स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे

महासंग्राम's picture
महासंग्राम in काथ्याकूट
10 Dec 2015 - 11:54 am
गाभा: 

दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 12:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत का? असल्यास बोलून उपयोग नसेल, अन्यथा बोलण्यालायक अन चर्चा करण्यालायक खुप मुद्दे आहेत.

कळावे

(वैदर्भी) बाप्या

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 12:19 pm | महासंग्राम

बाप्पू तसं नाही पूर्वग्रह नक्कीच नाही, पश्चिम महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो तर आपला का नाही त्याला स्वतंत्र कशाला पाहिजे एवढंच बोलन हा मायावाला ….

चुभूदेघे

मनाने विदार्भीय असलेला मंदार

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2015 - 12:03 pm | प्रमोद देर्देकर

हम्म. टंकनसुख घेणारे येतीलच इतक्यात. किती करायचेत बोला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2015 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्तेतील सरकार शेवटच्या वर्षात स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेऊ शकतो किंवा तशी काडी पुढील मतदान घेण्यासाठी टाकू शकतात.
लहान राज्ये असली पाहिजेत विकसाची जास्त संधी असते फक्त आर्थिक सोर्स तितके मजबूत असले पाहिजेत. स्वतंत्र विदर्भ झाला की स्वतंत्र मराठवाडा राज्य झालंच पाहिजे आणि त्या आंदोलनात आम्ही असूच....!

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 12:21 pm | महासंग्राम

डॉक एकत्र राहून जर यांना विकास साधता येत नसेल तर आपले नेतृत्व कूचकामी आहे असेच म्हणावे लागेल

उगा काहितरीच's picture

10 Dec 2015 - 12:28 pm | उगा काहितरीच

मग काय औ'बाद राजधानी परभणी, हिंगोली , नांदेड , लातुर झाले एक राज्य ! जमल्यास बीड , उस्मानाबाद वगैरे जोडायच .

संदीप डांगे's picture

10 Dec 2015 - 12:31 pm | संदीप डांगे

स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर काहीजणांची "भाकरी नसेल तर पुरणपोळी खा" ही भूमिका डोक्यात जाते.

विदर्भात नेत्यांमधे आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि मुदलात अशा नेत्यांची कमतरता आहे. बच्चू कडू सारख्यांनी हे आंदोलन हातात घेतले तर विदर्भ होणे आणि त्याचा विकास होणे अवघड नाही.

बाकी. बोलण्यासारखे बरेच आहे. चर्चा पुढे गेल्यास उडी टाकूच.

बावाजी पन सारेच कुटी कडू हायीत तीतच आपलं खेटर अडकते ना

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 12:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन बरे वाटले काही मुद्दे मांडतो ह्यांचा सविस्तर उहापोह झाल्यास काहीतरी उत्तम चर्चा होऊ शकते

पण त्या आधी काही एक डिस्क्लेमर :- मी हलके प्रतिवाद करणार नाही वैयक्तिक होणार नाही अन वैयक्तिक झालेल्यांकडे लक्ष ही देणार नाही

मुद्दे खालील प्रमाणे

१ अनुशेषभरती संबंधी आपली वाक्ये पाहता हे सांगावे वाटते की अनुशेष होता हेच आधी सरकार मानत नसे त्यांनी ते नंतर मानले , बरं मानले अन काही केले अश्यातला भाग नाही, तस्मात् राज्यपाल महोदयांना स्पेशल इंस्ट्रक्शन राज्यसरकार ला द्याव्या लागल्या तरीही त्यावर काही कारवाई होऊन पुढे किती अनुशेषभरती झाली हे कळाल्यास उत्तम होईल

२ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते

माझेही अगदी हेच म्हणणे आहे, वैयक्तिक/प्रांतिक आकस न ठेवता उत्तम चर्चा व्हावी हीच अपेक्षा आहे.

पहिल्या मुद्द्याबद्दल माझ्याकडे योग्य आकडेवारी नाही त्यामुळे इथे गप्प

२ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते

फली आयोगाने रिकमेन्डेशन दिले होते पण स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन सुरु झाल्याने विदर्भाची मागणी मागे पडली.

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 12:47 pm | प्रसाद१९७१

सोन्या बापु - विदर्भा वर वेगळा प्रतिसाद लिहीतोच. पण ह्या अनुशेष प्रकाराबद्दल लिहावे वाटले.
ज्यांच्या बाबतील अनुशेष आहे ( इथे विदर्भ ) त्यांना त्याच्या बाबतीत अजिबात दोषी न पकडता, ज्यांनी जमेत तितका विकास करुन घेतला आहे त्यांन दोषी ठरवणे गमतीशीर आहे. राजकीय रीत्या तर विदर्भाला आणि मराठवाड्याला मोठा काळ मुख्यमंत्री पद मिळाले आहे.

हे म्हमुल, एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार.

विदर्भ नैसर्गीक स्त्रोतामधे बाकी महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त नशिबवान आहे. तरी पण हे कायम मागासलेलेच

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 1:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक मिनिट!

अनुशेष आहे तो सरकार ने कबुल केलाय, "अनुशेष" म्हणजे इंग्लिश मधे "बॅकलॉग" विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर , तुम्ही वंचित आहात हा तुमचा दोष आहे ह्या प्रकारचे विधान हास्यास्पद वाटते दादा, उलट ज्यांनी विकासचक्र विषम ठेवले त्यांना दोष दिला तर तो अतार्किक कसा?? मराठवाड्यावर मी कॉमेंट करणार नाही कारण अभ्यास नाही विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच , मग जर कमी मार्क मिळणाऱ्या पोराने काही बोलले की त्यालाच बोल लावायचे ही कुठली रीत म्हणे दादा?? बरं विदर्भात जनतेची इच्छा नाही विकासाची असेही काही आढळले नाही मला तुमचे तसे काही निरिक्षण असल्यास नमूद करा त्यावर विचार करता येईल ही , फ़क्त ज्याच्या तोंडचा घास पळवलाय अन दुसऱ्याला चारला आहे त्याला तो चारलाय असे न म्हणता "मलाच का घास मिळत नाही" म्हणून स्वताड़न करणे आपल्याला अपेक्षित असल्यास मी त्याच्याशी तीव्र असहमत आहे

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 1:26 pm | प्रसाद१९७१

विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,

राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत?

राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?

विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,

विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे.

भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 2:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार खासदार निवडून येत नाहीत का?

वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो

विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे.

गल्लत होते आहे, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे पेन पेंसिल गाइड असे माझे म्हणणे नाही तर ते वापरायच्या परवानग्या म्हणजे पेन पेंसिल आहेत, चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात?

भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.

मुळात हे अतिशय अनइंफॉर्मड विधान आहे, १९५३ च्या नागपुर कराराच्यावेळी अनुशेषभरती हा मुद्दा होताच उगाच का घटनेने कलम ३७१(१) ची खास तरतूद केली असेल का? बरं १९५३ च्या आधी म्हणजे १९४७ मधे जर खुप जास्त सुबत्ता होती हे तुम्ही कबुल करता आहात तर त्याचा अर्थ हा बट्याबोळ महाराष्ट्रात येऊन झालाय हे एकार्थी मान्य करणे समजावे का? ३७१(१) नुसार अनुशेष अभ्यास १९८३ पर्यंत केला गेला नाही ह्यावरुन काय ते समजा, १९८३ मधे दांडेकर समिति स्थापन झाली जिचा रिपोर्ट १९८४ मधे सबमिट झाला तो तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांनी दाखलच करुन घेतला नाही! त्यानंतर थेट १९९१ ते ९३ सुधाकरराव नाईक, ह्यांना काम करायला किंवा अनुशेष भरती वर बघायला वेळ होता का? आठवा मुंबई दंगली, मग १९९५ मधे राज्यपालांनी विशेष आदेश देऊन नवी समिती बनवे पर्यंत सगळे ढिम्म, बरं ह्या आधी वैदर्भीय आमदार शांत बसले होते का हा उपप्रश्न तर अजिबात नाही १९८३ च्याच अधिवेशनात का त्याच्या २ वर्षे अगोदर (साल आठवेना नीट) सर्वपक्षीय वैदर्भी आमदारांनी सदनात हा अभ्यास व्हावा म्हणून ठराव दाखल केला होताच समजा काय ते! बरं ह्याआधी झालेले वैदर्भी सीएम होते त्यांनी काय केले? किंवा केले नाही हा प्रश्न विचारला जातो तर १९६० ची स्थापना नंतर एखाद वर्षे यशवंतराव मग त्यांचे केंद्रात प्रयाण (कृष्ण मेनन च्या जागी) त्यानंतर उणी पूरी दीड वर्षे कन्नमवार ते ऑन पोस्ट वारले त्यांच्यानंतर आले ते वसंतराव नाईक, बरं हे ह्या प्रश्नातले आवडते पात्र त्यांनी अकरा वर्षात काय केले? तर राज्य नुकते जन्माला आलेले,पहिल्या मुख्यमंत्र्याला केंद्रात तातडी ने जावे लागले, दुसरा एखाद वर्षात मरून गेला, परत निवडणूक प्रचार ह्यातुंन सुद्धा त्यांच्या औद्योगिक पॉलिसी साधक असल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचा पाया रचला गेला, बरं वरच्या प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे मुख्यमंत्री हा काटेरी मुकुट होय, लोकांना घी देखा पर बड़गा न देखा असे हे पद, बहुमत सांभाळा गवर्नेंस पहा विकास करा काँग्रेस पार्टी म्हणली का हायकमांड सुद्धा सांभाळा, ह्या सगळ्या नादात कोणाशी किती भांडणार अन विदर्भात काय ओढून आणणार? हे एक झाले शिवाय तुमच्या प्रश्नान्तर्गतच अजुन एक मुद्दा मांडतो, मुख्यमंत्र्याने राज्याचा समग्र विकास पहावा का फ़क्त आपल्या क्षेत्राचा? मला वाटते राज्याचा मुंबई ते विदर्भ अंतर पाहता मुख्यमंत्र्याने त्या काळात किती फिरावे? मग राज्याकडे लक्ष देणार की क्षेत्राकडे? मुळात मुख्यमंत्र्याने पुर्ण राज्याच्या विकासाकडे पहायला हवे की राव ते वसंतदादा ते शरदराव कोणी केले? मग आता सांगा पेन्सिली कोणाला मिळाल्या??

बॅटमॅन's picture

10 Dec 2015 - 2:43 pm | बॅटमॅन

खल्लास प्रतिसाद. _/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 2:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

शेवटच्या वाक्यावरुन पुढे सांगतो, माझे आजोळ तासगाव जिल्हा सांगली मधे आहे मी दोन्ही कडल्या कंडीशन पाहून आहे, वसंतदादा किंवा शरद पवार ह्यांनी जे केले ते चुकच होते (क्षेत्रकेंद्रित विकास) पण आजही लोक त्याला घटनात्मक अन बरोबर एंड codified duty of a legislative representative siting on post of CM मानतात तेव्हा मात्र ते एथिकल , मॉरल अन एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स वर चुक असतेच असते.

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 3:32 pm | प्रसाद१९७१

चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात?

सोन्याबापु - माझ्या प्रश्नाला तुम्ही टाळुन च मोठे उत्तर देत आहात. एकटा सीएम राज्यकर्ता नाही, ठीक आहे, मग ६० का ८० आमदार काय करतात? तुम्ही वर लिहीले आहे चंद्रपुर ची वीज पश्चिमेला जाते, मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का? अशी कशी परवानगी नटाव? आणि असले बिनकामाचे आमदार कसे निवडुन येतात वर्षानुवर्ष.

तसेच तुम्ही माझ्या दुसर्‍या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले आहे. प. महाराष्ट्रात पण असमतोल आहे. सांगली / कोल्हापुर ला दांडगे राजकीय नेतृत्व मिळुन पण आणि पाणी वगैरे असुन पण काही करता आले नाही.

पुण्याला राजकीय दृष्ट्या काडीची किम्मत नसताना, त्याच भागात कशी प्रगती ?

अमेठीतुन इतकी दशके पंतप्रधान निवडुन येत असुन अमेठीची हालत काय आहे ते तुम्हाला माहीती आहेच. हा दोष निवडुन येणार्‍याचा आहे का निवडुन देणार्‍याचा?

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 3:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का?

एक विनंती थोड़े भाषेचे भान असू द्याच आपण ही चर्चा डोकी फोडायला नाही तर डोकी चालवायला त्यांना खाद्य पुरवायला करतोय असे मला अजुनही वाटते, ते असो!

तुमच्या प्रश्नाचे उत्तर, मी वरतीच बोललोय "रस्ते विकासाच्या फण्ड ची मागणी करायला गेलेल्या नेत्यांस बसवणे दूर तर शिवीगाळ करून हकलुन दिले होते" मग आता सांगा ते लोकप्रतिनिधी करंटे म्हणावे का आपला न्याय वाटा मागायला आलेल्यांना अपमानित करून हकलणाऱ्या लोकांना करंटे म्हणावे?

आपले मुख्यमंत्र्याला सगळीकडे लक्ष देता येणे संभव नाही ह्या मुद्द्यावर एकमत समजू का?

बाकी तुम्ही म्हणता ते कसे मानु? कारण हे ८० आमदार सतत फंड किंवा न्याय पैसा आणायचा प्रयत्न करत असतात ते ही मी वर मांडले आहे, आपण ते मिस केलेत काय? मुळात अमरावती नागपुर चंद्रपुर अकोला आता बुलडाणा वाशीम सगळे लोक भांडण करून पैसा आणून विकास करीत आहेत , आक्षेप आहे तो "भांडण करावे लागण्याला" ज्याचा जो हक्क आहे त्याचा त्याला मिळायचा प्रश्न आहे न भाऊ!

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 4:20 pm | प्रसाद१९७१

सोन्याबापु,

माझा मुद्दा राजकीय नेतृत्वा पेक्षा तिथल्या जनते बद्दल होता. मी आधी पासुन सांगतोय, पुण्याला राजकीय दृष्ट्या काही किंमत नाही. तरी मग इथेच का जो काही विकास होतो तो होतो?

मागे राहीलेल्या प्रत्येकानीच स्वताकडे आत वळुन बघणे गरजेचे नाही का? दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार? त्यात इथे काही गुलामगीरी, मग दुसर्‍यां वर दोषारोप कीती वर्ष करणार?

२-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते?

मी नैसर्गीक स्त्रोत भरपुर आहेत असे लिहीले की तुम्ही म्हणणार वापरायला परवानगी नाही. खेचुन घ्यावी परवानगी.

तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे.

---------

पुन्हा विषयांतर

तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे,

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 5:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार?

दावा नाही पुरावे सुद्धा दिलेत , वाटल्यास अजुन देऊ शकतो, असो.

२-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते?

अब भाई जो है सो है !

खेचुन घ्यावी परवानगी.

कशी घ्यावी म्हणे? लोकशाहीत??

तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे.

अजिबात नाही, माझा रोख हा "विकासाचा क्षेत्रीय असमतोल" असे म्हणवतो, त्याची कारणे वगैरे मी देतोय, ह्यात तुम्हाला ब्रिटिश अन भारतीय वगैरे काय जाणवले तुमचे तुम्हाला माहिती देवा, आता विजेचे आहे असे त्याला तुम्ही मी काय करणार?

तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे

नंतर काय करणार आमदार? बरं तुमच्या कडल्या कर्तबगार आमदारांनी काय केले असते ते सांगा, जमल्यास आमच्याकडल्या लोकांस कळवतो,बरं तसंही नको, आमच्या मुळ जिल्ह्याचे राजे नशेत पक्षश्रेष्ठी वगैरे ना नको तिथे बांधत असतात आमदार खासदार कोणाचेही वाभाडे काढत असतात त्यांच्या विरोधात कुठल्या आमदाराने काय केले ते सांगा तसेच वागायला सांगतो भेट होईल तसे इकडील लोकांस!.

असो.

मला असे वाटते now lets agree to disagree brother :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 4:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

असला नाकर्ता भाग कशापायी ठीवाता मंग म्हाराष्ट्रामंदी?

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 4:56 pm | महासंग्राम

नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही, साधन संपत्तीच्या बाबतीत विदर्भ बर्यापैकी स्वयंपूर्ण आहे, आणि हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील ….

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 5:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हुनस म्हन्तोय मी
- अनिरुद्ध
(एक नागपूरकर)

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 5:35 pm | प्रसाद१९७१

नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही

हा प्रतिवाद न कळण्यासारखा आहे. विदर्भातले नेते आकाशातुन पडतात का प. महाराष्ट्र पाठवतो?

महासंग्राम's picture

11 Dec 2015 - 9:37 am | महासंग्राम

विदर्भातले नेते नाकर्ते आहे त म्हणून विदर्भाचा विकास रखडला आह इसा म्हणायचा आहे मला, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मधातच आणला, त्याबद्दल मी काही बोललोच नाही ओ ….

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2015 - 10:14 am | प्रसाद१९७१

अहो असले नाकर्ते नेते जनता च निवडुन देते ना का ते आकाशातुन पडतात असे मी विचारले होते.

बिहारींनी लालू ला निवडुन दिले आणि लालु नसता तर त्याच्या सारखाच कोणी गोलु, भोलु निवडुन दिला असता.

सुबोध खरे's picture

10 Dec 2015 - 7:25 pm | सुबोध खरे

महारष्ट्रात विजेचे वांदे होतील
असहमत
मुंबई मध्ये उद्योग ११ रुपये युनिटला या दराने वीज देतात. तेंव्हा विदर्भ वीज देऊन उपकार करतो आहे हि भाषा नको.गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे. आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. आकडे टाकणाऱ्या /फुकट्या लोकांसाठी नाही.सगळीकडे गरिबांसाठी फुकट गोष्टी देण्याच्या कोंग्रेसी संस्कृतीमुळे उर्जा क्षेत्र डबघाईला आलेले आहे.
माझ्या दवाखान्याला वीज ११ रुपये ३२ पैसे अधिक इंधन अधिभार अशी आहे. तेंव्हा २४ तास वीज पुरवतात हे काही उपकार नाहीत. स्वतःचे जनित्र यापेक्षा स्वस्त पडते पण प्रदूषणाचा बागुलबुवा दाखवून उद्योगाकडून वीज घ्यायची आणि "गरिबांना"/ आकडे टाकणार्यांना फुकट वीज द्यायची यामुळे महावितरण डबघाईला आलेले आहे.
पहा http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Curious-case-...

महासंग्राम's picture

11 Dec 2015 - 9:35 am | महासंग्राम

गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे.

इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल

<<इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल >>

महाराष्ट्र विज घेते. त्याचा करार आहे.
प्रथम तत्कालीन राज्यकर्त्यानीं करार करायला टाळाटाळ केली होती. कारण उघड आहे. तीन पैकी दोन राज्यातील मुख्यमंत्री शत्रु पक्षाचे होते. असो.

कालांतराने करार होउन या प्रकल्पातुन होणार्या विजनिर्मीती पैकी { 1,450 MW installed capacity (1 billion kWh every year) } २७ % विज महाराष्ट्राच्या वाट्याला येते.

There are two power houses viz. River Bed Power House and Canal Head Power House with an installed capacity of 1200 MW and 250 MW respectively. The power would be shared by three states - Madhya Pradesh - 57%, Maharashtra - 27% and Gujarat 16%. This will provide a useful peaking power to western grid of the country which has very limited hydel power production at present.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Dec 2015 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु

आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी.

