पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे.
वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा.
मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली.
पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला.
तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा.
अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे?
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं
--मुनव्वर राना
प्रतिक्रिया
25 Mar 2016 - 4:17 pm | श्रीरंग_जोशी
लेखाच्या आशयाशी पूर्णपणे सहमत.
25 Mar 2016 - 4:23 pm | विवेकपटाईत
२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात चंद्रपूरला गेलो होतो. घरा शेजारी मोठे विद्यत केंद्र, पंचक्रोशीत हि ४-५ सरकारी आणि निजी. तरीही रोज १० तास वीज नव्हती. (विदर्भाच्या गरजेपेक्षा किमान १० पट जास्त वीज निर्मिती विदर्भात होते). ज्या राज्यांत वीज निर्मिती जास्त आहे, तिथे विजेचे बिल कमी असते. उदा: हिमाचल प्रदेशला प्रत्येक जल विद्युत योजनेत १५-२५% वीज मुफ्त मिळते. ३ रुपये निर्मिती लागत असलेल्या विजेसाठी विदर्भकराना, मुंबई सारखे बिल भरावे लागत. मुंबईला २४ तास वीज मिळते आणि विदर्भातल्या अनेक गावांत वीज नाही आहे. शिवाय चंद्रपूर नागपूर सारख्या शहरांत हि वीज कट असतेच. विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड सारखे विदर्भात २४ तास वीज राहील. विदर्भाचा विकासाला वेग येईल. सोन्याची मुर्गी हातची जाईल.
25 Mar 2016 - 11:39 pm | मितभाषी
विवेकसाहेब निर्मीती पारेषण व वितरण या वेगळ्या कंपण्या आहेत. कंपण्यांच्या नावावरून त्यांची कार्यकक्ष कळते.
लोडशेडींग रिकव्हरीवर अवलंबून आहे. एक महिना बिल भरले नाही तर काय होते ते एखाद्या मुंबईकराला विचारा.
25 Mar 2016 - 11:43 pm | मितभाषी
लिहीण्यासारखे खूप आहे. पण आता टंकाळा आला आहे.
26 Mar 2016 - 1:16 pm | विवेकपटाईत
एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव अनुभवावा. विदर्भचे लोक हि बिल नियमित पणे. विजेची सर्वस्त जास्त चोरी उद्योगात होते. विश्वास नसेल तर वितरण वितरण कंपनीत कार्य करणार्याला विचारा.
26 Mar 2016 - 11:52 pm | मितभाषी
विश्वासाचा प्रशन नाही साहेब. तुम्ही क्रूपया अभ्यास वाढवा. मी गेले २१ वर्षे याच क्षेत्रात काम करत आहे.
विदर्भात माझे आजही काम चालू आहे व सर्व फर्सटहॅड आकडे माझ्याकडे आहेत.
फक्त फेकाफेकी करू नका हि विनंती.
25 Mar 2016 - 11:54 pm | काळा पहाड
म्हणूनच अर्थशास्त्र हा विषय शाळेत असताना कंपल्सरी शिकवला पाहिजे. तो फार महत्वाचा विषय आहे. मुंबई वेगळ्या विदर्भाकडून वीज सहज विकत घेवू शकतो. खरं तर सध्या जी वेगवेगळी राज्ये वीज विकतायत, त्या मधून मुंबई सहज सर्वात कमी खर्चाचा पुरवठादार शोधू शकतो. मुंबई फक्त वीजेवर अवलंबून नाहीये. तिला लागणारी ती फक्त एक गोष्ट आहे. बाकी विदर्भ वेगळा झाला तर ते पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे. एक तर नोकरशाही विभागली जाईल, त्यामुळे सरकारवरचा नोकरशाहीवरचा खर्च वाचेल. दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उगम पावणार्या गोदावरी चं पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल.
25 Mar 2016 - 4:26 pm | DEADPOOL
सहमत!
पण काय आहे ज्यांनी विदर्भ मागणी पुढे रेटायचि तेच आज मुम्बईच्या सिंहासनावर बसून विदर्भचा अनुशेष भरून काढू अशा वल्गना करतायेत!
वेगळ्या विदर्भाचा विषयच नाही!
जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत विकास नाही!
----एक पश्चिम महाराष्ट्रीय
25 Mar 2016 - 4:38 pm | नाना स्कॉच
स्पष्ट लिहिलेले खालील वाक्य आपण वाचलेले नाहीत काय??
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही,
**************************************
तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे!
हे ही लेखक महाशय बोलले आहेत, अन ते उगाच अभिनिवेषात येऊन कंसात पश्चिम महाराष्ट्रियन वगैरे लिहून आपण सिद्ध करताय इतके नोंदवतो!!
असो!.
25 Mar 2016 - 4:53 pm | नाना स्कॉच
ते कंसात असे न वाचता स्वाक्षरीत असे वाचावे
25 Mar 2016 - 5:00 pm | भाऊंचे भाऊ
भारतातील बरीच राज्ये एक स्वतंत्र देश बनू शकतात... आणि एक पश्चिम महाराष्ट्रीयन म्हणून मी त्याचा निषेध करतो
25 Mar 2016 - 5:24 pm | स्वामी संकेतानंद
Nation ही संकल्पना लक्षात घेतली तर तुमचे म्हणणेही खरेच आहे हे लक्षात येईल.
25 Mar 2016 - 5:25 pm | नाना स्कॉच
काय भाऊ राज्य अन देश ह्यात तरी फरक करा! अन त्याहुन जास्त म्हणजे तुम्ही परत परत लेखकाचाच मुद्दा सिद्ध करताय झाले!!!
25 Mar 2016 - 5:45 pm | भाऊंचे भाऊ
पश्चिम मराठी लोकांनी आपले तोंड बंद ठेवावे अन एक पश्चिम मराठी माणुस म्हणून माझे तोंड उघडून मी हेच सांगेन की काश्मीर हां भारताचा अविभाज्य भाग आहे भलेही उभ्या आयुष्यात मी कधीही काश्मिरला स्थायिक होणार नसेन
25 Mar 2016 - 5:50 pm | नाना स्कॉच
आराररा
मालक जरा गुळ पाणी घेता काय वैच?? कच्याला जीव तापविता जनु!! एकाव एक उदाहरणे गोळ्याझाडल्यागत हानतायसा तुमी पर सगळी हुकल्याली हैती हो!!
25 Mar 2016 - 5:56 pm | भाऊंचे भाऊ
हुकने का चान्सिच नय बस थर्ड हम्पायर प्रामाणिक होना मंगता...
