प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 1:00 pm

फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता.
हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात.
न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो. अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली.
बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे.
जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे.
आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही.
थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का रशीद. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.

समाजराजकारणविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

15 Mar 2016 - 1:14 pm | सुमीत भातखंडे

लेखातल्या भावनांशी सहमत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Mar 2016 - 1:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर लिहिले आहेस रे रणजीत. मल्ल्यांचा विजय ७००० कोटी बडवून विलायतेस गेला तेव्हाही समाजात अशी चीड दिसायला पाहिजे होती असे आमचे मत.मनमोहन असताना हे घडले असते तर एव्हाना ४ शतकी धागे येथे निघाले असते असे ह्यांचे मत.

प्रदीप साळुंखे's picture

15 Mar 2016 - 1:24 pm | प्रदीप साळुंखे

चालायचच,
असं ना तसं प्रत्येकजण आपआपली तळी उचलतच असतो,
शेवटी "अपना अपना स्टाईल होता है"

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 1:25 pm | भाऊंचे भाऊ

जिंकलं तुम्ही माई

माई, कशा आहात? तुमचे हे काही म्हणत नाहीत का हल्ली?

नाखु's picture

15 Mar 2016 - 2:46 pm | नाखु

नक्की आकडा सांगा

कारण आम्ही सकाळी वाचले ते वेगळे होते.

विजय मल्ल्यांना भारतात आणा-कॉंग्रेस
- - पीटीआय
मंगळवार, 15 मार्च 2016 - 01:45 AM IST

Tags: vijay mallya, india, congress, new delhi

कॉंग्रेस सदस्यांची राज्यसभेत मागणी; ललित मोदींवर निशाणा
नवी दिल्ली - उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा मुद्दा कॉंग्रेसने सोमवारी राज्यसभेत उपस्थित केला. परदेशात पलायन केलेल्या मल्ल्या व "इंडियन प्रीमिअर लीग‘चे माजी प्रमुख ललित मोदी यांना भारतात परत आणावे, अशी मागणी केली.

प्रश्‍नोत्तराच्या तासात कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत येऊन घोषणा दिल्या. "विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ‘, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. प्रमोद तिवारी यांनी मल्ल्यांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कर्जबुडवे उद्योगपती हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. मल्ल्या यांच्याविषयी तिवारी यांनी केलेले वक्‍तव्य अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी स्वीकारलेले नाही, अशी माहिती उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दिली.
=====================

वाचताना चष्मा लावला नव्हता बहुतेक तुम्ही, बाकी तुम्च्या यांच्या पाठीची उसण बरी आहे ना, काळजी वाटते हो (श्रीगुरुजींना)

चेक आणि मेट's picture

15 Mar 2016 - 3:11 pm | चेक आणि मेट

विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ‘,
गडबड झाली वाटतं:'(

ते ललीत मोदी साठी होतं. फक्त मोदी म्हटलं की दुहेरी हेतू साध्य होतो.

म्हणजे बँकांनी काय चूक केली आणि या सगळ्या चुका केव्हा झाल्या ते समजेल.
http://googleweblight.com/?lite_url=http://indianexpress.com/article/ind...

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 4:47 pm | मुक्त विहारि

लिंक्स बद्दल धन्यवाद....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Mar 2016 - 6:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

थोडासा वाचला रे लेख बोक्या. मल्ल्यानी "मी परदेशात जाणार आहे' हे घोषित केले होते ना? मग वेळीच कृति केली असती तर ? "कायदा बघावा लागतो' हे अरूण जेटलींचे स्पष्टीकरण अगदी साजेसे.
मल्ल्या ह्यानी सर्व प़क्षांना भरघोस देणग्या दिल्या आहेत ही वस्तुस्थिती.

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 7:14 pm | बोका-ए-आझम

१. पैसे वसूल करणे
२. मल्ल्याला शिक्षा करणे.

पैसे वसूल करण्यासाठी civil दावा आणि शिक्षेसाठी criminal case. आपल्याकडे हीच चूक, अगदी हर्षद मेहताच्या काळापासून राज्यकर्ते करताहेत. पैसे वसूल करण्याला नेहमी दुय्यम महत्व असतं. अमक्यातमक्या fraudster ला कसा हातकड्या घालून तुरूंगात नेला - ज्याला अमेरिकेत Perp walk असा चपखल शब्द आहे - हे लोकांना दाखवणं कधीही जास्त glamorous असतं. इथेही तेच झालेलं आहे. २ मार्चला मल्ल्या देश सोडून गेला. त्यावेळी त्याच्यावर गुन्हेगारी आरोप नव्हते. त्यामुळे त्याला विमानतळावर अटक होऊ शकली नाही. बँकांनी बहुतेक त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार दाखल केली. तोपर्यंत मल्ल्या निघून गेला होता.

पैसा's picture

15 Mar 2016 - 9:00 pm | पैसा

अहो आज्जीबै, कर्नलसाहेब तुमचे नातू का? त्यांनाही अरे रणजित म्हणताय म्हणून विचारते. त्यांचं वय मला माहीत आहे. त्या हिशेबाने तुम्ही शंभरी पार केलेली असणार एव्हाना. बाकी याआधी बोस, मोदी, फडणवीस आणि गांधीजीनाही तुम्ही एकेरीत बोललेले आठवते आहे. मनमोहन सिंगानाही तुम्ही याच वाक्यात एकेरीत संबोधले आहे त्यामुळे आश्चर्य वाटले नाही. फक्त लिहिताना जरा तारतम्य वापरत चला एवढी विनंती.

बाकी

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही.

हा मास्टरपीस.. मी देखील बरेच दिवस याच विषयावर विचार करत आहे. ३१ वर्षांचा कन्हैया अजून महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, आणि त्याची आई म्हणे मोलमजुरी करून त्याला पोसते. असो. त्याची शिकण्याची हौस अजून फिटली नसावी.
(मी हे वाक्य वापरून टीकाकारांना आयते कोलीत मिळवून देत आहे याची मला कल्पना आहे) परंतु त्याच्या वयाचा विचार करता त्याला विचारवंत, अगदी गेला बाजार अभ्यासक वगैरे म्हणावयास कहीच हरकत नसावी.

