पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 2:01 am

आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
ad
ad

हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.

वावरप्रतिसाद

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

4 Apr 2016 - 2:10 am | खटपट्या

मुद्दा पटला !!

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 2:13 am | अमृता_जोशी

:-)

खरेतर या झैरातीत राहुल गांधी आणि नरेन्द्र मोदींचे फोटो द्यायला हवे होते

गरिब चिमणा's picture

4 Apr 2016 - 3:50 am | गरिब चिमणा

त्यात एवढं चिडायला काय झालं,साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे.पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड( अकलेने)

तुमच्या घरातील स्त्रीयांनाही तुम्ही हाच नियम लावता का ?
कीती तो काडया टाकण्याचा प्रयत्न !!

मितान's picture

4 Apr 2016 - 8:19 am | मितान

भुर्रर्र !!!!

अजया's picture

4 Apr 2016 - 9:49 am | अजया

गरीब बिचारा चिमणा साहेब, काड्या कमी पडल्या वाटतं घरट्यासाठी

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 2:04 pm | टवाळ कार्टा

ओ...कपडे घट्ट झाले की डोक्यातली अक्कल वाढते असे म्हणायचे आहे त्यांना...मस्तय ना...खानावळीचे पिच्चर बघताना उघडेबंब बसायचे...डोक्याची विचार करायची क्षमताच नाहिशी होणार...मग खानावळीच्या पिच्चर मध्ये लॉजिक नाही शोधत बस्णार =))

भुमी's picture

4 Apr 2016 - 10:08 am | भुमी

जीनटॉपवाली फक्कड(अकलेने) चिमनी?अन् घरटं कुठं केलंत?

गरिब चिमणा's picture

4 Apr 2016 - 2:46 pm | गरिब चिमणा

सहकारनगर ,पुणे इथे आमचे घरटे आहे, चिमणा चिमणी व चिमणुकले असे तीघेही राहतो..

अप्पा जोगळेकर's picture

5 Apr 2016 - 12:54 pm | अप्पा जोगळेकर

कमाल आहे. तुम्ही सहकार नगर मध्ये राहून ऊसाची शेती कशी करता ?

नूतन सावंत's picture

4 Apr 2016 - 6:15 pm | नूतन सावंत

संपादित

सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं वाटतंय.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Apr 2016 - 11:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणु म्हणु नका ओ. गरिब किंवा दरिद्री चिमण्या म्हणा. चिमणु म्हणलं की मला हाक मारल्यासारखं वाटतं

(काही मिपाकर मित्रं फोनवर चिमणु म्हणतात म्हणुन)

फुरोगामी आत्मकुन्थन कि काय म्हणतात ते हेच का ?

हेमंत लाटकर's picture

11 Apr 2016 - 11:51 am | हेमंत लाटकर

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात या मताचा मी आहे.

तुम्ही मठ्ठ धोतरवाले आहात की हुश्शार जिन्सवाले.

पहिल्या जाहिरातीमधे पण प्रॉब्लेम आहे. "सदगृहस्थाची" व्याख्या सेक्सिस्ट आहे. नेहमी बिल "सदगृहस्थाने" द्यावे असे छुपे गृहितक त्यात आहे.

रेवती's picture

4 Apr 2016 - 6:55 am | रेवती

हा हा. मी अगदी उलटा अर्थ घेतला होता. आता समजलं.

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 8:19 am | तर्राट जोकर

मुद्दा पटला. तुमचा आक्षेप योग्य आहे.

सद्गृहस्थ वाली जाहिरात तर येडपटपणाचा कळस आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. इंग्रजी भ्रष्ट रुपांतर. लॉस्ट इन ट्रान्सलेशन.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 12:01 pm | अमृता_जोशी

थांकू!

कैच्या कै जाहिरात. आज मी पण जाणारे स्टार बझारात. तिथे दिसली जाहिरात तर मी ही तक्रार करून येईन.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 11:55 am | अमृता_जोशी

धन्यवाद!

अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली...

प्यारीस,लंटन, फ्रँकफुर्ट आणि हाँगकाँगातही पारंपारीक पंजाबी सलवार कुडता घालून रस्त्यावर पोळीचटणीचा रोल खात हिंडणारी अडाणी गावंढळ मितान ;)

अजया's picture

4 Apr 2016 - 9:40 am | अजया

:)
असेच करणारी गावंढळ मितानची गावठी मैत्रीण ;)

मी पण तुमचीच गावठी सखी बरका अजया मितान :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण आपण कसे आहात हे सिद्ध करण्याची ही अहमीका कशासाठी ? कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ? (भोगा आता फळं)

-दिलीप बिरुटे

कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ?

+१

अभ्या..'s picture

4 Apr 2016 - 5:04 pm | अभ्या..

मास्तर मास्तर,
नमस्कार करतो हं.

औक्षवंत हो, अष्टपुत्र सौभाग्यवान हो!! =))

अजया's picture

4 Apr 2016 - 6:05 pm | अजया

कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ?

अगदी बरोबर.

ब़जरबट्टू's picture

4 Apr 2016 - 5:05 pm | ब़जरबट्टू

तुम्ही स्व:ता प्यारीस, जर्मनी मध्ये असे कपडे घातले म्हणून स्वत:ला गावठी म्हणता, वर कपड्यावरून लायकी काढु नये म्हणता. आय डोंट केअर हा मुद्दा असेल तर ठिक आहे, पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंश्ताजरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे.

विवेक ठाकूर's picture

4 Apr 2016 - 5:13 pm | विवेक ठाकूर

पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंशतः जरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे.

मस्त मुद्दा पकडलायं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्दा १००% बरोबर.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिमण्याला उपहासाने म्हंटलंय हेही लक्षात आलेले दिसत नाही तुमच्या!

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 9:04 am | ब़जरबट्टू

चिमण्याने पंजाबी सुट घालणा-यांना स्मार्ट म्हंट्लय..भारतात .. :) तुम्ही तोच ड्रेस विदेशात घातल्यास आपल्याला गावठी समजतिल हे पहिलेच गृहीत धरलेय. किंवा आता चिमण्यासारखेच तुम्ही विदेशात पंजाबी ड्रेस घालणा-यांना (स्वत:सकट) गावठी समजता असा अर्थ आम्ही का घेऊ नये ?

