दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी श्री अत्रन्गि पाउस यांचा धागा आला,
“२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?”
मी स्वगत, क्या बात. मज्जा.
प्रतिसाद दिला, आमंत्रण दिल. सोबत प्राडॉ. यांच पण आमंत्रण होत. मी खुश. मग प्राडॉ. यांनी भ्रमणध्वनि वर मला आणि अत्रन्गि पाउस याना बोलून साधारण रूपरेषा ठरवली. संध्याकाळी अत्रन्गि पाउस यांच्या मोकळ्या वेळेनुसार भेटायचे आणि बीबी-का-मकबरा आणि पानचक्की ह्या दोन ठिकाणी जायचे असे ठरले.
होता होता कट्ट्याचा दिवस उजाडला. प्राडॉचा सन्देश आला की अत्रन्गि पाउस याना रात्रि थोडा उशीर होणार आहे. पण आपण तर सुरुवात करुया. स्वगत, वा असेही चालेल की.
प्राडॉ.नि दुपारीच एक सुखद धक्का दिला. सर दुपारीच भेटायला आमच्या दुकानावर आले. थोडा वेळ गप्पा झाल्या ओळख-पाळख झाली. त्या वेळी असे ठरले की संध्य्याकाळी साड़े सहा वाजता अत्रन्गि पाउस कामातून मोकळे होतील, त्यावेळेस भेटू. आणि काही कारणामुळे जर त्याना उशीर झाला तर आपल्याला भेटता येईल. आपण तर भेटूच. आणि आज जर मूड झालाच आहे तर मूड खराब न करता संध्याकाळ साजरी करू.
ठरल्या प्रमाणे प्राडॉचा संदेश आला. मीही काहिश्या उत्सुकतेने आणि काहीशी भीती मनात ठेउन निघालो. अत्रन्गि पाउस आलेले नव्हते. यायला वेळ लागेल असे कळवले होते. प्राडॉ म्हणाले आपण तर सुरुवात करुया.
दोघेही प्राडॉच्या गाडीतून निघालो, अग्रसेन चौकातील स्काय टच होटेल मध्ये पोहोचलो. जागा आवडली. जेवन सुद्धा एक नम्बर. वाह सरांची निवड मानली बुआ. प्राडॉशी बोलायला सुरुवात केल्यावर मनातील भीती एकदम निघून गेली. अरे प्राडॉचा स्वभाव तर एकदम मस्त आहे. क्या बात. जमल की. भरपूर विषयांवर मनमोकळया गप्पा झाल्या. जास्त करुण मिपा या विषयावरच गप्पा झाल्या. भरपूरश्या सदस्यांचे स्वभाव कसे आहेत. कोना कोणाला भेटायला कशी मजा येते. वाह, माझ्या समोर तर खजिनाच रीता होतोय.
मध्येच अत्रन्गि पाउस यांचा संदेश आला. त्याना काम संपवायला वेळ लागल्यामुळे आज येता आलेले नाही. यामूळे थोड मन खट्टू झाल. जौद्या, आपला कट्टा तर मस्त होतोय ना. मंद संगीत, होटल च्या गच्ची वर वाहणारा मंद वारा, मस्त जेवन आणि समोर प्राडॉ. मेहफिल तर मस्त जमली होती. प्राडॉच्या संगतीत दोन-अडिच तास कसे गेले कळालच नाही.
# प्राडॉना त्यांच्या पुतनीच्या वाढदिवासासाठी वापस गंगापुरला जायचे असल्या कारणाने कट्टा आवरता घेत वापस निघालो.
आजच्या कट्ट्याची फलनिष्पत्ती:-
एका प्रतिभा संपन्न आणि मस्त स्वभावाच्या व्यक्तिशी ओळख झाली.
कितीही आणि कसलेही काम असेल तरी दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे हे प्राडॉ कडून # शिकायला मिळाले.
एक संध्याकाळ सत्कारणी लागली.
मिपा परिवारात माझे स्वागत झाले.
