भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
3 Mar 2016 - 5:09 pm

कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>>

'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात.

मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक?

अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का?

मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात.

थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.)

मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?

समाजमाध्यमवेध

प्रतिक्रिया

चिनार's picture

3 Mar 2016 - 5:37 pm | चिनार

संयमित लिखाण ! आवडले !

आतिवास's picture

3 Mar 2016 - 5:40 pm | आतिवास

जेव्हा डावे आपल्याला उजवे समजतात आणि त्याच वेळी उजवे मात्र आपल्याला डावे समजतात - अशा वेळी आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात येते.

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 5:51 pm | तर्राट जोकर

हे नक्की कसे होत असेल ह्याबद्दल उत्सुकता आहे. :-)

सहमत. याचे जनरलायझेशनही करता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2016 - 9:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आणि आतिवास यांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2016 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा

@

डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात.

>> दारू बदलली,तरी दारुडेपण बदलत नाही!

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2016 - 6:50 pm | राजेश घासकडवी

लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची पातळी इतकी खाली येताना दिसते कधीकधी की ध्रुवीकरण होणं स्वाभाविक असतं. ध्रुवीकरण झालं की दोन्ही बाजू टोकाच्या भूमिका घेतात आणि मग चर्चेची पातळी आणखीनच खालावते. हे दुष्टचक्र चालूच राहातं.

आपण सामान्यतः जी माणसं बघतो त्यात कोणीच टोकाचं डावं किंवा टोकाचं उजवं नसतं. किंबहुना या विचारसरणींना महत्त्व देण्यापलिकडे सामान्य जीवनातल्या कटकटींमधून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. आणि तसं बघायला लागलं तर बहुतेक सरकारांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहारात डाव्या आणि उजव्या भूमिकांचा समन्वयच साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. असं असताना कुठच्यातरी दोन काल्पनिक व अव्यावहारिक टोकांकडे जाऊन, समोरच्या माणसाला एका टोकावर आणि आपण एका टोकावर बसून सीसॉ खेळत बसणं निरर्थक आहे.

मोदीसमर्थक आणि मोदीविरोधी यांचा वाद पाहून मला सतत हे वाटत राहिलेलं आहे की अरे तुमची चर्चा करण्याची, विचार करण्याची पातळी इतकी दहा वर्षाच्या मुलाइतकी खाली आलेली आहे का? कोणी आपल्या प्रकट जीवनात किती मूर्खपणा केला यावरून एकमेकांशी कशाला वाद घालायचा? सरकार चालवणं म्हणजे या प्रकट नौटंकीपलिकडे बरंच काहीतरी असतं. कायदे करणं, योजना राबवणं, सुव्यवस्था राखणं... या चर्चा करणारातले किती लोक एखाद्या कायद्याचा जनतेवर खरोखर काय परिणाम झालेला आहे, त्यातून किती चांगलं झालं आहे, त्याचे फायदे सर्वांना मिळताहेत की नाही वगैरे गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या भल्याबुऱ्या गोष्टी मांडतं? किती लोकं उजव्या व डाव्या दोघांचंही काही चुकतं काही बरोबर असतं असा समजुतदार विचार करू आणि मांडू शकतात?

असो. आता या लेखावरही मोदीचाहते विरुद्ध मोदीविरोधक अशी साठमारी दिसली नाही म्हणजे मिळवली.

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 7:06 pm | तर्राट जोकर

+१

स्वामी संकेतानंद's picture

3 Mar 2016 - 9:03 pm | स्वामी संकेतानंद

आपल्याकडे कोणतेही सरकार आले तर तिला टोकाची भूमिका घेता येणार नाही. साधारण समाजवादी, welfare स्टेट च्या भूमिकेत राहावे लागेल. मोदींनाही मनरेगा बंद करता आली नाही आणि काँग्रेसलाही सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक करणे सुरु ठेवावे लागले होते. शेवटी सरकार चालवणे एक balancing act आहे. अशावेळी टोकाची मते घेऊन आपण इकडे वेड्यागत भांडतो ते हास्यास्पद आहे.

मन१'s picture

4 Mar 2016 - 12:44 pm | मन१

कालपरवाच महेश भट ह्यांचं एक ट्वीट ह्याच अर्थाचं वाचण्यात आलं --
@MaheshNBhatt .... politics is the gentle art of getting votes from the poor & campaign funds from the rich, by promising to protect each from the other.
.
.
ब्यालन्सिंग अ‍ॅक्ट म्हणजे कह्रं तर खूपदा मांडवली केल्यासारखं काम असतं.

मुळात उजवे आणि डावे हा प्रकार काये सांगेल का कोणी? लहानपणापासून एकतोय

असंका's picture

3 Mar 2016 - 7:02 pm | असंका

+१
तसं स्वतःहून हे कबूल करायची माझी हिंमत झाली नसती, पण आता कुणीतरी म्हणत आहे तर मीही...

आहे काय हे उजवी विचारसरणी?

नीलमोहर's picture

3 Mar 2016 - 7:25 pm | नीलमोहर

हुश्श !! कुणीतरी विचारलं एकदाचं,
डावे कोण उजवे कोण?