त्याची कॉलेज गोईंग स्टुडंट ची जी प्रतिमा डोळ्यासमोर जाणून बुजून उभी केलेली आहे ती पुसून अ‍ॅक्टिव्हिस्ट अशी प्रतिमा उभी केल्यास बर्‍याच गोष्टींशी रिलेट करणे सोपे जाईल.

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 4:19 pm | बोका-ए-आझम

ब-याच दिवसांनी आलात आणि आल्यावरच सिक्सर मारलीत!

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 4:26 pm | मुक्त विहारि

एकदम बूल्स आय.

तिमा's picture

15 Mar 2016 - 4:47 pm | तिमा

ताज्या लोकप्रभामधे, एका विद्यार्थ्याने जे.एन.यु. प्रकरणाचा 'आँखो देखा हाल' लिहिला आहे. तो जरुर वाचावा.

http://epaper.lokprabha.com/744982/Lokprabha/18-03-2016#page/16/1

भंकस बाबा's picture

15 Mar 2016 - 4:55 pm | भंकस बाबा

असे काही मधुशालेत गेलेले विद्वान बोलल्याचे आठवते.
असो बाकी मांडणी व्यवस्थित केलि आहे पण श्रीगुरुजीनि इतके स्पष्टीकरण या संदर्भात दिले आहे की या धाग्याच्या विरोधात कोणी उभे राहिलसे वाटत नाही.
उत्तम लेख रणजीत साहेब

कर्नल साहेब छान आणि योग्य लिहिलयत तुम्हि.

पैसा's picture

15 Mar 2016 - 6:00 pm | पैसा

चितळेसाहेब, बरेच दिवसांनी लिहिलेत. लेखाशी सहमत आहे. मुळात विद्यार्थ्यानी राजकारण का करावे हेच समजत नाही. शिक्षण संपवून काय हवे ते करावे. सगळे आयुष्य अजून बाकी असते.

या लेखामुळे ३१ व्या वर्षी मी दोन मुलांची आई आणि संसाराचा गाडा ओढणारी हमाल होते, तसेच सरकारला माझ्या वाट्याचा इन्कम टॅक्स पण प्रामाणिकपणे भरत होते हे लख्ख आठवले.

मुळात विद्यार्थ्यानी राजकारण का करावे हेच समजत नाही. शिक्षण संपवून काय हवे ते करावे

शिक्षण हे फक्त शिक्क्यासाठी वापरणारे असतातच की, ज्यांचं करीअर आधीच ठरलेलं असतं..

त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारण करायलाही काही हरकत नाही पण प्रत्येक राजकीय पक्षाची वेगळी विद्यार्थी विंग का? राजकारण करायचचं तर तशाही पायर्‍या असतातच की आधी गाव/ शहर/ जिल्हा मग राज्य वगैरे.. मग विद्यार्थी विंग का आणि सर्वच पक्षाचे विद्यार्थी नेते विद्यार्थी म्हणायच्या पलिकडच्या वयाचेच असतात.. हे कोडं आहे बाकी..

मार्मिक गोडसे's picture

15 Mar 2016 - 6:27 pm | मार्मिक गोडसे

तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.

आजच्या Business Standard मधील हा लेख वाचा. कन्हैयासारखे आणखी कोणकोण करदात्यांचे पैसे खाऊन देशाविरुद्ध वागतायेत ते कळेल.

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 7:41 pm | बोका-ए-आझम

आय.आय.टी.मधून शिकून बाहेर पडलेला एखादा इंजिनियर जेव्हा आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर देशासाठी करण्याऐवजी वाॅल स्ट्रीटवर ट्रेडिंग करण्यासाठी करतो किंवा स्वस्त डिझेल वापरून कुणीतरी आपली एस.यू.व्ही.ची टाकी भरतो तेव्हा त्यांना कुणी करदाता का प्रश्न विचारत नाही असं यात विचारलेलं आहे. चांगले मुद्दे आहेत. पण याचा प्रतिवाद हा आहे की -
१.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे.
२. आय.आय.टी.मधून बाहेर पडलेल्या अनेक जणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कामगि-या केलेल्या आहेत. नारायणमूर्तींसारख्यांंनी कंपन्या उभ्या करुन अनेकांना रोजगार दिलाय. जे.एन.यू. मधून बाहेर पडलेल्यांनी असं काय काम केलंय?
३. आय.आय.टी. मधले किती जण परदेशात आहेत आणि तिथले नागरिक आहेत? परदेशात काम करणारा माणूस स्वदेशात पैसे पाठवत असेल (remittances) हा विचार या लेखाच्या लेखकाने केलेला दिसत नाही.
४. एस.यू.व्ही. आणि स्वस्त डिझेलचा मुद्दा ठीक अाहे.

तरीही 2 पैसे आमचेही
१.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे.

बऱ्याच अंशी मान्य, पण मुळात व्हॉटअबाउटरी सूरु कोणी केली ? हा प्रश्न एकंदरित आधी कोंबड़ी का अंडे धाटणीचा आहे! ह्यात एकमत होणे शक्य नाही असे वाटते
२ आय.आय.टी.मधून बाहेर पडलेल्या अनेक जणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कामगि-या केलेल्या आहेत. नारायणमूर्तींसारख्यांंनी कंपन्या उभ्या करुन अनेकांना रोजगार दिलाय. जे.एन.यू. मधून बाहेर पडलेल्यांनी असं काय काम केलंय?

Are we judging a gold fish by its capability to climb a tree in here??

३. आय.आय.टी. मधले किती जण परदेशात आहेत आणि तिथले नागरिक आहेत? परदेशात काम करणारा माणूस स्वदेशात पैसे पाठवत असेल (remittances) हा विचार या लेखाच्या लेखकाने केलेला दिसत नाही.

