|| बिर्याणीस्तोत्रम् ||

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
28 Feb 2016 - 2:16 pm

नमस्कार लोकहो,

मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो:

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

अथ ध्यानम्|

ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||

एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||

कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||

जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः|
सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4||

अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: |
शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5||

बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते |
विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6||

उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: |
तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7||

तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः|
सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8||

नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् |
यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9||

द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४]
चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10||

ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते |
खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11||

अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि |
स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12||

असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13||

||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||

टीपा:

[१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी.

[२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी)

[३] लखनौ.

[४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी.

=====================================================

मराठी भाषांतर

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1||

तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2||

कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3||

( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4||

त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5||

बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6||

मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7||

(तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8||

हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9||

द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10||

याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11||

जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12||

जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13||

===============================================

आरोग्यदायी पाककृतीइतिहास

प्रतिक्रिया

तिमा's picture

28 Feb 2016 - 2:29 pm | तिमा

साष्टांग नमस्कार. तो इंद्र धावत येणार आता वरुन!

प्रदीप साळुंखे's picture

28 Feb 2016 - 2:30 pm | प्रदीप साळुंखे

काय लिवलयं;-)

प्रचेतस's picture

28 Feb 2016 - 2:36 pm | प्रचेतस

क्या बात क्या बात....!!!

आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण द्या ना गडे.

सतिश गावडे's picture

28 Feb 2016 - 2:41 pm | सतिश गावडे

आम्हालाही. त्यासाठी आम्ही हैदराबादी हाऊसमधल्या चिकन/मटण बिर्यानीची गुरुदक्षिणाही द्यायला तयार आहोत.

बोका-ए-आझम's picture

28 Feb 2016 - 4:18 pm | बोका-ए-आझम

नागपुरी वडाभाताची शपथ आहे तुम्हाला!

नाखु's picture

29 Feb 2016 - 8:35 am | नाखु

द्याल न द्याल आम्ही एकलव्यासारखे (जुन्या) आप्ले चाहते आहेत आणि राहूही.

अतिअवांतर : लेखन उपास सोडल्याबद्दल सुजाता मस्ताने देणेत येईल ( फक्त चिंचव्डात)

अतिदुर्गम अवांतर : काय देऊ म्हटल्याने बॅट्या चिंचवड कट्ट्याला येईल.(मनोबा+अन्याचा वशीला लावावा काय?)

अभ्या..'s picture

28 Feb 2016 - 2:43 pm | अभ्या..

अगागागा
काय ती प्रतिभा, काय ते भाषाप्रभुत्व.
बट्टमणा दंडवत घे रे बाबा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 2:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर !

या निमित्त बट्टमण लिहिता झाला, याचा अत्यानंद झाला आहे !

आता एक बिर्यानी-कट्टा करायला पाहिजे !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Feb 2016 - 3:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठरवा. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 2:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

घ्या पुढाकार आणि त्याच्या आवडीच्या बिर्यानीहाउसमध्ये हौस पुरी करायला कट्ट्याचा धागा टाका.

रविवार निवडल्यास जास्त मिपाकर येतील असा अनुभव आहे :)

जेपी's picture

28 Feb 2016 - 2:57 pm | जेपी

मस्त आहे स्त्रोत्र

बॅटमॅन's picture

28 Feb 2016 - 3:03 pm | बॅटमॅन

सर्वांचे अनेक धन्यवाद!

डॉक- एका पायावर अन एका हातावर तयार हौत. बिर्याणी कट्टा झालाच पायजे.

प्रचेतस अन गावडे सर- अहो तुम्हांला कुठे स्थान देऊ, फ्यान तर आम्ही हाओत तुमचे.

प्रचेतस's picture

28 Feb 2016 - 4:19 pm | प्रचेतस

हा आपला विनय आहे.

बऱ्याच दिवसांनी दिसलात बँटभौ

एस's picture

28 Feb 2016 - 3:06 pm | एस

भूकनिवारकम् बिरियाणीम्स्तोत्रम् अतीव रुच्यते!
तस्य गीर्वाणभाष्येन कैच्याकै बोली: आमी प्रतिसाद लिवतसे! ;-)
तस्मात् आता भूक लागतसे.