चिनार's picture

4 Mar 2016 - 12:03 pm | चिनार

मले बी सांग जा

नीलमोहर's picture

4 Mar 2016 - 12:47 pm | नीलमोहर

आले लगेच विचारायला ;)

डावे म्हणजे साम्यवादी.. ज्यांच्यामते सगळी माणसे समान असतात.
उजवे म्हणजे अ-साम्यवादी. ते माणसा-माणसामध्ये भेद करतात

आता नेक्स्ट,

कम्युनिस्ट म्हणजे काय?
निधर्मांध म्हणजे काय?
विचारवंत म्हणजे कोण?

स्पा's picture

4 Mar 2016 - 2:24 pm | स्पा

अभिरुचीसंपन्न,डावी भूमिका,उज्वी भूमिका,किंचित डावीकडे झुकलेली centre leftist, संघी,अतिउजवा 'uncivilized raccoon,

यावरही प्रकाश पाडा

नीलमोहर's picture

4 Mar 2016 - 4:00 pm | नीलमोहर

लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत प्रतिसादांबरोबर तुम्हीही उजवीकडे चालले आहात लक्षात येतंय का तुमच्या?

धुत्या आणि जेवत्या हातांकडे बघ. आपोआप समजेल.

बाळ सप्रे's picture

4 Mar 2016 - 4:44 pm | बाळ सप्रे

धुत्या हाताचे महत्व जाणून म्हणताय की हलके काम जाणून म्हणताय हे यातून समजत नाहीये. त्यामुळे डाव्यांविषयीची तुच्छता आहे की वेगळेपण दाखवायचय हे समजत नाहीये. :-(

आनन्दा's picture

3 Mar 2016 - 8:04 pm | आनन्दा

माझे २ पैसे.

डावे म्हणजे साम्यवादी.. ज्यांच्यामते सगळी माणसे समान असतात.

उजवे म्हणजे अ-साम्यवादी. यामध्ये सगळे आहे, भांडवलवादी हा सरळ दिसणारा वर्ग, पण त्याबरोबरच वर्गवादी, वर्णवादी, धर्मवादी सुद्धा यांमध्ये येतात. जसे की हिंदू किंवा मुस्लिम यांच्यात आम्ही आणि इतर असे वर्ग असतात. भांडवलशाहीमध्ये मालक आणि कामगार असे वर्ग असतात. हे सगळे उजवे. कारण ते माणसामाणसामध्ये भेद करतात

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 9:45 pm | सतिश गावडे

जनरलायझेशन करायचे झाले तर तू उजव्या विचारांचा आहे आणि मी डाव्या. ;)

आतिवास's picture

3 Mar 2016 - 9:56 pm | आतिवास

या विषयावर अगदी सोप्या शब्दांत लिहायची खुमखुमी आहे. कधी वेळ मिळतोय त्याची वाट पाहतेय.

अर्धवटराव's picture

4 Mar 2016 - 12:36 am | अर्धवटराव

तुला आस्तीक/नास्तीक म्हणजे नेमकं काय हे कळलं आहे का ?(मला अजीबात कळत नाहि)
तसच काहिसं डावे/उजवे प्रकरण असावे असा कयास आहे माझा :ड

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 1:05 pm | नाना स्कॉच

माझ्या ऐकिव अन तोकड्या वाचीव माहीती नुसार

उजवे अन डावे हे शब्द प्रचलन फ्रेंच राज्यक्रांति नंतर उदयाला आले, फ्रेंच राज्यक्रांति जेव्हा झाली तेव्हा त्यांच्या राजाने म्हणे (१६वा लुई बहुदा) एक सभा बोलावली होती (का एक क्रन्तिकारी लोकांची सभा होती) (समन्वयवादी भूमिकेतुन का क्रांतिकारी लोकांचे कान उपटायला ते माहीती नाही) त्या सभेत समाजवादी लोकशाहीवादी क्रांतिकारी (पक्षी वोल्टेर वगैरे) मंडळी डाव्या हाताला बसली होती अन परंपरावादी सरांजमशाही सरदार दरकदार मंडळी उजव्या हाताला बसली होती, म्हणून हे नामकरण झाले म्हणतात

खरे खोटे देव जाणे

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 1:16 pm | बोका-ए-आझम

फक्त ही सभा (Estates General) फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी झाली होती.

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 2:31 pm | नाना स्कॉच

म्हणजे ही राजानेच भरवली असणार, नाही का??

शिवाय अशीच एक एस्टेट जनरल -२ नेपोलियन बोनापार्ट ने भरवुन लोकांच्या (सभेत हजर असलेल्या) कानशीलावर बंदुकी टेकवून स्वतःला सम्राट घोषित करायचा ठराव पास करवुन घेतला होता म्हणे.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 3:12 pm | बोका-ए-आझम

कारण प्रजेतला असंतोष शिगेला पोचला होता. त्यात फर्स्ट इस्टेट म्हणजे धर्मगुरू, सेकंड इस्टेट म्हणजे सरदार-दरकदार आणि थर्ड इस्टेट म्हणजे सामान्य लोक - कामगार, शेतकरी, व्यापारी, इत्यादी असे होते. पहिल्या दोन इस्टेट्स राजाच्या उजव्या हाताला आणि तिसऱ्या इस्टेटचे लोक डाव्या हाताला असे बसले होते, कारण त्यांची संख्या जास्त होती आणि पहिल्या दोन इस्टेट्सचे लोक त्यांच्याबरोबर बसायला तयार नव्हते.डावे आणि उजवे हे शब्दप्रयोग त्यावरूनच आले. अजून एक शब्दप्रयोग म्हणजे प्रसारमाध्यमांना जे Fourth Estate असं म्हटलं जातं त्यालाही हा संदर्भ आहे.
नेपोलियनने असं काही केलं होतं का ते संदर्भ चेकवून सांगतो.