आणि जाता जाता :- प्राडॉना एकदा मी व्यनी केला होता. त्याची आठवन प्राडॉनीच काढली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, माला वाटल की कुणी डू आयडी आहे की काय.
स्वगत, मी ? दु आयडी? ऐकून (हसून-हसून) ड्वाले पाणावले.
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 2:28 pm | नाखु
ट्वीस्ट नसल्याने जास्त आवडली
24 Feb 2016 - 2:32 pm | प्रचेतस
मस्त छोटेखानी वृत्तांत.
सरांबरोबर खूपदा भेटीगाठी झाल्यात. खूपदा भटकंतीही झाल्यात. धमाल माणूस आहे.
औरंगाबाद रॉक्स....!
24 Feb 2016 - 3:21 pm | गवि
अगदी अगदी.. इतके वयोवृद्ध असूनही आमच्यासारख्या नवतरुणांना समजून घेतात आणि मिळून मिसळून बरोबरीने वागवतात. आणि एकदा त्यांनी भेटण्याचा शब्द दिला म्हणजे दिला.. ऐनवेळी टांग कधीच देत नाहीत.
24 Feb 2016 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> इतके वयोवृद्ध असूनही
अगं आई ग ! एका देखण्या, चीरतरुण, उत्साही, आनंदी, हसमुख, हजरजवाबी, आणि आयुष्यात प्रेमात, मित्र मैत्रिणीत रमलेल्या प्राध्यापकाबद्दल असं मत वाचुन माझ्या छातीत कळच आली.
पुढच्या भेटीत टांग द्यावी लागते तुम्हाला. अशा प्रतिसादाने ज्यांनी मला पाहिलं नाही अशा तरुण मित्र मैत्रीणीपासून मी दूर जाण्याची शक्यता आहे, आपला प्रतिसाद वाचून आत्ताच एका मला न पाहिलेला मिपावाचक मैत्रीणीचा फोन आला म्हणाली ''मला अशा वयोवृद्ध लोकांना भेटण्यात इन्ट्रेष्ट नाही"
कुठे फेडाल हे सर्व गवि ! ;)
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतके वयोवृद्ध असूनही आमच्यासारख्या नवतरुणांना समजून घेतात...
गवि, गवि, गवि, एका बॉलवर दोन सिक्सर फाऊल समजल्या जातात =)) =)) =))
24 Feb 2016 - 6:19 pm | असंका
काय सुरेख!! जबरदस्त मजा केलेली दिसत आहे!!
24 Feb 2016 - 6:24 pm | पैसा
तुमचे प्रतिसाद किंवा खरडफ़ळ्यावर नमस्कार आतापर्यंत पाहिले होते. चांगलं लिहिताय की!
25 Feb 2016 - 3:46 pm | बाबा योगिराज
धन्यवाद, पै ताई.
24 Feb 2016 - 6:24 pm | बोका-ए-आझम
असल्यामुळे मी त्यांच्या फोनवर काॅल करुन प्राडाॅ आणि बाबा यांच्याशी बोलणार होतो. पण ते जमू न शकल्यामुळे हळहळल्या गेले आहे. बाकी इनो वगैरे आहेच! असो!परत बघू कधीतरी!
24 Feb 2016 - 6:56 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
24 Feb 2016 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वप्रथम बाबा छोटेखानी कट्टा वृत्तांत आवडला. आपण लिहिते झालात तो भेटी इतकाच आनंद आहे.मिपावर नवनवीन सदस्य येत राहावेत, लिहावेत ही माझी कायम इच्छा असते. चांगला वृत्तांत लिहिला. अभिनंदन. बाकी, माझं तुम्ही जरा जास्तच कौतुक केलं ब्वा. मला लॉगीन करायलाही संकोच होत होता. प्रतिभासंपन्न वगैरे जरा अतिच झालं पण दोन मित्र भेटल्यावर एकमेकांचं कौतुक होणारच, अब मेरी बारी.