पश्चिम मराठी म्हणून पुन्हा सांगतो केवळ गवतही उगवत नाही आशा जमिनीवर रहायला मी जाणार नाही पण म्हणून ती जमीन मी चीनच्या ताब्यात द्यायला माझा स्पष्ट विरोध आहे
25 Mar 2016 - 5:15 pm | पैसा
लहान राज्ये जास्त जास्त कार्यक्षमरीत्या चालवली जातात असे वाटते. हिंदीभाषी अनेक राज्ये असू शकतात तर मराठीभाषी का नकोत? तसे वर्हाडातल्या लोकांना मुंबई फार लांब आहे. गोवा सार्वमताच्या वेळी मुंबई फार लांब आहे, त्यापेक्षा पणजी राजधानी असली तर जास्त बरे हा एक मुद्दा प्रभावी ठरला होता.
परंतु विदर्भाकडे उत्पन्नाची मुंबईसारखी काय साधने आहेत? की वेगळे राज्य केल्यावर निधीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागेल?
25 Mar 2016 - 5:22 pm | स्वामी संकेतानंद
पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै!मुद्दा हा की संयुक्त महाराष्ट्र समर्थक आवाज विदर्भातून कमी, पश्चिम महाराष्ट्रातूनच जास्त निघत आहेत हा आहे.
25 Mar 2016 - 5:29 pm | पैसा
स्वतंत्र विदर्भाला विरोध पश्चिम महाराष्ट्रातून इमोसनल कारणे दाखवून केला जातोय असे तुम्ही म्हणताय ते ठीक. पण स्वतंत्र विदर्भाची मागणी पुरी झाली तर पुढे राज्य कसे चालेल याचा काही विचार असेल ना. विदर्भातलेच फडणवीस आता सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गडकरी मोठ्या पदावर आहेत, मग ते स्वतंत्र विदर्भासाठी काय करतील? फडणविसाना स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलायचे नाही अशी अट घालून मुख्यमंत्री केलंय का?
25 Mar 2016 - 6:34 pm | DEADPOOL
म्हणूनच मी कंसात पश्चिम महाराष्ट्र म्हटले!
कारण माझ्या मताचे सार्वत्रिकरण व्हायला नको!
25 Mar 2016 - 5:24 pm | सतिश पाटील
तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे महांकाळ आन तासगाव तालुक्यात बी द्राक्ष आन उसाचं अमाप पिक हुतया
तरीबी आम्हाला द्राक्ष आन साखर स्वस्त मिळत न्हाई,अर्धी अधिक साखर इदर्भातील लोक उन्हाळ्यात सरबत करून आणि थंडीत च्या करून पेत्यात,
आमचा कवठे महांकाळ आणि तासगाव तालुकाबी येगळा करा
म्हंजी आमच्याकड बी बक्कळ पाऊस पडील आन आमचा इकास हुईल,
आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे
शायद आपकी पैलेच शादी हुई है
-सुन्नव्वर शाणा
25 Mar 2016 - 5:31 pm | पैसा
आम्हाला पण मुंबईसह स्वतंत्र कोकण पाहिजे.
25 Mar 2016 - 5:54 pm | सातारकर
घेऊन टाका.
25 Mar 2016 - 6:47 pm | निनाद मुक्काम प...
कोकण गोव्यात समाविष्ट करा
त्यामुळे तरी तेथे पर्यटन व इतर व्यवसाय वाढेल सुब्बता येईल.
25 Mar 2016 - 11:29 pm | यशोधरा
नाका रे! गोयां आसा तितलें पुरो. सुशेगाद रावच्या बरें नीऽऽ..
25 Mar 2016 - 5:26 pm | नाना स्कॉच
लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची पश्चिम महाराष्ट्रियन जनतेत जबरी चुरस !
25 Mar 2016 - 5:35 pm | स्वामी संकेतानंद
बरोबर राजेहो! तुमी बी इदर्भातलेच दिसून रायल्या मले!!
25 Mar 2016 - 5:42 pm | नाना स्कॉच
नाही मी प्रॉपर पश्चिम महाराष्ट्रियन आहे हो! फ़क्त मी अभिनिवेष ठेवत नाही हे एक कारण असू शकेल !! थोडक्यात आमच्याकडली जनताच ते विदर्भाला एक प्राइस पोससेशन सारखे पाहतात हे आपापल्या प्रतिसाद अन स्वाक्षरी मधुन सिद्ध करीत आहेत इतके मात्र जाणवले!!
27 Mar 2016 - 1:52 pm | विशाल कुलकर्णी
27 Mar 2016 - 1:52 pm | विशाल कुलकर्णी
27 Mar 2016 - 1:54 pm | विशाल कुलकर्णी
27 Mar 2016 - 1:57 pm | विशाल कुलकर्णी
27 Mar 2016 - 2:04 pm | नाना स्कॉच
पुढं बोला की देवा !!
27 Mar 2016 - 4:17 pm | विशाल कुलकर्णी
च्यायला , आता मिपाला माझे प्रतिसाद सुद्धा नकोसे झाले कि काय? बादवे नाना, अभिनिवेश नसला तुमच्या बोलण्यात तरी 'कुंपणावरचे' दिसताय एवढेच सांगायचे होते.
27 Mar 2016 - 4:25 pm | सोत्रि
ऑ, आम्हालातर कुंपणावरही अभिनिवेश दिसला ब्वॉ!
- (कुंपणकरी) सोकाजी
25 Mar 2016 - 6:00 pm | श्री गावसेना प्रमुख
तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा पैसा हि पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी पळवून नेतात ना त्याला विदर्भ वेगळा झाल्याने पायबंद बसेल म्हणून हि वेगळ्या विदर्भाच्या मागणीविरोधात तावातावाने बोलत असतील।
25 Mar 2016 - 5:41 pm | सातारकर
पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजायची जुनी खोड आहे म्हणून असेल. मग ते राज्य पातळीवर असो नाहीतर देशपातळीवर.
कुठे देशच एकसंध ठेवायला मारतील / मरतील फौजेत जाऊन तर कुठे सगळे मराठी जन एकत्र ठेवायला.
25 Mar 2016 - 5:44 pm | नाना स्कॉच
मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर बॉर्डरी काय भारत पाकिस्तान असतील अशी काहीशी आपली समजूत आहे का सातारकर?? :D
25 Mar 2016 - 5:48 pm | सातारकर
कर्णाटक च्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे;
बेळगाव महाराष्ट्रात जायचं असेल तर पाकिस्तान युद्धापेक्षा जास्त सेना लागेल.