स्पा's picture

4 Mar 2016 - 4:16 pm | स्पा

नाना काका आणि बोका काका

कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी डाव्या उजव्या हाताला बसले म्हणून अख्खी विचारसरणी तशी डावी उजवी!! भलतंच गमतीशीर आहे!

एक प्रथा ब्रिटिश पार्लियामेंट मधे आहे, तिथे पार्लियामेंट चा बेलिफ का स्पीकरचा राजदंड रक्षक कुठलेतरी एक पद आहे त्या पदावर नियुक्तिसाठीच्या अटीत एक अट म्हणजे त्या व्यक्तीला तपकिर ओढायची सवय हवी, एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यात तंबाकुचं प्रस्थ प्रचंड होते, त्याचाच असर असावा, जगप्रसिद्ध इंग्लिश स्नफ (इंग्रजी तपकिर) ह्या बेलिफ ला देतात, त्याचा खर्च कायदेशीररीत्या बजेट मधे मांडला अन मंजूर केला जातो. ही व्यक्ति तिला पुरवलेल्या चांदीच्या डब्बी मधुन मधेमधे तपकिर नाकात कोंबत असते.

असंका's picture

5 Mar 2016 - 1:30 pm | असंका

ऐकावं ते नवल!!

म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती.

+१०००००

पैसा's picture

3 Mar 2016 - 7:33 pm | पैसा

लेख आवडला. समतोल विचार कोणी करू शकतो यावर लोकांचा विश्वास बसणे कठीणच असते.

हे डावे काका आणि उजवे काका कोण असावेत याची साधारण कल्पना आहे. तू एवढा किल्ला लढवला असशील तर शाबास!! :D

स्वामी संकेतानंद's picture

3 Mar 2016 - 9:04 pm | स्वामी संकेतानंद

तुमचा अंदाज चुकलेला असण्याची दाट शक्यता आहे! :P

पैसा's picture

4 Mar 2016 - 9:25 pm | पैसा

ओक्के!

तिमा's picture

3 Mar 2016 - 7:43 pm | तिमा

माझी सांपत्तिक स्थिती काही का असेना, माझ्या वर्तणुकीवरुन मी डावीकडे झुकलेला मध्यमवर्गीय आहे, असे वाटते. कुठल्याही प्रकारची उधळपट्टी, संपत्तीचे प्रदर्शन, स्वतःवर जास्त खर्च करणे मला आवडत नाही. आपल्या जेवढ्या गरजा आहेत त्याच प्रतीचा मोबाईल मी वापरतो. कॉल करणे व घेणे आणि प्रसंगी एस.एम.एस. करणे, एवढ्याच माझ्या गरजा. मोबाईलमधे व्हॉटस अ‍ॅप नसल्यामुळे, गुड मॉर्निंग पासून बाकीचे टाईमपास करायचा प्रश्नच येत नाही. भारतामधे लोकं एकमेकांना 'गुड मॉर्निंग' का करतात, हे लहानपणापासूनचे कोडे आहे. बहुतेक, सकाळी बद्धकोष्ठ न होता पोट साफ होणे, म्हणजेच गुड मॉर्निंग झाली, अशी उच्च मध्यमवर्गीयांची समजूत असावी.

विवेकपटाईत's picture

3 Mar 2016 - 8:09 pm | विवेकपटाईत

जन्तर मन्तर वर जमलेले उच्च शिक्षित युवा होते, अधिकांश मुले/ मुलींच्या होतात सिगरेटी होत्या, अभिव्यक्ती स्वात्यंत्र म्हणजे हेच. हे उच्चभू दलितांसाठी घोषणा देत होते. बाकी बघे बाबू कुठल्या नजरेने त्यांच्या कडे पाहत होते, न सांगणे योग्य.

माझा एक कलिग आहे गुरगाव चा तो सांगत होता कि नुसत्याच सिगरेटी नाहितर बिअर च्या कॅन सुद्धा रहायच्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Mar 2016 - 8:45 pm | llपुण्याचे पेशवेll

एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे,
हे ही एक ग्रोस जनरलायझेशन आहे आणि अर्थात ती तुमची विचारधारा असल्याने ती तुम्हाला समर्थनीय आहे हे मला मान्य आहे. :)

स्वामी संकेतानंद's picture

3 Mar 2016 - 8:51 pm | स्वामी संकेतानंद

नाही, माझ्या विचारांचे आहे, इतरांच्या नाही. विचारांचे अधिष्ठान प्रत्येकच विचारधारेला असते, नाहीतर ती विचारधारा कशी? मला म्हणयाचे होते की मी विचारपूर्वक तसे ठरवले आहे. ह्यात generalisation नाही. जर कोणी सेन्टर ला असणे म्हणजे कातडीबचावू धोरण म्हणेल तर मला त्याच्याही विचारांचा आदर करायला पाहिजे.

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 9:09 pm | सतिश गावडे

भारतामाजी डावे उजवे :)

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी

स्वाम्या यकदम चतुरस्त्र माणुस हाये :-) .

