पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 2:01 am

आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
ad
ad

हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.

वावरप्रतिसाद

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2016 - 6:08 pm | पिलीयन रायडर

काका.. मनातला अर्थ कुठुन आला? तिथे लिहीलय ना की "even she can use it". ह्याचा सरळ अर्थ हिला पण येतंय पहा.. असा होत नाही का? शिवाय त्यांनी विचारलं की तिथल्या मॅनेजरला की बाबा असं का? तर त्याच्याही तोंडचं वाक्य हेच आहे की त्या मॉडेलचे कपडे वगैरे वरुन ती अडाणी आहे असं वाटतय..

विवेक ठाकूर's picture

4 Apr 2016 - 6:44 pm | विवेक ठाकूर

याचा अर्थ कमीतकमी शिकलेली सुद्धा ते कार्ड वापरू शकते इतकाच मर्यादित आहे . पण लेखिकेनं साडी नेसलेली म्हणजे अडाणी असा उलट अर्थ काढलायं, तो मनाचा आहे . शिवाय अशी कमेंट पंजाबी ड्रेसवालीला का नाही ? असा अनाठायी मुद्दा काढलायं ते वाचलं का ? तद्वत लेखाचं शीर्षक पुरेसं बोलकं आहेच .

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 6:47 pm | अमृता_जोशी

याचा अर्थ कमीतकमी शिकलेली सुद्धा ते कार्ड वापरू शकते इतकाच मर्यादित आहे. पण लेखिकेनं साडी नेसलेली म्हणजे अडाणी असा उलट अर्थ काढलायं, तो मनाचा आहे . शिवाय अशी कमेंट पंजाबी ड्रेसवालीला का नाही ? असा अनाठायी मुद्दा काढलायं ते वाचलं का ?

पण प्रश्न तसाच आहे; ती "कमीतकमी" शिकलेली आहे, हे कश्यावरून?

विवेक ठाकूर's picture

4 Apr 2016 - 9:54 pm | विवेक ठाकूर

ती "कमीतकमी" शिकलेली आहे, हे कश्यावरून?

So easy even she can use it असं जाहिरातीतच म्हटलंय.

तुम्ही पारंपारिक वेशातली स्त्री अडाणी असते असा सरसकट अर्थ काढल्यानं तुम्हाला त्रास होतोयं.

सरळ विचार करुन पाहा : `कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे.

तुम्ही त्याही पुढे जाऊन मॅनेजरला म्हटलंय :

So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."

याचा अर्थ तुम्हाला So easy विषयी काहीही देणंघेणं नाही. तुमचा फोकस मॉडेलनं काय कपडे घातलेत यावर आहे. आणि तुम्हाला वाटतंय की साडी नेसलेली अडाणी तर पंजाबी ड्रेसवाली हुशार कशी ?

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 9:07 am | ब़जरबट्टू

`कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे. \
जे ब्बात !

इरसाल's picture

5 Apr 2016 - 11:13 am | इरसाल

असं बघा पुर्वीच्या मराठी पिच्चरामधे, हीरोला आधी गावंढळ म्हणुन लेंगा सदरा किंवा साधा वरुन घालायच्या शर्टात दाखवायचे मग तो हीरो शहरात (मुंबै) जावुन टी-शर्ट आणी बेल्बॉट्म घातली की शहरी किंवा इस्मार्ट वगैरे वगैरे.

असपण महाराष्ट्रीयतेरांची मान-सिक-ता बदलणे सोपे नाही.

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 6:56 pm | बोका-ए-आझम

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का? जर सगळे व्यवसाय महत्वाचे आहेत असं आपण म्हणत असू तर एखाद्या बाईचा पेहराव कामवाल्या बाईसारखा दाखवलाय असं पाहिल्यावर राग का यायला पाहिजे? इतर व्यवसायांप्रमाणे तोही एक व्यवसाय आहे. शहरांमध्ये तर अत्यंत आवश्यक व्यवसाय म्हणायला हरकत नाही.

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 7:00 pm | तर्राट जोकर

इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप आहे. तिचा पेहराव आणि ते वाक्य दोहोंचा मिळून अर्थ काय ह्यावर आक्षेप आहे.

पण फक्त वाक्याला. पेहरावाला नाही. Even she can use it चा माझ्या मते अर्थ - स्त्रिया सुद्धा वापरु शकतात असा आहे. म्हणजे स्त्रिया by default tech challenged असतात असं गृहीत धरलेलं आहे. माझा आक्षेप त्याला आहे.

स्रुजा's picture

4 Apr 2016 - 7:40 pm | स्रुजा

हा ही मुद्दा चांगला आहे. त्यांचं डेमोग्राफिक्स हे स्टिरिओटाईप्स वर आधारीत आहे. टेक सॅव्ही नसलेल्या ग्रुप ला पण सोपं असं दाखवायचं असेल तर आजी आजोबा वगैरे गृप पण चालू शकतो.

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 10:45 pm | तर्राट जोकर

ओके.

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?

अजिबात नाही, पण ती नेहमी मराठीच असली पाहिजे का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.

हे तुम्हाला मान्य आहे तर मग ती नेहमी मराठीच असली पाहिजे का हा प्रश्नच उद्भवत नाही. आणि समजा कोणी तशा हेतूने दाखवत असेल तर त्यावर react होऊन अशा लोकांना जास्त महत्व देण्यात काय अर्थ आहे?

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 7:06 pm | अमृता_जोशी

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?

हो..

जर सगळे व्यवसाय महत्वाचे आहेत असं आपण म्हणत असू तर एखाद्या बाईचा पेहराव कामवाल्या बाईसारखा दाखवलाय असं पाहिल्यावर राग का यायला पाहिजे?

सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 7:34 pm | बोका-ए-आझम

सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..

काय फरक आहे? देशाला दोन्हीची गरज आहे. तुम्ही मिळणाऱ्या पगारावरून म्हणत असाल तर पंतप्रधान काही देशातले highest paid person नाहीत. मग दर्जा कमी असं जे तुम्ही म्हणत असाल तर ते कशावरून? कामाचा दर्जा ठरवण्याचे तुमचे निकष काय आहेत?

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 7:46 pm | अमृता_जोशी

त्या कामातून मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा हीच त्या कामाचा दर्जा ठरवते.
(अर्थात; मोलकरणीला जर पंतप्रधान इतकी प्रतिष्ठा मिळाली तर माझे मतपरिवर्तन होईल.)