मंडळी कट्टयाचा विषय निघाला दोघांचेही व्य.नि.ने नंबर मिळाले अगोदर अत्रिंग पाऊस यांचा फोन आला. फोनवर बोलणं झालं. छान गप्पा झाल्या. आणि आपण उद्या भेटूच असं ठरलं. खरं तर आमच्या गप्पा संपल्यानंतर मला का कोण जाणे पाऊस आणि आपली भेट होणार नाहीच असं का वाटत होतं कोणास ठाऊक. बाकी कट्ट्याच्या दिवशी मी आणि बाबा वाट्सॅपवर अधुन मधुन बोलतच होतो. दुपारी दोन वाजता अत्रिंग पाऊस यांना मी फोन केला आणि त्यांनी तो कट केला. आणि नंतर पुन्हा त्यांचा फोन आला की माझ्या मिटींग्ज असल्यामुळे सायंकाळी भेटू. मी बाबाला फोन करुन म्हटलं 'बाबा कसं करायचं ?' बाबा, म्हणाला 'तुम्ही म्हणाल तसं' पण मला चैनच पडेना. मग मी बाबाला भेटायला निघालो.
बाबाच्या दुकानाचा पत्ता विचारला आणि बाबाच्या दुकानासमोर हजर झालो. मोबाईलने बाबाच्या दुकानाचा फोटो घेतला.
बाबाच्या दुकानात गेल्यावर बाबाची भेट झाली. प्रथमच भेटत होतो तेव्हा एकमेकांची ओळख झाली. गप्पा झाल्या. अत्रिंग पाऊस सायंकाळी येत आहेत म्हटल्यावर आपण बीबीका मकबर्याला जाऊ तिथे काही खादाडू काही फोटो सेशन करु असा एक विचार आला पण आपण दोघांनीही ते अनेकदा पाहिलं आहे तेव्हा आम्ही दोघांनी त्या विचाराला फेकुन दिलं. मधेच बाबाला ग्राहकांशी बोलावं लागायचं.
बाबाचं दुकान मोठं आहे. महिलांचं दालन म्हटल्याने महिलांची ये जा सारखी चालू होती. बाबाच्या दुकानातील काम करणारी मुलं ग्राहकांशी देवाण-घेवाण करीत होती. बाबा माझ्याशी बोलत काउंटर सांभाळत बोलत होता. बाबाची आपल्यामुळे अडचण होऊ नये म्हणुन आणि धंदे के टाईम पे बाबाला कुठे घेऊन जावं हा विचार मला काही पटेना. मग बी बाबाला म्हटलं बाबा सायंकाळी भेटू या. असं म्हणुन मी बाबाचा निरोप घेतला.
[बाबा आणि मी]
आता काय करावं म्हणुन मग बेगमपुर्यात सासूरवाडीत गेलो सासूबैंची तब्येतीची चौकशी केली. मस्त झोप मारली. सायंकाळी एका मित्राची भेट घेतली मग जो उत्साह वाढला की विचारु नका, तो गेला आणि बाबाला फोन लावला. बाबाही सेवन हील उड्डान पुलाला बरोबर बोलल्याप्रमाणे दहाव्या मिनिटाला हजर झाला. नंतर स्काय टच या हॉटेलला गेलो गप्पा मारल्या. यकुची आठवण झाली. काही जुन्या मिपाकर औरंगाबादकरंचा विषय निघाला. खुप दिवसानंतर एखादा मित्र भेटावा त्याप्रमाणे आमच्या दोघांच्या खुप गप्पा रंगल्या मजा आली. बाबा स्वत: एमबीए झाला आहे. शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा मारणारा. भरभरुन बोलणारा. अगदी सहजपणा बोलण्यात होता. आपलं दुकान, भविष्यातील स्वप्न, भटकंती, असे कितीतरी विषय गप्पात मजा आली.