यावर आपल काय म्हणण आहे? :)
25 Mar 2016 - 5:57 pm | नाना स्कॉच
कर्नाटक महाराष्ट्र जो प्रॉब्लम झालाय तो भाषेमुळे झालाय नै का पावनं?? मी दोन स्वतंत्र मराठी भाषिक राज्यं असं बोललो सुद्धा हाय की, वाचले नै काय? विदर्भ वेगळा करण्यात तो मुद्दा होता/ आहे वह्य?? हे म्हंजी सोमालिया अमेरिका परराष्ट्र संबंध कसे आहेत ह्यावर आज जेवाय आमटी नको ठरवल्यागत झाले आहे बरंका.
उगा कच्याला वडाची साल पिंपळाला म्हणतू मी! कर्णाटक महाराष्ट्र वेगळे उर्वरीत महाराष्ट्र विदर्भ वेगळे असे वाटते बुआ
25 Mar 2016 - 6:11 pm | सातारकर
माझा समज (आता गैरसमज) असा होता कि हा प्रश्न नको त्याला नको त्याच्यात घातल्यामुळ आणि मग नको त्याचि बळजबरि केल्यान झाला आहे.
25 Mar 2016 - 6:24 pm | नाना स्कॉच
मराठी भाषिक बेळगावला बळजबरी कर्नाटकात घातल्यामुळे अन त्यांच्यावर कन्नड़ भाषेची बळजबरी केली गेली, त्यामुळे प्रॉब्लम झालाय असेच आपण म्हणता आहात काय?
बरं,
ह्यातले काय विदर्भ - उर्वरीत महाराष्ट्राला लागु होईल ते ही सांगा , माझेच खरे असे म्हणणे नाही फ़क्त मुद्दा नीट सांगा , श्लेष अलंकार नको पुस्तकी प्रमाण भाषेत नीट सांगा. मुळात तर भाषिक वादच आहे न? का कसे? अन तो वाद विदर्भ उर्वरीत महाराष्ट्रात कुठे आला म्हणे?
25 Mar 2016 - 6:01 pm | सतिश पाटील
आम्ही तर बाबा जन्मभूमी कर्नाटक असूनसुद्धा, बेळगाव, कारवार,अथणी आणि निप्पानीसह संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करतो.
आणि आमच्या महाराष्ट्राला वैदर्भीय मुख्यमंत्री लाभले असून ते कर्नाटकच्या मुख्य मंत्र्यासारखे बरळत नाहीत
याचं आम्हाला विशेष कौतुक वाटते
25 Mar 2016 - 6:13 pm | सातारकर
फक्त विदर्भवाद्यांना पश्चिम महाराष्ट्रान मांडिखाली दाबून ठेवलय (आणि ते तसे राहीलेत) अस कुणी म्हटल की मला हसू येत, त्याला माझा नाइलाज आहे.
तरी आर्थिक्दॄष्ट्या मराठवाडा जास्त गरिब असूनही ते बिचारे असल काही म्हणत नाहीत.
25 Mar 2016 - 5:55 pm | धर्मराजमुटके
इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा हिंदू-मुस्लीम, आतले-बाहेरचे, महाराष्ट्र-कर्नाटक, वेगळा विदर्भ, भारत पाकीस्तान, आईची जय हेच विषय जास्त महत्वाचे आहेत हे एकंदरीत मिडियात डोकावून पाहिलं तर लक्शात येते. प्रजेचा इंटरेस्ट अशाच प्रश्नांत जास्त तर राजकीय पक्षांकडून वेगळी अपेक्षा तरी कशी ठेवायची ?
महागाई, भ्रष्टाचार, दुष्काळ, पाणी टंचाई, शिक्षण यासारख्या विषयांवर किमान साधक बाधक चर्चा करण्याला आणि जमलेच तर त्या दिशेने हात पाय हलवायला आपण प्राधान्यक्रम कधी देणार आहोत देव जाणे !
25 Mar 2016 - 6:05 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही इशारा करताय ते मुद्देही महत्वाचे असले तरी मोठ्या प्रमाणावर ज्या भागांतील लोक विकासाच्या व संधींच्या अनुशेषामुळे दीर्घकाळापासून बाधित आहेत त्यांच्या मुद्द्यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.
25 Mar 2016 - 6:33 pm | धर्मराजमुटके
तेच तर मी म्हणतोय. मी उल्लेख केलेला कोणताही मुद्दा बघीतला की त्यात व्यवहार्यता कमी आणि भावनिक मुद्द्यांवरची लढतच जास्त दिसतेय. मला प्रामुख्याने खालील प्रश्न आहेत.
१. वेगळा विदर्भ किंवा मराठवाडा करायचा की नाही हे कोणी ठरवायचे ? राज्यकर्त्यांनी की तिथल्या बाधित जनतेने ? की उर्वरीत महाराष्ट्राने ?
२. वेगळे राज्य निर्माण झाल्यास त्याचा आर्थिक व्यवहार कसा चालणार याचा अभ्यास येथून मागे स्थापन झालेल्या अनेक समित्यांनी केला असेलच. किंवा मागास जिल्ह्यांचा अनुशेष कसा भरुन काढायचा यावरही कित्येक वेळा चर्चा झाल्या आहेत. केळकर समितीचा अहवाल त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आदर्श मानला जातो.
(इच्छुकांना अहवाल येथून उतरवून घेता येईल.
३. विदर्भ / मराठवाडा मागास राहण्यात केवळ सरकारी अनास्था कारणीभूत आहे की काही तांत्रिक / व्यवहार्य अडचणी देखील आहेत काय हे तपासून बघीतले आहे काय आहे ? की ही कारणे केवळ आणि केवळ राजकीय आहेत ?
मनात बरेच प्रश्न आहेत पण ज्याची प्रामाणिक उत्तरे मिळणे आणि मिळालेली प्रामाणिक उत्तरे पचविणे हा एक वेगळाच विषय आहे.
शेवटी माझा अंदाज :
सध्याचे महाराष्ट्रातील भाजपा सरकार आपल्या पाच वर्षातील शेवटच्या कार्यकालात यावर निर्णय घेऊ शकते. जर महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापनेची संधी असेल तर तो निर्णय घेणे पुढे ढकलला जाऊ शकेल. मात्र जर महाराष्ट्र हातातून जातेय हे दिसले तर कमीतकमी विदर्भ तरी हाती असावा म्हणून राज्यविभाजनाचा निर्णय होऊ शकतो. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता अनुशेष भरुन काढण्याचा पर्याय वापरता येईल की नाही याबद्दल साशंकता वाटते.
25 Mar 2016 - 6:40 pm | श्रीरंग_जोशी
तपशीलवार प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गेल्या दोन वर्षांत मिपावर या विषयावर चर्चा झाल्या आहेत. त्यांचे दुवे इथे देतो.
25 Mar 2016 - 6:51 pm | धर्मराजमुटके
धन्यवाद !
चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच. आपण निर्देश केलेल्या सगळ्या चर्चा वाचल्या आहेत. पण आख्याड्यात उतरायचा कंटाळा करतो.
१००-१२५ प्रतिसांदांत १०-१५ प्रतिसाद लक्ष देण्यालायक असतात पण ते जरी वाचायला मिळाले तरी संस्थळावर आल्याचे सार्थक होते. धाग्यांबद्दलदेखील असेच म्हणता येईल.
असो.
25 Mar 2016 - 6:02 pm | श्रीरंग_जोशी
हाच मुद्दा माझे मित्र श्री गजू तायडे यांच्या शब्दांत....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: भाऊ?
: काय होय बे?
: तुमच्या घरात राहाचं नाही मले. मले अल्लग राहाव वाटते.
: काहून बे? मस्ती आली का तुले?
: तुमी रोज तूप-साखर-पोयी खाता. आम्हाले शियापाक्या भाकरी खाऊ घालता.
: अबे पन अल्लग होऊन घरान्याच्या इज्जतीले बट्टा लावशीन काय बोहार्या?
: मंग काय कोरड्या भाकरीचे कुटकेच चावत बसू काय अथीसा?
: अल्लग व्हाची भाषा करशीन तर तंगडंच तोडंन तुहं!
: मले वाटलंच होतं तुमी धमक्या द्यान म्हनून. त्याच्यापेक्षा प्रेमानं तूप-साखर-पोयी वाटून घेतली असती तं?
: अबे, अल्लग निंघशीन तं शिया भाकरीची तरी सोय हुईन काय तुही?
: ते माहंवालं मी पाहून घीन ना! तुम्ही कायले फिकर करता? खरं म्हनसान तं तुमची फिकर दुसरीच हाये.
: मले कोन्ची फिकर हाये बे?
: तुम्हाले फिकर हाये का मी अल्लग झालो तं तुमची तूप-साखर-पोयी बंद हून जाईन!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
25 Mar 2016 - 6:16 pm | भाऊंचे भाऊ
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच
जास्त तावातावात बोलतात हा आहे!
मग तुम्हाला काय अपेक्षा आहे तिबेटी लोकांनी यावरती तावातावाने बोलावे का ?
25 Mar 2016 - 6:22 pm | स्वामी संकेतानंद
तुमच्या लक्षात नाही आले. घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे अशी एक म्हण आहे पहा
25 Mar 2016 - 6:24 pm | सातारकर
पश्चिम महाराष्ट्रात. ;)
25 Mar 2016 - 6:38 pm | DEADPOOL
सर्व पश्चिम महाराष्ट्रीय जनतेला विनंती आहे की या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये!
घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे ही म्हण लक्षात ठेवावी!!
25 Mar 2016 - 6:50 pm | स्वामी संकेतानंद
चर्चा करा, भावनिक आवाहने करू नका, मारायला धावू नका.
25 Mar 2016 - 6:55 pm | DEADPOOL
कोण मारायला धावले?
आपली म्हणचा अर्थ घेतला तर आपण सरळ आम्हाला रिकामटेकडे अथवा बिनकामाचे म्हणत आहात!
मग आवाहन केले तर चुकलं काय?
असो
या धाग्यावर माझा शेवटचा प्रतिसाद!!!
(म्हण लक्षात ठेऊन.......)
25 Mar 2016 - 7:22 pm | स्वामी संकेतानंद
इथे नाही, बाहेर जे अनुभव आले ते पाहून हे सगळे लिहिले मी. म्हणूनच पोस्टमध्ये हळवे मावळे म्हणालोय
25 Mar 2016 - 6:57 pm | निनाद मुक्काम प...
वेस्ट महाराष्ट नाही पण पुणे मुंबई मधील सेनेचे समर्थक अस्मिता भावना ह्यांचे राजकारण जोरात करतात ह्यामुळे विधार्भात जनाधार कमी होतो आहे
तेच आता पुढील काही वर्षात मराठवाड्यात होईल ,
काडी सारण्यात आली आहे आता स्वतंत्र मराठवाडा वणवा पेट घेईल.
मुळात विधार्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर महाराष्ट्राचे असे काय नुकसान होणार आहे
राजकीयदृष्ट्या मराठी खासदार केवळ महाराष्ट्रासाठी एकत्र येउन दक्षिण भारतीयांच्या सारखी संसदेत आपल्या मागण्या करत नाहीत,आपली लॉबी उभारत नाहीत,
विधर्भ खनिज व इतर नैसर्गिक सामुग्रीने संपन्न आहे
तेथे फडणीस मुख्यंमत्री झाले तर महाराष्ट्रात खडसे तावडे ह्यांना संधी मिळू शकते
मात्र विधर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राचे थोडे कर्ज तो आपल्या शिरावर घेणार का
हा यक्ष प्रश्न आहे.
माझ्यामते देवेंद्र त्यांच्या शेवटच्या वर्षात स्वतंत्र विधर्भाची घोषणा करेल. त्याला विरोध होऊ नये म्हणूनच स्वतंत्र मराठवाड्याची हवा पसरवली आहे
राष्ट्रवादी सूचक मौन बाळगून आहेत तर कोन्ग्रेज मध्ये दोन गट पडले आहेत.
25 Mar 2016 - 8:42 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करावाच.
त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे मुंबई,कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून एक राज्य झाले कि जीडीपी किती उच्चांकावर असेल?आणि किती संपन्न प्रदेश असेल नै?
माण,खटाव,जत अन सोलापूरचा काही भाग पाण्याने संपन्न करावा लागेल इतकेच,
शिवाय उपराजधानी पुणे असेल?मज्जाच मज्जा.
ते मराठवाडा अन् विदर्भवाले त्यांचं ते बघोत,दुष्काळ पडल्यास मदत मिळणार नै!!
25 Mar 2016 - 9:51 pm | तर्राट जोकर
धागालेखकाचा मुद्दा काय आणी लोक बघा चर्चा कशावर करत आहेत. ;-)
25 Mar 2016 - 10:35 pm | काळा पहाड
एक लक्षात आलंय का? कुठलाही पुणे मुंबईचा माणूस नागपूर आणि बाकीच्या वैदर्भीय शहरांत (बाकीची कोणती शहरं आहेत विदर्भात?) घरं विकत घ्यायला जात नाही. पण पुणे मुंबईत हे "जाऊन राहिले" वाले बरेच फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात. तेव्हा त्यांना तो वेगळा विदर्भ देवून टाकावाच. तसंही तिकडं इथल्या कुणाचं काम असेलसं वाटत नाही. पण नंतर वैदर्भीय लोकांना इथले फ्लॅट, जागा विकत घ्यायला कायद्याने (किंवा अ-कायद्याने) बंदी घालावी. घ्या ते नागपूर आणि फुटा. पहिल्यांदा इथले फ्लॅट सरकारजमा करा. बाकी राहिला प्रश्न वीज कुठून मिळणार आणि खनिजं कुठून मिळणार वगैरेचा. ते बघून घेवू आम्ही. तुम्ही निघा.