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 8:23 pm | बोका-ए-आझम

ही आर्थिक प्राप्तीशी थोड्याफार प्रमाणात निगडीत असतेच आणि त्यात मागणी आणि पुरवठ्याचं गणितही येतं. जेव्हा घरकाम करणाऱ्यांची संख्या ही त्याला असलेल्या मागणीपेक्षा कमी होईल तेव्हा त्याला तुम्ही म्हणताय तशी सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. याचा अर्थ सामाजिक प्रतिष्ठा ही सापेक्ष आहे. म्हणजेच ती मानणं किंवा न मानणं हे आपल्या हातात आहे. तुम्हाला तुमच्या या गृहीतकामुळे तो फोटो पाहून राग आला. त्यामुळे ज्यांनी ती जाहिरात बनवलेली आहे त्यांचा त्याच्यामागचा दृष्टिकोन समजल्याशिवाय त्यांच्यावर चिडणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नये.

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 9:10 am | ब़जरबट्टू

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?
हो, भारतात तर आहेच आहे. पण जाहिरातीत दाखवलेली बाई कामवाली आहे, हे कसे ठरवले ?

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2016 - 12:25 am | बोका-ए-आझम

भारतात मानला जातो. आणि त्या स्त्रीला कामवाली बाई मी नाही, लेखिका समजताहेत. त्यावरूनच राग आला ना त्यांना.

कमी दर्जाचा व्यवसाय असला तरी त्याला जाहीररित्या शेम करणे बरोबर आहे का ?

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 10:06 am | टवाळ कार्टा

आणि तसे न करणारे चांगले?

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 11:56 am | मराठी कथालेखक

विठांशी यावेळी सहमत.
दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत. मॉडेलने काय कपडे घालावे वा काय नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य जाहिरात बनविणार्‍याला आहेच.
झालेच तर साडी हा काही फक्त महाराष्ट्रातील पारंपारिक पेहराव नाहिये. अनेक राज्यातील स्त्रियांचा तो पारंपारिक पेहराव आहे.

अडाणी बाई हा प्रकार दाखवणे म्हणजे माझ्या मते चांगले नाही. Targeted जाहिरात असती तर त्यांत काही चुकीचे वाटत नाही. पण जाहीररित्या कुणाला अडाणी, लट्ठ इत्यादी इत्यादी दाखवणे बहुतेक करून जाहिरात वाले टाळतात. जाहिरातीचा प्रमुख उद्येश जर जास्त ग्राहकांना प्राप्त करणे आहे तर त्या कामात हि जाहिरात असफल ठरली आहे. मी तरी त्यांची वस्तू विकत घेणार नाही.

कपड्यावरून पात्रता ठरवता येत नाही. तसे कपडे घातलेली सर्व माणसे अडाणीठरवणे योग्य नाही हे मान्य. पण याचा व्यत्यासदेखिल खरा ठरवून जाहीरातदाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करणं अमान्य.

जाहीरातीत देखिल छोटिशी का होइना आपली एक कथा असते पात्र असतात, तसच त्यात जाहिरातदाराने एक अडाणी बाइचं पात्र घेतलं आणी तिला तसे कपडे घालायला दिले आणि सांगितलं की हिला देखिल कळलं तर त्यात काय गैर आहे.

असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल.

असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल

पण मालिकेत फक्त अडाणी बायकाच साडी परिधान करतात असे दाखवले तरंच तसे म्हणता येईल.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 6:30 pm | अमृता_जोशी

कपडे सोडून इतर इखादी जरी गोष्ट या जाहिरातीत अशी असती जिच्यावरून असे वाटावे की हि बाई अडाणी किंवा मोलकरीण आहे तरी समजू शकले असते; पण फक्त महाराष्ट्रीयन पोशाख घालून उभी केलेली बाई अडाणी/गांवढल/मोलकरीण आहे असे वाटत नाही.

असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल.

चित्रपट/मालिकांमध्ये आणि छापील जाहिरातींमध्ये फरक असतो.

जाहीरातीतले ते एक पात्र मराठी अडाणी बाइ आहे .. याचा अर्थ सर्व तशा पोशाखातल्या बायका अडाणी असतात असे त्या जाहीरातदाराला/ कंपनीला म्हणायचय हा तुम्ही काढलेला अर्थ म्हणजे प्रचंड विपर्यास आहे. कै च्या कै !!!
आणी याचा निषेध त्या स्टोअर मॅनेजरवर आरडाओरडा करून करणे म्हणजे तर कहर आहे..

या धाग्यावर इतक्या जणांची याला सहमती पाहून तर फारच चक्रावलो !!

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 9:35 pm | टवाळ कार्टा

खिक्क

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 10:26 pm | अमृता_जोशी

एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून सांगायची?

जाहीरातीतले ते एक पात्र मराठी अडाणी बाइ आहे

पण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?

आणी याचा निषेध त्या स्टोअर मॅनेजरवर आरडाओरडा करून करणे म्हणजे तर कहर आहे.

मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.

बोका-ए-आझम's picture

5 Apr 2016 - 1:57 am | बोका-ए-आझम

"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.

इथे तर तो नुसतं म्हणतोय. काढून कुठे टाकल्या आहेत जाहिराती?

बाळ सप्रे's picture

5 Apr 2016 - 11:27 am | बाळ सप्रे

एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून सांगायची?

बोंबलण्यापेक्षा मुद्देसूद बोला :-)

पण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?

प्रत्येक वेळा सगळं उघडं करुन सांगायची गरज नसते. "even she can understand " यात ती अडाणी आहे हे आधी ठरलय ..ती अडाणी दाखवण्यासाठी हे कोर्टात सिद्ध करण्याइतके पुरावे देण्याची काहिही गरज वाटत नाही.

आणि याचा अर्थ " तशा कपड्यातल्या सगळ्या बायका अडाणी" असा तुम्ही घेताय, जाहिरातदार नाही.

मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.

याचा अर्थही तुमचे म्हणणे पटले म्हणून तुम्ही घेत असाल, पण त्याने कामाच्या वेळी कुठे तुमच्याशी निरर्थक वाद घालत बसणार अशा कारणाने केले असण्याची शक्यता जास्त आहे.. :-)

नूतन सावंत's picture

4 Apr 2016 - 6:42 pm | नूतन सावंत

अमृता,हाच आक्षेप मी आमच्या इथल्या स्टार बाजारमध्ये घेतला होता.माझ्या पतीनेही मला पाठिंबा देऊन लेखी तक्रार दाखल करुन ही जाहिरात काढून टाकायला लावली होती.त्यावेळी तिथे हजर असलेल्या बायकांनीही पाठिंबा देऊन त्या तक्रारीवर सह्या केल्या होत्या.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 6:48 pm | अमृता_जोशी

:-)

'पिंक' पॅंथर्न's picture

4 Apr 2016 - 6:50 pm | 'पिंक' पॅंथर्न

चांगला इस्त्रीचा शर्ट-पॅंट असा पोषाख असुनसुद्धा केवळ शर्ट इन केला नाही म्हणुन मी गावंढळ ठरलो गेलोय कोणे एके काळी....