भारतीय डायस्पोरा मिळून भारतीय जीडीपीच्या चार टक्के (4%) रेमिटेंस देतो, एकतर चार टक्के काही फार मोठा आकड़ा नाही, दूसरे म्हणजे चार टक्के टोटल डायस्पोरा रेमिटेंस आहे त्यातले आयआयटीयन्स किती? डॉक्टर्स किती?? बिज़नसमन किती हा आकड़ा वेधक असेल, बहुसंख्य रेमिटेंस हे परदेशस्थ बिज़नसमन अन स्मॉल एंटरप्राइज ओनर्स कडून येतो का? हे बघणे रोचक असेल, चार टक्यात इतके वाटेकरी आहेत मग आयआयटीयन्सची मातब्बरी ती अशी काय असणार? 0.25 ते 2.00% किंवा टोटल रेमिटेंसच्या 50% पकडली तरी ती काय मोठी लागून जाईल?

४.एस.यू.व्ही. आणि स्वस्त डिझेलचा मुद्दा ठीक अाहे.

ह्यावर मी लेख अन आपल्या प्रतिसाद दोहोंशी सहमत आहे

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 9:10 pm | बोका-ए-आझम

१.एकमत होणं शक्य नाही यावर एकमत.
२.हा मुद्दा मांडण्याचं कारण त्या Business Standard मधल्या लेखात IIT आणि JNU अशी करदात्यांच्या दृष्टिकोनातून तुलना केलेली आहे, आणि लेखकाचा मुद्दा काहीसा असा आहे - जर तुम्ही JNU मधल्या देशाविरोधी निदर्शनं करणारे विद्यार्थी जर माझ्या करांच्या पैशांवर शिकतात असं म्हणतात तर मग IIT चं काय? आणि मग त्यातून पुढे - देशाचा पैसा खर्च करून कसा तो IIT मधला विद्यार्थी अमेरिकेत पैसा कमावतोय आणि कसं करदाते त्याला विचारत नाहीत पण JNU वाल्याला विचारताहेत वगैरे वगैरे. त्यामुळे हा प्रश्न स्वाभाविक आहे की जसं IIT मधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आपण दाखवू शकतो की त्यांनी देशासाठी काहीतरी भरीव केलेलं आहे. नारायणमूर्तींचं उदाहरण त्याच अनुषंगाने आहे. तसं JNU मधलं कुणी आहे का?
३. इथे मुद्दा वेगळा आहे. IIT मधले लोक परदेशी जाऊन काम करतात आणि त्यांना करदात्यांचा पैसा वाया घालवता असं कोणी म्हणत नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. So, प्रश्न असा आहे की भारतातील १३ (चूभूद्याघ्या) IITs मधून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यातले परदेशी किती जातात आणि भारतातच किती राहतात? Remittance चा मुद्दा काढायचा हेतूही तोच आहे. जर एखादा माणूस परदेशात जाऊन खूप कमावतोय ही एकच बाजू आपण बघत असू तर तो अन्याय आहे. जर तो माणूस हा पैसा जमवून remittance म्हणून स्वदेशात पाठवत असेल तर? लेखकाने फक्त त्याचं कमावणं बघितलंय. तो हे पैसे घरी पाठवत असेल आणि ते पैसे भारतीय अर्थव्यवस्थेत काही खारीचा वाटा उचलत असतील ही शक्यता विचारात घेतलेली नाही - हे मला म्हणायचंय.
४. आपलं एकमत असल्यामुळे आणि लेखकाशीही सहमत असल्यामुळे लिहित नाही.

४% हा छोटा आकडा नाही. भारत जीडीपी च्या २.४३ % रक्कम संरक्षणासाठी खर्च करतो.
हा अर्थशास्त्रीय भाग सोडला तर परदेशस्थ भारतीय अन्य मार्गेही भारताला मदत करतात. उदा. भारतातील स्टार्टअप्सना कामे मिळवायला मदत व मार्गदर्शन करणे, त्या देशात राजकीय प्रभाव टाकणे (उदा. अमेरिकेचा पाक ला F -१६ विमाने देण्याचा निर्णय - अयशस्वी पण राजकीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नक्की होता)

हे खरे त्यांना कि भारतात राहून देशोपयोगी कामे करता येतील पण त्याचा अर्थ ते करत आहेत ते "देशाविरुद्ध" काम करत आहेत असा होत नाही. याखेरीज "देशाविरुद्ध" वागणे आणि "देशासाठी काम न करता फक्त थोडे पैसे पाठवणे" या दोन गोष्टीत फरक आहे.

नाना स्कॉच's picture

16 Mar 2016 - 10:24 am | नाना स्कॉच

पटण्यासारखे आहे! :)

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 6:53 pm | hmangeshrao

मी भारतात नोकरी करुन पैसे आणले तर ते माझ्या वैयक्तिक खात्यावर जातात.

परदेशात नोकरी केली तरीही ते पैसे वैअयक्तिक खात्यातच जातात.

परकीय चलन आणतो वगैरे तर थापाच ! त्या परकीय चलनाच्यआ आपल्याच खात्यात अखेर गांधीछाप नोटा होउन अखेर आपल्यालाच त्या मिळतात.

असले लोक हे बैलगाडीखालुन चालणाअर्‍या कुत्र्यासारखे असतात. गाडीच्या सावलीत कुत्रे चालते. पण ताला गंड असतो की गाडी माझ्याजिवावर चालते.

देशातुन मिळालेल्याआ डिग्रीच्या सावलीत हे जन्मभर रहातात.

व स्वतःच्याच खात्यावर पैसा भरुन देशाcaच परकेय चलन मिळवुन दिले म्हणुन किंकाळत फिरतात.

होबासराव's picture

21 Mar 2016 - 7:01 pm | होबासराव

बैलगाडीखालुन चालणाअर्‍या कुत्र्यासारखे असतात. गाडीच्या सावलीत कुत्रे चालते.
च प ख ल

णिसो सरांचि एक भयकथा आठवलि ;) "आणि त्या कुत्र्याचे डोळे हिरवे झाले"

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 7:20 pm | hmangeshrao

आयडीचे सार्थक झाले.

होबासराव's picture

21 Mar 2016 - 7:33 pm | होबासराव

तुमचं आमचं चक्क जमलं.
hmangeshrao - Mon, 21/03/2016 - 19:20
नवीन
आयडीचे सार्थक झाले.

तुमचं आमचं चक्क जमलं.

मंगेसराव समझ्या नय मेरे कु.