मी फिश खात नाही म्हटल्यावर एक फिश फ्राय सोडला तर बाबा माझ्याबरोबर व्हेज झाला. काजू मसाला आणि तंदुर सोबत काही सटरफटर खाऊन गप्पा मारता मारता नऊ वाजून गेले होते. अत्रिंग पाऊस यांचा दिलगिरी व्यक्त करणारा फोनही तेव्हाच येऊन गेला आम्ही दोघंही त्यांच्याशी निवांतपणे बोललो. बाकी, महिलांचं दालन म्हटल्यावर काही मिपाकर महिला इथे आपल्या दुकानात आल्या तर खरेदीत किती सुट देणार म्हटल्यावर १५ % सुट मिपाकर महिलांना देईन असं बाबा म्हणाला. असं म्हटल्यावर मग मी गप्पा आवरत्या घेतल्या. पुन्हा भेटायचं असं ठरवून आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मिपाच्या निमित्ताने एक नवा मित्र मला मिळाला. थ्यांक्स मिपा.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2016 - 7:43 pm | प्रचेतस
उपवृत्तांत मस्तच. मराठवाड्याची सिग्नेचर डिश फ़्राईड चना ह्यावेळी दिसली नाही.
आता बाबाला तिथे आल्यावर भेटणे आलेच.
25 Feb 2016 - 3:51 pm | बाबा योगिराज
प्रचेतसजी,
कधीही या. स्वागत आहे. आणि तुमची दर्पण सुंदरी बघायला आम्हाला पण शिकवा.
25 Feb 2016 - 3:54 pm | गवि
कुठे दगडधोंड्यात अन काट्याकुट्यात जाताय याच्या नादी लागून. आपण बसू निवांत सरांसोबत. हा येईल जाऊन. दर्पणसुंदरीने जेवण घातलंन करुन तर तिकडेच थांबेल.
25 Feb 2016 - 3:59 pm | बाबा योगिराज
ख्या ख्या ख्या.
25 Feb 2016 - 6:18 pm | प्रचेतस
:(
24 Feb 2016 - 7:59 pm | अत्रन्गि पाउस
पापक्षाल्नार्थ कै तरी करावेच लागणारे !!!
24 Feb 2016 - 8:31 pm | अभ्या..
टॅण्ण्ण्ण्ण्ण टॅण्यांग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग टॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण.
.
बाबांचे दुकान वावा
दुकानातले टीशर्ट वावा
सरांचा शर्ट वावा वावा (हितं मुझिक एक्कदम झँकीपँकी)
सरांचा गॉगल वावा
स्नॅक्सचे आयटेम वावा
औरंगावादचा कट्टा वावा
सारे जहांसे अच्छा सरसे दोस्ताना हमारा,
हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा.
इस्ट ऑर वेस्ट
मराठवाडा इज दि बेस्ट.
25 Feb 2016 - 9:23 am | नाखु
अभ्याची तर्री बेष्ट..
ओळ नं ३ साठी पार्श्वसंगीत सरसर सर
25 Feb 2016 - 3:49 pm | बाबा योगिराज
अरे कुणी सुतार बोलवा.
काळ पासून हरभऱ्याच्या झाडावर बसलोय. उतरता येत नाहीये. कै तरी करा.
25 Feb 2016 - 5:21 pm | अभ्या..
या बाबा आता खाली. त्या सुताराच्या पोरी आल्यात दुकानात.
भेटायचे म्हणताहेत. ;) झाड तुटेल.
29 Feb 2016 - 11:34 pm | सतिश गावडे
नुकताच अमेरिकन रीयुनियन हा अमेरिकन पाय सिरीजमधला लेटेस्ट चित्रपट हिंदीमध्ये डब केलेला पाहीला.
त्यात स्टीफलरच्या तोंडी सतत एक वाक्य असते, "मैं तो चला झँकीपँकी करने".
25 Feb 2016 - 3:57 pm | बाबा योगिराज
शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा मारणारा. भरभरुन बोलणारा. अगदी सहजपणा बोलण्यात होता. आपलं दुकान, भविष्यातील स्वप्न, भटकंती, असे कितीतरी विषय गप्पात मजा आली.