_/\_

संजय पाटिल's picture

28 Feb 2016 - 3:34 pm | संजय पाटिल

व्वा.. काय भारी लिवलय.
मनात..(डोके खाजवनारि स्मायलि) आयला, काय समज्ले नै ब्वा..

ते (सु) संस्क्रूत लोकांसाठी आहे, तुम्हाला नाही कळणार...

अजया's picture

28 Feb 2016 - 4:14 pm | अजया

कं लिवलंय कं लिवलंय! _/\_
असंस्कृत लोकांना अर्थ कळु द्या की ;)

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2016 - 4:28 pm | नगरीनिरंजन

साधु! साधु!!
इति श्री बट्ट्मण्ण रचितं बिर्याणीस्तोत्रं पठित्वा जठराग्नी प्रदीप्तं!

आतिवास's picture

28 Feb 2016 - 4:31 pm | आतिवास

वा! मजा आली वाचताना.

स्वामी संकेतानंद's picture

28 Feb 2016 - 4:52 pm | स्वामी संकेतानंद

हे अफाट आहे!!

स्वाती दिनेश's picture

28 Feb 2016 - 6:00 pm | स्वाती दिनेश

सॉलिड लिहिलं आहेस रे बॅट्या..
स्वाती

पैसा's picture

28 Feb 2016 - 6:29 pm | पैसा

आईची कहाणी सांगताना मावशी आणि आजीला वेगळे काढता येत नाही. तसेच मराठीबद्दल बोलताना संस्कृत आले म्हणून काही बिघडत नाही. मराठी दिनाला संस्कृत पुष्प(च्छ)दिल्याबद्दल धन्यवाद! मस्त झालंय स्तोत्र!

नूतन सावंत's picture

28 Feb 2016 - 7:31 pm | नूतन सावंत

भो बट्टमणा,नमस्कारम् करोमि.

पद्मावति's picture

29 Feb 2016 - 1:01 am | पद्मावति

अरे वाह, मस्तं!

बिर्याणी स्तोत्र झाले,मिसळ आणि वड्याच्या प्रतिक्षेत.

मित्रहो's picture

29 Feb 2016 - 7:31 am | मित्रहो

आम्ही संस्कृत फक्त पाठच केल्यामुळे अर्थ कळला नाही.

प्रीत-मोहर's picture

29 Feb 2016 - 7:37 am | प्रीत-मोहर

__/\___

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Feb 2016 - 7:52 am | कैलासवासी सोन्याबापु

"काहीही झाले तरी मी सामिष भोजन सोडणार नाही" म्हणणारे याज्ञवल्क्यमुनी आठवले अंमळ :D

अवांतर :- आम्हास संस्कृतात गती नसते म्हणे जमेल तसे अर्थ पोचला (अथर्वशीर्ष समजते तितपत) जमल्यास एक अनुवाद मराठीत करा बिर्याणीस्तोत्राचा आपल्या सोई ने!

(गोत्र चिकन बिर्याणी) बाप्या

सुनील's picture

29 Feb 2016 - 8:29 am | सुनील

फर्मास!!

द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:|

पैकी द्राविडी वगळता अन्य बिरियाणी चाखून पाहिल्या आहेत.

अतिअवांतर - काहीही म्हणा, पण त्या निकम वकिलांच्या "खयाली बिर्याणी"ची सर बाकी कश्शालाच नाही!!

अन्या दातार's picture

29 Feb 2016 - 10:40 am | अन्या दातार

अतिअतिअवांतर - निकम सरांनी नसलेल्या बिर्याणीचा पुरावा कोर्टात सादर केला यावरुनच ते किती पोचलेले वकिल आहेत हे दिसले नाही का? =))

खयाली बिर्याणीबद्दल तहे दिलसे सहमत!!!!!!

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 11:04 am | बॅटमॅन

अनेक धन्यवाद लोक्स. अता या स्तोत्राचे भाषांतर करून संपादक मंडळींना ते धाग्यातच अ‍ॅडवायला सांगतो.

चांदणे संदीप's picture

29 Feb 2016 - 11:45 am | चांदणे संदीप

गरीबांची सोय लावल्यामुळे आपले जाहीर आभार मानून मी आपले दोन शब्द वगैरे....