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 8:11 pm | hmangeshrao

आज आपलं चक्क एकमत झालं .

काळा पहाड's picture

23 Mar 2016 - 12:15 am | काळा पहाड

अर्थशास्त्र नावाचा एक विषय आहे. त्यातलं फॉरिन एक्स्चेंजचं प्रकरण जरा वाचा. मग बोलू. उगीच राष्ट्रवादीचे नेते मंडळी बोलतात तसलं (पक्षी: बिनडोक) बोलून नको तिथे आपल्या बल्बचा प्रकाश कशाला पाडायचा, काय?

बोका-ए-आझम's picture

23 Mar 2016 - 1:18 am | बोका-ए-आझम

परदेशात नोकरी केली तरीही ते पैसे वैअयक्तिक खात्यातच जातात.

परकीय चलन आणतो वगैरे तर थापाच ! त्या परकीय चलनाच्यआ आपल्याच खात्यात अखेर गांधीछाप नोटा होउन अखेर आपल्यालाच त्या मिळतात.

खाली आमचे मित्र काळापहाड यांनी अर्थशास्त्र वाचायचा सल्ला दिलाय तो ऐकलात तर बरं होईल. म्हणजे मग तुम्हाला कळेल की अमेरिकेत डाॅलर्स कमावणा-या एखाद्या भारतीय माणसाने NRE Account वर पैसे पाठवले त्याच्या घरच्यांसाठी तर RBI त्याला बाजारभावानुसार रुपये देते (१९९४ पासून. त्याआधी fixed rate असायचा) आणि ते डाॅलर्स RBI कडे जातात. त्यामुळे परकीय चलन आणतो वगैरे थापाच हे चुकीचं आहे. आणि ते देशाला परकीय चलन मिळवून दिले म्हणून किंकाळत फिरतात असं म्हटलंय तेही.
माहिती नाही तर सरळ माहिती नाही असं सांगावं. असा चारचौघांत पंचनामा करुन घेऊ नये.

hmangeshrao's picture

23 Mar 2016 - 8:22 am | hmangeshrao

डॉलर्स जमा केल्यावर बँक तितक्याच रकमेचे भारतीय चलन देते.. फुकट नाही घेत.

भारतीय सुद्धा. आणि का द्यावं? मिपा फुकट असल्याचे दुष्परिणाम बघतो आहोतच की आपण!

hmangeshrao's picture

23 Mar 2016 - 10:16 am | hmangeshrao

फूकट द्या असे आमचे म्हणणेही नाही.

परदेशातील मनुष्य त्याच्या चूल व मूल साठी परकीय चलन मिळवतो. ते पैसे तो जसेच्या तसे इथे खर्चू शकत नाही . म्हणुन ( झक मारत ! ) त्याचे भारतीय चलन करुन जसे इतर लोक वापरतात तसेच तो वापरतो... या एक्स्चेंज प्रक्रियेत सरकार परकीय चलन विकत घेते.

त्यामुळे देशाला परकीय चलन मिळवुन देतो वगैरे किंकाळ्या फोडु नयेत.

उद्या एखादा शेतकरीही दावा करेल की मी ऊस लावुन देशाला इतक्या रकमेचे ऑक्सिजन मिळवुन देतो !

विठाकाकांनंतर आम्ही मंगेशरावांचे पंखे होनार असं वाटतय.

सुबोध खरे's picture

23 Mar 2016 - 8:13 pm | सुबोध खरे

हितेस बुवा
तुमचे गांधी बाबाचे रुपये चालतात का कच्चं तेल घ्यायला/ सौदी किंवा अरब अमिरातीना? तेथे डॉलर च वाजवून द्यावे लागतात. किंवा कुणाही देशाकडून विमाने पाणबुड्या शस्त्रास्त्रे आणायला चालतात का?
का आता आमची बैलगाडीच बरी म्हणणार पेट्रोल न लागणारी युरो ८ (चार जोडी पाय) आणि drive by wire ( कासरयाच्या दोर्या) वाली.
तुमच्या रुपयाचे मुल्य कशा मुळे येते ते माहिती आहे.
का झिम्बाब्वे सारखे एक "निखर्व" डॉलर पेक्षा जास्त ला एक अमेरिकन डॉलर The Zimbabwe dollar was introduced in 1980 to directly replace the Rhodesian dollar at par (1:1) and at a similar value to the US dollar. Hyperinflation in Zimbabwe reduced it to one of the lowest valued currency units in the world. It was redenominated three times (in 2006, 2008 and 2009), with denominations up to a $100 trillion banknote.[3] The final redenomination produced the "fourth dollar" (ZWL), which was worth 10 RAISED TO TWENTY FIVE ZWD (first dollars).
https://en.wikipedia.org/wiki/Zimbabwean_dollar
उगाच माहित नसलेल्या गोष्टीत नाक खुपसणे सोडून द्या

मृत्युन्जय's picture

23 Mar 2016 - 11:13 am | मृत्युन्जय

बाकीचे सोडा पण आयआयटी मध्ये हा घाऊक देशद्रोहाचा बाजार तर चालत नाही ना? आणी चालला तर त्त्याला देखील विरोध करु. मालकाचे अन्न खाऊन त्याच्यावरच विनाकारण धाउन जाणार्‍या डुकरांपेक्षा बैलगाडीखालुन चालणारे कुत्रे नक्कीच परवडले.

मार्मिक गोडसे's picture

16 Mar 2016 - 11:50 am | मार्मिक गोडसे

१.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे.

जेव्हा लोकं कराचा आणि देशद्रोहाचा संबंध जोडतात तेव्हा असे युक्तीवाद केले जातात. देशातील नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क तो कर भरतो म्हणून मिळालेला नाही. येथे प्रत्येकजण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कर भरत असतो.

गॅरी ट्रुमन's picture

15 Mar 2016 - 8:02 pm | गॅरी ट्रुमन

बरेचसे मुद्दे मान्य पण...

जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे.

