदूंची त्याने तुलना खालील प्रमाणे केली आहे.

One lesson to be learned from genocide history pertains to Karma, the law of cause and effect, in a more down-to-earth sense: suffering genocide is the karmic reward of weakness. That is one conclusion which the Jews have drawn from their genocide experience: they created a modern and militarily strong state. Even more importantly, they helped foster an awareness of the history of their persecution among their former persecutors, the Christians, which makes it unlikely that Christians will target them again. In this respect, the Hindus have so far failed completely. With numerous Holocaust memorials already functioning, one more memorial is being built in Berlin by the heirs of the perpetrators of the Holocaust; but there is not even one memorial to the Hindu genocide, because even the victim community doesn't bother, let alone the perpetrators.

व्यवस्थीत अभ्यासपुर्ण संदर्भ न देता बाष्कळबाजीकरुन कालापव्यय करण्यात सर्वसाधारण हिंदू अधिक समाधान मानतो. अन्याय करणार्‍यावर अन्याय करण्याची स्वप्ने पहाण्याची आवश्यकता नसावी पण अन्याय करणार्‍यांना तुम्ही (अथवा तुमच्या पुर्वजांनी) हा असा असा अन्याय केला हे स्विकार्ह संदर्भ असलेली memorial एल्स्ट म्हणतो तसे का उभारु नयेत. इंग्लंडचा राजकुमार अथवा पंतप्रधान भारतास भेट देतात तेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या अन्याया बद्दल चे एक्झीबीशन दाखवण्यात काही गैर नसावे.

मराठी_माणूस's picture

19 Apr 2016 - 6:39 pm | मराठी_माणूस

इंग्लंडचा राजकुमार अथवा पंतप्रधान भारतास भेट देतात तेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या अन्याया बद्दल चे एक्झीबीशन दाखवण्यात काही गैर नसावे.

ही फार पुढची गोष्ट झाली. आपली मानसीकता कशी आहे ते खालील पत्रावरुन कळेल.
http://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-opinion-11-1226068/

माहितगार's picture

19 Apr 2016 - 6:54 pm | माहितगार

चिनी लोकही युरोमेरीकनांशी व्यापार करतात पण टाचणी अस्मीतेवर पडली तरी किती आग्रहाने आवाज करतात. अख्ख अफू युद्ध करुन इंग्रजांना केवळ दोन बेटांएवढी टिचभर जागा मिळाली. भारतीयांनी पाहता पाहता देश स्वाधिन केला.

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 6:23 pm | mugdhagode

रिकामा भाजपा कोहिनुरला तुंबड्या लावी.

उपरोक्त प्रश्नावर तुमची नेमकी बाजू काय आहे ?

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 11:57 pm | mugdhagode

आमची बाजू स्पष्ट आहे. भारतीय राजे महाराजे सरदार हे जनतेकडुन पैसा घेत होते. देश संभाळणे हे त्यांचे काम होते.

त्यामुळे शक हूण मोघल इंग्रज ... आम्ही कुणालाही दोष देत नाही.

माहितगार's picture

20 Apr 2016 - 12:04 am | माहितगार

Victim blaming is a devaluing act that occurs when the victim(s) of a crime or an accident is held responsible — in whole or in part ...

संदर्भ

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 1:04 am | mugdhagode

दोन राजे आपापसात लढलए तर हरणारा व्हिक्टिम होतो का ?

...

कोहिनूर हिरा शीख राजाने इंग्रजांना स्वतः लंडनात जाऊन अर्पण केला होता.

स्वतःचे प्राण व राजेपद यासाठी एतद्देशीय राजानी अनेकदा लोटांगणे घातलेली आहेत.

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2016 - 6:57 pm | मराठी कथालेखक

शत्रुराष्ट्राला त्याच्या चुकांची त्याने (भुतकाळात) केलेल्या अन्यायाची जाणीव करुन देण योग्यच. पण इंग्लड-भारत यातले संबंध असे साधे सरळ नाहीत. आज भारत जे काही आहे त्यातले ब्रिटिशांचे योगदान नाकारता येणार नाहीच (औगद्योगिक, सामाजिक, राजकीय सगळ्याच बद्दल म्हणतोय मी)
त्यामुळे अनेक नकारात्मक बाबींचा उल्लेख करताना अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख टाळणं चुकीचं ठरेल.
तेव्हा आता हे सगळं उगाळत न बसणंच ठीक...

विवेकपटाईत's picture

19 Apr 2016 - 7:24 pm | विवेकपटाईत

हिंदीत एक कहावत आहे 'जिसकी लाठी उसकी भैंस'. लाठी मजबूत असेल तर पुन्हा नजराण्यात कोहिनूर हिरा भारताला परत मिळेल. बाकी कुठलाही मार्ग नाही.

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:35 pm | माहितगार

:) सहमत आहे आणि कोहीनूर पेक्षा हे पल्ले पडणे आणि सामरीक सशक्तते करता प्रयत्न होणे महत्वाचे असावे

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 7:45 pm | mugdhagode

ललित मोदी व विजु मल्ल्या याना परत आणावे

हिरा आणून काय घंटा भेटणार आहे

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 10:39 pm | तर्राट जोकर

राम मंदीर बांधून...?