Sandy

मन१'s picture

29 Feb 2016 - 11:41 am | मन१

कोंबडी जाते जिवानिशी आणि खाणारं म्हणतय वृत्तात बसवायचय. :)
आख्ख्या धाग्याला "प्रणम्यं शिरसा देवम् गौरी पुत्रम् विनायकम्" श्लोकाची चाल्/वृत्त चपखल बसतय.
अख्खं संस्कृतात ???
( संस्कृत समजत नै. ते व्याकरण सांभाळून व्रुत्तात बसवलं असशील तर महान आहेस.)

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 11:47 am | बॅटमॅन

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1||

तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2||

कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3||

( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4||

त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5||

बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6||

मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7||

(तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8||

हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9||

द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10||

याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11||

जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12||

जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13||

अभ्या..'s picture

29 Feb 2016 - 11:54 am | अभ्या..

अहाहाहाहाहा.
हा काळा भातही आवडला. ;)

नाखु's picture

29 Feb 2016 - 12:02 pm | नाखु

चित्रांनी पाककृती आण्खी फर्मास वाटते तसे अगदी या भाषांतराने केलेय.

बॅट्या मस्तानीचे पक्के आहे आणि अभ्याला पण (सोलापुराच्या बाहेर १०० किमी गेला की पोलींसाना खबर पोचते का काञ अभ्या बाबत असे वाटून राहीलेय मला)

अर्था कळाल्याने जास्ती बिर्याणीग्रस्त नाखु

चला तर मग भागानगर भवनात? मौजे हिंजवडी इथे आहे असे गावडे सरांकडून कळाले.

काळा भात, म्म्म! च्यायला भात हाच इतका जब्राट पदार्थ आहे की काय वदावे त्याजपुढे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Feb 2016 - 12:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

जियो!!!!

एकदा मुर्शिदाबादी मीन बिरयानी वर आपल्याशी चर्चा करावी म्हणतो :D

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 12:09 pm | बॅटमॅन

बिर्याणीत कुक्कुट किंवा मेषादिंचे मांसच अतीव रुचकर लागते अशी आमची तूर्त समजूत आहे. त्यामुळे परमेश्वराचा प्रथमावतार त्यासोबत कसा लागेल याची अंमळ शंका वाटते आहे. तरी एकदा खाऊन बघण्यात येईल!!!!!

नगरीनिरंजन's picture

29 Feb 2016 - 6:29 pm | नगरीनिरंजन

अजशावकबिर्याणी विशेष रुचकर लागते असा अनुभव आणि मत आहे.

आम्ही कुक्कुटबिर्याणीचे विशेष फ्यान हाओत. अजशावकबिर्याणी उत्तम करणे सगळ्यांना जमतेच असे नाही, तुलनेने कुक्कुट प्रोसेसावयास सोप.

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:38 pm | प्रचेतस

अजशावक ज़रा वातड लागतं असं हल्लीच कुणी यानात सांगत होतं. :)

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 6:41 pm | बॅटमॅन

कुठल्या अंतराळयानात का ;)

लुसलुशीत अजशावक करणे येरागबाळाचे काम नोहे. आजवर खाल्लेल्यापैकी क्वचितच कुठेशीक नॉनवातड होते. एक सणसणीत अपवाद म्हणजे वडकी गावात जत्रेचे आमन्त्रण होते तिथे मेंढी कापलेली पाव्हण्यांसाठी. फक्त दोन डिशेस. एक म्हणजे मटण करी अन एक ड्राय मटन- फक्त तेल-मीठ लावून फ्राय केलेले. आणि सोबत भाकर्‍यांची चळत. अन सोबत आग्रह करू करू वाढणारे यजमान लोक्स. अगागागागा, काय वडलो मटन तेच्यायला.....लैच खाल्लो. तेवढं मटन किंवा चिकन कधी एका वेळेस खाल्लं असेलसं वाटत नाही.

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:45 pm | प्रचेतस

खी खी खी.
बाकी आम्ही घासफ़ूसवाल्यांनी मागच्या अठवड्यात एका ठिकाणी (यानात नव्हे) पनीर खाल्ले ते पण भलतेच वातड होते.

त्यामुळेच चांगल्या पंजाबी जेवणाचा एक निकष म्हणजे नॉनवातड पनीर असाही आहे!

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:49 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
अता पनीरबिर्याणी खाणे आले.

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 6:52 pm | बॅटमॅन

पनीर बिर्याणी ळॉळ =)) व्हेज बिर्याणीमध्ये अजून बरेच चांगले ऑप्शन्स असावेत की बे.