मितान's picture

4 Apr 2016 - 8:43 pm | मितान

खिक्क !
जाऊ द्या :))

नूतन सावंत's picture

4 Apr 2016 - 6:23 pm | नूतन सावंत

मीबी न्यूझीलंडमध्ये पैठणी नेसून लग्नाला मिरवनारी तुमची ताई बर्का

मुद्दा अगदी रास्त आहे. जाहिरात हटवली पाहिजे हे लक्षात आणून दिलंत ते बरं झालं.

मागे एकदा एक मोठी पोस्टर अॅड एका मॉलमधे होती.

ब्यूटी ट्रीटमेंट न घेतलेली म्हणून एक साधी केशरचनावाली विनामेकप मुलगी दाखवून तिचं वर्णन खास मराठी फॉन्टमधे "काकूबाई" असं छापलेलं आणि तिथेच बाजूला पाश्चात्य मेकअप आणि केशरचना करुन तिथे रोमन लिपीत Beautiful smart की आणि काहीतरी वर्णन.

कुठेतरी खटकलं होतं तेव्हाही.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 11:59 am | अमृता_जोशी

धन्यवाद!

वर आठवणीनुसार मोघम तपशील लिहीला होता. त्यात शब्द चुकलेत. नेमके शब्द आत्ता आठवले ते खाली देतोय.

साधी वेषभूषा आणि केशरचना असा मुलीचा फोटो. त्याचं शीर्षक : "अगंबाई" look
मेकअप आणि केशभूषावाली दुसरी मुलगी. शीर्षकः Hi-Fi look.

एकवेळ काकूबाई चालला असता (प्रौढ लुक असल्यास) पण अगंबाई हे अगदी आवर्जून हेटाळणीयुक्त लिहिणं आणि इंग्लिश लिपीतली बाकी संपूर्ण जाहिरात असताना तो एक शब्द देवनागरी फाँटात लिहिणं हे आवडलं नाही.

मराठीचा कट्टर पुरस्कर्ता किंवा अस्मिताधारक नसूनही.

नाखु's picture

4 Apr 2016 - 9:14 am | नाखु

किमान स्त्रीयांनी तरी जोरदार आक्षेप घ्यायला हवा अश्या जाहीरातींना.

किमान अश्या साठी की फक्त पुरुषांनी तक्रार केली तर हेटाळणीच जास्त केली जाते.आणि आजू बाजूच्या स्त्रीयाही तटस्थ राहिल्यास जास्त पंचाईत होते

अलिकडेच आर टी ओ त स्वतंत्र रांग स्त्रीयांसाठी आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात इतरांकडून अपमान्जनक टीपण्णी अनुभवलेला नाखु

स्मिता.'s picture

4 Apr 2016 - 9:38 am | स्मिता.

तुम्ही केलेली तक्रार अगदी योग्य आहे. पोषाखावरून पात्रता नक्कीच ठरत नाही, पण समाज मात्र ठरवत असतो. नेहमीच्या सार्वजनीक ठिकाणांवर मला स्वतःला पोषाखावरून मिळणारी वेगवेगळी वागणून अनुभवली आहे.

'सो-कॉल्ड' अडाणी बाईकरता असलेली जाहिरात इंग्रजीत कशाला बरं लावली असावी हा प्रश्न आहेच. तसेच दोन्ही जाहिराती डिस्क्रिमिनेशन दाखवणार्‍याच आहेत. त्यातून हेच दिसतं की स्त्रिला ना आर्थिक स्वातंत्र्य आहे ना शिक्षण!

बाकी उरले ते मराठीतले भाषांतर!! त्याबद्दल तर काय बोलावे? आताच एका मोठ्या रस्त्यावरच्या भल्यामोठ्या बोर्डवर एका दुचाकीची जाहिरात वाचून आलेय, 'इंडियाची नवी उम्मीद'

मराठीची मोडतोड हा एक मुद्दा आहेच. सर्वदूर मूर्खपणा सुरुच असतो. रेडिओ, व्रुत्तपत्रे वाहिन्या, सर्वत्र मराठी सक्तीने सुधारायची चळवळ उभी रहायला हवी.
लेखाचा मूळ मुद्दाही महत्वाचा आहे. आमच्याच उद्योग समूहाचे हे दुकान दिसते.त्यामुळे यावर नाराजी पोहोचवत आहे, बघूया कसा प्रतिसाद मिळतो ते..!

उपरोक्त जाहीरात छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे https://www.starbazaarindia.com ही स्टार बझारची वेबसाईट असावी. A TATA & TESCO ENTERPRISE असे वेबसाईट्च्या तळाशी लिहिले आहे, टाटाग्रूपचा हा कोड ऑफ कंडक्ट बहुधा यांना लागू पडावयास हवा. कंपनीचे नाव Trent Hypermarket Limited असावे, कस्टमर फिडबॅक दुवा (बहुधा उघडत नाही). कॉंटॅक्ट अस दुवा (अर्थात तेथील पत्ता इमेल पत्ता वरीष्ठांपर्यंत संदेश पोहचवण्यास पुरेसा असेल असे वाटत नाही). Jamshed S. Daboo हे मॅनेजींग डायरेक्टर अथवा सिईओ असावेत आणि या इन्व्हेस्टर रिलेशन पानावर कॉर्पोरेट ऑफीसचे फोनक्रमांक उपलब्ध असू शकण्याची शक्यता वाटते.

अशा तक्रारीच्या बाबतीत टाटा सारख्या मोठ्या ग्रुप मध्ये स्टोअर मॅनेजरच्या लेव्हलवरून पानही हलण्याची शक्यता कमीत कमी असेल. मोठ्या कार्पोरेट्स मध्ये तुमची तक्रार लेखी मॅनेजींग डायरेक्टरच्या नावाने असेल आणि सिईओच्या सेक्रेटरीशी तुम्ही बोलत नाही तो पर्यंत हलचालीची खूपही अपेक्षा ठेवू नये. तुम्ही जो पर्यंत अशा लेव्हल पर्यत पोहोचत नाही तो पर्यंत अशी एखादी जाहीरात पुन्हा येणार नाही हे सांगणे कठीण असावे. असो.

जाहीरातींवरील आक्षेप नोंदवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांची अधून मधून जाहीरात दिसते. त्यांच्याकडे सुद्धा तक्रार नोंदवली पाहीजे.