ह्या वाक्याचा अर्थ काय डॉक्टर साब? चंद्रपुरात कोणी पैसे द्यायला तयार नाही हे? की मुंबईकर ११₹ देतात त्याचा टेच? मुळात धंद्यात पैसे असले तर देणारे अन घेणारे कोणीच उपकार दर्शवु नयेत कारण त्याच्यामागे शुद्ध "डिमांड एंड सप्लाई" चा नियम असतो हे मी तुम्हाला सांगणे बरे दिसणार नाही बॉस, आम्ही देतोय कारण आमच्याकडे सप्लाई आहे अन तुम्ही घेताय कारण तुमच्याकडे डिमांड आहे, शिवाय गुजराती वीज स्वस्त पड़ते आहे तर घ्या की ती, ११ रु/यूनिट तुम्ही सांगता आहात त्यात फायदा विदर्भाचा तो काय आहे? मुंबई म्हणजे तुम्ही काही एमएसईडीसीएल कडून वीज घेता आहात का अंबानी अन टाटा कडून घेता आहात हा विचार ही करा, ट्रांसमिशन लॉस अन बाकी ग्रिड maintainance वगैरे पाहता आम्हाला थोड़ी स्वस्त का होईना पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ला वीज देने परवडल हो

सुबोध खरे's picture

11 Dec 2015 - 12:56 pm | सुबोध खरे

आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी.
बापूसाहेब
उद्योगधंदे मग ते मुंबईत असोत कि विदर्भात त्यांना ११ रुपयांनी वीज घ्यावी लागते आहे. हा क्रॉस सबसिडीचा प्रकार आहे.
वरील उत्तर आपल्याच मित्रांना आहे जे म्हणतात "मुंबईने आपली वीज वगैरे पाहून घ्यावी." विदर्भाने दिली नाही तर उद्योगांना ११ रुपयांनी वीज द्यायला कोणतेही राज्य किंवा प्रांत तयार होईल. की मुंबईकर ११ रुपये देतात त्याचा "टेच?" हि टेचाची भाषा आपणच लिहित आहात. मुंबई विदर्भावर अवलंबून आहे इ भाषा आपलेच मित्र वापरत आहेत.
मुंबईला वीज पुरवण्यासाठी कोयना १९६० मेगा वॉट आणि एनरॉन २२२० मेगा वॉट हे दोन प्रकल्प पुरेसे आहेत.त्यात तारापूरचे १४०० मेगा वॉट घ्या उरण ६७२ मेगा वॉट, ट्रॉम्बे १८० शिवाय खोपोली भिवपुरी भिरा इ मुंबई च्या जवळचे प्रकल्प पाहिलेत तर विदर्भातील वीजच काय गुजरातची सुद्धा वीज घ्यायची मुंबईला मुळीच गरज नाही हे आपल्याला लक्षात येईल. हे सर्व उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्यांना मायबाप सरकार देत असलेल्या फुकट विजेची बिलं भरण्यासाठी महाविज इकडची सबसिडी तिकडे करते त्यासाठी आहे हे आपल्या लक्षात येईल.
मुळात अजून विदर्भाची वीज मुंबईला येत नाही तर ती पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनलाच जाते आहे हे पण पाहून घ्या
A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5] https://en.wikipedia.org/wiki/Koradi_Thermal_Power_Station
एकदा हे पण बघून घ्या न
http://www.business-standard.com/article/opinion/why-mumbai-gets-24x7-po...
जाता जाता गुजरात मॉडेल पण वाचून घ्या त्यात http://www.business-standard.com/article/economy-policy/rajasthan-looks-...
राहिली गोष्ट
A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5]

सुबोध खरे's picture

11 Dec 2015 - 1:13 pm | सुबोध खरे

जाता जाता
(जर आणि जेंव्हा) जैतापूर अणुविद्युत प्रकल्प झाला तर तो ९९०० मेगा वॉट इतका प्रचंड असेल.
https://en.wikipedia.org/wiki/Jaitapur_Nuclear_Power_Project

संदीप डांगे's picture

11 Dec 2015 - 9:31 pm | संदीप डांगे

चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद होत आहेत.

सुबोधजी, आपल्या ह्या मतावर

समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे
नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे.
आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.

मी ही टिप्पणी केली आहे.
ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.
माझ्या टिप्पणीत विदर्भावर रोख नाही. तर मुंबईकरांच्या फुकाच्या टेचावर आहे.

'मुंबईचा पैसा' हे शब्द खटकले.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 9:39 am | सुबोध खरे

डांगे साहेब
मुळात तो प्रतिसाद विनोदी होता.
पण तरीही त्याच्या प्रतिसादात आपला मुंबईबद्दल आकस दिसून येतो.
अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली
चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग!
हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील
ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.
तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना

हि सर्व वाक्ये कुणी म्हटली आहेत? जसे काही मुंबई विदर्भाच्या मेहेरबानी वर जगते आहे?

प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे जर तुम्ही मी दिलेल्या दुव्यांवर लक्ष दिलेत तर लक्षात येईल. शिवाय डॉ श्रीकान्त जिचकार काय म्हणतात तेही नीट वाचा. राहली गोष्ट मुंबईच्या पैशाची . आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात. ते वाक्य पूर्ण वाचा
"समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे
नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे.आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील."
हे पूर्ण वाक्य आहे.
तुम्हाला मुंबईचा फक्त पैसा दिसतो. मुंबईचे अविरत कष्ट दिसत नाहीत. २६ जुलै च्या महा प्रलयानंतर मुंबई २७ जुलैला परत आपल्या पायावर उभी राहिली. कुणाच्या प्याकेजची वाट न पाहता.
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत. कष्टामुळे मुंबईत पैसा येतो.मुंबईत "भारतभरातून" कष्ट करण्याची तयारी असणारी माणसे येतात यात विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश बिहार सुद्धा येतात. ते कष्ट करतात आणी पैसा कमावतात. हि मुंबईची संस्कृती आहे. त्याचा दुश्वास का?
In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar.

Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''.
हे परत एकदा वाचून घ्या

महासंग्राम's picture

12 Dec 2015 - 12:52 pm | महासंग्राम

वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत

वा वा चक्क पुलंची आठवण करून दिली ना बाप्पा तुमी

तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ???

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 1:19 pm | सुबोध खरे

ते पुलंचेच वाक्य आहे. ( आम्ही स्वयंभू नाही परप्रकाशित आहोत)
पुलांच्याच शब्दात -- मुंबई नागपूर जाण्यायेण्याचा खर्च जमा धरता मुंबईत संत्री विकत घेऊन खाणे स्वस्त पडेल.
तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ???
नको हो
कशीही असली तरी आपली माय माउली मुंबईच बरी

वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत

संत्री हिवाळ्यात येतात (कालच ठाण्यात विकत घेतली - डायरेक्ट फ्रॉम वैदर्भिय शेतकरी!) आणि वाळ्याचे पडदे लागतात उन्हाळ्यात!

मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?

महासंग्राम's picture

12 Dec 2015 - 1:46 pm | महासंग्राम

मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?

पुलंनी इनोद केला होता व तो जरा हलक घ्या ना बाप्पा

चिगो's picture

14 Dec 2015 - 4:25 pm | चिगो

थेच तं.. च्याबहीन, उन्हाळ्यात ना मिरीगाचा संत्रा येत ना आंबियाचा.. कोण खात बसन तवा?

बाकी पुलं आमच्या आवडत्या लेखकांत असले, तरी पुलंवाक्यम प्रमाणम मानून आम्ही अश्या गैरसमजांना बळी पडणार नाही..

होबासराव's picture

12 Dec 2015 - 1:31 pm | होबासराव

.

विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे.

या वाक्याचा काही विदा आहे का ?

सोन्याबापू…तुम्ही या वाक्याशी सहमत आहात का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Dec 2015 - 10:56 am | कैलासवासी सोन्याबापु

पार्शियली एग्रीड हाओ चिनार भाऊ,

नैसर्गिक "स्त्रोत" म्हणले तर मी ते अमान्य करतो पण नैसर्गिक "संपत्ती" म्हणले तर काही अंशी मान्य उदाहरण कोळसा, वनसंपत्ती , खनिज वगैरे विदर्भात आहेत, पाऊस तितकासा नाही (पण ते नैसर्गिक कारण आहे), नद्या नाहीत मोठ्या (एक वर्धा नदीचा अपवाद सोडता)

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 1:26 pm | प्रसाद१९७१

विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,

राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत?

राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?

विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,

विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे.

भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 1:34 pm | प्रसाद१९७१

सोन्या बापु - माझा युक्तीवाद फक्त विदर्भ आणि प. महाराष्ट्राच्या बाबतीत नाहीये. प. महाराष्ट्रात पण असमतोल विकास आहे. पुणे पुढे गेले, कोल्हापुर मागे राहीले आणि सातार्‍याला तर कोणी विचारतच नाही.

खरे तर १९७०-८०-८५ मधे कोल्हापुर पुण्यापेक्षा फार च संमृद्ध होते. पैसा होता, शेती / पाणी होते, औद्योगिक वसाहती पण होत्या. मग गोळ कुठे झाला? का तिथे पण राज्यकर्त्यांनी कोल्हापूर चा वाटा पुण्याला दिला असे म्हणाल तुम्ही. खरेतर गेली चार दशके पुण्याला राज्याच्या राजकरणात किंमत नाही.

१९५० साली चीन भारतापेक्षा वाईट स्थितीत होता आणि पाकीस्तान आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा बर्‍या स्थितीत. २०१५ साली काय परीस्थिती आहे? ह्यात दोष कोणाचा? चीन कडे भारतानी अनुशेष भरुन देण्याची मागणी करायची का?
भारतात तर लोकशाही आहे, मग का नाही जनता चांगल्या काम करणार्‍या माणसांना निवडुन देत?

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 12:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

बच्चू कडु सेन्सेशनलिस्ट आहे! बेंजामिन फ्रैंकलिन ने जन्माला घातलेली ही राजकीय विरोधाची संकल्पना आहे डांगे साहेब, ह्या भाकरी नाही तर पुरणपोळी कॉमेंट वरुन एक अजुन सुचले आहे

वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो , बाकी तुम समझदार है गाववाले! ;)

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 12:49 pm | प्रसाद१९७१

स्वतंत्र विदर्भ तर कराच, पण ते नाही जमले तर मराठवाडा महाराष्ट्रापासुन वेगळा करा. त्याचा फार त्रास होतो.

मराठी_माणूस's picture

10 Dec 2015 - 12:53 pm | मराठी_माणूस

नागपुर ची मेट्रो घोषीत केल्या बरोबर पुण्याहुन आरडा ओरड सुरु झाली

चिगो's picture

10 Dec 2015 - 1:15 pm | चिगो

मी काय म्हणतो, होऊ द्याच ना वेगळा विदर्भ.. अरे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे हा.. हिंदी बोलणारी इतकी सगळे राज्ये आहेत, आणि मराठी बोलणारं एकच? विदर्भ वेगळा करा आणि मराठीचं संख्याबळ वाढवा..

असो.. आता जरा सिरीयसली बोलतो..
१. अनुशेष आणि अनुदान नेमका किती देण्यात आला, ह्याची काही आकडेवारी? कशावरुन ह्या ना त्या कारणाने त्याला रोखून 'तुम्हाला पैशांचा उपयोगच करता येत नाही' ह्या नावाखाली मदत थांबवण्यात आली नाही?

२. एका महीन्याचं अधिवेशन घेऊन खरंच काही फायदा आहे का?

३. जिल्ह्याचं मुख्यालय लोकांच्या जास्त जवळ जावं, म्हणून छोटे जिल्हे बनवल्या जाताहेत आता, मग राज्याचं मुख्यालय असं एक कोपर्‍यात का? मग विदर्भातल्या माणसांना मुंबईला जाण्याचा त्रास का? गोंदीया-मुंबई हे अंतर गोंदीया-दिल्ली इतकंच आहे जवळ जवळ..

४.

'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.'

हे मत कशावरुन?

५. मुंबईमुळे महाराष्ट्राच्या खजिन्यात मोठी भर पडते, व त्यातून मिळालेल्या पैशांची विदर्भाच्या विकासासाठी मदत मिळते, हे मान्य.. पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का? असल्यास शेअर करावा, ही विनंती.

६.

एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार.

पुन्हा तेच.. आराम केल्याने मार्क कमी पडताहेत कि गुर्जीलोकं पार्शालिटी करताहेत, हे कोण ठरवणार व कसं?

राही's picture

10 Dec 2015 - 1:21 pm | राही

स्वतंत्र विदर्भ हे नक्की मराठीभाषिक असेल काय?

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2015 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी

स्वतंत्र विदर्भ १००% मराठीभाषिक राज्य असेल याबाबत अजिबात शंका वाटत नाही. तसेच राज्याची अधिकृत भाषा हिंदी नसूनही बहुतांश जनता उत्तम हिंदी बोलणारे राज्य असेल.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी विदर्भ मध्य प्रांताचा हिस्सा होता ज्यात आजचे मध्य प्रदेश व छत्तिसगढ या राज्यांचेही भूभाग होते. तेव्हा मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती अन अधिकृत भाषा हिंदी व मराठी या होत्या.

विदर्भात ज्या लोकांची मातृभाषा हिंदी आहे व जे रोजच्या व्यवहारात हिंदी अधिक वापरतात ते सहजपणे मराठी माध्यमांच्या शाळेत शिकतात व शासकीय कामांसाठी मराठीत पत्रव्यवहार करतात.

बाकी वैदर्भिय बोलीभाषेत अनेक मराठी शब्दांचा वापर सहजपणे होतो ज्यांसाठी महाराष्ट्राच्या इतर भागांत हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरले जातात.

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 1:47 pm | महासंग्राम

'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.'
हे मत कशावरुन?

मी स्वतः विदर्भातला आहे म्हणून इथल्या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे असे मला वाटते, उद. द्यायचं झालं तर अकोल्याचे देता येईल अकोल्यात महापालिका झाल्यावर चंद्रशेखर रोकडे, श्रीकर परदेशी यांसारखे आयुक्त/जिल्हाधिकारी लाभले होते पण करंट्या राजकीय नेतृत्वाने त्यांचा फायदा न करून घेता पाय ओढण्यातच धन्यता मांडली .

मित्रहो's picture

10 Dec 2015 - 3:56 pm | मित्रहो

पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का?

फार पूर्वी श्रीकांत जिचकार यांचे लेख वाचल्याचे आठवते ज्यात विदर्भातून त्यावेळेला येनाऱ्या पैशातून विदर्भाची वाढ होउ शकनार नाही असे सांगितले होत. मुख्य कारण होते खाणी किंवा इतर नैसर्गिक साधनातून येणाऱ्या उत्पन्नांचा मोठा हिस्सा केंद्रसरकारला द्यावा लागतो. लेख फार जुने आहेत तेंव्हा लिंक नाहीत.

काही बाबतीत आकडेवारी तपासून अभ्यास करायला हवा
छोटी राज्ये केल्याने विकास होतो का ढोबळ मुद्दे असे
बाजूने मुद्दे
- छत्तीसगडमधे राबविलेली सार्वजनिक वितरण प्रणाली ही आदर्श मानली जाते.
- रायपुर, बिलासापुर ही शहरे लहानपणांपासून बघत आलोय, शहरांचा विकास वेगळ्या राज्यानंतर झपाट्यात झाला.
- हैद्राबाद सारख्या शहरात तेलंगणा वेगळा झाल्याने काही थांबले नाही. उलट निर्णयक्षमतेअभावी रेंगाळून पडलेली कामे वेगात पूर्ण झाली. विजेची समस्या सोडवण्यात यश आले. आता पाणी ही मोठी समस्या आहे त्यावर सरकार काय करते बघायला हवे.

विरुद्ध मुद्दे
- छत्तीसगडमधला नक्षलवाद तसाच कायम आहे.
- झारखंडला कित्येक वर्षे स्थिर सरकार लाभले नव्हते. तिथला भ्रष्टाचार.
- राजकीय अस्थिरता आणि त्यानिमित्त्याने होऩारी घोडेबाजी.

विदर्भ स्वतंत्र, मराठवाडा स्वतंत्र, मग उत्तर महाराष्ट्रानेच काय घोडं मारलंय? नाशिक, नगर सह उत्तर महाराष्ट्र झालाच पाहिजे. जिल्हे कमी पडत असतील तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याची थोडी जोडतोड करा. म्हणजे धुळे-जळगाव-नंदुरबारच्या भरीला नाशिक, नगर, औरंगाबाद, बुलडाणा उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबादच्या बदल्यात वाशिम यवतमाळ मराठवाड्यात. विदर्भ खूप मोठा आणि मोठ्या मनाचा आहे. एकदोन जिल्हे इकडेतिकडे झाले तर फरक पडत नाही.
पण तुळजापूर आणि जोगाईचें आंबें महाराष्ट्राबाहेर जाणार! आहे, त्यावरही उपाय आहे. मराठवाड्याने 'महाराष्ट्र' या नावावर क्लेम सांगावा. मराठवाड्याला आंदोलनाची सवय आहे. अ‍ॅडिक्शनच जणू. बरीच वर्षं झाली एखादं मोठं आंदोलन नाही झालं. तेव्हा होऊन जाऊं दे.

स्वामी संकेतानंद's picture

10 Dec 2015 - 2:27 pm | स्वामी संकेतानंद

कोथरूड, कर्वेनगरसह वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 2:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

आलास भाड्या!!! ये ये असा समोर ये न एक झाडीबोलीतली कविता दे

स्वामी संकेतानंद's picture

10 Dec 2015 - 2:46 pm | स्वामी संकेतानंद

खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते
मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते

जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर
बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते

-- स्वामी संकेतानंद

शब्दार्थ

बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे,
मिरगात= मृग नक्षत्रात
तऱ्याची पार= तळ्याचा बाँध
सब्बल= पहार

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 2:56 pm | महासंग्राम

दिल खुश कर दिया स्वामीजी आपने ….

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 4:50 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त!

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 2:57 pm | महासंग्राम

आमचेही अनुमोदण (नाकात बोलून) पण पाणीपुरी हे राष्ट्रीय खाद्य ठेवले तरच

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 5:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

वाईच, टेकडीपल्याड आमचं बावधान आहे … त्येबी सामील करून घ्या.

सुबोध खरे's picture

10 Dec 2015 - 3:03 pm | सुबोध खरे

सगळे लोक आपल्या विकासाची री लावून धरतात.
आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही.
ते काही नाही.
समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे
नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे.
आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.

नाखु's picture

10 Dec 2015 - 3:21 pm | नाखु

फक्त पिंप्री-चिंचवड वेगळं राज्य झालं पाहिजे..

चिमण्,वल्ली आहेतच फक्त चौराकाकांची वाट पहातोय..

नाव आडनाव's picture

10 Dec 2015 - 5:44 pm | नाव आडनाव

(राज्य झाल्यानंतर) पिंपरी-चिंचवड मधून वेगळं करून विशालनगर राज्य झालंच पाहिजे.

महासंग्राम's picture

10 Dec 2015 - 3:25 pm | महासंग्राम

आमच्या मुंबईचा कोणी वालीच नाही

साहेब मुंबईच बजेट ३५,००० कोटी रुपये इतके आहे जे कि जगातल्या एखाद्या छोट्या देशाइतके आहे, अजून काय पाहिजे ओ तुम्हाला. आधीच डूबाले आली तुमची मुंबई कुटी जानार बाप्पा एव्हडा पैसा घेवून…

मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.

आणि मुंबई चा पैसा मागतेच कोण विदर्भाला स्वःताच्या हक्काचा पैसा पाहिजे.

प्रसाद१९७१'s picture

10 Dec 2015 - 3:34 pm | प्रसाद१९७१

आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील.

आम्हाला मुंबई चा पैसा नकोच. आमचा पैसा थेट हम्रीकेतुन येतो.

संदीप डांगे's picture

10 Dec 2015 - 3:42 pm | संदीप डांगे

ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.

हेहेहे बावाजी कौन अस करायले तुमी , तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना ….