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:53 pm | प्रचेतस

व्हेज मधे मिळून मिळून काय ऑप्शन मिळणार तरी तळलेला कांदा भरपूर असलेली बिर्याणी जीव की प्राण.

तळलेला कांदा भरपूर असलेली

आंवयंस. हे पाहिजेच.

अद्द्या's picture

1 Mar 2016 - 12:02 pm | अद्द्या

मश्रूम ?

sagarpdy's picture

2 Mar 2016 - 11:31 am | sagarpdy

गाजर ?

अभ्या..'s picture

29 Feb 2016 - 6:48 pm | अभ्या..

काय वल्ली तुला पण ते थर्माकोलच्या भाज्या आवडतेत कुणास ठाऊक. चांगल्या रसदार, टेस्ति भाज्या सोडता आन पनीर च्या नादी लागता.

बाकी पण आवडतेत बे. पनीरवर जरा जीव आहेच. पण मलईकोफ्ता आणि स्टफ ढोबळी पण आमच्या अवडीची..

भरलेली ढोबळी हि द्विरुक्ती तर नव्हे ?

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:53 pm | प्रचेतस

=)) =))

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:53 pm | प्रचेतस

=)) =))

प्रत्येक ढोबळी ही भरलेली असते, पण प्रत्येक भरलेली.....जाऊदे =))

मैत्र's picture

29 Feb 2016 - 7:29 pm | मैत्र

आजच मत्स्यावताराची बिर्याणी हादडली आहे.
अप्रतिम मासा, सुंदर बिर्याणी आणि अतिशय चविष्ट सालान आणि रायता.
फोटू पण काढायचा राहिला इतका उत्तम प्रकार. यापूर्वी कधी मीन बिर्याणी खाल्ली नव्हती. त्यामुळे साशंक होतो पण बहार आली.

बिर्याणी अनेक प्रकारची आणि ठिकाणची आस्वादली आहे, पण मौजे हैदराबाद येथे आरटीसी क्रॉस रोड नामक चौकात मिळणारी श्रेष्ठ बल्लव (अर्थात बावर्ची) याला अजून तोड काही सापडलेली नाही.

अनेक धन्यवाद बट्टमण्णराय.

(बट्टमण्णराये लिहयिले वगैरे संस्कृतात बसवा की)

बावर्ची आणि प्याराडाईज अगदी स्वर्गच.

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 10:43 am | बॅटमॅन

अरे वा वा वा वा वा

तदुपरि मत्स्य बिर्यानी कुठे खादली तेही सांगणेचे करावे ना. आणि मत्स्य अवतारात अनेक कंटक असतात त्याचे काय करतात? की कमी काटेवाले मत्स्यच वापरतात?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Mar 2016 - 8:09 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही बहुदा कलकत्यात राहिलेले आहात, कोणी बंगाली मित्र असल्यास त्याला कलकत्ता बिर्यानी (ह्यात एक मोठा अर्धा आलू असतो घातलेला अख्खा) अन मुर्शिदाबादी माही पुलाव नक्की विचारा! एंड यस हे आइटम्स सरसोंच्या तेलातलेच उत्तम वाटतात

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 10:45 am | बॅटमॅन

ओह येस्स्सार. कलकत्ता बिर्यानीमध्ये जो आलू आहे तो रसभंग करतो असे आपले स्पष्ट मत आहे. "कोषा मांग्शो" नामक एक मटनकरीवजा डिश असते त्यांची, अत्युत्तम. परंतु त्यातही साला तो बटाटा पाहिजेच. =))

बाकी मुर्शिदाबादी माही पुलाव अवश्य विचारतो. समहाऊ या पदार्थाबद्दल तिथे असताना कधी ऐकण्यात आले नाही. अता कोलकाता ट्रिप करीन तेव्हा हे सर्व खाणे आले (भोजो हारि मान्ना किंवा ओ/वॉव कोलकाता).

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Feb 2016 - 2:03 pm | अनिरुद्ध.वैद्य

चुकुन दुष्त बिर्याणी असे वाचले :-)

कोळंबी भात मस्त !

चांदणे संदीप's picture

29 Feb 2016 - 12:33 pm | चांदणे संदीप

\o/ \o/ \o/

बिर्याणीचा उगम इराणात नेमका कधी झाला रे? प्राचीन इराण म्हणजे पर्शियन राजवटीत झाला का नंतरच्या मुस्लिम इराणमध्ये?