स्मिता.'s picture

4 Apr 2016 - 11:35 am | स्मिता.

बरेच वेळा जाहिराती ह्या गंडलेल्या असतात. त्यातला संदेश आपल्याला स्वतःच समजून घ्यावा लागतो. ज्या जाहिरातीमधे प्रतिभेसोबत समंजसपणा आणि संवेदनशीलता असते ती जाहिरात जास्त प्रभावी असते. अन्यथा अनेक उथळ जाहिराती आपण नेहमीच बघतो.

आजच एक गंडलेली जाहिरात पाहिली, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत जनजागरण करण्याच्या उत्तम विचाराचे समर्थन करणारी दैनिक भास्करची जाहिरात. त्यात दाखवलेय की एका सरकारी शाळेतून एक माणूस त्याच्या लहानश्या मुलीला ओढून घरी घेवून जात असतो तेव्हा त्या मुलीच्या वर्गातील इतर लहान मुले तिला धरून पुन्हा शाळेकडे खेचतात. त्या चिमुरडीची एकीकडून वडील आणि दुसरीकडून वर्गमित्र-मैत्रिणी अशी बराच वेळ ओढाताण झाल्यावर वडिलांना साक्षात्कार होतो आणि ते मुलीचा हात सोडतात. सगळी मुले खाली पडतात पण विजयी मुद्रेने उठत कपडे झटकतात. संदेश काहिसा असा, 'बुरी जिद के आगे अच्छी जिद जरूरी है'
या जाहिरातीत संदेश कितीही चांगला असला तरी (माझ्या) लक्षात राहिली ती त्या चिमुरडीच्या हाताला धरून केलेली ओढाताण! अश्याप्रकारे खरंच ओढलं तर एवढ्या कोवळ्या जीवाचा हात खांद्यातून नक्कीच सरकेल.

माहितगार's picture

4 Apr 2016 - 11:45 am | माहितगार

सुयोग्यतेचे निकष आणि अप्रत्यक्ष प्रबोधन म्हणून आपण करतो अशा चर्चांचे मुल्य आहे, त्याच वेळी प्रत्यक्ष जाहीरात एजन्सी आणि त्यांचे स्पॉन्सर्स पर्यंत तुमचे म्हणणे पोहोचत नाही तो पर्यंत परिवर्तनासाठी लागणारी शृंखला पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल असे माझे मत

स्मिता.'s picture

4 Apr 2016 - 11:50 am | स्मिता.

तुमचं मत अगदी बरोबर आहे. योग्य ठिकाणी तक्रार केल्याशिवाय परिणाम दिसण्याची शक्यता नाहीच!

समाधान राऊत's picture

4 Apr 2016 - 7:40 pm | समाधान राऊत

याला उत्तर आहे
अमितेश कुमार--अम्रुता जोशी यांच्या लेखावरुन असे समजते की हि घटणा औरंगाबाद मधील प्रोज़ोन mall ची आहे..
औरंगाबाद चे cp ((police commissioner))पोलिस आयुक्त अमितेश कुमार. हे अशा विषायांच्या पुर्णपणे विरोधात आहेत..खास करुन स्त्रिंयावरील अत्याचार आणि हेटाळणी((मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असेना)) त्याना फक्त ही बाब कळायला उशिर..
पण तक्रार योग्य हवी
या विषयावर त्याना लेखि पत्र किंवा तोंडी सांगितले तरी भरपुर झाले..पुढील कर्यवाही ते स्वता: करतात हे सर्व औरंगाबाद कराना माहितीच आहे

मृत्युन्जय's picture

4 Apr 2016 - 12:10 pm | मृत्युन्जय

लेख पटला.

पक्षी's picture

4 Apr 2016 - 12:19 pm | पक्षी

मुद्दा पटला... +१११११११११

केवळ वेशभूषेवर सर्व गृहीतकं न ठेवता या ठिकाणी फक्त थोडासा बदल करुन ही जाहिरात तितकी आक्षेपार्ह ठरली नसती असं वाटतं.

या जाहिरातीच्या सीरीजमधल्या सर्व फोटोंच्या बाजूला दोन काल्पनिक बायोडेटासारख्या वर्णनात्मक ओळी टाईप केलेल्या दाखवायच्या:

उदा. पहिल्या चित्रात, मिसेस अमुक तमुक, वयः ३५,शिक्षणः एम कॉम, व्यवसायः अकाउंटंट, मिशनः रीटेल थेरपी इत्यादि.
दुसर्‍या चित्रात उदा: सौ. अमुकबाई, वय तमुक,शिक्षणः पाचवी, व्यवसायः हाऊसमेड, मिशनः महिन्याचं किराणासामान यादीप्रमाणे आणणं

असं हलकंफुलकं करता आलं असतं. आक्षेपाची तीव्रता तरी कदाचित कमी झाली असती.

आणखी एक उत्सुकता.

इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा मुंडासं फेटावाला खेडेगावातला दिसणारा पुरुष दाखवला असता आणि यालाही कार्ड वापरता येतं असा उल्लेख असता तर तितकाच खटकला असता का? जस्ट क्युरिऑसिटी.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 12:55 pm | अमृता_जोशी

खटकला असता

चिगो's picture

4 Apr 2016 - 1:23 pm | चिगो

मुद्दा पटला.. आपला आक्षेपही योग्यच आहे. मात्र समाजात जवळपास नेहमीच कपड्यांवरुन लायकी (पात्रता) ठरव्ली जाते, हीदेखील सत्य आहे. म्हणूनच तर ब्रँडेड कपड्यांची दुकाने चालतात ना..

ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच आहे. फक्त काहीशी दुरित किंवा पूर्वग्रहदूषित नजर ही वस्तुस्थिती असेल तरी तिचा उपयोग जाहिरातीत अशा प्रकारे प्रमोशनसाठी करणं हे आक्षेपार्ह आहे.

उदाहरणार्थ, लंगड्या माणसाला अनेक जण हसतात, वेडंवाकडं, मंदगतीने चालण्यावरुन टर उडवतात किंवा चिडवतात हे खरं असेल, म्हणून जाहिरातीत "लंगडा भी भागता है" असं म्हणून एनर्जी ड्रिंकची जाहिरात करणं अयोग्य वाटेल. बेकायदेशीर नसलं तरी.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 1:39 pm | अमृता_जोशी

१००% सहमत

चिगो's picture

4 Apr 2016 - 2:44 pm | चिगो

तुमचं म्हणणं पटलं, गवि.. मला एवढंच म्हणायचं आहे, कि ती जाहीरात हे आजच्या समाजमनाचं प्रतिबिंब आहे.. चुकीचं आहे, but it also shows how deeply entrenched these prejudices are..