प्राडॉ, कशाला लाजवताय गरिबाला.
मिपाच्या निमित्ताने एक नवा मित्र मला मिळाला. थ्यांक्स मिपा
.मी पण हेच म्हणू इच्छितो.
24 Feb 2016 - 7:47 pm | यशोधरा
वृ आवडले.
24 Feb 2016 - 8:08 pm | उगा काहितरीच
वा छान वृत्तांत ! असे मनमोकळे, खेळीमेळीचे मिपा भारी वाटते बघा . रच्याकने कट्ट्याचे वृत्तांत वाचले की कट्टा करण्याची जोरदार इच्छा होते .
25 Feb 2016 - 5:15 pm | स्वाती दिनेश
वृत्तांत आणि उपवृत्तांत दोन्ही झकास!
स्वाती
25 Feb 2016 - 5:43 pm | एस
असेच म्हणतो!
25 Feb 2016 - 5:33 pm | पिलीयन रायडर
मस्तच कट्टा झाला की!!
एकदा औरंगाबादमध्ये मी नवर्याच्या आत्याकडे बसले होते. मी, नवरा, नवर्याचा आते भाऊ आणि त्याचा साडु असे गप्पा मरत होतो. साडु आणि मी पहिल्यांदाच भेटलो होतो. नवर्याचा आतेभाऊ उत्साहानी " आमचे साडु पण एकदम भारी लिहीतात बर का!!" असं सांगु लागला...
तर साडु म्हणे "छे हो.. लोक काय लिहीतात.. तुम्ही वाचायला पाहिजे.. मी तुम्हाला सांगतो.. मिसळपाव नावाची एक साईट आहे..."
"मिसळपाव?????????" मी एकदम उत्साहात..!!
"तुम्हाला मिसळपाव माहितीये??" साडु
समोर सासरची दहा माणसं.. मी दिवसभर इथेच पडीक असते आणि बराच दंगाही करते हे सांगावं की सांगु नये ह्या विचारात पडले..!!
पुढचा तासभर आम्ही पहिल्यांदा भेटलेली दोन माणसं "मिसळपाव" ह्या विषयावर बोलत होतो!!!
25 Feb 2016 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त !
-दिलीप बिरुटे
25 Feb 2016 - 5:44 pm | नीलमोहर
कट्ट्याला किती लोक ते महत्वाचे नाही, तर हजर लोकांत कट्टा यशस्वी करण्याचा अॅटिट्युड असणे गरजेचे हे सप्रमाण दाखवून दिलेत दोघांनी.
बाकी डिबी सर जसे इथे असतात तसेच प्रत्यक्षही दिसत आहेत, स्टायलिश, दिलदार, मनमिळावू, विनम्र :)
25 Feb 2016 - 5:47 pm | पिलीयन रायडर
आणि वयोवृद्ध!!
25 Feb 2016 - 5:47 pm | अभ्या..
अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी.
ते उजव्या बाजूचे. सफेद शर्टातले गॉगलवाले डीबी सर. ;)
25 Feb 2016 - 5:59 pm | नीलमोहर
उभे राहण्याची स्टाईल तर बघा आणि तो गॉगल... खलास !! त्यावरून तर ओळखलं ;)
25 Feb 2016 - 6:31 pm | चांदणे संदीप
=))
29 Feb 2016 - 11:35 pm | बाबा योगिराज
दुत्तं दुत्त अभ्या.
:-(
29 Feb 2016 - 3:43 pm | पद्मावति
मस्तं कट्टावृत्तांत. आवडला.
उपवृत्तांतही छानच.
29 Feb 2016 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी
एका दिलखुलास कट्ट्याचा दिलखुलास वृत्तांत अन उपवृत्तांत भावला.
बाबा योगिराज साहेब एकदम हॅपी गो लकी या गटात मोडणारे दिसतात.
सरांचा फोटो पाहून ते मराठी साहित्याचे प्राध्यापक कुठल्याच कोनातून वाटत नाहीत. टॉलिवूडचे हिरो वाटतात :-) .