लालगरूड's picture

19 Apr 2016 - 11:27 pm | लालगरूड

देव

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 11:37 pm | तर्राट जोकर

नाही भेटला अजून? कीप सर्चींग.

असो. कोहिनुर आणून जे भेटणार तेच राममंदिर बांधून भेटणार.

लालगरूड's picture

19 Apr 2016 - 11:43 pm | लालगरूड

both things are different. we need developement education stable government tolerance. : )

ट्रेड मार्क's picture

19 Apr 2016 - 10:41 pm | ट्रेड मार्क

मध्यंतरी ऐकले होते की राणीची सांपत्तिक परिस्थिती ठीक नाहीये. विकायला तयार असेल तर बघायला पहिजे. :)

पैसा's picture

19 Apr 2016 - 11:17 pm | पैसा

आणलाच समजा परत तर तो सरकारी मालकीचा होईल की रणजितसिंगाच्या वंशजांचा?

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 11:21 pm | तर्राट जोकर

देशाच्या...

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:33 pm | माहितगार

आणलाच समजा परत तर तो सरकारी मालकीचा होईल की रणजितसिंगाच्या वंशजांचा?

चांगला प्रश्न विचारलात मी अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांकडे बोट दाखवतो आहे ते यामुळेच, कोहीनूर मोगल (दिल्ली) दरबारच्या अधिकृत खजीन्याचा भाग होता तो निव्वळ लुटीतून नेला गेला. लुटीतून नेलेली गोष्ट कायदेशीरपणे जिथून आणली तिथे वापस गेली पाहीजे म्हणजे -आता भारत सरकारकडे जमा झाली पाहीजे- लुटीतून प्राप्त झालेल्या वस्तुवरचे सर्व करार मदार बेकायदेशीर ठरतात. आणि हा मुद्दा कोणी मांडावयास हवा कायदे पंडीतांनी, तुमच्या मंत्रीमडळात दोन-दोन सर्वोच्च न्यायालयीन कायदेपंडीत आहेत आणि अजूनपण आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही सॉलीसीटर जनरल नेमले आहेत कायदेशीर बाबींची फोड सामान्य जनतेस करता येत नसेल स्मृती इराणी, राजनाथ, नरेंद्र मोदींना करता येत नसेल पण अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांबद्दल तसे म्हणता येईल का ?

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 11:48 pm | mugdhagode

सुरतेच्या लोकानी नुस्कान भरपाई मागितली तर कोण देणार ? महाराष्ट्र शासन की महाराजांचे वारस ?

माहितगार's picture

20 Apr 2016 - 12:09 am | माहितगार

;) चांगला प्रश्न आहे, तांत्रिकदृष्ट्या आणि नैतीकदृष्ट्या महाराष्ट्र या बाबतीत गुजराथेस परतफेड करणे लागावा, आणि तरीही गुजराथी लोक त्या बद्दल इन्सीस्ट करताना दिसत नाहीत कारण नंतरच्या काळात त्यांच्या सुरक्षिततेचे दायित्व मराठा सेनानींनी सांभाळले असावे आणि तुमच्या शब्दात कदाचित मराठा सरदारांनी किमान गुजराथेत कर्तव्ये चोखपणे बजावली असावीत किंवा कसे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2016 - 5:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या सर्व स्वार्‍यांच्या बदल्यात मराठ्यांनी गुजरातला एक अख्खा गायकवाड नावाचा लोकाभिमुख राजवंश दिला, ज्याने गुजरातला भारतीय स्वातंत्र्यदिनापर्यंत न्याय्य, सुखकारक व भरभराटीची राजवट दिली !

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2016 - 5:20 pm | टवाळ कार्टा

कं लिवलयं

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 5:39 pm | mugdhagode

..

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2016 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे लॉजिक नाही वस्तुस्थिती आहे !

पण, सगळीकडे तिरक्या नजरेने पहाणार्‍याला वस्तुस्थितीकडे सरळ पाहणे जमत नाही, ना सोईचे असते... ही पण एक वस्तुस्थितीच आहे, नाही का ? =))

असो. चालूद्या. लोकांचे मनोरंजन करण्याच्या स्पर्धेत उतरण्याची इच्छा नाही.

गामा पैलवान's picture

21 Apr 2016 - 11:53 am | गामा पैलवान

मुगोबाई,

अहो काहीच कसं कळंत नाही तुम्हाला? म्हणे सुरतेची भरपाई कोण देणार. हा काय प्रश्न झाला का? सुरतेची भरपाई मोगलांनी द्यायला पाहिजे. सुरतेचा किल्लेदार इनायतखान पराकोटीचा भ्रष्ट होता. त्याने दहाहजार शिबंदीचे पैसे तरतूद न करता ढापले. महाराजांनी त्याला निरोप पाठवला तेव्हा एक कोटी रुपयांची मागणी केली. वर त्याला हेही सांगितलं की हे इतके पैसे केवळ तुझ्याकडेही सापडतील. इतरांना हात लावायची मला गरज नाही. पैसे दे, मी जातो. तरीपण भेकड इनायत सुरतेच्या गढीत लपून बसला. त्याच्याकडून भरपाई घ्यायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

mugdhagode's picture

21 Apr 2016 - 1:21 pm | mugdhagode

अग्गोबै !