अभ्या..'s picture

4 Apr 2016 - 3:27 pm | अभ्या..

आजचं समाजमन... हम्म्म.
असो. आजच्या मिपामनाचा जरा कानोसा घेऊयात. "अडाणी स्त्री/पुरुष सुध्दा हे कार्ड वापरु शकतात" ह्या हेडलाइनला सूट होणारे काय बरे घेता येईल?
बाकी कॅशलेस वगैरे डिट्टेल दिलेतच खाली. सो.. चित्र काय अथवा कशाचे घेता येईल?

संदीप डांगे's picture

4 Apr 2016 - 3:33 pm | संदीप डांगे

अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा.

'अडाणी स्त्री/पुरुष सुद्धा हे कार्ड वापरु शकतात' असं ब्रीफ असेल म्हणजे हे कार्ड जे वापरतात ते अडाणी असतात, असू शकतात असा अर्थ निघेल. माझ्यामते मुळ ब्रीफ असं नसावं.

एजंसीला मिळालेलं ब्रीफ असे असेल की 'हे कार्ड वापरायला खूप सोपे आहे. फार डोकं लावायची गरज नाही. इझी टू युज, नथिंग कॉम्प्लीकेटेड.' एजंसीतल्या अतिशाहाण्यांनी त्याचं 'अडाणी' हे इंटरप्रीटेशन करुन आपले पुर्वग्रह दाखवून दिलेत.

येप्प. इझी टू यूज हाच यूएसपी.
थ्यांक्स संदीपभौ.

आणि शॉपिंगबाबत म्हणाल तर कोणतंही कार्ड इतरांपेक्षा वापरायला जास्त "सोपं" किंवा जास्त "अवघड" असू शकणं हीच मोठी निरर्थक कल्पना आहे. ते एक असोच.

उगा काहितरीच's picture

4 Apr 2016 - 6:06 pm | उगा काहितरीच

ग्लॕड टु सी यु संदीपभाऊ !

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 6:15 pm | बोका-ए-आझम

बाकी जाऊ दे. तुम्ही प्रतिसाद देण्यासाठी तरी का होईना, परत आलात हे छान झालं!

तुषार काळभोर's picture

5 Apr 2016 - 12:33 pm | तुषार काळभोर

संदीपभौ, येत राहा हो अधून मधून..

आदूबाळ's picture

4 Apr 2016 - 2:38 pm | आदूबाळ

a

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>मात्र समाजात जवळपास नेहमीच कपड्यांवरुन लायकी (पात्रता) ठरव्ली जाते, हीदेखील सत्य आहे.

अगदी बरोबर. कपडे हे तुमचं व्यक्तिमत्व अधोरेखित करतं. बऱ्याचदा तसं नसतं पण त्याचा प्रभाव पडतो आणि संबधित माणूस कसा असावा याचा एक मनातल्या मनात आडाखा बांधल्या जातो.

एखाद्या स्वागत कक्षात साधी साडी घालून चेहरा न रंगवता अगदी सहज गावाकडील स्त्री जशी साधारण दिसते आणि असते अशा स्त्रीचा अभ्यंगतावर फारसा प्रभाव पडणार नाही, पण तिथेच टाय कोट शॉर्ट अशी असलेल्या स्त्रीला खूप फाफट पसारा न लावता थोडक्यात आणि शिस्तीत काही विचारायचं असल्यास माणूस विचारतो. हा प्रभाव पोशाखाचा आहे.

माझ्याच महाविद्यालयातला एक प्राध्यापक व्यक्तिमत्व इतकं जबरा आहे की विचारू नका. कपडे ही भारी असतात. एखाद्या शासकीय कार्यालयात गेलो की प्रतिसाद खूप चांगला मिळतो. फक्त तो बोलला की बिघडल काम. आम्ही न होणा-या कामासाठी त्याला घेऊन जातो अट ठेवतो प्लिज बोलू नको.

सारांश पोशाखावरून माणूस ओळखण्यास बरीच मदत होते, प्रभावही पडतो ही गोष्ट सत्य आहेआणि नाकारता येत नाही. पण प्रत्येक वेळी पोशाखाबरोबर व्यक्तित्वही तसंच असेल असं समजण्याचं काही कारण नाही.

अवांतर : न पटलेल्या प्रतिसादा वरून कोणा सदस्याचा बायकोच्या उल्लेख करणं हे निषेधार्य आहे. बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2016 - 2:08 pm | पिलीयन रायडर

लेख आवडला. आशयाशी सहमत!

लेख पटला!! विशेष म्हणजे, वरच्या काही प्रतिक्रियांप्रमाणे तुम्ही पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या प्रयत्नात निव्वळ आंतरजालावर हळहळ व्यक्त न करता, प्रत्यक्ष काहीतरी केलंत.

गरिब चिमणा's picture

4 Apr 2016 - 2:43 pm | गरिब चिमणा

मिपाची आजकाल सवयच झाली आहे वैयक्तीक बोलायची,माझी बायको काय पेहराव करते यावर इथली मंडळी घसरली हे पाहून आश्चर्य वाटले नाही.माझी बायको बायोकेमिस्ट आहे,तीचा पेहराव हा जीन्स टॉप असतो नेहमी ,लग्नाआधीही तसाच पेहराव होता.
साडीचा अपमान करायचा नाही पण ते लांब पातळ कापड अंगाला गुंडाळने मला मध्ययुगीन व बुरसटलेल्या विचारांचे वाटते ,तसच धोतर व बंडी घालणारे पुरुष ही त्याच कॅटॅगरीतले.
साडी हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण आहे,आदिम मानसिकतेतून हिंदूंनि लादलेली गुलामगिरी ,बर्याच बायका साडीचे समर्थन करताना दिसतात इथे याचा अर्थ आपल्याला बुद्धी व स्वातंत्र्य नकोच हेच त्यांनी मान्य केलेले दिसते.
( जीन्स टॉप घालणार्या टवकीचा टवका नवरोबा अर्थात गरिब चिमणा).