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2016 - 7:04 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा

भारी धागा आहे हा !

मराठी कथालेखक's picture

4 Apr 2016 - 7:06 pm | मराठी कथालेखक

मॅनेजर वा इनचार्ज काय म्हणाला ते बाजूला ठेवलं तरी जर तिच्या पोशाखावरुन ती बाई अडाणी आहे हे सिध्द होत नसलं तरी ती अडाणी नाही असंही सिद्ध होत नाही ना. आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि नाही हे महत्वाचं नाही, तिनं तो रोल केलाय अडाणी असण्याचा. आणी तो साडी घालून केलाय इतकच.
नेमका मुद्दा काय आहे ?
१) एकही बाई अडाणी नसतेच असं म्हणायच का ?(म्हणजे मुळात बाईला अडाणी का दाखवलं म्हणून वाद आहे का ?)
२) की अडाणी बाई साडी नेसत नाही असं म्हणायचं आहे (साडी नेसणारी प्रत्येक बाई अडाणी नसेल, प्रत्येक अडाणी बाई साडी नेसत नसेल, पण म्हणून साडी नेसणारी अडाणी बाई अस्तित्वाच असू शकत नाही असं म्हणायचं का ?)
आणि जर हे दोन्ही मुद्दे नसतील तर हा धागा अगदीच निरुद्देश होत नाही का ?

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 7:18 pm | अमृता_जोशी

आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि नाही हे महत्वाचं नाही, तिनं तो रोल केलाय अडाणी असण्याचा

आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.

१) एकही बाई अडाणी नसतेच असं म्हणायच का ?(म्हणजे मुळात बाईला अडाणी का दाखवलं म्हणून वाद आहे का ?)

अजिबात नाही.

की अडाणी बाई साडी नेसत नाही असं म्हणायचं आहे (साडी नेसणारी प्रत्येक बाई अडाणी नसेल, प्रत्येक अडाणी बाई साडी नेसत नसेल, पण म्हणून साडी नेसणारी अडाणी बाई अस्तित्वाच असू शकत नाही असं म्हणायचं का ?)
आणि जर हे दोन्ही मुद्दे नसतील तर हा धागा अगदीच निरुद्देश होत नाही का ?

शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?

करिष्मा आणि करीना कपूर ८ वी पास आहेत. शिक्षण पात्रताच बघायची असेल तर उत्तमोत्तम कपडे घालुन पण त्या कमी शिकलेल्याच आहेत : सर्वसाधारण भाषेत अडाणी. कामवाल्या बायका पण १० वीतुन शाळा सोडलेल्या वगैरे असतात.

आणि बौद्धीक पात्रते बद्दल बोलायचं असेल तर प्रत्येकाचा इंटेलेक्ट वेगळा. कामवाल्या बायकांमध्ये व्यावहारीक शहाणपण तुमच्या आमच्या पेक्षा जास्त असतं.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:03 pm | मराठी कथालेखक

आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.

इतर काय करणार अजून ?आणि साडी , महाराष्ट्रीयन दागिने घातलेली स्त्री अडाणी असूच शकत नाही असे नाही ना ? मग दाखवली अशी एखादी स्त्री तर काय चुकलं ?

शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?

असेल की, न असायला काय झालं ? पुढे कुणी तशीही स्त्री (शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी) दाखवेल एखाद्या जाहिरातीत वा कलाकृतीत. हरकत नाही.

'पिंक' पॅंथर्न's picture

4 Apr 2016 - 7:13 pm | 'पिंक' पॅंथर्न

"पारंपारीक पोषाख केलेली बाई अडाणी असते" असा एक चुकीचा संदेश जातोय त्यातुन असं त्यांच म्हणणं आहे.. असं मला वाटतय !!

मराठी कथालेखक's picture

4 Apr 2016 - 7:16 pm | मराठी कथालेखक

चुडीदार आणि साडी हे दोन्ही पारंपारिकच आहेत , त्यामुळे तो प्रश्नच नाही.

'पिंक' पॅंथर्न's picture

4 Apr 2016 - 7:22 pm | 'पिंक' पॅंथर्न

"महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख केलेली बाई अडाणी असते" असं वाचावं..

सूड's picture

4 Apr 2016 - 8:14 pm | सूड

बिंगो!! "Even she can use it" चा आणखी वेगळा अर्थ मला तरी दिसत नाहीये.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:04 pm | मराठी कथालेखक

साडी काय फक्त महाराष्ट्रातल्या स्त्रीयाच नेसतात असं म्हणायचं आहे का ?

मराठी कथालेखक's picture

4 Apr 2016 - 7:15 pm | मराठी कथालेखक

मुळात (माझ्या २ वर्षापुर्वीच्या अनुभावरुन सांगत आहे) औरंगाबाद मध्ये रिलायन्स हे स्टार पेक्षा स्वस्त (अगदी Dairy Milk chocolate वर पण छान सूट असते हो.) आणि मस्त (ऐसपैस, बिलिंगला कमी वेळ लागतो, ट्रॉलीतून स्वतः वस्तू उचलून बिलिंगला घेणारा स्टाफ) आहे, त्या आधारावर स्टारमध्ये उगाचच गर्दी करणारे सगळेच माझ्यामते अडाणी असले पाहिजेत :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टार बाजारात जरा बरं आणि बर्‍याच गोष्टी एकाच ठिकाणी आणि उगाच वाटतं जरा स्वस्त आहेत.
मला त्या स्टारबाजारात पाय ठेवावा वाटत नाही. तिथे उगाच किराणा दुकानात आल्याचा फिल येतो. ;)

आमच्या प्रोझोन मॉलला खुपच चांगले दिवस आले आहेत. मी आपला विंडो शॉपिंगसाठी हमखास जातो. ;)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 7:45 pm | टवाळ कार्टा

