मिपाकरहो नमस्कार,
मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे.
मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे. तेंव्हा सर्वप्रथम तीन विषयांकरिता असलेल्या तीन स्वतंत्र मतदान धाग्यांचा आस्वाद घ्या; हसा, वाहवा द्या, आणि सरतेशेवटी मतं द्या.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत एक दिवस वाढवल्याने मतदान करण्याकरिता आता २५ तारखेपर्यंत वेळ आहे. मतदान करताना तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.
निकाल घेऊन ठरल्याप्रमाणे २८ तारखेला हजर होऊ.
पण तत्पूर्वी, विडंबनकार मिपाकरांचे कौतुक आणि आभार.
या धाग्यात 'फजिती' या विषयाला धरून आलेली विडंबन काव्य दिलेली आहेत. इतर विषयांसाठी स्वतंत्र धागे खालीलप्रमाणे
विषय: प्रेम
विषयः राजकारण
विडंबन क्र. १
मूळ काव्यः उषःकाल होता होता
सुरेश भट
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
विडंबनः
ओल्ड मंक येता येता
ओल्ड मंक येता येता, ड्राय डेट आली!
अरे पुन्हा ठेक्यांवर त्या फेकवा मशाली!
आम्ही बार खुलण्याचीही वाट का पहावी?
ऐपतीत नव्हते त्याची आस का धरावी?
कशी एक हातातूनी बाटली पळाली!
दोन घोट पिउनी करती ते नवी हुशारी;
ओल्ड मंक म्हणुनी देती डुप्लिकेट सारी!
आम्ही मात्र पाजत असतो आय.बी.च खाली!
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्कॉच सारे,
आम्हां घरी संत्रीचाही नसे थेंब का रे?
आम्ही ते उपाशी ज्यांना मोह ना मिळाली!
धुमसतात अजुनि नरडीतले हे निखारे!
अजून घोट मागत उठती यकृतात सारे!
बाटलीच थम्सपची ती अम्हाला मिळाली!
----------------------------------------------
विडंबन क्र. २
मूळ काव्यःयेशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील
वसंत बापट
येशिल येशिल येशिल राणी; पहाटे पहाटे येशिल ?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन दोशिल ?
ओलेती पहाट शहाऱ्याची लाट गळ्यात रेशमी बाहू
तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू
प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल ?
चंद्र मावळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा
कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा
भानात नसून गालात हसून ललाट चुंबन घेशिल ?
वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी
कोणाला दिसेना, असू दे असेना, मीलना एखादा साक्षी
धुक्याने ढगांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशिल ?
विडंबनः
येशील येशील येशील दोस्ता
येशील येशील येशील दोस्ता
पहाटे पहाटे येशील
माझिया पिण्याचे झालेले ते बिल
लगेच येऊन देशील!
होऊनी मी धीट, घेतली 'निट'
आणि हसे झाले भाऊ
तुझ्या खांद्यावर जरा टेकता
नको ना रागाने पाहू
(घरी)चल वजन पेलत-रस्त्याने झुलत
जरी तू विटून जाशील!
धुंद व्हिस्कीचा आणि स्कॉचचा
लाभला सुगंधी पेला
झाला तू कावरा, कारे बावरा?
धरलास वर तो अबोला?
उठण्यात-'बसण्यात', खाण्यात-'पिण्यात'
सदैव कंपनी देशील!
म्यानेजराचे तांडव, तूही जरा सांडव
तुझ्या खिशातल्या नोटे
तूच रे उदार, तुझाच आधार
तुझ्यात 'भरत' भेटे
सुरेच्या पुरात, नशील्या सुरात
तू माझा 'किशोर'(कुमार) होशील!
----------------------------------------------
विडंबन क्र. ३
मूळ काव्यःअजुनी रुसूनी आहे
आ रा देशपांडे
अजुनी रुसूनी आहे, खुलतां कळी खुले ना
मिटले तसेच ओठ कीं पाकळी हले ना !
समजूत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
मी हांस सांगताच रडतांहि तू हसावे
ते आज का नसावे ? समजावणी पटे ना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना !
की गूढ काही डाव ? वरचा न हा तरंग !
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसूनी आहे, खुलतां कळी खुले ना !
विडंबनः
हनुवटी रुतुनी आहे
हनुवटी रुतुनी आहे, दिसता खळी दिसेना
सुटले तसेच पोट की टायर हे, हले ना!
कसरत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
मज श्वास लागतोहे, खिदळून तू हसावे
तुज कीव का नसावी? समजावणी पटे ना
धरिली अशी ही कंबर की चाल चालवेना !
की गूढ काही डाव? भलताच हा प्रसंग!
व्यायाम खोल घाव, जणू असंगाशी संग!
फसलो असा कसा मी, ज्या आपले कळेना?
हनुवटी रुतुनी आहे, दिसता खळी दिसेना
----------------------------------------------
विडंबन क्र. ४
मूळ काव्यः कणा
कुसुमाग्रज
'ओळखलंत का सर मला ?' पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून.'
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा !
विडंबनः
चणा
'ओळखलंत का अॅडमिन मला ?’ दारात आला कोणी,
कपडे होते विस्कटलेले, डोळां साचले पाणी.
संकोचून बसला, ओशाळे हसला, बोलला खाली मान घालून,
'मिजासखोरी अंगाशी आली, गेली आयडी घेऊन.'
नागिणीसारखी काळी जिव्हा मिपाभर नाचली,
आयडी न घेता जाईल कशी, अब्रू कशीबशी वाचली.
फजिती उडाली, दणकून हेटाई झाली, आयडीनेही राम म्हटले,
आठवण म्हणून मिपाकरांनी दिलेले शालजोडीतले तेवढे राहिले.
हरलेले मन घेऊन संगे, सर आता सावरतो आहे,
खचलेली हिंमत सांधतो आहे, तुकडे हृदयाचे जोडतो आहे.
चपलेकडे नजर जाताच झटकन दचकून उठला,
'चपला नकोत सर', जरा शर्मिंधेपणा वाटला.
मोडून पडला माज सारा बसलो खात चणा,
आधाराचा हात देऊन फक्त परत ये म्हणा !
----------------------------------------------
विडंबन क्र. ५
मूळ काव्यः अच्छा सिला दिया तूने
अताउल्लाह खान
ना दिन को सुकून है शातिर ना रात को सुकून है
ये कैसा हम पे उम्र इश्क़ का जूनून है
जो रचाये हैं तूने हाथ मेहंदी से
वो मेहंदी नहीं है मेरे दिल का खून है
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
मेरे प्यार वाले सभी फूल मुरझाये
कांटे भी फ़िज़ाओं वाले मेरे हिस्से आ गए
मेरे प्यार वाले सभी फूल मुरझाये
कांटे भी फ़िज़ाओं वाले मेरे हिस्से आ गए
रास न आया मुझे सपना बहार का -२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
अश्कों की माला मेरे गले पहनाके
खुश है वो घर किसी और का बसाके
अश्कों की माला मेरे गले पहनाके
खुश है वो घर किसी और का बसाके
कर दिया खून देखो मेरे ऐतबार का -२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
नाज़ तेरे मरके भी हस्के उठाये हैं
अश्कों के मोती तेरी याद में बहाये हैं
नाज़ तेरे मरके भी हस्के उठाये हैं
अश्कों के मोती तेरी याद में बहाये हैं
सुन कभी शोर मेरे दिल की पुकार का -२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का-२
यार ने ही लूट लिया घर यार का -३
विडंबनः
चांगली खोली दिलीस देवा
ना दिवसा झोपुन देती माश्या, ना रात्रीला ढेकुण
मच्छरही करती कानाशी, रात्रभर गुणगुण,
जे दिसती चेहर्यावर माझ्या, फोड मोठाले,
पिंपल्स नाहीत् ते, ते आहे, डासांचे ऋण,
चांगली खोली दिलीस देवा मला रहायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला, ||ढृ||
रुम पार्टनर माझ्या कानात, रात्र भर घोरतो
इस्त्री करुन ठेवलेले, माझे कपडे घालतो
कपडे घासुन घासुन, लागतो हात दुखायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,
कामावर रोज जातो, दोन बस बदलुन
साहेबाच्या शिव्या खातो, खाली मान घालुन
ऑफिसातल्या पोरी लागतात पाहुन हसायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,
रोज रात्री मेसचे मी, दिव्य जेवण गिळतो
कोरडी चपाती भात, लोणच्यासवे खातो
पैसे शिल्लक रहात नाहीत, रीचार्ज मारायला,-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,
----------------------------------------------
विडंबन क्र. ६
मूळ काव्यः चांदण्यात फिरताना
सुरेश भट
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥
निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥
सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥
विडंबनः
सोच नाही तेथे…
चांदण्यात पळताना माझी धरलीस लाथ!
श्वाना रे, आवर हे सावर हे तुझे दात!
निजलेल्या गावातुन
आलो मी एकटाच
दुष्ट पोट कळलावे
पडले मुरडे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !
सांग कसा लोट्याविन
साफ करू अंत:पूर?
तुज वारा छळवादी
अन् हे मच्छर फितूर!
ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
----------------------------------------------
----------------------------------------------
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 9:46 pm | तर्राट जोकर
सगळे आवडलेत. ओल्ड मंक नंबर एक.
19 Mar 2016 - 10:34 pm | एस
इथेही
विडंबन क्र. १!
20 Mar 2016 - 6:12 am | वेल्लाभट
मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.
20 Mar 2016 - 8:24 am | एस
२. विडंबन क्र. ३
३. विडंबन क्र. ४
20 Mar 2016 - 12:38 am | निशांत_खाडे
क्र. १
20 Mar 2016 - 12:42 am | प्रदीप साळुंखे
क्र. 4
20 Mar 2016 - 5:44 am | कंजूस
---
20 Mar 2016 - 9:44 am | जव्हेरगंज
१. विडंबन क्र. ५
चांगली खोली दिलीस देवा
बस एवढेच आवडले. तुफान जमले आहे. अगदी तालासुरात गाऊन बघितले.
यक नंबर.
20 Mar 2016 - 9:59 am | अत्रुप्त आत्मा
निश्चितच :- ६ (पुन्हा वाचून पहा! )
@
>>
20 Mar 2016 - 11:15 am | विश्वजित रामदास जाधव
१. विडंबन क्र. -२ (येशील येशील)
२. विडंबन क्र. -४ (ओळखलत का अॅडमिन मला)
३. विडंबन क्र. - ५ (चांगली खोली दिलीस देवा)
20 Mar 2016 - 12:17 pm | सर्वसाक्षी
क्र. १ - हनुवटी रुतून आहे
क्र २ - चांदण्यात पळताना
क्र. ३- ओळखलंत का
20 Mar 2016 - 3:21 pm | भाते
१) विडंबन क्र. १
२) विडंबन क्र. ४
३) विडंबन क्र. ६
21 Mar 2016 - 12:36 am | सूड
वि क्र १
21 Mar 2016 - 11:05 am | भरत्_पलुसकर
क्र 1 - येशील येशील दोस्ता
क्र 2 - ओल्ड मंक येता येता
क्र 3 - चना
21 Mar 2016 - 11:23 am | नाखु
५.५ (चांगली खोली दिलीस देवा)
३.हनुवटी रुतुनी आहे
२.येशील येशील येशील दोस्ता
21 Mar 2016 - 8:17 pm | शलभ
१-विडंबन क्र. ४
२-विडंबन क्र. १
३-विडंबन क्र. २
22 Mar 2016 - 12:23 am | रातराणी
१- चांगली खोली दिलीस देवा
२- सोचनाही तिथे :)
३- येशील येशील दोस्ता
22 Mar 2016 - 11:11 am | मित्रहो
१. चांदण्यात पळताना
२. हनुवटी रुतुनी आहे
३. ओल्ड मंक येता येता
22 Mar 2016 - 4:22 pm | सनईचौघडा
विडंबन क्रमांक ६
24 Mar 2016 - 12:00 am | पैसा
१
३
६
24 Mar 2016 - 10:23 am | sagarpdy
१. ५
२. १
३. ६
24 Mar 2016 - 4:26 pm | shvinayakruti
विडंबन क्र. ५
24 Mar 2016 - 8:47 pm | स्रुजा
माझे मतः
१
३
४
याच क्रमाने.
25 Mar 2016 - 11:11 am | वेल्लाभट
मतदानाचा आजचा शेवटचा दिवस !
26 Mar 2016 - 1:19 am | मधुरा देशपांडे
विडंबन क्रमांक 5,3, 1
26 Mar 2016 - 1:41 am | यशोधरा
१ - चणा
२ - हनुवटी रुतुनी आहे
26 Mar 2016 - 11:19 am | सविता००१
१-५
२-३
३-१