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 2:58 pm | टवाळ कार्टा

मिपाची आजकाल सवयच झाली आहे वैयक्तीक बोलायची,माझी बायको काय पेहराव करते यावर इथली मंडळी घसरली हे पाहून आश्चर्य वाटले नाही.

असे व्हायला नको होते...याबाबत माझा तुम्हाला पाठिंबा...मिपाकर दूदूदू आहेत

आदिम मानसिकतेतून हिंदूंनि लादलेली गुलामगिरी<<<<<<<<<
मी गप्प राहणार!!!!

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:00 am | माहितगार

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने)

@ गरीब चिमणा, आपला एका धाग्यावरील एक प्रतिसाद आपले चिडणे दर्शवतो. अन्यायाप्रती संवेदनशीलता हा सहज मनुष्य स्वभाव आहे आणि 'संयम बाळगा पण सहन करु नका' अशा अर्थाची एक इंग्रजी भाषेतील म्हण आहे.

आपल्याच त्या जुन्या प्रतिसादातील काही शब्दात फेरफार करुनही या धागा विषयात अभिप्रेत खुपणे काय असते आणि तीच खुपसणी आपण अट्टाहासाने कशी पुढे दामटता आहात हे दाखवून देऊ शकतो पण तुर्तास असू देतो कारण आपले वरील वाक्यही काही शब्दांचा फेरफार उदाहरण म्हणून केला तर पुरेसे ठरावे.

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने)

याच वाक्यात या एवजी त्या कपड्यांच्या नावांची अदला बदल केली तर सहज होऊ शकेल पण त्यामुळे या किंवा त्या गटातील स्त्रिया दुखावल्या जाउ शकतात, मुलतः माणसाच्या अंगावरच्या कपड्यांचा त्याच्या बुद्धीमत्तेशी संबंधच काय ? आपण मांडत असलेला संबंध सरळ सरळ एक तर्कदोष आहे किंवा कसे ?

आपल्या वाक्यातून होणारा हल्ला व्यक्तिगत नसला तरी सरसकटीकरण करणारा आहे - (सरसकटीकरणाच्या खास वैशिष्ट्यासाठी आपण मिपावर ओळखले जाऊ इच्छिता किंवा कसे हा वेगळ्या अभ्यासाचा मुद्दा ठरावा)-पण मुख्य म्हणजे आपल्या वाक्यातील तर्कदोष व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाच्या जवळ असणाराच आहे किंवा कसे ते खाली वाचून तुम्हीच ठरवा.

सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.

एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३]
उदाहरणे

" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने)

हे वाक्य मी जरासे बदलून टाकतो

त्यात एवढं चिडायला काय झालं, अबकड वैशिष्ट्याचे पुरुष जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. कखगघवाला जरा आणखी स्मार्ट व हळक्षज्ञवाला एकदम फक्कड (अकलेने)

इथे अबकड-कखगघ-हळक्षज्ञ या शब्दांच्या एवजी अनेक पद्धतीचे शब्द वापरता येतात दुसर्‍यांना सांस्कृतीक कारणावरुन कमी लेखू इच्छित मंडळी हेच करत असतात, असे करणारी मंडळी कधी रेसीस्ट असतात, कधी जातीयवादी असतात, कधी धर्मांध असतात, कधी सांस्कृतीक कारणावरुन द्वेष-विषमता जोपासणारी असतात; अजुन जर लक्षात आले नसेल तर आपल्या खरडफळ्यावर संपादक मंडळाच्या अनुमतीने अबकड-कखगघ-हळक्षज्ञ शब्दांमध्ये बदल करुन उदाहरणांचा गठ्ठा टाकतो, हवे अवश्य कळवावे.

आपली पूर्ण अर्ग्युमेंट सांस्कृतीक कारणावरुन द्वेषमुलक स्वरुपाची ठरते किंवा कसे हे आपले वाक्य रिव्हिजीट करुन पहावे.

...साडीचा अपमान करायचा नाही पण ते लांब पातळ कापड अंगाला गुंडाळने मला मध्ययुगीन व बुरसटलेल्या विचारांचे वाटते ,तसच धोतर व बंडी घालणारे पुरुष ही त्याच कॅटॅगरीतले.
साडी हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण आहे,आदिम मानसिकतेतून हिंदूंनि लादलेली गुलामगिरी ,बर्याच बायका साडीचे समर्थन करताना दिसतात इथे याचा अर्थ आपल्याला बुद्धी व स्वातंत्र्य नकोच हेच त्यांनी मान्य केलेले दिसते.

१) आपण सरळ सरळ अपमान करताय आणि मग अपमान करायचा नाही म्हणून सारवा सारव करताय काय ते एक नक्की ठरवावे.

२) आपण संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करत आहात किंवा कसे. धार्मीक विश्वासांचे लोक संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करत असतील तर त्यांची गल्लत उघडपाडली पाहीजे उलटपक्षी तुम्ही स्वतःच संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करताना दिसत आहात. पोषाख ही सांस्कृतीक गोष्ट आहे त्याचा धर्माशी अर्थाअर्थी संबंधच काय ?

३) (पुरोगामी लोकांनी पुढील वाक्यासाठी मला माफ करावे-नाईलाजाने लिहितो आहे) माणसाच्या विचारांचे पुरोगामीत्व अथवा बुरसटलेपण कपड्यांच्या लांबीवरुन ठरते यात काय पॉईंट आहे, या निष्कर्षाने सर्व पुरोगामी लोकांच्या सभा अंडरवेअर आणि बिकीनी घालून व्हावयास हव्यात.

४) नऊवारी आण धोतर असो वा गोलसाडीचे विवीध प्रकार असोत तेही अत्यंत सुंदर आणि रुबाबदार दिसू शकतातच. आणि पाश्चात्य पोषाख गबाळे दिसत असल्याची छायाचित्रे हवी असतील तर देतो. इतपत गबाळी देतो की तुम्ही सुद्धा गबाळी असल्याचे अ‍ॅग्री कराल त्या शिवाय मागच्या वर्षातील सर्वात गबाळा पोषाख केलेली व्यक्ती अशी नॉमीनेशन्स पाश्चात्य पोषाख करणार्‍यांचीही होतात. आपण शोधता का इतरांना शोधून देऊ देत ?