हे लेखन लैच भावलं. आतिवास यांचा एक वाक्याचा प्रतिसाद अन राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद पटला.

आजकाल कुणी स्वतंत्र विचारांचा असु शकतो हेच मान्य केलं जात नाही. जर आपल्याशी विचार जुळत नसतील तर तो आपल्याला न पटणार्‍या विचारसरणीचाच असणार हे गृहितक वापरलं जातं.

हुप्प्या's picture

3 Mar 2016 - 9:47 pm | हुप्प्या

तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.

भारतात डाव्या विचारांना प्रबळ करणारे नेहरु. बाकी काँग्रेसचे आघाडीचे नेते गांधी, पटेल, आझाद वगैरे इतके डाव्या विचारांनी प्रभावित नव्हते. बोस होते पण त्यांना नेहरू व गांधींनी पक्षातून हद्दपार केले होते. त्या सुमारास डावा विचार हा अत्यंत फॅशनेबल होता. नेहरू अशा उथळ प्रकाराला बळी पडले नसते तरच नवल! विशेष म्हणजे मोतीलाल नेहरूंना समाजवाद, साम्यवाद हा साफ नामंजूर होता. असे म्हणतात की दोघे बापलेक रशियाला गेले होते. तिथले साम्यवादी साम्राज्य पाहून धाकले नेहरू (अर्थातच) हुरळून गेले पण मोतीलाल नेहरूंना त्याचे आजिबात कौतुक वाटले नाही. असली सोंगे फार वेळ टिकणार नाहीत असे त्यांचे मत पडले.
सगळे उद्योग सरकार चालवणार आणि गोरगरीबांचे भले करणार. श्रीमंत लोक म्हणजे दुष्ट, स्वार्थी, लबाड. खाजगी उद्योग म्हणजे समाजाला लागलेली कीड. हा अस्सल डावा विचार. ह्यातूनच सार्वजनिक उद्योग निर्माण झाले. पंचतारांकित हॉटेले असोत की पोलादाचे कारखाने सगळे काही सरकारच्या मालकीचे. बँका, टेलिफोन, विमा हे सगळेही सरकारी. हा प्रयोग ५० पेक्षा जास्त चालवून आपण बघितले की सरकार उद्योजक झाल्यास ना उद्योगाचे भले होते ना सामान्यांचे. उच्चपदस्थ लोक आपले उखळ पांढरे करुन घेतात आणि बाकी सगळे कफल्लक होतात. अशा उद्योगात काम करणारे हळूहळू कामचुकार होतात आणि मग युनियनबाजी, वशिलेबाजी, भ्रष्टाचार फोफावतो. पश्चिम बंगालमधे अनेक वर्षे साम्यवाद होता. तिथल्या उद्योगधंद्यांची स्थिती काय आहे? माझ्या मते अत्यंत वाईट आहे.

डाव्या विचारांचे असे भव्यदिव्य स्वप्न पाहणार्‍या नेहरूंमुळे तसा विचार करणारे बुद्धीवादी, पत्रकार, विचारवंत फोफावले. आज सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी त्यांची स्थिती आहे. आपले विचार अमलात आणून काही हितकारी, कल्याणकारी राज्य बनवण्याचे डाव्यांचे दावे पोकळ होते असा आजवरचा इतिहास सांगतो त्यामुळे निव्वळ आक्रमक विचार मांडणे हाच पर्याय उरतो.

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 10:59 am | गॅरी ट्रुमन

तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.

म्हणजे मी विशीत असताना अत्यंत असंवेदनाशील होतो. अजून चाळीशी गाठलेली नाही. पण त्यावेळी मला मात्र मेंदू नक्कीच असेल याविषयी अजिबात शंका वाटत नाही. :)

सुमीत भातखंडे's picture

4 Mar 2016 - 2:17 pm | सुमीत भातखंडे

सहमत.

(सेंटर राईट)सुमीत भातखंडे

बाळ सप्रे's picture

4 Mar 2016 - 12:09 pm | बाळ सप्रे

तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.

माझा अनुभव याच्या एकदम उलटा आहे..

जेव्हा डावे आपल्याला उजवे समजतात आणि त्याच वेळी उजवे मात्र आपल्याला डावे समजतात - अशा वेळी आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात येते.

पटले!
संयमित संतुलित लेख. आवडला.

अमाले फक्त लारा न तेंडुलकर ठावे

मेकेन्रो आणि बोर्ग

अमिताभ आणि शत्रूघ्न सिंन्हा (बाँबे टु गोवा)

सर गॅरी सोबर्स आणि डेनिस लिली

असे बरेचजण आहेत.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 11:09 am | बोका-ए-आझम

आमनेसामने आले होते?

मुक्त विहारि's picture

5 Mar 2016 - 8:39 am | मुक्त विहारि

आमने-सामने आले असतील किंवा नसतील...

एकदा कोण डावे आणि कोण उजवे? हे नक्की झाले की, डाव्या-उजव्यांची आपापसात, तुलना करून टाकायची, असा आमचा स्वभाव.

