संध्याछाया..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Feb 2016 - 7:15 pm

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.

माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?

दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?

हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी

घेऊन जातो जन्म खुणा मी माझ्या या संध्येशी..
अशीच भेटो संध्या छाया पुनः पुन्हा या देशी..

झाले लिहून सुचले जितुके अता जरा मी 'येतो!'
मिळालेच जे दान हाताला तुमच्या हाती देतो.
-----०-----०-----०------०----
शुभ संध्याकाळ..

भावकविताशांतरसकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

18 Feb 2016 - 7:17 pm | जव्हेरगंज

वा वा !!!

प्रचेतस's picture

18 Feb 2016 - 7:23 pm | प्रचेतस

हम्म.
संगमेश्वर , सासवड :)

सतिश गावडे's picture

18 Feb 2016 - 10:59 pm | सतिश गावडे

सोपानदेवांची समाधी की नदी पल्याडचे शंकराचे मंदिर?

प्रचेतस's picture

18 Feb 2016 - 11:11 pm | प्रचेतस

नदीपल्याडचे.

जेपी's picture

18 Feb 2016 - 7:32 pm | जेपी

सहज..सोपी..रचना..

फोटोही चांगला आहे!या लवकर पहाटेच्या भुपाळ्या घेऊन.

स्पा's picture

18 Feb 2016 - 7:58 pm | स्पा

अप्रतीम रे बुवा, मस्तच

बरखा रितू आयी असे काहीतरी !

स्पा's picture

19 Feb 2016 - 12:28 pm | स्पा

https://www.youtube.com/watch?v=90xd79TJ55s

हे घ्या चौरा काका , माझा आवडता राग आणि आवडती चीज

गौरी लेले's picture

18 Feb 2016 - 8:17 pm | गौरी लेले

अप्रतिम!

खुपच सुंदर कविता आत्मबंध ! एकदम हळुवार . फारच छान :)

लिहित राहा !

लेले मॅडम ते अत्मबंध असे आहे

गौरी लेले's picture

19 Feb 2016 - 12:54 pm | गौरी लेले

नमस्कार स्पा ,

तुमचे व्याकरण कच्चे आहे असे दिसते. अत्मबंध ला काहीच अर्थ नाही , आत्मबंधच योग्य असावे आपण त्यांनाच विचारुयात का ? :)

अरे वा!! लेले आत्या, बरेच दिवसांनी दिसलात?

सतिश गावडे's picture

18 Feb 2016 - 11:03 pm | सतिश गावडे

सुंदर नाव असलेल्या आयडीला आत्या काय म्हणतो? वशाड मेलो.

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 12:21 pm | टवाळ कार्टा

गौरी नाव असलेल्या आयडीला सुंदर म्हणतो....वशाड मेलो

गौरी लेले's picture

19 Feb 2016 - 12:55 pm | गौरी लेले

वशाड मेलो म्हणजे काय ?
कृपया शिव्या देवु नयेत .
आणि व्यक्तिगत टिपण्णी टाळल्यास आनंद होईल :)

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 1:06 pm | टवाळ कार्टा

वशाड मेलो म्हणजे काय ?

कॉलींग सूड

कृपया शिव्या देवु नयेत .

"वशाड मेलो" म्हणजे काय ते माहित नसताना ती शिवी आहे असे आपणांस का वाटले? आणि तसे नसल्यास उरलेल्या वाक्यात नेमका कोणता शब्द शिवी आहे? बरे...मी दिलेली प्रतिक्रिया गावडे सरांना होती...त्याबद्दल त्यांनी आक्षेप घ्यावा...ना धागा तुमचा ना प्रतिक्रिया तुमच्या प्रतिसादावर मग तुम्हाला का आक्षेप? आणि आक्षेप आहे असे मानले तरी मग माझ्याच प्रतिसादावर आक्षेप का? गावडेसरांनीसुध्धा सूडजींना असाच प्रतिसाद लिहिला आहे...त्यावर आक्षेप का नोंदवावासा वाटला?

आणि व्यक्तिगत टिपण्णी टाळल्यास आनंद होईल :)

नक्की काय व्यक्तीगत टिप्पणी केलीये? "गौरी" नाव असलेल्या आयडीला "सुंदर" अश्या नावाने का संबोधावे?

गौरी लेले's picture

19 Feb 2016 - 1:09 pm | गौरी लेले

आत्ता कळाले तुम्हाला मुली शोधाण्यातले frustration का येते ते !

काळजी घ्या , विचारसरणी सुधारा , नाहीतर अवघड आहे !

शुभेच्छा :)

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 1:12 pm | टवाळ कार्टा

नक्की काय काळजी घ्यावी आणि नक्की कोणते विचार सुधारावे तेसुध्धा जरा सांगता का (जमत असेल तर)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2016 - 1:35 pm | अत्रुप्त आत्मा

क्रिप्या वेगळा धागा काढता का?

त्यांचं नाव गौरी आहे म्हणून आत्या म्हटलं, त्यांचं नाव 'सुंदर' असतं तर काका म्हटलं असतं. ;)

एक एकटा एकटाच's picture

18 Feb 2016 - 8:18 pm | एक एकटा एकटाच

वाह

मान गए उस्ताद

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Feb 2016 - 8:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी

सुंदर

एकप्रवासी's picture

18 Feb 2016 - 8:45 pm | एकप्रवासी

फोटो पण छान आहे

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2016 - 9:03 pm | टवाळ कार्टा

आवर गुर्जी ईज ब्याक वित ब्यांग :)

एस's picture

18 Feb 2016 - 10:44 pm | एस

छान कविता!

सतिश गावडे's picture

18 Feb 2016 - 10:58 pm | सतिश गावडे

छान कविता !!

पैसा's picture

18 Feb 2016 - 11:01 pm | पैसा

फोटो पण अगदी सुंदर आलाय!

नाखु's picture

19 Feb 2016 - 9:31 am | नाखु

बुवांच्या आयुष्यात सप्तरंगी पहाट उजळली !
आणि त्यामुळे(च)
सुरमयी संध्याकाळ त्यांना आकळली !

नाखु चारोळीवाला

यशोधरा's picture

19 Feb 2016 - 9:39 am | यशोधरा

अशेच मंते.
ते भावविश्व खंप्लीट करायला सांगा तेव्ह्ढं.

बुवा मस्तच हो. कविता पण आणि फोटो पण. तेवढे फोटोतल्य वायरी तेवढ्या तुमच्या लाडक्या पांडुब्बा कडून काढता आल्या अस्त्या तर बहार आली असती. ;)

क्षणार्धात काढून टाकल्या वायरी
पां डुब्बाची कमाल , अखेर दिसली पायरी

बॅटमॅन's picture

19 Feb 2016 - 2:58 pm | बॅटमॅन

* ब्याटबंध

स्पा's picture

19 Feb 2016 - 3:00 pm | स्पा

लोलबंध

पुढे लिहायचं झालंच तरः
जिलबी आली भायरी
वडगाव शेजारी धायरी!! =))

पुढे लिहायचं झालंच तरः
जिलबी आली भायरी
वडगाव शेजारी धायरी!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2016 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

@

पां डुब्बाची कमाल , अखेर दिसली पायरी

>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy023.gif
खाटूकबंधे 'अखेर' , आंब्याची केली कैरी! Llllllluuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif
----------------------------
स्पा
@लोलबंध >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy025.gif पांडूछन्द! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif
-----------------------------
सूड
@पुढे लिहायचं झालंच तरः
जिलबी आली भायरी
वडगाव शेजारी धायरी!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry007.gif
काढून बंदुका भायेरी
झाडा http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent099.gif सुडक्या वर फैरी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif

फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.

यशोधरा's picture

20 Feb 2016 - 9:28 am | यशोधरा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2016 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा

@फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.>> कशाला हो ते सारखं सारखं निरर्थक स्वात्म कुंथन!? http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

प्रचेतस's picture

20 Feb 2016 - 9:47 am | प्रचेतस

केवळ यमक जुळवण्यासाठी ओ.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2016 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा

असोच्च हो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

कसं जमतं हो तुम्हाला?

चाणक्य's picture

19 Feb 2016 - 2:02 pm | चाणक्य

.

कविता अण फटू दोणी छाण हाये...अता हिकडं येकदा जाऊन यावं म्हण्टो.

सुमीत भातखंडे's picture

19 Feb 2016 - 3:03 pm | सुमीत भातखंडे

.

सांजसंध्या's picture

20 Feb 2016 - 7:47 am | सांजसंध्या

अतिशय सुंदर कविता. सकाळी सकाळी वाचली तरी कवितेचा मूड जाणवला...

फोटोमुळे वेगळाच इफेक्ट आला. पण दिला नसता तरी कातरवेळचं देवालय आणि संध्याकाळ हे खूप आवडलं. शेवटचं कडवं गंभीर करून जातं.

किसन शिंदे's picture

20 Feb 2016 - 6:13 pm | किसन शिंदे

फोटो आणि कविता आवडली. स्पावड्याने एडीट केलेला फोटो मस्त आलाय.

हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी

मस्त एकदम