५) बुरखा आणि बुरखा समकक्ष डोक्यावरुन पदराचा आग्रह एवढ्या आणि एवढ्याच मर्यादे पर्यंत स्त्रीच्या गुलामगिरीचा पोषाखाशी संबंध येतो. कंपेअर्ड टू बुरखा नऊवारी आणि गोलसाडी खूप अधिक स्वातंत्र्य देत असत, कारनी लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना नैसर्गीक विधी करण्याची वेळ आली आणि आसपास सार्वजनिक शौचालय नसेल तर आमेरीकत पंचाईत होते- अलिकडे जे एन यु - कन्हैय्याची स्टोरी ऐकली असेल यावर अधिक भाष्य हवे असेल तर सांगा आपल्या खरडफळ्यावर करतो- आपल्याकडील नऊवारी आणि धोतर हा पोषाख अगदी घोड्यावर बसणे त्या शिवाय स्त्रीयांना पळण्याची वेळ येवो का घोड्यावर बसण्याची वेळ येवो नऊवारी हा त्या काळासाठी अत्यंत चांगला पोषाख होता. साडी असो का पंजाबी भारतीय पोषाख प्रकारात बुरखा न घालता ओढणी अथवा पदर कुणासमोर केव्हा, किती, कसे घ्यायचे ह्याचे बर्‍यापैकी स्वातंत्र्य असावे. त्यामुळे बुरख्यापेक्षा साडी हि नेहमीच आधूनिक आणि तरीही सुरक्षीत होती.

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:10 am | माहितगार

@ गरीब चिमणा जिन्स आणि टि शर्ट घालणार्‍या पाश्चात्य देशातील काही -आधुनिक विचारांच्या सुद्धा - स्त्रीया शरीराच्या काही अवयवांचे आकार कमी व्हावेत म्हणून सुद्धा शल्यचिकित्सा करतात कारण त्यांना त्यांच्या कपड्यातून होणारे अवयवांचे प्रदर्शन खुपते -पहाणार्‍यांना खुपत नसले तरीही- संदर्भ शोधून घेता का इतरांना मदत करु देत- त्या मानाने भारतीय स्त्री पोषाख स्त्रीला अधिक स्वातंत्र्य देतो. याचा अर्थ उलटाही नाही की मी जिन्स अथवा स्कर्टला चुकिचे मानतो केवळ एकाला चांगले म्हणून दुसर्‍याला वाईट ठरवणे अप्रशस्त आहे याकडे आपले लक्ष वेधावयाचे आहे असो.

माहितगार's picture

4 Apr 2016 - 2:43 pm | माहितगार

आमरीकेतील एका प्रसिद्ध विद्यापिठाच्या स्थापने मागे पोशाखावरुन केलेल्या अवमानाचा का कायसा संबंध असल्याचा किस्सा मागे केव्हातरी वाचल्याचे अंधूकसे आठवते.

हो स्टनफोर्ड बद्दल वाचला होता असा किस्सा. खर खोट माहीत नाही. ह्यांच्या (https://www.truthorfiction.com/stanford/) मते ती अफवा होती.

jo_s's picture

4 Apr 2016 - 3:30 pm | jo_s

मुद्दा पटला. तुमचा आक्षेप योग्य आहे.

इशा१२३'s picture

4 Apr 2016 - 4:09 pm | इशा१२३

लेख पटला.

ब़जरबट्टू's picture

4 Apr 2016 - 4:56 pm | ब़जरबट्टू

लेख पटला असे म्हणणार नाही. पण लेखिकेची तळमळ चुकीचे नाही. मला वाटते समाजात जवळ्पास पोशाखावरूनच पात्रता ठरवली जाते. कल्पना करा, जर मी इन्फी मध्ये इण्ट्रव्हुला उन्हाळ्यात बरा पडतो म्हणून पायघोळ चोळणा व सुती शर्ट किवां गुंठामंत्री स्टाऎल पांढरा शर्ट व पायजामा घालुन गेलो, तरी फक्त बुद्धीमत्तेवरुन मला घेतील ? का शेवटी याला ड्रेसिंग सेन्स नाही असेच म्हणतील ? जवळ जवळ समाजात तुम्ही काय घातलेय यावरूनच तुमची पात्रता ठरवली जाते. भर उन्हाळ्यात सुट घालून व आतुन चिंब घामाजलेल्या नवरदेवाला बघुन पण मला हाच इच्चार येतो. फर्क तो पडता ही भैय्या.. :)
इथे मला तरी ते प्रातिनिधिक उदाहरण वाटले, पोशाखावरून मला तरी दुस-या चित्रातील स्त्री खानदानी, थोडा आधुनिकतेचा गंध नसलेली वाटली. अश्या स्त्रिया या आधुनिक पध्दतीला दचकणारच.. त्यात शिक्षणापेक्षा किंव्हा पात्रतेपेक्षा ते कार्ड वापरायला त्यांचे बिचकणे अधोरेखित केलेय असे मला वाटते..

मुलाखत आणि लग्न दोन्ही स्पेशल गोष्टी आहेत. त्यांचा वेगळा प्रोटोकॉल/ड्रेस कोड असतो.

पण अडाणीपणाचा ड्रेस कोड साडी का असावा, हा इथे प्रश्न आहे.

कपिलमुनी's picture

5 Apr 2016 - 1:41 am | कपिलमुनी

या फोटोमध्ये असलेल्या काकूंबद्दल तुम्ही असच मत बनवाल.

SudhaMurthy

Sudha Murthy completed a BE in Electrical Engineering from the B.V.B. College of Engineering & Technology, standing first in her class and receiving a gold medal from the Chief Minister of Karnataka. Murthy completed M.E. in Computer Science from the Indian Institute of Science, standing first in her class and receiving a gold medal from the Indian Institute of Engineers.[11] Murthy became the first female engineer hired at India's largest auto manufacturer TATA Engineering and Locomotive Company (TELCO). Murthy joined the company as a Development Engineer in Pune and then worked in Mumbai & Jamshedpur as well

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 8:50 am | ब़जरबट्टू

दादा, तुम्ही हा फ़ोटो सुधा मूर्ती माहित नसलेल्या १० लोकांना दाखवा, मला नाही वाटत फक्त त्यांच्या पोशाखाकडे पाहून कुणी त्या ख-या कोण आहे हे ओळखु शकेल..मला तरी वाटते, त्यांना मस्त मध्यमवर्गीय आजीच म्हणतिल ते आणि इथेच मुद्दा बरोबर ठरेल. इथे सुधाजींचा साधेपणा आहे, आणी तो त्यांचा मोठेपणा आहे. . हे उदाहरण प्रातिनिधिक नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधा मूर्ती माहित नसलेल्या १० लोकांना दाखवा, मला नाही वाटत फक्त त्यांच्या पोशाखाकडे पाहून कुणी त्या ख-या कोण आहे हे ओळखु शकेल..