आमच्या काळात फेडरर आणि नदाल :)

पण आपली विचारसरणी हीच काय ती अंतिम आणि दुसरी विचारसरणी ही कःपदार्थ अशी धारणा चुकीची आहे. जगात जेव्हा अर्थशास्त्राचा उदय झाला तेव्हापासून उजवा विचार होता. पुढे समाजवाद्यांना त्यातल्या त्रुटी आणि त्यांचा शोषणासाठी होणारा वापर जाणवला. त्यातून डावा विचार उदयाला आला. म्हणजे दोन्हीही विचार हे माणसांनी केलेले आहेत. त्यामुळे दोन्हीही perfect असणं अशक्य आहे. पण हे दोन्हीही विचारसरणींवर टोकाचा विश्वास ठेवणारे मान्य करत नाहीत. आणि ही अशी rigidity उजव्यांपेक्षा डाव्यांमध्ये जास्त आढळते असा अनुभव आहे. Rigid उजवेही आहेत, नाही असं नाही पण त्यांचं प्रमाण डाव्यांच्या तुलनेत कमी आहे. १९९१ नंतर या देशात आर्थिक सुधारणा सुरु झाल्या. त्या काँग्रेसने आणल्यामुळे त्यांचं देशात स्वागत झालं असं माझं आधीही मत होतं आणि आत्ताही आहे. तेव्हा भाजप उदारीकरणाच्या विरोधात आणि उदारीकरणाला IMF Sellout वगैरे शब्द वापरणारा आणि स्वदेशीचा पुरस्कार करणारा पक्ष होता. नंतर सत्तेवर आल्यावर (१९९९-२००४) भाजपची आर्थिक धोरणं वेगळी होती. निर्गुंतवणूक; आर्थिक शिथिलीकरण; आयुर्विमा, दूरसंचार, वीजपुरवठा यासारख्या अनेक क्षेत्रांत खाजगी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. २००४ मध्ये जेव्हा हे सरकार बदललं तेव्हा आलेल्या युपीए सरकारला प्रथम डाव्या पक्षांचा पाठिंबा होता आणि या डाव्या पक्षांनी अमेरिकेबरोबर होऊ घातलेला अणुकरार होऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न केले. पण त्याचं कारण काय होतं? त्यांना आपण तसाच करार चीनबरोबर केला असता तर काहीही फरक पडत नव्हता. पण ते अमेरिकेचं नावही ऐकायला तयार नव्हते. ही ideological rigidity डाव्यांमध्ये जास्त दिसून येते. २००४ मध्ये डाव्यांना लोकसभेत ६१ जागा मिळाल्या होत्या. सरकारच्या अनेक धोरणांवर त्यांचा प्रभाव होता. पण सरकारचा पाठिंबा काढून त्यांनी एक मोठी संधी गमावली - ideological rigidity मुळे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रत्यक्ष व्यवहारात उजवे, डावे, मध्यमार्गी, वगैरे वगैरे फक्त बोलबच्चन लेबले आहेत, माणसे बहुदा "यात मला काय मिळणार ?" या प्रश्नाचे फायदेशीर / सोईचे उत्तर ज्या बाजूने आहे त्या बाजूने बोलतात... आणि असा फायदा-तोटा न बघता बोलणार्‍यांची दोन्ही बाजूचे लोक, स्वतःची सोय पाहून, भलावण करतात अथवा त्यांच्यावर तुटून पडतात.

स्वार्थ आणि भिती यावर केवळ समभाग बाजारच नाही तर बहुतेक सर्व मानवांच्या कृती चालतात.

अर्धवटराव's picture

4 Mar 2016 - 12:59 am | अर्धवटराव

+१११

एखाद्या विचारधारेत समाजाच्या तत्कालीन आणि सर्वकालीन समस्या सोडवण्याचं पोटेन्शीअल किती हाच क्रायटेरीया महत्वाचा आहे. धर्म/भांडवलशाही या मानवनिर्मीत व्यवस्था असल्यामुळे त्यात मानवी गुणदोष असणाअरच. त्यातल्या दोषांवर डाव्यांचा विशेष रोश असतो. पण त्याचवेळी साम्यवाद देखील मानवनिर्मीत व्यवस्था आहे व त्यात गुणदोषांचा तेव्हढाच स्कोप आहे हे डाव्यांना मान्यच नसतं. पोथीनिष्ठेबाबत सगळ्या विचारसरणी एकसारख्याच तीव्र असतात... अगदी 'आम' नव-विचारवादी सुद्धा.

लेखात जे डावे/उजवे मंडळं दाखवली आहेत ति तत्वतः डावे किंवा उजवे नाहित. डावी विचारसरणी ज्या परिस्थीतीत उगम पावली व फोफावली तशी परिस्थीती आज अस्तित्वात नाहि. त्यामुळे सद्यःच्या डाव्या विचारांच्या गाभ्यातच पोकळी आहे. उजवे देखील फार वेगळे नाहित. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आयतं मिळालं असल्यामुळे (त्यात काहि प्रॉब्लेम नाहि), व्यक्तीस्वातंत्र्याला समष्टीशी जोडण्याचं तंत्र अजुन डेव्हलप करता आलेलं नाहि. त्यामुळे डावे जसं एका केंद्रीय व्यवस्थेवर अवलंबुन असतात तसच उजवेदेखील.

आधुनीक काळाने माणसाला जे बळ दिलं आहे त्याचा वापर करणारी विचारधारा सर्वोत्तम आहे, म्हणुनच लोकशाही इज बेस्ट.