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 2:08 pm | बॅटमॅन

नक्की माहिती नाही. बहुधा प्राचीन काळातच असावासे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Feb 2016 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. धन्स.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

29 Feb 2016 - 12:04 pm | सस्नेह

अति-रुचकर स्त्रोत्र !

जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही.

...हे भारी !
बाकी, सचित्र बिर्याणी आणखी मजा आणून गेली असती !

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 12:10 pm | बॅटमॅन

सचित्र बिर्याणी टाकल्यास सुट्टी टाकून बिर्याणी खावयास पळावे लागले असते. :)

राही's picture

29 Feb 2016 - 12:10 pm | राही

भट्टमान्य, वाचूनच तृप्तीप्रत पावल्या गेले आहे.
लेखनसन्याससन्यस्तीमुळे आनंदित.

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Feb 2016 - 2:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

स्तोत्र रोज पठण करुन त्याचे आचरण करण्यात येइल.
बाकि मस्त जमलेय! सोबात मराठितही लिहिल्याने आम्हा असंस्कृतांची सोय झालि!

:)

प्राची अश्विनी's picture

29 Feb 2016 - 2:15 pm | प्राची अश्विनी

भाषाप्रभुत्त्वाला प्रणाम !__/\__

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 2:15 pm | नीलमोहर

हे असलं काही पूर्ण संस्कृतमध्ये लिहायचं म्हणजे (बिर्याणी) खायचं काम नव्हे :)

नाखु's picture

29 Feb 2016 - 2:23 pm | नाखु

पन्नास पुर्ती निमीत्त खवय्ये मिपाकर ज्या भागात असतील तेथील किमान १० बिर्याणी आमंत्रणे,बिर्याणीचे १०१ प्रकार ही पाक पुस्तीका आणी जे पी लिखित जाल सन्यास : शाप की वरदान ही ५०० पानी छोटेखानी पुस्तीका देऊन बॅट्टमण यांचा सत्कार करणेत येत आहे.

अखिल मिपा सत्कार महासंघ्,आद्य बिर्याणी प्रेमी रूचीरा मित्र मंडळ्,आणि हटेला चिमणची वल्ली संचालीत टल्ली नसलेली गँग.

सत्कार झाला का नाही पाहण्या साठी आलतो..=))=))

अलिकडे तुमचं सत्कार कमिटीकडे लक्ष नाही बर्र का जेपीभौ ! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

बिरयानी खाण्यात मशगूल असल्याने उशीर झाला काय ?

सूड's picture

29 Feb 2016 - 2:39 pm | सूड

कं लिवलंय कं लिवलंय!!

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 3:09 pm | मुक्त विहारि

झक्कास

पार्सल घ्यायला जात आहे.

उगा काहितरीच's picture

29 Feb 2016 - 3:56 pm | उगा काहितरीच

बिर्याणी कट्ट्याला जोरदार अनुमोदन.
रच्याकने काय लिहीलय . खल्लास !

सुधांशुनूलकर's picture

29 Feb 2016 - 4:24 pm | सुधांशुनूलकर

কিটি সুন্দর লিখতে তুমি!

আপনি আমার নমস্কার!! _/\_

बिर्याणी कट्ट्याला जोरदार अनुमोदन.

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 4:26 pm | बॅटमॅन

অনেক ধন্যবাদ নূলকর কাকু। বাংলায় প্রতিসাদ দেখে বেশ ভাল লাগল। :)

अभ्या..'s picture

29 Feb 2016 - 4:50 pm | अभ्या..

अबडक तबडक घोडोबा । घोड्यावर बसले लाडोबा । लाडोबाचे लाड करतय कोण । आजी आजोबा आत्या दोन । :)

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 6:26 pm | बॅटमॅन

जावक धनादाळ हलकट काकू

लोल

सुधांशुनूलकर's picture

1 Mar 2016 - 3:04 pm | सुधांशुनूलकर

जावक धनादाळ हलकट काकू..
बेक्कार हस्तोय काल्पास्नं!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2016 - 6:09 pm | अत्रुप्त आत्मा

असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13||

||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif धन्य रे खाटुका.. __/\__ धन्य तुझी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif
काय मेल्याची बुद्धी चालते तरी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

आता हे स्वर लाऊन पाठ करतो... आणी आमच्या भटुकात कामात म्हणतो..
बघू रांडिचं कुण्णाला काय कळतं का ते! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif