|| बिर्याणीस्तोत्रम् ||

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
28 Feb 2016 - 2:16 pm

नमस्कार लोकहो,

मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो:

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

अथ ध्यानम्|

ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||

एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||

कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||

जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः|
सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4||

अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: |
शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5||

बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते |
विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6||

उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: |
तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7||

तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः|
सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8||

नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् |
यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9||

द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४]
चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10||

ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते |
खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11||

अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि |
स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12||

असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13||

||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||

टीपा:

[१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी.

[२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी)

[३] लखनौ.

[४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी.

=====================================================

मराठी भाषांतर

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1||

तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2||

कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3||

( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4||

त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5||

बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6||

मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7||

(तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8||

हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9||

द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10||

याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11||

जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12||

जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13||

===============================================

आरोग्यदायी पाककृतीइतिहास

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

29 Feb 2016 - 6:14 pm | संजय पाटिल

हा हा हा
बुवा म्हणा,... पण जरा सांभाळून,

बॅटमॅन's picture

29 Feb 2016 - 6:14 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

म्हणाच आत्मूस हे. "प्रणम्य शिरसा देवम्" किंवा "भीमरूपी" ची चाल बसते याला. म्हणा अन कळवा!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2016 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif ह्या ह्या ह्या ह्या!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif श्राद्धाच्या भोजनाला बसताना(जेवण वाढले जात असताना..) अन्नसूक्त म्हणातात.. त्याच्या जागी हे चित्रान्न सूक्त म्हणतो..आणि पकडलनीत कुणी तर सांगेन मेल्ल्यांना.. की "हराम्यांन्नो प्रत्यक्ष श्राद्धान्न हेच मांस समान मानणारे टनाटनी तुम्ही..आणि मग मी त्याजागी आणलेल्या उडीदवड्यांना स्मरून हे सूक्त म्हटले..तर ते तुमच्याच टनाटन फ्राय धर्माला सु-संगत नै का होणार!? http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif
मग मात्र दातखीळ बसेल मेल्यांची! =))

सम्भाळा, ट्राय अ‍ॅट युवर ओण रिक्स बरंका!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 3:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता हे स्वर लाऊन पाठ करतो... आणी आमच्या भटुकात कामात म्हणतो..
बघू रांडिचं कुण्णाला काय कळतं का ते!

करा करा, प्रयोग करा (आपल्या जबाबदारीवर ) :) ;) =))

पॉइंट ब्लँक's picture

29 Feb 2016 - 6:18 pm | पॉइंट ब्लँक

लै भारी!

मूकवाचक's picture

29 Feb 2016 - 6:39 pm | मूकवाचक

__/\___

मदनबाण's picture

29 Feb 2016 - 6:53 pm | मदनबाण

हा.हा.हा... :)
मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anari

बत्तमानशास्त्री थोर आहेत! जबरदस्त!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Feb 2016 - 8:46 pm | भाग्यश्री कुलकर्णी

काय भारी लिहलायस.खरच दंडवत तुझ्या संस्कृत ज्ञानाला.

सटक's picture

29 Feb 2016 - 9:47 pm | सटक

___/\___ अतीच भारी आहे!

भंकस बाबा's picture

29 Feb 2016 - 9:55 pm | भंकस बाबा

.....

सुमीत भातखंडे's picture

29 Feb 2016 - 10:25 pm | सुमीत भातखंडे

साष्टांग नमन.
चवदार काव्य.

इष्टुर फाकडा's picture

29 Feb 2016 - 11:14 pm | इष्टुर फाकडा

आवडले !

शेवटच्या ओळी गधेगाळ आहे.

अन्नू's picture

1 Mar 2016 - 2:22 am | अन्नू

काय ते स्त्रोत! एक शब्द एका दमात बोलेन तर शप्पथ!
ते मेलं स्त्रोत म्हणताना आमच्या जिभेचं इकडं तुकडं पडलंन! :(

संजय पाटिल's picture

1 Mar 2016 - 7:36 am | संजय पाटिल

९८...
सेन्च्युरी झाली का ते बघायला आल्तो..