जयंत कुलकर्णी's picture

4 Mar 2016 - 9:13 am | जयंत कुलकर्णी

भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो. त्यावेळी बिअर पीत असेल तर मग त्याला खूपच चेव चढतो..(अर्थात काही जण बंदुक हातात घेतातही..नाही असे नाही.) नोकरीला लागल्यावर, हाताखाली माणसे आल्यावर, कामगार संघटनांशी, सरकारी नोकरांशी संबंध आल्यावर तो डावा किनारा सोडू लागतो. यावेळी त्याचा उजव्या किनार्‍याच्या दिशेने प्रवास सुरु होतो असे समजण्यास हरकत नाही. हळू हळू संसारात पडल्यावर तो उजव्या किनार्‍याजवळ येऊ लागतो व शेवटी त्यावर पाय ठेवतो.... ही प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक आहे. तारुण्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची खुमखुमी असते, तोच नंतर असहाय्य होतो व शेवटी परिस्थितीशी जुळवून घेतो....त्यात स्वतःचा फायदा बघतो.. असा तो प्रवास आहे....या प्रवासात मधे बरेच टप्पे आहेत ते लिहिण्यास प्रतिक्रियेची जागा कमी पडेल....

//तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे/////
वर श्री. हुप्प्या यांनी म्हटलेले मला वाटते अगदी बरोबर आहे...

भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो.

बालशाखेपासून संघात जाणारे सुद्धा? ;)

बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्‍यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते.

(हलके घ्यावे. सरसकटीकरण वाटते आहे म्हणून असा प्रतिसाद दिला आहे)

डावी विचारसरणी म्हणजे केवळ कम्युनिस्ट विचार किंवा डाव्या पक्षाचे काम नव्हे..
सर्वांना समान संपत्ती वाटप असावे, कोणी उच्च नीच नसावा वगैरे स्वप्नाळू विचार त्या वयात असतात.. अपवाद असतात, नाही असे नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे तरूण वयात तुम्ही डावे नसाल तर तुम्हाला हृदय नाही.
एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल.

आनन्दा's picture

4 Mar 2016 - 11:30 am | आनन्दा

विशीत तुम्ही पैसा म्हणजे सबकुछ नव्हे असा विचार करता.. खिशात पैसा नसतो, पण छातीत धमक असते, मनगटात ताकद असते, काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी असते..
चाळेशीत खिशात पैसा असतो, ह्रुदयात असंख्य टेंशन असतात, मनगटातला जोर हळूहळू उतरायला लागलेला असतो, आणि मुख्य म्हणजे मी काहीही करू शकत नाही, हे आहे हे असेच चालणार ही भावना हळूहळू जोर धरायला असते.

एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल.

सहमत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)

पैसा's picture

4 Mar 2016 - 12:03 pm | पैसा

चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे?

गणामास्तर's picture

4 Mar 2016 - 12:20 pm | गणामास्तर

विचारवंत.

चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे?

ह्म्म.. विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

माझ्यामते चाळीशीमध्ये डावे राहणार्‍यांमध्ये तीन प्रकार असतात.

एक डाव्या चळवळीमध्ये आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य घालवल्याने (नाईलाजाने) डावे राहिलेले लोक. विचार बदलणे म्हणजे चळवळीशी प्रतारणा किंवा आत्तापर्यंत घेतलेली भुमिका कशी बदलायची असे विचार असलेले "गोंधळलेले" लोक्स.

दुसरे म्हणजे कोणताही एक विशिष्ट विचार किंवा चळवळ किंवा भुमिका यांच्याशी एकनिष्ठ न राहता केवळ प्रसिद्धीसाठी डावे राहिल्याचा ढोल पिटणारे लोक्स. "प्रसिद्धीलोलूप"
यातलेच काही लोक्स उजव्यांचा तिरस्कार करणारे म्हणून "डावे" असेही असतात.

राहिलेले खरेखुरे डावे लोक. त्यांना बरेच काही बदलायचे असते परंतु फारसा पाठिंबा नसतो आणि जो पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्याचा 'बदल घडविण्यासाठी' फारसा उपयोग नसतो. त्यामुळे हे लोक नेहमी सत्ताधार्‍यांवर चिडलेले असतात. श्रीमंतीचा घाऊक तिरस्कार करतात. पोकळ आंदोलने वगैरे करतात आणि अशी आंदोलने करूनच आपण "सत्याचा आवाज बुलंद ठेवत आहोत" अशा भ्रमामध्ये जगतात.

प्रत्यक्षात असेच आहे का?

बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्‍यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते.

२०१४ मध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर एक फोटो फॉरवर्ड आला होता. चे गव्हेराचे टी-शर्ट घालून काही मंडळी नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये आली होती. आता बोला. बहुदा चे गव्हेरा म्हणजे रॅम्बो किंवा तत्सम कोणी वाटला असावा त्यांना :)

जयंत कुलकर्णी's picture

4 Mar 2016 - 12:11 pm | जयंत कुलकर्णी

चे गवेरावर लिहिले तर तो आजच्या घडीला गुन्हा ठरेल काय? काय वाटते ? मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्‍यापैकी प्रभावाखाली असायचो..

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 12:29 pm | गॅरी ट्रुमन

चे गवेरावर लिहिले तर तो आजच्या घडीला गुन्हा ठरेल काय? काय वाटते ?