माहितगार's picture

5 Apr 2016 - 11:53 am | माहितगार

मला वाटते समाजात जवळ्पास पोशाखावरूनच पात्रता ठरवली जाते. कल्पना करा, जर मी इन्फी मध्ये इण्ट्रव्हुला उन्हाळ्यात बरा पडतो म्हणून पायघोळ चोळणा व सुती शर्ट किवां गुंठामंत्री स्टाऎल पांढरा शर्ट व पायजामा घालुन गेलो, तरी फक्त बुद्धीमत्तेवरुन मला घेतील ?

ड्रेसींग सेन्स, शिस्तीची गरज म्हणुन असलेले युनिफॉर्म, कस्टमरशी श्रोताभिमुखता म्हणून अथवा व्यवसायाची गरज म्हणुन असलेले युनिफॉर्म आणि पात्रता यांची गल्लत केली जाऊ शकत नाही. अलिकडेच मर्चंट नेव्ही बद्द्लची लेख मालीका झाली मर्चंट नेव्ही मधला चीफ इंजीअर इतर कामगारांप्रमाणेच कळकट्ट पोषाखात दिसला म्हणून त्याची पात्रता ठरु शकत नाही. बर्‍याच कंपन्यांमध्ये कामगार ते मॅनेजींग डायरेक्टर एकसारखा युनिफॉर्म असतो तेथे कामगारासारखाच पोषाख आहे म्हणून मॅनेजींग डायरेक्टरची पात्रता कमी होत नाही.

इंटरव्ह्यु मध्ये बायोडाटाव्र कॉन्व्हेंटचे नाव पाहून कँडीडेटची इंग्रजी न तपासता मी एका कँडीडेट ला घेतले आणि फसलो, म्हणजे इंटरव्हयु घेणार्‍याने उलटपक्षी -जिथे कस्टमर रिलेशन चा संबंध येतो अथवा किमान स्वरुपाचा पोषाख करणे म्हणजे अगदीच अंडरवेअरवर येत नाही आहे हे पहाणे ठिक- पेहरावावरुन पात्रता ठरवण्याच्या भानगडीत ऑदरवाईज इंटरव्ह्यू घेणार्‍याने पडू नये. त्याच्या पेहरावावरुन आपण अत्यंत एबल कँडीडेट नाकारत असू शकतो. खासकरुन काही क्षमता या उच्चकोटीच्या असू शकतात एखादी व्यक्ती चांगली तंत्रज्ञ/संशोधक/ऑडीटर असू शकते पण पोषाख अजागळ अथवा बावळटासारखा करेल पण त्यावरुन व्यक्तीची पात्रता ठरत नाही. थोरले बाजीराव पेशवे उत्कृष्ट योद्धा होते हे ते धोतर घालत म्हणून त्यांची पात्रता कमी होत नाही, शिवाजी महाराजांचा पोषाख आजच्या काळासारखा नाही पण त्यांच्या अनेक गोष्टी आजही आदर्श आहेत. नानासाहेब फडणवीसांकडे अथवा चाणक्या कडे वेगवेगळ्या बुद्धीमत्ता होत्या ज्यांचा त्यांच्या पोषाखाशी काहीही संबंध नव्हता. केवळ लंगोटी धारण करणारे समर्थ रामदास दासबोध ग्रंथ लिहून गेले, महात्मा गांधी पंचा घालत. पोषाखावरुन पात्रता ठरवण्याचा आधुनिक कालीन कॉर्पोरेट प्रयत्न हा कास्ट एवजी क्लास सिस्टीमच्या स्वरुपात विषमतेचे अप्रत्यक्ष समर्थन करु इच्छित तर नाही ना अशी अशी शंका न राहणे अधिक सयुक्तीक नसेल किंवा कसे.

तर्राट जोकर's picture

5 Apr 2016 - 12:38 pm | तर्राट जोकर

माहितगारजी, आपण इथे आदर्शवादाबद्दल बोलत आहात असे वाटते. शिवाजी महाराज, चाणक्य, फडणवीस त्या त्या काळाप्रमाणे त्यांच्या दर्जाप्रमाणे पोशाख करत असतील ना? त्यांच्या पोशाखाचा आजच्या संस्कृतीशी संबंध कुणी करनार नाही. रामदासांप्रमाणे वेष धारण करणार्‍या हजारो सन्याशांना आजही भारतात त्यांच्या पात्रतेविषयी कोनतीच शंका व्यक्त न करता मान मिळतो. पोशाखावरुन पात्रता ठरवणे ही सार्वत्रिक प्रवृत्ती आहे, तिला स्थळ, काळ, कॉर्पोरेट की झोपडपट्टी अशा संदर्भाने बघणे योग्य वाटत नाही.

पोशाखावरुन पात्रता ठरवू नये असे लहानपणापासून आपण ऐकत आलोय. होतंय कायम त्याच्या उलट. जे आहे ते आहे.

प्रस्तुत पोस्टर्स कडे बघितले तर तो समाजमनाचा आरसा आहे. जाहिरात बनवनारे व बघनारे एकाच विचाराचे आहेत. इथे काहींनी जाहिरातीबद्दल आक्षेप घेतले त्यात मीही आहेच. पण थोडा विचार केल्यावर असे लक्षात आले की प्रत्यक्ष जीवनात आपण वेगळे काय करत असतो. रंग, भूषा, भाषा, शरीररचना, तोंडावळा ह्यावरुन आपण नैसर्गिकरित्या तरी एक ढोबळ मत बनवतोच बनवतो. अर्थात स्पष्टीकरण झाले की आपले गैरसमज दुर होतात. टाइपकास्ट, प्रतिमा-साचा आपल्या मनात असतोच. खाली जे पैसाताईंनी इस्रोच्या महिलांचे फोटो दिलेत. खोटं नाही सांगत पण जेव्हा केव्हा पहिल्यांदा ते फोटो बघितले होते तेव्हा थोडे खटकले होतेच. ते खटकणे नैसर्गिकपणे येते, नंतर आपण त्यावर तर्क लावून निर्णय घेऊन भूमिका बदलतो.