सुबोध खरे's picture

10 Dec 2015 - 8:05 pm | सुबोध खरे

हे पण बघून घ्या न भौ
Today, the collection is up to 98 per cent in residential, commerical and industrial categories. In agriculture, the collection is just 20-25 per cent. -

See more at: http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharasht...
http://indianexpress.com/article/cities/mumbai/power-tariff-in-maharasht...
पहा विदर्भाची वीज किती स्वस्त आहे आणि किती महाग

आणि हे पण पाहून घ्या न
If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.'' ``The region's share is burdened by a deficit of Rs. 2,848 crores and Monopoly Cotton Purchase Scheme, Employment Guarantee Scheme and such activity will immediately cease since we would not have money to pay salaries.'' All available resources - iron ore, surplus power generation, forestry - would not be enough.

In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar. ``Are we to agree simply because some people raise the issue which is not a people's issue at all? Are Congressmen to back a demand which was not in the party's manifesto in the recent polls to both Assembly and the Lok Sabha?''

Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''. Inadequate development and progress is cited as one reason for demands for separation apart from ``step-motherly treatment'' by the people of the rest of the State.

If the Fazal Ali Commission of the 1950s found Vidarbha viable it was on the relative position of other regions of Madhya Bharat, and that cannot be paraded now in support of a separate State, says Dr. Jichkar. ``It is a political demand unconcerned with its viability and it will convert the region into a agriculture State,'' he adds.

http://www.thehindu.com/2000/09/09/stories/0209000g.htm

महासंग्राम's picture

11 Dec 2015 - 9:40 am | महासंग्राम

If Vidarbha is hived off, Dr. Jichkar says, ``we will have no funds from day one to run the new State.''

सहमत आहे सर म्हणूनच वेगळा विदर्भ नको म्हणतोय मी, पण धागा वेगळ्याच लायनीवर चालला आहे

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 4:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

केंद्रशासित करून टाकावी ;)

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 4:38 pm | कपिलमुनी

आमचा पुणे पहिल्यापासूनच स्वतंत्र राष्ट्र असल्याने सदर विषयाला पास !

चुकलात मुनीजी पुणे स्वतंत्र विश्व आहे… ज्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणारे 'पुणेकर' नावाचे प्राणी राहतात

सतिश पाटील's picture

10 Dec 2015 - 4:52 pm | सतिश पाटील

आमास्नी बी आमचा कवठे महांकाळ आणि तासगाव तालुका सांगलीस्न येग्ळा करुनशान सोतंत्र राज्य करून द्या...

कारन आमच्याकडबी पान्याचा,
उसाला आन द्राक्षाला भावाचा,
कुस्ती पैल्वानास्नी चांगल शिक्शान आन प्रोत्सानाचा,
लावणी आन तमाशाला चांगल्या प्रेक्षकांचा,
यष्टी ला वडापचा,
आन बुकं शिकलेल्या पोरास्नी नोकरी धन्ध्याचा लय मोठा प्राब्लेम हाय...

मी तर म्हणेन एकूणच सांगलीचा पूर्वभाग तसाही तोडला तरी कै अडचण नाय. =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Dec 2015 - 5:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

ताकारी कराड रोड अजुन डोसक्याला शॉट हाय का हो गॉथम नरेश? तिकड़े तुमची बॅटमोबिल बी पंचर होईल देवानु =))

स्वामी संकेतानंद's picture

10 Dec 2015 - 5:51 pm | स्वामी संकेतानंद

लवकर तोडा नायतर आधी पार्श्वभाग तुटेल! ;)

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 5:54 pm | कपिलमुनी

अजूनही तसाच आहे .

ताकारीहून कराडास कधी गेलो नाय ओ. एकतर एनेचफोरने डिरेक्ट कराड नैतर कोयनेने ताकारी वगैरे, सबब माहिती नाय.

ताकारी कराड रस्ता सुधारला आहे. पण प्रवास कंटाळवाणा आहेच.

१) १८१८पर्यंत दोन शतके पुणे हे राज्यकर्त्यांचे वसतिस्थान होते. राजधानीच.
२) त्यानंतर ब्रिटिशांनी आपला सैनिकी तळ पुण्याला स्थापन केला. सदर्न कमांड्चा विस्तीर्ण पसारा पुण्यात जागोजागी पसरलेला आहे.
३) गेल्या वीस-पंचवीस वर्षांत एका नजाणत्या (म्हणे) राजाने हिंजवडी, मगरपट्टा आणि तत्सम ठिकाणी आय्टी पार्क नावाच्या अद्भुत नगर्‍या स्थापन केल्या.
पुणेकर खूप हुशार. पुणे किती भरभराटीला आले आहे पाहा. अगदी इतर कोणी काहीही न करता.

प्रसाद१९७१'s picture

11 Dec 2015 - 9:01 am | प्रसाद१९७१

उद्या तुमच्या साठी सण च असेल राही ताई. आमच्या काकांचा वाढदिवस आहे म्हणजे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Dec 2015 - 7:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

ब्रिटीशांची प्रांतरचना चांगली होती ;)

नसत्या अस्मिता अन नसते प्रॉब्लेम तरी नव्हते :D

महासंग्राम's picture

11 Dec 2015 - 9:43 am | महासंग्राम

अनिरुद्ध बापू कोणत्या आधारावर म्हणता आहात तुमी जरा ते तरी कळू देत ब्रिटीशांच्या प्रांतरचना स्वीकारली असती तर आता जो भारत दिस्तोय तो पण नसता दिसला.

सिरुसेरि's picture

11 Dec 2015 - 1:59 pm | सिरुसेरि

विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांनी कुठे जायचे याचाही विचार झाला पाहिजे.

महासंग्राम's picture

11 Dec 2015 - 3:37 pm | महासंग्राम

जर वेगळा विदर्भ होणारच नसेल तर कशाला कुठे जाईल

चिगो's picture

11 Dec 2015 - 5:22 pm | चिगो

हे कळलं नाही..

विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांनी कुठे जायचे याचाही विचार झाला पाहिजे.

म्हणजे काय? ही जनता कुणावर जुलूम-जबरदस्ती, धाकदपटशाही करुन राहते का? आपल्या लायकीने आणि लायकीप्रमाणे नोकरी किंवा कामधंदा करतेय ही जनता.. जरा कलम १९ वाचा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे.

राही's picture

11 Dec 2015 - 5:45 pm | राही

सध्यासुद्धा भारतातल्या झाडून सार्‍या राज्यांतले कित्येक लोक मुंबईत राहातात. त्यांचे काय वाईट झाले आहे?
मुंबईतून कोणी कुठे बाहेर जात नाही. उलट इथे येणारेच जास्त आहेत.

शब्दबम्बाळ's picture

11 Dec 2015 - 6:45 pm | शब्दबम्बाळ

अहो वेगळा देश म्हणत नाहीयेत हो ते! राज्य म्हणत आहेत!
पुण्या-मुंबईच्या लोकांना काय वाटत असत काय माहित!
भारतात कुठेही जाऊ शकतात भारतीय लोक...

व्हाया वेगळा विदर्भ वाले....तीच दारू आणि तीच झिंग....

असो,

जोपर्यंत ह्या जगात "मिपा" हे मध्यवर्ती ठिकाण आहे, तोपर्यंत वेगळा विदर्भ असो की तेलंगणा....आपल्याला काही फरक पडत नाही....

"वेगळा विदर्भ आणि हुबळी-धारवाड-बेळगाव सहित महाराष्ट्र, ही राजकीय पक्षांची मतांची कुरणे आहेत." असे आमचे बाबा म्हणतात.

होबासराव's picture

12 Dec 2015 - 2:32 pm | होबासराव

ते जांबुवंतराव धोटे... धोकटे नाहि.

विदर्भात एकदा सर्वमत घ्यायला पाहीजे, तिथल्या सामान्यांचे मत कळुन येइल. तरी पन तिथली परिस्थीती फारच बिकट असावी, अगदी म्हणजे अगदीच कारण कर्ज आमच्यावर पन असतात, तरी १० गुंठे/अर्धा एकर लय झालच तर ५/६ एकर वाले पोटापुरते तरी उत्पादन काढु शकतात, कर्ज फेडु शकतात पन तिकडे मात्र कितीही जमिन आसली तरी दैव काय साथ देत नाही आन शेवटी नाईलाजाने बिचारा शेतकरी कायतरी बरेवाईट करुन घेतो.

सुबोध खरे's picture

11 Dec 2015 - 7:02 pm | सुबोध खरे

बाबू दादा
सार्वमत घेण्याच्या अगोदर तेथील लोकांना वस्तुस्थिती समजावून देणे हे जास्त आवश्यक आहे.अचाट आणी अफाट आश्वासने दिल्यानंतर ती प्रत्यक्षात आणणे हे सोपे काम नाही. रोजगार निर्मिती करणे किंवा पाण्याची उपलब्धता करणे हे दोन पाच वर्षाचे काम नसते तर दहा ते पंधरा वर्षाचा मोठा कार्यक्रम असतो त्याची तयारी कोणत्याच राजकीय नेत्याची नसते. त्यांना पाच वर्षात आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करायचं असतो कारण पुढच्या पाच वर्षात काय होईल हे कोण सांगू शकेल?
उद्या कापूस एकाधिकार खरेदी किंवा रोजगार हमी योजनात पैसे नाहीत म्हणून लोकांचे पैसे देणे सरकारने थकवले तर पूर्वीची परिस्थिती बरी होती असे वाटू लागले तर?
मूळ स्वतंत्र राज्य झाल्याने सर्व सामान्य जनतेचा भक्कम असा कोणताही फायदा होत नाही होतो तो फक्त राजकारणी आणी बाबू लोकांचा. तेवढी जास्त पदे निर्माण होतात तेवढे जास्त अधिकार (आणी पर्यायाने जास्त कुरणे) हातात येतात. बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता आंध्र प्रदेश चे विभाजन झाले परंतु त्यात सामान्य माणसाला ना जास्त रोजगार उपलब्ध झाला ना शेतीला जास्त पाणी. पूर्वीच्या आणी आताच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही. कोउ राजा होउ हमे का हानी?
स्वतंत्र राज्य व्हावे हि तो नेत्यांची इच्छा असते
जनतेची नाही.

बिहारचे, मध्य प्रदेश आणी आता आंध्र प्रदेश चे विभाजन झाले परंतु त्यात सामान्य माणसाला ना जास्त रोजगार उपलब्ध झाला ना शेतीला जास्त पाणी. पूर्वीच्या आणी आताच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही.

नक्की का डॉक्टरसाहेब? जर छोटी राज्यं केल्यानी काहीच फरक पडत नसेल, 'Decentralised govt' चा काहीच फायदा नसेल, तर मग अख्खा देश हा एकच राजकीय प्रदेश का असू नये? तुम्हाला असं म्हणत नाही, पण येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे, असा नूर दिसत आहे. मी मेघालयात आहे. शिलाँग एकेकाळी अक्ख्या आसामची ज्यात तेव्हा आसाम, नागालँड, मेघालय आणि इतर बरीच राज्ये यायची. तरीही 'मेघालय'चा विकास (जो काही झाला असेल तो) ते आसामपासून वेगळा झाल्यावर झाला खर्‍या अर्थाने..

छत्तीसगड आता स्वतःच्या औद्योगिक, आर्थिक विकासावर भर देत आहे, झारखंड पण.. शेवटी त्यांना वेगळं व्हावसं का वाटलं, ह्याचाही विचार करावा की..

प्रसाद१९७१'s picture

14 Dec 2015 - 4:40 pm | प्रसाद१९७१

येथील बव्हांश जनतेचा वैदर्भीय माणूस जणू वेगळा विदर्भ मागून देशद्रोहच करत आहे,

चिगो - असे नाहीये. उलट घ्या काय पाहिजे तो वेगळा विदर्भ असे मत आहे. पण अनुशेष किंवा पुण्या मुंबई च्या नावानी बोटे मोडु नका इतकीच अपेक्षा आहे.

मी तर पहिल्याच प्रतिसादात लिहीले होते, मराठवाडा मागत नसले कोणी तरी आधी वेगळा करा.

सुबोध खरे's picture

11 Dec 2015 - 7:03 pm | सुबोध खरे

फुकटचा प्रशासकीय खर्च मात्र डोक्यावर बसतो

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2015 - 9:37 pm | श्रीरंग_जोशी

लेखक महोदयांना आवाहन. अशा विषयांवर नवा त्रोटक चर्चाविषयाचा धागा मांडण्यापूर्वी मिपावर या विषयावरचे जुने धागे नजरेखालून घालावे. काही पूर्णपणे नवे मुद्दे असल्यासच नवा धागा काढावा...

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? href="/node/27093">तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? href="/comment/557371#comment-557371">माझा प्रतिसाद या ठिकाणी च्योप्य पस्ते करतो. तसेच सदर धाग्यावर उत्तम चर्चा झालेली आहे. या विषयात रस असणार्‍यांनी ती आवर्जून वाचावी ही विनंती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरेल का हे सांगणे तसे अवघडच आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये व २००१ मध्ये आंदोलनांना बऱ्यापैकी जोर होता.

या धाग्यावर अनेक अभ्यासू मते मांडण्यात आली आहेत. मी स्वतः अमरावतीकर असल्याने हा विषय फारच जवळचा आहे. इतरांच्या मतांबद्दल आदर दर्शवून मी माझी निरीक्षणे व मते मांडू इच्छितो.

सर्वप्रथम विदर्भाला मागासलेला प्रदेश जे म्हंटले जाते त्यामुळे एक चुकीचे चित्र विदर्भाला जवळून न ओळखणाऱ्यांच्या मनात उभे राहते. पायाभूत सुविधा जसे रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण असे अत्यंत महत्त्वाचे निकष लावल्यास विदर्भ कुठल्याही प्रकारे मागासपणाच्या व्याख्येत बसत नाही. उलट या बाबतीत राष्ट्रीय सरासरीच्या वरच असावा.

विदर्भाची दशकानुदशके असलेली समस्या म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठा नसणे. शेतजमीन सुपीक असली तरी कोरडवाहू शेती करताना निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा गोरगरीब शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जातो. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या इतर भागांत राजकीय इच्छाशक्तीमुळे व नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेमुळे जी सिंचनव्यवस्था निर्माण होऊ शकली ती विदर्भात नाही होऊ शकली.

त्याखेरीज मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असे उद्योगधंदे विदर्भात नसणे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मुंबईपासून जवळ असणाऱ्या भागांना मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र जवळ असण्याचा नैसर्गिक लाभ मिळाला तसा तो विदर्भाला मिळाला नाही. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी याबाबतीत दूरदृष्टी दाखवून थोडेबहुत उद्योगधंदे विदर्भाकडे वळवले असते तर आज नक्कीच चित्र वेगळे असते. मध्य भारतातले सर्वात मोठे व्यापारी केंद्र व उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले नागपूर शहर विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी बलस्थान ठरले असते व रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊन व नवे रोजगारकेंद्र बनले असते. ज्यायोगे प्रादेशिक असमतोल निर्माण झाला नसता.

अनेकांना असे वाटते की आजवर सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रिपदावर बसणारी व्यक्ती (स्व वसंतराव नाईक) हे विदर्भातले होते तरीही त्याचा विदर्भाला फारसा उपयोग झाला नाही. याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की मराठी माणूस जसे राष्ट्रीय स्तरावर मोठ्या हुद्द्यावर पोचला की तो जसे स्वतःच्या राज्याला झुकते माप देणे अयोग्य समजतो तसेच विदर्भातला माणूस राज्यस्तरावर पोचल्यावर घडते.

स्व वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तो काळ सरून ४ दशके होत आली आहेत. त्यानंतर दीड वर्षांसाठी सुधाकरराव नाईक व युतीच्या काळात नितीन गडकरी यांच्याखेरीज राज्यस्तरावर महत्त्वाचे पद भुषवलेली विदर्भातील व्यक्ती मला तरी स्मरत नाही. त्यातही गडकरी यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले ते काही मुख्यमंत्रिपदावर किंवा केंद्रीय मंत्रिपदावर नव्हते.

विदर्भात खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या दोन संधी पहिली १९९१ च्या उदारीकरणानंतर व ९० च्या दशकाच्या शेवटी व गेल्या दशकाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा राज्याकडे चालून आलेल्या ओघाचा न्याय्य हिस्सा विदर्भाकडे वळविण्यास राज्य सरकारे कमी पडली किंवा त्यांची तशी इच्छाशक्ती होती का यावरही साशंकता वाटते.

कागदोपत्री दिसणारा आर्थिक अनुशेष तर आहेच पण संधींचा मोठा अनुशेष वर्षानुवर्षे तसाच आहे. बरेचदा असे म्हंटले जाते की मग विदर्भातले नेते यावर आवाज का उठवत नाहीत? यावर एक उदाहरण देतो. २००४ च्या निवडणुकीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारात स्वतः शरद पवार २००३-०४ मधील पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते नितीन गडकरी यांना दोष देत होते. कारण विदर्भाचा निधी इतर कारणांसाठी वापरला जात असल्याबाबत त्यांनी आक्षेप घेणारे पत्र राज्यपालांना लिहिले होते व राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांद्वारे सरकारवर त्या बाबतीत बंधन आणले होते. ज्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून गौरवले जाते तेच असे वागत असतील तर इतर राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रादेशिक समतोल राखण्याची काय अपेक्षा बाळगायची.

वेगळे राज्य झाल्यास नेमका काय बदल होईल?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाजगी उद्योगांद्वारे गुंतवणुकीसाठी तुलनेत लहान क्षेत्रफळाचे स्वतंत्र मार्केटींग करता येईल. देशातील इतर औद्योगिक केंद्रांपेक्षा सध्यातरी विदर्भात लागणारा खर्च (जमीनीच्या किमती, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी) तुलनात्मकरित्या कमी राहील. मी २००० साल पूर्वीचे मध्य प्रदेशचा भाग असणारे छत्तिसगढ व नंतरचे छत्तिसगढ जवळून पाहिले आहे. आज त्या भागाची जी प्रगती झाली आहे ती मध्य प्रदेशात राहून नक्कीच झाली नसती.

विदर्भ राज्य वेगळे झाल्यास उर्वरित महाराष्ट्रालाही लाभ होईल. गेले काही वर्षे सत्ताधारी इतर भागांतील विकास योजनांना निधी अपुरा पडू लागला की विदर्भाचा अनुशेष भरून काढला जातोय अशी कारणे सांगतात. असले काही कारण तेव्हा उरणार नाही.

विदर्भातील सामान्य जनतेचा वेगळ्या राज्याला पाठिंबा नाही असा पण मुद्दा वर आलाय. माझे असे निरीक्षण आहे इतर मराठी जनांप्रमाणेच विदर्भातली जनताही सोशिक आहे. तेलंगाणा वगैरे सारखे हिंसक आंदोलन विदर्भात कधीच होणार नाही. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर बहुतांश सामान्य जनतेला समाधानच वाटेल अन नाही झाले तरी आजवर जसे जुळवून घेतले आहे तसे जुळवून घेण्याचा प्रयत्न निरंतर सुरू राहील.

बाकी वेगळ्या राज्याची मागणी केल्यास बरेच लोक या प्रकारे आक्षेप घेतात की वेगळा देशच मागितला जात आहे. आजच्या विदर्भाचा भूभाग वेगळ्या राज्यात राहिला काय किंवा महाराष्ट्रात राहिला काय शेवटी एकाच देशात असणार आहे. आंध्र प्रदेश सारखी अविश्वासाची, खुनशीपणाची भावना विदर्भासकट महाराष्ट्रात कुठेही आढळत नाही. विदर्भ महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासूनच मराठी माणसाची सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतीके एकच होती ती नंतरही एकच राहतील.

देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्राची कूर्मगतीने प्रगती होत राहण्यापेक्षा महाराष्ट्र व विदर्भ या राज्यांच्या प्रगतीची घोडदौड होणे व्यापक हिताचे ठरेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मराठी_माणूस's picture

12 Dec 2015 - 1:20 pm | मराठी_माणूस

वर कुठेतरी मुंबईचे लोक खुप कष्ट करतात आणि बाकीचे नुसतेच बसुन असतात असा हीणकस प्रतिसाद आला आहे.
जर सर्व गोष्टी मुंबईतच उपलब्ध करुन दिल्या तर लोक इथेच येणार ना. फ्लाय ओव्हर्स, मेट्रो, मोनो , सीलिंक, लोकल्स १२ ड्ब्बा त्यांच्यात सतत वाढ, आता तर एसी लोकल्स पण येणार, आयटीचे प्रचंड मोठे एसीझेड्स. मग लोक येणारच रोजगारा साठी. उर्वरीत महराष्ट्राने नुसते बघत बसायचे आणि आळशी म्हणुन हीणवुन घ्यायचे. इथले लोक(सर्व नाही) मात्र आम्ही पैसे कमवतो आणि सर्व गोष्टी विकत घेण्याची ऐपत बाळगतो हा माज करणार. ४ दीवस दुध , भाजीपाला आला नाही तर ह्यांची फे फे उडते. व्हीजन नसलेले नेते मुंबईत बसुन फक्त मूंबईचा विकास बघणार आणि त्याचे बेनेफीशरी ऐट करणार. नशीबाने सर्वच्या सर्व जण मुंबईत येत नाहीत, नाहीतर मूंबईची काय हालत होईल.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 1:41 pm | सुबोध खरे

बाकीचे नुसतेच बसुन असतात असा हीणकस प्रतिसाद आला आहे.
असे आपण कुठे वाचलेत?
"फ्लाय ओव्हर्स, मेट्रो, मोनो , सीलिंक, लोकल्स १२ ड्ब्बा त्यांच्यात सतत वाढ, आता तर एसी लोकल्स पण येणार, आयटीचे प्रचंड मोठे एसीझेड्स."
या गोष्टी गेल्या १५-२० वर्षातील आहेत.
मुंबईची प्रगती गेल्या १०० वर्षातील आहे.
माझा भाऊ १९८५ साली व्ही जे टी आय मधून विद्युत अभियंता झाला आणी घरापासून ५ किमी अंतरावर कळव्याला सिमेन्स सारख्या कंपनीत लगेच नोकरी मिळाली ३ वर्षात कंपनीची गाडी न्यायला आणायला येत असे. असे असूनही तो स्वतःचा धंदा करायचा म्हणून संध्याकाळी ५ ते रात्री १० आपली मोटार सायकल घेऊन उद्योगात खेपा मारत असे. रात्री १० वाजता मोटार सायकल दुरुस्त करण्यासाठी हार्ड वेअर चे दुकान उघडे असे. लग्न होईपर्यंत आरामाची नोकरी केली आणी नंतर ती सोडून स्वताचा उद्योग सुरु केला आणी आज त्याच्या मालकीचे ३ कारखाने आहेत आणी यात १००% कामगार आणी इंजिनियर मराठी आहेत. सकाळी ९ ते रात्री बारा दुकाने उघडी असतात दिवाळीच्या वेळेस सोमवारची सुटी नसते.मुलुंड मध्ये २४ तास उघडी औषधाची दुकाने ९ ते १० आहेत.
मी लष्करी नोकरी सोडून मुंबईत राहायला आलो तेंव्हा माझ्या जन्मगावी( मुलुंड मध्ये) मला एकही डॉक्टर ओळखत नव्हता.कारण वयाच्या १८ वय वर्षी बाहेर गेलेला मी ४१व्या वर्षी परत आलो.( लष्करच्या नोकरीचा मला व्यवसायाच्या दृष्टीने कोणताही फायदा न होता तोटाच झाला) तीन महिने मुलुंड मधील प्रत्येक डॉक्टरच्या दवाखान्यात जोडे झिजवले तेंव्हा माझ्या कडे रुग्ण यायला लागले. एकदा ते यायला लागले. तेंव्हा पासून मौखिक कीर्तीवर माझा दवाखाना चालला आहे. मी कमांडर म्हणून निवृत्त झालो म्हणून घरी बसलो असतो तर कुत्र सुद्धा आला नसतं विचारायला. गेली सात वर्षे उरलेल्या वेळात बसून मी शेअर बाजाराचा अभ्यास केला. "दुसरा" काहीतरी व्यवसाय हवा म्हणून.
आमचा चुलत भाऊ पिडीलाईट सारख्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी असून उरलेल्या वेळात (संध्याकाळी ५ ते ९) चामड्याच्या बुटांचे दुकान चालवतो. त्याची पत्नी ते दुकान सकाळी ९ ते ५ पाहते.
ही मुंबईची संस्कृती आहे. याला मुंबई पैशाच्या मागे लागली आहे असेही हिणवले जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कामे करतात.ज्यांना जळायचे आहे ते जळत राहतात आणी कामे न करण्याची कारणे देत राहतात.
ज्यांना काम करायचे आहे असे अनेक प्रगतीशील शेतकरी, उद्योजक महाराष्ट्रात सर्वत्र दिसतील पण त्यांचा आदर्श ठेवून कष्ट करण्याऐवजी दुसर्याचा मत्सर करणे सोपे आहे.

मोगा's picture

12 Dec 2015 - 6:29 pm | मोगा

लोटांगण

नतमस्तक

मराठी_माणूस's picture

12 Dec 2015 - 1:53 pm | मराठी_माणूस

विद्युत अभियंता झाला आणी घरापासून ५ किमी अंतरावर कळव्याला सिमेन्स सारख्या कंपनीत लगेच नोकरी मिळाली

बरेच तरुण अभियंते होतात पण त्याना आसपास नोकरी मिळत नाही. कारण अशा अस्थापनाच नाहीत. धंदा सुरु करायचा तर आसपास तसे कारखाने हवेत. प्रत्येक तरुणात कष्ट करण्याची इछा असते. फक्त मुंबईचेच कष्ट करतात आणि बाकीचे मत्सर करतात हे म्हणणे बरोबर नाही.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 6:39 pm | सुबोध खरे

आमच्या सौ चे काका सेलू सारख्या मराठवाड्याच्या तालुक्याच्या गावी कष्टाने मारवाड्यांच्या एकाधीकार् शाही विरुद्ध उभे राहून आज खाते आणी कीटकनाशके यांचा व्यवसाय करीत आहेत आणी भरपूर कमवीत आहेत. ( महाराष्ट्राच्या अंतर्भागात शेती विषयक उत्पादनाच्या विक्रीमध्ये मारवाडी लोकांनी येऊन आपली एकाधिकारशाही निर्माण करतात या पेक्षा आमचे करंटेपण अजून काय असेल?)
कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना. ते आम्हाला सवलती नाहीत मारवाडी लोक नाडतात अशा तक्रारी करीत बसले नाहीत.
तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला कारणे लागत नाहीत.

मराठी_माणूस's picture

13 Dec 2015 - 4:30 pm | मराठी_माणूस

तात्पर्य--ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला कारणे लागत नाहीत.

बरोबर

त्याच चालीवर म्हणायचे तर "ज्याला कष्ट करायचे आहेत तो कुठेही करीतच असतो".

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 2:42 pm | सुबोध खरे

Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''.

राही's picture

12 Dec 2015 - 2:56 pm | राही

मुंबईकर त्यातल्यात्यात सहनशील असतात. बारीकसारीक गैरसोयींबद्दल तक्रार करीत नाहीत. शक्यतो लॉ-अबाय्डिंग असतात. अलीकडे हा गुण कमी होऊ लागला आहे हे खरे. पत्ता सांगणे, बस नंबर सांगणे, कुठून कसे जायचे याचे योग्य मार्गदर्शन करणे वगैरे गोष्टीत चटकन आणि योग्य मदत करतात. (हाही गुण अलीकडे कमी होऊ लागला आहे.) हे फक्त गुजरातमध्ये पाहायला मिळते. बाकी भारतात फारसे नाही. अरे ला कारे सहसा करीत नाहीत. 'यडा' म्हणून सोडून देतात.
कष्ट तर करतातच. करावेच लागतात. मुंबईत राहाणे हे 'डिमांडिंग' असते. ते मानसिक-शारीरिक सतर्कतेची अधिक अपेक्षा करते. महिलासुद्धा सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर असू शकतात. पांढरपेशे लोक सोडाच पण मजूरवर्गसुद्धा रविवारी, सुट्टीच्या दिवशी अधिकची कामे करतो. आमच्याकडे एक हरहुन्नरी माणूस अडल्यापडल्याला येतो. तो पेशाने मिस्त्री आहे. ६००-७०० रुपये रोजावर काम करतो. पण प्लंबिंग, टॉय्लेट तुंबणे, दिवाळीगणपतीत घर धुवायला, माळे साफ करायला बोलावले तरी जेवणाची वगैरे वेळ अ‍ॅडजस्ट करून लगेच येतो. अगदी कमोडमध्ये हात घालून साफ करायलाही कांकूं करत नाही. असे बरेच आहेत. कामाला जाण्यापूर्वी सकाळी सहा पासून गाड्या धुण्याचे काम अनेक जण करतात. मुलांना शाळेत नेणे-आणणे, क्लासेसना सोडणे अशी कामे संसाराला भर म्हणून बायका करतात. शिवाय बेबी-सिटिंग, रुग्ण आणि वृद्धांसाठी आया, मेल नर्स असे अनेक विपुल संख्येत असतात. विपुल संख्येत हे महत्त्वाचे. औषधे घरपोच येतात. चक्कीवाला दळण घेऊन जातो आणि पीठ आणून देतो. रद्दीवाला, इस्त्रीवाला, केळेवाला, पाव-अंडीवाला घरपोच नियमित सेवा देतात. ह्या सगळ्या कामकरी आणि विश्वासू लोकांमुळे मुंबई सुसह्य झाली आहे.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 6:28 pm | सुबोध खरे

राही ताई
मुलुंडला आमच्या मित्राकडे स्वयंपाक करणाऱ्या बाई पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजे पर्यंत पाच घरी स्वयंपाकाचे काम करतात.सकाळी सहा वाजता पोळी भाजी घेऊन जाणार्या शालेय शिक्षिकेच्या घरी त्या पाच वाजता कामाला जातात. महिन्याला दोन रजा आणी वर्षात इतर ६ रजा मिळून वर्षात ३० दिवस रजा असते. एक महिन्याचा पगार बोनस. परंतु वक्तशीरपणा असल्याने दोन पैसे जास्त देणे परवडते.
संध्याकाळी ४ ते ७ तीन तासात तीन घरी त्या काम करतात. अशा आठ घरी काम करून स्वयंपाकाच्या बाई १४-१५ हजार रुपये कमावतात. कष्टाची किमत काय आहे ते मुंबईच्या लोकांना व्यवस्थितपणे समजलेले आहे.

मराठी_माणूस's picture

12 Dec 2015 - 3:04 pm | मराठी_माणूस

ते त्यांचे वैयक्तीक मत असु शकेल. धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर वातावरण निर्माण केले आणि त्याला वर्षानुवर्श पाठींबा दीला तर कूठे ही तशी संस्कृती निर्माण होउ शकते. मुंबई मधे सुध्दा बाहेरुन आलेल्यानीच enterprise उभे केले आहेत. कारण तशा पुरक गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत.
नाशीक मधील बरेचसे उद्योगधंदे इतरत्र गेले आहेत कारण त्यांना त्याठीकाणी ज्यास्त सवलती देण्यात आल्या.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 6:20 pm | सुबोध खरे

धंद्यासाठीचे प्रोत्साहनपर वातावरण निर्माण केले
मग तुम्ही करा कि कुणी अडवलंय?
मुंबई मधे सुध्दा बाहेरुन आलेल्यानीच enterprise उभे केले आहेत. कारण तशा पुरक गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत.
या कुणी पुरवल्या?
आणि मुंबईत कोणताही tax holiday नसताना उद्योग येथे का येतात याचे कारण आपण लक्षात न घेता फक्त "माज करतात" "टेचात असतात" अशी भाषा वापरता याचे कारण समजेल का?
नाशिक चे उद्योगधंदे बाहेर का गेले? याचे कारण तेथे तेथे जास्त सवलती दिल्या गेल्या असे तुमचे म्हणणे आहे तर नाशिकला या सवलती द्यायला कुणी नको म्हटले होते?
प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. आमच्या वडिलांच्या मित्राचा (हा मूळ मुंबईचा आहे) नाशिकला रबरी हातमोजे बनवण्याचा( डॉक्टर वापरतात ते)कारखाना होता.नाशिकला मिळणाऱ्या विक्री कर अबकारी आणि इतर सुविधा पाहून त्याने नाशिकला कारखाना टाकला होता. जालाचा फायदा घेऊन त्याने आपली जाहिरात केली आणि त्याला फ्रान्स मधून मागणी आली. पण नाशिक चे कामगार काम करण्यात कुचराई करणारे होते. सकाळी उशिरा येणे आल्यावर तंबाखू मळत राहणे. वेळी अवेळी कामाचा खोळंबा करून चहा प्यायला जाणे. जेवायला घरी जाऊन दोन तास न उगवणे. वेळेत काम न करणे. जास्त कामाचा भत्ता(OVERTIME) देऊनहि काम न करणे. गणपती उत्सव, दिवाळीला दहा दिवस दांड्या मारणे इ इ. त्याबद्दल कोणाला काही विचारले तर युनियनबाजी करणे. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने कारखाना परत मुंबईत हलवला.त्याच्याच शब्दात मुंबईत कामगाराला दुप्पट पगार देणे परवडते कारण पगार जास्त दिला तरी काम चोख असते. चार पैसे जास्त गेले तरी चालतात पण वेळेत काम पूर्ण होते आणि बाजारात पत टिकून राहते. युरोपात निर्यात करण्याचे नियम आणि वक्तशीरपणा कडक आहे तेथे चालढकल चालत नाही. आज त्याने मुंबईत हातमोजे बनवण्याचे तीन कारखाने चालू केले आहेत.
जर अशी "वस्तुस्थिती" असेल तर कोण आपला कारखाना मुंबईच्या बाहेर घेऊन जाईल?

मराठी_माणूस's picture

13 Dec 2015 - 4:37 pm | मराठी_माणूस

सवलती सरकारने द्यायच्या असतात.
तुम्ही दिलेले कामचुकार कामगारांचे उदाहरण एखादे उदाहरण बरोबर असेल ह्याचा अर्थ तिथले सर्वच तसे आहेत असे समजणे चुकीचे आहे. अतिशय कष्ट करणारे लोक तिथेही पाहीलेले आहेत आणि कामचुकार लोक मुंबईत ही पाहीलेले आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

14 Dec 2015 - 7:22 pm | कानडाऊ योगेशु

कदाचित मुंबईत बदली कामगारांची उपलब्धता जास्त असल्याने तिथे तू नही तो कोई और सही हा पर्याय कारखाना मालकाला नेहेमीच उपलब्ध असावा जो कदाचित नाशिक सारख्या शहरात तितकासा नसावा.
सोलापूरात ( डॉ.साहेब सोलापूरातलेही एखादे माहीतीतले उदाहरण असले तर होऊन जाऊ दे. ;)) एका फाऊंड्री मध्ये काम करत असताना पाहीले कि स्गळे कामगार हे कन्नडभाषिक व कर्नाटकमधल्या बॉर्डर वर असलेल्या आसपासच्या खेड्यामधले होते. असे का ह्याची चौकशी केली असता समजले कि मूळचे सोलापूरातले कामगार हे पाट्या टाकणारे व शुक्रवारी हमखास भागवत चौकातल्या एखाद्या थिएटरात हजेरी लावणारे असत त्यामुळे मूळ सोलापूरातले कामगार नकोच हा एक अलिखित नियम व्यवस्थापनाने केला. ( चांगली चाललेली शिवाजी फाऊंड्री एकाएकी बंद पडली ह्यामागे असेच काही तत्सम कारण होते असे ऐकण्यात आले.)

अभ्या..'s picture

14 Dec 2015 - 7:49 pm | अभ्या..

बरोबर आहे योगेशराव.
शिवशाही (शिवाजी फाऊंड्री) बंद पडली त्याला ते प्रमुख कारण होते. सरसकटीकरण नाही पण सोलापूरांच्या नेहमीच्या बोलण्यात हेच वाक्य येते की कामगारांच्या माजोर्डेपणाने अन नेत्यांच्या कळलावे पणाने कित्येक उद्योग सोलापुरातून उठले.
सध्या बर्‍या चाललेल्या उद्योगात सुध्दा आंध्र, कर्नाटक किंवा लातूर उस्मानाबादच्या कामगारांची भरती जास्त आहे.

संदीप डांगे's picture

12 Dec 2015 - 7:17 pm | संदीप डांगे

खरेजी,

तुम्ही जे सारखे जिचकारांचे वक्तव्य इथे चिकटवताय ते तुम्हाला पटते म्हणून. तुम्हाला न पटणारे पण स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असणार्‍या अनेक अभ्यासू व्यक्तींचेही अहवाल आहेत. त्यांच्या बर्‍याच अभ्यासपूर्ण निबंधांचे दाखले देता येतील. जिचकार स्वतंत्र विदर्भवादी असते तर तुम्ही 'ते जिचकारांनी म्हटलंय ना, मग बरोबरच असेल' असे केले असते का?

तुमच्या दोन प्रतिसादांमधून तुमची विधाने घेतोय.

तुम्हाला मुंबईचा फक्त पैसा दिसतो. मुंबईचे अविरत कष्ट दिसत नाहीत. २६ जुलै च्या महा प्रलयानंतर मुंबई २७ जुलैला परत आपल्या पायावर उभी राहिली. कुणाच्या प्याकेजची वाट न पाहता.
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत. कष्टामुळे मुंबईत पैसा येतो.मुंबईत "भारतभरातून" कष्ट करण्याची तयारी असणारी माणसे येतात यात विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश बिहार सुद्धा येतात. ते कष्ट करतात आणी पैसा कमावतात. हि मुंबईची संस्कृती आहे. त्याचा दुश्वास का?

या गोष्टी गेल्या १५-२० वर्षातील आहेत.
मुंबईची प्रगती गेल्या १०० वर्षातील आहे.

तुम्ही म्हणताय तुम्ही विधान गमतीत केलंय पण तसं भासलं नाही कारण 'मुंबईचा पैसा कोणाला देणार नाही' ही भावना निव्वळ नर्मविनोदातून येऊ शकत नाही असं वाटतं. तसे नसेल तर ठिक आहे.

मुंबई कोण व्यक्ती आहे धीरुभाई सारखी? नाही. ते एक अत्यंत दुर्लक्षित ठिकाण होते. मुंबईचा विकास इंग्रजांनी केला. मुंबई एक बंदर म्हणून विकसित केले. तीच्या भौगोलिक ठिकाणाचा आणि नैसर्गिक बंदर असण्याचा फायदा घेत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस उपलब्ध केले. बंदराच्या आसपास सोयीचे म्हणून जवळच राहणार्‍या गुजरात्यांनी कारखाने उभे केले. कारखान्यात लोक लागतात म्हणून भारतातून लोक यायला लागले. मुंबईच्या विकासामागे आधी सुविधा उपलब्ध होत गेल्या हे तुम्ही नाकारू शकणार नाही.