इतके सगळ्यांनी लिहिलेच आहे तर माझेही २ पैसे...कोण कसे कपडे घालतो/ते त्यावरूनच लोक त्या व्यक्तीची पारख करतात...ड्रेसकोडवाली जागा असो वा नसो...सगळ्यात नॉर्मल उदाहरण म्हणजे पाखरे ज्या टाईपने वेगवेगळ्या मुलांबरोबर वेगवेगळ्या पध्धतीने वागतात...तस्मात बहुतांश बायकाच कोणी कसे कपडे घातले आहेत त्यावरून त्या व्यक्तीशी कसे वागायचे ठरवतात

मार्मिक गोडसे's picture

4 Apr 2016 - 8:25 pm | मार्मिक गोडसे

'So easy even she can use it' आलिया भट ह्या जाहीरातीसाठी फिट होती.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:06 pm | मराठी कथालेखक

आलिया भट ह्या जाहीरातीसाठी फिट होती

पण आलिया भट्ट साडीमध्ये खूप गोड दिसते (२ States मध्ये) म्हणून तिला साडी नेसवूनच जाहिरात केली तर पुन्हा पंचाईत होईल :)

माझीही शॅम्पेन's picture

4 Apr 2016 - 8:35 pm | माझीही शॅम्पेन

तुम्ही साडीच काय बोलताय , आमच्या इमारतीत बर्‍याचश्या कामवाल्या बाया ह्या 2 व्हीलर वरुन येतात आणि बहुतेक जणी पंजाबी ड्रेस घालतात , आता बोला :)

तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही.

ग्रामीण किंवा अडाणी ? सगळे ग्रामीण अडाणी असतात हे किती सहज लिहून जातात.

ससन्दीप's picture

4 Apr 2016 - 11:30 pm | ससन्दीप

बर्‍याच दिवसांपासून अशाच काहिश्या विषयावर मनात एक खल चालली होती ते म्हणजे आपल्या जाहिरातीं अथवा हिन्दी चित्रपटांतून येणारे स्त्रीचे 'मोलकरीण' हे पात्र आणि ते म्हणजे हमखास महाराष्ट्रीयन स्त्री. आक्षेप कामाच्या स्वरूपाला नाही तर हे पात्र नेहमीच अडाणी आणि दुय्यम दर्जाचे म्हणून रंगविले जाते याला आहे.
हे खरे आहे की पुर्वीपासून अत्यंत गरीब घरातील मराठी स्रीयांनी परप्रांतातून मुंबईमध्ये आलेल्यांची घरची धुण्या—भांड्यांची कामे स्विकारली आहे. पण आता बांग्लादेशी आल्यापासून आणि मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यापासून हे प्रमाण कमी झाले आहे. पण जेव्हा चित्रपटाचा/ जाहिरातींचा प्लाॅट हा महाराष्ट्राबाहेरचा दाखविण्यात येतो तेव्हाही मोलकरीण ही मराठीच दाखवायला हवी का? अगदी दिल्लीसारख्या ठिकाणी?

अवांतर : निवडणूक जवळ आल्यावर तात्पुरता का असेना पण मराठी अस्मितेचा सूर आवळणार्‍या नेत्यांना या गोष्टीचा आतापर्यंत कधीही बाऊ केल्याचे आठवत नाही.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 11:34 pm | अमृता_जोशी

+१

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 11:39 pm | तर्राट जोकर

राज ठाकरेंनी याविरुद्ध आवाज उठवल्याचे स्मरते.

कपिलमुनी's picture

5 Apr 2016 - 1:45 am | कपिलमुनी

Madhuri

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:09 pm | मराठी कथालेखक

पण जेव्हा चित्रपटाचा/ जाहिरातींचा प्लाॅट हा महाराष्ट्राबाहेरचा दाखविण्यात येतो तेव्हाही मोलकरीण ही मराठीच दाखवायला हवी का? अगदी दिल्लीसारख्या ठिकाणी?

असहमत..उदाहरण द्या.
अनेकदा हिंदी चित्रपट/मालिकांचा प्लॉट मुंबईचा असतो (निदान पुर्वी तरी असायचा).

संदीप डांगे's picture

5 Apr 2016 - 1:04 am | संदीप डांगे

ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने जाहिरात किंवा आर्टवर्क कसे तयार होते ह्याबद्दल काहीतरी लिहणार होतो. पण बराच काथ्याकूट झालेला दिसतोय. असो. ;)

चांदणे संदीप's picture

5 Apr 2016 - 1:16 pm | चांदणे संदीप

असं विजेसारखं चमकून नाही जायचं....बरसून जा एकदाचं मुसळधार! ;)

माहितगार's picture

5 Apr 2016 - 1:21 pm | माहितगार

टाका वेगळा धागा टाका

बाब्बौ! बरेच प्रतिसाद आलेत. आता अमृताताईंचा सत्कार करायचा म्हटला तर जीन्स आणि टॉप देऊन करावा लागेल काय? ;)
दोन्ही चित्रांपैकी वरील चित्रावारील भाषांतराने खास घोळ केलाय. बाकी ते साडी नेसावी का शर्ट पॅन्ट घालावे यातलं दुसरं काय ठरवतो यावर माझा निर्णय अवलंबून असणार नाही. जो पेहराव हवाय तोच करणार. मला केस रंगवलेले आवडत नाहीत तरीही आजूबाजूची बरीच जनता जांभळे केशरी केस करून आलेलीच असते ना? ते माझा विचार करतात का? ;)

मला वाटते स्टोअर इनचार्जचे ओळखपत्रावरचे नाव इथे देणे बरोबर नाही.

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 9:16 am | यशोधरा

काय ठरलं मग?

1

1

या बघा मंगळावर यान पाठवणार्‍या इस्रोच्या शास्त्रज्ञ. अजून काही सांगायला पाहिजे का?

तर्राट जोकर's picture

5 Apr 2016 - 11:15 am | तर्राट जोकर

सौ सुनार की और एक पैसाताईकी

माहितगार's picture

5 Apr 2016 - 11:59 am | माहितगार

सौ सुनार की और एक पैसाताईकी

+१+१..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण म्हणता या इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत म्हणून विश्वास ठेवतील. पण माझ्या गल्लीतल्या स्रियांना पाककृतीचं बक्षीस मिळाल्या म्हणून या महिला एकत्र आल्या आहेत आणि तो आनंद साजरा करत आहेत असंही वाटू शकतं.