मुक्त विहारि's picture

1 Mar 2016 - 8:19 am | मुक्त विहारि

१००

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Mar 2016 - 8:27 am | कैलासवासी सोन्याबापु

वडकी गावात जत्रेचे आमन्त्रण होते तिथे मेंढी कापलेली पाव्हण्यांसाठी. फक्त दोन डिशेस. एक म्हणजे मटण करी अन एक ड्राय मटन- फक्त तेल-मीठ लावून फ्राय केलेले. आणि सोबत भाकर्‍यांची चळत. अन सोबत आग्रह करू करू वाढणारे यजमान लोक्स

एक किस्सा आठवला,आमच्या एका मित्राला पुतण्या झाला म्हणून कळवण-सटाणा (जिल्हा नाशिक) मधे गावी बोलवले होते आम्हाला, बोकड़ कापुन गावजेवण वगैरे होते, तिकडे एक पद्धत होती, तेल मीठ लावुन फ्राय केलेले पीस वेगळे अन रस्सा (हाडे घालुन) वेगळा शिजवलेला. वाढताना एक गड़ी द्रोणात काही बोट्या घाली मागून एक दूसरा गड़ी बादली मधे रस्सा घेऊन त्या बोट्यांवर रस्सा ओतत पुढे जाई.

तर आम्ही एकंदरित ५ पोरे पंगतीत बसलेलो होतो मी उजवीकडून शेवटला अन माझ्या शेजारी एक म्हातारा बसला होता. प्रथम द्रोण आले मग बोटी वाला गड़ी मुठ मुठ बोट्या वाढून गेला तेव्हा त्या म्हाताऱ्याने त्या पोराला बोलवुन एक मुठ बोट्या अजुन घेतल्या. आता साहजिक आहे की त्याला बोट्या जास्त प्रिय असणार तर त्याने त्या द्रोणातुन काढून पत्रावळीवर ठेवल्या त्या बोट्या कारण त्याला बहुदा रश्यात भिजवुन बोट्या खायच्या नव्हत्या. तितक्यात रस्सा वाढणारा पोर्या आला रस्सा वाढत त्याने म्हाताऱ्याची कामगिरी पाहिली अन त्याला वाटले बोटीवाल्याने घाई केली का काय त्याने म्हाताऱ्याला रस्सा वाढला, बोट्या काढून ठेवलेल्या पाहून त्याला वाटले असेल की त्या म्हाताऱ्याला चावायच्या नाहीत तेव्हा ,त्याने ओरडून बोटी वाल्याला थांबवले मग भास्सकन म्हाताऱ्याच्या पानातल्या बोट्या उचलल्या अन धावत जाऊन परत बोटीच्या ट्रे मधे टाकून परत आपला रस्सा वाढायला निघुन गेला! म्हाताऱ्याला बोलता ही येइना अन न बोलावता राहिना!! अन शेजारी आम्ही पोरे आडवी होऊन ठो ठो हसतं बसलो होतो

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 10:49 am | बॅटमॅन

अगागागागा लैच =)) =)) =)) =)) हे असे होते म्हातारे झाले की. =)) =))

यावरून विनोबाजींचा किस्सा आठवला. गांधीजींच्या शेजारी ते जेवायला बसले. त्यांना कार्ल्याची भाजी आजिबात आवडत नसे. त्यामुळे ताटात ती पाहताच प्रथम फस्त केली. गांधीजींना नेमकं उलटं वाटलं आणि त्यांनी अजून कार्लाभाजी वाढायला सांगितली. =)) =)) =))

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 9:04 am | एक एकटा एकटाच

घालीन लोटांगण

अनुप ढेरे's picture

1 Mar 2016 - 11:47 am | अनुप ढेरे

जबरी!

अद्द्या's picture

1 Mar 2016 - 12:05 pm | अद्द्या

बॅटमॅन

च्यायला काय लिहिलंय _/\_

राजे.. जेव्हा कधी परत भेटाल तेव्हा आधी पाय धरीन तुमचे या स्तोत्रासाठी :D

मालोजीराव's picture

1 Mar 2016 - 12:06 pm | मालोजीराव

एकदम झकास…समजण्यासाठी अर्थात भाषांतर वाचावं लागलं

इरसाल's picture

1 Mar 2016 - 12:23 pm | इरसाल

असले स्तोत्र टाकुन अत्याचार केल्याबद्द्ल बॅट्याकडुन मला एक बिर्याणी लागु .