भारतातून प्रत्येकजण जेव्हा मुंबईत कर्मभूमी म्हणून पाय ठेवतो तेव्हा त्याला मुंबईची नव्हे, स्वतःची भरभराट करायची असते. त्याला विश्वास असतो मुंबईत 'काही ना काही तर होऊनच जाईल'. त्याला हा विश्वास का आहे? कारण इथे सोयीसुविधा आहेत. इथे उद्योगधंदे आहेत, इथे एक स्वस्थ आणि प्रगतिशील अर्थव्यवस्था आहे. हे सर्व 'आहे.' खास निर्माण केलेलं आहे. तुम्ही जेव्हा भारतातून कष्टाळू लोक मुंबईत येतात ह्याचे उदाहरण देता तेव्हाच दुसर्‍या अर्थाने हे पण कबूल करता की त्यांना त्यांच्या मातीत त्यांची कर्तबगारी सिद्ध करायला वातावरण ते नाही जे मुंबईत सहज उपलब्ध आहे.

तुम्ही तुमचे आणी भावाचे उदाहरण दिले. तुमच्या भावाचे तीन कारखाने आहेत म्हणताय. हे तीन कारखाने त्याने तेवढेच कष्ट करून तुमच्या मूळ गावी उभे करणे शक्य होते का? मी तुमच्या भावाचे व तुमच्या कष्टाला अजिबात कमी लेखत नाही, फक्त एक गोष्ट ध्यानात आणून देऊ इच्छितो की नुसते कष्ट उपयोगाचे नाहीत ते तुम्ही कुठे करता आहात तेही महत्त्वाचे. तुम्हाला कष्ट करायला योग्य ते वातावरण मुंबईत मिळाले. तेच वातावरण विदर्भात मिळत असेल तर विदर्भातली जी कष्टकरी, होतकरू, हुशार मंडळी आहेत ती का बरे विदर्भ सोडून इकडे तडमडायला येतील?

वाळ्याचे तट्टे लावून संत्री खात पडून असतात हे विधान भलेही पुलंनी गंमतीत लिहले असेल म्हणून विदर्भातले लोक आळशी आहेत असे म्हणण्याचा कोणालाही अधिकार प्राप्त होत नाही. वाळ्याचे तट्टे लावून संत्री आयती तोंडात द्यायला मुंबई कष्ट उपसते का विदर्भासाठी? आपला मुद्दा पडू नये म्हणून काहीही बोलायचे हे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि हजार जागी फिरलेल्या माणसाला शोभत नाही. आपल्याकडून तरी इतक्या हलक्या दर्जाच्या टिप्पणीची अपेक्षा नव्हती.

दुसरा मुद्दा पॅकेजबद्दलचा. बहुतेक आपण शेतकर्‍यांच्या दुष्काळी पॅकेजेसबद्दल बोलत आहात. आता त्याचं असं आहे की शेतीसाठी मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात कसूर करणार्‍या राज्यकर्त्यांना त्यांची नामुष्की आणि कामचोरपणा झाकण्यासाठी हे पॅकेज देतात. त्यात शेतकरी/वैदर्भीय आळशी, त्यांना बसून खायला पाहिजे अशी भावना आपण ठेवत असाल तर जरा दोन महिने विदर्भात फिरावे सुटी काढून तेही जून-जुलै महिन्यात अशी विनंती आपणास करतो. तुमच्यापर्यंत बातम्यांतून जे पोचतं वा पोचवलं जातं ह्यापेक्षाही वेगळं जग आहे, त्याला त्याच्या समस्या आहेत. पॅकेजेसमुळे शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाहीत, राज्यकर्त्यांचे सुटतात हे भान आपण बोलत असतांना ठेवायला हवे.

मुंबईसारखी शहरे एका दिवसात तयार होत नाहीत. अनेक वर्षांचे, पिढ्यांचे नियोजनबद्ध कष्ट लागतात. इंग्रजांपासून ते सुरू झाले. स्वतंत्र भारतात हैदराबाद, बेन्गलोर सोडले तर असे कुठले शहर आहे काय जे स्वतंत्रपणे विकसित झाले? सव्वाशे कोटीच्या भारतात अशी शहरे इन मीन चार-पाच आहेत जिथे गेल्यावर होतकरूस 'काही ना काही तर होऊनच जाईल' ह्याचा विश्वास असतो. त्यातले विदर्भात एकही नाही.

मुंबईच्या बाबतीत मला कधीही आकस नव्हता, नसेल कारण काही वर्षे तीच माझ्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी होती. आजही मी तिथे राहिलो असतो तरी मला कशाचीही ददात नसती.

मी नाशिकमधे आलो. मला इथे कोणीही ओळखत नव्हते. पण गेल्या दोन-तीन वर्षात मी बर्‍यापैकी जम बसवला आहे. मला इथे उज्ज्वल भविष्य आहे हे जाणवतंय, त्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट घेतोय. हे का? तर इथे ते वातावरण आहे. काही ना काही तर होऊनच जाईल असा विश्वास आहे. इथे शेती आहे, उद्योगधंदे आहेत, सरकारी आस्थापने आहेत. नाशिक जगातल्या सर्वात प्रगतीशील अशा तीस शहरांमधे गणले जाते. इथे प्रचंड काम आहे, मोबदला देणारेही आहेत. हे सर्व माझ्या मूळ गावी असते तर मी इथे-तिथे कुठेच न थांबता सरळ गावी जाऊन हेच उद्योग केले असते.

नाशिकमधे सरकारकडून बर्‍याच गोष्टी पुरवल्या गेल्या. मुंबई जवळ असल्याने अनेक उद्योगधंदे इकडे आले, पाण्याची सोय झाल्याने शेती बहरली, सरकारी आस्थापनांमुळे अनेक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतोय. एक स्वस्थ आणि प्रगतिशील अर्थव्यवस्था इथेही उभी राहते आहे. याला कारण शासकिय स्तरावर घेतले गेलेले अनेक निर्णय व त्यांची यशस्वीपणे झालेली अंमलबजावणी.

प्रगती हे एक चक्र आहे. त्याला आधी धक्का द्यावा लागतो, पैशाचा आणि मूलभूत सोयींच्या विकासाचा, शिक्षणाचा, प्रोत्साहनाचा. पुढे लोक ह्या उपलब्ध व्यवस्थेचा फायदा घेऊन अधिक संपत्ती निर्माण करतात, त्यातून अधिक सुविधा निर्माण होतात. हे चक्र चालूच राहते. विदर्भाच्या बाबतीत असे चक्र कधीच फिरले नाही. म्हणून समस्त विदर्भाला आळशी म्हणून हिणवणे हे अतिशय इल्-इन्फॉर्म्ड असण्याचे लक्षण आहे.

"because toiling is not in our blood", जिचकारांनी असे म्हटले खरे, पण पुण्या-मुंबईत आणि इतर ठिकाणी असणारी वैदर्भिय लोकांची गर्दी बघता हे कितपत खरे आहे हे सुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. जर आमच्या रक्तातच कष्ट करणे नसेल तर मग हे मुंबै-पुण्यात अविरत कष्ट उपसायला 'लग्जर्‍या' (खाजगी प्रवासी बससाठीचा खास विदर्भातला शब्द) भरभरून येणारी मंडळी कोणत्या रक्ताची आहेत?

उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी वा कुठल्याच व्यवसायासाठी विदर्भात काहीच नाही, त्यामुळे लोक स्थलांतर करत आहेत. ह्या स्थलांतराचे आकडे चिंताजनक आहेत. ह्या सगळ्या स्थलांतरीत आळशी लोकांना इतर कष्टकरी असलेली शहरे फुकट पोसत असतील असे वाटत तर नाही. त्यामुळे विधान करण्याआधी आपण (किंवा जिचकारांनी) सारासार विचार करायला हवा होता असे वाटते.

मुंबईचा पैसा हा फक्त मुंबईचा पैसा नाही. मुळात 'हे' मुंबईचे, 'ते' विदर्भाचे असे मी तरी कधी करत नाही. कुठलंही उत्पादन हा सगळ्यांचा कलेक्टीव प्रयत्न असतो. त्यात मी मोठा तू छोटा असे काहीच नसते. पण अवघं आयुष्य मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेलेल्यांना असलं काही समजत नाही. त्यांना विदर्भ म्हणजे कुठलातरी अतिमागास, आदिवासी, बुद्धीने आणि पैशाने गरिब असा कुठला तरी प्रांत वाटत असतो. जसा आपल्याला आफ्रिका खंड वैगेरे वाटतो तसा. त्या समजातून मग काहीबाही टोमणे मारले जातात. ते पटत नाहीत. जसा मुंबईचा राज्याच्या साधनसामुग्रीवर अधिकार आहे तसाच राज्याचा मुंबईच्या कमाईवर अधिकार आहे. इथे हृदय रक्तपुरवठा करतं म्हणून जास्त भाव खायची गरज नाही कि आतडं रक्त बनवतं म्हणून ऐट करायची आवश्यकता नाही.

मुंबई २७ जुलैला प्याकेजची वाट न पाहता उभी राहीली याचे आपल्याला कौतुक असावे, त्यात गैर काहीच नाही. पण ही मुंबईची दुखणी आहेत. इथे गळेकापू स्पर्धा आहे. इथे तुम्ही उभे राहिला नाहीत तर दुसरा उभा आहेच तुमच्या जागेवर तुमच्यापेक्षा कमी पैशात काम करायला. व्यवसायाच्या संधी आहेत तसे प्रचंड ताणही आहेत. इथे तुम्ही उभे नाही राहिलात तर असे कोसळाल की परत उभे राहायला काहीच राहणार नाही.

आज मुंबईचे पाणी मुंबईत नाही. जिथून मुंबईसाठी पाणी येते तिथली गावे तहानलेली आहेत, जिथून वीज येते तिथलेच उद्योगधंदे विजेविना खोळंबलेले आहेत. टँकर आला म्हणून चेंगराचेंगरीतून मरणे, आणि फक्त एक तास लाईट असते तेव्हाच धान्य दळून घेण्यासाठीची तारांबळ हे मुंबईकरांनी अनुभवलेली नसते. साधं प्यायला पाणी नाही. गावागावातून विजेवर चालणार्‍या गिरण्या थंड पडल्यात, लोकांच्या पोटाला वेळेवर घास लाभत नाही. ही परिस्थिती भयानक आहे. विदर्भातले लोक फार सहनशील आहेत. खूप समजून घेतात. म्हणून अनुशेषाचा डोंगर उभा राहिला. आम्ही अजूनही समजूनच घेत आहोत.

मार्ग अनेक आहेत, विदर्भाच्या विकासाचे. कोणतेही एक उत्तर बरोबर नाही. सर्व पातळींवर सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. शिक्षणापासून शेती, उद्योगधंद्यापर्यंत आमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. तेवढे झाले तर वेगळ्या विदर्भाची गरज तशी राहणार नाही. एकत्र राहून हे होत नसेल तर वेगळं होण्याशिवाय पर्याय नाही. काही लोक फार भावनिक होऊन 'शिवाजींचा महाराष्ट्र तोडू देणार नाही', किंवा 'देऊन टाका एकदाचा आणि गप्प बसवा' ह्या टैपची विधाने करतात. ह्यातून सरंजामी मानसिकता दिसून येते. जणू विदर्भ ह्या लोकांच्या तुकड्यावर जगतोय. ह्या लोकांनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधाचा उंटावरून शेळ्या हाकलण्याचा उद्योग करण्याऐवजी जरा विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केले तर बरे होईल. विदर्भच कशाला, मराठवाडाही विकसित झाला पाहिजे आणि जव्हार, मोखाडाही. स्वतंत्र भारतात कुणीही वंचित राहू नये असे माझे मत आहे मग ते एकत्र असो वा विभक्त.

ही मुंबईची संस्कृती आहे. याला मुंबई पैशाच्या मागे लागली आहे असेही हिणवले जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कामे करतात.ज्यांना जळायचे आहे ते जळत राहतात आणी कामे न करण्याची कारणे देत राहतात.
ज्यांना काम करायचे आहे असे अनेक प्रगतीशील शेतकरी, उद्योजक महाराष्ट्रात सर्वत्र दिसतील पण त्यांचा आदर्श ठेवून कष्ट करण्याऐवजी दुसर्याचा मत्सर करणे सोपे आहे.

ह्या विधानांमागचा आपला रोख कळला नाही. कोण जळतंय वा मत्सर करतंय?

मुंबई-विदर्भाबद्दल बोलतांना आपण तो विकासाच्या असमतोलाचा 'राजकिय' प्रश्न आहे असं विसरून गेलात काय? कारण सगळी उदाहरणे आपण व्यक्तिगत विकासाबद्दल देत आहात. धागा राजकिय दुर्लक्षामुळे विदर्भावर झालेल्या विकासाच्या अनुशेषाबद्दल आहे. आणी विदर्भ ही एक व्यक्ती नसून मुंबईसारखाच एक प्रांत आहे. प्रांताला स्वभाव-गुण असतात काय?

मीही नेहमी पोपटराव पवारांचे उदाहरण देतो. की त्यांच्या गावात बारामहिने पाणी आणि आजूबाजूची गावांची पाण्यासाठी भटकंती असते. जर गावांच्या एका मोठ्या विभागासाठी मंजूर झालेली रक्कम, तंत्रज्ञान, शासकिय मदत-प्रशिक्षण पवारांनी फक्त स्वतःच्या गावासाठीच वापरली असती आणि आजुबाजुच्या गावांच्या तोंडाला पाने पुसून वर तुम्हीच आळशी आहात, तुम्हाला कष्ट नकोत म्हणून हिणवले असते तर मी पोपटरावांचे उदाहरण दुसर्‍या कारणासाठी दिले असते.

विदर्भाचे कष्ट चालूच आहेत. तिथे लोक बसून कोण संत्री तोंडात टाकेल त्याची वाट बघत उपाशी बसलेले नाहीत. पण त्यांचे कष्ट सध्या सर्वायवलसाठीच चालू आहेत. हे जर राज्यकर्त्यांनी ध्यानात घेतले तर मुंबैला मागे पाडेन असा विदर्भ उभा राहिल. पण आधी समस्या समजून घेतली पाहिजे, मग उपाय. ते तर काही होतांना दिसत नाही. फक्त निरर्थक टोमणेबाजी होतांना दिसते. ती का होते काय माहित?

असो.

धन्यवाद!

धन्यवाद, डांगेसाहेब.. अत्यंत समतोल, संयमित प्रतिसाद..

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 9:08 pm | सुबोध खरे

मी भारतभर फिरलो तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली उत्तरप्रदेशातील भय्ये ज्यांना कष्ट करायचे आहेत तेच मुंबईत येतात नाहीतर खैनी खात राजकारणावर गप्पा हाणत बसलेले भय्ये अख्या उत्तर प्रदेशात दिसून येतात. मुंबईतील माणूस हा सर्व देशातून कष्टाची तयारी असलेलाच येतो अन्यथा मुंबईतून परत जाणारी काम न करण्याची इच्छा असणारी माणसे कमी नाहीत. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हि वृत्ती असलेली माणसे मुंबईत टिकत नाहीत.
काही ना काही तर होऊनच जाईल' ह्याचा विश्वास असतो. त्यातले विदर्भात एकही नाही. हेच मी म्हणतो "नागपूर" का नाही?
हे जर राज्यकर्त्यांनी ध्यानात घेतले तर मुंबैला मागे पाडेन असा विदर्भ उभा राहिल.कोणत्या राज्यकर्त्याने मुंबईसाठी कधी काही केलं आहे हो? नुसते गहिवर काढता मुंबईतील झोपड्या कमी करण्यासाठी कि लोकल ची गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या राजकारण्याने काही केले आहे? जे काही करायचे आहे ते दुसर्याने आणी (ते सुद्धा राजकारण्यांनी) हा अविर्भाव कशा साठी?
"जिथून वीज येते तिथलेच उद्योगधंदे विजेविना खोळंबलेले आहेत".महाराष्ट्रात जेथे जेथे पैसे भरले जातात तेथे उद्योग्धन्द्याला पुरेशी वीज उपलब्ध आहे. एकेकाळी आकडे टाकून फुकट वीज घेणारे शहर भिवंडी येथे आता ९७ % बिलाचे पैसे भरले जातात आणि तेथे २४ तास वीज उपलब्ध आहे. हा भिवंडी प्याटर्न म्हणून ओळखला जातो
"जिथून मुंबईसाठी पाणी येते तिथली गावे तहानलेली आहेत" हि वस्तुस्थिती अजिबात नाही. तानसा वैतरणा हि धरणे मुंबई महापालिकेने स्वतःच्या खर्चाने बांधली आहेत तेथिल गावात भरपूर पाणी उपलब्ध आहे किंवा पवई विहार आणि तुळशी हे तलाव (हे तर मुंबईतच आहेत) या च्या काठावरची गावे तहानलेली आहेत हे विधान निखालस खोटे आहे. कोणत्या आधारावर आपण अशी बेजबाबदार विधाने करता?
असेच विधान विदर्भाच्या अतिरिक्त विजेबाबत आपण करता. प्रत्यक्षात वस्तुस्थिती निदर्शनास आणली असताना आपण मेगाबायटी प्रतिसाद देता
"मुंबईचा राज्याच्या साधनसामुग्रीवर अधिकार आहे" मग मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे.हे आपले विधान आणि त्या नन्तर
तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना ….हे विधान कशाचे द्योतक आहे. जेंव्हा सज्जड पुराव्यासकट सांगितले कि विदर्भाच्या विजेवाचून मुंबईचे काहीही अडणार नाही तेंव्हा आपण गहिवर काढता.
विदर्भात वातावरण निर्मिती करायला पाहिजे. ती कोणी करायची? मुंबईने कि पश्चिम महाराष्ट्र वा कोकणातील माणसांनी?
मुंबई कष्ट उपसते का विदर्भासाठी? मुंबई स्वतःसाठी कष्ट उपसते.जगात कोणीही कुणाचे नसते हे समजून घ्या.
ऐट करायची, टेचात असायचे, माज दाखवायचा हे शब्द कोणाच्या प्रतिसादात आहेत हे जर परत एकदा वाचून घ्या. जमले तर मी दिलेले सर्व दुवे सुद्धा परत वाचून घ्या.
फक्त एक तास लाईट असते तेव्हाच धान्य दळून घेण्यासाठीची तारांबळ हे मुंबईकरांनी अनुभवलेली नसते अशा तर्हेची सारी रडगाणी तुम्ही गाता. मुंबईतील माणूस रोज दोन ते तीन तास लोंबकळत जीव मुठीत धरून लोकलने कामावर जातो ते काय आनंदाने गाणी गात का? थोडी थोडकी नव्हे तर ६५ लाख लोक रोज असे भाकरीसाठी प्रवास करतात त्यांचे कष्ट तुम्हाला दिसत नाहीत? बारा तास घरापासून लांब जातात त्यांचे कष्ट दिसत नाहीत? कि आयुष्यभर कष्ट करून एक डोक्यावर जेमतेम छप्पर असलेले घर मिळवताना काढलेल्या त्याच्या कष्टाची तुम्हाला किंमत नाही? मुंबईकर आपले रडगाणे लोकात रडत राहत नाही कि जालावर गहिवर टाकत नाही. कधी प्याकेजसाठी आंदोलने करीत नाही.तुमच्या सारखे लोक रडारड करताना डोक्यात जातात.
स्पष्ट शब्दात सांगतो कष्ट करायची तयारी असेल तर या मुंबईत. नुसती रडारड करायची असेल तर राहा आपल्या गावात. मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी तो झारखंड किंवा बिहार च्याच मार्गावर जाईल यात मला मुळीच शंका नाही.

संदीप डांगे's picture

12 Dec 2015 - 9:39 pm | संदीप डांगे

नीट न वाचताच दिला का प्रतिसाद..? असो. तुमचे मत बरोबरच आहे. विदर्भातली सगळी जनता आळशीच आहे.

धन्यवाद! माझ्याकडून चर्चेस पूर्णविराम.

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 7:45 am | सुबोध खरे

LOL

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 7:26 pm | संदीप डांगे

ळॉळ करणे सोपे आहे डॉक्टरसाहेब, मुद्दा पकडून चर्चा करणे कठिण आहे. विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या राजकिय अन्यायाच्या धाग्यात आपण वैयक्तिक विकासाच्या कारणांचा उहापोह करत आहात, यातच आपल्याला खरोखर चर्चेत रस आहे की वितंडवादात हे लक्षात आले.

जमत असेल तर ह्या दुव्यावरची ताजी आकडेवारी बघून घ्या.

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 8:55 pm | सुबोध खरे

m.timesofindia.com/india/Wrong-method-used-to-calculate-Vidarbha-Marathwada-backlog/articleshow/46328013.cms

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 9:26 pm | संदीप डांगे

पेस्टायच्या आधी वाचून तर घ्यायचं ना डॉक,

बातमीत म्हटलंय की समित्यांनी अनुशेषाचे गणित चुकिच्या गृहितकांच्या आधारावर मांडलंय. विदर्भाच्या बाबतीत अन्याय झाला नाही असे त्यांचे म्हणणे नाही. समित्यांनी जे मांडले त्याआधारे विदर्भ मराठवाड्यांचा अनुशेष दूर करणे पुढच्या ६५-७० वर्षात शक्य होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. माझे इंग्रजी कच्चे असेल तर कोणीही जाणत्यांनी खालचा उतारा भाषांतरीत करावा:

The use of incorrect methodology to remove backlog was the reason Vidarbha and Marathwada are still backward even after so many years. It was sad that Dandekar, himself being a statistician, had adopted a wrong method, which he realized later. It's not proper to tell the people from backward regions to wait till another 65-70 years for making amends. Their focus on government funds was their biggest drawback," Apte said.

Earlier, Deshpande made a detailed presentation on Kelkar report and briefed on its terms of reference and also how they arrived on various recommendations. He further explained how Vidarbha and Marathwada regions remained backward due to various factors like inadequate flow of private investments, low level governance and low human development index (HDI)

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 9:28 pm | सुबोध खरे

Agricultural consumers, who are charged tariffs largely based on the installed horse power (HP) capacity of their pumps, also account for the largest chunk of the MahaVitaran's Rs 12,000 crore pending dues. They also heavily cross-subsidised by the utility's other classes of consumers like industrial and commercial users.

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 10:06 pm | संदीप डांगे

ही वृत्तपत्रीय इंग्रजी समजत नाही हो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते सांगा.

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 10:19 pm | सुबोध खरे

12000कोटी रुपयै शेती पंपाची वीज थकबाकी आहे. 8 कोटी लोलोकसंख्येच्या महाराष्ट्रात माणशी 1500 रुपये शेतीच्या विजेसाठी देउनही यांची रडारड.

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 10:26 pm | संदीप डांगे

सदर आकडेवारी संपूर्ण महाराष्ट्राची आहे. ह्यात विशिष्टपणे विदर्भाच्या शेतकर्‍यांची आकडेवारी आहे काय? तसेच बातमीचा संदर्भही तपासून पाहावा अशी विनंती करतो.

कुणावर रडारडीचा आरोप करण्याआधी नक्की परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा जवळ असलेला बरा.

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 11:08 pm | सुबोध खरे

सौराष्ट्र पुढे का गेले आणि वैविदर्भ् का मागासलेले दोघांची भौगोलिक परिस्थिती एक असताना याचा तौतौलनिक अभ्यास आहे.

संदीप डांगे's picture

13 Dec 2015 - 11:26 pm | संदीप डांगे

इथेही आपण नीट वाचलेले दिसत नाही. सौराष्ट्र पुढे जाण्यात गुजरात सरकारचा भक्कम पाठिंबा आणि कर्तव्यतत्परता आहे हे ह्या अहवालात स्पष्टपणे लिहिलेले आहे. काश अशीच धडाडी महाराष्ट्र सरकारने दाखवली तर विदर्भ कशाला मागे राहिल?

Vidarbha's agrarian stagnation and resultant stress on its farmers showing up in high suicide rates has been explained in terms of six 'growth depressants' which are so hard to change in quick time that Vidarbha's agriculture appeared condemned to stagnation for a long time.

The failure of all manner of 'special packages' designed to jumpstart Vidarbha's agriculture gave added credence to this swansong. However, accelerated growth of agriculture in Saurashtra, which suffered even more than Vidarbha from the six 'growth depressants', raises new questions about this received wisdom about what ails Vidarbha's agriculture.

This Highlight has argued that Saurashtra's success has been aided by a succession of good monsoons but is crafted by a pragmatic and proactive governance of its agricultural economy. Government actions that have played a strong catalytic role in Saurashtra include: [a] explicit and sensible support to community based water harvesting and groundwater recharge movement; [b] Jyotigram and a policy of supplying an 8 hour ration of quality power supply to agriculture; [c] annual organization of Krishi Mahotsav; [d] allowing private Bt cotton seed producers to flourish even in violation of national policy; [e] controlling Bt cotton seed prices to affordable levels, when central government batted for seed multinationals; [f] later allowing Bt cotton seed prices to rise as Gujarat farmers emerged as major seed suppliers to other states; [g] handing over government dairies to NDDB to operate; and liberalizing the APMC act to free farmers to sell their produce direct to processors. Here was an administration that was pro-farmer in a steadfast and opportunistic way.
All these have opened up new economic opportunities in agriculture; and the Saurashtra farmer has responded in full measure. Many of these policy actions are readily replicable in Vidarbha, and there seems no reason to believe that Vidarbha farmer will respond differently from Saurashtra farmer.

सुबोध खरे's picture

14 Dec 2015 - 12:18 am | सुबोध खरे

डांगे साहेब
मी डॉक्टर आहे. शेती तज्ञ नाही. राजकारणी हि नाही. पण जी प्रत्यक्ष परिस्थिती पहिली त्याबद्दल मला काही वाटते ते लिहायचे होते. लोकांच्या भावना चेतव्ल्याशिवाय ते तुमच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत.
आपण हा तौलनिक अभ्यास केला तर आपल्याला जाणवते कि सौराष्ट्रात हीच किंबहुना विदर्भापेक्षा वाईट परिस्थिती होती. पण तेथील लोकांनी आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या सरकारने काय करून दाखवले ते आपणाला आता लक्षात येत आहे. "अच्छे दिन "हेच आहेत.

पण एकदा माणसे द्वेषाने आंधळी झाली कि त्यांना चांगल्या गोष्टी दिसेनाशा होतात. विदर्भातील लोकांची मनोवृत्ती कोन्ग्रेस सरकारने "असेल माझा हरी" अशी करून ठेवलेली आहे. सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत हि मनोवृत्ती जोवर विदर्भातील माणसे सोडत नाहीत तोवर विदर्भाचा विकास होणे कठीण आहे . आपल्या कल्याणकारी सरकारने गेल्या वीस वर्षात काय केले आहे ते या दुव्यात स्पष्ट आहे.

"दुर्दैवाची गोष्ट अशी कि विदर्भाचा अनुशेष म्हणजे विजेचे पंप हेच टुमणे धरून आजचेही विदर्भाचे नेते बसले आहेत."
पंप नुसते दिले तरी मुळात जमिनीतील पाणी वाढवण्याचे किंवा दुसरी पिके घेण्याचे कोणीच बोलत नाही. शेतकरी/ सहकारी संघ स्थापन करून दुग्धविकास किंवा पूरक जोडधंदे निर्माण करू असे कोणीही म्हणत नाही. ज्या गोष्टी पवार साहेबांनी केल्या उदा. कोरडवाहू जमिनीत डाळिंबे किंवा बोरांची शेती केली किंवा पश्चिम महाराष्ट्रात सहकारी दुध संघ निर्माण केले ( सरकारच्या पाठीम्ब्याविना) असे विदर्भात झाले नाही.
त्यामुळे जोवर विदर्भातील माणसे " मी" काहीतरी करून दाखवेन हे म्हणत नाही तोवर त्यांचा विकास होणे नाही. नाव घ्यावे असा एकही नेता विदर्भात आजमितीला( निदान माझ्या अल्प मतीप्रमाणे) नाही.( तुलना मोदी साहेबांशी करण्याचा मोह होतो आहे पण काही लोकांचा पापड मोडेल).
या तुलनेत विदर्भातील माणसे थोडीशी आळशी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. तेंव्हा त्यांनी स्वतः उद्योगशीलता दाखविली तर आणि तरच विकास होईल. अन्यथा वेगळा विदर्भ काढा काहीही होणार नाही. आजच्या ऐवजी नवे राज्यकरते येतील आणि तेच गब्बर होतील आणि विदर्भ आहे तसाच राहील.
जसे विदर्भाचे प्रश्न आहेत तसेच मुंबईचे हि आहेत. पण मिपा वर मुंबईचे प्रश्न कधीही विचारात घेतले गेले नाहीत कि कोणी पुढे आणले नाहीत. कारण मुंबईच्या माणसाला माहित आहे कि प्रश्न स्वतःला सोडवावे लागतात. जवळून रोज पाहत आल्याने सरकार काहीही करणार नाही हे त्याला माहित असते
राहिली गोष्ट-- मी जाणून बुजून दुवे असे दिले कि ज्यातून लोक नीट वाचून प्रश्न समजून घेण्यासाठी पुढे येतील.
अन्यथा ज्या दुव्यांमुळे तुमचा मुद्दा कमकुवत होईल असे दुवे देऊ नयेत एवढे व्यवहार ज्ञान मला नक्कीच आहे. ( सरकारशी तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिल्यावर एवढे व्यवहार ज्ञान नक्कीच येते). पण येथे मला माझा मुद्दा सरशी करायचा नव्हता तर वस्तुस्थिती लोकांच्या नजरेस आणायची होती आणि जमले तर त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास सुचवायचे होते.

EXCHANGE OF KNOWLEDGE IS DISCUSSION

ARGUMENT IS EXCHANGE OF IGNORANCE. हे तत्व मला पक्के माहित आहे.
या काथ्याकुटात हि वस्तुस्थिती जर मी लोकांच्या नजरेस आणू शकलो तर येथे टंकनात घालवलेला वेळ सार्थकी लागला असे मी समजेन.
भावनेच्या भरात, जाणता किंवा अजाणता कुणाचे मन यात दुखावले गेले असेल तर मनापासून क्षमस्व. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता.
मी दिलेल्या सर्व गोष्टी या दुव्यांसकट आहेत जिज्ञास्सुनी जरूर त्या पहाव्यात अशी मी त्याना विनंती करेन .
धन्यवाद.
इति लेखनसीमा
सौराष्टाची परिस्थिती मी स्वतः १९८९ पासून पाहत आलो आहे. गेली पाच वर्षे दर वर्षी मी समाजसेवी वैद्यकीय कॅम्पला जात आहे.मृद्संधारण शेती विषयक जागृती या कित्येक गोष्टी मध्ये होणारी तेथील प्रगती मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Dec 2015 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

मला पहिले वाटलं वरच्या बातमीच्या दुव्यातला असेल. पण तिथे हा मजकूर नाहीये.

मोठ्या प्रमाणावर कृषीपंपांचा वापर उसाच्या पिकासाठी केला जातो.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. त्यामुळे हा मुद्दा विदर्भाच्या शेतीबाबत असेल असे वाटत नाही.

चिगो's picture

14 Dec 2015 - 5:38 pm | चिगो

मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी तो झारखंड किंवा बिहार च्याच मार्गावर जाईल यात मला मुळीच शंका नाही.

एवढा उद्वेग? असोच. तसेही बाहेरच्यांना विदर्भ, त्यातल्या त्यात झाडीपट्टी बिहार-झारखंड किंवा त्यापेक्षाही भयंकर वाटते. 'गडचिरोली-चंद्रपूर में डाल दुंगा' ही वाक्ये धमकीसारखी वापरलेली पाहिली आहेत हिंदी चित्रपटांत..

माझ्यामते बिहार-झारखंड काही कचरा नाहीत. त्यांना दिशा मिळाली तर तेही बदलू शकतात, बदलताहेत.. कृपा करुन 'उपकारी' किंवा ;इमोशनल' न होता विदर्भ वेगळा होऊच द्यावा ना मग महाराष्ट्राने. म्हणताय, तशी लायकीच नसेल सडत मरु पण शिव्या तरी नकोत कुणाच्या.. बाकी जिचकारांचे वाक्य प्रमाण मानून बसायची गरज नाही..

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 9:14 pm | सुबोध खरे

जाता जाता -- आमचे आजोबा मुंबईतून १९२५ साली म्याट्रीक झाले. ते १९०८( जन्मापासून) मुंबईत होते. आमचे वडीलही मुंबईतच आहेत. आम्ही जन्मजात मुंबईकर आहोत. त्यामुळे मूळ गावी गुहागरला (जे आमच्या पणजोबांनी सोडले आणी जेथे आमचे आडनाव बंधू सोडून काहीच शिल्लक नाही) जाऊन उद्योग काढणे शक्य नाही.

कानडाऊ योगेशु's picture

14 Dec 2015 - 7:27 pm | कानडाऊ योगेशु

खरेसाहेब एकदा तुमच्या नात्यागोत्यातले कोण कोण काय काय करते आहे ह्यावर एक डिट्टेलवार धागा होऊनच जाऊ द्या.! (कृ.ह.घ्या.)

नितिन थत्ते's picture

12 Dec 2015 - 9:43 pm | नितिन थत्ते

वैदर्भीयांना स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर व्हावा.

नितिन थत्ते's picture

12 Dec 2015 - 9:43 pm | नितिन थत्ते

त्यांना तसा वेगळा विदर्भ हवासा वाटतो हे कारण पुरेसे असावे.

सुबोध खरे's picture

12 Dec 2015 - 10:55 pm | सुबोध खरे

काश्मीर बद्दल हेच म्हणणार काय?

नितिन थत्ते's picture

12 Dec 2015 - 11:17 pm | नितिन थत्ते

प्रामाणिक उत्तर हो असे आहे. [माझ्या हाती सत्ता आली तर मी तसे करणार नाही].

एखाद्या प्रदेशातील लोकांना स्वतंत्र व्हावे असे खरोखर वाटत असेल तर त्यांना स्वतंत्र होऊ न देणे हा "साम्राज्यवाद" ठरतो. कारण मग त्यांना स्वतंत्र होऊ न देण्याचे कारण त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक आणि इतर संपत्तीचा उपभोग (किंवा केवळ ईगो) हेच असू शकते.

मोगा's picture

13 Dec 2015 - 5:09 am | मोगा

सहमत

हुप्प्या's picture

14 Dec 2015 - 6:22 am | हुप्प्या

कश्मीर हे फुटून एक तर वेगळा देश किंवा पाकिस्तानचा हिस्सा बनू पहात आहे. विदर्भ वेगळा झाला तर काही वेगळा देश होणार नाही. तो भारताचा अविभाज्य भागच रहाणार. कुठलाही भारतीय तिथे जाऊन राहू शकतो, व्यापार उद्योगधंदे काढू शकतो. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही.

चिगो's picture

14 Dec 2015 - 5:39 pm | चिगो

सहमत..
अवांतरः बरेच दिवसांनी आलात, थत्तेकाका..

मोहन's picture

12 Dec 2015 - 10:27 pm | मोहन

+१. मुद्द्याचा प्रतिसाद. बाकी चर्चा गरजेची नाही.

सिरुसेरि's picture

12 Dec 2015 - 10:49 pm | सिरुसेरि

विदर्भातील बरीच जनता पुणे , मुंबई येथे राहते आहे . जर विदर्भ वेगळा झाला तर त्यांच्यावर "परप्रांतीय" हा शिक्का बसु शकतो अशी शंका वाटते आहे .

श्रीरंग_जोशी's picture

13 Dec 2015 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी

दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला डॉ विश्वंभर चौधरी यांचा विदर्भ विवेक हा लेख या विषयावर चर्चा करणार्‍यांसाठी अत्यंत वाचनीय आहे.

लेखाचा मजकूर इथे डकवत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या मुहूर्तावर राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या एका वक्तव्यावरून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित होऊन राजकीय वातावरण तापलं. चर्चेनं असं वळण घेतलं की, जणू काही विदर्भवासी देशाविरुद्ध विद्रोह करून देशाची फाळणीच करू मागत आहेत! विभाजित झाला, तरी विदर्भ भारतातच असणार आहे, हे लक्षात घेऊनच या प्रश्नाची चर्चा केलेली बरी. आणखी एक छोटा मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो हा की, महाधिवक्ता होण्याच्या आधीपासूनच अणे यांची वेगळ्या विदर्भाबाबत ठाम भूमिका आहे. त्यांचे आजोबा हे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या आद्य नेत्यांपैकी एक आदरणीय नेते होते आणि केवळ श्रीहरी अणे हेच नाही तर त्यांच्या तीन पिढ्या किंवा खरं तर विदर्भाच्या तीन पिढ्या ही मागणी करत आहेत, हेही लक्षात ठेवूनच या प्रश्नाची चर्चा व्हावी.

चर्चेची सुरुवात करताना ब्रिजलाल बियाणी या अत्यंत व्यवहारी नेत्याचं स्मरण होणं क्रमप्राप्त आहे. संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत विदर्भाचं वेगळं राज्य होतंच. विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात घेण्याचं घाटलं, तेव्हा कै. यशवंतराव चव्हाणांच्या “संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाचा” राजकीय आशय या नेत्याला पुरेपूर कळला होता! बियाणी यांनी असा प्रस्ताव मांडला होता, की संयुक्त महाराष्ट्रात जाऊ नये, त्या ऐवजी विदर्भ-मराठवाडा या प्रांतांचं एक वेगळं राज्य बनवावं.

ब्रिजलाल बियाणींचे न ऐकता विदर्भ-मराठवाड्यातील नेत्यांनी मंगलकलशावर हुरळून जाऊन संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय किती चुकला, हे आजच्या शेतकरी आत्महत्या, विकासाचा अनुशेष, पाण्याचं विषम वाटप आणि एकूणच प्रादेशिक असमतोल, यातून स्पष्टच होतं. वि. म. दांडेकर समितीपासून विजय केळकर समितीपर्यंत प्रत्येक समितीनं हा मुद्दा वेळोवेळी ठळक करून दाखवला; तरीही अनुशेष शिल्लक आहे, नव्हे तो वाढतच आहे. संयुक्त कुटुंबात मोठा भाऊ धाकट्यावर अन्याय करतो, तेव्हा आपण वेगळं निघून आपलं स्वत:चं भविष्य घडवावं, असं धाकट्याला वाटणं स्वाभाविक आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचं अधिष्ठान हे असं आहे. हा मुद्दा भावनिक बनवण्याचा प्रयत्न शिवसेना राजकीय सोयीसाठी करत असली, तरी हा आर्थिक मुद्दा आहे, हे अगदी स्पष्ट आहे. भावनिक राजकारणापुढे एखाद्या विभागाचं जगण्याचं अर्थकारण मारून टाकू नये, एवढा विवेक सेनेला कधीच नव्हता. त्यामुळे सेना काय म्हणते ते महत्त्वाचं नसून विदर्भाचे लोक काय म्हणतात, हे महत्त्वाचं आहे.