- दिलीप बिरुटे

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:16 pm | माहितगार

बिरुटे सर, आपल्याला काय वाटलं त्यावरुन त्यांची पात्रता कमी होत नाही आणि म्हणून पोषाखावरुन अथवा संस्कृतीवरुन कमी लेखू नका हा तर मुद्दा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोषाखावरुन कोणी कोणालाही कमी लेखुच नये. पण दुर्दैवाने पोषाखावरुन बर्‍याच गोष्टी ठरवल्या जातात ही गोष्टही मान्य केली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:48 pm | माहितगार

पण दुर्दैवाने पोषाखावरुन बर्‍याच गोष्टी ठरवल्या जातात ही गोष्टही मान्य केली पाहिजे.

अंशतःच सहमत आहे. कस्टमर रिलेशन मध्ये तुम्ही बोलायला चालू करता तो पर्यंतच तुमचे व्यक्तीमत्व आणि पोषाख म्हणजे पहिल्या प्रभावा पर्यंतच मर्यादीत असते, त्यानंतरचे तुम्ही काय बोलता त्यावर अवलंबून असते, तसेच अभिनयात दृष्य रुप अभिनयाची संधी मिळे पर्यंतच पहिला प्रभाव म्हणून उपयूक्त असू शकते, नंतरचे करीअरमध्ये प्रत्यक्ष अभिनय जमतो की नाही याचा संबंध राहतो एकदा कलाकार अभिनयासाठी तुम्ही स्विकारला की त्याचे दिसणे आणि त्याने घातलेला पोषाख दुय्यम ठरतो. एखादा गर्भ श्रीमंत भिकार्‍याचा वेष घालून जरी फिरला तरी लोक त्याला मुजराच करतील की नाही.

ज्याच्याकडे गर्भ श्रीमंती नसते त्याला त्याचे प्रदर्शन करावे वाटते म्हणून लोक दिसणे आणि पोषाखादी वरच्या गोष्टीच्या मागे लागतात. गर्भ श्रीमंतीत वाढलेली व्यक्ती कदाचित तेवढी प्रदर्शनोत्सुक राहणार नाही माझे मत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्याच प्रभावाबाबत पोषाखाचा परिणाम असतो. नंतरच्या संभाषणात पोषाखाला महत्व नसतं. तिथून पार्ट टू, पार्ट थ्री, पार्ट फोर सुरु झालेला असतो, तरीही पहिल्या प्रभावाचा परिणाम इतर भागांवरही टीकून असतो. म्हणजे इतका हुशार माणुस आहे पण किती गबाळा दिसत होता. पेहराव ही तुमची पहिली ओळख असतेच असते.

गर्भश्रीमंत भिकार्‍याचा वेष घालून जर फिरला तर त्याला सर्वच लोक मुजरा करणार नाही. कारण तो माझ्या ओळखीचा नाही, मी त्याला पाहिलेलं नाही. त्याचा पहिला प्रभाव पेहराव ठरवेल, जो पर्यंत त्याची माझ्याशी नीट ओळ्ख होत नाही.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

5 Apr 2016 - 1:11 pm | माहितगार

त्याचा पहिला प्रभाव पेहराव ठरवेल, जो पर्यंत त्याची माझ्याशी नीट ओळ्ख होत नाही.

असे बरेच लोक करतात मी तसे करणे आवर्जून टाळतो, मी समोरच्या व्यक्तीला पूर्ण संधी देतो आणि मगच निर्णय करतो.

मिपा कट्ट्यांचीच गोष्ट घ्या, - मी कट्ट्यात अद्यापतरी सहभाग घेतला नाही तरीही- अत्यंत चांगले तुम्हाला आवडणारे लेखन करणार्‍या व्यक्तीं तुम्हाला अनपेक्षीत पोषाखात अथवा अनपेक्षीत व्यक्तीमत्वाच्या आढळून आल्या असतील. म्हणजे पोषाखावरुन पात्रता मुद्दा गैरलागू होतो की नाही.

मुद्दा पटला. मेनेजरला विचारून फायदा नाही, त्यांच्या ट्विटर ला पाठवा आणि जाब विचारा.

सस्नेह's picture

5 Apr 2016 - 12:38 pm | सस्नेह

काही गोष्टी जाहिरात बनवणाऱ्यांनी आणि काही इथे प्रतिसाद देणाऱ्यांनी गृहित धरलेल्या दिसल्या. त्या खरोखरच तशा आहेत का हे तपासावे लागेल. (दया, पता करो...)
१. महाराष्ट्रीय साडी नेसलेल्या स्त्रिया कार्ड सहजपणे वापरू शकत नाहीत. (जा. बनवणारे)
२. बिल सद्गृस्थांच्या बायकांनी देणे कमीपणाचे आहे. (जा. बनवणारे)
३. सदर जाहिराती मॅनेजरने बनवलेल्या आहेत व त्याच्या आशयाशी तो सहमत आहे. (धागाकर्ती)
४. महाराष्ट्रीय साडी नेसलेल्या स्त्रिया अडाणी आहेत. (मॅनेजर)
५. जाहिरातीतील साडी नेसलेली स्त्री मोलकरीण आहे. (काही प्रतिसादक.)
६. पंजाबी पोशाख केलेल्या स्त्रिया अडाणी/गावठी आहेत. (काही प्रतिसादक.)
७. साडी नेसलेल्या स्त्रिया मठ्ठ असतात. (एक प्रतिसादक)
८. पोशाखावरून व्यक्तीचा दर्जा ठरतो. (काही प्रतिसादक)

अहो, मुळात अमुक एक कार्ड शॉपिंगसाठी वापरायला "सोपं" किंवा "अवघड" कसं असू शकतं? हा प्रश्न इथे आधीच उपस्थित केला होता. पण तो दुर्लक्षित झाला. या क्षेत्राशी संबंध आलेला असल्याने आणि तसंही कोणताही कार्डयूजर हे सांगू शकेल की कार्ड कोणतंही असलं तरी ते वापरण्याचा प्रोटोकॉल एकच असतो आणि त्यात कार्डधारकाला सोपं पडणारी आणि अवघड पडणारी कार्ड्स असू शकत नाहीत. म्हणजे एखाद्याला एकूण कार्ड वापरणंच अवघड वाटत असेल तर फक्त स्टार बाझारचं को-ब्रँडेड कार्डच तेवढं सोपं वाटणं शक्यच नाही.