25 Mar 2016 - 10:49 pm | नाना स्कॉच
फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात
धन्यवाद!! बाकी तुमचा एकंदरित पिंड द्वेषमुलक असल्या कारणे अजुन काही बोलायची इच्छा नाही आपल्याशी, तरीही आपल्या तर्कातील (?) दोष आपणांस दिसला असेल अशी (भाबड़ी) *आशा आहे
*आशेला ठळक केलेले आहे बरंका!
मी स्वतः एक पश्चिम महाराष्ट्रियन आहे अन तरीही मला तुमचे बोलणे चुकीचे वाटले !! लोकांनी मेहनतीच्या पैश्याने विकत घेतलेल्या फ्लॅटमधे वेदपठन करावे का वेगळ्या विदर्भावर चर्चा करावी ही त्या त्या गृहस्वामीची हक्ककक्षा आहे , शिवाय फ्लॅट सरकारजमा करायला सांगणारे आपण कोण घटनासिद्ध पदाधिकारी आहात म्हणे प्रशासन/सरकारातले? उगाच आपले काहीही राव!
25 Mar 2016 - 11:40 pm | काळा पहाड
स्कॉचनाना,
स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर पुण्या मुंबईत फ्लॅट कशाला हवेत? हे म्हणजे विप्रो मध्ये नोकरी करत असताना विप्रो कशी वाईट आहे, टीसीएस कशी चांगली आहे याचा प्रचार केल्यासारखं झालं. जर विदर्भ हवाच आहे, तर काया वाचा मन तिन्ही ने तो मागा नं. पुण्यात येवून रहायचं आणि नागपूर वेगळा करण्यासाठी आंदोलनं करायची हा दुतोंडीपणा कशाला? त्या अणे महाशयांना महाराष्ट्राबद्दलेवढा आकस आहे, तर महाराष्ट्राचं पद स्वीकारलं कशाला? ते पद नाकारून मग अक्कल शिकवायची!
मी तर स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे. मी तर म्हणतो जावू द्या. यात द्वेषमुलक पिंड कुठे दिसला?
सरकारला अमर्याद अधिकार असतात (अधिकृत आणि अनधिकृत). तेलंगण चे उदाहरण पहा.
27 Mar 2016 - 12:21 am | अर्धवटराव
मग पहिले विदर्भाचा मागच्या अनेक वर्षांचा अनुषेश भरुन काढा. गोल्डन क्वाड्रीलॅटरल, रेल्वे कनेक्टीव्हेटी वगैरे भानगडी आपपल्या बघुन घ्या. खबरदार कोणि (उर्वरीत) महाराष्ट्रीय माणुस वैदभीय जमिनीवर पाय ठेवता झाला तर :प
बाकि ते समुद्र, सह्याद्री वगैरे गोष्टी आमच्या आम्हि मॅनेज करु
(इती: वैदर्भीय मनोगत)
ढिस्क्लेमरः आमचा कशाशी काहिही संबंध नाहि. आम्हि बारामतीचा व्हिसा कधि मिळतो याचीच वाट बघतोय.
26 Mar 2016 - 1:49 am | निनाद मुक्काम प...
एवढा द्वेष बरा नव्हे
माझी आईचे वडील अकोल्याचे आहेत
डोंबिवली मध्ये ते १९५० साली आले , पुढे डोंबिवलीच्या जोशी हाय स्कूल मध्ये त्यांनी स्वतंत्र विधार्भाच्या साठी सभा आयोजित केली होती. आजही अकोल्यात्त आईचे आजोळ आहे व मी लहानपणापासून येथे जातो. म्हणून ह्याविषयी लिहित आहे.
वेगळे राष्ट्र नव्हे तर वेगळे राज्य मागत आहेत. आणि पुण्यात जागांचे भाव वाढवले म्हणून कशाला त्रागा करतात मुंबईत सुद्धा जागांचे भाव परप्रांतीयांनी वाढवले, वाढते शहरीकरण अपरिहार्य आहे. त्याला इलाज नाही
अणे ह्यांची मुलाखत पाहा त्यांच्यात आणि बेताल मुक्तफळे उधळणाऱ्या कनैह्या मध्ये फरक आहे.
26 Mar 2016 - 11:43 am | hmangeshrao
अगदी निषेधास्पद विचार . संकुचित विचार
26 Mar 2016 - 2:17 pm | चिगो
मी माझे विचार ह्या धाग्यावर आधीच मांडले आहेत, पण तरीही ह्या प्रतिसादात हेटाळणीचा सूर जाणवतोय, म्हणून विचारतोय.. फुकट दिलेत का हो विदर्भवाल्यांना फ्लॅट्स पुण्यातल्या बिल्डरांनी? खडकू नि खडकू मोजून घेतलाय.. लोन्सचे हप्ते फेडताहेत ते.. त्या-त्या पोरा-पोरींनी शिकून आपल्या जिद्दीवर आणि कमाईवर विकत घेतले आहेत ते फ्लॅट्स. उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी, कोणाचा बाप रोखणार आहे? जरा राज्यघटना वाचा भारताची.. आणि तुमच्याच तिरपागड्या लॉजिकनी तर गुजराथ्यांनी/पारश्यांनी वाढवलेली जोपासलेली मुंबई तुम्ही घेतलीत. हाकलू शकलात त्यांना? स्वतःच आता उपनगरांमध्ये जाऊन बसलेत 'मराठीजन'.. त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला की. तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो..
त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. विदर्भाला येणार्या योजना, मग त्या सरकारी असो वा निजी, ह्या प. महाराष्ट्रानी आपल्या राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्यात. आमचे नेते नालायक पडले, असंही म्हणता येईल. नाहीतर आम्हाला तुमचं पुणं-मुंबई इतकंही प्रिय नाही हो..
आता मुद्द्याचं:
१. विदर्भाची महाराष्ट्राशी ऐतिहासिक नाळ नाहीये. आम्ही कधीच शिवाजीमहाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' भाग नव्हतो. नागपूरकर भोसल्यांचा इतिहासच शिकवला जात नाही कुठेच महाराष्ट्रात. विदर्भाचा इतिहासच माहीत नाही आम्हाला, कारण की भावनिक होतात भक्क ऽऽकन लोक.. 'काय आहे असा तुमचा इतिहास' असं म्हणून हिणावण्याआधीच सांगतो, पार आसामला भिडलं होतं नागपुरकर भोसल्यांचं राज्य. रघुजीराजे भोसलेंनी आसामवरुन आणली होती संत्र्याची रोपं, जी आज नागपुरी संत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. कलकत्त्यात 'मराठा डीच' आहे जी ह्या मराठ्यांपासून संरक्षणासाठी बनवली होती..