या मुद्द्याशी तितकीशी सहमती नाही. अमेरिकन विद्यापीठांमध्ये अगदी ४०-४५ वर्षांचे पी.एच.डी विद्यार्थीही बघायला मिळू शकतात. अर्थातच ८-१० वर्षांपासून पी.एच.डी चालू असेल तर मात्र नक्कीच प्रॉब्लेम आहे. FTII मध्ये ८-८ वर्षांपासून बॅचलर्स करणारी मंडळी आहेत--पी.एच.डी तर सोडूनच द्या. ती अर्थातच समर्थनीय गोष्ट नाही. पण पी.एच.डी उशीरा सुरू केली असेल तर आणि मुळातच पी.एच.डी ही बॅचलर्स पदवीप्रमाणे ३-४ वर्षात पूर्ण होईलच याची खात्री नसते त्यामुळे ३१ वर्षाचा पी.एच.डी विद्यार्थी असणे ही अगदी अशक्य गोष्ट नाही.

रच्याकने: भविष्यात मलाही पी.एच.डी करायची अतोनात इच्छा आहे.आणि मी कुठे पी.एच.डी करायला गेल्यास माझ्याविषयीही मिपावर असे कोणी बोलू नका ही विनंती :)

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 8:09 pm | बोका-ए-आझम

तिथे पदवीधर ही किमान पात्रता असते ना? म्हणजे तिथे येणारे सगळेजण बॅचलर्स झालेले असणार. शिवाय तसंही FTII पदवी देत नाही, पदविका किंवा diploma देते.

गॅरी ट्रुमन's picture

15 Mar 2016 - 8:21 pm | गॅरी ट्रुमन

अरे हो. या संस्थेत पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा दिले जातात.मागे FTII ची वेबसाईट बघितली होती त्यावेळी अनेक कोर्सेस तीन वर्षांचे दिसले. त्यामुळे हे कोर्सेस म्हणजे बॅचलर्स कोर्सेस आहेत असे चुकून वाटले.ही मंडळी ८/८ वर्षे तिथे राहतात तेव्हा नक्की कोणता कोर्स तिथे शिकवला जातो (कारण अगदी प्रिन्सटन किंवा हार्वर्डमध्येही भौतिकशास्त्रासारख्या बेसिक सायन्सेसमधील पी.एच.डी सुध्दा ६-७ वर्षात पूर्ण होते) हे बघायला म्हणून मागे ती वेबसाईट बघितली होती.ते बघताना माझा भर नक्की किती वर्षांचे कोर्सेस तिथे असतात यावर होता. त्यामुळे नक्की कोणते कोर्सेस असतात याकडे तितके लक्ष दिले नव्हते. आता परत एकदा बघून खात्री करून घेतली. सुधारणेबद्दल धन्यवाद.

पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा दिले जात असले तरी त्याचे कारणे म्हणजे FTII ही संस्था विद्यापीठ किंवा डिम्ड विद्यापीठ नाही म्हणून त्यांना डिग्री द्यायचा अधिकार नाही हे असावे. सध्या आय.आय.एम सुध्दा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाच देतात.तरीही त्यांचा कोर्स मास्टर्स डिग्रीला समकक्ष असतो. कदाचित FTII विषयीही असेच असावे.

ट्रेड मार्क's picture

15 Mar 2016 - 9:08 pm | ट्रेड मार्क

अमेरिकेत जरी ४०-४५ वयाचे लोक्स पी.एच.डी करत असले तरी ते त्याबरोबरीने काम पण करतात. अमेरिकेत बहुतेक मुले मुली वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून काही ना काही काम मग करत असतात मग ते स्वयंसेवक म्हणून असो किंवा छोटी मोठी नोकरी असो. जरी शिष्यवृत्ती मिळाली असेल तरी स्वताचे बाकीचे खर्च भागवण्यासाठी काम करतात.

इथे मात्र शिष्यवृत्ती घेतात वर स्वतःच्या गरीबीचे भांडवल पण करतात आणि त्यापुढे जाऊन देशविरोधी वक्तव्ये पण करतात. कन्हैय्या आणि त्यासारखे बाकी वय झालेले विद्यार्थी बाकी पोटापाण्यासाठी काय करतात यावर कोणीतरी पी.एच.डी करू शकेल काय?

तर्राट जोकर's picture

15 Mar 2016 - 8:38 pm | तर्राट जोकर

कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. अजून दहा दिवस वाहिन्या नाही बघितल्या तर कुठेकुठेसुद्धा कन्हयाकुई ऐकु येणार नाही. वृत्तपत्रांनी कधीच सोडुन दिलंय. दोन चार महिन्यांनी कोण कन्हया म्हणून लोक विचारतील. 'कोण अण्णा हजारे' विचारतात तसे.

लेखाशी बर्‍याच अंशी सहमत आहे. तरी दोन-चार मुद्दे विचारुन घेतो. आशा आहे लेखक उत्तर देतील.

१. अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले.
>> ह्याचा खात्रीलायक पुरावा आहे? मीही अशा सुराच्या पोस्ट्स बघितल्यात, कन्फर्म बातमी नाही. तुमच्याकडे असेल तर द्यावी ही विनंती.

२. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे.
>> जेएनयु च्या अध्यक्षिय निवडणुकीची भाषणे आणि बेल नंतरचे भाषण यात काही फरक वाटत नाही. ना भाषेत, ना विचारात, ना कंटेंटमधे, ना आवेशात. न्यायालयाला घाबरुन, देशभक्ती सिद्ध करायला संघविरोधी मोहिम आहे असे म्हणणे वस्तुस्थितीला धरुन नाही. हे गृहितक कोणत्या आधारावर मांडले आहे?

३. जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे.
>> कन्हयाचे वय २८ सुरु आहे. ३१ नाही. साधारणपणे त्याचे पदव्युत्तर शिक्षण २००९-१० संपले असेल तर त्याने पीएचडी साठी २०१०-११ मधे प्रवेश घेतला असेल. पीएचडी मिळायला साधारणपणे ५-६ वर्षे लागतात. त्याप्रमाणे कन्हया जेएनयुत त्याच्या पीएचडीची एक वा दोन वर्ष बाकी असू शकतात. जगात सर्वत्र, अमेरिकेत आणि भारतातही, अनेक दशके पीएचडी करणार्‍यांचे सरासरी वय ३३ आहे. जेएनयुत प्रवेश मिळणे हे सामान्य बुद्धीच्या मुलांसाठी कठिण आहे. कारण स्पर्धा कठीण आहे. इथे प्रवेश मिळवणे जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश मिळण्याइतके सोपे नाही.

http://www.jnu.ac.in/Admission/AdmissionPolicy.pdf

अनेक जण पीएचडी करतात, काम करता करता शिकतात, जेएनयु वा इतर विद्यापिठांमधेही वयाची ३१-३२ वर्षे होईस्तोवर शिकतात. सोबत त्यांची फेलोशिपची कमाईही सुरु असते. रोहित वेमुलाच्या बाबतीत हेच झाले. तो २५ हजार रुपये महिन्याने फेलोशिप (A fellowship provides financial support to graduate students to pursue graduate studies without associated teaching or research responsibilites (as they are in a teaching or research assistantship). Fellowships are generally merit-based internal or external awards to support a student in a full-time course of study.) वर शिकत-शिकवत होता. त्याला विद्यार्थी म्हणून संबोधले गेले. एखाद्या विषयाची आपल्याला पूर्ण आणि सत्य माहिती नाही तरी आपण असे बेधडक लिहून त्या विशिष्ट वर्गाला गैरजबाबदार ठरवत आहात असे नाही वाटत?

४. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे.
>> त्याला राष्ट्रनेता बनायचे आहे असे कधी म्हटलेले आढळले नाही. त्याचे भाषण हिट झाले. अनेकांची अशी अनेक भाषणे ह्यापूर्वीही मिडीइयाने लाइव दाखवली आहेत. काहीवेळा लोकांना आवडलीत काही नाही. सव्वाशे कोटीने निवडून दिलंय ना त्यामुळे टिका करु नका, शिव्या देऊ नका हेच जर म्हणायचे असेल तर हेच आपण जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, उद्या न जाणो झालेच तर राह्हुल गांधी ह्यांनाही देऊ नये असे आपले मत असेल काय? कुणी शिवी द्यावी याची काय पात्रता ठरवली आहे?

५. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर.
>> हेच प्रवचन एबीवीपीतल्या विद्यार्थ्यांना द्याल का? ह्याबद्दल इतर धाग्यांवर मी लिहिले आहे. पुनरावृत्ती नकोय.

तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.
>> कन्हयाच्या देशद्रोही वागण्याची आपण दिलखुलास निंदा करुया. काहीच समस्या नाही. पण तुझ्या वयाची मुले आणि करदात्यांचे पैसे खाऊन हे दोन वाक्य अजिबात आवश्यक नाहीत. करदात्यांचे पैसे न खाता, दहा वर्षांआधी शिकून चांगले इंजिनियर वैगरे झालेले दहशतवादी कृत्य करणारे आढळले आहेत. तसेच जे असे देशद्रोही कृत्ये करत नाहीत पण २८-३५ पर्यंत शिकतात, करदात्यांच्या पैशानी शिकतात त्यांच्यावर आपण उगाच चिखलफेक करत आहोत.

टिपिकल असण्याच्या बाहेर असता तर ह्या लेखाला मी सहर्ष अनुमोदन दिलं असतं. बाकी लेखाच्या मागे असलेला आपला जेन्युइन संताप समजू शकतो. तो व्यक्त करायला घेतलेले काही मुद्दे चुकीचे वाटतात. ज्या पद्धतीने लेख लिहला आहे त्यावर एका विशिष्ट गोटाने तयार केलेल्या बातम्या, उपलब्ध माहितीला सोयिस्कर वाकवून बनवलेल्या गेलेल्या, सोशल गृप्सवर बोकाळलेल्या वन-लायनर्सचा भरपूर प्रभाव दिसतो. सदर गोटाने कन्हयाच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेतलेला दिसतो. ती लोकप्रियता अजून वाढू नये व लवकर घटावी म्हणून सदर मोर्चेबांधणी सगळीकडे सुरु आहे. चार दिवसाचं बाळ ते, येईल आणि जाईल. आले किती गेले किती संपले भरारा असे म्हणतात आणि परत तेच तेच दळण दळतात.

इष्टुर फाकडा's picture

16 Mar 2016 - 12:29 am | इष्टुर फाकडा

पटले.

रणजित चितळे's picture

15 Mar 2016 - 8:54 pm | रणजित चितळे

नाही विजय माल्या बद्दल बोललो. कारण मला वाटले हा प्रश्न जास्त चिघळला तर आवरता येणार नाही. बाकीचे आवरले जातीलही

होबासराव's picture

15 Mar 2016 - 8:54 pm | होबासराव

कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. अजून दहा दिवस वाहिन्या नाही बघितल्या तर कुठेकुठेसुद्धा कन्हयाकुई ऐकु येणार नाही. वृत्तपत्रांनी कधीच सोडुन दिलंय. दोन चार महिन्यांनी कोण कन्हया म्हणून लोक विचारतील. 'कोण अण्णा हजारे' विचारतात तसे.

सौ टके कि बात किये हो तजो भैय्या.
माझे मतः- फक्त अण्णा हजारे पे़क्षा कोण तो मागच्या वर्षि गुजरात मध्ये अराजक माजवणारा, त्याचे नाव फिट्ट बसले असते. अण्णा तरि महात्मा गांधि होण्याच्या नादात, प्रसिद्धि साठि हे सगळे करत होते. सुमार केतकरां चे आणि माझे ह्या बाबतितच मतैक्य होत कि "अण्णाना रोज टिव्हि वर दिसण्याचे, सतत बातम्यांमध्ये राहण्याचे जसे व्यसनच लागले होते". अहो कुठल्याहि नेत्याच्या भाषणाला नसतात इतके लाखो लोक "अन्ना" "अन्ना" करत त्यांच्यासोबत जंतर मंतर वर जमायचे, बास ह्यानेच सगळा घोळ झाला कि आणि ह्याचा फायदा ज्या धुर्त लोकांना उठवता आला तो त्यांनि उठवला, असो. अण्णा ना मि कधि काळि अकोल्यात प्रत्यक्ष भेटलोय एकदम साधा माणुस आहे हो. पण त्यावेळेस अण्णा रेल्वेने फिरायचे ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Mar 2016 - 12:33 am | निनाद मुक्काम प...