आता प्रश्न आहे की अशा परिस्थितीत अमृता यांनी घेतलेली भूमिका चुकीची की बरोबर. तर माझ्यामते ती बरोबरच आहे. कारण आपण आदर्शवाद हाच आपला आदर्श ठेवला पाहिजे. माध्यमांचा जनमानसावर प्रभाव असतोच, त्यात जे दिसतं तेच खरं व योग्य असं मानलं जातं. वरच्या पोस्टरांमधले चित्र व भावना खर्‍या वा योग्य नाहीत, त्यांचा तसाच प्रसार होऊ देत राहणे आदर्श सामाजिक परिस्थितीसाठी योग्य नाही. कोणत्याही स्त्री-पुरुषाचे पोशाखावरुन प्रतिमा बनवू नये हे जे नेहमी सांगितले जाते तेच आपल्या वागणूकीत जास्तीत जास्त आणत राहणे हे सुजाण नागरिक म्हनून, माणुसकी म्हणून आवश्यक आहे असे वाटते.

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 1:48 pm | ब़जरबट्टू

मग असे म्हणुया का, का समाज शेवटी तुमच्या पेहारावावरूनच तुमचा कालखंड, पात्रता, तुमची टेकसेव्ही कुवत ओळखतो. मी दिलेले इन्फी मुलाखातचे उदाहरण चुकीचे कसे ? शेवटी तुम्ही कपडे बघूनच सगळे ठरवताय ना ? शर्ट-सुट - चालतो, मग पांढरा स्वच्छ पायजामा का नाही ? भारतासारख्या उष्ण प्रदेशात, उसगावासारखे जोडे घालायचे काय कारण ? किती तरी लोक माझ्या पाहण्यात आहे, जे शेवटी टेबलाखाली जोडे काढून ठेवतात, पायाला घाम यांच्या येतो, आणि नाकाला सगळ्यांच्या.. :) पण शेवटी आपणच तो पोशाख ठरवलाय. चपला घालुन आलो तर मी गावंढळ ठरतो ...

माहितगार's picture

5 Apr 2016 - 2:28 pm | माहितगार

मग पांढरा स्वच्छ पायजामा का नाही ?

इतरांचे माहित नाही, मला व्यक्तिशः चालतो, पोषाखावरुन मी इतरांची संधी नाकारतो असा जेव्हा विचार करतो तेव्हा मी नाण्याची एकच बाजू बघत असतो, मी समान संधी न देताच व्यक्ति पोषाखावरुन नाकारली आणि व्यक्ती उत्तम असेल तर मी माझ्या आस्थापनेलाही एक चांगला माणूस मिळण्यापासून दूर ठेवले आहे. नाही म्हणताना आपण समोरच्याच व्यक्तिला नाही स्वतःलाही नाही म्हणत असतो. नाही म्हणून मी स्वतःची संधी दवडण्यापुर्वी दोनदा विचार करेन.

अनावश्यक गोष्टीवरुन भेदाभेद करण्याची स्विकारण्याची सवय झाली की त्याला अंत नाही, मी भाषा,प्रांत,धर्म,जात,वर्ण,सुरुपता असे अनेक अनावश्यक क्रायटेरीआ लावू शकतो. सगळीकडे मानसिकता एकसारखी आहे. या संकुचित मानसिकताम्च्या वर मी स्वतःस नेऊ शकतो का हे माझ्या स्वतःसाठी आव्हान आहे.

लेखिकेनं दोन्ही जोडल्यामुळे अनर्थ झाला आहे.

पहिलीचा अर्थ, पतीनं पैसे भरलेले असले की पत्नीला खरेदी सोपी आहे. त्याचा मॉडेलच्या ड्रेसशी संबंध नाही (आणि ती जाहिरात मराठीत आहे!)

आणि दुसरीचा अर्थ (जी इंग्रजीमधे आहे!) कमीतकमी शिकलेली स्त्री सुद्धा ते वापरु शकते. So easy even she can use it' . कमीत कमी शिकलेली जाहिरातीत कशी दाखवणार ? म्हणून त्यांनी कामवाल्याबाई सदृष स्त्री दाखवली आहे. याचा अर्थ `साडी नेसणारी अडाणी असते' असा कदापी होत नाही.

`साडी नेसणारी अडाणी असते' हा लेखिकेच्या मनातला अर्थ आहे. आणि तो तिथल्या मॅनेजरनं (दुर्दैवानं ) लेखिकेला हवा तसाच काढला आहे.

थोडक्यात, लेखिकेनं (किंवा मॅनेजरनं) साध्या अर्थाचा विपर्यास केला आहे. इतक्या साध्याश्या गोष्टीसाठी `साडी अस्मिता' जागृत होणं म्हणजे फारच झालं !

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 5:33 pm | अमृता_जोशी

एकंदरीत काय तर हा असा पोशाख फक्त कामवाल्या (शहरात) बायाच करतात असे म्हणणे आहे तुमचे.
ती बाई कमीत कमी शिकलेली आहे हे दाखवण्याचा एकमेव मार्ग तिला पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का?

कमीत कमी शिकलेली आहे हे दाखवण्याचा एकमेव मार्ग तिला पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का?

हाच तर प्रॉब्लेम आहे ना!! आणि आपलेच लोक ते सहज स्वीकारतात. मध्यंतरी 'बा बहू और बेबी' नामक मालिकेत काही समारंभाखातर नऊवारी नेसलेल्या बाईचा उल्लेख, "वो देखो हमारी कामवाली जैसी साडी पहनी है" असा केला होता. आता नऊवारी नेसणार्‍या आज्या पणज्या मोलकरणी होत्या का?

आणि `साडी नेसलेली म्हणजे अडाणी' हा तुमच्या मनातला अर्थ नाही का ? तुम्ही डायरेक्ट `पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय'? इतकं भारी टायटल का दिलंय ?

तसंच बघायचं झालं तर पहिल्या जाहिरातीबद्दल एखाद्या कमावत्या स्त्रीचा आर्थिक स्वाभिमान दुखावू शकतो !

थोडक्यात, इतकं सिरियस व्हायचं कारण नाही .