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:26 pm | भरत्_पलुसकर

बिर्याणी बिर्याणी बिर्याणी
बॅटमन को प्यारी है बिर्याणी!
भात काय इशेश आवडत नाय तवा माजी बी बिर्याणी तुलाच घे भावा.

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 1:53 pm | बॅटमॅन

कुर्बानी कुर्बानी कुर्बानी

https://www.youtube.com/watch?v=-qx03akOBCk

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 2:11 pm | भरत्_पलुसकर

तसं नाय
कोंबडीची कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
असं म्हणा बरं.

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 2:18 pm | बॅटमॅन

अगदी.

रमेश आठवले's picture

2 Mar 2016 - 3:47 am | रमेश आठवले

या वरून मला पण आठवले .
इंदिरा गांधी यांनी टी. अन्जैया यांना १९८०-८२ या काळात आंध्रचा मुख्य मंत्री केले होते . त्याच काळात हा सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यावरून हैद्राबाद मध्ये-
बिर्यानी बिर्यानी बिर्यानी अन्जयाको प्यारी है बिर्यानी-
असे विडम्बन प्रचलित झाले होते

सुचिकांत's picture

1 Mar 2016 - 2:17 pm | सुचिकांत

बॅटमॅन - भारीच लिहिलं आहे तुम्ही.

नाखु's picture

1 Mar 2016 - 2:21 pm | नाखु

बॅटमॅन - कसं सुचत हो तुम्हाला असं

मालोजीराव's picture

1 Mar 2016 - 2:38 pm | मालोजीराव

बॅटमॅन - कसं कसं सुचत हो तुम्हाला असं

नाव आडनाव's picture

1 Mar 2016 - 2:23 pm | नाव आडनाव

एक फोटू टाकू म्हंजी धागा खंप्लीट होइल -

(फोटू - गूगलदेवाची कृपा)

अत्ताच फटूही दिसला. धन्यवाद संपादक लोक्स. अता लौकरच बिर्याणी हदडणे आले.

अन्नू's picture

1 Mar 2016 - 11:30 pm | अन्नू

याला म्हणतात वशाट!!!! ;)

माहितगार's picture

1 Mar 2016 - 8:10 pm | माहितगार

__/\__ मस्त (बिर्याणीची) भूक लागली !

आतिवास's picture

1 Mar 2016 - 9:09 pm | आतिवास

मिसळपावचे वाचक नसलेल्या माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना हा दुवा पाठवला.
त्या सर्वांना हे स्तोत्र आवडले, त्यांची दाद तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा प्रतिसाद.

आवर्जून इतर मित्रमैत्रिणींना दुवा पाठवल्याबद्दल आमचा येक दुवा घ्यावा. अनेक धन्यवाद :

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2016 - 2:15 am | श्रीरंग_जोशी

क लिवलय क लिवलय.__/\__

अवांतर - इब्राहिम अफगाण यांचा लोकप्रभेतील हा लेख आठवला.

बॅटमॅन's picture

2 Mar 2016 - 11:20 am | बॅटमॅन

काय लेख आहे राव. एक लंबर!!!!

नंदन's picture

2 Mar 2016 - 5:32 am | नंदन

बिर्याणीचा पंक्तिप्रपंच सुरेख जमून आला आहे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2016 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार

वाल्गुदशास्त्री तुम्हाला मन:पूर्वक दंडवत.
काय लिवलय काय लिवलय.
पैजाराबुवा,

रायनची आई's picture

2 Mar 2016 - 4:25 pm | रायनची आई

मस्त लिहिलय..हे अस लिहायला खूप प्रतिभा लागते...
आम्ही बान्द्रा च्या "लकी चिकन बिर्यानी" चे फ्यान आहोत..आठवणीनेच तोंडाला पाणी सुटल..यम्मी : )

प्रमोद देर्देकर's picture

3 Mar 2016 - 2:20 pm | प्रमोद देर्देकर

दोन वर्षांपुर्वी तुम्हाला व्य.नि. केला होता आम्ही आठवतंय का?
तुमचे चरण कुठे आहेत साहेब ?

||अतः बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं प्रातःकाली स्मरंणम् ||

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:42 pm | रातराणी

_/\_
महान!