२. विदर्भाच्या मराठी बोली-भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे, त्यामुळे ही दोनदा क्रियापद वापरण्याची सवय आहे. 'जा रहा हुं/ आ रहा हुं' सारखंच 'जाऊन राहीलो'/'येऊन राहीलो'.. तुमच्या प्रमाण भाषेचा बाज आणि माज आम्ही बोलतांना का जोपासावा?
३. देवदेवस्कीचा विचार केला तरी हेच. पंढपुरच्या विठोबाच्या वारीला जाणारे वैदर्भीय मोजकेच असतील. त्यापेक्षा आजच्या मध्यप्रदेश-छ्त्तीसगड मधले देव जवळचे आणि पुर्वापार आहेत. रोटीबेटीचे व्यवहारपण मध्यप्रदेश-छत्तीसगडशी जास्त. (माझी स्वतःची आजी मध्यप्रदेशमध्ये माहेर असलेली) ही बाब माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याला लागू नाही..
३. कर्जाच्या बाबतीत तेच बोलतो, जे आधी बोललो होतो.. जे कर्ज विदर्भापायी, त्याच्या विकासासाठी झालंय, त्याचा बोजा विदर्भाला उचलावाच लागेल.
४. वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही..
माझ्याकडून ब्बास.. आता तेच ते बोलून कंटाळा आणि टंकाळा आलाय..
26 Mar 2016 - 2:25 pm | अभ्या..
हान तिज्यायला.
चिगो साह्यबाला एक पार्टी लागू ह्या जबरदस्त प्रतिसादासाठी.
मराठवाड्याचे जवळपास असेच आहे. रोटीबेटीचे व्यवहार सर्रास नसले तरी आंध्र आणि कर्नाटकात होतात.
26 Mar 2016 - 2:43 pm | तर्राट जोकर
एक्कीच मारा, सॉल्लिड मारा. __/\__
सुंदर, संयत, माहितीपूर्ण, वजनदार प्रतिसाद.
26 Mar 2016 - 2:50 pm | तुषार काळभोर
वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही.
+१ सहमत!!
-(भावनिक नसलेला, विनाकारणअतिसंवेदनशील नसलेला पश्चिम महाराष्ट्रीय)
26 Mar 2016 - 6:47 pm | भाऊंचे भाऊ
त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी
दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला
आम्हाला ते कधी स्पर्धक वाटले नाहित पण त्यांना मात्र आम्ही तसे वाटत असू तर दुर्दैव महाराष्ट्राचे.
बाकी भाषा दर10 km ला बदलते, रोटी बेटिचे व्यवहार जवळच्या अंतरात होत असतात म्हणून उगा ते एम्पित होतात की कर्नाटकशी हां दुय्यम भाग. बाकी तुमचे नेते नालायक पडले म्हणता आहात तर ते सुधाराना .. भलत्याच भावनिक बाबेला बळि पडून हे प्रिय नाही ते प्रिय नाही चा सुर कशाला ?
सगळ्यात जास्त वाईट हे वाटते की एक विदर्भिय मनुक्ष म्हणुन धागा लेखकाला अभिप्रेत धाग्यातिल मुद्दा आपण सपशेल भरकटवला आहे. त्यावर चार शब्द आले असते तर बरे झाले असते पण तुमिबी पच्चिम मराठी लोकावानी येग्लच बोलू रायला ना बे ?
28 Mar 2016 - 2:55 pm | चिगो
साहेब, 'पम'तल्या लोकांनाच 'एकी'चा उमाळा फुटतो, मग छत्रपती आठवतात नी शहीद आठवतात, वेगळ्या विदर्भाबद्दल बोललं म्हणजे हे ह्या धाग्यातल्या बव्हांश प्रतिक्रीयांवरुन स्पष्ट होतंय.. त्याबद्दल काय बोलू?
माझ्या माहितीत विदर्भात कुठंही असं काही बोलत नाही.. कृपा करुन वर्हाडीचा आव आणू नका. जमत नाहीये तुम्हाला..
26 Mar 2016 - 11:27 pm | काळा पहाड
हो, कारण इथं धागाकर्त्यानं धागा तयार करताना पश्चिम महाराष्ट्रातल्या (खरं तर विदर्भ आणी मराठवाड्यातल्या लोकांना वेगळ्ं राज्य हवं असल्यानं महाराष्ट्रातल्या म्हणायला हवं) लोकांना ते मोठ्या संख्येने विदर्भाबाबतीत प्रतिक्रिया का देतायत असा हेटाळणीचा सूर लावलाय. आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा काही फार संतवाणी नाही.
पण एवढं जर नागपूर प्रिय आहे, तर तिकडेच का जात नाही? दर पाच मिनिटानी एम एच तीस, एकतीस च्या गाड्या दिसतात. त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स. कशाला तुमच्यावर इतका अन्याय करणार्या परराज्यातल्या लोकांमध्ये रहायचं? मला खरं तर हे लॉजिक कळलेलं नाही. अन्याय सहन करत रहाण्याला काही अर्थच नाही ना!
तुम्हाला मेन प्रॉब्लेम सांगतो. या विदर्भात जे सरकारी नोकर, सरकारी शिक्षक इत्यादी (थोडक्यात भ्रष्टाचारी) लोकांना पैसा गुंतवायचाय तो पश्चिम महाराष्ट्रात. त्यांना खरं तर इकडं शिफ्टच व्हायचंय. ज्यांना हे शक्य नाही त्यांना वेगळं राज्य हवंय. तेव्हा घ्या तुम्ही दिल्लीत बंगला, माझं काही म्हणणं नाही, पण तुमच्या बंगल्याला वेगळं राज्य करण्याची मागणी करू नका. दिल्लीतले पोलीस फार मारतात म्हणे.
खिक! ते यूपी वाले झाले, मग बिहारी झाले (एक बिहारी सौ पे भारी वगैरे). आता तुम्ही आला. 'काँपिटीशन' म्हणे. हे म्हणजे बांग्लादेशानं दिलेली काँपिटीशन भारताला झोंबतंय म्हटल्यासारखं झालं. चड्डी में रहो मियां. वेगळं राज्य झाल्यावर उलट 'काँपिटीशन' कमी होईल माहितीये का? कारण परराज्यातल्या विद्द्यार्थ्यांना सध्या फक्त मॅनेजमेंट सीट वरच प्रवेश मिळतो. आणि मग पुण्या मुंबईत शिकायला येण्याचे तुमच्या लोकांचे मार्ग उलटे बंद होतील. जास्त कॉलेजेस कुठल्या प्रदेशात आहेत हे माहितीये ना?
तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्या' वगैरे सुचतं हो..
जोपासू नका. तुमचं वेगळं राज्य झालं की हिंदीचा प्रभाव असलेली भाषा प्रमाण करा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, वैदर्भी नाही. तस्मात, ते हिंदी बरोबरचं म्यूटंट मराठी 'तिकडे'.
बरोबर आहे. विदर्भ इज इक्वल टू नो शिवाजी महाराज, गॉट इट.
आमची ना नाही. तुमच्या वेगळ्या विदर्भाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा.
सी? या बाबतीत सुद्धा माझे विचार सेम.
बिलकुल. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
तात्पर्य, माझा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे, वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा. फक्त तुमचे नेते आणि 'काँपिटीशन' देणारे पोरं पोरी यांना बहुधा पुण्या मुंबईत स्थायिक व्हायचंय. तेव्हा एकदा मिटींग करा, काय ते नक्की ठरवा आणि मग सांगा. तुकडा पाडून टाकू. हाय काय नाय काय.
28 Mar 2016 - 2:50 pm | चिगो
झोंबलीय ते दिसतंय.. असोच..
अरेच्च्या.. चड्डीत आहोत तरी 'रिअल इस्टेट'चे भाव वाढलेत की.. बाहेर आलो तर काय होणार?
अर्थात.. आणि सीट्सचा जोगवा मागत पार इथं मेघालयातल्या माझ्या ऑफीससमोर बसतात हो दोन-दोन तास ही लोकं.. यादी हवीय का?
ते आमचं आम्ही बघू.. आम्ही आमच्याच पद्धतीची मराठी बोलणार. तुमचा माज तुमच्याजवळ ठेवा. आणि शक्य असल्यास ते 'मराठीच्या सक्ती' विरोधात निरुपम वगैरे बोंबलत असतात, ते जमतंय का सांभाळायला ते बघा. नाही, 'तुमच्या' मुंबईत होतंय हो हे सगळं..
सदिच्छांसाठी धन्यवाद.. ऐपत असेल तर घेऊही. बाकी पोलिसांची चिंता सोडा. त्याची आम्हाला पर्वा नाही. उद्या 'महागड्या' वैदर्भियांविरुद्ध आंदोलन-बिंदोलन करायचा विचार असेल तर तुम्हालाच ती चिंता..
एकंदरीत, वेगळा विदर्भ व्हावा ह्यावर आपलं एकमत आहे.. त्याकरीता धन्यवाद..
28 Mar 2016 - 5:06 pm | ब़जरबट्टू
त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स.
हा तुमचा निव्वळ माज आहे साहेब. पुण्यात २००५ पर्यंत काय दशा होती रियल एस्टेट ची ते आठवा जरा.. चार कंपन्या आल्या म्हणून तुमच्या जागेला सोन्याचा भाव तरी आलाय..या परराज्यातून आलेल्या लोकांच्या भरवश्यावरच कमवताहेत इथले , नाही तर बसले होते पेन्श्नर सिटी चा वांझोटा बोर्ड घेऊन... एव्हढा माज करू नका.. एकदा बजाज गेल्यावर औरंगाबादची व कंपन्या गेल्यावर मिशिगनची झालेली वाताहत बघा..
आयटी को आते और जाते देर नाही लागती दोस्त.. और शायद शुरुवात का शंखनाद हो चुका है :)
http://www.mh-31.com/nagpur/about-nagpur/nagpur-mihan-real-estate-land/6...
25 Mar 2016 - 10:52 pm | टवाळ कार्टा
महाराष्ट्रियन????? कि मराठी????? चायला आधी मराठी नीट लिहायला शिका की
25 Mar 2016 - 10:57 pm | नाना स्कॉच
मला ते "फ्लो" मधे सुचले तसे लिहित गेलो !, मला काय माहीती इथे व्याकरणाची परीक्षा होते आहे, तसे आपणांस जे गोड वाटेल ते वाचा, बाकी जमल्यास थोड़े सौजन्य शिकुन घ्या तोंडी लावण्यापुरते, बरे असते ते अनोळखी माणसाशी बोलताना, असो!.
रच्याकने,
पश्चिम महाराष्ट्रियन नसेल चालत किंवा चुक असेल तर काय लिहावे? "पश्चिम महाराष्ट्रातील मराठी"?????
25 Mar 2016 - 11:00 pm | तर्राट जोकर
=))
25 Mar 2016 - 11:06 pm | नाना स्कॉच
भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर बुआ!
डोके उठल्यावर ही निमुट मुग गिळून बसणे अन सौजन्य पाळणे हेच बहुदा गृहस्थाश्रमाचे वैश्विक सार असावे असे वाटते आहे आम्हांस आजकाल!
त्या बबल्याला सांगा बॉयल सिंग आण म्हणा एक कंप्लीमेंट्री!!!
25 Mar 2016 - 11:14 pm | तर्राट जोकर
काटेरी, आगलावू प्रतिसाद देण्याची शक्ती विशिष्ट आयडींकडे मुक्तपणे उपलब्ध असे पर्यंत आपण मूग, चणा, शेंग गिळत राहू.
25 Mar 2016 - 11:21 pm | नाना स्कॉच
मोगांचे नावही घेऊ नका!! ;) चढ़ली दारू उतरंल!! काटेरी प्रतिसाद देणारे तेच एक आहेत !! बाकी सगळे प्रतिक्रियावादी भद्रजन आहेत! काय समजलात मिस्टर!!!
26 Mar 2016 - 12:25 pm | तर्राट जोकर
प्रतिक्रियावादी भद्रजन =))
प्रतिक्रियावादी हा शब्द ब्रँचमधे शंभरदा घोटायला लावत असतील, तेव्हाच सगळीकडे यायला लागलाय.
25 Mar 2016 - 11:07 pm | टवाळ कार्टा
असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो...तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे...
सौजन्य काय अस्ते/कशाशी खातात याचे चांगले ज्ञान आहे मला
"प.महा.मधील लोक" असे लिहित चला की
रच्याकने तुम्ही पुणेकर असाल तर माझा पास
25 Mar 2016 - 11:16 pm | नाना स्कॉच
असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो...
हे अगोदरच बोलला असतात तर काय प्रश्न होता राजे! सेम शब्द ! समजुतीचा सुर कामे तड़ीस नेतो इतके फ़क्त ह्या निमित्ताने सांगतो देवा.
तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे...