, सुरतेतुन कोटभर रुपये गोळा करुन मराठ्यानी लुटुन घेतले तर
सुरतेच्या किल्लेदाराने / मोघलानी गुजरात्यांवर केलेला अन्याय कसा दूर होतो म्हणे ?

ज्यांना या बाबतीत अजून काही जाणण्याची उत्सुकता आहे त्यांनी वि स वाळिंबे यांचे 'युवराज' हे पुस्तक वाचावे.

याचा नायक आहे दुलीपसिंघ - रणजीतसिंहाचा वारस, लाहोरचा अंतिम शीख शासक. त्याचे राज्य इंग्रजांनी घेतले. महाराणी विक्टोरिया हिच्या मानसपुत्राचा दर्जा त्याने गाठला. आणि त्यानंतरची शोकांतिका मुळातून वाचण्यासारखी आहे.

कोहिनूर हिरा त्याने लहानपणी महाराणीला भेट म्हणून दिला आणि उत्तर आयुष्यात ती संपत्ती परत मिळावी म्हणून त्याच राणी बरोबर तो झगडला.

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 7:14 am | mugdhagode

भेट दिलेली वस्तू परत कशी मिळेल ?

महाभारत द्युतात , वनवास भोगला की राज्य परत मिळणार होते. तशी स्कीम होती का ?

बबन ताम्बे's picture

20 Apr 2016 - 10:46 am | बबन ताम्बे

तहातील खालील कलम वाचा. लबाड कोल्ह्यांनी घातलेल्या जाचक अटी आहेत त्या.
III. The gem called the Koh-i-Noor, which was taken from Shah Sooja-ool-moolk by Maharajah Runjeet Singh, shall be surrendered by the Maharajah of Lahore to the Queen of England.

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 11:46 am | mugdhagode

यात लबाडपणा काय आहे ? जिंकणारा राजा हवे ते घेणारच ना ? आणि त्या शाह सू मलिककडुन शीखांकडे कोहिनुर कसा आला म्हणे ? उडत उडत ? की तोही युद्धात जिंकला होता ?

ती इंग्लंडच्या राणीला भेट दिलेली नव्ह्ती. तो हीरा शाह कडून रणजीतसिंहांकडे कसा आला हे मी वाचले नाही.
राहीला लबाडपणा. इंग्रजांनी बहुतेक राज्ये लबाडपणेच खालसा केली आणि भारताला लुटले.

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 10:17 pm | mugdhagode

इंग्रजानी युद्ध करुन देश जिंकला असता तर तुमचे आमचे खापरपणजोबा - आम लोकच युद्धात मेले असते.

त्यापेक्षा संस्थानिकाना कायद्यात बांधुन इंग्रज जिंकले हे बरेच झाले की !

प्रमोद देर्देकर's picture

20 Apr 2016 - 11:29 am | प्रमोद देर्देकर

मा. गा. साहेब मागे एकदा लोकसत्तेमध्ये कुतुहल या सदरात त्याची माहिती आली होती. मिळाली की डकवतो.

अभिजित - १'s picture

20 Apr 2016 - 10:27 pm | अभिजित - १

५६ इंच छाती ने मारलेली अजून एक पलटी. बस ..
हाच निर्णय खान्ग्रेस ने घेतला असता तर जोरदार अस्मितेची बोंब ठोकली असती.

अर्धवटराव's picture

21 Apr 2016 - 1:02 am | अर्धवटराव

कोहिनूरच्या किमतीपेक्षा जास्त मुल्य देणारी चीज भारताकडुन वसुल करायची असेल तर साहेब आरामात कोहीनूर भारताच्या हवाली करेल. वरुन आपण किती उमद्या मनाचे आहोत याची दवंडी पिटुन घेईल. साहेबच तो...

तर्राट जोकर's picture

21 Apr 2016 - 11:05 am | तर्राट जोकर

पटले. बचके रहना रे बाबा.

श्रीनिवास टिळक's picture

21 Apr 2016 - 7:23 pm | श्रीनिवास टिळक

महाराजा रणजीत सिंग यांनी आपल्या मृत्युपत्रात कोहिनूर हिरा पुरीच्या जगन्नाथ मंदिराला अर्पण करावा असं लिहिल्याचं जालावर वाचलं आहे (अवांतर: गुरु नानक पुरीला १५०६ मध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी एक आरती लिहिली. रवींद्र नाथ टागोरनी तिचे वर्णन An anthem to the world असं केलं आहे (See The Jagannath Temple and the Sikh Arti by Anil Dhir http://odisha.gov.in/e-magazine/Orissareview/2012/Feb-March/engpdf/1-6.pdf).