गुन्हा का ठरावा?चे गव्हेरा तर भारतातही आला होता.आणि पंडित नेहरूंनी त्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रितही केले होते.भारताचे पंतप्रधान एखाद्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रित करत असतील तर त्या माणसाविषयी लिहिणे हा गुन्हा ठरू नये.मला स्वतःला ती मते पटत नसली तरी त्याच्यावर लिहिणे हा गुन्हा ठरावा असे मला तरी वाटत नाही.

Che

मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्‍यापैकी प्रभावाखाली असायचो..

म्हणजे तुम्ही आता प्रभावाखाली नाही आहात. मग तर तुम्ही लिहायलाच हवे. विचार बदलण्याचे नक्की काय कारण, प्रभावातून बाहेर का आलात? एकंदर स्थित्यंतर कसे झाले वगैरे वगैरे.

नक्की लिहाच.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 2:08 pm | बोका-ए-आझम

मराठीत अरुण साधूंचं ' फिडेल, चे आणि क्रांती ' आणि ' क्रांतीनंतरचा क्यूबा ' ही दोन पुस्तकं सोडली तर चेवर कोणीच लिहिलेलं नाहीये (बहुतेक). साधू डावे असल्यामुळे त्यांनी ते त्या बाजूने लिहिलंय. तुमचं लिखाण दुसरी बाजू दाखवून देईल. वाट बघतोय.

विकास's picture

5 Mar 2016 - 2:42 am | विकास

"क्रांतीनंतरचा क्युबा" हे माधवराव गडकर्‍यांनी लिहीलेले पुस्तक होते. माधवरावांना डावे म्हणणे कदाचीत अवघड जाईल पण ते उजवे म्हणजे भाजपा/संघाच्या बाजूचे पण नव्हते.

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 8:17 am | बोका-ए-आझम

गडकरींनी लिहिलेलं पुस्तक आहे. साॅरी. तेही चुकून अरुण साधूंच्या नावावर गेलं.

भंकस बाबा's picture

5 Mar 2016 - 9:45 am | भंकस बाबा

वारा पाहुन् शीड बदलणार , तरी गड़कर्याचे लेख थोडेफार कोंग्रेस धार्जिनेच असायचे.

गणामास्तर's picture

4 Mar 2016 - 9:24 am | गणामास्तर

मला एक साधा प्रश्न पडलाय, आजपर्यंत मी 'उजवा विचारवंत, असा प्रकार ऐकला वा पहिला नाहीये.
हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ? का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे
असे काही आहे ?

वैयक्तिक मत : कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे ;)

हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ?

जशी सेक्युलर मंडळी शांतताप्रिय धर्माची सतत पाठराखण करतात तसेच काहीसे प्रकरण आहे.

का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ?

अर्थातच. प्रवाहाच्या विरोधी लिहून, बोलून प्रकाशझोतात राहिले की हा शिक्का मिळतो. त्यानंतर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यापासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांच्या ह्युमन राईट्सची आठवण येते. गांधी विथ गन्स वगैरे वगैर..

कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे

असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.
मात्र प्राण गमावलेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारधारेची आहे त्यावर आवाज उठण्याची तीव्रता अवलंबून असल्याने आवाज ऐकू येण्याचे प्रमाणही बदलते.

अगम्य's picture

4 Mar 2016 - 10:51 am | अगम्य

शंकानिरसक प्रतिसाद

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 10:57 am | गॅरी ट्रुमन

असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.

पण मोठा फरक म्हणजे तो विचार अंमलात आणायची शक्यता डाव्यांच्या बाबतीत खूप जास्त असते. आठवा गुलाल.... आज भारतातही सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये राजकीय हिंसाचार (पोलिटिकल व्हॉयोलन्स) सर्वात जास्त आहे त्याचे कारण सूज्ञांस सांगणे न लागे.

सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाही. हा विचार मुळातच मानवी स्वभावाच्या विरूध्द असल्यामुळे तो एन्फोर्स करण्यासाठी बळाच्या पोलादी पंज्याचाच वापर करावा लागतो यातच सगळे काही आले.

(कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन

सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाही

सगळ्या जगाने कोणता विचार नाकारलाय नक्की?? आपण आर्थिक कम्युनिस्ट विचारांबद्दल बोलत असाल तर डावे विचार म्हणजे फक्त आर्थिक विचार नव्हे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत. आणि अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे. अगदी अमेरिकेत सुध्दा १०० टक्के मुक्त बाजारपेठ नाही. तिथेसुध्दा कल्याणकारी राज्याच्या अनेक योजना आहेत. भारतासकट अनेक देशांमध्ये असलेली श्रीमंतांवर कर आणि गरीबांना सबसिडी हेदेखील कम्युनिझमच आहे.

रच्याकने आजच्या भारतातल्या राजकीय डाव्या पक्षांकडे बघुन पुर्ण डाव्या विचारसरणीबद्द्ल मत बनवणे म्हणजे शिवसेनेकडे बघुन शिवाजी महाराजांबद्दल मत बनवण्यासारखे आहे.

(भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 4:01 pm | नाना स्कॉच

शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब मुजरा घ्या _____/\_____

आनन्दा's picture

4 Mar 2016 - 5:28 pm | आनन्दा

हाणुमोदन.