चुक दाखवण्याला आक्षेप असता तर खाली "मग नेमके कसे लिहावे" विचारले नसते साहेब, आक्षेप चुक दाखवायला नसुन चुक दाखवायच्या पद्धतीला आहे , हे परत एकदा लक्षात आणून देतो. आपण वरती जे गळे काढणे वगैरे लिहिले आहे त्यात "आपण गळे काढतो" म्हणला आहात आपण बरे वाटते ते! हेच आधी बोलला असता तर आपल्याला आपल्या सौजन्याची सेल्फअट्टेस्टेड कॉपी (स्वसत्यापित प्रत) दाखवावी लागली नसती इतकेच ! :)
असो. लोभ असावा की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण रोष असू नये ही माझी वैयक्तिक विनंती आहे!
-नाना
26 Mar 2016 - 7:11 am | सातारकर
आपल नक्की काय विवेचन आहे लेखकान विचारलेल्या मुळ प्रश्नावर. आपले सर्व प्रतिसाद इतर प्रतिसादांना उत्तर दिसताहेत.
26 Mar 2016 - 7:41 am | नाना स्कॉच
हेच आहे की ,
1 विदर्भ वेगळा व्हावा की नाही ह्यावर लेखकाने भाष्य केलेले नाही (तसे मलाही ते करण्यात रस नाही)
2 लेखकाच्या म्हणण्यानुसार वेगळा विदर्भ ह्या विषयावर एकंदरित पश्चिम महाराष्ट्रातील जनता जास्तच आवेशपुर्ण होते (वरील काही दिव्य प्रतिक्रियांचा लाभ घ्यावात परत फिरून एकदा ही विनंती), अन लेखकाचे हे मत काही प्रतिक्रिया अन काही सदस्यांनी शब्दशः बरोबर ठरवले आहे
3 पुढे माझ्यामते लेखकाने हा प्रश्न विचारला आहे की असे का होत असावे?, त्याला कोणीच समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही, अगदी आपणही *"पश्चिम महाराष्ट्रातली माणसे लष्कराच्या भाकरी...." वगैरे वगैरे भावनिक खेळ केले आहेत. ते एक असोच्. पण वेगळा विदर्भ किंवा एकुणच विदर्भ म्हणले की पश्चिम महाराष्ट्रातील लोकं इतकी हाइपर का होतात हा प्रश्न अजुन अनुत्तरीत आहे! हे मात्र खरे!
*बरं लेखकाने "मग पश्चिम महाराष्ट्रातली जनता पोस्टिंग विदर्भात आल्यास मंत्रालयात खोके पोचवुन बदली का करून घेतात"?? असा ही प्रश्न विचारला आहे! एक उदाहरण डोळ्यासमोरचे आहे ते नंतर कधीतरी!
एकंदरित , लेखकाच्या लिखाणात मला तरी कुठेही अभिनिवेष दिसला नाही मात्र थेट प्रश्न दिसले जे बऱ्याचजणांस दुखवु शकतात, त्या प्रश्नांना उत्तरे नाहीत किंवा तेच प्रश्न वर्मावर वगैरे आहेत असेही मला वाटत नाही, फ़क्त एक निरिक्षण हे ही आहे की त्या प्रश्नांना बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने भावनात्मक जिंगोइसम आधारीत उत्तरे दिली आहेत , कोणीही त्या प्रश्नांना तर्काने कापू शकलेला नाही, उगाच स्वाक्षरी मधे " एक पश्चिम महाराष्ट्रियन माणुस" "मी एक पश्चिम महाराष्ट्रियन मराठी" वगैरे बोलून उपयोग नसतो/ इथे नाही!. मी तरी माझ्यापरीने ह्याला उत्तरे शोधून मग जरूर बोलल पण तुर्तास लेखकाचे मुद्दे भावनावेगात येऊन स्वहस्ते सिद्ध करायची आमची अजिबात मनीषा नाही.
26 Mar 2016 - 2:40 pm | सातारकर
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला.
हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही.
आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा.
अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
26 Mar 2016 - 2:51 pm | सातारकर
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला.
हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही.
आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा.
अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
26 Mar 2016 - 3:34 pm | नाना स्कॉच
1 प म मधील लोकं ही असं का करतात हे समजून घ्यायला मला बरेच सायास पडले बघा कारण आम्हाला आमचा कोष (*शब्द लक्षात ठेवा) तोडून बाहेर पडून ते पाहता ते एक टक्का समजले आहे असा आमचा समज आहे बघा, आपण केलेल्या भावनिक प्रतिपादनात अन मुळ प म मधील लोकांच्या वागणुकीत जमीन अस्मानाचे अंतर आहे ! असे एक "वेंटेज पॉइंट वर" बसता दिसुन येते बघा साहेब!! (U may please take all the offence in return of this hard truth) तुम्ही म्हणता तसे आम्ही किंवा आपण पश्चिम महाराष्ट्रातले लोक भारत/मराठी तेतुका एक ठेवायला झटतो . ओके ! पण आपण आपल्या सारखे नाहीत म्हणून इतर लोकांस हसतो सुद्धा! माना वा ण माना ती आपली मर्जी पण एखाद्या वैदर्भ माणसाने जर "बुआ आमच्याकडे अमुक गोष्ट अमुक पद्धतीने खातात" म्हणले की आपली रिएक्शन काय असते?? "आम्ही 'तसलं' खात नसतो" पुढे अजुन सुलभ करायचे म्हणले तर आपण ओवर सिम्पलीफिकेशन करतोय साहेब, आंबट चव घातलेल्या वरणाला "आमटीच" म्हणायचे "त्याला कुठं चिंचगुळ वरण म्हणतात वह्य!!!"
'ही रूपकात्मक उदाहरणे आहेत बरंका ! नाहीतर शब्दप्रमाणिक अर्थ शोधत वरडत हिंडसाला!!'
मालक पश्चिम महाराष्ट्र हाच प्रमाणित महाराष्ट्र आहे असा गोड गैरसमज तुम्हाला असलेला जाणवतो आहे, पण त्यांची संस्कृती वेगळी आहे!एनी आहे का?
आता नका म्हणू झेपले नाही! सार्वजनिक संस्थळावर अजुन स्पष्ट बोलणे शक्य नाही आम्हाला!
झेपले नाही तर आम्ही यड़े म्हणून सोडुन द्या !
टिप :- आपण आमचे आवड़ते शब्द हुड़कत बसा आम्हाला हरकत नाही फ़क्त उद्या त्याचा रोजमुरा मागु नका ही विनंती!!
27 Mar 2016 - 3:10 pm | स्वामी संकेतानंद
'अभिनिवेश' शब्दावर नाना स्कॉच ह्यांचे प्रेम पाहता त्यांना यंदाचा 'अभिनिवेश गुप्त' पुरस्कार जाहीर करण्यात येतो!