सस्नेह's picture

5 Apr 2016 - 12:48 pm | सस्नेह

गृहितक नं. १. शॉपिंगसाठी वापरायचे कार्ड वापरण्यास अवघड असते. (कंपनीवाले)

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:53 pm | माहितगार

:) गवि तुमचा मुद्दा अंशतः बरोबर, सगळेच प्रेशर कुकर शिट्ट्या मारतात मग आम्ही तुम्हाला दिलेला प्रेशकुरर शिट्टी मारेल हे सांगण्यात काय हशील ? तेच तर जी गोष्ट आहे ती समोरच्या व्यक्तीस कशी उपयूक्त आणि सुलभ आहे हे सांगण्यासाठी म्हणून जाहीरात.

गवि's picture

5 Apr 2016 - 1:22 pm | गवि

फरक आहे.

आमच्या कुकरची शिट्टी सुलभपणे ऐकू येते कारण ती मोठ्या आवाजात वाजते. हा इतरापेक्षा वेगळा गुण म्हणता येईल.

किंवा शिट्टी वाजली की कुकर आपोआप गॅस / वीजप्रवाह बंद करतो.. हेही इतरांपेक्षा वेगळं फीचर.

इथे तसं नाहीये.

इथे इतरांपेक्षा आमचं कार्ड सोपं आहे असा भाव आहे. कारण "ईझीशॉप कार्ड, सो ईझी दॅट इव्हन शी कॅन यूज"

म्हणजे हे ईझीशॉपकार्ड इतर कार्डांपेक्षा वापरायला जास्त सोपं, कमी क्लिष्ट आहे.. इतकं की हिलाही वापरता येईल.

कार्डचा वापर हा त्यावरचा डिजिटल मजकूर मशीनद्वारे आपोआप रीड होऊन वेगवेगळ्या स्विचेसवाटे त्या कार्डला इश्यू करणार्‍या बँकच्या सर्वरकडे संदेश पाठवून पैसे अप्रूव्ह करुन घेण्यासाठी असतो. ही प्रक्रिया इथे स्विच आणि बँकऐवजी स्टार बाझारने स्वतःचंच प्रीपेड कार्ड देऊन घडवली आहे.

इन ऑल केसेस, कार्ड विसा असो, मास्टर असो, रुपे असो किंवा बिग बाझार, स्टारबाझारचं स्वतःचं अंतर्गत कार्ड असो. ते काउंटरवरच्या माणसाला देणं आणि पिन नंबर टाकून कार्ड आणि पावती घेणं या क्रियेत बदल नाहीच.

तेव्हा वापरायला सोपं हा दावा जो जाहिरातीचा मुख्य मुद्दा आहे त्यातच अर्थ वाटत नाही.

अगदीच चिकित्सा करायची तर उलट ही प्रीपेड कार्डं रिचार्ज करुन भरुन घेण्याचा वेगळा ताप होतो आणि त्यासाठी स्टार बाझारचेच पाय धरावे लागतात. "इतर" बँक बेस्ड कार्ड्सला ही कॉम्प्लिकेशन नाही. अकाउंटला पैसे असले की वेगळं काही करावं लागत नाही. कार्ड कोणत्याही दुकानात चालतं, स्टार बाझारच हवा असं नाही. अकाउंट व्हॅलिड असला की पैसे सुखरुप राहतात. त्याला टाईम लिमिट नसते. कार्डची एक्सपायरी जवळ आली की कार्ड आपोआप घरी पाठवतात बँका.

उलट जास्त सोपं आणि स्वातंत्र्ययुक्त नाही का? :-)

माहितगार's picture

5 Apr 2016 - 1:24 pm | माहितगार

+१ सहमत.

संदीप डांगे's picture

5 Apr 2016 - 1:33 pm | संदीप डांगे

गविसर,

एजन्सीला काय ब्रिफ मिळालं असेल ह्याचा उल्लेख मी केला म्हणून तुमच्या प्रश्नावर उत्तर देणं आवश्यक आहे. एखादं कार्ड हे कशाच्या तुलनेत सोपं आहे ह्याचा आपला थोडा गैरसमज झालाय. हे कार्ड इतर कोणत्या कार्डाच्या तुलनेत सोपं आहे असे जाहिरातदाराने म्हटलेले नाही. ह्याचा खोलात जाऊन बघितलं तर काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.

पहिलं की ही जाहिरात औरंगाबाद शहरात लावली आहे. जिथे मुंबई-दिल्ली-बेंगलोर सारखा टेक्नोसॅव्ही क्राऊड कमी आहे. येथे येणारे लोक कॅशवाले जास्त, क्रेडिट-डेबिटवाले थोडे कमी. डेमोग्राफिक्स बघायला पाहिजे. (हीच, अशीच जाहिरात पुणे-मुंबई-बँगलोर इथे नाही हे मी गृहित धरत आहे)

दुसरा मुदा असा की स्टार बाझारला कायमस्वरुपी ग्राहक मिळवण्यासाठी काहीतरी शक्कल लढवायची आहे. कॅश वा क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक लॉयल्टी कस्टमरमधे बदलण्यासाठी स्टारचे स्वतःचे कार्ड काढले. जेणेकरुन ते कार्ड इथेच वापरता येत असल्याने ग्राहक इकडे येण्याची शक्यता वाढते. पाच हजाराचा रिचार्ज एकदाच मारला पण काही खरेदी करुन दोन हजार उरलेत तरी ते इथेच वापरायचे आहेत. रोखीचे व्यवहार कमी होऊन कामाचा वेग वाढतो. असे अनेक स्टारचे फायदे लक्षात घेऊन कार्ड काढले.

आता तिसरा मुद्दा आला की पारंपरिक विनिमय माध्यमे वापरणार्‍या ग्राहकांना ह्या नव्या व्यवस्थेकडे वळवायचे कसे? कॅशवाले ग्राहक जास्त असल्याने त्यांना ही कार्डवाली व्यवस्था कशी सोपी सुटसुटीत उपयोगी आहे हे समजावून सांगणे आले. त्यांच्या जाहिरातीतल्या मजकुरावरुन हे कळते * कॅशलेस, * रिचार्जेबल, * सोयिस्कर, * गिफ्टींग. हे कार्ड का वापरायचे ह्याची ही चार कारणे स्टारने दिली आहेत.

तर ह्यावरुन कळतं की हे कार्ड दुसर्‍या कोणत्या कार्डच्या नव्हे तर रोख पैसे देण्याघेण्याच्या तुलनेत अधिक सोपं आहे व जास्त टेक्नोसॅव्ही नसणार्‍यांसाठीही सोयिस्कर आहे असे जाहिरातदारास म्हणायचे आहे असे दिसते.

माझ्या आकलन व अनुभवानुसार उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काही शंका असतील तर नक्की चर्चा करु.