नाव आडनाव's picture

4 Mar 2016 - 5:39 pm | नाव आडनाव

+१ जोरदार वाक्य आहे. अर्ध राज्य बक्षीस तुम्हाला !

बाळ सप्रे's picture

4 Mar 2016 - 4:11 pm | बाळ सप्रे

++ सहमत

हे डावं उजवं करत राहिलं की संतुलन ढळतच. म्हणूनच सरसकटीकरण टाळावं.

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 4:13 pm | गॅरी ट्रुमन

आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत.

हा हा हा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि डावे? मग डाव्या देशांमध्ये गुलागवगैरे का होते हो? डाव्यांना पटेल ते बोलले तरच अभिव्यक्तीस्वातंत्र्य.नाहीतर कुठले अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कुठली समता आणि कुठचे काय.

अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे.

तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर शिवसेनेकडे बघून शिवाजी महाराजांविषयी मत बनविल्यामुळे कॅपिटॅलिझम वाईट असे चित्र उभे राहते. पण मुळातली कॅपिटॅलिझमची तत्वे गंडलेली नाहीत. मुळात समता ही बाहेरून थोपता येत नसल्यामुळे त्या थोपविण्यावर आधारीत असलेली कुठलेही प्रणाली मुळातच गंडलेली आहे.त्यामुळे हे विचार गंडलेले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.

(भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)

हो. एनी प्रॉब्लेम? भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.

भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.

चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 4:32 pm | गॅरी ट्रुमन

चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!

दगडापेक्षा वीट मऊ वगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्या असाव्यात ही अपेक्षा. आणि ऐकल्या नसतील तरी कम्युनिस्टांच्या राज्यापेक्षा मला ब्रिटिश राज्य परवडले असते या मतात मला कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज वाटत नाही.

बाळ सप्रे's picture

4 Mar 2016 - 4:39 pm | बाळ सप्रे

_/\_

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 5:42 pm | नाना स्कॉच

अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन ह्यांचे राजकीय पृथक्करण वाचायला मला नेहमी आवडे वाचनमात्र होतो तेव्हापासुन पण त्यांचा डावा द्वेष् किती आत्यंतिक आहे हे आज पाहिले, माझ्यालेखी गॅरी ह्यांनी ऑब्जेक्टिविटी गमवली आहे (कधी होती तरी का? हा कळीचा प्रश्न आहे ते एक असो), राजकीय पृथक्करण करताना नीरक्षीर असणे गरजेचे, ते करणाऱ्या मंडळी ने स्थितप्रज्ञपणे कोष्टके अन आकड़े मांडावे, जनतेला निर्णय घेऊ द्यावा, असे कायम वाटते, पण गॅरी साहेब ह्यांनी सपशेल भ्रमनिरास होईल असे वाक्य वर लिहिले आहे, माफ़ करा पण आजपासुन तुमचे पृथक्करण हे फ़क्त अन फ़क्त प्रचारकी लेखन म्हणून मी तरी गणेल, अर्थात आपला अभ्यास उदंड आहे आपले श्रोते/वाचक उदंड आहेत ते तसेच रहावे ह्या शुभेच्छा , तसे पाहता माझे अश्या निषेध करण्यामुळे गॅरी ह्यांच्यासारख्या अभ्यासु लेखकाला शष्प फरक पडणार नाहीच हे मला व्यवस्थित माहीती आहे. फ़क्त एकेकाळी मी मिपावर येण्यासाठी ज्या काही आयडीचे लिखाण पेडेस्टल वर ठेवत असे त्यात एक गॅरी होते म्हणून वाईट वाटले, एक विलक्षण प्रतिभावान अन डेटा ने परिपूर्ण असलेला आयडी आमच्या (नॉट सो इम्पॉर्टेन्ट) नजरेतून उतरला हे मनःपूर्वक नमूद करावे वाटले म्हणून लिहितोय.

गॅरी साहेब, आपण ही कॉमेंट वैयक्तिक घेणार असलात तर मी तो माझाच बहुमान समजेल, किमान तुम्ही आमच्यासरख्या कीड़ामुंगी
आयडीची दखल घेतली असा आमचा समज होईल, दुर्लक्ष केल्यास आमचे दुर्दैव असेल ते.

आम्ही भगत, अटलजी, सावरकर, अन चंद्रशेखर आझाद ह्यांचा दुस्वास सहन करू शकत नाही (ही आमची पर्सनल अकलेची लिमिटेशन आहे असे समजा)

तेव्हा आजपासुन आम्ही गॅरी ह्यांचे राजकीय पृथक्करण त्यागतो आहोत

क्षमस्व

(कट्टर देशप्रेमी) नाना :)

गॅरी ट्रुमन's picture

4 Mar 2016 - 5:47 pm | गॅरी ट्रुमन

जशी आपली इच्छा.

(कट्टर देशप्रेमी) ट्रुमन

स्वामी संकेतानंद's picture

4 Mar 2016 - 5:50 pm | स्वामी संकेतानंद

इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी नाही का??

नाना स्कॉच's picture

4 Mar 2016 - 5:54 pm | नाना स्कॉच

तर्राट जोकर म्हणून एक आयडी आहे! (ऑल द बेस्ट)

देशप्रेम कट्टर झाले की विदेशी कशी चालेल???? देशीच हवी ना??