विदर्भाच्या अस्वस्थतेची समीक्षा कशी करायची? चंद्रपूरचा माणूस चौदा तासांचा प्रवास करून मुंबईत येतो कशासाठी, तर अगदी छोट्या कामासाठी. आल्यावर त्याला मंत्रालयाची वेळ संपली म्हणून रस्त्यावर राहावं लागतं. व्यवस्थेचं केंद्रीकरण एवढं आहे, की प्रत्येक काम राजधानीत आल्यावरच होतं. माझं काम जर राजधानीशिवाय होणारच नसेल तर निदान राजधानी तरी माझ्याजवळ आणा, अशी ही मागणी आहे. शिवसेनेला एवढा अस्मितेचा अटॅक आला असेल तर आत्मपरीक्षण करून स्वत:ला विचारावं की, उन्हातान्हात मंत्रालयाच्या रांगेत उभं राहण्यासाठी १४ तासांचा प्रवास करून आलेल्या विदर्भातील सामान्य माणसासाठी सेनेनं सत्ता होती तेव्हा आणि आता पुन्हा सत्ता आहे तेव्हा काय केलं? विकेंद्रीकरणासाठी काही प्रयत्न केले का? आजही विकेंद्रीकरण करू, हे तोंडदेखलं आश्वासन तरी द्यायला सेना तयार आहे का? सबब, हा मुद्दा सामान्य माणसाच्या सोयीचा आहे, राजकारणाचा नाही, हे महत्त्वाचं आहे.

राज्याला जो केंद्राचा निधी मिळतो, त्याचं विषम वाटप होतं. अनुशेष वाढला म्हणून वैधानिक विकास मंडळं आली. सिंचनाच्या निधीवरून असो की रस्त्यांच्या; रस्सीखेच चालू राहिली. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांवर ढकलून चालणार नाही; त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला. मुद्दा असा आहे की, विदर्भ-मराठवाड्याच्या नेत्यांना वैयक्तिक स्वार्थापुढं प्रदेशाचा स्वार्थ दुय्यम वाटला. आज हा युक्तिवाद समोर येतो आणि तो अगदी रास्तच आहे, की विदर्भ-मराठवाड्याला वर्षानुवर्षे नेतृत्व मिळूनही अनुशेष का राहिला? मुद्दा बरोबर आहे, नेते नाकर्ते निघाले हेही मान्य आहे; पण नेते नाकर्ते निघाले म्हणून जनतेला किती दिवस वेठीस धरायचं, याचाही विवेकानं विचार व्हावा. विदर्भ वेगळा झाला की लगेच त्याचा विकास होईल, या भ्रमात कोणीच नाही.

किमान केंद्राच्या निधीचा आमच्या हक्काचा वाटा आम्हाला उपलब्ध होईल आणि आम्ही आमचे नियोजन करू शकू, असा त्यांचा मुद्दा आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विशेषत: वन-संपदा मोठी असल्यानं त्यांचं अर्थकारण ते सांभाळू शकतात, असं त्यांना वाटतं. पुण्या-मुंबईच्या विकासाचं मॉडेल तेच नागपूरचं असावं, असा कोणाचा हट्ट असू नये. छोटी राज्य एकूण विकास नियोजन, संसाधनांचं व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन, व्यवस्था विकेंद्रीकरण या दृष्टीनं हिताची असतात.

महाराष्ट्राचा आकारमानाच्या दृष्टीनं पसारा एवढा प्रचंड वाढलाय, की मुंबईच्या एकमेव मंत्रालयातून त्यावर नियंत्रण करणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललंय. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या मोठ्या राज्यांचं विभाजन होऊन अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा या नव्या राज्यांची निर्मिती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं विभाजन होत असेल तर काही पाप घडतंय, असं समजण्याचं कारण नाही. शिवसेना जो १०५ हुतात्म्यांचा मुद्दा पुढे करत आहे, तो मुद्दा दिशाभूल करणारा आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले, हे खरं आहे; पण ते मुंबई महाराष्ट्रात राहावी या कारणासाठी, विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात यावेत, यासाठी नाही! दुसरीकडे बेळगाव महाराष्ट्रात यावं, म्हणून सेना वर्षानुवर्षे बोलत आहे; पण त्यावर केंद्र आणि राज्यात सरकारमध्ये असूनसुद्धा काही कृती करताना दिसत नाही. बेळगाव महाराष्ट्रात आणा नाहीतर आम्ही दोन्हीकडून सत्तेतून बाहेर पडू, असा खास मराठी वगैरे ‘बाणा’ आज सेना का दाखवत नाही? की शिवसेनेला हे मुद्दे फक्त राजकारणासाठी वापरायचे आहेत?

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाच्या गरजा वेगळ्या आणि त्या भागाची आर्थिक गरज भागवण्यासाठी लागणारी तरतूदही वेगवेगळी आहे. प्राधान्यक्रम वेगळे आहेत. पुण्या-मुंबईत वाहतूक हा प्राधान्याचा प्रश्न असेल तर विदर्भात कापूस-सोयाबीनच्या शेतीचा प्रश्न प्राधान्याचा आहे. आजच्या नियोजनात माहिती तंत्रज्ञान पुण्या-मुंबईच्या लोकांना गरजेचं वाटत असेल, तर शेती मालावर प्रक्रिया करणारे औद्योगीकरण हा विदर्भ- मराठवाड्याच्या गरजेचा विकासक्रम आहे. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन विशेषत: खनिज संपत्ती अर्थात, खाणींचं व्यवस्थापन आणि वाटप मुंबईतून कधी आणि कसं झालं, ते स्थानिक जनतेला कळतसुद्धा नाही, इतकी मुंबई त्यांच्यासाठी दूर आहे! छोटं राज्य झालं तर स्थानिक लोकांचा जल, जमीन, जंगल, खनिज यांच्या व्यवस्थापनात सहभाग वाढण्याची शक्यता नक्कीच वाढते. प्रशासन जेवढं स्थानिक होत जाईल, तेवढं लोकाभिमुख आणि लोककेंद्री होत जाईल. केंद्र-राज्य व्यवस्थेत हे दोन्ही घटक सक्षम होऊन राहिलेले असून स्थानिक स्वराज्य संस्था हा घटक पूर्णत: या दोहोंवर अवलंबून आहे, असं चित्र दिसतंय. तशा परिस्थितीत छोटी राज्यं अधिक चांगलं प्रशासन राबवू शकतात. शेवटी प्रश्न व्यवस्था किती केंद्रित करून ठेवायची, हाही आहे. म्हणजे व्यवस्था केंद्रित आणि तरीही लोकसहभागाची अपेक्षा, असा हा उफराटा मामला आहे. व्यवस्था विकेंद्रित असेल तरच ती लोकांना सोयीची असेल. आजची व्यवस्था नेत्यांना सोयीची आहे, लोकांना नाही.

डॉ. विश्वंभर चौधरी
dr.vishwam@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुबोध खरे's picture

13 Dec 2015 - 11:15 pm | सुबोध खरे

विदा द्या. भाभावनिक भाषणे सोडा.वरचा अभ्यास वाचून घ्या.टाटा आणि जल व्यवस्थापन यांचा,

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 5:56 am | श्रीरंग_जोशी

डॉ सुबोध खरे यांचे या धाग्यावरील प्रतिसाद वाचून सखेद आश्चर्य वाटले. त्यांचे अभ्यासपूर्ण व अनुभवसिद्ध प्रतिसाद वाचायला मिळणे ही नेहमीच पर्वणी असते परंतु या विषयाच्या बाबतीत सर्वच उलट दिसत आहे.

या विषयावर काहीही लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट करतो की मी लिहीत असलेल्या माहितीत काहीही चूक नसेल याची १००% खात्री मी देऊ शकत नाही. याचे कारण असे आहे की या विषयावर वर्षानुवर्षे इतके अनुभवले अन वाचले आहे की वेगवेगळ्या घडामोडींची वा माहितीची सरमिसळ होत असते. परंतु याचा अर्थ असा नाही की मी ठरवून चुकीची माहिती इथे देईन.

सर्वप्रथम माझ्या पार्श्वभूमीविषयी. मी जन्माने नागपूरकर अन तसा अमरावतीकर. वयाची पहिली एकवीस वर्षे अमरावती शहर व त्यातल्या काही तालुक्यांच्या ठिकाणी मी जगलो आहे. त्यानंतर एमसीए करण्यासाठी अडीच वर्षे बारामती अन त्यानंतर शेवटच्या सत्रातले इंडस्ट्रियल ट्रेनिंग पासून पुढे नोकरीनिमित्त पुढची साडेतीन वर्षे मी पुण्यात राहिलो आहे. गेली अनेक वर्षे मी अमेरिकेत राहत आहे.

माझे अनुभवविश्व फारसे समृद्ध नसले तरी विविध पार्श्वभूमी असलेल्या माणसांशी माझा संबंध येत गेला आहे. एमसीए करताना महाराष्ट्रातल्या सर्व कोपर्‍यांतील तसेच काश्मीर, पंजाब, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, गुजरात इथले माझे सहाध्यायी होते. नोकरीमध्ये भरपूर प्रमाणात दक्षिण भारतीयांशी संबंध आला व येतो. अमेरिकेतल्या वास्तव्यात तर जगातल्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मंडळींशी संबंध येतो.

आजवरच्या आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव येऊनही मी कोणत्याच माणसांच्या बाबतीत सरसकटीकरण करू शकणार नाही. सर्वच माणसांमध्ये चांगले व वाईट गुण दिसतात. मूळच्या पुणेकरांबाबत मराठी आंतरजालावर नेहमीच अप्रिय टिप्पण्या केल्या जातात. पण माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात अन तिथे सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करताना मला कधीच वावगा अनुभव आला नाही. इतर ठिकाणची सर्वसामान्य माणसं जशी असतात तशीच पुण्यातली सर्वसामान्य माणसं वाटली.

विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषासाठी वैदर्भीय माणसाच्या आळसाला कारण मानणे हे पूर्णतः चुकीचे आहे. डॉ खरेंनी अविरत कष्ट घेऊन स्वतःचे व्यवसाय यशस्वीपणे उभरणार्‍या व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत. अशीच उदाहरणे माझ्या नातेवाईक व ओळखीच्या मंडळींची विदर्भातलीही आहेतच. शून्यातून सुरुवात करून आज यशस्वी उद्योजक बनले असले तरी आजही परिश्रमात कुठली कमी येत नाही. पूर्वी सह्याद्री वाहिनीवर जिद्द नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्यामध्ये शून्यातून यशस्वीपणे उद्योग उभारणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती दाखवल्या जात असत. बी.जी शिर्के अन अमरावतीच्या घरकूल मटण मसालाचे मालक श्री वरणगावकर यांच्या मुलाखती मला अजूनही आठवतात.

२००४ साली लोकसत्ताच्या दिवाळीच्या विदर्भरंग मासिकात विदर्भातल्या तरुण उद्योजकांच्या मुलाखती आल्या होत्या. बहुतेकांनी उद्योगांची सुरुवात करताना उमेदीच्या काळात मुंबईला खेटे मारण्यात किती काळ व श्रम वाया गेले याबाबत सांगितले होते. २००२ साली माझ्या कॉलेजात एका जुन्या विद्यार्थ्यास आम्हाला व्याख्यान देण्यास आमंत्रित केले होते. जो तोवर यशस्वी उद्योजक बनून पंतप्रधानांच्या परदेशदौर्‍यांमध्ये उद्योजकांच्या शिष्टमंडळात सामील होत होता. त्याचीही कहाणी अशीच होती. अमरावतीत मेडिकल वस्तूंचा जसे सिरींज वगैरे कारखाना त्याने सुरू केला होता. मार्केटिंगसाठी केवळ नागपूरमध्ये कार्यालय सुरू करून उपयोग झाला नाही म्हणून एक कार्यालय त्याने दिल्लीतही सुरू केले होते. तेव्हा कुठे त्याच्या उद्योगाने वेगाने प्रगती केली. हे सर्व सांगण्याचे प्रयोजन हेच की अविरत परिश्रम घेणारे अन प्रयत्नवादी लोक इतर ठिकाणांप्रमाणेच विदर्भातही आहेत.

स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे वेगळ्या विदर्भाबाबतचे विचार मलाही ठाऊक आहेत. आजवर साडेतीन चार तास उभ्याने कुणाचे व्याख्यान मी ऐकले असेल तर या माणसाचे ( जून २००३ मध्ये). एक माणूस एकाच वेळी इतक्या सार्‍या विषयांवर प्रभुत्व कसे काय मिळवू शकतो हा प्रश्न त्यांचे व्याख्यान अनुभवून मला पडला होता. डॉ. जिचकार अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे होते. कॅन्सरमुळे होणार्‍या मृत्यूच्या दाढेत जाऊन ते यशस्वीरीत्या परतले होते अन पुन्हा कार्यरत झाले होते.

तर हा माणूस अत्यंत सकारात्मक विचार करणारा, प्रयत्नवादी व आशावादी होता. त्यांचा अपघाती मृत्यू जून २००४ मध्ये झाला. त्यानंतर पुढची साडेदहा वर्षे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. ज्यामध्ये बहुतेक सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे होती. डॉ. जिचकार आज हयात असते तर या सरकारांचा कारभार पाहून वेगळ्या विदर्भाबाबत आपली भूमिका नक्कीच बदलली असती. त्यांनी वैदर्भीय जनतेबाबत परखडपणे नकारात्मक मते मांडली आहेत कारण ते स्वतःही वैदर्भीयच होते. कुणीही स्वतःबद्दल स्वतःच्या भागाबद्दल प्रथम नकारात्मक काय आहे हेच लक्षात घेतो व बोलून दाखवतो. असे मत इतरांबाबत बोलले जात नसते. डॉ. जिचकारांच्या अशा वक्तव्याचे भांडवल केले जाऊ नये.

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधल्या लोकांची भारतातून फुटून वेगळा देश बनवण्याची मागणी व वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी यांना डॉ. खरे यांनी एकसारखेच समजले आहे. हेच परिमाण लावले तर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनही चुकीचेच होते असे म्हणावे लागेल.

याखेरीज विदर्भाचे राज्य झाल्यास ते झारखंड अन बिहारच्याच मार्गाने जाईल असेही डॉ. खरे यांनी वर लिहिले आहे. मिपाच्या भाषेत हे म्हणजे खरोखरच कैच्याकै विधान आहे. या दोन राज्यांचा सर्वात मोठा नकारात्मक घटक म्हणजे तिथे खोलवर रुजलेला जातीयवाद. अन या परिमाणाच्या बाबतीत विदर्भातली परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा नक्कीच बरी आहे. हे तुलनात्मक वाक्य आहे याचा अर्थ असा नाही की विदर्भात जातीयवाद अजिबात नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्रात काही ठिकाणी मंदिरांत उघडपणे पशुबळी दिले जातात पण विदर्भात हे प्रकार बंद होऊन अनेक दशके लोटली आहेत.

नाव घ्यावे असा नेता विदर्भात नाही असाही दावा डॉ. खरे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर जाणे अन महाराष्ट्रातल्या यशस्वीपणे राबवलेल्या योजना इतर राज्यांसाठी अनुकरणीय ठरण्यामध्ये मोठे योगदान आहे दोन मुख्यमंत्र्यांचे. या सर्व गोष्टींची पायाभरणी करणारे स्व. यशवंतराव चव्हाण अन आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात यशस्वीपणे राज्याची घोडदौड करणारे स्व. वसंतराव नाईक. नाईक विदर्भातले होते. त्यांच्या कार्यकाळानंतर राज्याच्या राजकारणाची व सत्ताकारणाची प्रगल्भता कमी होत गेली. गेल्या दोन दशकांतल्या राज्य सरकारांचा विचार केल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितिन गडकरी यांनी केलेल्या कामाच्या जवळपास आजही कुणी पोचू शकले नाही. त्यांनी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांचा अभ्यास करायला इतर राज्यांमधूनच नव्हे तर इतर देशांमधूनही शिष्टमंडळे येत असत. नंतरच्या सरकारांना गडकरींनी सुरू केलेल्या योजना पूर्ण करता करताच नाकी नऊ आले. युतीचे सरकार १९९९ ते २००४ सत्तेत असते तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आणखी पुढे गेले असते हे नक्की.

कापूस एकाधिकार योजनेचा उल्लेखही डॉ. खरे यांनी केला आहे. ही योजना बंद होऊन किमान १२-१३ वर्षे झाली असतील. महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम उसाच्या उत्पादनाने केले आहे हे वास्तव दुर्लक्षिले जाऊ नये.

मुंबईकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचेही डॉ. खरे यांनी म्हंटले आहे. एका मर्यादेपर्यंत हे योग्यच आहे. पण मुंबई साठी काहीच केले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. युती सरकारच्या काळात मुंबईतल्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्यात आला. त्यांच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना रडतखडत का होईना पुढच्या सरकारांनी पूर्ण केल्या. आघाडी सरकारने राज्यातल्या इतर भागांसाठी फारसे काही केले नसले तरी युती सरकारने सुरू केलेल्या योजना पूर्ण करणे तसेच मेट्रो व मोनो रेल्वेंची पायाभरणी करणे हे नक्कीच केले आहे. हे सर्व असले तरी मुंबईलाही जेवढे सरकारकडून जेवढे मिळायला हवे तेवढे मिळाले नाही हे वास्तवच आहे. पण १९९९ ते २००४ मध्ये सत्तेवर असणार्‍या कुचकामी व दिशाहीन सरकारमुळे संपूर्ण राज्याचेच नुकसान झाले आहे हेच वास्तवाचे मोठे चित्र आहे.

आपल्या देशात मुंबई व इतर मोठी शहरे कोट्यावधी लोकांना काम देतात सामावून घेतात या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात. पण यामागचे कटू वास्तव हेच की वेळोवेळच्या केंद्र व राज्य सरकारांनी संधीचे व पायाभूत सुविधांचे विकेंद्रीकरण केले नाही. मुंबईचे शांघाय करण्यापेक्षा इतर रोजगार केंद्रे निर्माण करून मुंबईवरचा ताण कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते. नुकतेच चेन्नई मध्ये पुराचे संकट आले. गेले दशकभर तिथे मा.ता. उद्योगाची अतिरेकी वाढ झाली. तिच वाढ काही प्रमाणात तिथल्या राज्यसरकारने तामिळनाडूतल्या इतर शहरांकडे वळविली असती तर चेन्नईची जी अवस्था झाली ती झाली नसती.

यावरून एक वेगळा मुद्दा लक्षात आला. तिथले निवृत्त सनदी अधिकारी एम जी देवसहायम यांनी तिथल्या राज्य सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढताना मुंबईत २६ जुलै २००५च्या पुरानंतरच्या सुधारणांचे कौतुक केले आहे. आपल्या लोकांना मात्र या कामांची दखलही घ्यावीशी वाटत नाही.

वर डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या लेखाचा मजकूर असलेल्या माझ्या प्रतिसादावर डॉ. खरे यांनी विदा मागितला आहे. विदर्भाचा अनुशेष अन त्या मागची कारणे जी वेगळ्या विदर्भाच्या समर्थकांकडून दिली जातात ही खोटी असती तर केंद्र सरकारकडून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती अन राज्यपालांना विदर्भाचा अनुशेष कमी करण्याच्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळाला सूचना देण्याचा विशेषाधिकार दिला गेलाच नसता. विविध काळातल्या राज्य व केंद्र सरकारांनी विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल उलट दावा केलेला नाही. अन डॉ. खरे यांनी म्हंटल्याप्रमाणे तो केवळ कृषीपंपाचा तर नक्कीच नाही. डॉ. चौधरी यांनी जे लिहिले आहे ते वास्तव आहे त्यात भावनिक असे मला तरी काहीच जाणवले नाही.

याखेरीज विदर्भातले शेतकरी मूळ व्यवसायाला जोडून फारसे काही करत नाहीत असेही डॉ. खरे यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी ज्यांचे शेतीच्या व्यवसायावर जगणेही अवघड आहेत ते जगण्याकरिता शेतीशिवाय काहीच करत नसतील. असे शक्य तरी आहे का? शेतीची कामे नसताना किंवा कमी असताना मोल मजुरीसकट मिळेल ते काम करताना मी अनेक शेतकर्‍यांना पाहिले आहे. आत्महत्या करणार्‍यांच्या तुलनेत पडेल ते काम करून जीवनगाडे हाकणाऱ्या शेतकर्‍यांची संख्या हजारो पटीत असेल.

वेगळा विदर्भ झाला तर भारतात एक प्रागतिक राज्य केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही असेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. अन असे झाले तर ते विदर्भाच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचेच असेल.

वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्‍या सर्वसामान्य लोकांनी उर्वरित महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य लोकांना दोष दिला आहे असे मला कधीही दिसले नाही. जो काही दोष दिला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सत्ताधार्‍यांना व त्यांच्याबरोबर लॉबिंगमध्ये सामील असणार्‍या नोकरशहांना. या विषयावर पूर्वीही मिपावर चर्चा झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांमध्ये आकस निर्माण होईल असे दावे यापूर्वी कुणी केल्याचे आठवत नाही.

मी या प्रतिसादात केवळ न पटलेल्या विचारांचा व दाव्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. यात वैयक्तिकपणे डॉ. खरे यांना दुखवायचे नाही. नकळतपणे तसे घडत असल्यास मी आधीच माफी मागतो.

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधल्या लोकांची भारतातून फुटून वेगळा देश बनवण्याची मागणी व वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी यांना डॉ. खरे यांनी एकसारखेच समजले आहे. हेच परिमाण लावले तर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनही चुकीचेच होते असे म्हणावे लागेल.
जोशी साहेब
माझा वरील प्रतिसाद थत्ते साहेबांच्या "ज्याला जे पाहिजे ते विचार न करता देऊन टाका" या म्हणण्याला उपहासात्मक प्रतिसाद म्हणून होता. त्याचा आपण असा अर्थ काढलात या बद्द्दल मला सखेद आश्चर्य वाटते आहे. एकीकडे आपण म्हणता विदर्भातील नेते सक्षम होते तर मग माशी कुठे शिंकली?
"बहुतेकांनी उद्योगांची सुरुवात करताना उमेदीच्या काळात मुंबईला खेटे मारण्यात किती काळ व श्रम वाया गेले याबाबत सांगितले होते." कोणतही उद्योग सुरु करायचा असेल तर महाराष्ट्रातच काय भारतात हीच परिस्थिती सार्वत्रिक आहे. तेंव्हा आम्ही खेटे घातले हे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. मला दवाखाना सुरु करण्यासाठी मिळणाऱ्या अनुज्ञप्ती साठी सक्षम अधिकारी मिटींगला उशिरा पोहोचला म्हणून मला दवाखाना सुरु करायला दीड महिना उशीर झलक आणी नोकरी सोडली असल्याने मी घरी हरी हरी करीत बसलो उपकरणाचे कर्ज डोक्यावर घेऊन हि स्थिती मुंबईत असून आहे. लोकांना वाटते आम्ही मुंबई बाहेरचे म्हणून आमची कामे होत नाहीत.
नुसतेच सुरु नव्हे तर बंद करायचे असतील तरीही सरकारी परवानग्या मिळवण्यासाठी नाकी नउ येतात आणी वेगवेगळ्या ठिकाणी इतके पैसे खायला घालायला लागतात कि लोक उद्योग बंद करण्याऐवजी ते आजारी ठेवणे पसंत करतात.
अनुशेषाचा विदा तपासला तर शेतीपम्पाचा सोडून दुसरा कुठला सापडत नाही म्हणून मी तो मागत होतो. केवळ स्वस्तात मिळणाऱ्या विजेवर चालवण्याच्या पंपांचा अनुशेष भरून काढण्यात काय हशील आहे हे कळत नाही. मुळात जमिनीत किंवा सिंचनाचे पाणी आहे का हा विचार ःओएण आवश्यक आहे.
बाकी भावनिक मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यात अर्थ नाही

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Dec 2015 - 6:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

साठी सक्षम अधिकारी मिटींगला उशिरा पोहोचला म्हणून मला दवाखाना सुरु करायला दीड महिना उशीर झलक आणी नोकरी सोडली असल्याने मी घरी हरी हरी करीत बसलो उपकरणाचे कर्ज डोक्यावर घेऊन हि स्थिती मुंबईत असून आहे

ते बरोबर आहे डॉक साब,

पण समजा तुमची फ़ाइल मंत्रालयात आहे, अन तुम्हाला तिचे स्टेटस पहायचे आहे तर तुम्हाला २४ तास प्रवास करून जायला लागत नसेल/नसावे न? म्हणजे बुआ सकाळी उठले लोकल पकडली मंत्रालयात गेले बाबु न हलकटपणा करून फ़ाइल नाही सांगितले मग तुम्ही संध्याकाळी परत आलात , ह्यात तुमच्या मानसिक त्रास अन थकव्याला कमी लेखण्याची गुस्ताखी मी करणार नाही अजिबात, तरीही एकंदरित प्रवास अन नकारघंटा ऐकायला आपल्याला काही तास पुरेसे न? चंद्रपुरहुन माणुस यायचा म्हणजे एकतर नागपुर ला या मग रेलवे रिजर्वेशन/फ्लाइट बुक करा (एकात वेळ बर्बाद एकात पैसा) आल्यावर मुंबई मधे राहण्या जेवण्याचा खर्च, नंतर २ दिवसांनी नकारघंटा ऐकून पुढली तारीख घेऊन स्वगृही परतणे, विषय "शिंगरु मेलं ओझ्यानं" असा होतो त्याच्यात, म्हणजे आधीच तुम्ही सांगितलेली यथार्थ सरकारी अनास्था अन वरतुन भौगोलिक अंतर असा तो विषय होतो, असे नमूद करू इच्छितो.

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी

थत्ते साहेबांनी विचार न करता देऊन टाका असं अजिबात म्हंटलं नाहीये. भारतात गेल्या अनेक वर्षांत नव्या राज्यांची निर्मिती झाली आहे. एकदा तरी ती विचार न करता झाली असणार का? जे (विचार न करता नवे राज्य निर्माण करणे) होऊच शकत नसते तसा प्रस्ताव थत्ते साहेब कशाला मांडतील. त्याखेरीज थत्तेसाहेबांनी जो विचार मांडला तो असा झटक्यात उडवून लावण्यासारखा निश्चितच नाही.

एवढे करूनही उपहास करावासा वाटला तर जरूर करावा. पण त्यासाठी काश्मीरच्या फुटीरतावादाशी तुलना. माझ्या मनात हा विचार नकळतही आला असता तर मला स्वतःची लाज वाटली असती.

विदर्भातील नेते सक्षम असताना माशी कुठे शिंकली यावर मी पूर्वीच विवेचन केले होते जे या धाग्यावरही पुन्हा डकवले आहेच.

नवउद्योजकांची मी जी उदाहरणे दिली ती मी सौम्यपणे मांडली असली तरी ती प्रत्यक्षात अत्यंत तीव्रतेची होती. एवढ्या वर्षांनंतर त्यातले तपशील नेमकेपणाने आठवत नसल्याने मी थोडक्यात लिहिले. शेवटी आशय अधिक महत्वाचा.

विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाचे अनेक घटक आहेत. सिंचन त्यात सर्वात महत्वाचे आहे कारण शेतीव्यवसाय. विदर्भातले अनेक धरण व कालवे प्रकल्प काही दशकांपासून प्रलंबित आहेत. युती सरकारच्या काळात प्रथम यावर काम झाले नंतर कृष्णा खोर्‍यातले पाणी २००० सालपर्यंत अडवणे आवश्यक होते म्हणून विदर्भाच्या प्रकल्पांचे निधी तिकडे वळवले गेले. नंतर आघाडी सरकारच्या काळाबाबत तर बोलण्यासारखेच काही नाही. त्याखेरीज संधीचा अनुशेष आर्थिक निकषांत मोजता येत नसतो. संधीचे समान नसले तरी न्याय्य वाटप होणे ही अपेक्षा ठेवणे काही गैर नाही.

वर्षानुवर्षे वार्षिक अर्थसंकल्पात विदर्भाच्या योजनांसाठी राखून ठेवलेला निधी प्रत्यक्षात दुसर्‍याच कामांसाठी वापरला गेला. काही वर्षांपूर्वी अनुशेषाची रक्कम (माझ्या आठवणीप्रमाणे) ४० हजार कोटी रुपयांवर गेली होती. आता तर त्यापेक्षा बरीच अधिक असेल.

बाकी या संपूर्ण चर्चेत माझ्यातर्फे मी भावनिक मुद्दे अजिबात मांडलेले नाहीत हे नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो. तुम्ही देखील मुंबईवर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिले आहे ज्यास मी देखील अनुमोदन दिले आहे. त्याच धर्तीवर मी विदर्भावर होत राहिलेल्या अन्यायाबाबत लिहिले आहे जे वास्तवाला धरून आहे.

एक रचना जी दशकानुदशके उपयुक्त ठरू शकलेली नाही त्याबाबत सोदाहरण लिहिणे हे भावनिक कसे काय असू शकते. भावनिक गोष्टींची उदाहरणे द्यायची झाली तर कसली तरी अस्मिता किंवा इतिहासामधल्या प्रकरणांवरचे वादविवाद या गोष्टी होत.

महाराष्ट्राच्या विविध राज्य सरकारांनी जर विदर्भाच्या क्षमतेचा योग्य वापर केला असता तर विदर्भाची प्रगती होऊन त्याचा लाभ संपूर्ण राज्याला झाला असता. राज्याच्या डोक्यावरचे कर्ज इतके वाढले नसते. या रचनेत ते जमणे शक्य दिसत नाही. असे असताना विदर्भ वेगळा झाल्यास त्याची अन तुलनेत नवा महाराष्ट्र अधिक लहान झाल्यामुळे महाराष्ट्राची अधिक वेगाने व सर्वसमावेशक प्रगती होऊ शकते.

वेगळा विदर्भ झाल्यास तुम्ही प्रशासकीय खर्चाचा मुद्दा मांडला आहे. नागपूरमध्ये राज भवन, विधान भवन पासून सरकारला लागणारे इन्फ्रा स्ट्रक्चर पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यावर नवा खर्च करण्याची अजिबात गरज नाही हे देखील लक्षात आणून देऊ इच्छितो.

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 7:12 am | श्रीरंग_जोशी

वरच्या चर्चेमध्ये विदर्भातल्या लोकप्रतिनिधींबाबतही नकारात्मक मत व्यक्त केले गेले आहे. पण वेळोवेळी विधिमंडळातल्या मार्गांच अवलंब करून विदर्भातल्या लोकप्रतिनिधींनी त्यावर आवाज उठवला आहे. नितिन गडकरी, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यात आघाडीवर होते. आणखी एक अराजकीय नाव म्हणजे अमरावतीचे प्रा. बी.टी. देशमुख. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांची विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषाबाबतची भाषणे आजही नव्या आमदारांना अभ्यासाला दिली जातात. बहुतांश मुख्यमंत्री मात्र सरांची भाषणे अभ्यासपूर्ण असतात असे अभिप्राय व्यक्त करून मूळ प्रश्नाला बगल देत असत.

गेल्या १५ वर्षात विधीमंडळात अनेकदा विदर्भातले व पश्चिम महाराष्ट्रातले प्रतिनिधी असा सामना झाला होता. विदर्भाच्या प्रतिनिधींवर राज्याच्या हिताचा विचार न करता स्वतःच्या प्रदेशाचाच विचार करून संकुचिततेचे प्रदर्शन करतात असे आरोप होतात. हे म्हणजे

हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम,
वोह कतल भी करते हैं तो चर्चा नही होता...

असा प्रकार आहे.

एकंदरीत नेहमी उदारपणे राज्याच्या व्यापक हिताचा विचार करून स्वतःचेच घोडे न दामटणे ही वैदर्भिय लोकांची अन लोकप्रतिनिधींची कमजोरी समजली जाते.

मित्रहो's picture

14 Dec 2015 - 7:56 am | मित्रहो

वेगळे राज्य मग ते विदर्श असो की इतर कुठे याकडे नेहमीच भावनिक दृष्टीने बघितल्या जाते. असे केले की मग इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या जाते. बऱ्याच वर्षापूर्वी जेंव्हा वेगळ्या विदर्भाची मागणी आली तेंव्हा जांबुवंतराव धोटेंनी त्याला भावनिक किनार दिली होती.
या मुद्द्याकडे विदर्भ विरुद्ध मुंबई, किंवा विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठी माणसाचे तुकडे केले वगेरे असे बघू नये. विदर्भाने विज देणे बंद केले म्हणून मुंबईत अंधार होइल हा दावा जितका फोल आणि हास्यास्पद आहे तितकाच की फक्त मुंबईच्याच पैशावर विदर्भ चालतो हा दावा सुद्धा फोल आणि हास्यास्पद आहे. काही मुद्द्यांवर व्यवस्थित विचार व्हायला हवा.

भाषावर प्रांतरचना - योग्य कि अयोग्य. आज राज्याराज्यातील समस्येमधे कुठेतरी भाषावर प्रांतरचनाच कारणीभूत आहे असेच वाटते. एक भाषा बोलनाऱ्या लोकांना एकत्र आणने म्हणजे दोन वेगवेगळी भाषा बोलनाऱ्यांना वेगळे करने होय. सीमेच्या भागात दोन्ही भाषा बोलनारे असतात त्यामुळे सीमावाद निर्माण झाले. प्रांतीय अस्मितेचे राजकारण करनाऱ्या पक्षांचे पीक आले. भाषावार प्रांतरचना ही प्रशासकीय दृष्टीने हे सोयीचे नव्हती. मद्रास, मुंबई, भोपाळ या राजधान्या मध्यवर्ती भागात नसून राज्याच्या एका टोकाला आहेत. दुसरे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वाश्रमीचा मध्यप्रदेश. रायपूरवरुन भोपाळ किंवा छिंदवाड्याला जायला रस्ता किंवा रेल्वे ही नागपूरवरुनच जात होती. दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. तेंव्हा कारखानदाराला दोनवेळा कर भरावे लागत होते. ते चुकवायला जंगलातल्या गोटाड रस्त्यतून माल पाठवायचा प्रकार सर्रास व्हायचा.
छोटी राज्ये झारखंड हे जरी छोट्या राज्याचे फसलेले उदाहरण असले तरी छत्तीसगड, उत्तरांचल, गोवा इतकेच काय आधीचे पंजाब, हरयाणा हे छोटी राज्ये यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे.
जिचकारांची मते योग्य होती. आज त्याला दहा वर्षाच्या वर काळ लोटलाय. जी कारणे विदर्भाच्या विरोधात होती तीच छत्तीसगडच्या विरोधात सुद्धा होती. वेगळे राज्य झाल्यावर मग जोगीेच्या काळात असो की रमणसिंगाच्या काळात विकास आधीपेक्षा वेगात झाला. हे राज्य बऱ्याच मोठ्या राज्यांना विजपुरवठा करते आणि राज्यात विजतुटवडा नाही. जिचकारांनी बारा पंधरा वर्षापूर्वी मांडलेल्या मु्द्द्यावर आज परत अभ्यास करायला हवा कदाचित केंद्र आणि राज्ये यांच्यातील आयवाटणीचे प्रमाण बदलले असेल, करपद्धतीतही बरेच बदल झाले. विदर्भात सुद्धा बरेच बदल झाले.
प्रायॉरीटीज मोठ्या राज्यात काही गोष्टी सरकारपर्यंत पोहचत नाही कारण त्याची प्रायॉरीटी कमी असते. मुंबई, जळगाव, आणि सिरोंचा तीनही ठीकाणी विजेची समस्या असेल तर नक्कीच सिरोंचाचा क्रम शेवटी येतो. काही दिवसांपूर्वी विलास मनोहरांचे भामरागड छत्तीसगडला द्या हे वक्तव्य आले होते यामागे हीच भावना होती. छत्तीसगडात सरकार गावागावात पोहचू शकते तर इथे नाही.
विकासकामाला लागनारा पैसा फक्त स्थानिक स्वराज्य संस्था, खासदार निधी, आमदार निधी यातून ठोस विकासकामे होत नाही. त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारातून पैसा लागतो. मंत्रीच नाही तर मंत्रालयातल्या बाबूलोकांचाही तितकेच सहकार्य लागते. हे बऱ्याचदा शक्य होत नाही.
उद्याोगाला पोषक वातावरण विविध करसवलती देउन उद्योगधंदे बोलवऩे शक्य होते. मोठ्या राज्यात अशा सवलतींची मागणी सर्वत्र होऊ शकते किंवा तशी भिती सतत असते.

राजकीय अस्थिरता आणि त्या अनुषंगाने होनारी घोडेबाजी ही छोट्या राज्यांची फार मोठी समस्या आहे. वेगळे राज्य झाले म्हणजे विदर्भ बदलून जाइल, शेतकरी आत्महत्या थांबतील हा आशावाद सुद्धा अनाठायी वाटतो. काही समस्या ह्या छोट्या राज्याने सुटण्या सारख्या नाहीत. नवीन राज्याच्या उभारणीसाठी चांगले नेतृत्व लागते. उत्तम नेतृत्वाशिवाय काहीच साध्य होत नाही .

उदासीणतेचे एक उदाहरण म्हणजे अप्पर आणि लोअर वर्धा प्रकल्प आणि त्यातून येनारे कालवे. १९९२ साली कालवे खोदायला आमची जमीन ताब्यात घेतली. नंतर त्याचे पैसेही दिले. कालवा झाला, सारे झाले पण पाणी आले नाही. ते यायला फडणवीसांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसावे लागले, जवळ जवळ बावीस वर्षे लागले. मोेठे धरण बांधून, कालवे बांधून पाणी पुरविणे हे सरकारचेच काम आहे. दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी बदलून फारसे काही साधले नाही.
९८ साली कसलातरी फॉर्म भरताना मी माझे जन्मगाव चंद्रपूर असे लिहिले तर माझ्या बाजूला बसलेला मुंबईचा मुलगा मला म्हणाला. चंद्रपूरला फार गरीबी आहे, तिथे नक्षलवादी आहेत. ते आजही आठवले तर हसायला येते. दोष त्याचा नव्हता. मी चंद्रपूरात खाणीत वेल्डींग इलेक्ट्रोडचे मार्केटींग करायचो, आमचे बहुतेक डिस्ट्रिब्युटर मराठी होते. सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सारेच खाणींमधे भटकत होतो. चंद्रपूरची समस्या आहे तिथले तापमान आणि घाम पुसल्यावर काळा होनार रुमाल ही आहे. त्याच जिल्ह्यात मात्र कोरडवाहू शेती आहे. आज चंद्रपूरसाठी अधिक चांगले दिवस यायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्याचे मूळ गाव मूल चंद्रपूर जिल्ह्यात येते, अर्थमंत्री चंद्रपूरचे, केंद्रात अहीर मंत्री आहेत, हे कमी की काय भागवत सुद्धा चंद्रपूरचे.
असो भावनिक मुद्द्यांवर चर्चा करुन प्रतिसादांची संख्या वाढण्याखेरीज फारसे काही साधत नाही तेंव्हा त्यावर न बोललेलेच बरे. वरील मुद्द्याचा जिचकारांसारख्या कुण्या जाणकार व्यक्तीने अभ्यास करुन छोटी राज्ये योग्य की अयोग्य हे सांगायला हवे.

संदीप डांगे's picture

14 Dec 2015 - 9:12 am | संदीप डांगे

श्रीरंग व मित्रहो,

तुमच्या सर्व प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Dec 2015 - 10:54 am | कैलासवासी सोन्याबापु

श्रीरंग भाऊ, मित्रहो व डांगे साहेब, तुमच्या तिघांचे ही आभार

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 11:06 am | श्रीरंग_जोशी

सोन्याबापू, तुम्ही फारच मुद्देसुद व संदर्भपूर्ण लिहिलं आहे.