सहमत

साहेब..'s picture

16 Mar 2016 - 10:31 am | साहेब..

+१

प्रदीप साळुंखे's picture

15 Mar 2016 - 8:56 pm | प्रदीप साळुंखे

हा कन्हैयाकुमार अव्वल दर्जाचा नालायक आहे.

होबासराव's picture

15 Mar 2016 - 8:59 pm | होबासराव

अहो वरचे काहि प्रतिसाद बघा ! आता चक्कि बंद होत आलिये आणि तुम्हि आता दळण आणता होय ;)

प्रदीप साळुंखे's picture

15 Mar 2016 - 9:05 pm | प्रदीप साळुंखे

हा शेवटचाच प्रतिसाद,
काही नै जाता जाता थोडा सत्कार करून जावे म्हणलं:'(

नाना स्कॉच's picture

15 Mar 2016 - 9:56 pm | नाना स्कॉच

"राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र नहीं बल्कि राष्ट्र है इसीलिए राष्ट्रवाद है"

-मेजर सिद्धांत चौधरी (राहुल बोस), शौर्य

उगाच आठवले! असो!

इष्टुर फाकडा's picture

16 Mar 2016 - 12:31 am | इष्टुर फाकडा

अतिशय टुकार कॉपी चित्रपट (फ्यु गुड मेन- व्हर्जिनल). राहुल बोसचं पात्र तर लयीच 'चड्डी'. असो. उगाच आठवले ;)

नाना स्कॉच's picture

16 Mar 2016 - 5:01 am | नाना स्कॉच

सहमत! फ़क्त ड्वायलॉक आठवला त्यों लिहिला! फ्यू गुड मेन इज फ्यू गुड मेन!! :)

(उगाच नाही मुद्दाम लिहितोय) :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Mar 2016 - 12:51 am | निनाद मुक्काम प...

राष्ट्र आहे म्हणून का होईना तुम्हाला राष्ट्रवाद आहे हे तरी मान्य आहे
मग राष्ट्राचे तुकडे पडण्याच्या घोषणा दिल्यावर त्या जो प्रत्यक्ष पडत नाही तो पर्यत राष्ट्रदोहाचा आरोप करू नका असे कसे म्हणता येईल
भाजपच्या रणनीतीला सलाम
सुरवातील सगळे विचार्जंत व जे एन यु मधील लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गप्पा मारत उमरची पाठराखण करत होते त्यात कनैह्या सुद्धा होता प कनैह्या ला आत टाकल्यावर राजकीय पक्ष व प्रसरा माध्यमांनी कनैह्या एके कनैह्या सुरु केले
उमर त्यांची संघटना ह्यांना वार्यावर सोडले
सगळ्यात गंमत म्हणजे अध्यापक गिलानी ह्यांना त्याच्या शिक्षक संघटनेने जे एन यु प्रशासनाने प्रसार माध्यमांनी वाळीत टाकले
थोडक्यात भारतविरोधी घटक आपसूकच अडगळीत टाकण्यात आले
कनैह्या ला मोदींच्या विरोधात उभे करण्याच्या नादात जनतेसमोर ह्या लोकांनी आपण फक्त राजकारण करत आहोत हे डावे पक्ष व त्यांचे धार्जिणे प्रसार माध्यमे ह्यांना साक्षात्कार झाला.
लोकसत्ता ने सुद्धा जसे कोन्ग्रेज धर्म निरपेक्षतेचे कार्ड वापरायची तसे भाजप राष्ट्रवादाचे कार्ड वापरत आहे अशी कोल्हेकुई केली
मात्र भाजपने कार्ड वापरल्यावर ज्या तत्परतेने त्यांनी बोंबाबोंब केली ती कोन्ग्रेज च्या वेळी केली नाही.
भारतीय जनतेला तुम्ही कोणतेही कार्ड वापरा काहीही फरक पडत नाही
त्यांना रोटी कपडा मकान हवे असते ते मिळाल्यावर माफक चंगळवाद संस्कृती उपभोगू सहकु एवढा पैसा गाठीशी असला कि
आपण बरे आपले डेली सोपस आणि रिया लेटी शोज बरे तोंडी लावायला आय पी एल क्रिकेट आणि बॉलीवूड
बाकी काहीही नको
आंदोलनाचे दिवस सरले महाराजा
उशाकाल होता होता ह्या गाण्यातील एक वाक्यावर भारतीय जनतेचा ठाम विश्वास बसला आहे
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
म्हणूनच जे आहे तेच खरे वास्तव मानून भारतीय समाज प्रत्येक दिवशी जास्तीजास्त भांडवलशाहीचा पाईक होत आहे
असे प्रांजळ साल सलाम लाल माकडे अजून काही वर्ष करतील मग ते इतिहासाचा भाग बनतील

तर्राट जोकर's picture

16 Mar 2016 - 1:14 am | तर्राट जोकर

भारतीय जनतेला तुम्ही कोणतेही कार्ड वापरा----- क्रिकेट आणि बॉलीवूड बाकी काहीही नको

>> भारतीय जनतेबद्दलचा फारच गोग्गोड, मेट्रोपोलिटन व्यू आहे. भारतीय जनतेवर इतका विश्वास आहे तरी दोन-चार माथेफिरूंच्या चार-दोन फुटकळ घोषणांनी ह्या अवाढव्य राष्ट्राचे पिझ्झासारखे तुकडे पडतील अशी भीती का वाटली असावे बरे? मिडीयाने कन्हयाला एवढीशी हवा दिल्यावर धरणीकंप होईल एवढा का थयथयाट झाला असावा बरे? त्या थयथयाटाची थरथर अजूनही कमी झाल्यासारखी वाटत नाहीये.

असे प्रांजळ साल सलाम लाल माकडे अजून काही वर्ष करतील मग ते इतिहासाचा भाग बनतील
>> असे वारंवार बोलत राहिल्याने बोलणार्‍याला थ्री इडियट्सवाली 'ऑल इ़ज वेल ऑल इज वेल' टैप शांतता मिळत असेल का?

नाना स्कॉच's picture

16 Mar 2016 - 5:09 am | नाना स्कॉच

तुम्ही बुआ समोरच्याला लैच गृहीत धरता ! राष्ट्र प्रत्येकालाच मान्य आहे हो (किमान जालीय एक्सेस असणाऱ्या प्रत्येक सुखवस्तुला तर नक्कीच) फ़क्त त्याची परिभाषा काय? ते मुद्दल क्लियर झाले की ओमर खालिद सारख्या वाय झेड लोकांस शिव्या देणे सोईचे पड़ते, बीजेपी च्या रणनीती ला सलाम करणे म्हणजे राष्ट्र अन राष्ट्रवाद आहे होय हो दादा???

असो!

रणजित चितळे's picture

16 Mar 2016 - 10:58 am | रणजित चितळे

एकदम पटले

आपल्याकडे फुकट सल्ले द्यायला फार आवडतं लोकांना। कोणी काय शिकावं, काय शिव्या द्याव्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नाही का?

ट्रेड मार्क's picture

16 Mar 2016 - 1:26 am | ट्रेड मार्क

हा पण एक फुकट सल्लाच आहे असे निरीक्षण नोंदवतो.

हाहा। पण सल्ला कुठे दिला मी

नव-युगपुरुष कन्हैय्या आणि भारतिय नागरीकांचे आशास्थान रा.रा. राहुल गांधि ह्यांचि आज भारताला सध्या भेडसावणार्‍या समस्या ह्या बद्दल गहन चर्चा झालि.
कुछ तो करना हि पडेगा न्युज मे बने रहने के लिये :)

भारतिय नागरीकांचे आशास्थान रा.रा. राहुल गांधि

तरूण आशास्थान न म्हटल्याबद्दल निषेध!

रमेश आठवले's picture

23 Mar 2016 - 7:32 am | रमेश आठवले

कन्हैया गेले काही वर्षे ८००० दरमहा शिष्यवृत्ती उपभोगत आहे. त्याला अत्यल्प दराने वसतिगृहात रहाणे व भोजन यांची सोय आहे. आपल्या भाषणात त्याच्या आई वडलांच्या गरिबी बद्दल बोलतो आणि त्यांना मासिक फक्त ३००० रुपये मिळतात असे सांगतो. पण तो त्याना आर्टिक मदत करत असल्याची माहिती कुठेही आलेली नाही

hmangeshrao's picture

24 Mar 2016 - 10:55 am | hmangeshrao

मोदीजी सौभाग्य्वती मोदीना किती पोटगी देतात , हे कसे समजेल ?

रमेश आठवले's picture

24 Mar 2016 - 8:06 pm | रमेश आठवले

आपण मोदींची आणि कन्हैया ची तुलना कशी करू शकता ?
कन्हैया तोंड उघडले की त्याचे आई वडील कसे गरीब आहेत आणि त्या साठी समाजव्यवस्था कशी दोषी आहे हे सांगत फिरत असतो.८-९ वर्षे टिवल्या बावल्या करत शिष्यवृत्तीवर मजा करत आहे, आई वडिलांच्या गरीबीचे भांडवल करत आहे आणि शिष्यवृत्ती ८००० वरून १२००० करावी या साठी चळवळ करीत आहे .
पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का ?
क्न्हैयाची तुलना मोदींशी करण्यात त्याचे महत्व वाढवणे हा तुमचा हेतू नाही असे मी मानतो.

hmangeshrao's picture

25 Mar 2016 - 9:00 pm | hmangeshrao

पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का

?

मोदी सर्कारने कायदा बदलला की काय ? !!

रमेश आठवले's picture

26 Mar 2016 - 1:53 am | रमेश आठवले

कायद्यात काय तरतूद आहे ते लिहून माझे अज्ञान दूर केल्यास मी आभारी राहीन.

hmangeshrao's picture

26 Mar 2016 - 6:05 am | hmangeshrao

गुगल वाइफ , मेंटेनन्स , डायवोर्स.

Obligation of a husband to maintain his wife arises out of the status of the marriage. Right to maintenance forms a part of the personal law. Under the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), right of maintenance extends not only to the wife and dependent children, but also to indigent parents and divorced wives.

http://www.legalserviceindia.com/articles/hmcp.htm

hmangeshrao's picture

25 Mar 2016 - 9:46 pm | hmangeshrao

पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का

?

मोदी सर्कारने कायदा बदलला की काय ? !!

होबासराव's picture

23 Mar 2016 - 2:05 pm | होबासराव

आज हैद्राबाद युनिव्हर्सिटी ला भेट देतायत.

रमेश आठवले's picture

23 Mar 2016 - 7:59 pm | रमेश आठवले

कन्हैयाला हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश करू दिला नाही अशी आत्ताची बातमी आहे. कदाचित काल डाव्या मताच्या २० विद्यार्थ्यांनी उप कुलगुरुंच्या ऑफिस वर हल्ला करून त्याना ६ तास डांबून ठवले त्याचा हा परिणाम असेल. आता पुण्याच्या संस्थे सारखे इथेही मुठभर विद्यार्थी उप कुलगुरू कोण असावेत हे ठरवू पहात आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/india/Kanhaiya-stopped-at-the-gate-of...

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2016 - 3:42 pm | श्रीगुरुजी

आपला काहीही संबंध नसताना आव्हाड फर्ग्युसनमध्ये गेला होता. तिथे त्याला धक्काबुक्की झाली. आता काल त्याने ट्वीट करून तारे तोडले आहेत.

"फर्ग्युसनची स्थापना शाहू महाराजांनी स्वतंत्रलढ्याच्या प्रेरणेतून केली त्याच कॉलेजच्या प्राचार्यांनी शाहू महाराजांच्या विचारांची होळी केली"

हा नावामागे डॉक्टर लावतो. बहुतेक बारामती विद्यापीठाने त्याला डॉक्टरेट दिली असावी. फर्ग्युसन कॅालेजची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, व महादेव बल्लाळ नामजोशी यांनी केली होती हे सुद्धा याला माहिती नाही.

मेडियाच्या दृष्टीने कन्हैय्या ~= हार्दिक पटेल. थोडे दिवस हवा करायची, नवीन मुद्दा मिळाला कि तिकडे धावायचे