1 Mar 2016 - 4:13 pm | चांदणे संदीप
+1111111111111111111111111111
+1111111111111111111111111111
(प्रतेक्ष भेटून खात्री पटलेला)
Sandy
1 Mar 2016 - 12:39 am | कंजूस
बाबा पेट्रोल पंप यांचाच?
1 Mar 2016 - 1:47 pm | बाबा योगिराज
बाबा पेट्रोल पंप यांचाच?
नाय बुवा.
:-)
1 Mar 2016 - 11:40 pm | काळा पहाड
बाबा वाईन शॉप?
2 Mar 2016 - 12:38 am | बाबा योगिराज
काय बोलता?
खर कि काय?
2 Mar 2016 - 1:00 am | श्रीरंग_जोशी
याच तर्काने बाबा इन्फोटेक, बाबा फर्टिलायझर्स, बाबा टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, बाबा एन्टरटेनमेंट, बाबा स्टुडियोज, बाबा हेल्थकेअर, बाबा होटेल्स अॅन्ड रिसॉर्ट्स, बाबा हर्बल अॅन्ड ब्युटी प्रॉडक्ट्स हे सर्वही योगिराज साहेबांचेच :-) .
3 Mar 2016 - 11:20 am | चांदणे संदीप
"बाबा मांडव"वाले राहिले!
3 Mar 2016 - 2:28 pm | बाबा योगिराज
योगी बाबा ट्यम्पो वाले.
;-)
3 Mar 2016 - 5:43 pm | गवि
पान मसाला?
3 Mar 2016 - 5:50 pm | अभ्या..
मेन १२० राह्यलं.
3 Mar 2016 - 9:07 pm | बाबा योगिराज
उरली सुरली, आन आमच्या आवडीची इलायची बी घ्या...
3 Mar 2016 - 9:38 pm | चांदणे संदीप
"The Proposal" मधली Paxton भाऊची दुकाने आठवली! ;)
3 Mar 2016 - 9:43 pm | सतिश गावडे
The Proposal कोणतं? व्हिजा संपल्याने कॅनडाला परत जावं लागू नये म्हणून बॉसिण आपल्या हाताखालच्या तरुणाशी लग्न ठरल्याचं खोटं खोटं सांगते तो का?
1 Mar 2016 - 4:53 pm | अजया
सरांचा वृ आवडला.
2 Mar 2016 - 1:13 am | खटपट्या
छान व्रुतांत. योगीराज, आपल्याला दुकानात येणारे बरे वाईट अनुभव वाचायला आवडतील. पुण्याएवढे तर्हेवाइक अनुभव नसतीलच पण तरीही वाचायला आवडतील.
3 Mar 2016 - 2:32 pm | नाखु
एका वाक्यात शतकाची बीजे रोवली आहेत.इतके सांगून मी योगीराजांची रजा(धाग्यावरून) घेतो .
पुणे १४ वाला नाखुस
3 Mar 2016 - 3:26 pm | बाबा योगिराज
अनुभव तर बरेच आहेत, लिहायचा नक्की प्रयत्न करेन.
2 Mar 2016 - 4:35 am | जुइ
वृत्तांत आणि उपवृत्तांत आवडले!
3 Mar 2016 - 2:41 pm | बॅटमॅन
वृत्तान्त अवडला!
3 Mar 2016 - 3:08 pm | सूड
चान चान!!
3 Mar 2016 - 7:25 pm | जव्हेरगंज
बाबाजी !
वा !!
3 Mar 2016 - 9:09 pm | बाबा योगिराज
____/\____
29 Sep 2016 - 12:18 pm | ज्याक ऑफ ऑल
बोलला नाहीस कधी !!
29 Sep 2016 - 4:01 pm | बाबा योगिराज
अरे, त्यावेळी मलाच माहित नव्हतं कि तू मिपावर आहेस.
31 Oct 2016 - 11:40 pm | वैभव पवार
Next time मी पण ! बरंका¡