तुम्ही माझाच मुद्दा सपोर्ट करताय पूर्णपणे. त्यामुळे बरंच वाटलं.

कार्ड सोयीचं आहे ते त्यांच्यासाठी म्हणजे स्टार बाझारसाठी. पण ते एक असो, कारण शेवटी जाहिरात करताना असा प्रामाणिकपणा हास्यास्पद ठरेल.

आता तुमचा हा मुद्दा:

एखादं कार्ड हे कशाच्या तुलनेत सोपं आहे ह्याचा आपला थोडा गैरसमज झालाय. हे कार्ड इतर कोणत्या कार्डाच्या तुलनेत सोपं आहे असे जाहिरातदाराने म्हटलेले नाही.

तसं थेट म्हटलेलं नाही, पण शब्दरचना पहा. "कार्ड सो ईझी दॅट इव्हन शी कॅन यूज इट" हा मजकूर वरच्या पोस्टरपेक्षा वेगळा आहे. इथे वापरायला सोपं असणं हाच मुद्दा आहे. आणि हे कार्ड इतकं सोपं आहे की तीही वापरु शकेल, याचा अर्थच मुळी इतर काही कार्ड्स ही वापरु शकली नसती, पण ईझीकार्ड मात्र सोपेपणामुळे तिलाही वापरता येईल. अन्यथा या स्पेसिफिक कार्डला काही खास गुण नसल्यासारखंच होईल की.

बाकी मुद्दे मी खाली एका प्रतिसादात दिलेच आहेत. मुळात तुम्ही म्हणताय तसं ब्रिफमधे चुकलंय. जे मुद्दे पुढे आणायला हवेत ते न आणता भलत्याच मुद्द्याला हायलाईट केलंय. इथे जाहिरात बनवणारा गंडलाय.

प्रीपेड कार्डमधे रिस्क कमी असते. जितके पैसे लोड केलेत तितकीच मॅक्झिमम रिस्क असते. ते लोड करताना त्रासच होतो. शिवाय एकाच दुकानाचं बंधन येतं, पण अगेन्स्ट ऑल धिस, तुम्ही कामवालीला ते कार्ड देऊन (कॅशऐवजी) तिला पाठवू शकता, कारण अगदी पिन असल्यास आणि तो शेअर केल्यासही, प्रीपेड कार्ड फक्त स्टारबझारमधून सामान खरेदी करण्यापुरतंच व्हॅलिड असल्याने आणि तुमचा बँक अकाउंट याच्याशी निगडीत नसल्याने त्याची प्रायव्हसी जपली जाते. दुरुपयोगाची शक्यता एका दुकानातल्या सामानापुरती आणि टॉप अप केलेल्या रकमेइतकी मर्यादित राहते.

हा रिस्कचा / सेफ्टीचा मुद्दा हायलाईट करण्याऐवजी नॉन एक्झिस्टिंग सोपेपणाचा मुद्दा हायलाईट केलाय.

तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का?

"आमच्या डिटर्जंट पावडरने कपडे स्वच्छ होतात" हे विधान इतकं ट्रिव्हियल आहे की त्याला शून्य जाहिरातमूल्य आहे. यात निश्चितच इतरांपेक्षा जास्त शुभ्र होतात, किंवा इतके टक्के मळ जास्त निघतो असाच भाव असतो.

संदीप डांगे's picture

5 Apr 2016 - 2:56 pm | संदीप डांगे

तुम्ही म्हणताय तो मुद्दाही रास्तच आहे. कॅशपेक्षा कार्ड सोपं हा एक भाग, पुढचा प्रश्न तोच येतो की कार्ड सोपं आहेतर इतर कार्ड चं काय? ह्यात असं म्हणता येईल, जे तुम्ही पुढच्या प्रतिसादात स्पष्ट केलं आहेच, की बँकाच्या क्रेडिट-डेबिट्कार्डप्रमाणे रिस्क कमी आहे. त्यामुळे दोन गोष्टींशी एकाच वेळी केलेली तुलना आहे. कॅश व इतर क्रेडिट-डेबिट कार्ड्स. अर्थात आपलेच प्रॉडक्ट जगात भारी दाखवायला इतर सगळ्या संबंधित गोष्टी सोयिस्कर नाहीत हे सांगणे आलेच. इथे आपल्याशी पुर्ण सहमत आहे.

ब्रीफ चुकलंय हे तर खरंच आहे. रिस्कचा / सेफ्टीचा मुद्दा हायलाईट करण्याऐवजी नॉन एक्झिस्टिंग सोपेपणाचा मुद्दा हायलाईट केलाय. हे तुमचं मत बरोबर आहे. क्रीएटीव हेड व कॉपीरायटरने स्वतःही सोपेपणाचा मार्ग पत्करला आहे. ह्यातून त्यांचे स्वतःचे बायस दिसलेत. एजन्सीतलं वातावरण (स्टारचं काम जे करत असतील) बघता तिथे काम करणारे कॉपीरायटर यांची पार्श्वभूमी, शिक्षण, संस्कार, वय, अनुभव ह्यातून असे विचार जन्मतात. दुसरा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ. अशा प्रोजेक्ट्सवर फार विचार करायला त्यांना वेळ मिळत नाही. काथ्याकुट चालतात पण ते एकूण मार्केटींग, ब्रँडींग, इमेज ह्यांची स्ट्रॅटेजी ठरवायला. अशी छोटी कामे फार डोकं, वेळ लावून केली जात नाहीत, परवडत नाही. त्याचा एकूण जनमानसावर किती सूक्ष्म व दुरगामी परिणाम होतोय एवढा विचार करायची चैन त्यांना परवडणारी नाही.

तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का?

येऊ शकते. एक प्रोडक्ट दुसर्‍यापेक्षा 'सोपेपणात अधिक चांगले' असे होऊ शकते. पण 'ह्याच्यापेक्षा ते सोपं' हे तत्व 'तत्सम' प्रोडक्टबद्दल डिफरंशीएट करणारा घटक असू शकत नाही. कारण मग ते प्रोडक्ट 'तत्सम' राहणार नाही, त्यापेक्षा अ‍ॅडव्हान्स होईल. त्याची कॅटेगीरी बदलेल. एकामेकांशी स्पर्धा करणारे प्रॉडक्ट्स ते करत असलेलं काम दुसर्‍यापेक्षा अधिक चांगलं कसं करु शकतात हे सांगू शकतात. पण पद्धत वेगळी असेल तर स्पर्धा संपते.

जसे दिल्लीहून बेंगलोरला बस, ट्रेन, विमान ह्या प्रकारे जाता येते. म्हटलं तर आपल्याला ह्यात स्पर्धा दिसेल. पण तसे नाही ह्या कॅटेगीरी आहेत. ह्यात कोणीही कोणाशी स्पर्धा करत नाही. (कधीतरी कोणत्यातरी दोहोंचे रेट्स एकाच पातळीवर आल्यावर होऊ शकते. मागे कुणा विमानसेवेचे दर कमी झाल्यावर त्यांनी ट्रेनच्या पैशात विमानाने लवकर पोचा अशी जाहिरात केल्याचे स्मरते.) ह्यात बससेवावाले एकमेकांशी दर, आरामदायक प्रवास, वेळेची शिस्त पाळणे इत्यादी बाबतीत स्पर्धा करतील. पण विमानवाले बसवाल्यांशी त्याच बाबतीत स्पर्धा करत नाहीत.

तुम्ही दिलेले डिटर्जंटचेच उदाहरण घेऊया. डिटर्जंट यायच्या आधी लोक पाण्याने, लवण वापरुन कपडे धुवत होते. त्यात कष्ट होते, डिटर्जंट आल्यावर कपडे धुणे 'सोपे' झाले. आता अनेक डिटर्जंट बाजारात आल्यावर ते सोपेपणात स्पर्धा करणार नाहीत तर त्या सोपेपणाला मदत करणारे घटक अधिक चांगले कसे आमच्याच पावडरीत आहेत असे सांगतात. लाँड्री-ड्रायक्लिनरवाला डिटर्जंटशी स्पर्धा करणार नाही. भले तो सांगेन घरी कपडे धुण्याची कटकट करण्यापेक्षा माझ्याकडे द्या, धुवुन इस्त्री करुन देइल. म्हणजे तो सोपेपणाची पुढची पायरी घेतोय. ह्यात अनेक लाँड्रीवाले आमच्याकडे कसे जास्त चांगले कपडे धुतल्या जातात याची जाहिरात करतील.

केस धुण्याचे शाम्पू व केस धुण्याचा इतिहास-भविष्य बघितले तर हेच उदाहरण अजून गमतीदार होईल. शाम्पूत विटामीन टाकणारे महाभाग केस धुण्याच्या रिठे-शिकेकाई वापरण्याच्या तुलनेत सोपी असलेल्या क्रियेत इतर तत्सम प्रॉडक्टच्या तुलनेत फक्त घटक (तेही कल्पनेतले) वाढवल्याने आपलं शाम्पू इतरांपेक्षा जास्त चांगलं आहे असं सांगत आहेत.

माझ्यामते माझा काही गोंधळ होत नाही आहे. पण तुम्हाला काही खटकले तर नक्की सांगा. त्यावर विचार करेन.

रोचक प्रतिसाद आहे. नवीन कन्सेप्ट आणि माहिती समजली. आवडलं.

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2016 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी

जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍या माणसाचा अनुभवावर आधारित प्रतिसाद आवडला.

अमेरिकेत आल्यावर मला भारतातल्या व तिथल्या जाहिरातीमंध्ये असणारा महत्वाचा फरक जाणवला. भारतात स्पर्धक कंपनी व उत्पादनांचे नाव चुकूनही जाहिरातीत चालत नाही. अप्रत्यक्षपणे संदर्भ बरेचदा सुचवला जातो पण नाव अजिबात येऊ दिले जात नाही.

अमेरिकेत थेट स्पर्धक कंपनीच्या उत्पादनाचे नाव, फोटो, इतर तपशील छापून त्याची तुलना स्वतःच्या उत्पादनासोबत केली जाते. त्यामुळे भारतात जाहिरातदारांना जसा द्राविडी प्राणायम करावा लागतो तो करावा लागत नाही. जो काही दावा करायचा आहे तो थेट करता येतो.

Comparative advertising हे विकीपान या प्रकारावर अधिक माहिती देते.

बोका-ए-आझम's picture

6 Apr 2016 - 12:29 am | बोका-ए-आझम

आजकाल भारतातही चालतं. बिझनेस चॅनेल्स करतात की comparative advertising. Times Now तर नेहमीच करतं.

श्रीरंग_जोशी's picture

6 Apr 2016 - 12:37 am | श्रीरंग_जोशी

या प्रकाराची आता भारतातही सुरुवात झाली असेल तर उत्तमच.

अगोदरच्या प्रतिसादात उदाहरण द्यायचे राहून गेले होते. ते आता देतो.

Kindle Fire HD vs iPad - Screen Comparison — Commercial.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१. काही साड्या नेसलेल्या स्त्रीया कार्ड सहजपणे वापरु शकत नाहीत.
४. काही साड्या नेसलेल्या स्त्रीया या अशिक्षित असू शकतात.
६. काही पंजाबी पोशाख केल्या स्त्रीया या.... .....असू शकतात.
७. काही साडी नेसलेल्या स्त्रीया या ..... असू शकतात.
८. पोषाखावरुन व्यक्तीचा अंदाज बांधता येऊ शकतो मात्र ते बरोबरच असू शकत नाही.

टीप. पुरुषांच्या पेहरावाबाबतही अशीच मतं मांडता येऊ शकतात.
-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

5 Apr 2016 - 12:55 pm | सस्नेह

सर्वांनी जर असा मतितार्थ समजून घेतला तर धाग्याचे प्रयोजनच रहात नाही, हो ना ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2016 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वांनीच जर सर्व नीट समजून घेतलं तर वाद आणि काथ्याकुट कशावर करायचे. एवढ्या पोटतिडकीने कुठे बोलता येणार. मग काथ्याकुटाचा उपयोग काय. काथ्या खुप कुटला पाहिजे पण ती चर्चा व्यक्तिगत होऊ नये. पहिल्या प्रतिसादाला सर्वच खुश दिसतात तशा शेवटच्या प्रतिसादापर्यंत सर्व खुश असले पाहिजे. आपली सोडून कोणाची तरी मतं पटली पाहिजे. एक मजा आली पाहिजे. असो, दुसरा विषय घ्या आता.

-दिलीप बिरुटे

ब़जरबट्टू's picture

5 Apr 2016 - 3:58 pm | ब़जरबट्टू

१) दुस-या जाहिरातीत दाखवलेली स्त्री साडी नेसलेली आहे का नऊवारी ?
२) हिंन्दी सिनेमात कामवाली बाई नऊवारीच का नेसते ? (संदर्भ - नो एन्ट्री )

सध्या एव्हढेच :)